LetsUpp Marathi
4.86K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂️ *नांदेडात आणखी तिघांना कोरोनाची लागण*

*LetsUp l Nanded*

मागील काही दिवसांपासून नांदेडात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढ आहे. त्यातच शुक्रवार दि. ८ रोजी आणखी तीन नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.

राज्यभरात सुरूवातीला रुग्णांची संख्या वाढत असतांना मात्र, नांदेड जिल्हा तब्बल एक महिना ग्रीनझोन मध्ये होता;परंतु शहरातील पीरबुह्रानगर येथे 22 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.

यानंतर कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजघडीला अबचलनगर परिसर कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू ठरला अाहे. सर्वाधिक रुग्ण गुरुद्वारा परिसरात आढळत आहेत.

दि. ७ मे रोजी २३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका महिलेसह अन्य दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण अबचलनगर येथील पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात आले.

तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💁‍♂️ *नाशिक शहरात कोरोनाचे नवे 15 रुग्ण, पन्नाशीकडे वाटचाल*

*LetsUp l Nashik*

मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील कोरोनाने विळखा घातला आहे. शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात 15 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे. यामुळे शहरातील आकडा 41 झाला आहे.

नाशिक शहरात देखील गेल्या तीन दिवसांपासून रोज कोरोना हे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहे. शहरात कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली असून आता नवीन आलेले रुग्ण हे आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहे.

त्यातच आता जिल्हा प्रशासनाने खाजगी अस्थापनांनाही दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिल्याने बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शहरवासीयांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय सकाळ पासूनच दारू दुकानावर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत.

दरम्यान सकाळी आलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे सातपूर, सिडको, पाथर्डी फाटा आणि अन्य परिसरातील असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.

शहरात आता पर्यंत 41 रुग्ण असून लवकरच शहर पन्नाशी पूर्ण करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगावमधूनच नाशिक मध्ये कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💁‍♂️ *रिक्षाचालकांसाठी माणुसकीचा हात*

*LetsUp l Pimpri chinchwad*

लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे. हे लक्षात घेवून थेरगाव सोशल फाऊंडेशनतर्फे रिक्षाचालकांना पंधरा दिवस पुरेल इतके अन्न धान्य भाजी पाल्याचे किट देण्यात आले.

गेल्या दीड महिन्यापासून रिक्षा चालकांची रिक्षा वाहतूक बंद आहे. हॉस्पिटलला जायचे, ऑफीसला जायच आहे, मुलांना शाळेत सोडायच आहे, घरातला किराणा माल आणायचा आहे प्रत्येक सुख दुःखात धाऊन येणार्‍या रिक्षा चालकांना थोडासा हातभार म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🗞 *जिल्हानिहाय ठळक घडामोडी*

*LetsUp l Sangali*

सांगली : कोतीज येथील मुंबईस्थित 55 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील 11 जणांची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह

▪ सातारा : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली घटना, गुन्हा दाखल

---------------------
*Advertisment On LetsUp*
*Contact* : 7798655655
----------------------

▪ राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 974 वर पोहचली; आरोग्यमंत्री राजेश टोपे

▪ एकजुटीने संकटातून राज्याला बाहेर काढू, सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *तंबाखूच्या गोडाऊनवर एलसीबीची धाड...*

*LetsUp | Beed*

शहरातील इमामपूर रोडवर आज दुपारी एलसीबीच्या टीमने तंबाखूचा गोडावूनवर धाड टाकली.यावेळी त्या ठिकाणी जवळपास अडीचशे पोते तंबाखूचा साठा आढळून आल्याचे समजते.

सदरील साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यासंदर्भात एलसीबीकडे विचारणा केली असता कारवाई झाल्याचे सांगितले मात्र अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

शहरातील इमामपूर रोड भागात एका गोडाऊनमध्ये तंबाखूचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने या ठिकाणी कारवाई केली.

गोडाउनमध्ये जवळपास 250 पोते तंबाखू आढळून आली. टेम्पो मागवून साठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो साठा पेठ बीड पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान सदरील तंबाखू ही सुटी विक्री करण्याची असून संबंधित मालकाने मात्र हा माल फेब्रुवारीमध्ये मागवला होता असे सांगून पोलिसांना जीएसटी बिलासह पावत्या दाखवल्याचे समजते.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🧐 *युनियन बँकेत चोरीचा प्रयत्न; दोघाना अटक*

*LetsUp l Ahmednagar*

लॉकडाऊनच्या काळात नगर शहरातील युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

कोम्बिंग ऑपरेशन करत पोलिसांनी या दोन चोरांना अटक केली. उसवाल इंपीरियल चव्हाण, सेन्थाँल अस्तंनदुर काळे (दोघे रा.कुरणवस्ती, वाळुंज, ता.नगर), असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक विकास वाघ, गुन्हे शाखेचे पोसई सतिष शिरसाट, पोसई मनोज कचरे, पोना गणेश धोत्रे, नितीन शिंदे, शाहीद शेख, पोकाँ सुजय हिवाळे यांनी ही कारवाई केली.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *भारत-चीन मधील तणाव वाढला*

*LetsUp l Update*

⚡ भारत व चीन यांच्यात लद्दाखमध्ये तणाव वाढला आहे. चीनचे अध्यक्ष सतत भारतीय भागात त्याच्या विस्तारावर भर देत आहेत. दरम्यान, चीनने लद्दाख सीमेवर पेट्रोलिंग वाढवल्याची माहिती मिळाली आहे.

💁🏻‍♂️ *पेट्रोलिंगही वाढवले* : पॅनोंग त्सो तलावाजवळ चीनने अधिक नौका उतरवल्या आहेत. यासह चीनने येथे पेट्रोलिंगही वाढवले आहे. चीन पेइचिंग लद्दाखमधील भारताचे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे.

🧐 *आरोप* : चिनी हेलिकॉप्टर या विवादित सीमेजवळ पाहण्यास मिळाले. चीन बीजिंगच्या सीमेवर खूप आक्रमक होत आहे. त्याचवेळी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी करत भारतावर सीमा उल्लंघनाचा आरोप केला आहे.

👀 *चीनचे मत* : 'चीनच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी भारतीय सैन्याने चीन-भारत पश्चिम विभाग आणि सिक्किम विभागाची सीमा ओलांडली.' भारताने त्वरित सैन्य मागे घ्यावे आणि आहे त्या स्थितीत रहावे. आधीही अनेकवेळा भारताने सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप चीनकडून केला गेला आहे.

📌 भारतीय लष्कराकडून सीमेवर गस्त वाढविण्यात आली आहे. सध्या सीमेवर भारत-चीन सैन्यात झालेल्या चकमकींबद्दल माहिती मिळालेली नाही, मात्र अद्याप सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
😋 *मँगो केक*

*LetsUp I Recipe*

*साहित्य* : दीड कप कणीक, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 100 ग्रॅम बटर, 200 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 1 कप मँगो प्युरी, 3-4 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून व्हेनिला इसेंस.

*कृती* :

● सुरुवातीला ओव्हनला 180 डिग्री सें. वर 15 मिनिटापर्यंत प्रीहीट करा.
● कणकेला बारीक चाळणीने चाळून घ्या.
● यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिसळून वेगळे ठेवा.
● एका बाऊलमध्ये बटर, मँगो प्युरी, कंडेंस्ड मिल्क, साखर आणि व्हेनिला इसेंस फ्लफी होईपर्यंत फेटून घ्या.
● आता यात कणीक मिसळून एकाच दिशेने परत फेटा. या मिश्रणाला केक टिनमध्ये घाला.
● प्रीहीट ओव्हनमध्ये केक टीनं ठेवून 40 मिनिटापर्यंत बेक करा.

🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* :
http://bit.ly/Letsupapp
🎯 *करिअर : सायकोलॉजिस्ट*

*LetsUp I Career*

आकडेवारीचा विचार केला तर भारतातील तब्बल ७ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या मानसिक आजारांनी ग्रस्त आहे. गेल्या काही महिन्यांचा विचार केला तर यात आणखी भर पडली असेल. भारतात इतर रोगांचे अनेक तज्ज्ञ असले तरी मानसिक आजारांवर प्रभावी उपचार करणाऱ्या मनोचिकित्सकांची अजूनही कमतरता आहे. त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता.

🤓 *कामाचे स्वरूप* : मानसिक रुग्णांना कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी मदत करणे, त्याचे मानसिक संतुलन व्यवस्थित राखणे. या रुग्णांचा व्यवहार सामान्य करणे, गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देणे ही कामे मनोवैज्ञानिकाला करावी लागतात.

💁 *रोजगाराच्या संधी* : समाजकल्याण संस्था, संरक्षण क्षेत्र, सार्वजनिक आरोग्य केंद्र, तुरुंग, रुग्णालय, एनजीओ, थेरपी सेंटर, कौन्सिलिंग सेंटर, विद्यापीठे, शाळा, औद्योगिक कार्यालये इत्यादींमध्ये समुपदेशक म्हणून नोकरी मिळू शकते.

कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्याला नामांकित मनोवैज्ञानिक/कौन्सिलरच्या हाताखाली प्रॅक्टिस करण्याचीही संधी मिळते. तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट व्यसनमुक्ती केंद्रातही समुपदेशक म्हणून काम करू शकतो.

शिक्षक, मनोवैज्ञानिक सल्लागार, करिअर कौन्सिलर, सायकोलॉजिस्ट, मॅरेज कौन्सिलर, चाईल्ड कौन्सिलर आदी पदांवर काम करण्याची संधी मिळते.

विविध औद्योगिक कार्यालयांत सायकोलॉजिस्ट विषयातील तज्ज्ञांना कामगार कल्याण अधिकारी पदावर नियुक्त केले जाते. शिक्षक म्हणूनही खासगी आणि आता तर शासकीय शाळांमध्ये सायकोलॉजिस्ट नियुक्त करण्याचे चलन वाढत आहे.

*पात्रता* : ग्रॅज्युएशननंतर तीन वर्षांचा बी.ए. (ऑनर्स) कोर्स उपलब्ध आहे. तसेच उमेदवाराला नामांकित संस्थांमध्ये परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो.

अभ्यासक्रमात सायकोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, इंट्रॉडक्शन टू कौन्सिलिंग, कौन्सिलिंग सायकोलॉजी, व्होकेशनल गायडन्स, चाइल्ड सायकोलॉजी, बिहेव्हिअर सायन्स, कौन्सिलिंग प्रोग्राम, रिसर्च मेथडोलॉजी आदी विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* :
http://bit.ly/Letsupapp
🧐 *खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे शुल्क ठरवा*

*LetsUp l Update*

⚡ खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी मोजावे लागणारे अधिकचे पैसे लवकरच कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत. कोरोनाचे निदान करणाऱ्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी आकारले जाणाऱ्या शुल्काबद्दल धोरण ठरवण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) राज्यांना दिले आहेत. परिषदेने सध्या घेतले जाणारे 4500 रुपये शुल्क रद्द केले आहे.

💁🏻‍♂️ *सचिवांना पत्र* : कोरोना चाचणीच्या शुल्काबद्दल धोरण ठरवण्याचे निर्देश आयसीएमआरने राज्यांना दिले आहेत. परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गवा यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सचिवांना पत्र पाठवले आहे.

👍 *उत्पादन* : “त्यावेळची परिस्थिती आणि बाजारातील किंमती लक्षात घेता परिषदेने 4500 रुपये शुल्काची मर्यादा 17 मार्च रोजी घातली होती. आता ही मर्यादा लागू नसणार, चाचणीसाठी लागणाऱ्या किट्सचे उत्पादन देशातही सुरू झाले आहे.

📌 राज्यांनीही चाचणी किट्स खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे पुरवठा साखळी स्थिर झाली आहे. त्यामुळे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी लॅबमध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयातून पाठवले जाणारे नमुने, चाचणीच्या शुल्काबद्दल धोरण ठरवावे. खासगी लॅबशी चर्चा करून योग्य शुल्क ठरवावे,” असे आयसीएमआरने म्हटले आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🏇🏻 *रेडझोनमधून आलेला घोडा क्वारंटाइन!*

*LetsUp l Trending*

⚡ जगभर पसरलेल्या कोरोनामुळे सर्वत्र भीती, दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकजण सावधगिरी बाळगत आहे. छोटीशी चूक कोरोनाग्रास्तांचा आकडा वाढवू शकते हे लक्षात आल्याने आता सर्वतोपरी काळजी घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

💁🏻‍♂️ माणसेच काय पण प्राणी आले तरी संबंधित गावाचे प्रशासन त्याचीही दाखल घेऊ लागले असल्याचा अनुभव जम्मू काश्मीरमध्ये नुकताच आला.

🐎 *घोड्याची तपासणी* : काश्मीरच्या राजौरीमध्ये एकजण त्याचा घोडा घेऊन आला. तो मुघल रोड, काश्मीर घाटीतून आला होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थांबविले तेव्हा तो रेड झोनमधून आल्याचे उघड झाले. तत्काळ प्रशासनाला माहिती देऊन घोडे मालकाचे सँपल तपासणीसाठी घेतले, सोबतच पशुवैद्यकाला बोलावून घोड्याची तपासणी केली.

📌 *पहिलीच घटना* : घोड्याला काही आजार नसल्याचे लक्षात आल्यानंतरही खबरदारी म्हणून घोड्याला 14 दिवस होम क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता घोडा मालकाच्या कुटुंबातील कुणीही घोड्याला 14 दिवस भेटू शकणार नाही. देशात कोरोना संकट आल्यापासून प्राण्याला 14 दिवस क्वारंटाइन करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे समजते.

📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🐛 *टोळधाडीचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी : कृषीमंत्री*

*LetsUp | Update*

⚡ राज्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या टोळधाडीचे संकट आहे. या संकटांशी सामना करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

👍 आतापर्यंत टोळधाड किड्याचा नायनाट करण्यात 50 टक्के यश आले आहे.

🗣️ ज्या भागात हे संकट उभे राहील त्या भागात अग्निशमन बंब आणि ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून हे संकट दूर करण्याचा केले जाईल, असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.

📍 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील बाजार पेठ ठप्प झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान कृषी विभागाचे झाले आहे.

💁‍♂️ त्यामुळे लॉकडाऊनची आणखी आवश्यकता भासल्यास त्यातून कृषी क्षेत्र वगळले जाईल. अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.

👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp News Update*

▪ भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 58 हजार 333 वर पोहचला मागील 24 तासांत 6 हजार 566 नवे रुग्ण

▪ यंदाचा mansun 1 जूनला केरळमध्येच दाखल होणार - हवामान विभागाने वर्तविला अंदाज

▪ कोरोना विषाणूचे संकट टळावे म्हणून पुजाऱ्याने देवीला दिला नरबळी; ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील नरसिंहपूर येथे घडली घटना

----------------------
*Advertisment On LetsUp*
*Contact* : 7798655655
----------------------

▪ बांगलादेशाची राजधानी ढाकामधील गुलशन मार्केट परिसरातील एका हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू तर काही जण जखमी

▪ महाराष्ट्रात संचारबंदी लागू करुन सैन्य तैनात करण्यात येणार असल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार- गृहमंत्री अनिल देशमुख

▪ राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून,कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59 हजार 546 झाली

▪ कोरोना विरोधात लढा देणाऱ्या आणखी 130 पोलिस कर्मचाऱ्यांना गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झाली; तर 2 पोलिसांचा मृत्यू

▪ फुटबॉल प्रेमींसाठी अच्छे दिन ! 17 जून पासून प्रिमीअर लिग स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार

▪ Tik Tok ला टक्कर देण्यासाठी आलं Mitron App; आतापर्यंत 50 लाख पेक्षा जास्त लोकांनी केलं डाऊनलोड

▪ 'खिलाडी' अक्षयचा 'लक्ष्मी बॉम्ब' डिजिटली रिलीज होणार, 1 अब्जहून अधिक किंमतीला विकले गेले राईट्स !

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp