LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🎯 *कोरोनो अलर्ट! वस्तू खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा*

*LetsUp l Special*

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. परंतु एखाद्याला घराच्या आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाजार किंवा किराणा दुकानात जावे लागतच आहे.

तसे, लोक सोशल डिस्टनसिंगचे पालन करताना दिसत आहेत. तरीही तज्ञांच्या मते, कुठीलीही खरेदी करताना खालील काही गोष्टींचे अनुसरण करूनच आपण कोरोनापासून संसर्ग टाळू शकतो. *त्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/3c9gizW

👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🧐 *राज्यात कोरोना पॉझिटिव्ह वाढले!*

*LetsUp l Update*

⚡ राज्यात आणखी 82 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 64 इतकी झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

💁‍♂️ 82 रुग्णांपैकी 59 रुग्ण मुंबईमधील आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनही 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय योजले आहेत. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही तयार केले आहेत.

👀 *येथील रुग्ण* :

● मुंबई : 59
● ठाणे : 05
● मालेगाव : 12
● पुणे : 03
● वसई-विरार : 01
● पालघर : 02

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🛅 *देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन कायम*

*LetsUp | Breaking*

⚡ कोरोनाचा अधिकचा संसर्ग लक्षात घेता देशभरातला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

🧐 *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य भाषणातील महत्वाचे मुद्दे*

● करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन 3 मे पर्यंत कायम राहणार

● 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्यातील स्थितीचे मुल्यांकन करणार

● आता कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेणे हि सर्वांची जबाबदारी आहे

● लॉकडाउन वाढवा ही नागरिकांची मागणी आहे

● सरकारकडून उद्या नवीन नियमावली जारी करणार

● 20 एप्रिलपर्यंत ज्या राज्यात नियंत्रण आणले जाईल, तेथील नियम शिथील केले जातील- मोदी.

● लॉकडाउमुळे आर्थिक नुकसान होतेच, मात्र ते जनतेच्या जीवापेक्षा मोठे मानता येणार नाही

● समस्या दिसता क्षणी आपण त्यावर उपाय करणे सुरू केले

● अन्य देशांशी भारताची तुलना करणे योग्य नसले तरी देखील तुलनेने भारतातील करोनाबाधितांची संख्या ३० टक्क्यांनी कमी- मोदी.

● एखाद्या सैनिकाप्रमाणे देशातील जनता कर्तव्य पार पाडत आहे

● देशव्यापी लॉकडाउनच्या काळात लोकांनी संयम पाळल्याचे दिसले

*या सात गोष्टी जरूर लक्षात ठेवा*

1️⃣ घरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या

2️⃣ लक्ष्मण रेखा ओलांडू नका; सोशल डिस्टनसिंग, घरात बनवलेले मास्क वापरा

3️⃣ शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

4️⃣ आरोग्य सेतू अँप डाउनलोड करा व इतरांनाही याबाबत जागरूक करा

5️⃣ कोणालाही कामावरून काढू नका

6️⃣ गरीब परिवाराची काळजी घ्या त्यांना मदत करा

7️⃣ अत्यावश्यक सेवेतील लोकांचा सन्मान करा

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
*सात मंत्र्यांची उपसमिती स्थापन*

*LetsUp | Update*

राज्यावरील कोरोना संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला संपवणं, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्था, शासनाच्या विविध यंत्रणां युद्धस्तरावर काम करत आहेत. त्यांच्या लढाईला बळ देण्याचं कामही ही समिती करणार आहे. राज्यात २४ मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्र ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठी अकरा तज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
😍 *मार्च-एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ*

*LetsUp | Update*

🗣️ राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या घरगुती, व्यावसायिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.

📝 सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन केल्यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचे वीजबिल प्राप्त होईल.

📆 राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सूचनेप्रमाणे मार्च महिन्याचे बिल भरण्यास महावितरणने 15 मे 2020 तर एप्रिल-2020 चे वीजबिल भरण्यासाठी 31 मे 2020 ची अंतिम तारीख दिली आहे.

🤩 लॉकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

📍 लॉकडाऊनमुळे महावितरणकडून 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे.

🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🎞️ *बॉलिवूडचे सेलिब्रिटी अडकले लॉकडाऊनमध्ये*

*LetsUp | Entertainment*

🔐 देशभर लॉकडाऊन लागू झाल्यावर कित्येक लोक आपल्या घरी परत येऊ शकले नाहीत.

👉 *मनोज वाजपेयी*: मनोज वाजपेयी उत्तराखंडमध्ये शुटिंग करत होते. मात्र त्यांना परत येता आले नाही. ते अशा ठिकाणी अडकला आहे जिथे टिव्ही आणि मोबाईलची रेंजही नाही.

👉 *जॅकी श्रॉफ* : जॅकी श्रॉफ देखील पुण्याजवळच्या फार्महाऊसवर अडकले आहेत आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कुटुंबीयांना आपल्या बद्दल सांगितले.

👉 *जया बच्चन* : जया बच्चनही आपल्या कुटुंबीयांपासून दूर दिल्लीत अडकल्या आहेत.

👉 *जुनैद खान* : आमिर खानचा मुलगा जुनैददेखील पाचगणीतील आपल्या बंगल्यात अडकून पडला आहे.

📆 आता लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे या सर्वांना आहे तिथेच राहावे लागणार आहे.

🎬 *बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🧐 *शरद पवारांचं भाकित; राज्यावर अर्थसंकट!*

*LetsUp l Update*

⚡ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनसंवाद साधला. शरद पवार म्हणाले, ‘देशात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशात कोरोनाचे संकट आहे.

💸 *अर्थसंकट* : लॉकडाउनमुळे उद्योग बंद आहेत. कामगारांची जबाबदारी आणि वाढणारे कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट आले आहे.

💁‍♂️ *भाकीत* : शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे हे परिणाम एक ते वर्ष जाणवतील,’ असे भाकित शरद पवार यांनी केले आहे.

🗣️ *संवाद* : जनतेशी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधताना शरद पवार म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापूर्वी 21 दिवसांचा लॉकडाउन होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.

📌 देशात वाढलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या चिंताजनक आहे. जगातील स्थितीशी याची तुलना करणार नाही. पण, आपण नियमाचे पालन करायला हवे असेही पवार म्हणाले.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
*सातारा व कराड येथील मिलिटरी कॅन्टीन दि. 14 ते 20 एप्रिल या कालावधीत पुर्णत: बंद*

*LetsUp | Satara*

सातारा व कराड येथील मिलिटरी कॅन्टीन दि. 14 ते 20 एप्रिल या कालावधीत पुर्णत: बंद राहणार असून याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी.

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत दि. 3 मे पर्यंत पुन्हा वाढविण्यात आली आहे.

त्यामुळे मुख्यालयाकडून आलेल्या आदेशानुसात दि. 20 एप्रिलपर्यंत मिलिटरी कॅन्टीन बंद राहणार असून पुढील आदेश येईल त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल,

अशी माहिती मिलिटरी कॅन्टीनचे व्यवस्थापक विंग कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली.

🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
*जिल्ह्यातील सेतू, ई-सेतू व महा ई केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश*

*LetsUp | Sangali*

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सेतू, ई-सेतू व महा ई केंद्रावर विविध दाखले व इतर कामकाजासाठी मोठ्याप्रमाणावर लोकांची गर्दी होते.

कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना या विषाणूचे संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्यांच्या संपर्कात आल्याने होते.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सेतू, ई-सेतू व महा ई केंद्रे दिनांक 15 एप्रिल 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते पुढील आदेश होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
*टास्क फोर्सची स्थापना*

*LetsUp | Pune*

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरातील कोराना-१९ विषाणूच्या संसर्गाने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे.

वाढत जाणाऱ्या मृत्यूदरांचे प्रमाण कमी करण्याबरोबर कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी पुण्यातील दहा नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स (कार्य बल गट) स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला पुण्यातील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.

विशेष म्हणजे हे डॉक्टर पुण्यातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत.

🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
*आमदारांनी हाती कात्री घेत पतीराजाची कटींग केली...*

*LetsUp | Beed*

सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांची दाढी-कटींग वाढली आहे. पण बाहेर सलूनची दुकानेच उघडी नाहीत.

पतीराजांची हीच अडचण ओळखून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी स्वतः हातात कात्री घेत आपल्या पतीराजांची कटींग केली.

स्वतः अक्षय मुंदडा यांनी आपल्या फेसबूक पेजवर याचा फोटो देखील पोस्ट केला आहे. लॉकडाऊन झाला त्या दिवसापासून आ.नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा हे मुंबईतच अडकून पडलेले आहेत.

इकडे मतदारसंघाची सारी मदार नंदकिशोर मुंदडा यांच्यावर येऊन पडली आहे. लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडता येत नाही

त्यामुळे वेळ कसा घालवायचा याचा विचार सर्वजण करीत आहेत. अनेकजण आपल्यातील लपलेली कौशल्य तपासून पाहताना दिसत आहेत.

आमदार नमिता मुंदडा यांनीही हाती कात्री घेत आपल्या पतीराजांची कटींग करून आपण एक उत्तम ब्युटीशियन असल्याचे दाखवून दिले आहे.

कटींग झाल्यानंतर अक्षय मुंदडा यांनी एक कमेंट केली असून त्यात ते म्हणतात ‘लॉकडाऊनचा असाही एक फायदा जो माझ्या कायम आठवणीत राहील ! बायको ने आज माझा परफेक्ट हेअरकट केला.

🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
*अमेरिकेच्या नागरिकाविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल*

*LetsUp | Solapur*

एका अमेरिकन व त्याचबरोबर असलेल्या तीन भारतीय नागरिकांनी तोंडाला मास्क न लावल्याने त्याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरिक कोअजारनूर वय ५५, रा. न्यूयार्क, अमेरिका, जोसेफ डायस वय ३५, रा. बेळगाव, राज्य कर्नाटक, अमित रवींद्र पवनीकर वय २७, रा. नंदनवन, नागपूर व लोकनाथ स्वामी वय ७१, रा. आरेवाडी, ता. तासगाव, जिल्हा. सांगली हे चौघेजण अत्यावश्यक सेवा देण्याबाबतचा पास घेऊन थेऊर (पुणे) येथून पंढरपुरातील इस्कॉन मंदिरात आले होते.

त्यांची पंढरपूर जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात आली होती त्या सर्वांना होम कॉरंटाईन केल्ल्याबाबतचा शिक्के मारण्यात आले होते.

हे चौघेजण वाहनांबरोबर परत जाणे अपेक्षित असताना ते परत न जाता इस्कॉन मंदिर पंढरपूर येथे थांबले. तसेच अमेरिकन नागरिक मंदिर परिसरात फिरताना आढळून आले. या सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला.

त्याचबरोबर संसर्गजन्य आजारांचा संसर्गाचे उपाययोजना म्हणून तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधला नव्हता. संसर्गजन्य रोगाचे बाबतीत जीवितास धोका होईल असे निष्काळजीपणा व हायगयीचे कृत्य केले.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
*मालेगावमध्ये बंदोबस्तात वाढ, एसआरपीएफ च्या चार तुकड्या दाखल*

*LetsUp | Nashik*

मालेगाव मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम 144 अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यांवर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यांवर, गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करण्यात आली असतांनाही शहरातील मध्यवर्ती भागात काही नागरिकांचा अजुनही संचार दिसून येत आहे.

अशा नागरिकांना दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी विनाकारण घराबाहे पडू नये असे आवाहन घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेश सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया यांनी केले होते

प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शहरात 502 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून राज्य राखील पोलिस दलाच्या 4 तुकड्या दाखल झाल्या आहेत.

तसेच जळगाव येथून 100 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात करण्यात आली आहे.

मालेगाव शहरात कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट तयार होऊ नये यासाठी शासनाने विशेष दखल घेत मोठा फौजफाटा मालेगाव शहरात पाठविला असून दंडात्मक कारवाई टाळण्यासह आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन पंकज आशियानी यांनी केले आहे

🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
*औरंगाबादेत 58 वर्षीय महिला कोरोनामुक्त*

*LetsUp | Auranagbad*

शहरातील सिडको भागात राहणारी एक 58 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. या महिलेला आज रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

यापूर्वी शहरातील एक महिला कोरोनामुक्त झाली असून तीला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनामुक्त महिलेला 15 दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या लाळेची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 14 दिवसाच्या उपचारानंतर पुन्हा चाचणीसाठी स्कॅब नमुने घेण्यात आले. त्यात त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

खात्रीसाठी चोवीस तासानंतर पुन्हा चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🧐 *आरोग्य सेतूचा विक्रम!*

*LetsUp l Trending*

⚡ केंद्र सरकारने कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅप काही दिवसांपुर्वी लाँच केले होते. या अ‍ॅपने एक नवीन विक्रम केला आहे.

💁‍♂️ *विक्रम* : फक्त 13 दिवसांमध्ये या अ‍ॅपला 5 कोटींपेक्षा अधिक जणांनी डाऊनलोड केले आहे. सोबतच हे अ‍ॅप जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत आले आहे. या बाबतची माहिती नीति आयोगाच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

👉 *रिपोर्टनुसार* : आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपला 13 दिवसांमध्ये 5 कोटी लोकांनी डाऊनलोड केले आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधन केले त्याच्या 24 तासांच्या आत 11 मिलियन युजर्सनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले.

👀 पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपने पोकेमॉन गो गेमिंग अ‍ॅपचा विक्रमदेखील मोडला आहे.

📌 आरोग्य सेतू अ‍ॅप युजर्स कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आला आहे की नाही याची माहिती देते. हे अ‍ॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठीसह 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💁‍♂️ *'त्या' पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात 22 जण*

*Letsup | Solapur*

सोलापुरातील पाच्छा पेठेतील 56 वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते.

या दुकानदाराच्या संपर्कात 148 जण आले असून या सर्वांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी 124 जन निगेटिव्ह तर एक महिला पॉझिटिव्ह आढळली आहे.

'त्या' महिलेच्या संपर्कात 22 जण आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

मयत किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 148 जणांपैकी 125 जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 23 जणांचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाहीत. कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.

या 22 जणांचाही अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे. मयत किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व अद्याप रिपोर्ट आलेल्या 23, महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 अशा एकूण 45 जणांचे कोरोनाचा चाचणी अहवाल आज रात्रीपर्यंत प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💁‍♂️ *51 ठिकाणी बीड पोलीसांचे छापे*

*Letsup | Beed*

बीड पोलीस दलाने दि.13 आणि 14 या दोन दिवसात गावठी दारूच्या 51 आड्ड्यावर छापे मारून 51 आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातील 3 लाख 17 हजार 80 रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली.

या कारवाईने जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये पोलीसांचा धाक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन सुरू असतानाही सर्वत्र अवैध दारू विक्री सुरू असल्याचे चित्र असून, याप्रकरणी काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली.

दि.14 मंगळवार रोजी भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दारूच्या नशेत काही अनुचित प्रकार करू नये, आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून जिल्ह्याती विविध पोलीस ठाणे हद्दीत गावठी दारू आड्ड्यांवर छापे मारण्यात आले.

दि.13 राजी 11 ठिकाणी छापे मारून 60 हजार 798 ची दारू जप्त करण्यात आली. तद दि.14 रोजी 40 ठिकाणी छापे मारून 2 लाख 56 हजार 282 ची दारू जप्त करण्यात आली. असे एकूण 51 छापे मारून 3 लाख 17 हजार 80 रुपयांची गावठी दारू जप्त करून 51 आरोपींच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात मुंबई दारू बंदी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,अप्पर पो.अधीक्षक स्वाती भोर,विजय कबाडे, सर्व उपविभागीय पो.अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2800 वर*

*LetsUp | Update*

💫 देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला २१ दिवस होऊनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबत नसून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे.

✨ आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत.

👉 तसेच, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

🔎 *सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp