LetsUpp Marathi
5.27K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💪 भारताचा मोठा विजय; कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

LetsUp | International

👍 पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला मोठा दिलासा

हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले

👉 हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली, भारताच्या बाजूने 15 विरुद्ध 1 अशा मतांनी हा निकाल देण्यात आला

📍 मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ निकाल यांनी केले वाचन, कुलभूषण प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे कोर्टाने केले स्पष्ट

💫 कुलभूषण यांचे प्राण वाचले असले तरी त्यांच्या सुटकेसाठी मोठा कायदेशीर, राजकीय आणि कूटनितीने संघर्ष करावा लागणार

🤔 कुलभूषण जाधव कोण? :

जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत
कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 फेसअ‍ॅपची क्रेझ; ‘ओल्ड एज फिल्टर’ झाले व्हायरल!

LetsUp | Trending

🧐 सध्या सोशल मीडियावर सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे "आपण म्हातारपणी कसे दिसू?" यासंदर्भातील फोटोंचा ट्रेंड

👉 मुळात हा ट्रेंड अचानक व्हायरल होण्यामागील कारण आहे फेस अ‍ॅप (Face App).

💁‍♂ फेस अ‍ॅप वापरुन सध्या सेलिब्रिटीजपासून सामान्यांपर्यंत अनेकजण भविष्यात आपण काही वर्षांनी कसे दिसू? हे तपासून पाहत असून ते फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत आहेत

🤔 फेस अ‍ॅप काय आहे? :

फेस अ‍ॅप हे प्रथम 2017 साली लॉन्च करण्यात आले होते.
मात्र अचानक हे अ‍ॅप वापरणाऱ्यांचे आणि त्यावरील फोटो व्हायरल होण्याचे नक्की कारण काय आहे हे समोर आलेले नाही.
खरं तर या अ‍ॅपमध्ये अनेक फिल्टर्स आहेत मात्र त्यातील ओल्ड फेस फिल्टर खूपच लोकप्रिय झाले आहे. या फिल्टरचा वापर करुनच अनेकजण भविष्यातील स्वत:कडे पाहत आहेत.
हे फिल्टर मोफत असल्याने अनेकजण ते ‘ट्राय करुन तर बघू’ म्हणत वापरुन पाहताना दिसत आहेत.
या अ‍ॅपपमध्ये तरुण रुप पाहण्यासाठीचे फिल्टर, केसांचा रंग बदलण्याचे, चेहऱ्यावर मेकअप करण्याचे तसेच क्रूर हास्य चेहऱ्यावर आणण्याचेही फिल्टर या अ‍ॅपमध्ये आहे.

📍 फेस अ‍ॅप कसं काम करतं? :

आर्टिफिशियल (AI) इंटेलिजन्स अल्गोरिदमवर हे अ‍ॅप काम करते.
AI च्या मदतीने युझर्सचा चेहरा काही वर्षांनी कसा दिसेल याचा अंदाज अ‍ॅप लावते.
त्यानुसार युझरच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, सुकलेले डोळे, चेहऱ्यावरील केस, काही ठिकाणी डाग आणि चेहऱ्यावरील इतर बारीक-सारीक बदल केले जातात.
त्यांनतर काही वर्षांनंतरचा युझरचा ‘ओल्ड’ व्हर्जनमधील फोटो तयार होतो.
AI चा वापर करुन हे अ‍ॅप काम करत असल्याने तयार होणारा फोटो हा कार्टून किंवा चित्र न वाटता युझर्सचाच काही वर्षानंतर काढलेला फोटो वाटतो.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🙏 आज अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

LetsUp | Special

शाहीर तसेच दीन-दुबळ्यांचे, उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारे साहित्यिक, लेखक अण्णाभाऊ साठे यांचा आज 50 वा स्मृतिदिन.

सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात 1 ऑगस्ट इ.स. 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीच शाळेत गेले नाहीत.

परंतु तरीही आपल्या लेखणीच्या जोरावर समाजमन ढवळून काढण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी गायलेले पोवाडे, लेखण, रचना, समाजकार्य आणि राजकारण आजही लोकांच्या हृदयात आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे काही प्रेरणादायी विचार पाहुयात...

1) हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
2) जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव.
3) नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते. धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
4) जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.
5) अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.

📍 विशेष बाबी :

तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
ते दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले.
1 ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹4 टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते.
पुण्यातील लोकशाहीर अण्णाभा साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.
अण्णाभाऊ यांच्या जातीव्यवस्था, दलित सवर्ण संघर्ष, निसर्ग, स्थलांतरण, शहर आणि ग्रामिण जीवन यांतील संघर्ष असे अनेक पैलू पाहायला मिळतात.
महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले गेले आहेत.
पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे.
त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

📝 साहित्य संपदा : लोकनाट्य : 13 I नाटके : 3 I कथासंग्रह : 13 I कादंबर्‍या : 35 I पोवाडे : 15 I प्रवास वर्णन : 1 I चित्रपट कथा : 7

👍 'फकिरा'ला प्रचंड यश : त्यांच्या फकिरा (1959) या कादंबरीला प्रचंड यश मिळाले. या कादंबरीस राज्य सरकारने 1961 सालात उत्कृष्ट कादंबरी पुरुस्कार देऊन गौरविले.

आज लोकशाहीर सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन : https://bit.ly/2NZ1gWh

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🚀 ठरलं! चांद्रयान 22 जुलैला अवकाशात झेपावणार

LetsUp | Science

👍 भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'च्या महत्वकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेच्या प्रक्षेपणाचा नवा मुहूर्त ठरला

💁‍♂ तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण रद्द झाल्यानंतर आता सोमवार दि. 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी या अवकाशयानाचे प्रक्षेपण होणार

🧐 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहचेल, यानंतर हे चांद्रयान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार

📍 विशेष बाबी :

भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार
या मोहिमेसाठी भारताला तब्बल 978 कोटी रुपये खर्च आला आहे
सर्वात महत्वाचे म्हणजे या यानाचे सर्व भाग स्वदेशी आहेत

🔎 अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार :

या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, त्यावर उपलब्ध असलेली खनिजं, रसायनं आणि त्यांचा अभ्यास केला जाणार
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली कोणती खनिजं दडली आहेत? तिथे पाण्याचा अंश आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासणीनंतर मिळणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
अयोध्याप्रकरणी तोडगा की रोज सुनावणी? 2 ऑगस्टला ठरणार

LetsUp | Update

अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

📝 अयोध्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने कोर्टात अहवाल केला सादर

👍 आता या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी कोर्टाने समितीला 31 जुलैपर्यंतची दिली मुदत

📅 त्यानंतर या प्रकरणावर 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता खुल्या कोर्टात सुनावणी होणार

💁‍♂ त्यात मध्यस्थ समितीमार्फत या प्रकरणावर तोडगा काढायचा की? या प्रकरणावर रोज सुनावणी करायची यावर निर्णय घेण्यात येणार : सर्वोच्च न्यायालय

🧐 पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने 2 ऑगस्टची तारीख केली निश्चित

💫 या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. एस. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचा समावेश आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📍 करिअर निवडताना भावनिक होऊ नका!

LetsUp | Career

करिअरची निवड हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे तो निर्णय भावनेच्या बळावर नव्हे तर सर्वांगीण विचार करून घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी आपली आवड लक्षात घ्यावीच आणि क्षमताही तपासून पाहावी.

उत्तम करिअर घडण्यासाठी आधी आपल्या क्षमता ओळखणे आवश्यक असते. आपण कशात प्राविण्य मिळवून काम करू शकतो हे ओळखणे महत्वाचे असते.

----------------------
🤔 खात्रीशीर नोकरी शोधताय? मग तुमचा Resume अपलोड करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, अनुभवी व फ्रेशर्ससाठी लाखो संधी एकाच ठिकाणी 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------

👉 कला शाखेमध्ये पदवी शिक्षण घेताना परदेशी भाषांची आवड असल्यास त्या भाषेचे प्रशिक्षण घेता येते. जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, चायनीज आणि जपानी या परदेशी भाषेच्या अनुवादकांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. कला शाखेत सुद्धा आपण आपले करिअर करू शकतो आणि हे आजच्या काळात वेगळे सांगण्याची गरज नाही.

🎯 पुढे नोकरीच्या संधी आहेत कि नाही याचा विचार करूनच क्षेत्र निवडावे कारण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी नाही मिळाली तर अनेकांना नैराश्य येते. आपली शारीरिक सुधृडता आणि मानसिक तयारी पाहूनच क्षेत्र निवडावे.

मित्र मैत्रीण अमुक एखादे क्षेत्र निवडत आहे म्हणून आपण तेच करावे असा विचार मनात येणे साहजिक आहे मात्र असे ना करता गोंधळलेल्या स्थितीत असाल तर मात्र तज्ज्ञ सल्ला उपयुक्त ठरतो.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 तुम्हाला माहित आहे का?

LetsUp | Know U Know

1) जगातील सगळ्यात जास्त पदवी (Degree) मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकर यांच्या नावावर आहे.

2) सर्वात जास्त म्हणजे 122 वर्ष जगण्याचा रेकॉर्ड Jeanne Calment यांच्या नावावर आहे

3) जगात सगळ्यात जास्त स्त्रिया (Woman) एस्टोनिया (Estonia) नावाच्या देशात आहेत.

4) जगात सर्वात जास्त खून (Murder) व्हेनेजुएला (साऊथ अमेरिका) मध्ये होतात.

5) सर्वसाधारणपणे सर्वात जास्त पाणी गाय पिते. गाय थंडीमध्ये 20 तर उन्हाळ्यामध्ये 75 लिटर पाणी पिते.

6) सर्वात जास्त जाडे होण्याचा रेकॉर्ड पॉल मॅसनचे यांच्या नावावर असून त्यांचे वजन 445 किलोग्राम एवढे आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● लष्कर प्रमुख बिपीन रावत जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर करणार सुरक्षेची पाहणी

● राज्यपाल वजुभाई वाला यांनी आज शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करण्याचे दिले आदेश

● येत्या 25 आणि 26 जुलै रोजी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर सहभागी होणार

● अभिनेता एजाज खान याला अटक; जातीय तेढ निर्माण करणारे व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केल्याप्रकरणी कारवाई

● सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदा बरखास्त

● राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली

● पुढील दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार; शनिवारपासून संपूर्ण राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

● सॅमसंगने रोटेटींग ट्रिपल कॅमेर्‍यांनी युक्त असणारा गॅलेक्सी A80 हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी केला सादर

● इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस सनरायझर्स हैद्राबादच्या संघाला करणार मार्गदर्शन

● बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंड गॅब्रेलियाने एका मुलाला दिला जन्म
💁‍♂ राज्यातील 5 जिल्हा परिषदा बरखास्त

LetsUp | Update

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर राज्यसरकारकडून पाच जिल्हा परिषदा बरखास्त

👉 यामध्ये नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांचा समावेश

🧐 नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2017 मध्ये तर उर्वरीत चार जिल्हा परिषदांचा कार्यकाळ डिसेंबर 2018 मध्ये संपला होता

😇 या ठिकाणच्या आरक्षण प्रक्रियेसंदर्भात उच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया लांबली होती

🗣 काही तांत्रिक गोष्टींमुळे यांचा कार्यकाळ तुम्ही वाढवत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही निवडणुका घ्या किंवा त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करा : सर्वोच्च न्यायायलय

💫 सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर जिल्हा परिषदा बरखास्तीचा निर्णय, आता जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदी मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 क्रिकेटच्या 'या' नियमांमध्ये बदल!

LetsUp | Sports

📍 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCने क्रिकेटमधील नियमात केले काही महत्त्वाचे बदल

👍 लंडनमध्ये झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हे निर्णय घेण्यात आले

1) धीम्यागतीने गोलंदाजी; कर्णधाराला दिलासा :

धीम्यागतीने गोलंदाजी केल्याबद्दल यापुढे कर्णधारावर निलंबनाची कारवाई केली जाणार नाही.
तर संपूर्ण संघाला समान दंड केला जाणार आहे.
या कारणामुळे निलंबनाची कारवाई केली जाणार नाही.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप दरम्यान त्यांचे गुण कट केले जातील.

🧐 अगोदर काय? :

सामन्यात जर एखाद्या संघाने धिम्यागतीने गोलंदाजी केली तर कर्णधाराला मानधनाच्या 50 टक्के दंड केला जात.
तर संघातील अन्य खेळाडूंच्या मानधनातून प्रत्येकी 10 टक्के रक्कम कपात केली जात.
सलग 3 सामन्यात असे झाले तर कर्णधारावर निलंबनाची कारवाई केली जात.

2) मिळणार बदली खेळाडू :

सामन्या दरम्यान चेंडू लागल्यामुळे जर एखादा खेळाडू जखमी झाला असेल तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संघात घेता येऊ शकते.
संबंधित जखमी झालेला खेळाडू संघात ज्या भूमिकेत होता तशाच प्रकारचा दुसरा खेळाडू संघात घेता येईल.
अर्थात असे बदल करताना मॅच रेफरीची गरज लागेल.
येत्या 1 ऑगस्टपासून हा नियम लागू होईल. याची सुरुवात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेपासून होईल.

🔎 घटनांचा अभ्यास करून निर्णय :

गेल्या काही वर्षातील घटनांचा अभ्यास केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.
अनेक वेळा खेळाडूंच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे संघांना कमी खेळाडूंसह सामना खेळावा लागला आहे.
अशा परिस्थितीत संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच यापुढे बदली खेळाडू दिला जाणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
जाणून घ्या भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे

LetsUp | Education

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई)
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (नवी दिल्ली)
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता)
के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद)
गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी)
दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (गोवा)
सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद)
श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ (श्रीनगर)
बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगळूर)
मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मंगळूर)
कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कलिकत)
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची)
त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरूअनंतपुरम)
देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंदौर)
श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर)
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (जयपूर)
वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (पोर्टब्लेअर)
कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोइंबतूर)
तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरूचिरापल्ली)
चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (लखनौ)
लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ (वाराणसी)

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👌 भारतीय क्रिकेटचा आवाज 'हर्षा भोगले'

LetsUp | Special

गुणात्मक हजरजबाबीपणा, नाटयमय वक्तृत्त्व, सशक्त शब्दसौष्ठव, खेळाप्रति निस्सीम प्रेम, बिनधास्त, गमतीशीर स्वभाव आणि अशा अनेक गोष्टींमुळे हर्षा भोगले यांना सर्वोत्कृष्ट समालोचक म्हणून ओळखले जाते. आज त्यांचा 58 वा वाढदिवस.

क्रिकेटमधील विशेष पार्श्वभूमी नसताना अनेक आजी-माजी खेळाडूंसोबत समालोचन करताना क्रिकेटच्या जगतात त्यांनी स्वतःचे एक मोठे स्थान निर्माण केले आहे. काही टेक्निकल बारकाव्यांच्याही पलिकडे जाऊन एक क्रिकेटप्रेमी या नात्याने आपले मत व्यक्त करणारे हर्षा नक्कीच इतरांपेक्षा उजवे ठरतात. म्हणूनच त्यांना भारतीय ‘क्रिकेटचा आवाज’ देखील म्हटले जाते.

अगदी रेडिओच्या काळापासून ते आज क्रिकेट अ‍ॅप्सच्या माध्यमातून तज्ज्ञ म्हणून मते मांडण्यापर्यंत हर्षा यांनी क्रिकेट चाहत्यांना क्रिकेट ऐकवले आहे. एका सामान्य अ‍ॅड एजन्सीपासून ते प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटरपर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात हर्षाला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला आहे. मागील 39 वर्षांपासून समालोचन करणाऱ्या हर्षा यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी क्रिकेट चाहत्यांना ठाऊक नाही. आज त्या जाणून घेऊयात...

1) हर्षा यांचा जन्म 19 जुलै 1961 रोजी हौद्राबादमधील एका मराठी कुटुंबामध्ये झाले. ते उत्तम मराठी बोलतात.

2) आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भोगले हे उस्मानीया विद्यापिठाकडून क्रिकेट खेळले आहेत.

3) हर्षा यांचे शालेय शिक्षण हौद्राबाद पब्लिक स्कुलमध्ये झाले. नंतर त्यांनी उस्मानिया विद्यापिठामधून केमिकल इंजिनियरींगमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

4) पदव्युत्तर अभ्यासनंतर त्यांनी अहमदाबादमधील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी पदवी घेतली.

5) शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एका जाहिरात कंपनीमध्ये दोन वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्यांनी एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीमध्ये दोन वर्ष नोकरी केली.

6) वयाच्या 19 वर्षी हैदराबादमधून त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. सर्वात पहिल्यांदा त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी समालोचन केले.

7) 1991-92 साली ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनने त्यांना समालोचन करण्यासाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टींगने परदेशी समालोचकाला आमंत्रित करण्याची पहिलीच वेळ होती.

8) खेळ विश्वातील आर्थिक बाजू समजावून सांगणारे पुस्तक हर्षा आणि त्यांची पत्नी अनिता भोगले यांनी ‘द विनिंग वे’ नावाने प्रकाशित केले आहे.

📍 विशेष बाबी :

‘जंटलमन मॅगझीन’ने त्यांचा ’50 men you want to know better’ या यादीत समावेश केला होता.
‘आऊटलूक मॅगझीन’ने त्यांचा समावेश ‘एखाद्या प्रोफेशनकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला लावणारी आठ व्यक्तीमत्व’ या यादीत केला होता.
2010 साली पिनस्ट्रोमने तयार केलेल्या खेळांसंदर्भातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये भोगले 35 व्या क्रमांकावर होते.
सोशल मिडियावरुन प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींच्या यादीतही भोगले 35 व्या क्रमांकावर होते.
हर्षा यांच्या नावाने ‘हर्षा की खोज’ हा कार्यक्रमही सुरु करण्यात आला होता.
हर्षा भोगले यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये त्यांच्या स्वत:च्या तसेच अझरुद्दीनच्या आत्मरित्राचाही समावेश आहे. ‘व्हाइस ऑफ क्रिकेट’ असं त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे.

🎙 सर्वोत्तम समालोचक :

2010 साली ‘द हिंदुस्तान टाइम्स’ने भोगलेंना ‘द ग्रेटेस्ट आयकॉन ऑफ क्रिकेट कॉमेंन्ट्री’ म्हणून गौरवले होते. वाचकांच्या जनमत चाचणीमध्ये भोगले ‘सर्वात लोकप्रिय समालोचक’ ठरले होते.
भोगले यांनी टिव्हीवर इएसपीएन आणि स्टार स्पोर्टस या वहिन्यांसाठी हर्षा ऑनलाइन, हर्षा अनप्लग्ड आणि स्कूल क्विझ ऑलंपियाड या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन केले होते.
डिस्कव्हरी आणि टीएलसी या वाहिन्यांवरही हर्षा यांनी ‘ट्रॅव्हल वीथ हर्षा भोगले’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
1992 साली त्यांचा ‘रेडिओवरील सर्वात मादक’ आवाज असणारे व्यक्ती म्हणून सन्मान करण्यात आला होता.
1999 साली एका वेबसाईटने जगभरातील क्रिकेट चाहत्यांची जनमत चाचणी घेतली त्यामध्ये हर्षा हे जगातील पहिल्या क्रमांकाचे समालोचक असल्याचे मत चाहत्यांनी नोंदवले होते.
ऑस्ट्रेलियामध्ये 2003-04 साली झालेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये हर्षा हे ‘रेडिओ तसेच टिव्हीवरील सर्वोत्तम समालोचक’ ठरले.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● कर्नाटक विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत (दि. 22) स्थगित, कुमारस्वामी सरकारवरील संकट तूर्त टळले

● गेल्या 6 दिवसांत आसाममधील पुरात अडकलेल्या 488 जणांची लष्करातील जवानांनी केली सुटका

● पीएमओमध्ये कार्यरत असलेले विवेक कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती

----------------------
🌕 आज संकष्टी चतुर्थी | चंद्रोदय : 9.51 Pm
----------------------

● एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचा पोलीस सेवेचा राजीनामा, लवकरच राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता

● काय रे, अलिबागवरून आलायस का?, या डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

● वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी 30 जुलै रोजी. विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता

● अभिनेता आदित्य पांचोलीला दिलासा, बलात्कार प्रकरणी 3 ऑगस्टपर्यंत अटकेस दिंडोशी सेशन कोर्टाची मनाई

● गुगल मॅपवर पब्लिक टॉयलेटही शोधता येणार, हे फीचर ios आणि अँड्रॉइडवर उपलब्ध असेल

● भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा निवृत्त होण्याचा विचार नाही, धोनीचे मित्र अरुण पांडे यांची माहिती

● अभिनेत्री बिपाशा बासूने बॉलिवूड वापसी ऐवजी बंगाली चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ जगातील टॉप 20 प्रभावशाली पुरूष आणि महिलांची यादी जाहीर

LetsUp | Update

📣 ब्रिटनची इंटरनेट मार्केट रिसर्च आणि डाटा एनालिटिक्स कंपनी 'युगोव्ह'ने या वर्षातील जगातील टॉप 20 प्रभावशाली पुरूष आणि महिलांची यादी केली जाहीर

🔎 41 देशातील 42 हजार पेक्षा अधिक लोकांच्या ऑनलाईन मुलाखतीद्वारे जमा करण्यात आलेल्या डाटाच्या आधारावर ही रँकिंग करण्यात आली

👍 यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रमवारी दोन अंकानी वाढली, मागील वर्षी ते 8व्या स्थानावर होते

👉 अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा यांचा क्रमांक घसरला तर सुष्मिता सेन, शाहरूख आणि सलमान खान यांनी प्रथमच यादीत स्थान मिळवले

📝 प्रभावशाली पुरूष I महिलांची यादी :

1) बिल गेट्स (9.6) I मिशेल ओबामा (8.8)

2) बराक ओबामा (9.2) I ओपेरा विनफ्रे (6.9)

3) जॅकी चॅन (5.7) I अँजोलिना जोली (6.8)

4) शी जिनपिंग (5.1) I क्विन एलिजाबेथ (5.9)

5) जॅक मा (4.9) I एम्मा वॉटसन (4.0)

6) नरेंद्र मोदी (4.8) I मलाला यूसफजई (3.9)

7) क्रिस्टिआनो रिनाल्डो (4.3) I पेंग लियुआन (3.9)

8) दलाई लामा (4.2) I हिलेरी क्लिंटन (3.6)

9) लियोनेल मेसी (3.8) I तू यूयू (3.5)

10) ब्लादिमीर पुतिन (3.7) I टेलर स्विफ्ट (3.3)

11) वॉरेन बफे (3.3) I मॅडोना (3)

11) अमिताभ बच्चन (2.9) I एंजेला मर्केल (2.8)

12) एलन मस्क (2.9) I दीपिका पादुकोण (2.8)

13) डोनाल्ड ट्रम्प (2.6) I प्रियंका चोप्रा (2.8)

14) पोप फ्रांसिस (2.4) I एलेन डिजेनर्स् (2.7)

15) शाहरुख खान (2.2) I ऐश्वर्या राय (2.7)

16) इमरान खान (1.9) I सुष्मिता सेन (2.2)

18) सलमान खान (1.7) I थेरेसा मे (2)

19) रेसेप तैयप एर्डोगन (1.5) I मिलेनिया ट्रम्प (1.6)

20) एंडी लॉ (1.5) I यांग मी (1.3)

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. मध्ये 335 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :

● ड्यूटी ऑफिसर-टर्मिनल : 08
● ड्यूटी ऑफिसर : 15
● ऑफिसर (IR/HR) : 02
● ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/अ‍ॅडमिन) : 04
● ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (Pax) : 65
● ऑफिसर-अकाउंट्स : 01
● डेप्युटी टर्मिनल मॅनेजर (Pax Handling) : 02
● ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) : 02
● ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल : 04
● कस्टमर एजेंट : 56
● रॅम्प सर्व्हिस एजेंट : 15
● यूटिलिटी एजेंट-कम-रॅम्प ड्राइव्हर : 40
● हँडिमन / हँडिवूमन : 121

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

💸 फी : General/ OBC: ₹500/- (SC/ ST/ ExSM : फी नाही)

🗞 जाहिरात व अर्ज पहा : http://bit.ly/2xXGUCg

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤼‍♀ आजपासून रंगणार प्रो-कबड्डीचा थरार

LetsUp | Sports

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची आजपासून (दि.20) दणक्यात सुरुवात होणार

👉 गच्चीबौली स्टेडियमवर रंगणाऱ्या सलामीच्या सामन्यात तेलुगू टायटन्स आणि यू मुम्बा आमने-सामने

आजच्या लढती : तेलुगू टायटन्स वि. यू मुम्बा (सायं.8.30) I पाटणा पायरेट्स वि. बेंगळुरू बुल्स (रात्री 8.30)

----------------------
🧐 कबड्डीची आवड आहे? मग निवडा तुमची ड्रीम टीम आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11 ॲप, 👉 क्लिक करा : https://urlzs.com/zorLC
----------------------

📍 विशेष बाबी :

● सलामीचा सामना 20 जुलैला तर अंतिम 19 ऑक्टोबरला
● या सीझनमध्ये एकूण 12 संघ सहभागी होणार
● दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने लढती होणार
● 'प्ले-ऑफ'सह यंदाच्या स्पर्धेत एकूण 72 सामने होणार
● हैदराबाद, मुंबई, पाटणा, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, पुणे, जयपूर, पंचकुला, ग्रेटर नॉएडा अशा 12 शहरांमध्ये हे सामने रंगणार
● सर्व सामने 8 ऐवजी 7.30 (Pm) पासून
● प्रत्येक संघाला दुसऱ्या संघाशी दोनवेळा खेळण्याची संधी मिळणार
● प्रत्येक टप्पा शनिवारी सुरू होणार
● राहुल चौधरी आणि अजय ठाकूर प्रथमच एकाच संघातून खेळणार
● यंदा अनुप कुमार (पुणेरी पलटण) आणि राकेश कुमार (हरयाणा स्टीलर्स) प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ Letsup I General Knowledge

1) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेला भारतीय खेळाडूचे नाव काय?

उत्तर : सचिन तेंडुलकर (6 वा)

2) कोणत्या ई-कॉमर्स कंपनीने पेटीएम मॉल या कंपनीमधील 5.5 टक्के हिस्सा खरेदी केला आहे?

उत्तर : ईबे (eBay)

3) जुलै 2019 मध्ये निधन झालेल्या जेष्ठ बंगाली अभिनेत्याचे नाव काय?

उत्तर : स्वरुप दत्ता

4) भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना पूर्व बंगालचा कोणता सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे?

उत्तर : ‘भारत गौरव’

5) छत्तीसगडच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तर : अनुसूइया उईके

6) सन 2019 मधील “इंडियाज 100 लिडिंग ब्रॅंड्स 2019” या यादीत कोणती कंपनी अग्रस्थानी आहे?

उत्तर : टाटा ग्रुप (19.55 अब्ज डॉलर)

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ महेंद्रसिंग धोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार

LetsUp । Sports

भारतीय संघ 3 ऑगस्टला वेस्ट इंडिज दौ-यावर जाणार आहे.

🤐 निवृत्तीच्या चर्चांना विराम : गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहेत. मात्र, आता दोन महिने आपण क्रिकेट खेळणार नसल्याचे धोनीने बीसीसीआयला कळवले आहे. धोनीच्या या भूमिकेमुळे त्याची निवृत्ती आणि वेस्टइंडिज दौऱ्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

👀 धोनी करणार हे काम? : महेंद्रसिंग धोनी दोन महिने क्रिकेट खेळणार नसून पॅरासैन्य रेजिमेंटमध्ये दाखल होणार आहे.

🏅 धोनीला त्याच्या क्रिकेटमधील अमूल्य योगदानाबद्दल 2011 मध्ये पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आले होते.

🧢 संघातील स्थान? : भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

🗣 धोनीचा क्रिकेटमधून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे त्याचे व्यवस्थापक अरुण पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

LetsUp । Breaking

💁‍♂ माजी मुख्यमंत्री : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं शनिवार (दि.20) रोजी निधन झालं आहे.

📍 वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

🏥 शनिवार (दि.20) सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुपारच्या सुमारास त्यांचं निधन झालं. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती.

💫 कारकीर्द :
शीला दीक्षित यांनी 15 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.
केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातही त्या मंत्री होत्या.
सध्या दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🥇 हिमा दास ने पटकाविले पाचवे ‘सुवर्ण’पदक

LetsUp | Sports

💁‍♂ भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णवेध कायम असून शनिवारी तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली.

🏃‍♀ मेटूजी ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 52.09 सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले.

👀 भारताच्याच वी. के. विस्मया, सरिता गायकवाड यांनी अनुक्रमे दुसरा (52.48 सेकंद) व तिसरा (53.28 सेकंद) क्रमांक मिळविला.

📍 गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने 400 मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

💫 हिमाने महिनाभरात विविध स्पर्धांमध्ये मिळून पाच सुवर्णपदक पटकाविले आहेत.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 महिलांसाठी सुरक्षित देशांच्या यादीत कोण कितव्या स्थानी?

LetsUp । Update

वर्ल्ड इंडेक्स ट्विटरने जाहीर केली आकडेवारी

💁‍♂ टॉप 3 सुरक्षित देश? : महिलांसाठी सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत आइसलँडने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नॉर्वे दुसऱ्या तर स्वीडन देश तिसऱ्या स्थानी आहेत.

📍 भारत 108 व्या स्थानी : महिलांसाठी सुरक्षित असलेल्या यादीत भारत 108 व्या स्थानी असताना भारताचे शेजारी देश बांगलादेश 48 व्या स्थानी, तर फिलिपीन्स हा देश 8 व्या स्थानी आहे. तर, या यादीत पाकिस्तान 148 व्या स्थानी आहे.

💁‍♀ या देशात सर्वाधिक महिला नजरकैदेत : हाँगकाँगमध्ये एकूण कैद्यांच्या 20.5 टक्के महिला कैदी असल्याचे स्पष्ट होत आहे. यानुसार सर्वाधिक महिला कैदी असलेल्या देशांच्या यादीत हाँगकाँग प्रथम स्थानी आहे. या यादीत भारत 12 व्या स्थानी आहे. भारतात हे प्रमाण 4.3 टक्के इतके आहे. पाकिस्तान मात्र 14 स्थानी असून तेथील महिला कैद्यांचे प्रमाण आहे 1.7 टक्के.

🔝 या देशात महिलांचे वर्चस्व : आफ्रिका खंडातील रवांडा या देशात संसदेत सर्वाधिक महिला प्रतिनिधी आहे. रवांडात संसदेतील महिला प्रतिनिधींचे प्रमाण आहे 61 टक्के. यात बोलिव्हिया दुसऱ्या, तर क्युबा तिसऱ्या स्थानी आहे.

👉 भारताचा क्रमांक 14 वा असून भारतात 11 टक्के महिला संसदेत आहेत. पाकिस्तानात 20 टक्के महिलांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup