LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🎊 Amazon FREEDOM sale : बस कुछ ही घंटे बाकी!

😍 Amazon FREEDOM sale अंतर्गत अनेक वस्तुओं की खरीददारी पर पाएं आकर्षक छूट

📆 सेल 8 से 11 अगस्त 2019 तक ...

📱 Mobile Accessories : 40% तक डिस्काउंट

🔌 Electronics Devices : 35% तक डिस्काउंट

📲 6000 रुपयों तक एक्सचेंज ऑफर

🔊 Headphones & Speakers : 60% से अधिक डिस्काउंट

📺 Tv & Appliances : 60% तक डिस्काउंट

🏠 Home & Kitchen उपकरण : 75% तक डिस्काउंट

👗 amazon Fashion : 80% तक डिस्काउंट

🛒 Daily Essentials : 70% तक डिस्काउंट

👍 No Cost EMI, Cashback & More

💳 अगर आप SBI Credit Card User हैं, तो 10% इंस्टेंट डिस्काउंट उपलब्ध

💰 Amazon Pay से पे (भुगतान) करने पर 5000रु. तक का अतिरिक्त कॅशबॅक

✈ डोमेस्टिक फ्लाईट बुकिंग पाइये 2000 /- में

🛒 जल्दी करें! शॉपिंग की स्वर्णसंधि का लाभ उठाएं

👍 ऑफर्स का लाभ लेने के लिए यहां क्लिक करें : 👉 https://amzn.to/31rj2TV
💥 महाराष्ट्रासह 4 राज्यात पावसाचा हाहाकार; 125 जणांचा मृत्यू

LetsUp | Update

⚡ गेल्या काही दिवसांपासून विविध राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार

👀 या राज्यांमध्ये पावसाचा कहर : महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर दिसून येत आहे. या राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

📍 125 नागरिकांचा मृत्यू :
▪ केरळ : 57
▪ महाराष्ट्र : 27
▪ गुजरात : 22
▪ कर्नाटक : 24

💰 10 हजारांची मदत : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या प्रत्येक कुटुंबास दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.

🗣 काय म्हणाले मंत्री? : शासनाने 154 कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

🎯 व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/HpcBFG
LetsUp News Updates

● केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली

● गुजरातमधील कच्छ येथे पुरात अडकलेल्या 125 जणांना भारतीय हवाई दलाने सुरक्षित स्थळी हलवले

● देशातील सर्व सरकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कामकाज सकाळी 9 वाजता सुरू होणार, अर्थ मंत्रालयाने दिला निर्णय

● काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळ येथील पूरग्रस्तांची भेट घेत घेतला परिस्थितीचा आढावा

● पाकिस्तानकडून समझौता एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्यामुळे समझौता लिंक एक्स्प्रेसही रद्द; उत्तर रेल्वेची माहिती

● 370 कलम रद्द केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान चिडले, इम्रान खान यांची आरएसएसवर जाहीर टीका

● मुसळधार पावसाचा फटका रेल्वे विभागाला, मुंबई-पुणे रेल्वे सेवा 15 ऑगस्टनंतरच पूर्ववत होणार, साचलेले पाणी, दरडींमुळे मोठे नुकसान

● राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टी तसेच पुराचा जिल्हा परिषदेच्या दोन हजार 177 शाळांना फटका; शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची माहिती

● रॉजर्स कप टेनिस स्पर्धेमध्ये मेरी बुज्कोव्हाला मात देत सेरेना विल्यम्सचा अंतिम फेरीत प्रवेश

● 'कुली नंबर 1' चित्रपटात कादर खान यांची भूमिका साकारणार अभिनेते परेश रावल


न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारताचा वेस्ट इंडिजवर 59 धावांनी विजय

LetsUp | Sports

⚡ डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे टीम इंडियाचा 59 धावांनी विजय

💁‍♂ भारत - वेस्टइंडिजमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांमधील दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताचा विजय

🎾 भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेत वेस्ट इंडिजला विजयासाठी 280 धावांचे आव्हान दिले होते.

👉 मात्र विंडीजच्या फलंदाजीदरम्यान सामन्यात पावसाने व्यत्यय आल्यामुळे,वेस्ट इंडिजला विजयासाठी 46 षटकात 270 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र विंडीजचा संघ 210 धावांपर्यंत मजल मारु शकला.

🧢 कोहलीचे शतक : भारताचा कर्णधार विराट कोहलीने चांगली कामगिरी बजावत 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावा केल्या.

💫 या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्राच्या मंजुरीनंतर जम्मू काश्मीरमध्ये मतदारसंघ पुनर्रचना होणार, निवडणूक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

● अभिनेता रितेश देशमुखनंतर महानायक अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत

● 'हिंदू पाकिस्तान' शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टाने जारी केले अटक वॉरंट

● दिल्लीतील रिक्षा चालकांसाठी केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, रिक्षा फिटनेस फी माफ करण्याचा घेतला निर्णय

● विमानतळावरील धरणे आंदोलनामुळे हॉंगकॉंगमधील विमानसेवा पूर्णतः ठप्प

● मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने अखेर नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड' या पुस्तकाचे शरद पवार व नितीन गडकरींच्या हस्ते होणार प्रकाशन

● पूरपरिस्थितीमुळे स्वातंत्र्य दिनासह रक्षाबंधनावर दूधटंचाईचे सावट; बासुंदी, श्रीखंड, मिठाईची टंचाई

● व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर, आता फिंगरप्रिंटच्या सहाय्याने मेसेज अनलॉक होणार

● भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींसह सहा दिग्गज मैदानात

● लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये पुन्हा एकदा होणार दयाबेनची एन्ट्री

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👮‍♂ राज्यातील 11 पोलिसांना 'केंद्रीय गृहमंत्री पदक'

LetsUp । Update

⚡ उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी देण्यात येणार पुरस्कार

👍 उत्कृष्ट कामगिरी : केंद्रीय गृहमंत्री पदकाने देशातील 96 तपास अधिकाऱ्यांचा गौरव झाला असून त्यात महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

💁‍♂ गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा व तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या वर्षीपासून या पदकांची सुरुवात करण्यात आली आहे.

▪ सीबीआय - 15 अधिकारी
▪ महाराष्ट्र पोलीस - 11 अधिकारी
▪ उत्तर प्रदेश - 10 अधिकारी
▪ केरळ पोलीस - 9 अधिकारी
▪ मध्य प्रदेश - 8 अधिकारी
▪ दिल्ली व कर्नाटक पोलीस - 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात 13 महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही बाजी मारली आहे.

🥇 महाराष्ट्रातील पदकविजेते अधिकारी

1) अविनाश लक्ष्मीकांत आघाव (पोलीस निरीक्षक)
2) श्रद्धा अशोक वायदंडे (सहायक पोलीस निरीक्षक)
3) सुरेश नानाभाऊ रोकडे (पोलीस निरीक्षक)
4) प्रदीप विजय भानुशाली (पोलीस निरीक्षक)
5) प्रशांत श्रीराम अमृतकर (पोलीस उपअधीक्षक)
6) हेमंत सुभाष पाटील (पोलीस निरीक्षक)
7) प्रियांका महेश शेळके (सहायक पोलीस निरीक्षक)
8) सागर जगन्नाथ शिवलकर (पोलीस निरीक्षक)
9) संजय देवराम निकुंबे (पोलीस निरीक्षक)
10) सुधाकर दत्तू देशमुख (पोलीस निरीक्षक)
11) सचिन सदाशिव माने (सहायक पोलीस निरीक्षक)

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज निर्णायक लढत

LetsUp | Sports

⚡ मालिका विजयासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात

🏆 मालिका विजयाचं लक्ष : भारतानं वेस्ट इंडीज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज अखेरचा सामना होणार आहे.

🌧 पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता. त्यामुळं आता शेवटच्या सामन्यात विजय मिळवून भारताचे मालिका विजयाचं लक्ष्य असेल.

🧐 वेस्ट इंडीजसाठी एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तसेच तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. त्यामुळं वेस्ट इंडीजचा संघ गेलला विजयी निरोप देण्यासाठी मैदानात उतरेल.

🧢 याच सामन्यात शानदार शतक करणारा कर्णधार विराट कोहलीकडून आजही दमदार खेळी अपेक्षित आहे.

📍 स्थळ -पोर्ट ऑफ स्पेन,

⏰ वेळ - सायंकाळी 7 वाजता

📺 येथे पाहू शकता सामना : Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👨🏻‍🎨 विंग कमांडर अभिनंदन यांना 'वीरचक्र' जाहीर

LetsUp | Update

⚡ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 'वीर चक्र' पुरस्काराने गौरवण्यात येणार

🇮🇳 स्वातंत्र्यदिनी मिळणार 'वीर चक्र' : पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 हे लढाऊ विमान पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पदक जाहीर झाले आहे.

📆 15 ऑगस्ट रोजी अभिनंदन यांना वीरचक्र पदक प्रदान केले जाणार आहे.

🏵 वीरचक्र : 'वीरचक्र' हे भारतीय सैन्यदलातील जवानांना देण्यात येणारं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पदक आहे. अतुलनीय धाडस आणि शौर्यासाठी हे पदक दिलं जातं.

👉 3 महत्वाचे शौर्य पदक :
🥇 परम वीर चक्र'
🥈 'महा वीर चक्र'
🥉 'वीर चक्र'

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🚀 चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावले

LetsUp | Update

⚡ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सोडलेल्या 'चांद्रयान-2' च्या प्रवासाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

🌍 भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी 'चांद्रयान-२'नं पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून थेट चंद्राच्या दिशेनं सरळ प्रवास सुरू केला आहे. पृथ्वीची कक्षा सोडण्यापूर्वी 'इस्रो'नं 'ट्रान्स लूनार इंजेक्शन' हा किचकट प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला.

🗣 काय म्हणाले इस्रोचे अध्यक्ष? : 'चांद्रयान-2' हे चंद्राच्या वाटेवर सहा दिवस असेल आणि सुमारे 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास करून 20 ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल.

📍 चांद्रयान 2 चा प्रवास
▪ चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
▪ चंद्र हा पृथ्वीपासून 3.84 लाख किलोमीटर अंतरावर आहे.
▪ 20 ऑगस्टला चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.
▪ 3 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील.
▪ 7 सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 सप्टेंबरमध्ये लाँच होणार वनप्लसचा स्मार्ट टीव्ही

LetsUp | Tech

⚡ चिनी मोबाईल कंपनी वनप्लस ने केली अधिकृत घोषणा

📢 वनप्सल लवकरच स्मार्ट टीव्हीही लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच कंपनीनं या टीव्हीची घोषणा केली असून टीव्हीचं नावही जाहीर केलं आहे. 'वनप्लस टीव्ही' असं नाव आहे.

🔹 कंपनीने नुकताच टीव्हीचा अधिकृत लोगोही लाँच केला आहे.

📆 या दिवशी होणार लॉंच? : सूत्रांनुसार, 26 सप्टेंबरला हा टी.व्ही लाँच होईल असे सांगण्यात येत आहे. वनप्लसचा हा टीव्ही अँड्रोइड असून अनेक वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे.

💫 वेरियंट : वनप्लस टीव्ही 43, 55, 65 आणि 75 इंच वेरियंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या टीव्हीचा हाय-एंड वेरियंट 4kHDR डिस्प्लेला सपोर्ट करणार.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● पाकिस्तानकडून जम्मू कश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन, प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानचे 3 सैनिक ठार

● 29 ऑक्टोबरपासून सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

● आर्थिक मंदीत सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार उद्योगांना प्रोत्साहन पॅकेज देण्याच्या विचारात

● ओएनजीसी कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनवाढीसाठी देशात 83 हजार कोटींची गुंतवणूक करणार

● राज्यात लवकरच ‘एक व्यक्ती, एक घर’ धोरण योजना लागू होणार, उच्च न्यायालयाच्या आदेशाची राज्य शासनाकडून अंमलबजावणी केली जाणार

● आर्थिक संकटात सापडलेली एमटीएनएल, बीएसएनएल उपक्रमातील कर्मचाऱ्यांसाठी अखेर स्वेच्छानिवृत्ती योजना जारी

● अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश आजपासून निश्चित होणार

● वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार; आरोग्य विद्यापीठाने दिली मान्यता

● टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत! सल्लागार समितीकडे लक्ष

● हिंदी चित्रपटांमुळे 'ये रे ये रे पैसा 2' ला थिएटर्स मिळणे मुश्कील; प्रसाद ओकने सोशल मिडीयावर व्यक्त केला राग

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🥳 आज पारसी नववर्षारंभ

LetsUp । Special

👉 जगभरात आज पारसी नववर्षाला सुरुवात होत आहे.

🎊 पारसी नववर्ष : दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पारसी नववर्षदिन साजरा करण्यात येतो. पासरी समुदायासाठी 360 दिवसांचे वर्ष असते, तर उर्वरीत 5 दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात. पारसी नववर्षाला 'नवरोज' असेही म्हणतात. महाराष्ट्रात 'पतेती' म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.

📆 इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला 'नवरोज' म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाउन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात.

🍱 पारशी जेवण : पारशी जेवण हे गुजराती आणि इराणी खाद्यसंस्कृतींवर आधारित आहे. यात मुख्यत्वे भात आणि दालचा (घट्ट वरण) सामावेश आहे. पारशी लोक मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात. पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली कोंबडी हे काही पारशी मांसाहारी पदार्थ आहेत. अंडी आणि स्क्रँबल्ड एग, पारसी आकूरी, पोरो सारखे अंड्याचे पदार्थ हे पारशी नाश्त्यात असतात.

💁‍♂ राष्ट्रपिता महात्मा गांधी काय म्हणाले? : हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त 0.007% आहे. पण, त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

📢 ‘चांगले विचार, आचार आणि सतकर्म ‘ हा ह्या पवित्र दिवसाचा संदेश आहे.

👏 पारसी नववर्ष नवरोझच्या शुभेच्छा !!!

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎯 मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?

LetsUp । Special

⚡ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतीदिन

💁‍♂ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्यातील काही ठळक घडामोडींचा घेतलेला आढावा...

📍 पोखरण टेस्ट : 1974 नंतर भारताने मे 1998 मध्ये पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी घेतली. भारत अण्विक शक्ती असलेला देश आहे हे दाखवून देण्यासाठी ही अणुचाचणी करण्यात आली. त्यांच्या या निर्णयाचा अनेक स्तरातून विरोध झाला. मात्र, या चाचणीनंतर भारत एक शक्तीशाली देश म्हणून जगाच्या समोर उदयास आला.

🔢 '13' नंबरचं स्पेशल कनेक्शन : वाजपेयींनी 13 मे 1996 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र बहुमत सिद्ध करता न आल्याने 13 दिवसांमध्ये त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांचे सरकार 13 महिन्यांमध्ये कोसळले. वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी 13 पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 13 ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घ्यायची असे त्यांनी ठरवले होते.

💫 काही विशेष :

▪ 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्नने गौरवण्यात आले.
▪ 6 ते 14 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे वाजपेयींच्या कार्यकाळात सुरू केले.
▪ माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक मानले जातात. परंतु या क्रांतीचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात केले.
▪ भारत-पाकिस्तान या देशांमधील संबंध सुधारण्यासाठी वाजपेयींनी अनेक मोलाचे प्रयत्न केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात दिल्ली-लाहोर ही बससेवा सुरू केली व पहिल्या बसमधून ते स्वत: लाहोरला गेले होते.
▪ 1942 मध्ये त्यांनी छोडो भारत आंदोलनात 23 दिवस कारावास भोगला होता.

👏 भारत रत्न, कुशल राजनीतिज्ञ, कुशल वक्ता व माजी प्रधानमंत्री श्री. अटल बिहारी वाजपेयी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌐 जाणून घ्या विकिपीडिया बद्दल महत्वाची माहिती

LetsUp | Education

💁‍♂ 18 वर्षापूवी सुरु झालेली 'विकिपीडिया' या वेबसाईटने आज इंटरनेटच्या जगात वेगळ स्थान निर्माण केले आहे. जर तुम्ही नेहमी इंटरनेटवर राहून विकिपीडियाचा वापर करत असाल तर तुम्हाला खालील गोष्टी माहित असणे आवश्यक आहेत.

1) 2001 मध्ये जिमी वेल्स आणि लैरी सेंगर यांनी विकिपीडियाला सुरुवात केली होती.

2) हे कोणाला हि माहिती नाही आहे कि विकिपीडियाचा पहिला लेख कोणता होता. विकिपीडियाचे संस्थापक ज़िमी वेल्स यांनी पुष्टि केली आहे कि त्यांच्या वेबसाइटचा पहिला लेख त्यांच्या वेबसाइटवरच कुठे तरी गहाळ झाला आहे.

3) विकीपीडिया मधील विकी या शब्दचा अर्थ 'जलद' असा होतो. हा शब्द "हवाई(hawaii)" भाषेमधून घेतला आहे.

4) इंग्रजी विकिपीडियातील वेबसाइट वर सर्वात जास्त म्हणजे 50 लाख लेख अस्तित्वात आहेत.

5) विकिपीडियावर रोज 7 हजार नवीन लेख प्रकाशित केले जातात.

6) विकिपीडिया भारतामध्ये सातव्या क्रमांकावर आहे ही वेबसाइट भारतामध्ये ट्विटरपेक्षा अधिक वापरली जाते.

7) विकिपीडियाचा पहिला लोगो 17 वर्षीय पॉल स्टैनिसर(paul stansifer) याने बनवला होता.

8) "सेक्स" विकिपीडिया वर सर्वात प्रसिद्ध लेख आहे, जो सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे.

9) 5 करोड पेक्षा जास्त वापरकर्ते दर महिन्याला विकिपीडियाचा वापर करतात. आणि प्रत्येक महिन्याला 2 अऱब एवढे वापरकर्ते वाढत आहेत.

10) विकिपीडियावर 50% पेक्षा जास्त लोक गुगल(google) द्वारा येतात.

11) विकिपीडियावर पैसा कमवण्यासाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात दाखवली जात नाही. विकिपीडिया “no loss no profit” वर चालू आहे.

12) प्रत्येक महिन्यात 5 करोड पेक्षा जास्त युजर्स विकिपीडियाचा वापर करतात आणि प्रत्येक महिन्यात 2 अरब पेक्षा जास्त वेळा या वरील लेख वाचले जातात.

13) जर विकिपीडियावर एखादा लेख इंग्रजीमध्ये वाचताना कठीण वाटत असेल तर "simple english" या ऑप्शन वर क्लिक करा.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
⛈ पावसाने मोडला 50 वर्षांचा रेकॉर्ड!

LetsUp | Update

📣 भारतीय हवामान शास्त्र विभागाने आकडेवारी जाहीर केली.

💁‍♂ त्यानुसार गेल्या 50 वर्षांतील सरासरीच्या तुलनेत या वर्षीच्या 8 ते 14 ऑगस्ट या आठवडाभराच्या काळात देशभरात तब्बल 45 टक्के एवढ्या अधिक पावसाची नोंद.

1) सर्वाधिक पाऊस : तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप, त्याखालोखाल महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानात अधिक पावसाची नोंद
2) सामान्य पाऊस : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, त्रिपुरा, मिझोराम
3) अपेक्षेपेक्षा कमी पाऊस : तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, आसामचा काही भाग, बिहार, हरयाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर

🤔 सध्या परिस्थिती काय? :

● आगामी काळात सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. केवळ हलका पाऊस सुरू राहील.
● दक्षिण मध्य महाराष्ट्रातील इतर भागातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
● दक्षिण कोकण आणि गोवा येथे मध्यम पावसासह काही जोरदार सरींची शक्यता आहे.

💫 पावसाचे प्रमाण कमी होण्याचे कारण मान्सूनची दुर्बल झालेली लाट आहे. महाराष्ट्राच्या इतर विभागांतही पावसाचा जोर कमी झाला आहे : स्कायमेट

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 मतदान कार्डही ‘आधार’ला जोडणार!

LetsUp | Update

📍 पॅन कार्डनंतर आता मतदान ओळखपत्रही आधारला जोडण्यात येणार

👉 केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाकडे मतदान कार्ड आणि आधार जोडणीची केली मागणी

📝 निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला यासंदर्भात लिहिले पत्र

🤔 पत्रात आयोगाने म्हटले :

● मतदान कार्ड ‘आधार’शी जोडल्यास बोगस मतदानासारख्या गैरप्रकारांना आळा बसेल
● लोकप्रतिनिधी कायदा 1950 मध्ये सुधारणा करावी

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗞 LetsUp News Updates

● पूरग्रस्त भागात दाव्यांचा त्वरित निपटारा करा, केंद्र अर्थ मंत्रालयाची विमा कंपन्यांना सूचना

● देशभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तब्बल 269 जणांचा मृत्यू तर 42 जण बेपत्ता

----------------------
🌕 आज संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय : 9.37 Pm
----------------------

● देशातील 9 शहरांत सध्या 45 लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या 4.12 लाख सदनिका तयार

● दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाला पीएम मोदींचं नाव द्या, भाजप खासदार हंसराज हंस यांची मागणी

● पुढील दोन ते तीन आठवडे राज्यात कोरडे हवामान राहणार, हवामान विभागाने वर्तविला अंदाज

● बालभारतीकडून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना तातडीने दीड लाखांहून अधिक पुस्तकं वाटप

● कोहिनूर प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस; 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

● वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप आज साेमवारपासून बासेल (स्वित्झर्लंड)मध्ये सुरू, भारताचे 19 खेळाडू सहभागी

● प्रो कबड्डी : पुणेरी पलटन-तमिळ थलैवा सामना बरोबरीत तर तेलुगू टायटन्सचा हरयाणा स्टीलर्सवर विजय

● दिग्गज अभिनेत्री झिनत अमानचा मुलगा जहान खान बॉलिवूडमध्ये एक संगीतकार म्हणून करणार पदार्पण

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🚍 येत्या आठवड्यात एसटीत ‘व्हीटीएस’

LetsUp | Update

📣 राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एसटी महामंडळातील लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश

👍 त्यानुसार येत्या आठवड्यात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस) प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता

✔ या प्रकल्पांतर्गत एसटीची 'रिअल' वेळेत माहिती मिळावी यासाठी मोबाइल अ‍ॅपही प्रवाशांना उपलब्ध होणार

👌 हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास एसटी येण्याच्या 10 मिनिटे आधी प्रवाशांना मोबाईल फोन अ‍ॅपद्वारे सूचना मिळेल

🤔 काय-काय लाभ मिळणार? :

● एसटी कुठे आहे? ती कधी येणार? हे कळणार
● चालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार
● डिजिटायझेशनकडे जाणाऱ्या एसटीचा मोलाचा टप्पा असेल

🎯 प्रकल्पाची चाचणी यशस्वी :

● महामंडळाकडून नाशिक विभागात यशस्वी चाचणी, आता मुंबई, पुणे, ठाणे या विभागांत ही सुविधा राबवण्यात येईल
● मुंबईसह नाशिक, पुणे या विभागातील एसटींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात येईल
● यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील बसगाड्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏸 आजपासून रंगणार विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धा

LetsUp | Sports

⚔ आजपासून (दि.19 ) बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा स्वित्झर्लंडमधील बॅसेल येथे रंगणार

👉 या स्पर्धेत 45 देशांतील 357 तर भारताचे 19 खेळाडू सहभागी होणार

🇮🇳 सिंगल्समध्ये भारताचे 6 खेळाडू असून डबल्समध्ये 8 जाेड्या आहेत

🎯 भारतीय खेळाडू :

● सिंगल्स : पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत, समीर वर्मा, बी. साईप्रणीत, एच. एस. प्रणॉय
● पुरुष दुहेरी : मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी, एमआर अर्जुन आणि रामचंद्रन श्लोक तसेच अरुण जॉर्ज आणि सन्यम शुक्ल
● महिला दुहेरी : अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी, जक्कमपुडी मेघना आणि पूर्विशा एस. राम, पूजा दांडू आणि संजना संतोष
● मिश्र दुहेरी : प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की

--------------------------------------------

🧐 ICC कडून 'या' नियमाचा वापर!

📍 अ‍ॅशेसमध्ये इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने टाकलेला बाऊन्सरमुळे दुखापतग्रस्त स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या टेस्टला मुकणार

🧢 आयसीसीच्या नव्या नियमानुसार मार्नस लाबुसचग्ने याला स्मिथचा बदली खेळाडू म्हणून देण्यात आली संधी

✔ नवीन नियमाचा प्रथमच वापर :

● 1 ऑगस्टपासून आयसीसीचे नवे नियम लागू
● त्यानुसार मैदानात खेळाडूला गंभीर दुखापत झाली, तर या खेळाडूला बदली खेळाडू देण्यात येणार
● कनकशन सबस्टिट्यूट, असे नाव या नियमाला देण्यात आलेय
● यामुळे मार्नस लाबुसचग्ने हा पहिला कनकशन सबस्टिट्यूट खेळाडू ठरला

--------------------------------------------

🏏 श्रीलंकेचा न्यूझीलंडवर विजय

⚡ श्रीलंकेने न्यूझीलंडविरूद्धचा पहिला क्रिकेट कसोटी सामना 6 गडी राखून जिंकला

👍 या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली

💁‍♂ श्रीलंकेकडून विजयासाठी आवश्‍यक असलेले 268 धावांचे लक्ष्य 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण

🏆 दिमुथ करूणारत्ने लंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला, त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 सतत अ‍ॅसिडिटी होते? मग आहाराचे व्यवस्थित नियोजन करा!

LetsUp | Health

अन्न हे पूर्णब्रह्म! हे आपण अनेकदा ऐकतो. कोणी काही खायला दिलं तर 'नाही' न म्हणण्याचे आपली संस्कृती सांगते. मात्र किती खावे आणि कधी खावे? हे मात्र आपली प्रकृती पाहून आपण ठरवायला हवे.

अनेकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवतो आणि उलटी, मळमळणं या गोष्टी दैनंदिन जीवनाचा हळूहळू भाग होतात. व्यवस्थित खाऊन, तेलकट पदार्थ टाळून देखील त्रास होत असेल तर का बरं अ‍ॅसिडिटी होत असेल या विचाराने अनेकजण त्रासलेले असतात. खालील टिप्स फक्त अ‍ॅसिडिटीने त्रासलेल्यांसाठी आहेत...

1) आहाराच्या वेळा पाळा :

● सातत्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास आहारांच्या वेळा योग्य आहेत का? याची खात्री करून घ्यावी.
● कितीही कामामध्ये गुंतले असले तरी कामाच्या स्वरूपानुरूप दुपारच्या जेवणाची वेळ पाळणे आवश्यक आहे.
● सकाळची न्याहारी सर्वसाधारणपणे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घ्यावी.
● न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार ते पाच तासांचे अंतर असायला हवे. हे शक्य नसेल तर न्याहारीमध्ये पोळी-भाजी खावी.
● दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मधल्या वेळात हलक्या पदार्थाचे सेवन करावे.

2) पथ्ये पाळायला हवी : सातत्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास पुढील पथ्यांचे पालन केल्यास नक्कीच फरक जाणवतो.

● शिळे पदार्थ, आंबट दही, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
● भाज्यांमध्ये मेथी, मेथीचे पदार्थ, मुळा आणि मुळ्याचे पदार्थ, सिमला मिरची यांचे प्रमाण कमी असावे.
● हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेली मिरची हे पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत.

3) ट्राय करा घरगुती उपाय :

● रोज एक चमचा मोरावळा खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
● आवळा पावडर आणि ज्येष्ठमध समभाग एकत्र करून अर्धा चमचा रोज सकाळ-संध्याकाळ दोन वेळा घ्यावी. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते.
● डोळ्यांची आग होत असल्यास थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून डोळ्यांवर ठेवल्यास बराच आराम पडतो.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📸 आज जागतिक फोटोग्राफी दिन

LetsUp | Special

दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो. अव्यक्त भावनांना बोलकं करणाऱ्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आज आपण जागतिक फोटोग्राफी दिनाचा इतिहास, आणि साजरा करण्यामागचे कारण जाणून घेऊया...

🎯 जाणून घ्या इतिहास :

● फ्रान्समध्ये सुरूवात झालेल्या जागतिक फोटोग्राफी दिनाला सुमारे पावणे दोनशे वर्षांचा इतिहास आहे.
● लुईस द गेरो आणि जोसेफ नायफोर यांनी 1837 मध्ये दगेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. यामुळे छायाचित्रण सोपे बनले.
● साधारण सन 1800 मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली.
● त्यानंतर 1839 च्या दरम्यान व्यावसायिक छायाचित्रकेलचा जन्म झाला.
● इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा 1990 मध्ये जन्माला आला.
● सध्या छायाचित्रण व्यवसाय नव्या क्रांतीच्या मार्गावर आहे.

🖼 जगातील पहिला फोटो : जोसेफ निकफेर निएपेस याने 1826 किंवा 27 दरम्यान फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशातील 'ल ग्रास' येथील एका खिडकीतून दिसणार्‍या दृश्याचे पहिले छायचित्र टिपले.

💁‍♂ पहिला जागतिक फोटोग्राफी दिन : जगभरातल्या फोटोग्राफर्सनी 19 ऑगस्ट 2010 रोजी पहिला जागतिक फोटोग्राफी दिन आयोजित केला. जगभरातून 270 फोटोग्राफर्सनी यामध्ये भाग घेतला. त्यांचे फोटोग्राफ्स तब्बल 100 देशांमधल्या लोकांनी पाहिले. त्यानंतर दरवर्षी 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस म्हणून साजरा होऊ लागला.

हा दिन साजरा करण्‍याचा महत्त्वाचा उद्‍देश आहे की, फोटोग्राफीला प्रोत्‍साहन देणे व मार्गदर्शन करणे हा आहे. या दिवसामुळे वेगवेगळ्‍या देशातील विभिन्‍न संस्‍कृतीचे लोक एकत्र येतात. फोटो प्रदर्शन, स्‍पर्धा, व्‍याख्‍याने, कार्यशाळा याचे आयोजन केल्यामुळे अनेकांना एक व्‍यासपीठ मिळते. यानिमित्त या क्षेत्रासाठी ज्‍या विद्वानांनी योगदान दिले त्‍यांच्‍या आठवणी अजुनही ताज्‍या होतात. त्‍यातून नवीन छायाचित्रकारांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळते.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup