LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
भारतीय मानक ब्यूरो मध्ये 50 जागांसाठी भरती

LetsUp | Job

पदाचे नाव व पद संख्या
1. टेक्निकल असिस्टंट (लॅब) - 30
2. सिनिअर टेक्निशिअन - 20

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा

वयाची अट : 08 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]

प्रवेशपत्र : 23 मार्च 2020

परीक्षा : 29 मार्च 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2020 (06:00 PM)

जाहिरात पाहा : http://bit.ly/2wkkmOt

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2V431Ul

✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
#LetsUp #LetsInspireHer
आयुष्याच्या स्पर्धेत वयाला हरवणाऱ्या लता करे.

▪ लता करे या मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असून रोजगाराच्या शोधात त्या पती व मुलांसह त्या बारामतीत पोहोचल्या. मात्र आजारी पती आणि रोजंदारीची तुटपुंजी कमाई यामध्ये घर चालणे शक्य नव्हते.

▪ पतीच्या उपचारासाठी आर्थिक विवंचनेत असतानाच लता यांना मॅरेथॉनविषयी माहिती मिळाली. व त्यांनी स्पर्धेत धावण्याचे ठरवले.

▪ लता करे वयाच्या 68 वर्षी सुद्धा मॅरेथॉनमध्ये धावतात. पतीवरील उपचाराच्या खर्चासाठी अनवाणी पायाने त्या विविध स्पर्धांमध्ये धावतात.

▪ लता यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी यासाठी प्रोत्साहन दिले. स्पर्धा जिंकून मिळालेल्या पैशातून पतीचा इलाज करता येईल या आशेने त्या धावत होत्या.

▪ 2014 साली लता यांनी पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेऊन 3 किलोमीटरची स्पर्धा पार पाडली. त्यावेळी त्यांना स्पर्धेत धावण्याविषयी काही विशेष माहिती नव्हती.

▪ लता यांनी ही पहिलीच स्पर्धा जिंकली आणि त्यांना रोख 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. त्या पैशातून त्यांनी पतीच्या एमआरआयचा खर्च केला.

▪ मला फक्त पायी चालणे माहीत होते. पतीचे प्राण वाचविण्यासाठी मी धावले. खास अशी कोणतीच तयारी केली नव्हती, असे लता यांनी सांगितले. लता यांनी सलग 3 वर्ष ‘बारामती मॅरेथॉन’ जिंकून हॅट्ट्रीक साधली.

▪ दरम्यान लता यांच्या या कार्याची दखल भारतातील अनेक माध्यमांनी घेतली. यातूनच नवीन कुमार या चित्रपट दिग्दर्शकाने लता यांच्यावर चित्रपट बनवायचे ठरवले.

▪ या चित्रपटात लता यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे. आजही मोलमजुरी करणाऱ्या लता करे यांना अभिनयाचा गंधही नाही.

▪ इथेही त्यांनी जिद्द दाखवत चित्रपटात अभिनय केला आहे. 'मी पैशासाठी धावत होते, माझ्यावर चित्रपट निघेल असं मला वाटलं नव्हतं', असं लता सांगतात.

▪ लता यांच्या पतीला त्यांचा अभिमान वाटतो. मात्र आपल्या इलाजासाठी आपली पत्नी या वयातही धावते याची खंतदेखील त्यांना वाटत राहते.

▪ आयुष्य लढून जगण्यातच खरी मौज असते. मरायचं नाय तर लढायचं आणि जिंकायचं, हे परिस्थितीने मला शिकवले, अशी प्रेरणा लता सर्वांना देतात.
💁‍♂ देशात दोघांना 'कोरोना व्हायरस'ची लागण

LetsUp I Update

⚡ नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

👉 सरकारकडून देशात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक रुग्ण दिल्लीत तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळून आला आहे.

💫 दिल्ली येथे पॉझिटीव्ह आढळेला रुग्ण हा इटलीतून भारतात आलेला आहे. तर, तेलंगणातील रुग्ण हा दुबईतून आला आहे.

🏥 सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

📍 दरम्यान, कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रुग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमामाने घरी परतला होता. न्युमोनिया, फुप्फुसाचा तीव्र संसर्ग व उच्च मधुमेहामुळे त्याला इस्पितळात दाखल केले गेले होते.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती

LetsUp | Job

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस

ट्रेड व पद संख्या
1. फिटर - 16
2. टर्नर - 04
3. इलेक्ट्रिशिअन - 14
4. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 19
5. मशिनिस्ट - 05
6. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - 04
7. ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 09
8. Reff. & AC - 04
9. इलेक्ट्रोप्लेटर - 04
10. वेल्डर - 02
11. COPA - 69

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात ITI-NCVT.

वयाची अट : 31 मार्च 2020 रोजी 21 वर्षांपर्यंत. [SC/ST/PWD: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : गाझियाबाद युनिट

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/3anYhx3

जाहिरात पाहा : http://bit.ly/2PEMIJN

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3arr1F1

✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💥 'कैथी'च्या रिमेकमध्ये अजय दिसणार

LetsUp I Entertainment

💁‍♂ बॉलिवूड अभिनेता अजय देवगण एका तमिळ फिल्मच्या रिमेकमध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

👉 तमिळ मधील 'कैथी' या सिनेमातून अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची माहिती अजयने ट्विटरद्वारे दिली आहे.

🧐 अजय देवगणच्या तान्हाजी द वॉरीयर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजला आणि यानंतर आता एका नव्या चित्रपटाचे रिमेक करत असल्याची माहिती त्याने ट्विटर द्वारे दिली आहे.

📍 ट्विटरवर त्याने म्हटले आहे की,' मी तमिळ सिनेमा कैथीचा हिंदीतून रिमेक करत आहे. हा सिनेमा येणाऱ्या काळात 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रदर्शित होईल'

🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
😍 सुवर्णसंधी! 25 ते 30000 रूपये महीना कमवा घरबसल्या...

🎯 यासाठी घरी बसून मोबाईल किंवाकॉम्प्युटर वरुन पार्ट टाइम डेटा एंट्री काम करावे लागले.

💸 आपल्या कामाचे आपल्याला रोजच्या रोज पेमेंट दिले जाईल...

👍 महत्वपूर्ण : हे काम पूर्ण डेटा एंट्रीचे असून मार्केटिंग, चेन सिस्टम नाही आहे...

🧐 टीप : जर काम करण्यास इछुक असाल तर अधिक माहितीकारिता खालील व्हॉट्सअ‍ॅप लिंकवर hiii असा मेसेज करा : https://wa.me/917261998582?text=need%20details किंवा 917261998582 या नंबरवर कॉल करा.

💁‍♂ *TECH AIRCRAFT SOLUTION PRIVATE LIMITED *

कंपनीचे कागदपत्र : PVT. LTD CERTIFICATE कागदपत्रांसाठी खालील लिक चेक करू शकता.
1) http://mca.gov.in/mcafoportal/showCheckCompanyName.do Tyep this - U72900PN2019PTC186857.

🤔 कामाचे स्वरूप काय? :

● कैप्चा व फॉर्म फिलिंग पर फॉर्म फिलिंग चार्जेस.
● कामासाठी टार्गेट आणि ऍकुरसी यांची गरज नाही.
● रोज पेमेंट, कामाचे सॉफ्टवेअर, अँड्रॉइड ऍप व काम कसे करायचे ? याची पूर्ण माहिती दिली जाईल.
● हे काम कोणीही कुठूनही आपल्या वेळेनुसार घरी बसून करू शकतो!
● महिना 25,000 ते 30,000 रुपये कमवा.

💼 थोडक्यात आमच्याबद्दल :

● आम्ही गेली 9 वर्षे सतत सेवेत/ कार्यरत असून आत्तापर्यंत 2 करोड़ रुपये पर्यंत पेमेंट केलेले आहे.
● आमच्या कंपनीचे सर्व डाक्यूमेंट्स लीगल आहेत. (शॉपअ‍ॅक्ट/ ITR/ रजिस्ट्रेशन, GSTIN)
● तुम्ही कंपनीला गूगलवर ही चेक किंवा सर्च करू शकता.
● आमचे काम कोणीही कुठूनही घरी बसून करू शकतो. आपलीकडे केवळ घरी कॉम्प्युटर, लॅपटॉप किवा अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे आहे.

🤔 काम कसे असते? : हे पाहण्यासाठी आमच्या नंबर्सवर WhatsApp मेसेज करा. मग त्यानंतर तुम्हाला कामाचे व्हिडिओ, कंपनी प्रूफ व जी आवश्यक माहिती हवी आहे ती पुरवली जाईल.

✔ कंपनीचे फेसबुक पेज पेमेंट प्रूफसाठी पाहू शकता : 👉 https://goo.gl/1H62EZ

👀 कामाचे व्हिडिओज नक्की पहा :

● https://goo.gl/s4aP6W
● https://goo.gl/VpeMe5

🖥 कंपनीची वेबसाईट : 👉 https://goo.gl/w9vdjf

(ADVT)
🏏 कोरोनामुळे 'टी-20 लीग'ला स्थगिती

LetsUp I Sport

💁‍♂ कोरोना व्हायरसचा जगभरात प्रादुर्भाव वाढला असून याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही होताना दिसून येत आहे.

👉 नेपाळची मोठी क्रिकेट स्पर्धा एव्हरेस्ट प्रीमियर लीग या महिन्यात 14 मार्चपासून होणार होती. परंतु आता कोरोना व्हायरसच्या तीव्रतेमुळे नेपाळ सरकारने ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

🧐 प्रकरण काय? :

▪ एव्हरेस्ट प्रीमियर लीगच्या आयोजकांनी एक निवेदन जारी केले आहे की अटी अनुकूल झाल्याबरोबर स्पर्धा आयोजित केली जाईल. नेपाळमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एक संशयित रुग्ण सापडला आहे.

▪ मात्र आरोग्य मंत्रालयाने लोकांना व्हायरसचा प्रसार होण्याची अपेक्षा असलेल्या कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचे आवाहन केले आहे.

▪ यापूर्वी कोरोना विषाणूमुळे यावर्षी जुलैपासून जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धासुद्धा धोक्यात आली आहे.

▪ या स्पर्धेत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल, नेपाळचा युवा गोलंदाज संदीप लामिछाने आणि अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शहजाद हे दिग्गज खेळाडू सहभागी होणार होते.

📍 दरम्यान, ही स्पर्धा पुढे ढकलली गेल्याने खेळाडू तसेच क्रिकेटपटूनमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

👍 जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती

LetsUp | Job

पदाचे नाव : उप कार्यकारी अभियंता (वितरण)

शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल) (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट : 04 एप्रिल 2020 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

फी : खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹250/-, PWD/ExSM: फी नाही]

परीक्षा (Online) : एप्रिल 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2Ir3gRy

जाहिरात पाहा : http://bit.ly/2TtiI6g

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3auQSvZ [Starting: 20 मार्च 2020]

✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
📣 *सर्व विद्यार्थ्यांना अनमोल संधी..*

👍 *चला करू श्रीमंतीला लक्ष्य....!*

👉 *जागतिक पर्यटन , हॉटेल* *इंडस्ट्रीजमध्ये सहज मासिक*

💰 *रुपये १ लाख कमवण्याची अनमोल संधी*

✔ १००% आंतरराष्ट्रीय शेफ घडविणारे प्रशिक्षण उपलब्ध
✔ अनुभवी व फॉरेन रिटर्न टीचर्स
✔ उद्योजकता विकास , बेकरी प्रशिक्षण व पासपोर्ट मोफत
✔ ७/१२ वरती शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत.
✔ कमवा व शिका योजना.
✔ मुलींसाठी मोफत हॉस्टेलची सोय

📣 *गेली 16 वर्षात 2650 विद्यार्थी देश -परदेशात नोकरी व व्यवसायात कार्यरत.*

📌 महाराष्ट्रातील नामवंत शासनमान्य साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड हॉटेल,टुरिझम मॅनेजमेंट
📌 छञपती शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ शेफ अँड किचन आर्टस्
📌 *स्टडी कॅम्पस -: *कोल्हापूर, कराड* *व उस्मानाबाद*

📞 *संपर्क* - 8975352500/ 9822994500

👉 https://youtu.be/I3NmH3KNfaA
हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

LetsUp | Job

पदाचे नाव व पद संख्या
1. डिझाइनर ग्रेड-IV (मेकॅनिकल) - 10
2. डिझाइनर ग्रेड-IV (इलेक्ट्रिकल) - 03
3. ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-III (मॅकेनिकल) - 07
4. ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-III (इलेक्ट्रिकल) - 09
5. ज्युनिअर सुपरवाइझर ग्रेड-III (सिव्हिल) - 07
6. ऑफिस असिस्टंट (सेक्रेटेरियल) - 09
7. ज्युनिअर फायर इस्पेक्टर - 04
8. ड्रायव्हर ग्रेड-V - 02

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा

वयाची अट : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा

फी : General/OBC: ₹200/- [SC/ST/PH: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 एप्रिल 2020 (05:00 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2020 (05:00 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR)A.C., Hindustan Shipyard Ltd., Gandhigram (PO), Visakhapatnam- 530 005

जाहिरात पाहा : http://bit.ly/2IySOI2

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2PXcrxk

✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
🗣 शेतकऱ्यांनो, वीज बिल भरायला शिका

LetsUp I Update

💁‍♂ 'महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा दिला आहे. आता आकडे टाकणे बंद करा आणि वीज बिल भरायला शिका,' असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

👉 राज्य सरकारतर्फे आयोजित केलेल्या महाराजस्व अभियानादरम्यान कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे पवार बोलत होते.

🧐 पवार म्हणाले..:

▪ महाराष्ट्रात माझ्या दौऱ्यादरम्यान मी बहुतांश ठिकाणी वीजचोरीसाठी टाकलेले आकडे बघतो. अशा पद्धतीने वीजचोरी करणे चांगले नाही. यामुळे वीज वितरण कंपनी अडचणीत येऊन थकबाकी आणि कर्ज वाढत आहे.

▪ राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता वीज बिले भरण्यास शिकले पाहिजे. आम्ही फक्त बोलत नाही, तर करून दाखवतो.

▪ पोलीस आणि प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न राहाता काम करावे. चांगले काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाईल

📍 दरम्यान, राज्यात महिलांच्या सुरेक्षेसाठी लवकरच कडक कायदा आणला जाईल असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💥 पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण

LetsUp I Update

💁‍♂ पुण्यामध्ये पती-पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. हे पती पत्नी 20 ते 29 फेब्रुवारी दरम्यान दुबईला गेले होते.

👫 दुबईहून पुण्यात परतल्यावर दोघांनाही सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत असल्याने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले.

🦠 सदरील दाम्पत्याचे घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविण्यात आल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

👉 सदरील रुग्ण पुण्यातील रहिवासी असून 49 आणि 51 वयाचे आहेत. महाराष्ट्रातील हे दोघे पहिलेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

🧐 उपचार सुरु : दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे.

📍 दरम्यान, कोरोनाला नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp