LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👩‍✈ देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर बनली 'एस धामी'

Letsup I Update

📍 भारताच्या इतिहासात प्रथमच हवाई सेनेच्या फ्लाईंग युनिटमध्ये महिला फ्लाईट कमांडर असणार

✈ हवाई दलातील विंग कमांडर 'एस. धामी'ने देशातील पहिली महिला फ्लाईट कमांडर होण्याचा मिळवला मान

👍 हिंडन या हवाई तळावरील 'चेतक हेलिकॉप्टर' युनिटचे फ्लाईट कमांडरपद धामी सांभाळणार

💫 वायुसेनेच्या कमांड युनिटमध्ये फ्लाइट कमांडरचे पद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😇 ‘ट्रिपल सीट’; ‘त्या’ दोघींपैकी एकीचा खुलासा!

Letsup I Entertainment

🎬 यंदाच्या दिवाळीत अंकुश चौधरी बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी चक्क “ट्रिपल सीट’ घेऊन येणार आहे.

👉 अगोदरच जन्माष्टमीच्या मुहूर्तावर चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले होते.

🧐 मोशन पोस्टरमध्ये असलेल्या त्या दोघी नक्की कोण आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती.

👍 त्याच प्रश्नाचे उत्तर देणारे आगामी पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

👀 पोस्टरमध्ये खुलासा :

● या पोस्टरमध्ये अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसत आहे.
● दोघांच्याही कानाला फोन असून ते कुणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे.
● विशेष म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या वाढदिवशी हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
● शिवानी सुर्वेसोबत दुसरी अभिनेत्री कोण असेल? याची उत्सुकता मात्र अद्याप कायम आहे.

💫 तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता

LetsUp | Politics

⚡ 15-20 ऑक्टोबर दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजण्याची शक्यता!

💁‍♂ विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार, याबद्दल अनेक अंदाज व्यक्‍त होत असले, तरी 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

📆 साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूका होऊ शकतात तसेच 2 टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता आहे.

📍 या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. दिवाळी 25 ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्याआधी मतदान होईल, असे सांगितले जाते.

📢 राज्यात प्रचार यात्रा सक्रिय : येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या जाणार आहे. दरम्यान; राज्यात मुख्यमंत्री फडणवीसांची महाजनादेश यात्रा, काँग्रेसची पर्दाफाश यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗞 LetsUp News Updates

● चांद्रयान-2 चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचले, उद्या 30 ऑगस्टला ते चौथ्या कक्षेत जाईल

● देशात उभारले जाणार 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालय, 15 हजार जागांची भर्ती, केंद्राचा मोठा निर्णय

● जम्मूतील सर्व 10 जिल्ह्यांत आणि काश्मीरच्या कुपवाडा आणि हंदवाडा भागातील मोबाईल सेवा पूर्ववत

● ऊस शेतकऱ्यांना 40 लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीवर सरकारकडून अनुदान : प्रकाश जावडेकर

● छोट्या किंवा मोठ्या करार उत्पादनांत 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी : पीयूष गोयल

● ICICI बँकेत नोटांची गणती रोबोटद्वारे होणार, असे करणारी ही देशातील पहिली बँक ठरली

● ‘ब्रेग्झिट’ योजनेची योग्य आखणी आणि मांडणी करण्याचे कारण देत ब्रिटनची संसद संस्थगित

● एसटीच्या सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदतवाढ : परिवहन मंत्री रावते

● प्रो कबड्डी : यू मुम्बावर मात करत दिल्लीचा विजय तर हरयाणाकडून गुजरात फॉर्च्युन जाएंटचा धुव्वा

● अभिनेता ईशान खट्टर आणि अनन्या पांडे प्रथमच मोठ्या पडद्यावर 'खाली पीली'मध्ये सोबत झळकणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏑 हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती

LetsUp | Special

आज ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू, जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती. देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेल्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस दरवर्षी देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. म्हणून आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल विशेष काही...

1) असे पडले नाव : मेजर ध्यानचंद यांचे मुळ नाव ध्यान सिंग होते. परंतु ते रात्री उशिरापर्यंत हॉकीचा सराव करत. नंतर त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.

2) खेळाची सुरुवात : ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त 6 वी पर्यंतच झाले. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा विशेष अनुभव नव्हता.

3) भारतीय संघाचे नेतृत्त्व : हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांचा सामना करत होते. अशा परिस्थितीतही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता.

4) न्यूझीलंड दौऱ्यात छाप : ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. 1926 च्या न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 21 सामने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे 192 गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते.

5) ऑलिम्पिक हिरो : मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला.

6) हिटलरची ऑफर नाकारली : 1936 मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या लढतीत ध्यानचंद यांचा खेळ पाहून जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर त्यांचे चाहते झाले. यामुळे हिटलरने त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.

7) पद्मभूषण देऊन गौरव : ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना 1948 साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना 1956 साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. मेजर ध्यानचंद यांचे 3 डिसेंबर 1979 रोजी निधन झाले.

हॉकी विश्वात आपल्या असामान्य कामगिरीने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या तसेच आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 येणार आमदारांसाठीही आचारसंहिता!

LetsUp | National

📍 लवकरच सर्व आमदारांसाठी आचारसंहिता तयार केली जाईल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली घोषणा.

🗣 ओम बिर्ला म्हणाले :

● ही आचारसंहिता तयार करण्यासाठी सर्व विधानसभा सभापतींची समिती स्थापन केली जाईल
● ही समिती सर्व विधानसभांच्या आणि विधान परिषदांच्या सभापतींशी चर्चा करेल.
● हि समिती नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर करेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

🤝 बैठकीत एकमुखाने पाठिंबा :

● यासंदर्भात विधानसभा आणि विधान परिषदांचे सभापती मिळून 30 हून अधिक पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक झाली.
● यावेळी विधानसभांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमावली तयार करण्यावर सर्व सभापतींचे मतैक्य झाले.
● सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे आणि कमीत कमी वेळा सभागृह स्थगित करण्याची वेळ यावी, यासाठी आमदारांसाठी आचारसंहिता तयार करण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला.

💫 यामुळे विधानसभेतील कामकाज सुरळीत चालेल आणि सातत्याने सभागृह स्थगित होण्याचे प्रकार कमी होतील.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👨‍⚕ डॉक्टर निळ्या/हिरव्या रंगाचाच युनिफॉर्म का घालतात?

LetsUp | Do U Know

जेव्हा आपण डॉक्टरांना भेटतो, पाहतो तेव्हा त्यांच्यासोबत विशिष्ट रंगाचं कनेक्शन आहे दिसतं. जर आपण बारकाईने लक्ष दिले तर जाणवेल डॉक्टर बहुदा सफेद, हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतात. त्यांच्या या रंगांच्या युनिफॉर्ममागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत.

1) सफेद रंग : हा रंग शांततेचे व स्वच्छतेचे प्रतिक आहे. यामुळे विविध प्रकारचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांना मानसिक ताण येऊ नये. शांत वाटावे म्हणून डॉक्टर सफेद रंगाचा कोट घालतात.

2) हिरवा/ निळा रंग : 1914 साली एका डॉक्टरने सफेद रंगाच्या डॉक्टरांच्या युनिफॉर्मचा रंगच बदलून हिरवा करुन टाकला. तर काही डॉक्टरांनी हिरव्याला निळ्याचीही जोड दिली. यामुळे तेव्हापासून डॉक्टर ऑपरेशन करतेवेळी हिरव्या तर कधी निळ्या रंगाच्या युनिफॉर्मचा वापर करू लागले.

📝 'टूडे सर्जिकल नर्स' (1998) या वैद्यकिय अहवालावर आधारित एका लेखात याबाबत सांगण्यात आले आहे.

● हिरवा रंग हा डोळ्यांना आराम देणारा असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करताना या रंगाचा युनिफॉर्म घालण्याचे ठरवले.
● जर आपण एखाद्या गडद रंगाकडे एकटक पाहीले तर डोळ्यांना त्रास होतो. डोळे थकतात. कधी कधी डोळ्यांना सूजही येते.
● वैद्यानिक दृष्टीकोणातून विचार करता आपले डोळे हिरवा आणि निळा रंग बघण्यासाठी अधिक सक्षम आहेत.
● ऑपरेशन करतेवेळी रक्ताचा लालभडक रंग सतत बघून डॉक्टरांच्याही डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी आजूबाजूला डोळ्याला आराम देणारा रंग दिसल्यास थकवा जाणवत नाही.

वरील सर्व कारणांचा विचार करून हिरव्या आणि निळ्या रंगाचा युनिफॉर्म घालणे डॉक्टर पसंत करतात.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🕺 हॅपी बर्थडे ‘किंग ऑफ पॉप’

LetsUp | Special

सर्व जगाला वेड लावून गेलेला तसेच आपल्या नृत्य आविष्काराने सर्व जगाला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या मायकल जॅक्सनचा आज जन्मदिवस.

📍 मायकल जॅक्सन म्हणजे :

● अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक, अभिनेता आणि 'पॉपचा राजा' .
● खऱ्या अर्थाने पॉप संगीत सामान्य जनतेपर्यंत घराघरात पोहचवणारा स्टार.
● 'थ्रीलर', 'बॅड', 'डेंजरस' या यशाची उच्चतम पातळी गाठणार्‍या पॉप अल्बमसचा निर्माता आणि सर्वेसर्वा.
● संगीत क्षेत्राची मानाचा "ग्रॅमी" अ‍ॅवॉर्ड तब्बल 13 वेळा जिंकणारा एकमेव कलाकार.
● गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पासून ते "ग्रॅमी" अ‍ॅवॉर्ड पर्यंत जवळपास 400 अ‍ॅवॉर्डचा धनी.

💁‍♂ सुरुवात आणि प्रसिद्धी :

● त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1958 रोजी अमेरिकेतील इंडियन प्रांतातील छोट्याशा शहरात झाला होता.
● 1964 साली ते आपल्या 6 भावांच्या ‘जॅक्सन-5’ या बँड ग्रुमध्ये सामील झाले व त्यांच्या संगीताचा प्रवास सुरु झाला.
● साधारणतः 80 च्या दशकात मायकल यांनी संगीत जगतात आपली एक वेगळी ओळख बनवली.
● त्यांच्या गाण्याचे ‘बिट इन’, ‘बेले जीन’ आणि ‘थ्रिलर’ हे अल्बम 1982 साली रिलीज झाले व त्यांना जागतिक प्रसिद्धी मिळाली.

👍 अनेक जागतिक विक्रम :

● 90च्या दशकात त्यांचे ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ आणि ‘स्क्रीम’ने हे अल्बम गाजले.
● ‘थ्रिलर’ या अल्बमच्या जगभरात जवळपास 65 लाख प्रति विकल्या गेल्या आहेत. व ते संगीतातील ‘किंग ऑफ पॉप’ बनले.
● ‘रॉक अ‍ॅण्ड रोल हॉल’च्या फेम मध्ये मायकल जॅक्सन दोनदा सामील झाले आहेत.

😇 चर्चित वैयक्तिक आयुष्य :

● मायकल जॅक्सन यांचे गाण्यांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यही खूप जास्त चर्चेत राहिले.
● त्यांनी आपल्या 30 वर्षातील करियरमध्ये तब्बल 100 कॉस्मेटिक सर्जरी केल्या.
● त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा आरोपही लागला होता. शिवाय ते ड्रग्सच्या आधीन गेले होते.
● 25 जून 2009 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी मायकल जॅक्सन यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗞 LetsUp News Updates

● चांद्रयान-2 : लँडर विक्रम चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले, शनिवारी (दि.7 ) ते चांद्रभूमीवर उतरणार

● आयएनएक्स मीडिया प्रकरण : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम 5 सप्टेंबरपर्यंत CBIच्या ताब्यातच राहणार

● IDBI तोट्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून 9 हजार कोटींचे बेलआउट पॅकेज मंजूर

● आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून अटक

● तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारताकडून जीवनावश्यक औषधांच्या आयतीसाठी दिली मंजूरी

● भाजपच्या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महायुती 229 जागा जिंकणार असल्याचा अंदाज

● जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासाठी 7 नवीन समिती कार्यालये स्थापन

● Nokia 8.1 (4GB) या स्मार्टफोनच्या भारतातील किंमतीत एकूण 11 हजार रुपयांची कपात

● कसोटी क्रमवारी : फलंदाजीत विराट कोहली दुसऱ्या तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी

● संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी आपल्या ‘एकदा काय झालं’ चित्रपटाचे पोस्टर केले प्रसिद्ध

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌧 राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार

LetsUp । Update

⚡ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण

💁‍♂ येत्या 8 सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज

👍 आगामी 48 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार, मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये; हवामान खात्याने दिला इशारा

🧐 हवामान खात्याचा अंदाज काय? :

● राज्याच्या विविध भागात आठवडाभर संततधार पाऊस सुरू राहणार
● पुढील 24 ते 48 तासांत मध्य महाराष्ट्रात (जळगाव, नाशिक आणि मालेगाव) मध्यम पावसाची शक्यता
● पुण्यात हलका पाऊस राहील. मराठवाड्यातील काही भागांत मध्यम सरींची शक्यता
● त्यानंतर, पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु विदर्भ, कोकण आणि गोवा येथे पाऊस पडतच राहील

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗞 LetsUp News Updates

● RBIने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या 1 ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे दिले आदेश

● भारत-रशिया यांच्यात 15 करार, यात क्षेपणास्त्र प्रणाली शक्तिशाली करण्यासंबंधी कराराचा समावेश

● चांद्रयान-2चे लँडर विक्रमची कक्षा दुसऱ्यांदा यशस्वीरीत्या बदलली, हे लँडर आता चंद्राच्या अगदी जवळ

● कर्नाटकातील काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ, 13 सप्टेंबरपर्यंत ईडीच्या रिमांडवर

● महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी आज (दि.5) गुरुवारी पार पडणार

● विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे 10 लाख मतदारांची वाढ : निवडणूक आयोग

● देशातील सर्वात मोठी कंपनी असलेली मारुती सुझुकी हरियाणातील आपले प्लँट दोन दिवस बंद ठेवणार

● विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील भारताचा पहिला सामना आज गुरुवारी (दि.5) ओमानविरुद्ध होणार

● मिसबा-उल-हककडे पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीप्रमुख पदाची जबाबदारी

● बहुचर्चित ‘साहो’ चित्रपटाने पाचव्या दिवशी तब्बल 350 कोटी रुपयांचा आकडा आकडा केला पार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 खुशखबर! होमलोन होणार स्वस्त

LetsUp I National

📣 RBIने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या 1 ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे दिले आदेश

💁‍♂ त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार, कारण RBI जेव्हा जेव्हा रेपो रेट कमी करेल तेव्हा तेव्हा बँकांना व्याजदर कमी करावा लागणार

✔ त्यामुळे ग्राहकांच्या कर्जांवरील व्याजदर आपोआप कमी होणार असल्याने त्यांना कर्जाचा हप्ता कमी बसणार

📍 महत्वाचे :

● दसरा-दिवाळी सारख्या सणांच्या तोंडावर स्वस्त कर्जाची भेट कर्जदारांना मिळणार
● गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्जे उपलब्ध होणार
● तसेच कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार

👀 सक्तीचा बडगा : प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर RBIने उगारला सक्तीचा बडगा

💫 ICICI बँकेकडून कर्जावरील व्याजदरात कपात जाहीर, बँकेने कर्जावरील व्याजासह ठेवींवरील व्याजदरही 0.10 टक्के प्रमाणात केले कमी

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019

LetsUp । Job

💁‍♂ विभागाचे नाव : पोलीस विभाग

👍 पद व संख्या : पोलीस शिपाई - 3,450

🔎 वेतनश्रेणी : 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे - 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर

🎓 शैक्षणिक पात्रता : 12 वी पास

🎯 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

🧐 वयाची अट : 18 ते 28 (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्ष)

💰 शुल्क : खुला गट - ₹450/- (आरक्षित जागा : ₹350/-)

📅 अंतिम मुदत : 23 सप्टेंबर 2019

🗞 अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2lDvTCS

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗞 *LetsUp News Updates*

● 'चांद्रयान-2' मोहीम आता अंतिम टप्प्यात, त्यामुळे चंद्र आता अवघ्या काही पावलांवर आला आहे

● भारताकडून रशियाला एक अब्ज अमेरिकी डॉलर कर्ज स्वरूपात देण्यात येतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

● INX मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना कोर्टाचा दिलासा नाही, 19 सप्टेंबरपर्यंत तिहार जेलमध्ये रवानगी

● कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींना समन्स, 4 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

● ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉनसन यांच्या भावाचा मंत्रिपदाचा आणि खासदारपदाचा राजीनामा

● प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक नाटककार किरण नगरकर (77 वर्ष) यांचे निधन

● रिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर लॉन्च, विविध प्लॅन्स आणि ऑफर जाहीर

● Pro Kabaddi 7 : यू मुम्बा विरुद्ध पुणेरी पलटण यांच्यातील रोमहर्षक सामना बरोबरीत (33-33) सुटला

● विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा : सलामीच्या लढतीत भारत ओमानकडून (1-2) पराभूत

● बॉलिवूडचे महानायक मराठीत दिसणार, त्यांचा आगामी चित्रपट 'एबी आणि सीडी'चं पोस्टर रिलीज

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 जिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लॉन्च; जाणून घ्या सर्वकाही!

LetsUp | Tech

रिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर अखेर लॉन्च झाली. याअंतर्गत जिओने मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. आता जवळपास 1600 शहरांमध्ये ही ब्रॉडब्रॅंड इंटरनेट सेवा सोबत डीटीएच सेवा सुद्धा उपलब्ध होणार आहे.

📍 असे आहेत प्लॅन :

दरमहा प्लॅन किंमत/ स्पीड/ FUP अंतर्गत डेटा+मोफत डेटा

1) ब्राँझ प्लॅन : 699 रूपये/ 100Mbps/ 100GB+50GB
2) सिल्व्हर प्लॅन : 849 रूपये/ 100Mbps/ 200GB+200GB
3) गोल्ड प्लॅन : 1,299 रूपये/ 250Mbps/ 500GB+250GB
4) डायमंड प्लॅन : 2,499 रूपये/ 500Mbps/1250GB+250GB
5) प्लॅटीनम प्लॅन : 3,999 रूपये/ 1Gbps/2500GB
6) टायटॅनियम प्लॅन : 8,499 रूपये/ 1Gbps/5000GB

👉 टीप : अतिरिक्त मोफत डेटा सहा महिनेच मिळणार आहे.

🎯 ठळक वैशिट्ये :

1) सर्वच प्लॅन्ससोबत फ्री व्हॉईस देण्यात आले आहेत. याद्वारे भारतात कोठेही मोफत कॉल्स करता येतील.

2) या सेवेसाठी जिओचे JioCall हे अ‍ॅप वापरता येईल.

3) टीव्ही व्हिडिओ कॉलिंग, गेमिंग या सेवा असतील. व्हिडिओ कॉलिंग सेवेची किंमत वार्षिक 1,200 रुपये, गेमिंग सेवेची किंमत वार्षिक 1,200 (झेरो लेटन्सी नेटसाठी), डिव्हाईस सेक्युरिटी सेवा वार्षिक 999 रुपयात उपलब्ध असेल.

4) होम नेटवर्किंग घरातील विविध खोल्यांमध्ये वायफाय मेश तयार करून इंटरनेट पुरवता येईल.
फोटो, म्युझिक, व्हिडिओ शेयर करण्यासाठी सेवा उपलब्ध!

5) सुरक्षेसाठी Safety & Surveillance Solution उपलब्ध करून दिले जाईल. ज्यामध्ये डोर कॅमेरा, CCTV, बाळांकडे लक्ष ठेवण्यासाठी बेबी मॉनिटरचा समावेश.

6) आभासी जगाची सफर घरबसल्या करण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी हेडसेटचा समावेश थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहण्याचा अनुभव.

7) जिओ होम गेटवे हा राऊटर असेल जो जिओ फायबरद्वारे वायफाय मार्फत सेवा पुरवेल.

💁‍♂ जाणून घ्या सेवेची किंमत :

✔ हि सेवा घेण्यासाठी तुम्हाला 2,500 रुपये डिपॉजिट भरायचे आहे (हे एकदाच द्यावं लागेल) यामधील 1,500 रुपये परत मिळू शकतील तर उर्वरित 1,000 रुपये इंस्टॉलेशन चार्ज असेल.
✔ जिओच्या वेलकम ऑफर अंतर्गत जिओ होम गेटवे, 4K Jio Set Top Box मोफत मिळेल.
✔ एक टीव्ही (गोल्ड आणि पुढील प्लॅन्समध्ये म्हणजे दरमहा 1,299 आणि त्यापुढील प्लॅन्स) मिळेल. सोबत OTT सेवांद्वारे चित्रपट, मालिका, गाणी मोफत पाहता येतील.

1. गोल्ड प्लॅन : 1 वर्षासाठी घेतल्यास Muse 2 Bluetooth speaker मिळेल. 2 वर्षांसाठी घेतला तर 24 इंची एचडी टीव्ही मिळेल.
2. सिल्व्हर प्लॅन : वर्षासाठी घेतल्यास Thump 2 Bluetooth speakers मिळतील.
3. डायमंड प्लॅन : वर्षासाठी घेतल्यास 24 इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
4. प्लॅटिनम प्लॅन्स : वर्षासाठी घेतल्यास 32 इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
5. टायटॅनियम प्लॅन : वर्षासाठी घेतल्यास 43 इंची 4K टीव्ही मोफत मिळेल!

🤔 नोंदणी कशी कराल? :

● www.jio.com वर जा किंवा MyJio अ‍ॅप घ्या. JioFiber सेवेसाठी नोंदणी करा.
● तुमचा पत्ता, नाव, मोबाईल क्रमांक विचारला जाईल.
● जर तुमच्या भागात जिओ फायबर सेवा असेल तर त्यांचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल पुढील प्रक्रिया त्यांच्यामार्फत पार पाडली जाईल.
● दरमहा/ चौमाही/ वार्षिक अशा कोणत्याही प्लॅन्सने रीचार्ज केल्यास ग्राहकांना सेट टॉप बॉक्स देण्यात येईल.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ ऐतिहासिक! चांद्रयान-2'चं लँडिंग आज मध्यरात्री

LetsUp | National

📍 इस्रोची महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहे.

👉 उद्या दि. 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्राच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहे.

👍 इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत.

🚀 चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेले चांद्रयान शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.

🧐 यानाचे लँडिंग झाल्यावर 2 तासांनी म्हणजे 5.30 ते 6.30 च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी चित्तथरारक असणार आहे.

💪 यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीननंतर जगातील चौथा देश बनेल, तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल

👀 'या' ठिकाणी लाईव्ह पहा :

● इस्रोच्या अधिकृत वेबसाईट https://www.isro.gov.in/ वरून याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
● 'प्रेस इन्फर्मेशन ब्युरो'तर्फे (PIB) युट्युबवर या घटनेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. यासाठी PIB च्या या युट्युब चॅनेलला भेट द्या.
● तसेच हॉटस्टारवर तुम्हाला लाईव्ह पाहता येईल.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗞 LetsUp News Updates

● आता काेणत्याही बँकेचे ग्राहक भारतीय पाेस्ट पेमेंट बँकेतून (आयपीपीबी) पैसे काढू शकतील

● चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 18 सरकारी बँकांत 31,898.63 काेटी रुपयांचा घोटाळा

● शीखविरोधी दंगलप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ अडचणीत येण्याची शक्यता

● ब्रिटिश एअरवेजच्या वैमानिकांनी पगारवाढीसाठी पुकारला संप, मुंबई-लंडन प्रवाशांना फटका बसणार

● एमपीएससीने 377 पदांसाठी घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल जाहीर

● विद्यमान राज्य सरकारने कार्यकाळातील अखेरच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल 37 महत्त्वाचे निर्णय घेतले

● युतीचा फॉर्म्युला आठवड्याभरात स्पष्ट होईल, कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार : चंद्रकांत पाटील

● अ‍ॅपल कंपनी आज (दि.10) मंगळवारी एका कार्यक्रमाद्वारे अ‍ॅपल आयफाेन बाजारात आणणार

● माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी

● 'छिछोरे' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस, बॉक्स ऑफिसवर पहिल्या 3 दिवसांतच 35 कोटी रुपयांची कमाई

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 153 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :

● जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग : 30
● जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग : 123

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

💸 फी : खुला प्रवर्ग: ₹500/- (मागासवर्गीय: ₹300/-)

👍 अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001

🗓 अर्ज पोहोचण्याची मुदत : दि. 25 सप्टेंबर 2019

🌐 अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2lYd6m0

🗞 जाहिरात पहा :

● पद क्रमांक 1 : http://bit.ly/2lEZNXJ
● पद क्रमांक 2 : http://bit.ly/2k8Rd2S

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤦🏻‍♀ लठ्ठपणा म्हणजे आजारांना आमंत्रण

LetsUp । Health

लठ्ठपणा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही खास उपाय

👉 पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

💁‍♀ दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

🍃 पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

🧐 वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

▪आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

🚶‍♀ दररोज सकाळी आणि संध्याकाळी काही किलोमीटर अंतर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. रात्री जेवणात पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या.

🎯 वजन कमी करण्यासाठी : वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.

👍 दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

🌷 सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup