LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🗞 LetsUp News Updates

● केंद्र सरकार बँकांमध्ये 70 हजार कोटी रुपये जमा करणार, होम आणि कार लोन स्वस्त होणार : निर्मला सितारामण

● क्रेडिट रेटिंग एजन्सी मुडिजच्या अंदाजानुसार, 2019 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा दर कमी करून 6.2 टक्के राहील

● जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नव्या तारखा लवकरच जाहीर होणार

● चलनांचे स्वरूप आणि आकार सतत बदलण्याचा निर्णय योग्य नाही, उच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले

● येत्या 13 किंवा 14 सप्टेंबरलाच निवडणुकीचा बिगुल वाजणार, राज्य निवडणूक आयोगाने दिले संकेत

● उद्या रविवारी (दि.25) मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार, रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार

● फ्युएल पाईपचा दोष दुरुस्त करण्यासाठी मारुती सुझुकीने सुमारे 40 हजार वॅगनआर परत बोलावल्या

● प्रो कबड्डी : गुजरातचा पटणा पायरेट्सवर 29-26 ने विजय तर यू मुंबाचा तमिळ थलैवाजवर 29-24 ने विजय

● भारताचा पहिला डाव 297 धावांत आटोपला; दुसऱ्या दिवसअखेर वेस्टइंडीजच्या 8 बाद 189 धावा

● बालाकोट हवाई हल्ल्याची शौर्यकथा लवकरच रुपेरी पडद्यावर, चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 *अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारकडून अनेक घोषणा!*

*LetsUp | National*

🎯 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक अर्थ-प्रोत्साहक उपायांची केली घोषणा.

💁‍♂ *खालील घोषणा करण्यात आल्या* :

*1.* गुंतवणूकदारांच्या भांडवली नफ्यावरील वाढीव कर अधिभार मागे.

*2.* कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटीच्या (CSR) नियमांचे उल्लंघन फौजदारी गुन्हा मानला जाणार नाही. सीएसआरसंबंधीच्या सर्व तरतुदींचा अर्थ मंत्रालयाकडून आढावा घेण्यात येईल.

*3.* स्टार्टअप कराशी संबंधित प्रकरणांसाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येईल. स्टार्टअप नोंदणीकरणात आयकर कलम 56 2(B) लागू होणार नाही. स्टार्टअप्समध्ये एंजेल टॅक्स रद्द.

*4.* सरकारी बँकांना सरसकट 70,000 कोटींचे अर्थसाहाय्य. तसेच रोकड सुलभतेची परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी गरज पडेल त्याप्रमाणे आणखी पाच लाख कोटी रुपयांची तरतूद.

*5.* बँकांनी रेपो दरात केलेल्या कपातीचा लाभ व्याजदर कमी करून ग्राहकांना द्यावा लागेल. यातून गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याबरोबरच, उद्योगधंद्यांना खेळत्या भांडवलासाठी स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल.

*6.* वस्तू आणि सेवा कर परतावा 30 दिवसांत पूर्ण होईल. MSMEच्या अर्जानंतर 60 दिवसात परतावा मिळेल.

*7.* लोन सेटलमेंटच्या अटी सुलभ झाल्या. कर्जासाठी केलेल्या अर्जांचे ऑनलाईन मॉनिटरिंग होईल. कर्ज परतफेडीच्या 15 दिवसांच्या आत ग्राहकांना कागदपत्रं सुपूर्द करणे बँकेवर बंधनकारक असेल.

*8.* करासाठी कुणालाही त्रास दिला जाणार नाही. टॅक्स असेसमेंट 3 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. आयकराशी संबंधित सूचना 1 ऑक्टोबरपासून सेंट्रलाईझ्ड पद्धतीने जारी होतील.

*9.* पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी 100 कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल. या क्षेत्राच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल.

*10.* 31 मार्च 2020 पर्यंत खरेदी करण्यात आलेली BS-IV वाहने त्यांच्या रजिस्ट्रेशन पीरियडपर्यंत कायम राहतील. शिवाय त्यांच्या वन टाईम रजिस्ट्रेशन फीसाठी जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येईल.

🗣 *अर्थमंत्री म्हणाल्या* :

● जगातल्या बहुतांश देशांना मंदीचा सामना करावा लागतो आहे. जगाचा अभ्यास केल्यास तुमच्या लक्षात येईल.
● जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. देशात व्यवहार करणे आता सोपे झाले आहे.
● आर्थिक सुधारणेची प्रक्रिया बहुतांश प्रमाणात ऑटोमॅटिक झाली आहे.
● जीएसटीची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये अधिक सुलभ केली जाणार आहे.
● भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याचं काम वेगाने सुरु आहे.
● अर्थव्यवस्थेतली सुधारणा हा सरकारचा पहिला अजेंडा आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 *MPSCमार्फत 435 जागांसाठी भरती*

*LetsUp | Job*

💁‍♂ *पदाचे नाव* : पशुधन विकास अधिकारी

🎓 *शैक्षणिक पात्रता* : पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी.

✔ *वयाची अट* : 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

📍 *नोकरी ठिकाण* : मुंबई

💸 *फी* : खुला प्रवर्ग: ₹374/- (मागासवर्गीय: ₹274/-)

🗓 *ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत* : दि. 13 सप्टेंबर 2019

🗞 *जाहिरात पाहा* : http://bit.ly/31YRAx7

🌐 *ऑनलाईन अर्ज* : http://bit.ly/2XpbQJT

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 Letsup I General Knowledge

1) कोणत्या देशाने लढाईसाठी तयार असलेली मानवरहित युद्धनौका (ऑगस्ट 2019) तयार केली?

उत्तर : चीन

2) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) मानवी-आकाराचा रोबोट (फेडर) कोणत्या देशाने पाठविला?

उत्तर : रशिया

3) अमेरिकेतली कॅटालिना खाडी ओलांडणारा पहिला आशियाई जलतरणपटू कोण बनला?

उत्तर : पॅरा-जलतरणपटू सतेंद्र सिंग लोहिया (मध्यप्रदेश)

4) अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘सरल’मध्ये (‘स्टेट रूफटॉप सोलर अट्रॅक्टीवनेस इंडेक्स) कोणत्या राज्याला प्रथम क्रमांक मिळाला?

उत्तर : कर्नाटक

5) आर्क्टिक प्रदेशात जगातली पहिली पाण्यावर तरंगत असलेली अणुभट्टी (अ‍ॅकेडेमिक लोमोनोसोव्ह) कोणत्या देशाने उभारली?

उत्तर : रशिया

6) मनुष्यबळ विकास मंत्रीने सर्वात मोठ्या शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्याचे नाव काय?

उत्तर : निष्ठा

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचे निधन

LetsUp । Breaking

⚡ दिल्लीतील AIIMS रुग्णालयात घेतला अखरेचा श्वास

🏥 दीर्घ आजाराने निधन : माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं, ते 66 वर्षांचे होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली.

💫 राजकीय कारकीर्द :

▪ जेटली यांनी 26 मे 2014 ते 14 मे 2018 या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले.
▪ 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली.
▪ 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांनी संभाळली.
▪ 3 जून 2009 ते 26 मे 2014 या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.

📣 जेटलींच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय :
✔ नोटबंदी
✔ वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीची देशभर अंमलबजावणी
✔ रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द करून तो देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट
✔ देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा निर्णय

📽 : कार्याचा आढावा : http://bit.ly/31Z8KL9

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗞 LetsUp News Updates

● जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी.व्ही. सिंधू पहिली भारतीय ठरली

● केंद्राच्या अटल मिशन फॉर रिज्यूवेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन योजनेत 1,159 पार्क विकसित

● 23 सप्टेंबरला 4 राज्यांत (उत्तर प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा व केरळ) पोटनिवडणुका : निवडणूक आयोग

● भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली, कानपूर येथील रुग्णालयात दाखल

● पाकिस्तानने जादा पाणी सोडल्याने पंजाबमध्ये पुराचा धोका निर्माण, मदत पथके तैनात

● 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 'फिट इंडिया मुव्हमेंट' सुरू करणार; पंतप्रधान मोदी

● हार्ले-डेव्हीडसनची पहिली इलेक्ट्रिक बाईक 'लाइव्हवायर' 27 ऑगस्ट रोजी भारतात सादर होणार

● पहिल्या कसोटीत भारताचा वेस्टइंडीजवर 318 धावांनी विजय, अजिंक्य रहाणे ठरला सामनावीर

● प्रो कबड्डी : दबंग दिल्लीने यूपी योद्धाविरुद्ध तर बेंगळुरूने जयपूरवर 41-30 ने विजय मिळवला

● फोर्ब्स 2019 : हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन ठरली सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारताचा वेस्टइंडीजवर विजय

LetsUp | Sports

👍 भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजवर 318 धावांनी मिळवला विजय

💁‍♂ भारताने विंडीजला विजयासाठी 419 धावांचे लक्ष्य ठेवले होते, यानंतर विंडीजचा दुसरा डाव अवघ्या 100 धावांत आटोपला

🏆 पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे सामनावीर ठरला

📍 सामन्यातील विक्रम :

● कर्णधार विराट कोहलीने विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील विजयासह धोनीच्या विक्रमाची (27 विजय) बरोबरी साधली
● भारताकडून चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक वेळा शतकी भागीदारी (8 वेळा) करण्याचा विक्रम विराट-रहाणे जोडीच्या नावावर
● जसप्रीत बुमराहचा कसोटीमध्ये सर्वात जलद (11 कसोटी) 50 विकेट्सचा टप्पा पार करणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला

--------------------------------------------

💥 पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास!

🎖 जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंधूने ओकाहुराला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले

🇮🇳 या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू पहिलीच भारतीय खेळाडू ठरली

🏸 सिंधूने नोजोमी ओकाहुराच्या विरोधात 21-7, 21-7 अशा गुणांची खेळी करत विजय मिळवला

🧐 या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेडही केली

✔ या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत

--------------------------------------------

⚡ इंग्लंडचा रोमांचकारी विजय

🧢 तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 1 विकेटने रोमांचकारी विजय मिळवला

👉 या विजयाबरोबरच इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी केली बरोबरी

💫 इंग्लंडला विजयासाठी 359 धावांची गरज होती, त्यांनी 9 गडयांच्या बदल्यात हे आव्हान पूर्ण केले

👌 इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, त्याने नाबाद 135 धावांची झुंजार खेळी केली

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ व्हायरल ताप; करा घरगुती उपाय

LetsUp | Health

हल्ली व्हायरल इन्फेक्शनमुळे आलेल्या तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या तापाबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे आजारही डोकेवर काढत आहेत.

या तापात रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे इतरही आजारांची लागण लवकर होऊ शकते. चला तर आज व्हायरल तापाची लक्षणं कोणती? त्यावर काही घरगुती उपाय आहेत का? याविषयी जाणून घेऊयात...

----------------------
😍 आता नामांकित 'मेडिसिन' व 'आरोग्यवर्धक उत्पादित वस्तूवर भरघोस सूटचा लाभ घ्या 'PharmEasy' वर, पहिल्या ऑर्डरवर मिळवा 30% ऑफ! त्यासाठी क्लिक करा : 👉 https://urlvia.com/tr1VJ
----------------------

🤔 व्हायरल तापाची लक्षणं : घसा दुखणं, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी,स उलट्या आणि अतिसार सुरू होतो. याशिवाय डोळे लाल होऊन डोकं गरम व्हायला सुरुवात होते.

व्हायरल तापावर वैद्यकीय सल्ला तर घ्यावाच. पण तुम्ही काही घरगुती उपचार देखील करू शकता. योग्य आहारातून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यामुळे तापही लवकर बरा होऊ शकतो. लिंबाचा रस आणि मध व्हायरल ताप कमी करते. घशाची खवखव थांबते. शिवाय उलट्या-जुलाबांपासून आराम मिळू शकतो.

ताप 102 किंवा त्याहून कमी असेल तर घरगुती उपचार करूनही ताप कमी करता येऊ शकतो. शरीराचं तापमान कमी होईपर्यंत रुग्णाच्या शरीरावर, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. दर सहा तासांनंतर पॅरासिटेमॉलची (क्रोसीन किंवा तत्सम कुठलीही जेनेरिक गोळी) एक गोळी द्यावी. असे करूनही ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1) काढा ट्राय करा : एक चमचा लवंगांची पावडर, ताज्या आणि स्वच्छ केलेल्या तुळशीच्या पानांबरोबर एक लीटर पाण्यात टाकून उकळा. दर 2 तासांनी हा काढा प्यायला द्या. यामुळे शरीरातील सर्व बॅक्टेरिया, कीटाणू आणि अन्य विषाणू नष्ट होतात.

2) चहा ट्राय करा : धण्यात असलेले अँटिबायोटिक तत्त्व विषाणूंविरोधात लढण्याची शक्ती देतात. धण्याच्या बिया शरीराला व्हिटॅमिन देतात. पाण्यात एक मोठा चमचा भरून धणे उकळा. यानंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळा.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 जाणून घ्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांची यादी!

LetsUp | Entertainment

📍 चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 2019 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांची यादी सोशल मीडियावर केली शेअर

💁‍♂ यादीनुसार, ‘कबीर सिंग’ हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा आणि तितकाच लोकप्रिय चित्रपट ठरला

✔ टॉप 10 चित्रपटांची यादी अशी :

1. ‘कबीर सिंग’
2. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’
3. ‘भारत’
4. ‘मिशन मंगल’
5. ‘केसरी’
6. ‘टोटल धमाल’
7. ‘सुपर 30’ सातव्या स्थानी
8. ‘गली बॉय’
9. ‘दे दे प्यार दे’
10. ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏍 *येतेय हार्ले-डेव्हिडसनची इलेक्ट्रिक बाईक!*

*LetsUp | Auto*

हार्ले-डेव्हीडसन ही कंपनी आपली वहिली इलेक्ट्रिक बाइक 'लाइव्हवायर' भारतात सादर (27 ऑगस्ट) करणार आहे. भारतीय बाजारात या बाइकची किंमत 32 ते 35 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

लाइव्हवायर बाइकमध्ये इलेक्ट्रिक मोटर 105 'एचपी' आणि 116 'एनएम' टॉर्क उत्पन्न करते. ही बाइक 3 सेकंदात 0 ते 1000 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडते.

लाइव्हवायर इलेक्ट्रिक बाइकला एसी वॉल सॉकिट पूर्ण चार्ज करण्यासाठी 12.30 तास इतका वेळ लागतो. यानंतर हि बाइक शहरात 235 किलोमीटर आणि हायवेवर 113 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकते.

🤔 *फिचर्स काय-काय?* :

● या बाइकला उत्तम हार्डवेअर सपोर्ट देण्यात आला आहे.
● या व्यतिरिक्त ब्लूटूथ कनेक्टिविटीबरोबर 4.3 इंच टीएफटी डिस्प्ले, एबीएस आणि ट्रँक्शन -कंट्रोल सिस्टमसारख्या सुविधाही आहेत.
● तसेच, या बाइकमध्ये रायडिंग मोड्स असून, यात स्पोर्ट, रोड, रेन, रेंज आणि तीन कस्टम मोड्सचाही समावेश आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 *मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढली!*

*LetsUp | Update*

📍 देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची 'SPG' सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा केंद्र सरकारने घेतला निर्णय.

👉 सगळ्या गुप्तचर यंत्रणांकडून आढावा घेतल्यानंतर यापुढे मनमोहन सिंग 'झेड प्लस' सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

📝 *गृहमंत्रालयाने परिपत्रकात म्हटले* :

● सुरक्षेसंदर्भातील निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आधारावर घेतला आहे.
● ठराविक काळानंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जातो.
● ही सामान्य प्रक्रिया आहे. याअंतर्गत सुरक्षा कमी करणे किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो.

🤔 *SPG सुरक्षा म्हणजे काय?* :

● SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) ही सुरक्षा देशातील निवडक व्यक्तींनाच दिली जाते.
● देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राजकारण्यांची सुरक्षा करणारे हे उच्च दर्जाचे पथक आहे.
● आता देशातील केवळ 4 जणांच्या सुरक्षेसाठी हे पथक असेल.
● यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे.

💫 सरकारच्या या निर्णयावरून वाद उद्भवण्याची दाट शक्यता आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗞 LetsUp News Updates

● RBI केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार 51 कोटी रुपये देणार, सरकारला दिलासा

● सरकारी 'जन औषधी केंद्रां'मध्ये आजपासून (दि.27) सॅनिटरी नॅपकिन 1 रुपयात मिळणार

● आता चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागाचे 4375 कि.मी. उंचीवरून टिपलेले छायाचित्र पृथ्वीवर पाठवले

● कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री असणार

● इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ

● आम्ही काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा इशारा

● रासपा प्रवेशाचे वृत्त अभिनेता संजय दत्तने फेटाळले, कोणत्याही पक्षात प्रवेश करत नसल्याचे केले स्पष्ट

● फोटो शोधणं आणखी सोपं होणार, गुगल फोटोजमध्ये आता फोटोंमधील टेक्स्टद्वारेसुद्धा सर्च करता येणार

● टेस्ट चॅम्पियनशीप : पहिल्या विजयामुळे भारत 60 पॉईंट्ससह संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर

● अभिनेता आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'बाला'चा दमदार टीझर प्रदर्शित

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👍 जीएसटी रिटर्नला मुदतवाढ!

LetsUp | Update

⚡ जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 3 महिन्यांनी वाढवून 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे

🗣 केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने याबाबत सांगितले

🗓 अगोदर 31 ऑगस्ट ही वार्षिक जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती

👉 मुदतवाढीमागे कर भरणाऱ्यांना परतावा भरण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे कारण सांगितले जात आहे

💫 दुसरीकडे, सेवा कर आणि उत्पादन शुल्क माफी योजनेंतर्गत करदात्यास देण्यात आलेल्या सवलतीबाबत अधिकृत समिती 60 दिवसांत निर्णय घेण्यात येणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती

LetsUp । Job

📍 पदाचे नाव : तंत्रज्ञ-3 I जागा : 746

💁‍♂ श्रेणी व पद संख्या अशी :

● सामान्य : 373
● प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी : 336
● B.T.R.I साठीचे आरक्षण : 37

👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

💸 फी : खुला प्रवर्ग: ₹500/- (मागासवर्गीय: ₹300/-)

🗓 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 08 सप्टेंबर 2019 (11:59 PM)

🗞 जाहिरात पाहा : http://bit.ly/2NrSyOC

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

LetsUp | Breaking

⚡ प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरमधील बळपुडी गावाजवळ अपघात

👉 या अपघातात आनंद शिंदे सुखरुप बचावले, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे

🤔 नेमकं काय घडलं? : शिंदे मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात होते. इंदापूरजवळील वरकुटे फाटा येथे आनंद शिंदे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही.

अशात त्याने डंपरला पाठीमागून धडक दिली. त्यात आनंद शिंदे यांच्या पायाला मुका मार लागला. यानंतर उपचारासाठी त्यांना इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

💫 प्राथमिक उपचारानंतर शिंदे आता पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👌 सॅनिटरी नॅपकिन 1 रुपयामध्ये

LetsUp | National

💁‍♂ आजपासून (दि.27) सरकारी 'जन औषधी केंद्रां'मध्ये सॅनिटरी नॅपकिन 1 रुपयात उपलब्ध होणार आहे.

👍 रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबत माहिती दिली.

👉 अगोदर अडीच रुपयांना मिळणारे हे नॅपकिन आता 1 रुपये दराने मिळणार आहे.

🗣 मनसुख मांडवीय म्हणाले :

● जैवविघटनशील सॅनिटरी नॅपकिन्स आता 1 रुपयांत उपलब्ध करत आहोत.
● देशभरातील 5,500 जन औषधी केंद्रांमध्ये 'सुविधा' या नावाने हे नॅपकिन्स उपलब्ध असतील.
● हा निर्णय घेऊन मोदी सरकारने 2019 च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण केले.

💫 गेल्या वर्षभरात वर्षात सुमारे 2.2 कोटी नॅपकिनची विक्री करण्यात आली. आता किंमत आणखी कमी केल्याने ही विक्री दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 जयंती विशेष : 'सर डॉन ब्रॅडमन'

Letsup I Special

क्रिकेटच्या इतिहासात सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून सर डॉन ब्रॅडमन यांना आजही आठवले जाते. त्यांना 'द डॉन' या नावानेही ओळखले जाते. आज त्यांची 111 वी जयंती. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ त्यांच्याविषयी खास काही...

1. एकूण 52 कसोटी सामन्यांमध्ये ब्रॅडमन यांनी 99.94 च्या सरासरीने एकूण 6 हजार 996 धावा (29 शतके) फटकावल्या.
2. 1931 च्या अ‍ॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी 974 धावा फटकावल्या होत्या. हा विक्रम अद्याप अबाधित आहे.
3. एका दिवसात त्रिशतक फटकावणारे ब्रॅडमन हे एकमेव फलंदाज आहेत.
4. कसोटी क्रिकेटमध्ये 99.94 च्या सरासरीने धावा फटकावण्याच्या त्यांच्या विक्रमाच्या आजही कुणी जवळपासही नाही.
5. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 12 द्विशतके झळकाविली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके फटकावणारे ते पहिले फलंदाज होते.
6. आपल्या कसोटी कारकिर्दीत ते कधीही 90 ते 100 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झालेले नाहीत.
7. ब्रॅडमन यांनी केवळ इंग्लंडविरुद्ध 5 हजार धावा करण्याचा विक्रम केला. इंग्लंडविरुद्ध खेळताना त्यांनी 5,028 धावा केल्या होत्या.
8. ब्रॅडमन यांनी 1931 साली एका सामन्यात 18 मिनिटात शतक ठोकले होते. त्यावेळी 8 बॉलची ओव्हर असायची. अवघ्या 22 बॉलमध्ये ब्रॅडमन यांनी शंभरी गाठली होती.

🤔 माहित नसलेल्या गोष्टी :

● ब्रॅडमन यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 ला झाला. त्यांचे पूर्ण नाव डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन असे आहे.
● आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी ते गोल्फच्या चेंडूचा वापर करत असत.
● आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात 100 ची सरासरी कायम ठेवण्यासाठी त्यांना केवळ 4 धावांची आवश्यकता होती. मात्र, अखेरच्या सामन्यात ते एकही धाव न काढता बाद झाले.
● ऑस्ट्रेलियातील सर्व राज्यांच्या राजधान्या आणि परिसरातील टपाल क्रमांक PO BOX 9994 असा ठेवण्यात आला आहे. कारण डॉन ब्रॅडमन यांची सरासरी 99.94 आहे.
● क्रिकेट खेळत असतानाच त्यांनी 'डाॅन ब्रॅडमन्स बुक', 'माय क्रिकेटिंग लाईफ' आणि 'हाऊ टू प्ले क्रिकेट' या पुस्तकांचे लेखन केले.

📍 स्वभाव व आवडी :

● ते अत्यंत कुटुंबवत्सल व्यक्ती होते.
● ते आणि त्यांची पत्नी दोघे स्वत: जातीने मुलांकडे लक्ष द्यायचे.
● त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी काही संगीत रचनाही केल्या होत्या.
● ते पियानो वाजवायचे.
● ते एक उत्तम ड्राइव्हर होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कार खूप आवडायच्या.
● त्यांना प्रसिद्धीची अजिबात हाव नव्हती. मीडियापासून ते लांबच राहायचे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 Letsup I General Knowledge

1) 45 व्या जी-7 शिखर परिषद 2019 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?

उत्तर : बिआरिट्झ, फ्रान्स

2) महिलांच्या सुरक्षेसंबंधीचा 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला?

उत्तर : दिल्ली

3) "कलवी तोलाईकाच्ची" (एज्युकेशन टीव्ही) नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?

उत्तर : तामिळनाडू

4) नुकतीच नव्या “सुपर-लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचर” ची चाचणी कोणत्या देशाने घेतली?

उत्तर : उत्तर कोरिया

5) अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) याच्या अंतर्गत ऑगस्ट 2019 च्या अखेरीस किती उद्याने विकसित केली गेली?

उत्तर : 1,159

6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “ऑर्डर ऑफ जाईद” हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाने बहाल केला?

उत्तर : संयुक्त अरब अमिरात (UAE)

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup