LetsUpp Marathi
5.27K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🏏 जाणून घ्या कसोटी वर्ल्ड कपचे वेळापत्रक

LetsUp । Special

कसोटी वर्ल्ड कपला येत्या 1 तारखेपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघातील अ‍ॅशेस मालिकेद्वारे होणार सुरुवात

👍 पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 27 मालिका तर 71 सामने होणार

🇮🇳 भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशीपमधील पहिला सामना 22 ऑगस्टला वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार

🧢 भारतीय संघ वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार

📍 विशेष बाबी :

● ही चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात पार पडणार
● यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा असणार समावेश
● तसेच 9 संघांना प्रत्येकी 8 प्रतिस्पर्ध्यांपैकी 6 संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार, यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर 3 मालिका परदेशात खेळाव्या लागणार

👀 गुणांचं विभाजन कसं? :

● प्रत्येक मालिका 120 गुणांसाठी नियंत्रित करण्यात आली आहे
● उदाहरणार्थ, 2 मॅचची सीरिज असेल तर प्रत्येक टेस्ट जिंकण्यासाठी 60 गुण असतील. एखाद्या संघाने दोन्ही टेस्ट जिंकल्या तर त्यांना 120 गुण मिळू शकतात
● टेस्ट मॅच टाय झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 30 आणि टेस्ट मॅच ड्रॉ झाली तर प्रत्येकी 20 गुण देण्यात येतील. हरल्यानंतर एकही गुण मिळणार नाही. हेच सूत्र बाकी समीकरणांना लागू होईल
● 3 टेस्टची सीरिज : जिंकण्याकरता 40 गुण, टायकरता 20 गुण तर ड्रॉ करता 13.3 गुण
● 4 टेस्टची सीरिज : जिंकण्याकरता 30, टायकरता 15 तर ड्रॉकरता 10 गुण
● 5 टेस्टची सीरिज : जिंकण्याकरता 24 गुण, टायकरता 12, ड्रॉ करता 8 गुण

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
LetsUp News Updates

● भारत रशियाकडून ‘आर -27’ क्षेपणास्त्रांची खरेदी करणार, 1500 कोटींच्या खरेदी करारावर स्वाक्षरी

● वाहन नोंदणी आता ऑनलाईन, ‘प्रवासी 2019’ प्रदर्शनामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

● केंद्रीय दूरसंचार विभागाने 5जी ध्वनिलहरी परवाने लिलावाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

● उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार अजून भाजपात कसा काय?, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा सवाल

● माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 8 ऑगस्ट रोजी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला जाणार

● महाराष्ट्रातील वाघांची संख्या 190 वरुन 312, स्थानिकांच्या सहभागातून केलेल्या व्याघ्रसंवर्धनाच्या प्रयत्नाचे हे यश : सुधीर मुनगंटीवार

● गुगल आपले वेब ब्राउजर गुगल क्रोम अपग्रेड करणार, आज (दि.30) गुगल क्रोम 76 रिलीज होणार

● रोहित शर्माशी वाद असते, तर विश्वचषकात चांगल्या प्रकारे खेळ झाला नसता; विराट कोहलीचे स्पष्टीकरण

● प्रो कबड्डी : बंगाल वॉरियर्सचा पुणेरी पलटनवर दणदणीत विजय तर पटणा पायरेट्सचा तमिळ थलैवावर रोमहर्षक विजय

● अभिनेता संजय दत्तच्या आगामी 'प्रस्थानम' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
📣 महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात 702 जागांसाठी भरती

LetsUp । Job

💁‍♂ पदाचे नाव : किसान मित्र

🎓 शैक्षणिक पात्रता : B.Sc (कृषी) किंवा B.Sc (उद्यानविद्या)

🧐 वयाची अट : 01 जुलै 2019 रोजी 21 ते 46 वर्षे.

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र I फी नाही

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 30 जुलै 2019

🗞 जाहिरात पाहा : http://bit.ly/2SQjoAv

🌐 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/2YsOPpJ

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
💁‍♂ Letsup I General Knowledge

1) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत 1000 धावा आणि गोलंदाजीत 100 बळी मिळवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ती कोणत्या देशाची रहिवासी आहे?

उत्तर : एलिस पेरी - ऑस्ट्रेलिया

2) भारतीय लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन्स विभागाचे नवे महासंचालक (DGMO) कोण असणार आहेत?

उत्तर : लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग

3) नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल 2018' प्रसिद्ध केला. त्यानुसार, देशातल्या वाघांची संख्या वाढून किती झाली आहे?

उत्तर : 2,967

4) एम्पुमलांगा (दक्षिण आफ्रिका) येथे “मिस्टर अ‍ॅण्ड मिस डेफ वर्ल्ड 2019” ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. यात कोणत्या व्यक्तीने 2019 या वर्षाचा ‘मिस्टर डेफ वर्ल्ड’ हा किताब जिंकला?

उत्तर : फुमेलेला मापुकाता (24 वर्ष)

5) थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धा 2019 मध्ये कोणत्या भारतीय मुष्टीयोद्धाने भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले?

उत्तर : आशीष कुमार (75 किलो वजनी गट)

6) जुलै 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या ताज्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) याच्या मानांकन यादीत भारतीय फुटबॉल संघाचा कोणता क्रमांक आहे?

उत्तर : 103

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
🥳 सोनू निगम @ 46 वर्षे

Letsup I Special

गेल्या अनेक दशकापासून आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा लोकप्रिय पार्श्वगायक म्हणजे सोनू निगम. 'अच्छा सिला दिया' सारख्या गाण्यातून दर्द असो किंवा मराठीतील 'टिक टिक वाजते' तुन हृदयाची धडधड असो सोनू सगळीकडे आपली छाप पडतो.

भाषेची बंधन झुगारून सोनुने हिंदी, बंगाली, उडिया, कानडी, पंजाबी, तामीळ, तेलुगू, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, मराठी या भाषांतही गाणी म्हटली आहेत. आज सोनू निगम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीतील काही अप्रतिम गाणी पाहुयात...

1. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का (बेवफा सनम) : http://bit.ly/2YtmX0X

2. अब मुझे रात दिन (दिवाना) : http://bit.ly/2K31fgk

3. संदेसे आते हैं (बॉर्डर) : http://bit.ly/2YtlYOb

4. ये दिल दीवाना (परदेस) : http://bit.ly/32YOuux

5. पेहली पेहली बार बलिये (संघर्ष) : http://bit.ly/2SQaXp6

6. तनहाई (दिल चाहता है) : http://bit.ly/32YUEuH

7. कल हो ना हो (कल हो ना हो) : http://bit.ly/2Yt6EVH

8. सूरज हुआ मद्धम (कभी ख़ुशी कभी गम) : http://bit.ly/2GBKKpd

9. मैं अगर कहूँ (ओम शांती ओम) : http://bit.ly/2Kd1W5l

10. मेरे हाथ मे (फना) : http://bit.ly/2K2IyZV

11. झुबी डुबी (थ्री इडियट्स) : http://bit.ly/2Kh5jZ9

12. अभी मुझ में कहीं (अग्नीपथ) : http://bit.ly/2yoJoK6

13. हिरवा निसर्ग (नवरा माझा नवसाचा) : http://bit.ly/2ZiNFdD

14. आभास हा (यंदा कर्तव्य आहे) : http://bit.ly/2LNhSyA

15. टिक टिक वाजते (दुनियादारी) : http://bit.ly/2LOdLlI

16. तू हवीशी (ऑनलाईन- बिनलाईन) : http://bit.ly/2ZkxZ9P

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
😍 अन्य बँकांच्या ATMमधून पैसे काढणे होणार स्वस्त!

Letsup I National

😇 आता अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणारे शुल्क कमी करण्याचा RBIचा विचार

📝 एटीएम वापराबाबतच्या सर्व शुल्कांची समीक्षा करण्यासाठी RBIने स्थापन केलेल्या समितीने केला अहवाल तयार

● त्यानुसार अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याची शिफारस
● ही समिती लवकरच आपला अहवाल आरबीआयकडे सुपूर्द करणार
● एटीएमचा वाढलेला वापर पाहून आवश्यक त्या सर्व शुल्कांची समीक्षा करून समितीने केला अहवाल तयार
● RBIच्या प्रतिनिधींसह बँकांचे अधिकारी आणि ग्राहकांच्या प्रतिनिधींचाही होता समितीमध्ये समावेश

👍 सध्या महिन्यातून 5 वेळा अन्य बँकांचे एटीएम विनाशुल्क वापरता येते. तर ही मर्यादा मेट्रो शहरांसाठी 3 व्यवहारांची आहे

💫 पुढील महिन्यात RBIकडून एटीएम शुल्क कमी करण्याच्या अहवालाबाबत घोषणा होण्याची शक्यता

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
💁‍♂ धनगर समाजाला मोठा दिलासा! राज्य सरकारचा मोठा निर्णय

Letsup I Update

📣 अनुसुचित जमातीतील (एसटी) समाजाला लागू असलेल्या 22 महत्त्वाच्या योजना धनगर समाजाला लागू होणार

👍 आज (दि.30) मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

💫 यामुळे शिष्यवृत्तीसह शैक्षणिक योजना, भूमिहीनांना जमिनी तसेच घरकुल योजनांचा धनगर समाजाला लाभ मिळणार

💰 या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध, त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
LetsUp News Updates

● लोकसभेनंतर राज्यसभेतही तिहेरी तलाक विधेयक मंजूर; विधेयकाच्या बाजुने 99 तर विरोधात 84 मते

● वैद्यकीय विधेयकाविरुद्ध ओपीडीसह अत्यावश्यक वगळता सर्व सेवा देशभर आज गुरुवारी (दि.31) सकाळी 6 पर्यंत बंद राहणार

● काँग्रेसकडून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणामुळे कर्नाटकातील 14 बंडखोर माजी आमदारांची हकालपट्टी

● सीबीएसईने दिलेल्या निर्देशानुसार, 10 वी व 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडलेले विषय बदलण्याची परवानगी मिळणार नाही

● परराष्ट्र मंत्रालयाने देशभरातील बनावट ट्रॅव्हल एजंट्सची यादी केली जारी, यामध्ये बनावट एजंटांची नावे, पत्ते व फाेन नंबरही आहेत

● राज्यात 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तारीख जाहीर, 31ऑगस्ट 2019 रोजी मतदान होणार

● राज्यात आणखी 4 ठिकाणी लवकरच टपाल कार्यालयांत पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार

● पोर्श कंपनी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत, 4 मिनिटं चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर पर्यंत धावणार

● उत्तेजक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने फलंदाज पृथ्वी शॉला 8 महिन्यांसाठी केले निलंबित

● सलग 17व्या दिवशी 'सुपर 30' चित्रपटाची विक्रमी कमाई, 125 कोटी रूपयांचा आकडा केला पार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
💥 ब्रेकिंग! व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू

LetsUp | Breaking

कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू, त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे.

🏥 काही वेळात सिद्धार्थ यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होणार असून त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.

👀 आर्थिक व्यवहार प्रकरण आणि आयकर विभागाकड़ून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

🧐 व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.

🔎 गेल्या 36 तासांपासून व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता होते. त्यांचं झालं काय हा प्रश्न कायम होता. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे.

📝 काल (दि.30) सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेली एक चिठ्ठी सापडली होती. त्यात त्यांनी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छळ झाल्याचा तसेच, कर्जदारांकडून असह्य दबाव असल्याचे म्हटले होते.

🤔 'कॅफे कॉफी डे' काय आहे? : 'कॅफे कॉफी डे' हा देशातला सगळ्यांत मोठा कॉफी उद्योग समूह आहे. सीसीडी या नावाने प्रसिद्ध या उद्योगाच्या देशभरात 1,750 शाखा आहेत. मलेशिया, नेपाळ आणि इजिप्तमध्येही त्यांची काही आऊटलेट आहेत.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
📣 ऐतिहासिक! तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

LetsUp | Update

तत्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही झाले मंजूर

👍राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे.

💁‍♂ तत्काळ तिहेरी तलाकविरोधातील विधेयकाच्या बाजूने 99 तर विरोधात 84 मते पडली.

तत्काळ तिहेरी तलाकला हद्दपार करणारा भारत हा जगातला एकविसावा देश ठरला.

💫 भारताआधी इजिप्त, सुदान, श्रीलंका, इराक, सायप्रस, जॉर्डन, अल्जेरिया, इराण, ब्रुनेई, मोरोक्को, कतार, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश इतकंच काय अगदी पाकिस्तानातही तिहेरी तलाकवर बंदी आहे.

🧐 तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय? : 'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते. हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.

📍 विशेष बाबी :

● तत्काळ तिहेरी तलाक देणाऱ्यांना पोलीस तातडीने अटक करु शकतात, मात्र त्यासाठी स्वतः महिलेने तक्रार करायला हवी.
● महिलेच्या रक्ताचे नातेवाईकही तक्रार दाखल करु शकतात, परंतु शेजारी -किंवा अनोळखी व्यक्तींना तक्रार करता येणार नाही.
● तोंडी, लेखी, व्हॉट्सअ‍ॅपवर तलाक देणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
● पीडित महिलेची बाजू ऐकल्यानंतर आरोपीला तात्काळ जामीन दिला जाऊ शकतो.
● महिलेने तयारी दर्शवली तर मॅजिस्ट्रेट समजुतीने प्रकरण सोडवण्याची मुभा देतील.
● पीडित महिला पोटगी मागू शकते.
● पीडित महिलेला किती नुकसान भरपाई द्यावी हे न्यायालयातील सुनावणीनंतर निश्चित केले जाईल.
● पीडितेची मुलं अज्ञान असतील तर त्यांची कस्टडी कोणाकडे असेल? हे न्यायाधीश ठरवतील.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
💁‍♂ राज्यात 67 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची तारीख जाहीर

LetsUp | Political

राज्यातील विविध 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 31 ऑगस्टला होणार मतदान

🗣 राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली माहिती, यामुळे निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता झाली लागू

💫 1 ऑक्टोबर ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.

📍 जिल्हानिहाय संख्या : ठाणे : 6 I रायगड : 9 I रत्नागिरी : 4 I सिंधुदुर्ग : 3 I नाशिक : 25 I धुळे : 1 I सातारा : 4 I सोलापूर : 1 I कोल्हापूर : 1 I उस्मानाबाद : 3 I अकोला : 2 I यवतमाळ : 1 I वर्धा : 5 I चंद्रपूर : 2

🧐 निवडणूक कार्यक्रम :

● सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे दि. 9 ते 16 ऑगस्ट या कालावधीत स्वीकारली जातील. (शासकीय सुट्टी वगळून)
● त्यांची छाननी 19 ऑगस्टला होईल.
● नामनिर्देशनपत्रे दि. 21 ऑगस्टपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.
● मतदान दि. 31 ऑगस्टला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsu
💥 भाजपमध्ये मेगाभरती! दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

LetsUp | Breaking

📍 निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनके दिग्गज नेत्यांनी भाजपात केला प्रवेश

🧐 'या' नेत्यांनी केला प्रवेश : मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर

👉 नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 52 नगरसेवकांनीही केला भाजपात प्रवेश

👍 गरवारे क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांचे जंगी स्वागत केले

🗣 मुख्यमंत्री काय म्हणाले? :

● महाराष्ट्रातल्या आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्गज लोक भाजपाच्या परिवारात आले याचा मनस्वी आनंद होतो आहे
● भाजपात येणाऱ्या नेत्यांना आम्ही कोणताही धाक आणि प्रलोभन दाखवली नाही. तर ती स्वतः हून जनतेच्या इच्छेने भाजपात आली आहेत
● भारतीय जनता पक्ष ही धर्मशाळा नसून कुणालाही भाजपात प्रवेश दिला जात नाही
● मधुकर पिचड यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आम्हाला फायदा होईल
● शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत ते भाजपात येणे ही आनंदाची बाब आहे
● कालिदास कोळंबकर हे लोकांमधून आलेले नेते आहेत. सामान्य माणसे आणि पोलिसांठी जे आंदोलन केले ती बाब चांगलीच आहे

💫 या पक्षप्रवेसामुळे आजचा दिवस हा भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा http://bit.ly/ltsupTele
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

🎭 समलैगिंकतेवर भाष्य करणारा शिरकुर्मा : आगामी 'शिरकुर्मा' या चित्रपटात बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाची कथा समलैंगिकता या विषयावर आधारित आहे.

👉 अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज अन्सारी हे करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

🎼 'पेहलवान'चे पहिले गाणे रिलीज : अभिनेता सुनील शेट्टी 'पेहलवान' या चित्रपटातून पडद्यावर झळकणार आहे. त्यांचा या चित्रपटातील फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटातील पहिले गाणे देखील आता रिलीज करण्यात आले आहे.

👉 या गाण्याला गणेश आचार्य यांनी कोरियोग्राफ केले आहे. तर हे गाणे व्यास राज, देव नागी आणि अमृता यांनी गायले आहे. तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

😍 बिग बॉसचे 13 वा सीझन लवकरच : बिग बॉस या वादग्रस्त रिऑलिटी शोचा 13 वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. हा भागही सलमान खानच होस्ट करणार आहे.

👉 यंदा बिग बॉसच्या घराचा पत्ता बदलला असून लोणावळ्याऐवजी मुंबईतील गोरेगाव येथे बिग बॉसचे घर असणार आहे. खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने लोणावळ्याऐवजी मुंबईत सेट उभारण्यात येणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ

LetsUp । Update

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता

💁‍♂ जनावरांसाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

📍 मुदतवाढसाठी मागणी : छावण्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी मागणी केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य करून त्याला मुदतवाढ दिली आहे. त्याबाबत अध्यादेशदेखील जारी केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

🧐 का वाढवली मुदत? :
राज्यातील बहुतांश भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही
मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहे
दरम्यान, शेतकऱ्यांकडून चारा छावण्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली
अखेर महसूल व वन विभागाने परिपत्रक काढून चारा छावण्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📅 1 ऑगस्टपासून या तीन गोष्टी स्वस्त होणार

LetsUp । Update

🛵 इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त : 1 ऑगस्टपासून इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणं स्वस्त होणार आहे. जीएसटी काउन्सिलनं बॅटरीवर चालणाऱ्या कार्स आणि बाइकवर लागणारा GST कमी केलाय. इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटीचे दर 12 टक्क्यांहून कमी होऊन 5 टक्के झालेत. तर चार्जरवरचा जीएसटी 18 टक्क्यांहून कमी होऊन 12 टक्के झालाय.

🏦 'एसबीआय' च्या या सेवा मोफत : एसबीआयने ग्राहकांसाठी आईएमपीएस शुल्क रद्द केलं आहे. जे ग्राहक इंटरनेट बँकींग आणि मोबाईल पेमेंट सारखे काम करतात त्यांना उद्यापासून कोणतेही शुल्क लागणार नाही. यासोबत आरटीजीएससाठी एनईएफटी वर लागणारे शुल्क रद्द केले आहे.

🏡 स्वस्तात घर खरेदी करु शकता : तुम्ही दिल्लीत राहात असाल तर नोएडा आणि ग्रेट नोएडा इथे घर खरेदी करणं किंवा दुकान घेणं स्वस्त झालंय. या नव्या निर्णयामुळे ग्रुप हाउसिंगमध्ये 6 टक्के आणि कमर्शियलमध्ये 25 टक्के सरचार्ज रद्द केलाय.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● राज्यसभेत मोटर वाहन दुरुस्ती विधेयक मंजूर, आता वाहतुकीचे नियम मोडणे महागात पडणार

● दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी लहान मुलांचा वापर; संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता

● क्यूएस क्रमवारीत विद्यार्थ्यांसाठी लंडन हे जगातील तर बंगळुरू भारतातील सर्वोत्तम शहर

● जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा येत्या 4 ऑगस्टपर्यंत स्थगित

● अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे पुत्र रिशद प्रेमजी विप्रो हे झाले विप्रोचे चेअरमन

● Lenovo ने भारतात लॉन्च केला Yoga S940 लॅपटॉप, किंमत 23,990 रुपये

● अखेर रोइंगपटू दत्तू भोकनळला दिलासा, कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा हायकोर्टाने केला रद्द

● प्रो-कबड्डी : जयपूर पिंक पँथर्सची विजयाची हॅट्रीक तर यूपी योद्धाने यू-मुंबावर मिळविला विजय

● आजपासून रंगणार ‘अ‍ॅशेस’चा थरार, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी एजबॅस्टनवर

● लवकरच बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसह विवाहबंधनात अडकणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 आता वाहतुकीचे नियम मोडणे पडणार चांगलेच महागात

LetsUp | Update

राज्यसभेत मोटर वाहन दुरुस्ती विधेयक-2019 प्रदीर्घ चर्चेनंतर 13 विरूद्ध 108 अशा फरकाने मंजूर झाले.

👍 केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडले.

🗣 नितीन गडकरी काय म्हणाले? :

● देशात मागील 5 वर्षात रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
● तसेच, यामध्ये होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षाच्या सध्याच्या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.
● सरकारचा मोटर वाहन दुरुस्ती विधेयकाद्वारे राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विचार नाही.

📝 विधेयकात काय-काय?

● आता हेल्मेट न वापरणाऱ्यास 100 रूपयां ऐवजी एक हजार रुपये दंड तसेच लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे.
● दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास दोन हजारांऐवजी आता दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
● हिट अ‍ॅण्ड रन केसमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्यात येणार आहे.
● गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास व परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यास 5 हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे.
● आता कुणालाही टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज पडणार नाही. कारण वाहनचालकांना मोबाईलद्वारेच टोल भरता येणार आहे.
● वाहन चालवण्याची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला घर बसल्याचं ऑनलाइन वाहन शिकत असल्याचा परवाना मिळणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 तुम्हाला माहित आहे का?

LetsUp | Do U Know

1) जगातील सर्वात धोकादायक भूकंप चिली (Valdivia, Chile) मध्ये आला होता. ज्याची तीव्रता 9.5 इतकी होती.

2) जगातील सर्वात सर्वात उंच महिला यओ डेफेन (Yao Defen) असून तिची उंची 7 फुट 8 इंच एवढी आहे.

3) जगातील सर्वात लांब नाक असण्याचा विक्रम मेहमत ओज़्यूरिक (Mehmet Ozyurek : 8.8 Cm) यांच्या नावावर आहे.

4) जगातील सर्वात लांब मिश्या असण्याचे रेकॉर्ड भारताच्या राम सिंग चौहान (4.29 मी) यांच्या नावावर आहेत.

5) क्रिकेटमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद अफरीदीच्या नावावर आहे. त्याने 158 मी. लांब षटकार लगावला होता.

6) जगातील सर्वात महागडी भेट वस्तू "ताज महल" असल्याचे म्हटले जाते. जे बेगम मुमताजच्या स्मुत्यर्थ बांधले गेले होते.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त

LetsUp | National

🗣 सरकारने विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची केली कपात : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन

👍 आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्याने ग्राहकांना मिळाला दिलासा

👉 या नव्या दरांमुळे 14.2 किलोच्या अनुदानित गॅसचा दर आता 574.50 रुपये इतका, हा नवा दर झाला लागू

💰 दरम्यान, नव्या दराप्रमाणे प्रत्येक सिलेंडरसाठी ग्राहकाला बँक खात्यात 142.65 रुपयांचे अनुदान मिळेल

💫 गेल्या 2 महिन्यात एकूण मिळून विनाअनुदानित प्रति गॅस सिलेंडरमध्ये 163 रुपयांची कपात करण्यात आली

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ

LetsUp | Update

दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा.

💁‍♂ निर्णय : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण युवक कल्याण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

👌राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

💰 विद्यार्थ्यांचा खात्यात रक्कम जमा होणार : दुष्काळी भागातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा माफ करताना यापूर्वी न होणाऱ्या प्रात्यक्षिक, गुणपत्रिका, प्रमाणपत्र अशा सर्व शुल्कांसह संपूर्ण फी आता माफ होणार असून प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

💫 विशेष : महसूल विभागांनी दुष्काळी गावांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यापूर्वी जी गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील, अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरते वेळी कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची दक्षता राज्य मंडळाने घ्यावी.

📍 यांना फायदा मिळणार : महाराष्ट्र शासनाच्या या फी माफीचा फायदा शासकीय, अनुदानित माध्यम शाळा, कनिष्ठ महाविद्यालय (ज्युनियर कॉलेज) च्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup