LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🖼 नासाने प्रसिद्ध केली 'विक्रम' ची छायाचित्रे

LetsUp I Science

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'चांद्रयान-2' मोहिमेतील विक्रम लँडरची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

एलआरओने काढलेले फोटो हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून 600 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पृष्ठभागाचे आहेत. यात 'विक्रम' लँडर चंद्रावर उतरताना जोरात आदळले असे स्पष्ट होत आहे.

👉 फोटो पाहण्यासाठी : https://go.nasa.gov/2lBzAto

🗣 नासाने काय म्हटले? :

● एलआरओने भारताचे चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर जिथे उतरले त्या पृष्ठभागाचे फोटो काढले आहेत.
● हे फोटो संध्याकाळच्या वेळी काढण्यात आल्याने या फोटोंमध्ये लँडर नक्की कुठे आहे? हे स्पष्ट होऊ शकले नाही.
● ऑक्टोबरमध्ये (दि. 14) एलआरओ पुन्हा या भागावरुन जाणार आहे. तेव्हा आणखीन फोटो काढले जातील.

एलआरओच्या मदतीने 'विक्रम' लँडरशी संपर्क करता येणार नसला तरी लँडरचे नक्की काय झाले? नेमकी काय चूक झाली? याबद्दलची माहिती मिळण्याची शक्यता होती. आता त्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ 'ईडी कार्यालयात जाणार नाही'

LetsUp I Update

माझ्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

🗣 शरद पवार म्हणाले :

● आयुष्यात मी कधी शिखर बॅंकेचा संचालक नव्हतो, सभासद नव्हतो.
● विरोधी पक्षातल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न.
● चौकशीसाठी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार.
● माझ्यावर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत.

पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी शिवसनेचे आभार मानले आहेत. तसेच आता पुण्यात जाऊन पूरग्रस्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

🗣 रोहित पवार म्हणले :

● राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदलली नाही.
● सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये ही इच्छा आहे.
● कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शरद पवार यांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
● या ठिकाणी कोणत्याही सहानुभूतीचे राजकारण करण्यात आले नाही.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ अ‍ॅक्टर्स फॅक्टरी आयपीए व इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आयोजित*

🎭 अभियंत्यातल्या अभिनेत्यांची स्टँडअप ऍक्टिंग स्पर्धा

🗓 2 ऑक्टोबरला स्टॅंडअपच्या माध्यमातून घेतली जाणार इंजिनिअरिंगची शाळा.

🎙 स्पर्धेचे विषय :
▪ कंपेटीटीव्ह एक्झाम बद्दल
▪ कॉलेजचे किस्से
▪ होस्टेलचे किस्से
▪ इंडस्ट्रियल व्हिजिटचे किस्से
▪ इंटरव्ह्यूचे किस्से

🏆 प्रथम 5 विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे. स्पर्धेचा विजेता बनणार आगामी वेबसिरीजचा भाग*

📍 स्थळ : पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, शिवाजीनगर, पुणे

📝 मग वाट कसली पाहताय *9820961997* या क्रमांकावर व्हाट्सअ‍ॅप मेसेज करून आजच आपली नावनोंदणी करा.

(ADVT)
🗞 *LetsUp News Updates*

● 'पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँके'च्या (PMC कथित) घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल

● आंध्रप्रदेश सरकारकडून एकाच दिवसात राज्यातील तब्बल 1 लाख 26 हजार युवकांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे

● देशात विविध ठिकाणी पावसाचे आत्तापर्यंत 148 बळी, आणखी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

● गुजरातमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात, 20 प्रवाशांचा मृत्यू तर 30 जण झाले जखमी

● राज्यात पुन्हा युतीचे सरकार; परंतु, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे ठरलेले नाही : चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

● विविध उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या रॅनिटिडीन या औषधावर बंदीचे आरोग्य विभागाने दिले आदेश

● मतदान केंद्रात कार्यरत असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या(बीएलओ) मानधनात वाढ

● वोडाफोनचा नवा 45 रुपयांचा ऑलराऊंडर प्रीपेड प्लॅन, यामध्ये फुल टॉक टाइम आणि 48 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार

● अमेरिकेची महिला धावपटू एलिसन फेलिक्सने मोडला उसेन बोल्टचा 11 सुवर्णपदकांचा विक्रम

● गेल्या 4 आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 5 चित्रपटांनी मिळून तब्बल 700 कोटी रुपयांची केली कमाई

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😇 म्हणून उमेदवारी अर्ज भरतानाच झाला दंड!

LetsUp | Politics

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम प्लास्टिक पिशवीत आणल्याने एका उमेदवाराला दंड भरावा लागल्याची घटना घडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे कारवाई झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. अशाप्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करताना दंड होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

सविस्तर असे कि, देवगाव येथील मुंगसे यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी 10 हजाराची चिल्लर घेऊन आले. यावेळी त्यांनी 500 रुपयाचे 20 बंडल प्लास्टिक पॅकेटमध्ये आणले होते.

प्लास्टिक बंदी असताना सदरची रक्कम ही प्लास्टिकमध्ये आणल्याचे लक्षात आल्याने नेवासा नगरपंचायतीने ही कारवाई केली. त्यांनी मुंगसे यांना 5 हजाराचा दंड ठोठावला. या कारवाईने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 जाणून घ्या आजपासून आर्थिक क्षेत्रात काय बदल होणार?

LetsUp | National

आर्थिक विषयाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये आजपासून (दि. 1) बदल होणार आहेत. काय-काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊ...

1. SBI ची 'ती' मर्यादा रद्द : स्टेट बँकेने इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग व्यवहारांवरील दरमहा मर्यादा पूर्णपणे रद्द केली आहे.

● दरमहा सरासरी 25,000 रुपयांची शिल्लक ठेवणाऱ्यांना बँकेच्या शाखेतून दोनवेळा मोफत रक्कम काढता येणार आहे.
● दरमहा सरासरी 25 ते 50,000 रुपयांची शिल्लक ठेवणाऱ्यांना बँकेच्या शाखेतून 10 वेळा मोफत रक्कम काढता येणार आहे.
● खात्यामध्ये 50,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम शिलकीत ठेवणाऱ्या ग्राहकास अमर्यादवेळा रक्कम काढता येणार आहे.

2. कॅशबॅक बंद : आजपासून पेट्रोलपंपांवर डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा ई-वॉलेटच्या माध्यमातून इंधनखरेदी केल्यावर मिळणारी 0.75 टक्क्यांची सवलत बंद होणार आहे.

3. पेन्शन पॉलिसीत बदल : ज्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू 1 ऑक्टोबर 2019 रोजी 10 वर्षांची सेवा पूर्ण करण्यापूर्वीच झाला असेल आणि त्याांनी सलग 7 वर्षे सेवा केली असेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना 1 ऑक्टोबर 2019 पासून उपनियम (3) अंतर्गत वाढलेल्या दराप्रमाणे पेन्शन मिळणार आहे.

4. कॉर्पोरेट कर कपात : आजपासून स्थापन होणाऱ्या कंपन्यांना किमान 15 टक्के कर भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या कंपन्यांना आता उपकरासह एकूण 17.01 टक्के करभरणा करावा लागणार आहे.

5. हॉटेलखोल्या स्वस्त : आजपासून 1,000 रुपये भाडे असणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवरील जीएसटी शून्य करण्यात आला आहे. यामुळे आज एक ऑक्टोबरनंतरचे बुकिंग करणाऱ्याना जीएसटी घटविल्याचा फायदा होणार आहे.

6. जीएसटी अर्जात बदल : वार्षिक 5 कोटी रुपये उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांसाठी आजपासून नवीन जीएसटी रिटर्न भरावा लागणार आहे. या व्यावसायिकांना ‘जीएसटीएएनएक्स-1’ हा अर्ज भरावा लागणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ भाजपची पहिली यादी अशी

LetsUp | Politics

1. नागपूर दक्षिण-पश्चिम : देवेंद्र फडणवीस

2. कोथरूड : चंद्रकांत पाटील

3. नंदूरबार : विजयकुमार गावित

4. नवापूर : भारत गावित

5. रावेर : हरीभाऊ जावळे

6. भुसावळ : संजय सावकारे

7. अकोला (प.) : गोवर्धन शर्मा

8. अकोला (पू.) : रणधीर सावरकर

9. जामनेर : गिरीश महाजन

10. जळगाव जामोद : संजय कुटे

11. शहादा : राजेश पाडवी

12. जळगाव शहर : सुरेश भोळे

13. सिंदखेडा : जयकुमार रावल

14. धुळे ग्रामीण : ज्ञानज्योती बदाणे

15. अमळनेर : शिरीष चौधरी

16. चाळीसगाव : मंगेश चव्हाण

17. माण : जयकुमार गोरे

18. तुळजापूर : राणा जगजितसिंह पाटील

19. अकोले : वैभव पिचड

20. राहुरी : शिवाजीराव कर्डिले

21. औसा : अभिमन्यू पवार

22. वांद्रे पश्चिम : आशिष शेलार

23. नाशिक मध्य : देवयानी फरांदे

24. ऐरोली : संदीप नाईक

25. शिर्डी : राधाकृष्ण विखे-पाटील

26. इंदापूर : हर्षवर्धन पाटील

27. अमरावती : सुनील देशमुख

28. वर्धा : पंकज भोयर

29. मूर्तिजापूर : हरीश पिंपळे

30. पुणे कँटोन्मेंट : सुनील कांबळे

31. वाशिम : लखन मलिक

32. कारंजा : राजेंद्र पटणी

33. दर्यापूर : रमेश बुंदिले

34. मोर्शी : डॉ. अनिल बोंडे

35. आर्वी : दादाराव केंचे

36. हिंगणघाट : समीर कुणावार

37. नाशिक मध्य : देवयानी फरांदे

38. उमरखेड : सुधीर पारवे

39. हिंगणा : समीर मेघे

40. राजुरा : संजय धोत्रे

41. आमगाव : संजय पूरम

42. मलकापूर : चैनसुख संचेती

43. चिखली : श्वेत महाले

44. खामगाव : आकाश फुंडकर

45. अकोट : प्रकाश भारसाकळे

46. सावनेर : राजीव पोतदार

47. नागपूर दक्षिण : मोहन मते

48. नागपूर मध्य : विकास कुंभारे

49. नागपूर पश्चिम : सुधाकर देशमुख

50. नागपूर उत्तर : मिलिंद माने

51. अर्जुनी मोरगाव : राजकुमार बडोले

52. तिरोरा : विजय रहांगदले

53. आरमोरी : कृष्णा गजभे

54. गडचिरोली : देवराव होली

55. चंद्रपूर : नाना शामकुळे

56. बल्लारपूर : सुधीर मुनगंटीवार

57. *चिमूर : किर्तीकुमार भांगडिया

58. वणी : संजीव रेड्डी बोदकुरवार

59. राळेगाव : अशो उइके

60. यवतमाळ : मदन येरावार

61. आर्नी : संदीप धुर्वे

62. भोकर : बापुसाहेब गोर्ठेकर

63. मुखेड : तुशार राठोड

64. हिंगोली : तानाजी मुटकुळे

65. परतूर : बबनराव लोणीकर

66. बदनापूर : नारायण कुचे

67. भोकरदन : संतोष दानवे-पाटील

68. फुलंब्री : हरीभाऊ बागडे

69. औरंगाबाद पूर्व : अतुल सावे

70. परळी : पंकजा मुंडे

71. गंगापूर : प्रशांत बम

72. चांदवड : राहुल आहेर

73. नाशिक पश्चिम : सीमा हिरे

74. डहाणू : पास्कल धानरे

75. विक्रमगड : हेमंत सावरा

76. भिवंडी पश्चिम : महेश चौघुले

77. मुरबाड : किसन कथोरे

78. कल्याण पूर्व : गणपत गायकवाड

79. डोंबिवली : रवींद्र चव्हाण

80. मीरा भाईंदर : नरेंद्र मेहता

81. ठाणे : संजय केळकर

82. दहिसर : मनीषा चौधरी

83. मुलुंड : मिहीर कोटेचा

84. कांदिवली पूर्व : अतुल भातखळकर

85. चारकोप : योगेश सागर

86. घाटकोपर (प.) : राम कदम

87. गोरेगाव : विद्या ठाकूर

88. विलेपार्ले : पराग अळवणी

89. सायन कोळीवाडा : तामीळ सेल्वन

90. वडाळा (मुंबई) : कालिदास कोळंबकर

91. मलबार हिल : मंगलप्रभात लोढा

92. बेलापूर : मंदा म्हात्रे

93. पनवेल : प्रशांत ठाकूर

94. पेन : राजीवशेठ पाटील

95. शिरूर : बाबुराव पाचर्णे

96. चिंचवड : लक्ष्मण जगताप

97. पुणे पर्वती : माधुरी मिसाळ

98. कसबा पेठ : मुक्ता टिळक

99. *भोसरी : महेश लांडगे

100. वडगाव शेरी : जगदीश मुळीक

101. शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे

102. खडकवासला : भीमराव तापकिर

103. हडपसर : योगेश टिळेकर

104. कोपरगाव : स्नेहलता कोल्हे

105. सातारा : शिवेंद्रराजे भोसले

106. कराड दक्षिण : अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष)

107. नेवासा : बाळासाहेब मुरकुटे

108. शेवगाव : मोनिका राजळे

109. श्रीगोंदा : बबनराव पाचपुते

110. कर्जत जामखेड : राम शिंदे

111. गोराई : लक्ष्मण पवार

112. माजलगाव : रमेश अडसकर

113. अष्टी : भीमराव धोंडे

114. अहमदपूर : विनायक किसन जाधव-पाटील

115. निलंगा : संभाजी पाटील-निलंगेकर

116. सोलापूर शहर उत्तर : विजयराव देशमुख

117. सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख

118. वाई : मदन भोसले

119. कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक

120. इचलकरंजी : सुरेश हाळवणकर

121. मिरज : सुरेश खाडे

122. सांगली : सुधीर गाडगीळ

123. शिराळा : शिवाजीराव नाईक

124. जत : विलासराव जगताप

125. नागपूर पूर्व : कृष्णा खोपडे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Update

● केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्सचे व्याजदर घटवून 7.9% केले

● गंगा आणि तिच्या उपनद्यांत मूर्ती विसर्जनावर बंदी घालावी असे केंद्राने 11 राज्यांना दिले निर्देश

● अ‍ॅट्रॉसिटी कायदा : केंद्र सरकारच्या दुरुस्त्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

● एअर इंडिया प्रवाशांसाठी मागणीनुसार आता देणार मदतनीस, त्यांची 'नमस्कार सेवा' सुरू

● पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे स्वतः एकनाथ खडसे यांनी केले जाहीर

● महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 77 स्टार प्रचारक; पंतप्रधान मोदी, शहा यांच्यासह खडसे, तावडे यांची वर्णी

● PMC बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचे संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक

● महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने फोर्ड इंडियामध्ये 51 टक्के समभाग खरेदी करण्याची केली घोषणा

● पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची दिवसअखेर 3 बाद 39 अशी अवस्था, अश्विनचे 2 बळी

● अभिनेता विकी कौशलने आपल्या आगामी 'उधम सिंग' या चित्रपटासाठी जवळपास 13 किलो वजन केले कमी

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😇 पाकिस्तान कर्जबाजारी; संकटात वाढ

LetsUp | International

पाकिस्तान चीनच्याच कर्जात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आएएमएफने दिलेल्या कर्जापेक्षाही चीनकडून पाकिस्तानने दुप्पट कर्ज घेतले आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार आयएमएफने 2022 मध्ये पाकिस्तानच्या प्रस्तावित बेलआऊट पॅकेजला मंजुरी दिली आहे. सध्या पाकिस्तावर असलेल्या इतर कर्जापोटी त्यांना 2.8 अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे.

पाकिस्तानने चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्यामुळे त्यांच्या संकटात वाढ झाली आहे. तर आयएमएफने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला 2022 पर्यंत चीनकडून घेतलेल्या 6.7 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची रक्कम फेडावी लागणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Update

● यंदाचा माेसमी पाऊस, पूर आणि भूस्खलनात 1900 जणांचा बळी; 46 बेपत्ता असून 738 जण जखमी

● 'राफेल' येत्या 8 ऑक्‍टोबर रोजी भारताच्या ताब्यात मिळणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या जेटमधूनही उड्डाण करणार

● पंजाब सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे शस्त्रांची तस्करी; केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएकडे सोपवला तपास

● दीर्घकालीन व्हिसावर वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या झुबेदा बेगम यांना लग्नानंतर 35 वर्षांनी भारताचे नागरिकत्व मिळाले

● विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल; बंडखोरांना माघार घ्यायला लावणार : मुख्यमंत्री फडणवीस

● महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश

● मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने (EOW) पीएमसी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना केली अटक

● मारुती कंपनीने 6 महिन्यांत बीएस-6 मानकाची दोन लाखांहून जास्त वाहने केली विक्री

● रवींद्र जडेजा सगळ्यात जलद 200 विकेटचा टप्पा गाठणारा डावखुरा बॉलर ठरला आहे

● बॉलिवूड इंडस्ट्रीसारखंच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतही स्त्री पुरूष असा भेदभाव केला जातो : श्रुती हसन

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ क्रांतिकारी अवलिया 'स्टीव्ह जॉब्स'

LetsUp I Special

स्टीव्ह जॉब्स यांनी अफाट कल्पना शक्ती व अपार कष्ट या जोरावर जगात स्वतःचा वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या मकॅन्टोस कॉम्प्युटर, आयफोन, आयपॉड, आयपॅड अशा उपकरणांनी तंत्रज्ञान विश्वात क्रांती घडवून आणली. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊ त्यांचे यशस्वी होण्याचे सिक्रेट नियम...

1. तेच करा जे तुम्हाला करायला आवडते. ("Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do")

2. वेगळे विचार करा. (Better Be a pirate than to join navy. Be different)

3. पहिले पाऊल टाका. (Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition)

4. सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा. (Don't worry about too many things at once, just concentrate on one thing, start small, think big)

5. नेहमी शिकत रहा. (Learn continually)

6. लोकांच्या भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका. (Don't let the noise of other's opinion drown out your own inner voice)

7. फक्त पैशांसाठी काम करू नका. (Don’t do it for money)

8) दुसऱ्याचे आयुष्य जगू नका. (Don’t live someone else’s life)

9. अनुकरण नका नेतृत्व करा. (innovation distinguishes between a leader and a follow)

10. कधीच संतुष्ट होऊ नका. (stay hungry, Stay foolish)

वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेणारे स्टीव्ह जॉब्स नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ पावसाळ्यात वायपरची काळजी घ्या

LetsUp | Auto

पावसाळा सुरु असल्याने वाहनचालकांच्या मनात आपल्या गाडीचा वायपर, त्याची ब्लेड चांगली आहे का? गाडीचा वायपर बंद तर नाही ना पडणार? या ना अशा अनेक प्रश्नांची धांदल सुरु असते. यावर उपाय म्हणून काय काळजी घ्यावी? याबाबत जाणून घेऊयात...

1. सर्वप्रथम आपल्या गाडीचे वायपर नीट चालतात का? तपासून घ्या.

2. काच नीट स्वच्छ होत नसल्यास वायपरची ब्लेड्स बदला.

3. वायपरची ब्लेड्स स्वस्त असल्यामुळे दरवर्षी ती बदला. त्यामुळे काच चांगली स्वच्छ राहते, शिवाय त्यावर ओरखडेही पडत नाहीत.

4. वायपरबरोबर वायपरचे स्प्रेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यात नियमित पाणी भरणेही गरजेचे आहे, त्यात शॅम्पू टाकल्यास काच चांगली स्वच्छ होते.

😇 वायपर बंद पडल्यास : लांबच्या प्रवासाला जाताना गाडीचा वायपर बंद पडला तर अशावेळी कच्चा बटाटा, तंबाखू किंवा शेव्हिंग फोम लावून काच स्वच्छ करता येते. यामुळे काच थोडीफार स्वच्छ होण्यास नक्की मदत होईल. पावसाचे पाणी काचेवरून पटकन ओघळते व वायपर सुरू नसतानाही गाडी चालवता येते.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Update

● राज्य सरकारकडून 21 ऑक्टोबर 2019 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघांत सार्वजनिक सुट्टी जाहीर

● आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस, त्यामुळे शेवटच्या नाट्यमय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष

● 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

● आदिवासी आजीच्या (जोधईया बैगा) कलेची जागतिक स्तरावर दखल; इटलीतल्या प्रदर्शनात पेटिंग

● आरेमध्ये लागू करण्यात आली जमावबंदी अनिश्चित काळासाठी लागू राहणार, पर्यावरणप्रेमी संतप्त

● आरेतील वृक्षतोडीवर सुप्रीम कोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल, आज (दि.7) होणार सुनावणी

● विठुरायाच्या महापूजेसाठी 2020 पर्यंतचे बुकिंग फुल्ल, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती

● डीटेल कंपनीने किफायतशीर मूल्य असणारा 32 इंचचा स्मार्ट टिव्ही बाजारपेठेत केला सादर

● जपान ओपन टेनिस स्पर्धेमध्ये सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने एकेरीचे विजेतेपद पटकावले

● जॅकलीन फर्नांडिस-सुशांतसिंग राजपूत 'ड्राईव्ह'मध्ये एकत्र दिसणार, त्यांचं 'मखना' साँग रिलीज

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस!

LetsUp | Politics

सर्वच पक्षांना बंडोबांना थंड करण्याची आज अखेरची संधी आहे. कारण आज (दि. 7) सोमवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे.

288 मतदारसंघात युती व आघाडीमध्ये जागावाटपामुळे धूस-फूस पहायला मिळाली. यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अशा सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावण्यात कोणता पक्ष किती यशस्वी ठरतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अशा सर्व माघारी अर्जानंतरच 288 मतदार संघातील लढतींचें चित्र आजअखेर स्पष्ट होणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👩‍🚀 15 महिलांची टीम करणार स्पेसवॉक

LetsUp | International

'नासा' ने प्रथमच फक्त 15 महिलांची टीम अंतराळात स्पेसवॉक करायला पाठवण्याची योजना आखली आहे.

क्रिस्टीना कोच आणि जेसिका मीर या दोन महिला अंतराळवीर या टीमचे नेतृत्व करणार आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला या 15 महिला अंतराळात तीन-तीन अशा गटांनी स्पेसवॉक करणार आहेत.

यापूर्वीही 'नासा'ने मार्च महिन्यात महिलांसाठी स्पेसवॉक कार्यक्रम योजला होता. स्पेससूट उपलब्ध न झाल्याने ती योजना स्थगित करण्यात आली होती. मात्र आता तीच योजना नव्याने बनवण्यात आली आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Update

● प्लास्टिकमुक्त भारतासाठी जनआंदोलन उभे राहावे; पंतप्रधान मोदींचे रावण दहन कार्यक्रमात आवाहन

● फ्रान्सने भारताला पहिले राफेल विमान सोपवले; राजनाथ सिंह यांनी ॐ लिहून केले शस्त्रपूजन

● यंदा नवरात्रीला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी विक्रमी गर्दी, एकूण संख्या 62.71 लाखांच्या पुढे गेली

● या वर्षी भाविकांसाठी बद्रीनाथाचे कपाट 17 नोव्हेंबर रोजी बंद होणार : मुख्य पुजारी ईश्वरीप्रसाद नंबुद्री

● जयपूरसह देशातील प्रमुख शहरांत येत्या 1 एप्रिलपासून बीएस 6 इंधन मिळण्यास सुरुवात होणार

● शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासह 10 रुपयांत जेवणाची थाळी देणार : उद्धव ठाकरे

● नाराज शिवसेना उमेदवारांनी आर्ज मागे घ्यावे आणि भगव्या शिवशाहीचे साक्षीदार व्हावे : सुभाष देसाई

● काँग्रेस-राष्ट्रवादी विलिकरणाचा मुद्दा नाही; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

● सॅमसंगच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग 11 ऑक्टोबरला करता येणार

● 'मरजावां' सिनेमाच्या दुसऱ्या 'एक तो कम जिंदगानी' गाण्याचा टिझर रिलीज, यात नोरा फतेही झळकणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🔎 आयकर विभाग करदात्यांच्या तक्रारींचा ऑनलाईन निपटारा करणार

LetsUp | Update

दसऱ्या मुहूर्तावर केंद्र सरकारने करदात्यांना 'फेसलेस असेसमेंट'ची नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेमुळे करदात्यांना आयकर कार्यालयाचे हेलपाटे घालण्याची गरज पडणार नाही. कारण आयकर विभागाचे अधिकारी ऑनलाईन राहून करदात्यांच्या तक्रारींचा निपटारा करणार आहेत. वेळप्रसंगी करदात्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही संपर्क साधला जाणार आहे.

● याअंतर्गत करदात्यांना रजिस्टर्ड ई-मेल आणि 'www.income taxindiaefiling.gov.in' वर लॉग इन केल्यानंतर आयकर विभागाच्या नोटीस तसेच अन्य सूचना मिळतील.
● त्याचबरोबर रजिस्टर्ड मोबाईलवर तत्काळ मेसेजही मिळेल.
● याआधारे करदात्यांच्या रिटर्न फाईल वा इतर तक्रारींची चौकशी केली जाणार आहे.
● करदात्यांना आपल्या कार्यालय वा घरातून आयकर विभागाच्या नोटिशीला उत्तर देता येणार आहे.
● ई-मेलच्या माध्यमातून नॅशनल ई-असेसमेंट सेंटरशी संपर्क साधता येणार आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे आणि बंगळुरू या 8 शहरांमध्ये हे रिजनल सेंटर कार्यरत राहणार आहेत. यामुळे कर निर्धारणाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि सहजसुलभ होणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 हो, SBIची सगळी कर्ज स्वस्त

LetsUp | National

भारतीय स्टेट बँकेने (SBI) ग्राहकांना दिवाळीच्या आधीच मोठी भेट देत एमसीएलआरचे दर 0.10 टक्क्यांनी घटविले आहे.

हे नवे दर उद्यापासून (दि. 10) लागू होणार आहेत. सध्याच्या आर्थिक वर्षात ही सलग सहावी कपात आहे. एसबीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.

बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांनी कमी केले आहेत. आता पुढील वर्षापर्यंत हे दर 8.15 टक्क्यांवरून 8.05 टक्क्यांवर आले आहेत.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Update

● जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 10 अंकांनी घसरून 68 व्या क्रमांकावर फेकला गेला

● यूजीसी नेटसाठी अर्ज करणाऱ्यांना दिलासा, नोंदणीच्या अंतिम तारीख 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

● देशात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद, बुधवारपासून (दि.9) मान्सूनच्या परतीला सुरुवात

● स्टेट बँक ऑफ इंडियाने एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंट घटवून कर्ज दर स्वस्त (0.25) केला

● मॉब लिंचिंगविरोधात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रेटिंवरील देशद्रोहाचा गुन्हा रद्द

● विधानसभेच्या घोषणेनंतर आचारसंहिता लागू झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकरणात 477 गुन्हे दाखल

● राहुल गांधी यांनी सांगावं की, त्यांच्या पक्षाने जम्मू काश्मीरसाठी काय केले : केंद्रीयमंत्री अमित शहा

● Motorola चा नवा स्मार्टफोन Motorola one macro लाँच, किंमत फक्त 9 हजार 999 रुपये

● भारत-दक्षिण आफ्रिके दरम्यान दुसरा कसोटी सामना आजपासून, सामन्यावर पावसाचे सावट

● 'से रा नरसिंहा रेड्डी' चित्रपटाची विक्रमी कमाई, चित्रपटाने 6 दिवसांत 100 कोटींचा गल्ला केला पार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👍 रेल्वेत चोरी; FIR दाखल करा

LetsUp | National

📍 आता रेल्वेतून प्रवासादरम्यान आपले सामान चोरी झाल्यास तुम्हाला FIR दाखल करता येणार

👌 सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) प्रवासी आणि त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी घेतला निर्णय

🗓 आज दि. 10 ऑक्टोबरपासून प्रवाशांना या सुविधेचा फायदा उचलता येणार आहे

💁‍♂ या पार्श्वभूमीवर जीआरपीने यासाठी एक खास अ‍ॅप तयार केले आहे

✔ या अ‍ॅपच्या माध्यमातून धावत्या रेल्वेमध्ये एखादा चोरीचा प्रसंग घडल्यास ट्रेन न थांबवता मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून एफआयआर दाखल करता येणार

👉 तसेच जीआरपीने केलेल्या सहकार्याचा अनुभवही प्रवासी या अ‍ॅपवर नोंदवू शकतात

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup