LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🤔 सेलमधून शॉपिंग करताय? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

LetsUp | Special

जुलै-ऑगस्ट हा काळ जसा पावसामुळे अल्हाददायी असतो तसेच विविध ठिकाणी असणारे कपड्यांचे सेल आणि विविध ऑफर्स यामुळे देखील चर्चेत असतो.

प्रत्येकालाच ब्रँडेड कपडे आवडतात. परंतु त्यांच्या किमती अवाक्याबाहेर असल्याने बऱ्याचदा अनेकांना मनाला मुरड घालावी लागते. परंतु, जुलै ऑगस्ट या काळात विविध ठिकाणी ब्रँडेड कपड्यांवर देखील ऑफर्स असतात आणि या सेलमधून कपडे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

🤷‍♀ खरेदीला कधी जाल? : सेल सुरु झाल्यावर एक प्रश्न असतो कि, नेमकं खरेदीला जावं कधी? तर सेलच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करणं फायदेशीर असतं कारण सेलचा स्टॉक नवा असतो आणि जर आठवड्याच्या सुट्ट्या सोडून शॉपिंग केली तर गर्दी देखील कमी असते. तुम्ही निवांत खरेदीचा आनंद लुटू शकता.

सेलच टायमिंग : कधी-कधी सेलमध्ये असणारे कपडे जुने असतात. त्यामुळे खरेदी करताना सेलमधील कपड्यांचं टायमिंग आणि ते कपडे सध्या ट्रेंड मध्ये आहेत कि नाही? याची खात्री करून घ्यावी. खरेदी करायची म्हणून करू नये.

🧐 सेलमध्ये असणारे ब्रॅण्ड्स : पेन्टालून्स, झारा, एलेन सोली, लेविस आणि अजूनही इतर ब्रॅण्ड्स अ‍ॅण्ड ऑफ सीजन सेलमध्ये आकर्षक ऑफर्स देऊन ग्राहकांना खरेदीची ओढ लावतात. आपल्या आवडीच्या ब्रॅण्ड्सवर 80% पर्यंत सूट मिळत असल्यावर कोणाला खरेदीचा मोह आवरेल?

🤔 साईजचा घोळ होत नाही : आपण सहसा ऑनलाईन शॉपिंग करत असतो ज्यामुळे आपल्याला खरेदीचा आनंद बाहेर जाऊन लुटता येत नाही. मात्र सेल हि संधी आपल्याला देतो.

बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग मुळे होतं असं कि, आपली साईज असते एक आणि कपडे येतात भलत्याच साईजचे. मग रिटर्न पॉलिसीचे नुसार जे मिळेल त्यात समाधान मानावे लागते आणि त्यात वेळ वाया जातो तो वेगळाच. सेलमध्ये मात्र आपल्याला हवे ते कपडे ट्राय करून पाहता येतात त्यामुळे साईजचे घोळ होत नाही.

👉 बार्गेनची संधी : सेलमध्ये असणाऱ्या किंमती या फायनल किंमती असतात असा आपला समज असतो. मात्र खरं तर त्या किंमती खरोखर वाजवी आहेत का? हे पडताळून पाहणे आपल्या अधिकाराच्या अखत्यारीत आहे.

👀 डोळे उघडे ठेऊन शॉपिंग करा : कपड्यांचा पोत, प्रकार आणि ते किती काळ टिकू शकतात? याचा विचार करणे गरजेचे असते. कपड्यांचे उत्पादन कधी झाले त्याची तारीख जरूर पहा. तसेच कपडे डॅमेज झालेले तर नाहीत ना याची पडताळणी करूनच खरेदी करा.

🤨 ब्रँडची खात्री करून घ्या : सेल आहे म्हणलं कि, आपण शॉपिंग करतो आणि मग फायनल बिल करताना आपल्या लक्षात येतं कि आपण खरेदी केलेल्या कपड्यांच्या ब्रँडवर सेलच नाही आहे. असं होऊ नये असं वाटत असेल तर आधीच सेल कोणत्या ब्रँडवर आहे याची खात्री करून घ्या.

रिटर्न पॉलिसी जाणून घ्या : प्रत्येक मॉलमध्ये रिटर्न पॉलिसी वेगवेगळी असते. त्याचा अभ्यास आधीच केला तर नंतर होणार मानसिक ताण कमी होऊ शकतो.

कधीकधी घेतलेले कपडे किंवा वस्तू नाही आवडल्या तर त्या जागी रिटर्नमध्ये दुसरी वस्तू त्याच कॅटेगरीमधून घ्यावी लागते तर कधी-कधी त्या रकमेतून तुम्ही इतर कोणतीही वस्तू तेवढ्या किंमतीची असेल तर खरेदी करू शकता. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शॉपिंग करणे फायदेशीर ठरते.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारत-आफ्रिकेचा विजय; सेमीफायनलमध्ये आमने-सामने कोण?

LetsUp | #CWC 2019

भारताकडून ‘लंकादहन’

विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय

💁‍♂ 265 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल (111) आणि रोहित शर्मा (103) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 39 चेंडू राखून जिंकला सामना

दक्षिण आफ्रिकेचा ‘शेवट गोड’

विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला

💁‍♂ अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आफ्रिकेच्या 325 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 315 धावांमध्ये आटोपला

📣 भारत-आफ्रिकेच्या विजयाने उपांत्य फेरीचे बदलले गणित खालीलप्रमाणे :

1) भारत Vs न्यूझीलंड भिडणार

🎯 ठिकाण : अमिरात ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर. I दिनांक व वेळ : मंगळवारी 9 जुलै रोजी दु. 3 वाजता

2) ऑस्ट्रेलिया Vs इंग्लंड लढणार

🎯 ठिकाण : एजबस्टन, बर्मिंगहॅम. I दिनांक व वेळ : गुरुवारी 11 जुलै रोजी दु. 3 वाजता

💫 सेमी फायनलमधील विजेत्यांचा अंतिम सामना लॉर्ड्सवर रविवार 14 जुलैला रंगणार आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
साप्ताहिक राशीभविष्य; 7 ते 13 जुलै 2019

LetsUp | Astrology

मेष : या आठवड्यात धार्मिक स्थळांना भेटी द्याल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल.

वृषभ : प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल.

मिथुन : आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्या वक्तृत्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल

कर्क : आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.

सिंह : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे.

कन्या : नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. नवीन परिचय होतील.

तूळ : सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

वृश्चिक : धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करत बसू नका.

धनु : दुसऱ्यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत.

मकर : व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे.

कुंभ : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. नाविन्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.

मीन : आपल्या मतांचा आदर केला जाईल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. शुभकार्याचे आयोजन केले जाईल.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧢 धोनी, 'माही' आणि बरंच काही!

LetsUp | Birthday Special

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 38 वा वाढदिवस. वयाच्या 23 व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवणं असो किंवा वर्ल्ड कप जिंकून देणं असो प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी कामगिरी धोनीने वारंवार करत क्रिकेटरसिकांवर आपली विलक्षण छाप पाडली. आज त्याच्या कारकिर्दीतील काही विशेष कामगिरीवर नजर टाकुयात...

1) आयसीसीच्या सर्व मालिका जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने 2007मध्ये टी-20, 2011मध्ये वनडे वर्ल्ड कप तर 2013मध्ये आयसीसी चॅम्पियन्स टॉफी जिंकली होती.

2) 2007मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता. टी-20 प्रकारात सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचा विक्रम आहे. त्याने 72 पैकी 41 सामन्यात विजय मिळवला आहे.

3) धोनी हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याने भारतीय संघाला 27 कसोटी, 110 वनडे आणि 41 टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.

4) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2009मध्ये प्रथमच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.

5) धोनीने केवळ 42 सामन्यात आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान काढले होते. आयसीसी क्रमवारीत इतक्या वेगाने अव्वल स्थान गाठणारा धोनी हा सर्वात वेगवान क्रिकेटपटू ठरला आहे.

6) धोनीने अनेक वेळा षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. वनडेत धोनीने 9 वेळा षटकार मारून विजय मिळवून दिला असून हा देखील एक विक्रम आहे. अशी कामगिरी करणारा धोनी एकमेव खेळाडू आहे.

7) वनडेत विकेटकिपर म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने वनडेत नाबाद 183 धावांची खेळी केली आहे.

8) 2015मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत 3-0 असे पराभूत केले होते. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या 140 वर्षाच्या इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर एखाद्या संघाने क्लीन स्वीप केले होते.

9) धोनीने आतापर्यंत 348 सामने खेळले आहेत. या सामन्यातून त्याने 228 षटकार मारले आहे. वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही विकेटकिपरला अशी कामगिरी करता आलेली नाही.

10) 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीने षटकार मारत 28 वर्षानंतर भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. ज्या बॅटने धोनीने षटकार मारला होता त्याचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात बॅटची किमत एक लाख पाऊंड इतकी मिळाली.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

11) दुसऱ्यांदा फलंदाजीकरत आतापर्यंत चार वेळा विश्वचषक जिंकला आहे. यातील 2011मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 274 धावा करत मिळवलेला विजय हा सर्वोच्च आहे. यात धोनी असा एकमेवर फलंदाज आहे ज्याने षटकार मारत विजेतेपद मिळवले आहे.

12) विकेटकिपर असून देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 22 षटके टाकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध एक बोल्ड देखील घेतली आहे.

13) धोनीने अनेक वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवून दिला आहे. वनडे मध्ये धोनी 78 वेळा नाबाद राहिला आहे. हा देखील हा एक विक्रम आहे.

14) सातव्या क्रमांकावर फलंदाजीकरत सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने 33 सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत 2 शतके केली आहेत. यामध्ये नाबाद 139 ही सर्वोच्च खेळी आहे.

15) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्प करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने कसोटीत 38, वनडेत 122 आणि टी-20मध्ये 33 विकेट घेतल्या आहेत.

16) भारताचा सर्वात यशस्वी विकेटकिपर अशी धोनीची ओळख आहे. धोनीने कसोटीत 294 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय वनडेत 394 आणि टी-20त 87 विकेट घेतल्या आहेत. कसोटीमध्ये विकेटकिपर म्हणून कसोटीत द्विशतक करणारा धोनी एकमेव खेळाडू आहे.

17) धोनीने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत अशी कामगिरी केवळ 14 खेळाडूंना करता आली आहे. पण 50हून अधिकच्या सरासरीने 10 हजार धावा करणारा धोनी हा पहिला खेळाडू आहे. अशी कामगिरी विराट कोहलीने देखील केली आहे.

18) धोनीने आयपीएलमध्ये 104 सामने जिंकले आहेत. त्याच्या विजयाची टक्केवारी 60 टक्के इतकी आहे. या स्पर्धेत 100हून अधिक सामने जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

19) धोनीला चौकार आणि षटकारांचा राजा या नावाने ओळखले जाते. त्याने एकदिवसीय सामन्यात 825, कसोटीत 544 आणि टी-20मध्ये 116 चौकार लगावले आहेत. षटकारांबद्दल म्हणायचे झाल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये 228 षटकार तर,
कसोटीत 78 आणि टी-20मध्ये 52 षटकार लगावले आहेत.

20) धोनीने भारतीय संघाचे 10 वर्ष नेतृत्व केले आहे. 2007मध्ये टी-20च्या विजेतेपदापासून सुरु झालेला धोनीचा प्रवास 2017मध्ये संपला. कर्णधार म्हणून धोनीने भारतीय संघाचे 332 सामन्यात नेतृत्व केले. यात 60 कसोटी, 200 वनडे आणि 72 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.
LetsUp News Updates

● लष्कराच्या ताफ्यात नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा समावेश, अंधारातही उडवता येणार शत्रूचा रणगाडा

● देशात 6 महिन्यांतच 60 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती, मागील वर्षी 100 वाघांचा झाला होता मृत्यू

● दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार

● विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला राज्यभरातील रिक्षाचालकांचा नियोजित संप अखेर मागे

● माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांना 31 जुलैपर्यंत घाटात पर्यटनबंदी, दुर्घटनांच्या अनुषंगाने निर्णय

● बेस्ट बसचे किमान भाडे आजपासून फक्त 5 रुपये; भाडेकपातीच्या प्रस्तावास राज्य शासनाची मान्यता

● डीएसकेंच्या पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या 350 कोटींच्या आणखी 25 मालमत्ता जप्त

● आता चोरीला गेलेले मोबाईल फोन पुन्हा वापरणे शक्य होणार नाही; देशात सुरु होणार नवी यंत्रणा

● विश्वचषक सेमीफायनलमध्ये आज भारत-न्यूझीलंड भिडणार, लढतीत पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता

● बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट साहोमधील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 आज भारत Vs न्यूझीलंड भिडणार

LetsUp | #CWC 2019

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना आज (दि.9) भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये रंगणार

💁‍♂ भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा सामना रंगणार

🧢 या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले तरी न्यूझीलंडला कमी लेखणे भारताला महागात पडू शकेल

----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : https://urlzs.com/zorLC
----------------------

😇 नाणेफेकीचा कौल महत्वाचा? :

विश्वचषकात यंदा नाणेफेकीचा कौल अत्यंत निर्णायक ठरला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक विजय नोंदवण्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
आत्तापर्यंत 42 सामने झाले असून त्यात 14 सामन्यांत लक्ष्य गाठताना संघ जिंकले, तर 27 सामन्यांत संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत.
2007 च्या विश्वचषकात प्रथम फलंदाजी आणि निर्धारीत लक्ष्य गाठणाऱ्या संघांची आकडेवारी ही सारखीच म्हणजे 25-25 अशी होती. 2011 मध्ये ती 24-23 अशी तर 2015 ती 24-24 अशी होती.

👀 आज कुणाला संधी? :

लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचे स्थान निश्चित आहे.
आता उर्वरित चार स्थानांसाठी संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. सातव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकचे स्थान कायम ठेवायचे की केदार जाधवला पुन्हा संघात स्थान घ्यायचे.
रवींद्र जडेजाचे स्थान कायम ठेवून चहल, कुलदीप पैकी एकाची निवड करायची का?.
3 प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचे की भुवी, शमी पैकी एकाला विश्रांती द्यायची? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

🤔 पाऊस आला तर काय? :

या लढतीवर पावसाचे सावट असून आज पावसामुळे खेळ झाला नाही तर उद्या बुधवारचा दिवस त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
मात्र बुधवारीही खेळ झाला नाही तर भारत व न्यूझीलंड यांनी साखळी गटात केलेल्या कामगिरीचा निकष लावला जाईल. त्यानुसार गुणांच्या आधारे भारतास अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

🧐 आमने-सामने इतिहास :

वनडे 106 I भारत : 55 विजय I न्यूझीलंड : 45 विजय I टाय : 1 I अनिकाली : 5
वर्ल्डकप 8 I न्यूझीलंड : 4 विजय I भारत : 3 विजय I अनिकाली : 1

🎯 स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर. I वेळ : दुपारी 3 पासून.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ Letsup I General Knowledge

1) ‘FIFA महिला फुटबॉल विश्वचषक 2019’ या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन संघात झाला? कुणी मारली बाजी?

उत्तर: अमेरिका Vs नेदरलँड I अमेरिका (चौथ्यांदा)

2) पोलंडमध्ये कुटनो अ‍ॅथलेटिक्स मिट 2019 या स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?

उत्तर : हिमा दास (200 मीटर 23.65 सेकंदात पूर्ण)

3) कोणत्या भारतीय राज्यात तिसरी आंतरराष्ट्रीय सूर्यफूल बियाणे आणि तेल परिषद 2019 (ISSOC) आयोजित केली जाणार आहे?

उत्तर : मुंबई (महाराष्ट्र) I 19 ते 20 जुलै 2019 दरम्यान

4) वर्तमान (17 व्या) लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : ओम बिर्ला

5) भारताच्या साहाय्याने युद्धग्रस्त लोकांसाठीचा गृहनिर्माण प्रकल्पाचा भाग म्हणून कोणत्या देशाने त्याच्या पहिल्या मॉडेल गावाचे उद्घाटन केले?

उत्तर : श्रीलंका ('रानीदुगमा')

6) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा पार करण्याचा विक्रम करणारा जगातला दुसरा सर्वात वेगवान खेळाडू ठरणारा भारतीय कोण?

उत्तर : जसप्रित बुमराह (57 सामन्यांमध्ये 100 बळी)

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 प्रतीक्षा संपली! 'सेक्रेड गेम्स 2'चा ट्रेलर प्रदर्शित

LetsUp | Entertainment

बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

25 दिवसांत काय होणार? त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कहाणी आहे. यामध्ये काय होणार हे पाहणे हा प्रेक्षकांच्या औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

👀 ट्रेलर पहा : http://bit.ly/2G33zRL

🎬 ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित :

अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट 'साहो'मधील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून प्रभास आणि श्रद्धा यांच्या भन्नाट केमिस्ट्री दिसतेय.

ध्वनी भानूशालीने हे गाणे गायले असून तनिष्क बागचीने हे गाणे लिहिले आहे आणि या गाण्याला संगीतही दिले आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.14 ऑग्सट रोजी साहो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

👀 गाणं पहा : http://bit.ly/2YQD2yN

🎬 ‘बाबा’ चा टीझर नक्की पहा! :

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजय दत्तची पहिली निर्मिती असलेला ‘बाबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट संजयने त्याच्या वडीलांना सुनील दत्त यांना समर्पित केला असून या चित्रपटाची निर्मिती संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स अंतर्गत करण्यात येत आहे.

👀 टीझर पहा : http://bit.ly/2Jp2oOV

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 नवोदय विद्यालय समितीमध्ये 2,370 जागांसाठी मेगा भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :

असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) : 05
पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B) : 430
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (ग्रुप-B) :1154
विविध श्रेणी शिक्षक (ग्रुप-B) : 564
स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) : 55
लीगल असिस्टंट (ग्रुप-C) : 01
केटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) : 26
निम्नश्रेणी लिपिक (ग्रुप-C) : 135

----------------------
📍 नोंदणी करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, लाखो संधी एकाच ठिकाणी सादर आहे तुमच्यासाठी, 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------

📍 लेखी परीक्षा/CBT : 05 ते 10 सप्टेंबर 2019

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 9 ऑगस्ट 2019

🗞 अधिक माहिती व जाहिरात पाहण्यासाठी : http://bit.ly/32a67Y1

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👌 विजेसंदर्भात नवं धोरण तयार; विजेची सबसिडी आता बँक खात्यात

LetsUp | National

📍 केंद्र सरकारकडून विजेसंदर्भात नवं धोरण तयार, यामुळे वीजचोरी रोखण्यास मदत मिळणार

📝 नव्या धोरणात काय-काय? :

केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाकडून सदर धोरण तयार
या नव्या धोरणाची ऑगस्ट महिन्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार
यातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार
ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार

🧐 अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही :

वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या ग्राहकांकडून वीजपुरवठ्या अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाहीत
ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशनदरम्यान वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रक्रियेलाही ग्राहकांच्या खात्याशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता केवळ पुरवठा केलेल्या विजेचेच पैसे वसूल करता येणार

👍 एका क्लिकवर घरातील वीज बंद! :

आता आपल्याला बाहेर राहूनही अ‍ॅपच्या माध्यमातून घरातील वीज बंद करता येणार
या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरीवर लक्ष ठेवता येणार
या मीटरमुळे कंपनीचा मीटर रिडिंग घेण्याचा व बिले वाटण्याचा खर्च वाचणार
विजेचे ऑडिट करता येईल. तसेच मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

● सीबीआयची देशभरात 110 ठिकाणी छापेमारी, 30 गुन्ह्यांची नोंद; आठवडाभरातील दुसरी मोठी कारवाई

● भारत-पाकिस्तान सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण 43 टक्क्यांनी घटले, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची लोकसभेत माहिती

● खासगी क्षेत्रात नोकरीमध्ये राज्यातील तरुणांना तब्बल 70 टक्के आरक्षण, मध्यप्रदेश सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय

● छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक नक्षलवादी ठार तर अनेक जण जखमी

● आमदार नितेश राणेंना चिखलफेक चांगलीच अंगलट, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

● पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सीबीआय कोर्टात साक्ष

● ह्युंदाईची पहिली इलेक्ट्रिक कार कोना लॉन्च, किंमत 25.30 लाख रुपये, हि कार एकदा चार्ज केली की 452 किमी धावणार

● वनप्लस 7 या स्मार्टफोनची 'मिरर ब्ल्यू' ही नवीन आवृत्ती अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार

● बीसीसीआयकडून राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड, आयसीसीने दिली माहिती

● अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● स्विस बँकांतील भारतीयांच्या गुंतवणुकीचा लवकरच उलगडा, माहितीच्या देवाण-घेवाणीचा टप्पा पूर्ण

● देशात उपचारांवरील खर्चामुळे दरवर्षी 3.08 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जातात : मनसुखलाल मांडविया, केंद्रीय मंत्री

● जवानांसाठी लागणाऱ्या बुलेट प्रुफ जॅकेटसाठीचा कच्चा माल चीनमधून आयात : राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री

● हज यात्रेकरूंना एअर इंडियाचा दिलासा; पाच किलोपर्यंत झम झम पवित्र जल सामानात आणण्याची परवानगी

● गोवा सरकार विवाह नोंदणीआधी एचआयव्ही चाचणी करणे सक्तीचे करणार : विश्वजित राणे, आरोग्यमंत्री

● भारताने अमेरिकन वस्तूंवर लावलेला कर खपवून घेणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

● सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होणार, पहिली परीक्षा 12 जुलैला

● अत्याधुनिक फीचर्स असलेली Renault ची नवी Duster नऊ विविध व्हेरिअंट्समध्ये भारतात लाँच, किंमत 7.99 लाख रुपये

● पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-न्यूझीलंडमधील उर्वरित सामना आज बुधवारी होणार, न्यूझीलंडच्या 46.1 षटकात 5 बाद 211 धावा

● अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची गोड केमिस्ट्री दाखविणाऱ्या गर्लफ्रेंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारत-न्यूझीलंड उर्वरित सामना आज; पुन्हा पाऊस आल्यावर काय पर्याय?

LetsUp | #CWC 2019

विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला आहे

💁‍♂ उपांत्य सामन्यासाठी एक दिवस पर्यायी असल्याने आज (दि.10) हा सामना जिथे थांबला तिथून पुढे सुरू होणार

🧢 पावसामुळे सामना उशीरा सुरु झाल्यास भारतासमोर असे असेल आव्हान :

46 ओव्हरमध्ये 237
40 ओव्हरमध्ये 223
35 ओव्हरमध्ये 209
30 ओव्हरमध्ये 192
25 ओव्हरमध्ये 172
20 ओव्हरमध्ये 148

🧐 राखीव दिवशी सामना रद्द झाला तर? :

राखीव दिवशीही सामना न झाल्यास दोन्ही संघापैकी गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजयी घोषित केले जाते. म्हणजेच भारत थेट फायनलमध्ये जाणार
आज पुन्हा पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागणार

🤔 फायलन रद्द झाल्यास काय? :

सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो
पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 तंत्रज्ञान क्षेत्रात कुठं काय?

LetsUp | Tech

👍 व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबूकवर शेअर करा

📍 आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप स्टेटससोबत आणखी एक अन्य फिचर जोडले जाणार

या फिचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबुकसह अन्य अ‍ॅपवरही शेअर करू शकणार
व्हॉट्सअ‍ॅपचे हे फिचर सध्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हेरिएंटवर उपलब्ध आहे
मात्र व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबुकवर शेअर करण्यासाठी तुम्हाला कमीत-कमी फेसबुक किंवा फेसबुक लाईट अ‍ॅप आपल्या फोनवर डाऊनलोड करणे गरजेचे असणार

📱 OnePlus 7 चं नवं व्हेरिअंट लाँच :

📣 वनप्लस कंपनीने आता 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेले वनप्लस 7 चे नवीन व्हेरिअंट ‘मिरर ब्ल्यू कलर’मध्येही उपलब्ध करण्याची केली घोषणा

15 जुलै रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान हे नवं व्हेरिअंट विक्रीसाठी उपलब्ध केलं जाणार
अ‍ॅमेझॉन तसेच वनप्लसच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल
वनप्लस 7 च्या मिरर ब्ल्यू व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये आहे
अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 1,750 रुपये कॅशबॅक मिळणार
8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 37 हजार 999 रुपये आहे

💁‍♂ सोनीचा कॉम्पॅक्ट कॅमेरा लॉन्च :

सोनी कंपनीने आपला बहुचर्चीत ठरलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा रेंजची लेटेस्ट एडीशन Sony RX0 II नावाने भारतीय बाजारात केला लॉन्च

साधारण 132 ग्रॅम वजनाचा हा कॅमेरा सोना RX0 कॅमेऱ्याचे अपग्रेड व्हर्जन आहे
याचे डायमेंशन केवळ 59mm x 40.5mm x 35mm इतके आहे
फिचर्स : स्क्रीन - 180 डिग्री. वॉटरप्रफ (IPX8). डस्टप्रूफ (IP6X). शॉकप्रूफ आणि क्रशप्रूफ (200 किलो पर्यंतचा दाब सहन करण्याची क्षमता.)
सोनी RX0 II ची किंमत 57,990 रुपए आहे. याची व्रिकी 15 जुलै पासून सुरु होणार
सोनी सेंटर, अल्फा फ्लॅगशिप, सोनी ऑथोराइज्ड डीलर आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स स्टोरमध्ये तुम्हाला हा कॅमेरा मिळू शकतो

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ जाणून घ्या ‘डकवर्थ-लुइस’ बद्दल सर्व काही!

LetsUp | Special

विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि पुन्हा ‘डकवर्थ-लुइस’ प्रणाली बद्दलची चर्चा सुरु झाली आहे. नेमका हा नियम काय आहे? याचे जनक कोण? याबद्दल आज जाणून घेऊयात...

फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन गणितज्ञांनी क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास आकडेमोडीसंदर्भात काय तडजोड करता येईल? यासंदर्भात काढलेला गणितीय तोडगा म्हणजे डकवर्थ-लुईस प्रणाली होय.

1997 साली झिम्बाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. तेव्हापासून आयसीसीने ही प्रणाली वनडे आणि टी-20 सामन्यांदरम्यान पाऊस झाल्यास वापरण्यास सुरुवात केली.

🧐 ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ केव्हा वापरली जाते? : जेव्हा क्रिकेट सामन्यादरम्यान पाऊस येतो. अशावेळी नियोजित वेळेत खेळ पूर्ण करण्याच्या उद्देशाने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी विशिष्ट षटकांमध्ये धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य ठेवले जाते. यावेळी त्यांनी नक्की किती धावा कराव्यात यासाठी ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रणाली वापरली जाते.

🤔 डवर्थ-लुईस-स्टर्न प्रणालीचे जनक :

स्टीफन स्टर्न हे क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठात सांख्यिकी प्राध्यापक व संगणक प्रणाली तज्ज्ञ म्हणून काम करायचे.
ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर त्यांना क्रिकेटची गोडी लागली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये उडणारा गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी डकवर्थ-लुईस पद्धतीच्या अभ्यासाला सुरुवात केली.
त्यानंतर स्टर्न यांनी 2014 मध्ये डकवर्थ-लुईस पद्धतीची आकडेमोड अधिक सुरळीत व्हावी यासाठी काही बदल सुचवले.
स्टर्न यांनी केलेल्या संशोधनानुसार अल्गोरिदमच्या माध्यमातून डकवर्थ-लुईस पद्धतीमधील आकडेमोड अधिक सोप्या पद्धतीने करत सुधारित लक्ष्य ठेवण्या संदर्भातील नियम तयार केले.
अखेर त्यांनी 2014 साली या प्रणालीमधील बदल आयसीसीला सुचवले. त्या बदलांना आयसीसीने मान्यता दिली.
स्टर्न यांचे योगदान लक्षात घेऊन 2015 च्या विश्वचषकापासून ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ या सुधारित नावाने ही प्रणाली अंगीकारण्यात आली आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💅 नखांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

LetsUp | Tips & Tricks

आपल्या आरोग्याबद्दल आपण म्हणावं तितकं जागरूक नसतो. आपल्या दैनंदिन कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की, स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच मिळत नाही.

आपली नखं आपल्या आरोग्याविषयी बरंच काही सांगतात. म्हणुन आपल्या नखांची काळजी घेणं आणि त्यांना स्वच्छ करणं खुप आवश्यक आहे. म्हणून नखांना स्वस्थ आणि स्वच्छ ठेवण्याचे काही उपाय खास तुमच्यासाठी...

🥗 आपला आहार नखांच्या संरचनेत मुख्य भुमिका निभावतो. तुम्हाला तुमच्या आहारात सर्व पोषकतत्वांचा समावेश करायला हवा. ज्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, आणि झिंक असायला हवे.

🥚 यासोबतच तुमच्या आहारात दुध, अंडी, भुईमुगाच्या शेंगा, बदाम असे पदार्थ असावेत. तसच तुमच्या आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश देखील असावा.

🥄 1 चमचा फूड जिलेटिन घ्या. त्याला उकळत्या पाण्यात टाका. आता त्याला थंड होउ द्या आणि आपल्याकरता फळांचा ज्युस बनवतांना त्यात उपयोगात आणा. असे आपण एक आठवडा देखील करू शकता. असे केल्याने तुमच्या नखांची संरचना योग्य होईल.

👉 आपल्या नखांना गरम ऑलिव्ह तेलात बुडवा. असे 10 दिवस रोज किमान एक वेळेला तरी करा. यामुळे तुमची नखं स्वस्थ आणि स्वच्छ राहातील.

🍋 आपल्या नखांवर रोज लिंबाची साल किंवा लिंबाच्या रसाने मालिश करा आणि काही वेळानंतर धुवुन टाका, यामुळे नखांवर असलेले डाग निघुन नखं स्वच्छ आणि स्वस्थ होतील.

👍 नखांवर त्वचा मउ ठेवणारी क्रिम किंवा व्हॅसलीनने मसाज करा. असे केल्याने नखांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होईल आणि नखं एकदम फ्रेश दिसतील.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ या राज्यात लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट करणे बंधनकारक होणार

LetsUp । Update

देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न.

🗣 काय म्हणाले आरोग्यमंत्री? : गोवाच्या नागरिकांना भविष्यामध्ये लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली आहे.

👍 एचआयव्ही तपासणी बंधनकारक करण्याचे विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.

💉 टेस्ट बंधनकारक का? :

गोव्यात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात.
देहव्यापाराचे प्रमाणही या राज्यात अधिक आहे.
त्यामुळे एड्सचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
याचाच विचार करून लग्नाआधी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

📍 हि तपासणीही करावी लागणार : एचआयव्हीसोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणेही बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😱 धक्कादायक! राज्यात वर्षभरात साडेसोळा हजार बालमृत्यू

LetsUp । Update

आरोग्य विभागाने 2018-19 मधील आकडेवारी केली जाहीर

💁‍♂ राज्यात गेल्या वर्षभरात 16 हजारांहून अधिक बालमृत्यू झाले. एकीकडे बालमृत्यूचा दर कमी होत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असतानाच हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

👀 या भागांमध्ये बाल मृत्युदर अधिक : प्रामुख्याने आदिवासी जिल्ह्यंमध्ये बालमृत्यू व अर्भकमृत्यूचे प्रमाण मोठे असून सक्षम आरोग्य यंत्रणेच्या अभावी बालमृत्यू वाढत असल्याचे ग्रामीण क्षेत्रातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

🤔 का होतात मृत्यू? : बहुतेक मृत्यू हे जंतुसंसर्ग,न्युमोनिया तसेच जन्मता वजन कमी असल्यामुळे आणि श्वासारोधामुळे होतात. तसेच आरोग्य विभागातील हजारो रिक्त पदांमुळे तसेच पुरेसे बालरोग तज्ज्ञ उपलब्ध होत नसल्यामुळे बालमृत्यू दर वाढतो आहे.

📊 राज्यातील काही आकडेवारी (2018-19)
नंदुरबार - 426
अमरावती - 309
गडचिरोली - 61

📍 आरोग्य विभागाची माहिती :
👉 राज्यात वर्षांकाठी 15 लाख बालकांचा जन्म होतो.
👉 त्यापैकी सुमारे 8 लाख बालकांचा जन्म हा आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये होतो.
👉 2014 मध्ये दरहजारी बालमृत्यूचे प्रमाण हे 22 एवढे होते ते कमी होऊन 19 वर आले आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 भारतीय धावपटू द्युती चंदला सुवर्णपदक

LetsUp । Sport

भारताची धावपटू द्युती चंदने इटलीमध्ये सुरु असलेल्या, 30 व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

🥇 द्युती चंदने 100 मीटर शर्यतीत ही कमाल करून दाखवली आहे.

🏃‍♀ द्युतीने 100 मीटर अंतर 11.32 सेकंदात पार करत सुवर्णझेप घेतली आहे.

💁‍♂ यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

📍 शिवाय या जागतिक स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती चंद पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎞 मनोरंजन विश्वातील काही खास घडामोडी

LetsUp | Entertainment

💃 गोविंदा-करिश्माच्या हिट गाण्यावर वरुण-सारा धरणार ठेका!

जुनी गाणी आणि त्यांची जादू याबाबत नेहमीच बोलले जाते. आजही काही गाजलेली गाणी त्यांच्या धून वर ठेका धरायला लावतात. आजकाल तर जुनी गाणी रिक्रीएट करून ती नव्या चित्रपटांमध्ये वापरली जातात.

💁‍♀ गोविंदा आणि करिश्माने ‘कूली नं १’ या चित्रपटात एका गाण्यावर नृत्य केलं आणि ते गाणं खूप गाजलं देखील. ते गाणं म्हणजे ‘मैं तो रस्‍ते से जा रहा था’.

👀 ‘कूली नं १’ चित्रपटातील ‘मैं तो रस्‍ते से जा रहा था’ या गाण्याला रिक्रिएट करण्यात येणार आहे. या गाण्याचे नविन व्हर्जन तनिष्क बागचीने संगीतबद्ध केले आहे. हे गाणे तेव्हा कुमार सानू आणि अल्का याग्निक यांनी गायिले होते.

😃 या गाण्यामध्ये सारा आणि वरुण एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान ‘कूली नं १’ चित्रपटातील मुळ गाण्यात कोणताही बदल करणार नसल्याचा खुलासा डेविड धवनने केला आहे. चित्रपटात मात्र काळानुसार काही प्रमाणात बदल पाहायला मिळतील.

----------------

🧐 ‘कबीर सिंग’ हिट, शाहिद ची ब्रँड व्हॅल्यू झाली तीस कोटी

👉 शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला हा चित्रपट देशासह विदेशातही गाजत आहे.

💫 या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २३५. ७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.या चित्रपटाची कथा आणि शाहिदचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.

💰 चित्रपटाच्या यशानंतर शाहिदकडे काही चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. मात्र आता त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. त्यामुळे त्याने त्याच्या पुढील चित्रपटासाठी ३० कोटींची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.

-----------------

📺 डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

💁‍♂ ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी घराघरांत स्थान मिळवले. त्यानंतर आता नवी मालिका ‘स्वराज्यजननी जिजामाता’ येत्या १९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.

🎥 ‘ही जगदंब क्रिएशनची दुसरी निर्मिती आहे. स्वराज्यरक्षक संभाजीनंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे. शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली, आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाई मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं सोनी मराठीच्या माध्यमातून शक्य होत आहे. ही आनंदाची आणि जबाबदारीची बाब आहे! ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाची हुंकार असेल,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup