LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂ या राज्यात लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट करणे बंधनकारक होणार

LetsUp । Update

देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न.

🗣 काय म्हणाले आरोग्यमंत्री? : गोवाच्या नागरिकांना भविष्यामध्ये लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली आहे.

👍 एचआयव्ही तपासणी बंधनकारक करण्याचे विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.

💉 टेस्ट बंधनकारक का? :

गोव्यात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात.
देहव्यापाराचे प्रमाणही या राज्यात अधिक आहे.
त्यामुळे एड्सचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
याचाच विचार करून लग्नाआधी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

📍 हि तपासणीही करावी लागणार : एचआयव्हीसोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणेही बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😱 धक्कादायक! राज्यात वर्षभरात साडेसोळा हजार बालमृत्यू

LetsUp । Update

आरोग्य विभागाने 2018-19 मधील आकडेवारी केली जाहीर

💁‍♂ राज्यात गेल्या वर्षभरात 16 हजारांहून अधिक बालमृत्यू झाले. एकीकडे बालमृत्यूचा दर कमी होत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असतानाच हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

👀 या भागांमध्ये बाल मृत्युदर अधिक : प्रामुख्याने आदिवासी जिल्ह्यंमध्ये बालमृत्यू व अर्भकमृत्यूचे प्रमाण मोठे असून सक्षम आरोग्य यंत्रणेच्या अभावी बालमृत्यू वाढत असल्याचे ग्रामीण क्षेत्रातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

🤔 का होतात मृत्यू? : बहुतेक मृत्यू हे जंतुसंसर्ग,न्युमोनिया तसेच जन्मता वजन कमी असल्यामुळे आणि श्वासारोधामुळे होतात. तसेच आरोग्य विभागातील हजारो रिक्त पदांमुळे तसेच पुरेसे बालरोग तज्ज्ञ उपलब्ध होत नसल्यामुळे बालमृत्यू दर वाढतो आहे.

📊 राज्यातील काही आकडेवारी (2018-19)
नंदुरबार - 426
अमरावती - 309
गडचिरोली - 61

📍 आरोग्य विभागाची माहिती :
👉 राज्यात वर्षांकाठी 15 लाख बालकांचा जन्म होतो.
👉 त्यापैकी सुमारे 8 लाख बालकांचा जन्म हा आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये होतो.
👉 2014 मध्ये दरहजारी बालमृत्यूचे प्रमाण हे 22 एवढे होते ते कमी होऊन 19 वर आले आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 भारतीय धावपटू द्युती चंदला सुवर्णपदक

LetsUp । Sport

भारताची धावपटू द्युती चंदने इटलीमध्ये सुरु असलेल्या, 30 व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

🥇 द्युती चंदने 100 मीटर शर्यतीत ही कमाल करून दाखवली आहे.

🏃‍♀ द्युतीने 100 मीटर अंतर 11.32 सेकंदात पार करत सुवर्णझेप घेतली आहे.

💁‍♂ यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

📍 शिवाय या जागतिक स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती चंद पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎞 मनोरंजन विश्वातील काही खास घडामोडी

LetsUp | Entertainment

💃 गोविंदा-करिश्माच्या हिट गाण्यावर वरुण-सारा धरणार ठेका!

जुनी गाणी आणि त्यांची जादू याबाबत नेहमीच बोलले जाते. आजही काही गाजलेली गाणी त्यांच्या धून वर ठेका धरायला लावतात. आजकाल तर जुनी गाणी रिक्रीएट करून ती नव्या चित्रपटांमध्ये वापरली जातात.

💁‍♀ गोविंदा आणि करिश्माने ‘कूली नं १’ या चित्रपटात एका गाण्यावर नृत्य केलं आणि ते गाणं खूप गाजलं देखील. ते गाणं म्हणजे ‘मैं तो रस्‍ते से जा रहा था’.

👀 ‘कूली नं १’ चित्रपटातील ‘मैं तो रस्‍ते से जा रहा था’ या गाण्याला रिक्रिएट करण्यात येणार आहे. या गाण्याचे नविन व्हर्जन तनिष्क बागचीने संगीतबद्ध केले आहे. हे गाणे तेव्हा कुमार सानू आणि अल्का याग्निक यांनी गायिले होते.

😃 या गाण्यामध्ये सारा आणि वरुण एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान ‘कूली नं १’ चित्रपटातील मुळ गाण्यात कोणताही बदल करणार नसल्याचा खुलासा डेविड धवनने केला आहे. चित्रपटात मात्र काळानुसार काही प्रमाणात बदल पाहायला मिळतील.

----------------

🧐 ‘कबीर सिंग’ हिट, शाहिद ची ब्रँड व्हॅल्यू झाली तीस कोटी

👉 शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला हा चित्रपट देशासह विदेशातही गाजत आहे.

💫 या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २३५. ७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.या चित्रपटाची कथा आणि शाहिदचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.

💰 चित्रपटाच्या यशानंतर शाहिदकडे काही चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. मात्र आता त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. त्यामुळे त्याने त्याच्या पुढील चित्रपटासाठी ३० कोटींची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.

-----------------

📺 डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

💁‍♂ ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी घराघरांत स्थान मिळवले. त्यानंतर आता नवी मालिका ‘स्वराज्यजननी जिजामाता’ येत्या १९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.

🎥 ‘ही जगदंब क्रिएशनची दुसरी निर्मिती आहे. स्वराज्यरक्षक संभाजीनंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे. शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली, आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाई मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं सोनी मराठीच्या माध्यमातून शक्य होत आहे. ही आनंदाची आणि जबाबदारीची बाब आहे! ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाची हुंकार असेल,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांतील ठेवींचा आकडा आता 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक

● गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन, विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील दुसरी घटना

● प्रवासी कारच्या देशांतर्गत विक्रीमध्ये जून महिन्यात तब्बल 25 तर, एकूण कारविक्रीत जूनमध्ये 18 टक्क्यांनी घट

● अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात 22 जुलै रोजी व्हाइट हाऊसमध्ये बैठक

● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक (अ‍ॅण्टीबायोटिक) औषधे देणाऱ्या राज्यभरातील 43 विक्रेत्यांवर प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा

● एसईबीसी कायद्याची यंदा अंमलबजावणी नको, इच्छुक एमबीबीएसचे खुल्या वर्गातील विद्यार्थी हायकोर्टात

● उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर

● आता PUBG गेम खेळणे झाले अजून सोपे, मिळणार गिफ्ट्ससुद्धा; भारतामध्ये पब्जीची जिओ सोबत डिजिटल पार्टनरशिप

● वर्ल्डकप 2019 : भारताचे आव्हान संपुष्टात; न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांची पराभव, न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक

● ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन प्रथमच एकत्र दिसणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧘‍♂ करा योग क्षेत्रात करिअर

LetsUp | Career

हल्ली योगाची लोकप्रियता वाढत असल्याने याकडे आता करिअर म्हणूनही बघितले जात आहे. लवकरच योगशास्त्राला इंडस्ट्रियल स्वरूपही दिले जाऊ शकते. याबाबत सविस्तर जाणून घेऊ...

🧐 करिअर ऑप्शन :

बारावी ग्रॅज्युएशननंतर योगशास्त्रात डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहे.
बॅचलर ऑफ आर्ट्स (योग), मास्टर इन आर्ट्स (योग), पीजी डिप्लोमा इन योग थेरपी अशा कोर्सेसला प्रचंड मागणी आहे.
योग एक्सपर्ट अथवा नॅचरोपॅथीच्या स्वरूपात करिअर विकसित करू इच्छित असल्यास साडेपाच वर्षांचा बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योगिक सायन्सेस (बीएनवायएस) डिप्लोमा केला जाऊ शकतो.

👍 रोजगाराच्या संधी काय? :

शैक्षणिक क्षेत्र, नियोजन आणि प्रशासन, रुग्णालय आणि उपचार केंद्रे, योग चिकित्सालय यामध्ये योग प्रशिक्षकांची गरज असते.
कॉर्पोरेट संघटना, आंतरराष्ट्रीय कंपन्या, हेल्थ स्पा, ब्यूटी सलून आणि जिम येथेही योग प्रशिक्षकांची गरज असते.
काही टेलिव्हिजन चॅनेल्सही योग कार्यक्रमासाठी प्रशिक्षक नियुक्त करतात.
उद्योजक, व्यापारी, सिनेअभिनेता किंवा आजारी व्यक्ती खासगी योग प्रशिक्षक नियुक्त करतात.
वेळेची कमतरता असल्यास तुम्ही पार्टटाईम योग क्लासेस घेऊ शकता.

👀 3 लाख योग प्रशिक्षकांची गरज : एसोचेमच्या अभ्यासानुसार, भारताला 3 लाख योग प्रशिक्षकांची गरज आहे. ही आकडेवारी येत्या दशकात 5 लाखांपर्यंतही जाऊ शकते. दक्षिण पूर्व आशियात योगतज्ज्ञांची मागणी सर्वाधिक आहे.

📍 देशभरात अनेक शासकीय आणि गैरशासकीय संस्थानांकडून योगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांची काही नावे खालीलप्रमाणे आहेत.

मोरारजी देसाई इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योग, नवी दिल्ली.
लखनौ विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश.
डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ, फैजाबाद, उत्तर प्रदेश.
बुंदेलखंड विद्यापीठ, झाशी, उत्तर प्रदेश.
देव संस्कृती विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
गुरुकुल कांगड़ी विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
हेमवती नंदन बहुगुणा गढ़वाल विद्यापीठ, पौड़ी गढ़वाल, उत्तराखंड.
पतंजली विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ, मध्य प्रदेश.
डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, सागर, मध्य प्रदेश.
जिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर, मध्य प्रदेश.
महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठ, कटनी, मध्य प्रदेश.
कुरुक्षेत्र विद्यापीठ, हरियाणा.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌎 पृथ्वीबद्दल महत्वाची माहिती

LetsUp | Do You Know

सूर्यमालेतील सर्व ग्रहांमध्ये आपली पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन जगणे शक्य आहे. म्हणून "धरणी स्वर्ग आहे" असे संबोधित केले जाते. आपले शास्त्रज्ञ पृथ्वीवरील गूढ रहस्य सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर चला मग जाणून घेऊया पृथ्वीबद्दल अशी काही माहिती ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल...

🧐 पृथ्वी वरील माणसांपेक्षा जास्त सूक्ष्म जीवाणू एक चमचाभर मातीमध्ये असतात.

😳 पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एक तृतीयांश भाग वाळवंटाने व्यापलेले आहे.

😱 आपल्या आकाशगंगेत जवळजवळ 2 अरब पृथ्वीसारखे ग्रह आहेत असे शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

😰 पृथ्वीच्या आतील भागातील तापमान सूर्याच्या तापमाना एवढे असते.

😅 सुरुवातीच्या काळात योग्य ज्ञान नसल्यामुळे पृथ्वी सपाट आहे असे मानले जात होते.

💧 सूर्यमालेमधील पृथ्वी हा एकच असा ग्रह आहे जिथे पाणी तीन रुपात उपलब्ध आहे. द्रव, वायू आणि घन.

😯 मागील 40 वर्षामध्ये पृथ्वीवरील जवळ-जवळ 40% प्राणी नष्ट झालेले आहेत.

🌞 सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे पूर्ण सूर्य-ग्रहण होते.

सूर्य 19 लाखांपेक्षा जास्त पृथ्वी आपल्या आतमध्ये सामावून घेऊ शकतो.

🤭 एका दिवसात 24 तास नसून 23 तास, 56 मिनिटे आणि 4 सेकंद असतात. हा तो वेळ आहे ज्यामध्ये पृथ्वी, सूर्या भोवती एक चक्कर लावायला लावते.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👨‍👨‍👧‍👧 जागतिक लोकसंख्या दिन; आज गंभीर होण्याची गरज!

LetsUp | Special

आज जागतिक लोकसंख्या दिन. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा केला जातो.

📍 इतिहास : 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै, 1987 रोजी युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/इशारा दिन म्हणून पाळता जातो.

जॉन ग्रँट यांना लोकसंख्याशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते, तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.

🧐 भारत दुसऱ्या स्थानी : लोकसंख्येच्या बाबतीत सध्याच्या घडीला चीन पहिल्या स्थानावर तर भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2011 च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज आहे, तर चीनची लोकसंख्या 1.38 अब्ज आहे.

😨 संयुक्त राष्ट्राचा अहवाल चिंताजनक : 2028 पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या 1.45 अब्जचा टप्पा ओलांडून जाईल. त्यानंतरच्या काळात भारताची लोकसंख्या वाढत राहील व चीनची कमी होत जाईल.

💁‍♂ म्हणून आपण गंभीर व्हायला हवे! :

विकसित देशांमध्ये संसाधने अधिक आणि लोकसंख्या कमी आहे तर विकसनशील अविकसित देशांमध्ये संसाधने कमी आणि लोकसंख्या अधिक आहे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आपल्या देशातील उपलब्ध साधनसंपत्ती आणि रोजगार आदी बाबींचा विचार करता, ही भारतासाठी चांगली गोष्ट नाही.
सध्या चीनची लोकसंख्या स्थिर राहण्याचा अंदाज आहे, कारण चीनने कठोर उपाय योजले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी आपण सावध होणार का? एवढाच प्रश्‍न आहे.
लोकसंख्येमुळे चांगले आरोग्य, पौष्टिक अन्न, रोजगार यांसारख्या गोष्टी बहुतांश नागरिकांपासून दूर-दूर जाऊ लागतात. ही परिस्थिती आपणच निर्माण केलेली असते.

😇 समस्यांवर ठोस उपाययोजना हव्या :

अहवालात वर्तविलेल्या भाकितानुसार भारताची लोकसंख्या दीड अब्ज म्हणजे दीडशे कोटी झालीच, तर एवढ्या लोकसंख्येला दोन वेळचे अन्न उपलब्ध करण्याची क्षमता भारताकडे नक्‍कीच नाही.
रोबोटिक्‍स आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स यांसारख्या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांत कामगार, कर्मचाऱ्यांची गरज उरणार नाही, अशा वेळी या लोकसंख्येचे करायचे काय, हा प्रश्‍न उभा राहील.
विकासाच्या प्रवाहापासून दूर फेकल्या जाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढेल आणि गुन्हेगारीही वाढेल.
वाढती लोकसंख्या देशाची प्रगती रोखण्यास कारणीभूत तर ठरते. त्यामुळे आतापासूनच आपल्याला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

👍 आपले सक्रिय योगदान हवे : जेवढी लोकसंख्या वाढेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक दराने वंचित लोकांचा आकडा वाढत जाईल. त्यामुळेच स्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी भारताने लोकसंख्या आटोक्‍यात आणण्यासाठी कठोर उपाय योजणे गरजेचे आहे. ही जबाबदारी केवळ एकट्या सरकारची नसून सर्वसामान्य नागरिकांचीही आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤰🏻 गरोदर मातांना शासकीय योजनांचे कवच

LetsUp | Government Scheme

नवी पिढी सुदृढ असावी म्हणून आरोग्य विभागाने गरोदर मातांवर लक्ष केंद्रित करून अंगणवाडीताईवर जबाबदारी सोपविली आहे. गर्भवतींना विशेष आहार, लसीकरण आणि वजनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या बाळंतपणात मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. काय आहेत या योजना जाणून घेऊ:

🎯 भाग्यश्री योजनेमधून ५० हजार

एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांना माझी कन्या भाग्यश्री योजनेतून महिला बालकल्याण विभागामार्फत ५० हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाºया पालकांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जाणार आहे. हा निधी मुलींच्या नावाने भविष्यासाठी गुंतविला जाणार आहे.

💫 मातृत्व वंदन योजनेतून सहा कोटी

केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेतून गरोदर मातांना पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यातील २० हजार गरोदर मातांना आतापर्यंत सहा कोटी रूपयांचा निधी आरोग्य विभागाने तीन हप्त्यात वितरित केला आहे. यासोबत अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी जननी सुरक्षा योजनेतून ७०० रूपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. याकरिता गरोदर मातांना अंगणवाडीत नोंदणी करणे आवश्यक आहे.

💊 लसीकरण, कॅल्शिअमच्या गोळ्या, आहारात कडधान्य

गरोदर मातांना अंगणवाडीमधून तीन महिन्यांपासून ते बाळंतपणापर्यंत आणि बाळ जन्माला आल्यानंतर सहा महिन्यापर्यंत सकस आहार पुरविला जाणार आहे. याकरिता अंगणवाडी केंद्रांना गहू, मसूर, मूगडाळ, चवळी, मटकी, मूग, हळद, मीठ, मिरची आणि तेलाचे वितरण करण्यात येणार आहे. यासोबत टी.टी. लस आणि कॅल्शिअम गोळ्या देणे, तसेच बाळाचे लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण मिळणार

LetsUp । Update

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा.

💁‍♂ याचिका फेटाळली : वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच आरक्षण मिळणार आहे.

🧐 काय म्हणाले न्यायालय? : प्रवेश प्रक्रिया जरी आधी सुरु झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते, त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारला आहे.

📍 घटनाक्रम :
वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली.
प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी कायद्याला मंजुरी देण्यात आली.
एमबीबीएस व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एसईबीसी कायद्यानुसार मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणे बंधनकारक केले आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ यंदाच्या पावसाळ्यात भारनियमनाच्या त्रासापासून होणार सुटका

LetsUp । Update

😍 पावसाळय़ात कोळसा खाणींमध्ये पाणी शिरल्याने किंवा रेल्वे वाहतुकीला फटका बसल्यास त्याचा कोळसा पुरवठय़ावर परिणाम होऊन वीजनिर्मिती ठप्प होते. याची दखल घेत महानिर्मितीने यंदा पावसाळय़ापूर्वीच सर्वच औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा मुबलक साठा करून ठेवला आहे.

👍 काही विशेष :
महानिर्मितीकडे सध्या 11 लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे.
आजची विजेची मागणी पाहता या कोळशावर 15-20 दिवस वीजनिर्मिती करता येणार आहे.
पावसामुळे कोळसा पुरवठय़ाबाबत आणीबाणीची परिस्थिती आली तरी त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होणार नाही.

👀 कोळश्याचे पावसापासून संरक्षण : महानिर्मितीने स्टॉकमध्ये असलेला 11 लाख मेट्रिक टन कोळसा पावसात भिजू नये म्हणून ताडपत्रींच्या सहाय्याने झाकला आहे. तसेच सदर कोळसा कोल मिलपर्यंत नेण्यासाठी शेड उभारली आहे.

📍 उपलब्ध कोळसा :
कोराडी 2 लाख 13 हजार मेट्रिक टन
भुसावळ 1 लाख 85 हजार मेट्रिक टन
पारस 42 हजार मेट्रिक टन
खापरखेडा 1 लाख 34 हजार मेट्रिक टन
नाशिक 38 हजार मेट्रिक टन
चंद्रपूर 2 लाख 25 हजार मेट्रिक टन
परळी 2 लाख 39 हजार मेट्रिक टन

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्र सरकारची रस्त्यांवरील अपघात, दुर्घटना कमी करण्यासाठी 14 हजार कोटी रुपयांची योजना तयार

● यंदाच्या सुरुवातीच्या 5 महिन्यांत केंद्र आणि राज्यांच्या सुमारे 25 वेबसाइट हॅक : रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री

● 'फोर्ब्ज'च्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अक्षय कुमार एकमेव भारतीय

● संपत्ती जप्त करू नका, फरार मद्य उद्योजक विजय मल्ल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

● ग्रीन कार्डवरील 7 टक्के मर्यादा अमेरिकी प्रतिनिधीगृहाने हटविली, 3 लाख भारतीयांना होणार फायदा

● सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

● महाराष्ट्रातील 160 तालुक्यांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, शेतकरी खरिपाच्या पेरण्यांसाठी खोळंबले

● व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड होणार, 'क्विक एडिट मीडिया शॉर्टकट' नावाचे फीचर येणार

● वर्ल्डकप 2019 : उपांत्यफेरीच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून दणदणीत विजय

● बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी 'बाटला हाऊस' चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला धक्का; यंदा नवा जगज्जेता मिळणार!

LetsUp | #CWC 2019

यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 8 गड्यांनी धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत केला प्रवेश

💁‍♂ ऑस्ट्रेलियाला 223 धावांत गुंडाळून इंग्लंडने 32.1 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले

🏆 अवघ्या 20 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद करणार्‍या ख्रिस वोक्सची 'सामनावीर' म्हणून निवड करण्यात आली

आता इंग्लंड Vs न्यूझीलंड यांच्यात येत्या रविवारी लॉर्ड्सच्या मैदानात ऐतिहासिक अंतिम सामना रंगणार

📍 काही विशेष बाबी :

क्रिकेट जगताला यंदा नवा जगज्जेता मिळणार आहे. कारण न्यूझीलंड आणि इंग्लंड यांना आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही
तब्बल 27 वर्षांनंतर इंग्लंड वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दाखल
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच त्यांचा संघ सेमी फायनलमध्ये पराभूत झाला
भारताचा माजी कर्णधार धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथसुद्धा धावबाद झाला यामुळे सामना संघाच्या हातातून निसटला
इंग्लंडने हा विश्वचषक जिंकल्यास यजमान संघाने विश्वविजेता होण्याची ही सलग तिसरी वेळ असेल

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ आज आषाढी एकादशी; पाहू विठू माऊलीचा गजर करणारी गाणी!

LetsUp | Special

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवसांनंतर देव चार महिन्यांसाठी झोपी जातात असा विश्वास आहे. आज आषाढी एकादशी निमित्ताने जाणून घेऊयात आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी विषयी काही खास गोष्टी...

🧐 देवशयनी एकादशी असे नाव का पडले? :

आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी' असे म्हणतात.
यानंतर चार महिने, म्हणजेच आषाढाचे 20 दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस देव झोपी जातात.
या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला 'परिवर्तनी एकादशी' असे म्हणतात.
चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात.

🎬 विठू माऊलीचा गजर करणारी सिनेमातील काही गाणी :

1) माझा देव कुणी पहिला (अगं बाई अरेच्या 2) : http://bit.ly/2YOyJnl

2) वारी पंढरीची :
http://bit.ly/2XHTPHG

3) माउली माउली (लय भारी) : http://bit.ly/2xKC6zU

4) माझी पंढरीची माय (माउली) : http://bit.ly/30vdoje

5) रखुमाई (पोश्टर गर्ल) : http://bit.ly/30sUdXl

6) जय जय राम कृष्णा हरी (एक तारा) : http://bit.ly/2JvSQ4A

7) पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदूंग (नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे) : http://bit.ly/2XE9vvC

8) वार वार वारकरी (हरी ओम विठ्ठला) : http://bit.ly/30xZ8q5

9) बा विठ्ठला धाव पाव रे (हरी ओम विठ्ठला) : http://bit.ly/2XCMfOu

10) विठ्ठला विठ्ठला (विठ्ठल) : http://bit.ly/2NQICA6

11) हरी ओम विठ्ठला : http://bit.ly/2JD2OzX

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 जाणून घ्या भारतातील जंगलाविषयी

LetsUp | Education

भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे. भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून हि बाब समोर आली आहे.

भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.

📍 जंगलाचे प्रमाण व राज्ये असे :

1. आकारमानानुसार सर्वाधिक जंगल : भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.

2. क्षेत्रफळानुसार मोठे राज्य : क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.

3. सर्वात कमी जंगल असलेले राज्य : हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

👍 भारतातील प्रमुख जिवारण्ये :

1. निलगिरी : तामीळनाडू, कर्नाटक व केरळ राज्यांमिळून
2. नंदादेवी : उत्तराखंड
3. मानस : आसाम
4. सुंदरबन : पश्चिम बंगाल
5. मन्यार खाडी : तामीळनाडू
6. पंचमढी : मध्यप्रदेश
7. कच्छ : गुजरात
8. ग्रेट निकोबार : अंदमान व निकोबर

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 *कसा आहे Super 30?*

*LetsUp | Movie Review*

देशातील विख्यात गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर 30' चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या 30 मुलांना एकत्र आणून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आनंद कुमार यांनी घेतलेल्या कष्टांची आणि मेहनतीची कथा चित्रपट दाखवण्यात आलेली आहे.

-----------------
🎬 *'सुपर 30' पाहण्यासाठी आपले तिकीट बुक करा* : https://urlzs.com/RkaW2
-----------------

🧐 *कथा* : हृतिक (आनंद कुमार) बिहारमधील एका छोट्या गावातील गरीब कुटुंबामधील अतिशय हुशार मुलगा असतो. जो कॅम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असतो. परंतु हालाखीच्या परिस्थितीमुळे त्याला प्रवेश घेणे शक्य होत नाही. अशात हृतिकच्या वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडते.

यादरम्यान हृतिकला त्याच्या आधीच्या बॅचमधील टॉपर असणारा विद्यार्थी भेटतो. मग तो हृतिकची हुशारी लक्षात घेऊन आयआयटी कोचिंग क्लासेस सुरु करतो. यातून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारते. मात्र शिक्षणाचा होणार बाजार पाहून हृतिकला वडिलांनी दिलेल्या धड्याची आठवण होते. त्यानंतर पैशाच्या मागे धावणारा हृतिक महागडे आयआयटी कोचिंग क्लासेस घेणं बंद करतो.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांसाठी मोफत आयआयटी शिक्षण देण्यास तो सुरुवात करतो. यासाठी तो 30 मुलांच्या तुकडीची निवड करतो. ज्यांना तो ‘सुपर 30’ या नावाने संबोधतो. समाजातील श्रीमंत माणसांशी वैर पत्करुन, कठीण परिस्थितीला समोर जात हृतिकने ज्या 30 मुलांवर कठोर परिश्रम घेतले आहे ती मुले आयआयटीमध्ये प्रवेश मिळवतात की नाही, या प्रवासात त्याला काय-काय अडचणी येतात? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

हृतिकचा अभिनय वाखण्या जोगा आहे. या चित्रपटाला अजय-अतुल या जोडीने दिलेले संगीत ठीक-ठाक आहे. चित्रपटात आनंद कुमार यांच्या अफाट बुद्धिमत्तेची, सातत्याची, त्यागाची, कठोर मेहनतीची ही गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे यात शंकाच नाही.

एकंदरीत कथा, दिग्दर्शन, संकलन, अभिनय, संगीत आणि छायांकन या सर्वच बाबतीत हा चित्रपट भाव खाऊन जातो. हृतिकचे चाहते असाल तर वेगळं काही सांगायचा प्रश्नच नाही, बाकी तुमची मर्जी!

*Ratings* : 3.5/5

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● श्रीहरिकोटा : तांत्रिक समस्येमुळे 'चांद्रयान-2' चे आजचे प्रक्षेपण रद्द, नव्या तारखेची घोषणा लवकरच : इस्रो

● मार्च ते मे या कालावधीमध्ये देशभरातील डेबिट कार्डची संख्या तब्बल 10 कोटींनी घटली, क्रेडिट कार्डच्या संख्येत मात्र भर

● लवकरच दृष्टिहीनांना नोटा ओळखता याव्यात यासाठीचे मोबाईल अ‍ॅप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दाखल केले जाणार

● ‘एलआयसी’विरूद्ध याचिकेची सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी सुनावणी, पाच कोटी पॉलिसीधारकांच्या फसवणुकीचा आरोप

● छत्तीसगड : दंतेवाडामधील मडकामीरास जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार तर एकाला अटक

● 10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता : गिरीश महाजन

● फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलचे नवे Shoelace App; नेटवर्क नसतानाही वापरण्याची सोय

● विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय, अष्टपैलू बेन स्टोक्स ठरला विजयाचा शिल्पकार

● अत्यंत उत्कंठावर्धक लढतीत अखेर जोकोविचने फेडररला नमवत पाचवे विम्बल्डन जिंकले, तब्बल 4 तासांपेक्षा जास्त काळ रंगला सामना

● बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी 'सांड की आँख' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 टाय, सुपरओव्हर आणि इंग्लंडचा थरारक विजय

LetsUp | #CWC 2019

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरले

💁‍♂ न्यूझीलंडने दिलेल्या 242 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 50 षटकात 241 धावाच करू शकल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला

👉 सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 16 धावा हव्या असताना न्यूझीलंडचा संघ पंधराच धावा करु शकला, अखेरीस सर्वाधिक चौकार लगावल्याच्या निकषावर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले

👍 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला, तर न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

🧐 सुपरओव्हरचं थरारनाट्य :

2019 विश्वचषक स्पर्धेतली ही पहिली सुपरओव्हर ठरली आहे. तसेच विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत अंतिम सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

इंग्लंडने सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडसमोर 16 धावांचे आव्हान ठेवले.
पहिला चेंडू जोफ्रा आर्चरने वाईड टाकला. पुन्हा टाकलेल्या चेंडूवर जेम्स नीशामने 2 धावा घेतल्या.
दुसऱ्या चेंडूवर नीशामने षटकार लगावला.
तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर नीशामने 2-2 धावा काढल्या.
आता न्यूझीलंडला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावा लागत होत्या.
पाचव्या चेंडूवर नीशामने 1 धाव घेतली.
सहाव्या चेंडूवर मार्टिन गुप्टिल 1 धाव कडून धावचीत झाला आणि सामना पुन्हा टाय झाला.
मात्र सर्वाधिक चौकार मारण्याच्या निकषावर इंग्लंडचा संघ विजयी ठरला.

🏆 इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि गोलंदाज जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. स्टोक्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले

🧢 किवी कर्णधार विल्यमसनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला, त्याने स्पर्धेत 578 धावा केल्या

👀 विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा विश्वचषक यजमान देशाने पटकावला, याआधी भारत (2011) आणि ऑस्ट्रेलिया (2015) यांनी यजमान म्हणून विश्वविजेतेपद जिंकले होते

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ एसी आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम!

LetsUp | Health

हल्ली ऑफिस, घर, दुकानं या ठिकाणी एसीचा (Air Conditioner) सर्रास वापर पाहायला मिळतो. परंतु एसीचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेदेखील आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात...

1) सलग 10 ते12 तास एसीमध्ये राहिल्यामुळे घाम येत नाही. यामुळे हाडाशीसंबंधित समस्यांना नक्कीच आमंत्रण मिळते.

2) आपण रुम थंड व्हावी यासाठी एसीचं टेम्परेचर 16-17 वर ठेवत असतो. त्यामुळे एसीतून येणारी गार हवा आपल्या शरीरावर परिणाम करते.

3) रुम प्रचंड थंड झाल्यामुळे हाड कमकूवत होत असतात. त्यामुळे एसीचे टेम्परेचर कायम स्थिर ठेवावे. एकदा टेम्पेचर सेट केल्यानंतर ते सतत बदलू नये.

4) एसी लावल्यानंतर आपण अनेक वेळा दारं-खिडक्या बंद करतो. त्यामुळे घरात खेळणारी शुद्ध हवा थांबली जाते. परिणामी श्वसनासंबंधीच्या तक्रारीदेखील निर्माण होऊ शकतात.

5) विशेष म्हणजे शरीराला ताजी हवा न मिळाल्यामुळे शरीराची वाढ होण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

6) एसीमध्ये बसल्यामुळे शक्यतो घाम येत नाही. परिणामी हे द्रव्ये शरीरातच राहतात. त्यासोबतच सतत एसीमध्ये बसल्याने त्वचा कोरडी होते.

7) त्वचेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे शरीरावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. त्यासोबत अनेक आजारही उद्भवण्याची शक्यता असते.

8) जे लोक सतत एसीमध्ये असतात त्यांना एसीची सवय लागते व त्यांना त्वचे संबंधी समस्या होतात. जसे त्वचा शुष्क व डेड स्कीन सेल्स सारख्या समस्या होतात.

9) एसीचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या डोक्यावर होतो, ज्या मुळे जास्त डोकेदुखी होते. आपली डोके दुखीची समस्या वाढते.

10) एसीची थंड हवा आपल्या शरीरातील रक्ताला प्रभावित करते यामुळे हृदयाला आपले काम करायला अडथळे येतात. यामुळे हृदयाच्या समस्या वाढतात. म्हणून एसीमध्ये सतत राहू नये.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 वर्षातला सर्वात मोठा सेल आणि शेवटचा दिवस!

भरघोस डिस्काउंटची हि संधी सोडू नका!

📣 ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’चा Amazon Prime Day Sale म्हणजे मनसोक्त डिस्काउंट देणारा सेल...!

Home & Kitchen उपकरणे खरेदीवर 30 ते 75% डिस्काउंट
दैनंदिन आवश्यक गोष्टींवर 70% पर्यंत डिस्काउंट
अ‍ॅमेझॉन फॅशनवर 80% पर्यंत डिस्काउंट
टॉप Electronic Appliances वर 5000+ डील आणि No cost EMI उपलब्ध
जर तुम्ही HDFC Credit किंवा Debit Card User असाल तर 10% इन्स्टंट डिस्काउंट आणि उपलब्ध
50,000 पेक्षा कमी खरेदीवर 1,750* /- पर्यंत सूट
50,000 पेक्षा जास्तीच्या खरेदीवर 3,500* /- पर्यंत Flat सूट

👍 सेलमध्ये स्मार्टफोन, ऑडियो प्रॉडक्ट्स, टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रिक उपकरणांवर भरघोस डिस्काउंट

👉 त्वरा करा, ऑफरसह खरेदीसाठी क्लिक करा : https://amzn.to/2NWiGTI
LetsUp News Updates

● केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोटार वाहन सुधारणा विधेयक-2019 केले सादर

● चीनच्या आर्थिक विकास दराने दुसऱ्या तिमाहीत गेल्या सत्तावीस वर्षांतील नीचांक (6.2 टक्के) गाठला

● भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त

● राज्य सरकार शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत पुढील महिन्यात निर्णय घेणार

● दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान 14 ऑगस्टपर्यंत, 33 लाख कुटुंबांना शिधापत्रिका, 40 लाख गॅस कनेक्शन मिळणार

● डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

● ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

● आयशर ट्रॅक्टर्स कंपनीने बाजारात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर्स आणि अ‍ॅग्रिस्टार रोटोटिलर केले लाँच

● बीसीसीआय लवकरच मुख्य प्रशिक्षकांसह साहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवणार

● प्रेमातील चढउतार घेऊन राजश्री मराठीची 'यु टर्न' ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup