LetsUpp Marathi
5.27K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🎾 नो बॉलसाठी आता आधुनिक नो बॉल तंत्रज्ञान

LetsUp | Sports

🏏 बीसीसीआयने आयसीसीला केलेल्या मागणीमुळे नो बॉल ओळखण्यासाठीचे नवीन तंत्रज्ञान आयसीसीने प्रायोगिक तत्वावर राबवायचे ठरवले आहे.

🤔 काय आहे नो बॉल तंत्रज्ञान: या तंत्रज्ञानामध्ये गोलंदाजाच्या पायावर कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिसरा पंच लक्ष ठेवणार आहे. गोलंदाजाचा पाय जर क्रिसच्या पुढे पडत असेल तर त्याविषयी हा तिसरा पंच ताबडतोब मैदानावरील पंचाला माहिती देईल.

👉🏻 आधीची पद्धत: आत्तापर्यंत गोलंदाज तसेच मैदानातील खेळावरही मैदानावरील पंचाचेच लक्ष असे. यातून बऱ्याच वेळा नो बॉल पडला तरी दरवेळी पंचाच्या ते लक्षात येईलच असे नव्हते. यामुळे पंच आणि खेळाडूंमध्ये वाद उद्भवत असतं. पंचाची मदत फक्त डीआरएसची मागणी झाल्यावरच मिळायची.

👍🏻 नो बॉल तंत्रज्ञानाचा फायदा: सामन्यात मैदानावरील पंचाची नजर चुकवून नो बॉल टाकण्याच्या प्रकाराला या तंत्रज्ञानामुळे आळा बसेल. तसेच सामना पारदर्शक व्हायला या नव्या तंत्रज्ञानामुळे मदत होणार आहे.

📆 अंमलबजावणी कधीपासून:

हे तंत्रज्ञान प्रचंड खर्चिक असून एका सामन्यासाठी हजारो डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो.

आयसीसीने सध्या प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा वापर करायचे ठरवले आहे.

भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये लवकरच हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👨‍👩‍👧‍👦 पावसाळ्यात मुलांची अशी घ्या काळजी

LetsUp I Parenting

🌧 पावसाळा हा सर्वांनाच आवडणारा आणि आल्हाददायक ऋतू आहे. लहान मुलांसाठी हा ऋतू आनंददायी असला तरी पावसाळ्यात पालक म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया काही खास टिप्स.

💁‍♂ या गोष्टी करा

पावसापासून संरक्षण करण्यासाठी मुलांना रेनकोट, छत्री, पावसाळी बूट इत्यादी साहित्य उपलब्ध करून द्या.

पावसाळ्यात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा हे मुलांना शिकवा.

पाऊस पडत असताना मुलं घराबाहेर असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी थांबायला सांगा.

पावसाळी वातावरणात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याने पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

मुलांना पिण्यासाठी उकळून थंड केलेले पाणी द्यावे.

वातावरणाचा अंदाज घेऊन शक्य असल्यास मुलांसाठी छोटीशी पावसाळी सहल आयोजित करा.

🚫 या गोष्टी टाळा

पाऊस चालू असताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करणे टाळा.

जास्त पाऊस होत असल्यास मुलांना घेऊन बाहेर पडणे टाळा किंवा त्यांना एकटे बाहेर जाऊ देऊ नका.

पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याने बाहेरचे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यापासून मुलांना प्रतिबंध करा.

पावसाळ्यात मुले उपद्रवी कीटक किंवा प्राण्यांच्या संपर्कात येतील अश्या गोष्टी टाळा.

पाऊस चालू असताना झाडाखाली किंवा धातूच्या खांबाखाली उभा राहणे टाळण्याविषयी मुलांना सूचना द्याव्यात.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 खुशखबर! नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

LetsUp | Update

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गिफ्ट

👀 जाणून घ्या निर्णय : महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

📆 मंगळवारी (23 जुलै) मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

💰 पगारात होणार वाढ : येत्या 2 सप्टेंबरपासून या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

💁‍♂ 7 लाख कर्मचाऱ्यांना लाभ : 1 जानेवारी 2019 पासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीची रक्कम मिळेल. सुमारे 7 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

📍अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होती.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● कर्नाटक पेच सुटला! मुख्यमंत्री कुमारस्वामींचे सरकार कोसळले, भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा

● इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत वाढली, 31 जुलै ऐवजी आता 31 ऑगस्ट असणार अंतिम तारीख

● भारताचा आर्थिक विकासदराचा 2019 व 2020 या वर्षांतील अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 0.3 टक्क्य़ांनी केला कमी

● देशभरातील एकूण 23 विद्यापीठांची नावे बोगस विद्यापीठांच्या यादीमध्ये, महाराष्ट्रातील एकाचा समावेश

● लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार, ते थेरेसा मे यांची जागा घेतील

● माहिती अधिकार कायद्यात केंद्र सरकार करू इच्छित असलेला बदल म्हणजे जनतेला दिलेला धोका : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

● रेल्वे पोलिसांना अखेर दिलासा, येत्या 1 ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांना आठ तास ड्युटी लागू होणार

● TVS Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी पहिली बाइक ठरली

● आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी, फलंदाजीत विराट नंबर वन तर अष्टपैलूंच्या यादीत जडेजा तिसऱ्या स्थानी

● कबीर सिंगच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचा भाव वधारला, पुढच्या सिनेमासाठी 40 कोटींची मागणी

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ अखेर दिलासा! इन्कम टॅक्स रीटर्नसाठी मुदत वाढवली

LetsUp | Update

📍 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ने आयकर विवरणपत्र (ITR) फाईल करण्यासाठी मुदत वाढवली

👉 अगोदर निर्धारित केलेली 31 जुलै ही तारीख वाढवून आता 31 ऑगस्ट करण्यात आली आहे

🗣 इन्कम टॅक्स विभागाने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती दिली आहे

💫 31 ऑगस्टनंतर आयकर परतावा भरल्यास कलम 139(1) मधल्या तरतुदी नुसार 10 हजार रूपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 क्रीडा घडामोडींवर एक नजर

LetsUp | Sports

🔝 कसोटी क्रमवारी : टीम इंडिया-विराट अव्वल

आयसीसीने जाहीर केली ताजी कसोटी क्रमवारी

👉 संघ मानांकन : 1) भारत 2) न्यूझीलंड 3) दक्षिण आफ्रिका 4) इंग्लंड 5) ऑस्ट्रेलिया
👉 कसोटी फलंदाज : 1) विराट कोहली 2) केन विलियम्सन 3) चेतेश्वर पुजारा 4) स्टिव्ह स्मिथ 5) मॅट हेन्री
👉 कसोटी गोलंदाज : 1) पॅट कमिन्स 2) जेम्स अँडरसन 3) कागिसो रबाडा 6) रविचंद्रन अश्विन 10) रवींद्र जडेजा
👉 अष्टपैलू खेळाडू : 1) जेसन होल्डर 2) शकिब अल हसन 3) रवींद्र जडेजा

🏏 विंडीजचा संघ जाहीर

📍 भारताविरूद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचा 14 खेळाडूंचा संघ जाहीर

🧐 अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन व कायरन पोलार्ड यांचे पुनरागमन तर सलामीवीर जॉन कॅम्पबेल व फिरकी गोलंदाज खॅरी पिअरी या युवा खेळाडूंना संधी

🧢 संघ : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सुनील नरेन, किमो पॉल, खॅरी पिअरी, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, आंद्रे रसेल, ओशानी थॉमस, अँन्थोनी ब्रॅम्बेल (यष्टीरक्षक), जॉन कॅम्पबेल, शेल्डॉन कॉट्रेल, शिमरोन हेटमेयर, एविन लुईस

👀 'अ‍ॅशेस' पासून नवा नियम

🤨 आगामी अ‍ॅशेस मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार

👍 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होणार आहे की, खेळाडू नावे आणि क्रमांक पाठीवर असणारी जर्सी घालणार

प्रो कबड्डी : आजचे सामने

यु पी योद्धा वि. बंगाल वॉरियर्स I रात्री : 7.30 वाजता
तेलुगु टायटन्स वि. दबंग दिल्ली I रात्री : 8.30 वाजता

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 जिओ गिगा फायबर 12 ऑगस्टपासून!

LetsUp | Tech

📍 रिलायन्स जिओची बहुप्रतीक्षित गिगा फायबर व्यावसायिक सेवा 12 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता

💁‍♂ गिगा फायबरची सेवा देशभरातील 1,100 शहरांमध्ये सुरू होणार, यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक

👍 एकाच प्लॅनमध्ये ब्रॉडबॅण्ड, लँडलाइन व्हॉइस कॉल, आयपीटीव्ही आदी अनेक सुविधा उपलब्ध असणार

🇮🇳 IAF लाँच करणार मोबाईल गेम

🕹 लवकरच भारतीय वायुसेना (IAF) एक ऑनलाईन मोबाईल गेम लाँच करण्याच्या तयारीत

📍 भारतीय वायुसेनाने आपल्या अधिकृत ट्विटर पेज वर या गेमचा टीजर केला लाँच

👉 हा एक सिंगल प्लेअर मोबाईल व्हिडिओ गेम आहे, जो अँड्रॉईड आणि ios या दोन्ही व्हर्जनसाठी तयार आहे

📅 हा मोबाईल गेम येत्या 31 जुलैला प्रदर्शित केला जाईल. टिझर पहा : https://bit.ly/2SySP2G

📱 ओप्पो के-3 स्मार्टफोन लाँच

भारतीय ग्राहकांसाठी ओप्पो के 3 हा स्मार्टफोन सादर, यात पॉप-अप सेल्फी कॅमेर्‍यासह अनेक सरस फिचर्स

👉 यात 16 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असून हा पॉप-अप या प्रकारात वर येऊन सेल्फी व व्हिडीओ कॉलींगसाठी वापरता येणार

📸 याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यामध्ये 16 आणि 2 मेगापिक्सल्सच्या कॅमेऱ्याचा समावेश

💸 स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोअरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे 16,990 आणि 19,900 रूपये मूल्यात सादर

🌐 हे दोन्ही व्हेरियंट नेब्युला पर्पल, मॉर्नींग व्हाईट व सेक्रेट ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवर उपलब्ध

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🚆 रेल्वेत येणार बायोमॅट्रिक तंत्रज्ञान

LetsUp l Update

बायोमॅट्रीक तंत्रज्ञानामुळे रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास होणार मदत

💁‍♂ कशी असेल प्रक्रिया? : रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना बायोमॅट्रिक मशिनमधून जावे लागणार आहे. या मशिनवर आपल्या बोटाचे ठसे दिल्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जातो. त्यामुळे गाडी प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर सीट बूक होणार आहे.

👀 कशासाठी: विनाआरक्षित डब्यामधून प्रवास करण्यासाठी बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

🧐 कुठे झाला प्रयोग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्‍सप्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

📍 मुंबईतील चार रेल्वे स्थानकावर बायोमॅट्रीक मशीन लावण्यात आली आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ टोमॅटोचा ज्यूस वापरा आणि केसातील कोंड्याची समस्या दूर करा

LetsUp । Tips & Tricks

👍 टोमॅटोचा वापर भाजींमध्ये करण्यासोबत अनेकजण सलाद म्हणूनही केला जातो. सौंदर्य वाढविण्यासाठीही टोमॅटो फायेदशीर ठरतं. तुम्ही केसांच्या समस्या दूर करण्यासाठी टोमॅटोचा वापर करू शकता.

🍅 टोमॅटो ज्यूसचा केसांवर होणार फायदा :

टोमॅटोचा ज्यूस केसांवर लावल्याने केसांचं टेक्चर स्मूद होतं आणि केस चमकदार होतात.
टोमॅटो ज्यूस केसांमध्ये लावल्याने पीएच लेव्हल बॅलेंस होते. ज्यामुळे केसांचा रूक्षपणा दूर होतो.
टोमॅटोचा ज्यूसच्या वापराने कोरड्या आणि निस्तेज केसांचा वॉल्युम वाढवण्यासाठी मदत होते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे हा ज्यूस केसांना लावल्याने केसांच्या स्काल्पला मजबुती मिळते.
टोमॅटोचा ज्यूस लावल्याने केस मजबुत होतातच आणि केस दुभंगण्याची समस्या दूर होते. त्याचबरोबर केसांची ग्रोथ वाढते.

📍 टोमॅटोचा कम्प्लिट पॅक : टोमॅटोच्या ज्यूसमध्ये मध एकत्र करून हेयर मास्क तयार करा. अर्ध्या तासासाठी हा मास्क केसांना लावून ठेवा. त्यानंतर माइल्ड शॅम्पून धुवून टाका. यामुळे केसांतील कोंड्याच्या समस्या पासून सुटका होण्यास मदत होईल.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

पॉपस्टार शर्ली सेतिया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण :
यु ट्यूब सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी शर्ली सेतिया आता निकम्मा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शर्लीसोबत या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासनीदेखील असणार आहे. शब्बीर खान दिग्दर्शित हा मसाला चित्रपट असेल. त्यामध्ये ऍक्शन, रोमान्स, इमोशन, मनोरंजन इत्यादी भरपूर गोष्टी असणार आहेत.

शर्ली हि न्यूझीलंडमधील पॉपस्टार गायक आहे. ती युट्युबवर लोकप्रिय असून तिच्या युट्युब चैनलला 3 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. शर्लीला पायजमा पॉपस्टार म्हणूनही ओळखले जाते.

स्ट्रीट डान्सर 3 चित्रपटाच्या सेटवर श्रद्धा कपूर जखमी :
'स्ट्रीट डान्सर 3' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर जखमी झाली. डान्स करत असताना पाय मुरगळल्याने तिला दुखापत झाली. याविषयी श्रद्धाने इंस्टाग्रामवर फोटो टाकून माहिती दिली आहे. या आधीसुद्धा डान्सचा सराव करताना श्रद्धाच्या मानेला आणि खांद्याला दुखापत झाली होती.

रेमो डिसूजाचा 'स्ट्रीट डान्सर 3' हा चित्रपट 'एबीसीडी' आणि 'एबीसीडी 2' या चित्रपटांचा सिक्वेल आहे. श्रद्धा कपूर आणि वरून धवन सोबतच या चित्रपटात प्रभू देवा आणि नोरा फतेही हे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन शिवानी सुर्वे :
बिग बॉसच्या घरात एक आठवड्यापूर्वीच परतलेल्या शिवानी सुर्वेला बिग बॉसने पाहुनी म्हणून घरात ठेवले होते. परंतु तिची उत्तम कामगिरी बघून तिला बिग बॉसच्या घराचे सदस्यत्व बहाल केले. याच संधीचे सोनं करत सकारात्मक वावर, उत्साहपूर्ण सहभाग आणि कार्यातील कामगिरी यांच्या जोरावर तिने कॅप्टनपद पटकावले.

अभिजित केळकर आणि शिवानी सुर्वे यांच्यात कॅप्टन्सी कार्य रंगले असतानाच अभिजीतच्या सर्व प्रतिमा शिवानीच्या टीमने नष्ट केल्या. तब्येतीच्या कारणास्तव 21 दिवसांमध्येच तिला घरातून बाहेर पडावे लागले होते.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 पीक विमा अर्ज भरण्यास सरकारकडून मुदतवाढ

LetsUp । Update

शेतकऱ्यांच्या मागणीची राज्य सरकारकडून घेण्यात आली दखल

🧐 जाणून घ्या मुदतवाढीची कारणे? : केंद्र सरकारच्या सूचनांनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

📆 5 दिवसांची मुदतवाढ : या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 24 जुलैपर्यंत देण्यात आली होती. आता राज्य सरकारने 25 जुलै ते 29 जुलै अशी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

💁‍♂ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : शेतकऱ्यांनी आपला पीक विमा अर्ज दाखल करुन केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीकविमा खरीप हंगाम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सरकारतर्फे करण्यात आले आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● चांद्रयान-2 ने पृथ्वीच्या कक्षेभोवती पहिली परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली : इस्रो

● 'आधार' आणि सरकारी योजनांसाठी 'आधार'च्या वापराबाबतच्या अन्य संबंधित कायद्यांमधील दुरुस्ती विधेयकाला केंद्राची मंजूरी

● परदेशात फरार होणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक बॅंकांची कर्जे थकवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने दिले कठोर निर्देश

● संघटनांसह व्यक्तीही दहशतवादी ठरवण्याचा सरकारला अधिकार, दहशतवादविरोधी कायदा दुरुस्ती लोकसभेत मंजूर

● ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांनी बकिंगहम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्याकडे राजीनामा केला सुपूर्द

● अवैध वाळू उपसा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सीबीआय व महाराष्ट्रासह पाच राज्यांना बजावली नोटीस

● संपूर्ण देशातील आकडेवारी पाहता महाराष्ट्रामध्ये एचआयव्हीसह आयुष्य व्यतीत करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक

● प्रो-कबड्डी : बंगाल वॉरियर्सचा यूपी योद्धावर दणदणीत विजय तर दबंग दिल्लीची तेलगू टायटन्सवर मात

● एकमेव कसोटीत आयर्लंडने इंग्लंडला पहिल्या डावात अवघ्या 85 धावांत गुंडाळले, टीम मुर्ताघचे 5 बळी

● ‘अर्जुन रेड्डी’नंतर विजय देवरकोंडाच्या ‘डिअर कॉम्रेड’चाही येणार हिंदी रिमेक, करण जोहरने विकत घेतले हक्क

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करण्याची कायदादुरुस्ती मंजूर

LetsUp | Update

📝 केवळ संघटनाच नव्हे तर व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणारे अवैध कृत्य प्रतिबंधक कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत

🗣 केंद्रीय गृहमंत्री शाह काय म्हणाले? :

1) हातात बंदूक आहे म्हणून कोणी दहशतवादी होत नाही, तर दहशतवादी मानसिकता आहे म्हणून दहशतवादी होत असतो. त्यामुळे अशा मानसिकतेविरोधातही कठोर कारवाईची गरज आहे.

2) नक्षलवाद्यांची शहरात बसून पाठराखण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा लोकांबद्दल सरकारची कोणतीही सहानुभूती नाही.

3) एनआयएने यासीन भटकळची दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनला तर दहशतवादी संघटना घोषित केले, पण त्यांना यासीनला दहशतवादी घोषित करता आले नाही. आता कायद्यातील हि विसंगती आम्ही दूर केली.

4) आज कायद्यातील दुरुस्तीला काँग्रेस पक्ष विरोध करत आहे, पण 1967 मध्ये इंदिरा गांधी यांचे सरकार असतांना त्यांनी असाच कायदा आणला होता.

5) या कायद्यात पहिली दुरुस्ती 2004 च्या शेवटी करण्यात आली. दुसरी दुरुस्ती 2008 मध्ये, तर तिसरी दुरुस्ती 2013 मध्ये करण्यात आली, या तिन्ही दुरुस्त्यांच्या वेळी केंद्रात संपुआचेच शासन होते.

6) कठोर कारवाई न करता संबंधितांशी चर्चा करून दहशतवाद आटोक्यात आणला जाऊ शकतो, या सिद्धांंतावर कुणाचा विश्‍वास राहू शकतो, पण माझा नाही.

📍 महत्त्वाच्या दुरुस्त्या काय? :

दहशतवाद संबंधित प्रकरणाचा 'एनआयए'ला कुठेही राज्याच्या संमतीविनाही तपास करता येईल.
व्यक्तीलाही दहशतवादी मानून तिच्या मुसक्या आवळता येतील.
'एनआयए'च्या आदेशानेही संशयितांच्या मालमत्ता जप्त करता येतील.
प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहणे अधीक्षकांना शक्य नसल्याने अधिकार निरीक्षक अधिकाऱ्यास मिळतील.

💫 नव्या तरतुदींच्या समावेशाला तीव्र विरोध दर्शवून हे वादग्रस्त विधेयक स्थायी समितीकडे पाठविण्याची मागणी करीत विरोधी पक्षांकडून सभात्याग

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 भारतीय वंशाच्या प्रीती पटेल ब्रिटनच्या गृहमंत्री

LetsUp | International

ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय वंशाच्या महिला खासदार प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी नियुक्ती.

📍 गृहमंत्री पदी विराजमान होणाऱ्या पटेल या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या.

🧐 47 वर्षांच्या प्रीती पटेल यांचा जन्म लंडनमध्येच झाला असून त्यांचे आई-वडील मूळचे गुजरातचे आहेत. मात्र, त्यानंतर ते युगांडाला गेले. 1960च्या दशकात ते लंडनमध्ये स्थायिक झाले.

💁‍♂ मंत्रिमंडळात 'या' भारतीय वंशाच्या खासदार समावेश :

1) आलोक शर्मा : शर्मा (51 वर्ष) यांचा जन्म भारतातल्या आग्र्यामधला. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून 2010 सालापासून रीडिंग वेस्टचे खासदार आहेत. त्यांच्याकडे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

2) ऋषी सुनक : ऋषी यांनी ऑक्सफोर्डमधून शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई मेडिकल स्टोअर चालवायच्या. ऋषी सुनक रिचमंडमधून खासदार आहेत. त्यांच्याकडे चिफ सेक्रेटरी टू द ट्रेझरी हे पद सोपविण्यात आले आहे.

🚨 हाफिज सईदच्या कोठडीला मुदतवाढ

🧐 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड व जमात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईद याच्या न्यायालयीन कोठडीत 7 ऑगस्टपर्यंत वाढ

आता 7 ऑगस्ट रोजी सईद विरोधातील पूर्ण आरोपत्र सादर करण्यात यावे, अशी पंजाब प्रांतातील दहशतवाद विरोधी विभागाला न्यायालयाने केली सूचना

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
करिअर : फॉरेन लँग्वेज

LetsUp | Career

विदेशात नोकरीसाठी डिग्रीसोबतच विदेशी भाषेच्या ज्ञानाचे महत्त्व लोकांना पटू लागले आहे. यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी आणि सोबत चांंगले वेतनही मिळते. मात्र ही भाषा नेमकी कुठे शिकवली जाते? करिअरसाठी स्कोप काय? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...

🧐 आवश्यक कौशल्ये :

● सामाजिक अनुकूलता, रचनात्मकता, उच्च बौद्धिक क्षमता यासोबत मेहनत करण्याची तयारी असावी लागते.
● बोलण्यात नम्रतेची आणि आपुलकीची भावना. यासोबतच दूरचा प्रवास करण्याची क्षमता असावी.
● फॉरेन लँग्वेजमध्ये A-1, A-2 आणि B-1, B-2 कोर्स केलेल्या उमेदवारांना जास्त मागणी असते.
● A-2 लेव्हलचा कोर्स केला तरी जॉब सहजपणे मिळू शकतो. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीच्या सामाजिक संस्थांसोबतही काम करण्याची संधी मिळते.

🤔 अभ्यासक्रम कालावधी :

● सर्टिफिकेट कोर्सचा कालावधी 6 महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत असतो.
● डिप्लोमासाठी 1-2 वर्षे तर ग्रॅज्युएशनसाठी 3 वर्षे इतका कालावधी असतो.
● तुम्ही विदेशी भाषेत 2 वर्षांची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसुद्धा करू शकता.

💸 वेतन किती? :

● ट्रान्सलेटरला 150 ते 300 रुपये पेजप्रमाणे पैसे दिले जाते.
● जर्मन आणि फ्रेंचसाठी 300 ते 500 रुपये तर अरबी आणि जापानी भाषेसाठी 750 रुपये प्रति पेज पैसे मिळतात.
● टीचिंग क्षेत्राचा विचार केला तर 20 ते 60 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाते.
● उच्च गुणवत्ताधारक इंटरप्रेटर 8000 रुपये प्रति तासाप्रमाणे काम करू शकतो.

👨‍💼 नोकरीच्या संधी

1) टीचर : यासाठी पी.जी.सह नेट परीक्षा उत्तीर्ण असावी लागते. फॉरेन लँग्वेजचा कोर्स शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये लँग्वेज टीचर्सची आवश्यकता असतेच. तुम्ही टीचिंगला पार्टटाइम प्रोफेशन म्हणूनही स्वीकारू शकता.
2) इंटरप्रेटर : टेलिकॉन्फरसिंग आणि व्हिडिओ कॉन्फरसिंगसारख्या टेक्नॉलॉजी आल्याने जगात कुठेही असलेल्या व्यक्तीसोबत मीटिंग अथवा चर्चा करता येते. यासाठी फॉरेन लँग्वेज एक्सपर्टची मदत घेतली जाते.
3) ट्रान्सलेटर : तुम्हाला विदेशी भाषा चांगल्या प्रकारे अवगत असेल तर तुम्ही पूर्णवेळ अथवा अर्धवेळ ट्रान्सलेटरची नोकरी करू शकता. पुस्तके, लेख आणि फिल्म स्क्रिप्ट आदींचे भाषांतर करू शकता.
4) बीपीओ : फॉरेन लँग्वेजमध्ये स्किल्ड प्रोफेशनल असल्यास तुम्हाला भारताच्या बीपीओ इंडस्ट्रीत उच्च वेतनाची नोकरी मिळू शकते. डेटा प्रोसेसिंगशी संबंधित जॉब करू शकता.
5) फॉरेन सर्व्हीसेज : फ्रेंच, जर्मन अथवा रशियन भाषेचे तज्ज्ञ असाल तर तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आयएएस अथवा आयएफएस सेवेत जाऊ शकता.

👍 इतर संधी :

● जागतिक व्यापार संघटना, संयुक्त राष्ट्र संघटना, जागतिक बँक, युनिसेफ यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. याशिवाय एअरलाइन्स इंडस्ट्रीतही नोकरी करू शकता.
● पर्यटन, हॉटेल, इंटरनॅशनल मीडिया हाउसमध्ये (प्रिंट, रेडियो, टी.व्ही.) न्यूज ट्रान्सलेटर आणि रिपोर्टर पदासाठी विदेशी भाषेच्या जाणकारांना प्राधान्य दिले जाते.
● देशातील मोठ्या कंपन्या उदाहरणार्थ : एचपी, ओरॅकल, सॅमसंग, ह्युंंदाई, एलजी, थॉमसन आदींमध्ये विदेशी भाषेचे तज्ज्ञ नियुक्त केले जातात.

फॉरेन लँग्वेजमध्ये तुम्ही डिग्री, सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा करू शकता. यासाठी पात्रता इंटरमिडिएट किंवा त्याच्या समकक्ष असते.

💁‍♂ खालील संस्थांमध्ये विदेशी भाषांचे कोर्स उपलब्ध आहेत: :

1) लखनौ विद्यापीठ, लखनौ. I कोर्स : सर्टिफिकेट व डिप्लोमा प्रोग्राम
2) द इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी, लखनौ. I कोर्स : ग्रॅज्युएशन, पीजी, डिप्लोमा
3) अलीगड विद्यापीठ, अलीगड.
4) एलियान्स फ्रेंचाइज, नवी दिल्ली

📍 डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्रोग्रामकरिता :

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
2) पंजाब विद्यापीठ, पटियाळा.
3) उत्कल विद्यापीठ, भुवनेश्वर.
4) जापनीज कल्चर अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सेंटर, असेम्बी ऑफ जापान - नवी दिल्ली.
5) दिल्ली विद्यापीठ, दिल्ली.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● सर्वोच्च न्यायालयाचा मोठा फैसला, 60 दिवसांच्या आत 'त्या' प्रत्येक जिल्ह्यात "पोक्‍सो' न्यायालय स्थापन करण्याची केली सूचना

● पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत 22 ऑगस्टपर्यंत वाढ

● रशियाच्या नेव्ही डे परेडमध्ये सहभागी होण्यासाठी भारताची 'आयएनएस तरकश' सेंट पीटर्सबर्गला पोहोचली

● गेल्या सात वर्षात राज्यातून एकूण 1 अब्ज 85 कोटी 89 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला

● राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारणेसाठी समिती गठित होणार : आशिष शेलार

● डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जांवर आता व्हिडीओ रेकॉर्डिंगसह होणार सुनावणी

● वर्ष अखेरीस WhatsApp Payment सुरु करण्यात येईल : विल कॅथकार्ट, व्हॉट्सअ‍ॅप ग्लोबल हेड

● प्रो कबड्डी : दबंग दिल्लीने तामिळ थलाइवासचा अवघ्या एका गुणाने 30-29 असा थरारक पराभव केला

● जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधू आणि बी साई प्रणित यांनी केला प्रवेश

● लेखक, अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाची केली घोषणा

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ पहिली प्रवेश; आता वयोमर्यादेत मिळणार शिथिलता

LetsUp | Update

📍 पहिलीच्या प्रवेशासाठी कागदोपत्री 6 वर्षे वयाची अट असली तरी आता प्रत्यक्षात साडेपाच वर्षांच्या मुलांनाही पहिलीत प्रवेश मिळणार

📝 प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतचे वय ग्राह्य धरले जाणार असल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने केला प्रसिद्ध

👍 याआधी पहिलीच्या प्रवेशासाठी 6 वर्षांची अट निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी सुरुवातीला 31 जुलैपर्यंतचे वय गृहीत धरण्याचे निश्चित करण्यात आले

🧐 31 जुलैनंतर जन्माला येणाऱ्या मुलांचे एका वर्षांचे नुकसान होत असल्याचा आक्षेप पालकांनी घेतला होता. त्यामुळे 2017 मध्ये 6 वर्षं वय ग्राह्य धरण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती

💫 2010 पासून टप्प्याटप्प्याने दरवर्षी वयाचा निकष बदलण्यात आलेला आहे. त्यानुसार यंदापासून 15 ऑक्टोबरला 6 वर्षं पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांलाही पहिलीला प्रवेश देता येणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 विविध गोष्टी; भारतातील पहिली सुरुवात

LetsUp | Education

1) पहिले वर्तमान पत्र : द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

2) पहिली टपाल कचेरी : कोलकाता (1727)

3) पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन : मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)

4) पहिले संग्रहालय : इंडियन म्युझियम, कोलकाता (फेब्रु.1814)

5) पहिले क्षेपणास्त्र : पृथ्वी (1988)

6) पहिले राष्ट्रीय उद्यान : जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

7) पहिले रेल्वेस्थानक : बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

8) पहिली भुयारी रेल्वे : मेट्रो रेल्वे दिल्ली

9) पहिले व्यापारी विमानोड्डापण : कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

10) पहिली दुमजली रेल्वेगाडी : सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🇮🇳 कारगिल विजय दिवस @ 20 वर्षे

LetsUp | Special

देशभरात आज 26 जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा केला जातो आहे.

काश्‍मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला आज खऱ्या अर्थाने 20 वर्षे पूर्ण झालीत. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

भारतीय सैनिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून पाकिस्तानला धुळ चारत आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हाच दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

💁‍♂ कारगिल युद्धातील काही खास बाबी :

1998-99 च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात LOC पलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला 'ऑपरेशन बद्र' असे नाव देण्यात आले होते.

मे महिन्यात दुसऱ्या आठवड्याच्या सुमारास स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवून हल्ला केला.

पाकिस्तानकडून कारगिलवर विजय मिळवण्यासाठी सुमारे 5000 सैनिकांची तुकडी पाठवण्यात आली होती. मात्र भारतीय सैनिकांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले.

कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सुमारे 3 हजार सैनिकांना ठार मारले. हे युद्ध 18 हजार फीट उंचीवर लढले गेले.

8 मे दिवशी कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर 11 मे दिवशी भारतीय वायुसेनेने मदतीसाठी हात पुढे केला. यामध्ये वायुसेनेच्या सुमारे 300 विमानांचा वापर करण्यात आला.

कारगिल युद्धामध्ये भारतीय वायुसेने पाकिस्तानच्या विरोधात मिग 27, मिग 29 चा देखील वापर केला होता. पाकिस्तानने ज्या भागावर कब्जा मिळवला होता तेथे बॉम्बहल्ले केले. पाकिस्तानच्या अनेक ठिकाणी आर-77 मिसाईलद्वारा हल्ला करण्यात आला होता.

कारगिलच्या युद्धामध्ये बोफोर्स तोफांचा वापर करण्यात आला होता. युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले तर 1363 जवान जखमी झाले आहेत.

भारताला कारगिल युद्धा दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला, त्यामुळे पाकिस्तानवर अमेरिसह जगातील अनेक देशांनी सैन्य मागे घ्यावे यासाठी दबाव टाकला होता.

🙏 अनेक भारतमातेच्या पुत्रांनी देशासाठी बलिदान देत आपल्या शौर्यातून लढवय्यी प्रेरणा देशाला दिली. या वीर जवानांच्या शौर्याची, त्याग आणि बलिदानाची आठवण करुन देणारा आजचा दिवस आहे हे लक्षात ठेवुयात.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup