LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂ एसी आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम!

LetsUp | Health

हल्ली ऑफिस, घर, दुकानं या ठिकाणी एसीचा (Air Conditioner) सर्रास वापर पाहायला मिळतो. परंतु एसीचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेदेखील आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात...

1) सलग 10 ते12 तास एसीमध्ये राहिल्यामुळे घाम येत नाही. यामुळे हाडाशीसंबंधित समस्यांना नक्कीच आमंत्रण मिळते.

2) आपण रुम थंड व्हावी यासाठी एसीचं टेम्परेचर 16-17 वर ठेवत असतो. त्यामुळे एसीतून येणारी गार हवा आपल्या शरीरावर परिणाम करते.

3) रुम प्रचंड थंड झाल्यामुळे हाड कमकूवत होत असतात. त्यामुळे एसीचे टेम्परेचर कायम स्थिर ठेवावे. एकदा टेम्पेचर सेट केल्यानंतर ते सतत बदलू नये.

4) एसी लावल्यानंतर आपण अनेक वेळा दारं-खिडक्या बंद करतो. त्यामुळे घरात खेळणारी शुद्ध हवा थांबली जाते. परिणामी श्वसनासंबंधीच्या तक्रारीदेखील निर्माण होऊ शकतात.

5) विशेष म्हणजे शरीराला ताजी हवा न मिळाल्यामुळे शरीराची वाढ होण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

6) एसीमध्ये बसल्यामुळे शक्यतो घाम येत नाही. परिणामी हे द्रव्ये शरीरातच राहतात. त्यासोबतच सतत एसीमध्ये बसल्याने त्वचा कोरडी होते.

7) त्वचेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे शरीरावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. त्यासोबत अनेक आजारही उद्भवण्याची शक्यता असते.

8) जे लोक सतत एसीमध्ये असतात त्यांना एसीची सवय लागते व त्यांना त्वचे संबंधी समस्या होतात. जसे त्वचा शुष्क व डेड स्कीन सेल्स सारख्या समस्या होतात.

9) एसीचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या डोक्यावर होतो, ज्या मुळे जास्त डोकेदुखी होते. आपली डोके दुखीची समस्या वाढते.

10) एसीची थंड हवा आपल्या शरीरातील रक्ताला प्रभावित करते यामुळे हृदयाला आपले काम करायला अडथळे येतात. यामुळे हृदयाच्या समस्या वाढतात. म्हणून एसीमध्ये सतत राहू नये.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 वर्षातला सर्वात मोठा सेल आणि शेवटचा दिवस!

भरघोस डिस्काउंटची हि संधी सोडू नका!

📣 ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’चा Amazon Prime Day Sale म्हणजे मनसोक्त डिस्काउंट देणारा सेल...!

Home & Kitchen उपकरणे खरेदीवर 30 ते 75% डिस्काउंट
दैनंदिन आवश्यक गोष्टींवर 70% पर्यंत डिस्काउंट
अ‍ॅमेझॉन फॅशनवर 80% पर्यंत डिस्काउंट
टॉप Electronic Appliances वर 5000+ डील आणि No cost EMI उपलब्ध
जर तुम्ही HDFC Credit किंवा Debit Card User असाल तर 10% इन्स्टंट डिस्काउंट आणि उपलब्ध
50,000 पेक्षा कमी खरेदीवर 1,750* /- पर्यंत सूट
50,000 पेक्षा जास्तीच्या खरेदीवर 3,500* /- पर्यंत Flat सूट

👍 सेलमध्ये स्मार्टफोन, ऑडियो प्रॉडक्ट्स, टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रिक उपकरणांवर भरघोस डिस्काउंट

👉 त्वरा करा, ऑफरसह खरेदीसाठी क्लिक करा : https://amzn.to/2NWiGTI
LetsUp News Updates

● केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोटार वाहन सुधारणा विधेयक-2019 केले सादर

● चीनच्या आर्थिक विकास दराने दुसऱ्या तिमाहीत गेल्या सत्तावीस वर्षांतील नीचांक (6.2 टक्के) गाठला

● भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त

● राज्य सरकार शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत पुढील महिन्यात निर्णय घेणार

● दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान 14 ऑगस्टपर्यंत, 33 लाख कुटुंबांना शिधापत्रिका, 40 लाख गॅस कनेक्शन मिळणार

● डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

● ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

● आयशर ट्रॅक्टर्स कंपनीने बाजारात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर्स आणि अ‍ॅग्रिस्टार रोटोटिलर केले लाँच

● बीसीसीआय लवकरच मुख्य प्रशिक्षकांसह साहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवणार

● प्रेमातील चढउतार घेऊन राजश्री मराठीची 'यु टर्न' ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📝 मोटारवाहन सुधारणा विधेयक सादर

LetsUp | Update

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मोटार वाहन सुधारणा विधेयक-2019 लोकसभेत केले सादर

💁‍♂ जाणून घ्या विधेयकातील नियम :

दारु पिऊन गाडी चालवल्यास 10 हजार रुपयांचा तर, अतिवेगाने वाहन चालवल्यास 5,000 रुपयांचा दंड
ओव्हरडोलिंगवर 20 हजार रुपयांचा तर सीट बेल्ट न बांधल्यास 10 हजार रुपयांचा दंड
विना पॉलिसी वाहन चालवल्यास 2 हजार रुपयांचा दंड
विना हेल्मेट वाहन चालविल्यास 1000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी वाहनपरवाना रद्दची तरतूद
सध्या हे लायसन्स 20 वर्षांसाठी मिळते. हा कालावधी 10 वर्षांवर आणण्यात आला आहे
वय वर्ष 55 पुढील लोक हे लायसन्स नुतनीकरणासाठी आणतील तेव्हा ते 5 वर्षांसाठीच दिले जाईल
सर्व राज्यांत वाहन परवाना, वाहन नोंदणी या प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर नोंदणीकृत करण्याची सूचना
मोटार अपघातात मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये भरपाई देण्याची तरतूद

💫 मोटार वाहन सुधारणा विधेयकात सुरक्षा नियमांसाठी कडक पाऊले, त्यामुळे, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेची तरतूद

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 200 जागांसाठी भरती

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :

संचालक / कार्यकारी संचालक : 01
सल्लागार (आरोग्य अर्थशास्त्र व वित्त) : 01
सल्लागार (सार्वजनिक आरोग्य) : 01
उप कार्यकारी संचालक : 01
वरिष्ठ सल्लागार - सार्वजनिक आरोग्य : 15
सल्लागार - सार्वजनिक आरोग्य : 14
कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य : 148
कार्यकारी अभियंता स्थापत्य / विद्युत : 02
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : 05
बायोमेडिकल अभियंता : 10
कार्यक्रम व्यवस्थापक - HR / कार्यक्रम अधिकारी - HR / कार्यक्रम अधिकारी - प्रशासन HR : 02

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

💸 फी : खुला प्रवर्ग : ₹150/- (राखीव प्रवर्ग: ₹100/-)

👍 अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- 400001

📆 अर्ज पोहचण्याची मुदत : 25 जुलै 2019 (05:30 PM)

🗞 जाहिरात व अर्जासाठी पाहा : http://bit.ly/2YTVg27

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ Letsup I General Knowledge

1) FIFAच्या ताज्या मानांकन यादीत (जुलै 2019) भारतीय महिला फुटबॉल संघाचा क्रमांक कोणता आहे?

उत्तर : 57 वे स्थान

2) 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात कुणी मारली बाजी?

उत्तर : नोव्हाक जोकोविच (सर्बिया)

3) 2019 विम्बल्डन या स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटाची विजेती कोण?

उत्तर : सिमोना हॅलेप (रोमानिया)

4) ICC क्रिकेट विश्वचषक 2019 या स्पर्धेचा सामनावीर आणि स्पर्धावीराचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?

उत्तर : सामनावीर - बेन स्टोक्स I स्पर्धावीर - केन विल्यम्सन

5) आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर : बिजींग, चीन

6) सध्या जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्य करणार्‍या व्यक्तीचे नाव काय?

उत्तर : डेव्हिड मालपास

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्र सरकार घरगुती वीज वापरासाठी प्रिपेड सुविधा देशभरात लागू करण्याच्या तयारीत, त्यासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार

● केंद्राने जनरल प्राॅव्हिडंट फंडाचे व्याजदर घटवले, जुलै-सप्टेंबरसाठी जीपीएफवर 7.9% व्याज मिळणार

● आयटीआर 2 व आयटीआर 3सह रिटर्न भरण्यासाठी अधिसूचित काेणत्याही फाॅर्ममध्ये बदल झालेला नाही : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ

● कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या याचिका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आज (दि.17) आपला निर्णय देणार

● छत्तीसगडच्या राज्यपालपदी अनुसुइया उइके आणि आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी विश्व भूषण हरिचंदन यांची नियुक्ती

● शहिदांच्या वारसांना एक काेटी, तर जखमींना 60 लाखांपर्यंतची मदत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला महत्त्वपूर्ण निर्णय

● मंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार, याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता

● जबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, किंमत 23, 990 रुपये

● भारताची गोळाफेकपटू दीपा मलिकची पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे 2020च्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतून माघार

● नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवर ‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर प्रदर्शित, येत्या 15 ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 आधी पैसे मगच वीज वापरता येणार

LetsUp | Update

📍 केंद्र सरकार आता घरगुती वीज वापरासाठी प्रिपेड सुविधा देशभरात लागू करण्याच्या तयारीत आहे.

👍 वीज वापरानंतर पैसे भरण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात येणार, त्यासाठी देशभरातील घरांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे.

👉 त्यानुसार वीज वापरण्यासाठी आता ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना वीज पुरवठा होणार आहे.

🗣 केंद्रीय ऊर्जामंत्री सिंह काय म्हणाले? :

भारत आता वीज क्षेत्रात एक नवी व्यवस्था निर्माण करु पाहत आहे, यामध्ये वीज ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागतील त्यानंतरच त्यांना वीज वापरता येणार आहे.
तसेच राज्यांना समाजातील गरीब वर्गाला मोफत वीज देण्याचा पर्यायही खुला असणार आहे. मात्र, यासाठी त्यांना आपल्या बजेटमधून वीज वापराचे पैसे भरावे लागतील.
या प्रिपेड योजनेसाठी केंद्र सरकारने 2022चे लक्ष्य निश्चित केले आहे.
यानंतर लोकांना आपल्या घरांमध्ये वीज मीटर रिचार्ज केल्याशिवाय वीज वापरता येणार नाही.
यासाठी ग्राहकांना मोबाईल फोन प्रमाणे वीज रिचार्ज करावी लागेल.
हे रिचार्ज संपल्यानंतर आपोआपच ग्राहकांच्या घरातील वीज पुरवठा बंद होऊन जाईल.

💁‍♂ प्रिपेड मीटरचे फायदे :

ग्राहकांना घरपोच बील पाठवण्याची कटकट संपेल.
वीज कंपन्यांवर थकीत वीजबीलांचा भार राहणार नाही.
थकीत बाकी नसल्यामुळे वीज कंपन्यांची स्थिती सुधारेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने वीज क्षेत्रात क्रांती येईल.
मोबाईल फोनच्या माध्यमातून आपल्या वीज मीटरला रिचार्ज करता येईल.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

1) सेक्रेड गेम्सचा दुसरा टीजर रिलीज : नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवर ‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

येत्या 15 ऑगस्टला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जंग का वक्त आ गया है’, म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देणार आहे.

👉 टीजर पहा : http://bit.ly/2JEqNQJ

2) ‘बाबा’चा ट्रेलर पहा : अभिनेता संजय दत्तची निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये शंकरच्या पालकत्वासाठी सुरू असलेला लढा पाहायला मिळतो. मुलासाठी एका बाबाने केलेल्या संघर्षाचं चित्रण यामध्ये करण्यात आले आहे.

👉 ट्रेलर पहा : http://bit.ly/2Sn9mGP

3) 'कोडे, सोपे थोडे' गाणे प्रदर्शित : अभिनेता अमेय वाघ आणि सई ताम्हणकर अभिनित 'गर्लफ्रेंड' या चित्रपटातील 'कोडे,सोपे थोडे' हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

या गाण्याचे संगीत दिग्दर्शन आणि संयोजन ह्रिषीकेश, सौरभ आणि जसराज यांनी केले आहे. सध्या या गाण्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट येत्या 26 जुलैपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

👉 गाणे पहा : http://bit.ly/32sdvOo

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤩 भावना व्यक्त करण्याचे आधुनिक माध्यम 'इमोजी'!

LetsUp | Special

मनुष्य हा भावनाप्रधान प्राणी आहे. सुख, दुःख किंवा अगदी राग सुद्धा व्यक्त केल्याशिवाय माणसाला राहवत नाही. मग कोणी भावना व्यक्त करायला शब्दांचा आधार घेतो तर कोणी केवळ डोळ्यांमधून भावना व्यक्त करतो.

😅 परंतु हे झालं समोरासमोर संवाद साधताना. मात्र, जेव्हा तुम्ही दूर राहून संवाद साधता तेव्हा आजच्या आधुनिक युगात तुम्हाला संवादाचे माध्यम चॅटिंग तर भावना व्यक्त करण्याचं इमोजी. आज जागतिक इमोजी दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात इमोजीचं जग!

🧐 प्रथम इमोजी 1999 मध्ये शिगताका कुरिता यांनी जपानमधील मोबाईल इंटरनेट प्लॅटफॉर्मवर कार्य करणाऱ्या टीमचा एक भाग म्हणून तयार केली होती. जेथे त्याने प्रथम 175 पिक्सेल इमोजी वितरित केली.

🎯 प्रथमतः वर्ल्ड इमोजी दिन हा 17 जुलै 2014 ला साजरा करण्यात आला होता. जागतिक इमोजी दिनाच्या पूर्वसंध्येला टेक कंपनी 'बोबल एआय'ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

📌 यात दोन इमोजीचा समावेश आहे. 😂 आनंदाश्रू आणि 😘 ब्लोइंग अ किस इमोजी या दोन इमोजींचा भारतात सर्वाधिक वापर होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

😍 त्यानंतर स्माइलिंग फेस विथ हार्ट आइज, किस मार्क, 👍ओके हँड, 😫 लाउडली क्राईंग फेस, 🥺 बिमिंग फेस विथ स्माईलिंग आइज, 👍 थम्स अप, 🙏 फोल्डेड हँड्स आणि 😎 स्माईलिंग विथ सनग्लासेस या इमोजीचा वापर होत असल्याचे ही या अहवालात म्हटले आहे.

😇 यावरूनच, आपल्या लक्षात येते कि आपल्या आयुष्यात इमोजीचं काय स्थान निर्माण झाले आहे. आपल्या चॅटिंगमध्ये जसे आनंदी इमोजी आपण वापरता तसेच, आपण खऱ्या आयुष्यातसुद्धा आनंदी राहाल याच आजसाठी शुभेच्छा!

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ सावधान! आता आधार नंबरमध्ये चूक झाल्यास होणार दंड

LetsUp | Update

सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना झालेली चूक आता महागात पडणार

📝 लवकरच सरकार ’इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट’शी संबंधित नियमावलीत करणार बदल, त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून 10 हजारांचा दंड वसूल केला जाणार

👀 नियमावलीत बदल अंमलात आल्यानंतर नागरिकांना डोळ्यात तेल घालून सरकारी कागदपत्रांमध्ये आधार नंबर नोंदवावा लागणार

👉 ’इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट’च्या कलम 272 अन्वये हा बदल केला जाणार, हा नवीन नियम 1 सप्टेंबर 2019 पासून लागू होण्याची शक्यता

👉 चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्या नंबरची पडताळणी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यालाही हा दंड ठोठावला जाणार

💫 कराचा भार टाळण्यासाठी नागरिकांनी चुकीचा आधार नंबर नोंदवू नये, यासाठी सरकारने उचलले हे पाऊल

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 तंत्रज्ञान कुठं काय?

LetsUp | Tech

1) रियलमी 3i भारतात लाँच : रियलमी कंपनीने बजेट स्मार्टफोन रियलमी 3 आय डायमंड रेड, ब्लॅक आणि ब्लू या तीन रंगात लाँच केला आहे.

3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत 7 हजार 999 रुपये इतकी तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये इतकी आहे.

📍 जाणून घ्या फोनची वैशिष्ट्ये :

6.22 इंचाचा एचडी प्लस नॉच डिस्प्ले
मीडिया हिलिओ पी60 प्रोसेसर
ड्युअल रियर कॅमेरा सेटअप
13 मेगापिक्सस प्लस 2 मेगापिक्सल कॅमेरा
13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
4,230 एमएएच क्षमतेची बॅटरी

2) शाओमीचा LED लॅम्प लाँच : शाओमी कंपनीने आपल्या वर्धापनदिना निमित्ताने भारतात ‘Mi Rechargeable LED Lamp’ लाँच केला आहे.

हा लॅम्प तुम्ही एकदा चार्ज केला की, पुढील पाच दिवस वापरु शकता, असा दावा कंपनीने केला आहे. उद्या दि. 18 जुलै रोजी दुपारी 12 पासून या लॅम्पची विक्री कंपनीच्या वेबसाईटवर (MI.com) सुरु होईल. या लॅम्पच्या किंमतीबद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

🧐 लॅम्पचे वैशिष्ट्य काय? :

व्हाईट रंगाच्या एलईडीमध्ये राऊंड बेस स्टॅण्ड, लॉंग स्लिम पोल आणि सिलेंड्रिक लॅम्प देण्यात आला आहे.
एमआय रिचार्जेबल एलईडी लॅम्पमध्ये व्हाईट, वार्म व्हाईट अशा रंगात ब्राईटनेस लेव्हल आहेत.
हा लॅम्प खूप हलका असल्यामुळे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता.

3) जिओ ग्राहकांसाठी खुशखबर : जिओने आपल्या 198 रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे. या प्लानमध्ये आता ग्राहकांना 1.5 जीबी डेटाऐवजी आता 2 जीबी डेटा उपलब्ध होणार आहे.

जिओच्या या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. तसेच डेटासह अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन 100 SMS दिले जाणार आहेत. या सर्व प्लानबरोबर जिओचे सर्व अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे.

दरम्यान, 449 रुपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना 3 महिन्यांपर्यंत (91 दिवस) जिओची सेवा मिळणार आहे. 3 महिन्यात ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार असून दररोज 100 SMS फ्री मिळणार आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 मोठी बातमी! कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला अटक

LetsUp | International

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमधील लाहोर येथून अटक

🚨 सईदला पाकिस्तानमध्ये पंजाबच्या काऊंटर टेररिजम डिपार्टमेंट (CTD) यांच्यातर्फे घेण्यात आले ताब्यात

🧐 टेरर फंडिंगच्या आरोपाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे, साऱ्या घडामोडींवर भारताचंही लक्ष

😇 डबघाईला आलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी पाकिस्तान सरकारने हाफिजवर कारवाई केल्याची चर्चा सुरु

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 स्वयंपाकाची आवड आहे? मग सादर आहे खास टिप्स!

LetsUp | Tips & Tricks

बऱ्याचदा स्वयंपाक उत्तम येत असतो. मात्र कधी-कधी काहीतरी चूक होते आणि ती सुधारण्यासाठी आपल्याला मार्गच सापडत नाही. म्हणून चूक होऊच नये यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊयात...

🍅 टोमॅटो पल्प काढण्यासाठी : टोमॅटोचा पल्प पटकन काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन् काढता येते. याचा उपयोग टोमॅटो सूप, ग्रेव्ही व ज्युससाठी करता येतो.

😋 कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी : कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी कणकेत 2 चमचे गरम केलेले तेल घाला.

🍋 लिंब ताजे ठेवण्यासाठी : लिंब बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होवून चवहीन होतात. त्यासाठी लिंबं निट धूवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहतात.

🥥 नारळाचे दोन समान भाग करण्यासाठी : जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे त्याला पाण्याची रेघ अर्ध्यातून ओढून नंतर जोरात आपटावे, नारळ तेथूनच तुटेल.

🍚 नरम व मोकळ्या भातासाठी : तांदुळ शिजवतांना कुकरमध्ये शिजवावा त्याने भात नरम होतो. त्यात 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती, भारताला मोठे यश, पाकला दणका

● एक घर असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला दुसऱ्या घर खरेदीसाठी जीपीएफमधून रक्कम काढता येणार नाही

● केंद्र सरकारने 15 व्या वित्त आयोगाला 1 महिन्याची मुदतवाढ देत कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत वाढवला

● CBI कडून 3 वर्षांत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 86 IAS, IPS आणि IRS अधिकाऱ्यांवर खटले दाखल

● गुणवत्तेवर आधारित कायदेशीर स्थलांतराचे प्रमाण 57 टक्के करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या विचाराधीन

● इस्रोने GPS चं इंडियन व्हर्जन केलं विकसित, नेव्हिगेशन विद इंडियन कॉन्सटेलेशन (NavIC) असे नामकरण

● 25 हजार रुपयांमध्ये Kia Seltos च्या बुकिंगला झाली सुरूवात, किंमत 10 ते 17 लाख रुपयांच्या दरम्यान

● सामन्यावेळी डोक्याला मार लागून फलंदाज जखमी झाल्यास संघातील 12 वा खेळाडू फलंदाजी करू शकेल

● भारताच्या अनीष भनवालने म्युनिचमध्ये सुरू असलेल्या ज्युनियर शूटिंग वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक पटकावले

● 'गेम ऑफ थ्रोन्स'ने 'एमी 2019' या अवॉर्डसाठी 32 श्रेणींमध्ये नामांकन मिळवत एक नवा रेकॉर्ड केला आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💪 भारताचा मोठा विजय; कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

LetsUp | International

👍 पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला मोठा दिलासा

हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले

👉 हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली, भारताच्या बाजूने 15 विरुद्ध 1 अशा मतांनी हा निकाल देण्यात आला

📍 मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ निकाल यांनी केले वाचन, कुलभूषण प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे कोर्टाने केले स्पष्ट

💫 कुलभूषण यांचे प्राण वाचले असले तरी त्यांच्या सुटकेसाठी मोठा कायदेशीर, राजकीय आणि कूटनितीने संघर्ष करावा लागणार

🤔 कुलभूषण जाधव कोण? :

जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत
कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 फेसअ‍ॅपची क्रेझ; ‘ओल्ड एज फिल्टर’ झाले व्हायरल!

LetsUp | Trending

🧐 सध्या सोशल मीडियावर सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे "आपण म्हातारपणी कसे दिसू?" यासंदर्भातील फोटोंचा ट्रेंड

👉 मुळात हा ट्रेंड अचानक व्हायरल होण्यामागील कारण आहे फेस अ‍ॅप (Face App).

💁‍♂ फेस अ‍ॅप वापरुन सध्या सेलिब्रिटीजपासून सामान्यांपर्यंत अनेकजण भविष्यात आपण काही वर्षांनी कसे दिसू? हे तपासून पाहत असून ते फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत आहेत

🤔 फेस अ‍ॅप काय आहे? :

फेस अ‍ॅप हे प्रथम 2017 साली लॉन्च करण्यात आले होते.
मात्र अचानक हे अ‍ॅप वापरणाऱ्यांचे आणि त्यावरील फोटो व्हायरल होण्याचे नक्की कारण काय आहे हे समोर आलेले नाही.
खरं तर या अ‍ॅपमध्ये अनेक फिल्टर्स आहेत मात्र त्यातील ओल्ड फेस फिल्टर खूपच लोकप्रिय झाले आहे. या फिल्टरचा वापर करुनच अनेकजण भविष्यातील स्वत:कडे पाहत आहेत.
हे फिल्टर मोफत असल्याने अनेकजण ते ‘ट्राय करुन तर बघू’ म्हणत वापरुन पाहताना दिसत आहेत.
या अ‍ॅपपमध्ये तरुण रुप पाहण्यासाठीचे फिल्टर, केसांचा रंग बदलण्याचे, चेहऱ्यावर मेकअप करण्याचे तसेच क्रूर हास्य चेहऱ्यावर आणण्याचेही फिल्टर या अ‍ॅपमध्ये आहे.

📍 फेस अ‍ॅप कसं काम करतं? :

आर्टिफिशियल (AI) इंटेलिजन्स अल्गोरिदमवर हे अ‍ॅप काम करते.
AI च्या मदतीने युझर्सचा चेहरा काही वर्षांनी कसा दिसेल याचा अंदाज अ‍ॅप लावते.
त्यानुसार युझरच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, सुकलेले डोळे, चेहऱ्यावरील केस, काही ठिकाणी डाग आणि चेहऱ्यावरील इतर बारीक-सारीक बदल केले जातात.
त्यांनतर काही वर्षांनंतरचा युझरचा ‘ओल्ड’ व्हर्जनमधील फोटो तयार होतो.
AI चा वापर करुन हे अ‍ॅप काम करत असल्याने तयार होणारा फोटो हा कार्टून किंवा चित्र न वाटता युझर्सचाच काही वर्षानंतर काढलेला फोटो वाटतो.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🙏 आज अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

LetsUp | Special

शाहीर तसेच दीन-दुबळ्यांचे, उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारे साहित्यिक, लेखक अण्णाभाऊ साठे यांचा आज 50 वा स्मृतिदिन.

सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात 1 ऑगस्ट इ.स. 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीच शाळेत गेले नाहीत.

परंतु तरीही आपल्या लेखणीच्या जोरावर समाजमन ढवळून काढण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी गायलेले पोवाडे, लेखण, रचना, समाजकार्य आणि राजकारण आजही लोकांच्या हृदयात आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे काही प्रेरणादायी विचार पाहुयात...

1) हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
2) जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव.
3) नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते. धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
4) जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.
5) अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.

📍 विशेष बाबी :

तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
ते दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले.
1 ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹4 टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते.
पुण्यातील लोकशाहीर अण्णाभा साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.
अण्णाभाऊ यांच्या जातीव्यवस्था, दलित सवर्ण संघर्ष, निसर्ग, स्थलांतरण, शहर आणि ग्रामिण जीवन यांतील संघर्ष असे अनेक पैलू पाहायला मिळतात.
महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले गेले आहेत.
पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे.
त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

📝 साहित्य संपदा : लोकनाट्य : 13 I नाटके : 3 I कथासंग्रह : 13 I कादंबर्‍या : 35 I पोवाडे : 15 I प्रवास वर्णन : 1 I चित्रपट कथा : 7

👍 'फकिरा'ला प्रचंड यश : त्यांच्या फकिरा (1959) या कादंबरीला प्रचंड यश मिळाले. या कादंबरीस राज्य सरकारने 1961 सालात उत्कृष्ट कादंबरी पुरुस्कार देऊन गौरविले.

आज लोकशाहीर सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन : https://bit.ly/2NZ1gWh

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🚀 ठरलं! चांद्रयान 22 जुलैला अवकाशात झेपावणार

LetsUp | Science

👍 भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'च्या महत्वकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेच्या प्रक्षेपणाचा नवा मुहूर्त ठरला

💁‍♂ तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण रद्द झाल्यानंतर आता सोमवार दि. 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी या अवकाशयानाचे प्रक्षेपण होणार

🧐 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहचेल, यानंतर हे चांद्रयान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार

📍 विशेष बाबी :

भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार
या मोहिमेसाठी भारताला तब्बल 978 कोटी रुपये खर्च आला आहे
सर्वात महत्वाचे म्हणजे या यानाचे सर्व भाग स्वदेशी आहेत

🔎 अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार :

या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, त्यावर उपलब्ध असलेली खनिजं, रसायनं आणि त्यांचा अभ्यास केला जाणार
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली कोणती खनिजं दडली आहेत? तिथे पाण्याचा अंश आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासणीनंतर मिळणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
अयोध्याप्रकरणी तोडगा की रोज सुनावणी? 2 ऑगस्टला ठरणार

LetsUp | Update

अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

📝 अयोध्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने कोर्टात अहवाल केला सादर

👍 आता या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी कोर्टाने समितीला 31 जुलैपर्यंतची दिली मुदत

📅 त्यानंतर या प्रकरणावर 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता खुल्या कोर्टात सुनावणी होणार

💁‍♂ त्यात मध्यस्थ समितीमार्फत या प्रकरणावर तोडगा काढायचा की? या प्रकरणावर रोज सुनावणी करायची यावर निर्णय घेण्यात येणार : सर्वोच्च न्यायालय

🧐 पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने 2 ऑगस्टची तारीख केली निश्चित

💫 या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. एस. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचा समावेश आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup