LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🏏 इंग्लंड उपांत्य फेरीत; आज अफगाणिस्तान-वेस्ट इंडिज सामना

LetsUp | #CWC 2019

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडच्या संघाचा 119 धावांनी उडवला धुव्वा

👉 या विजयाने पाकिस्तानचे विश्वचषकातले उरलेसुरले आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे

💁‍♂ इंग्लंडने दिलेल्या 306 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 186 धावांमध्ये आटोपला

🏆 सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 106 धावांची खेळी केली, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

अफगाणिस्तान Vs वेस्ट इंडिज

🧢 उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेले अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज आज प्रतिष्ठा राखण्यासाठी झुंजणार

👉 अफगाणिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय नोंदवण्यासाठी लढणार, दुसरीकडे वेस्ट इंडिज शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल

👍 ख्रिस गेलचा अखेरचा विश्वचषक : कारकीर्दीतील चौथा विश्वचषक खेळणाऱ्या ख्रिस गेलचा हा विश्वचषकातील शेवटचा सामना असून, अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो उत्सुक असेल. गेलने (39 वर्षीय) आत्तापर्यंत विश्वचषकाच्या 8 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 235 धावा केल्या आहेत.

🧐 आमने-सामने : एकदिवसीय : 5 I अफगाणिस्तान : 3 I वेस्ट इंडिज : 1 I टाय : 0 I रद्द :1

🎯 स्थळ : हेडिंग्ले, लीड्स. I दुपारी 3 पासून.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 तुम्हाला हे माहिती आहे का?

LetsUp | Do you know

1) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याची सामान्य वेळ 90 मिनट असते.

2) स्केटिंग खेळण्या जाणाऱ्या परिसराला रिंक म्हटले जाते.

3) कबड्डी आणि बुद्धिबळ खेळाचा जन्म भारतात झाला आहे.

4) वॉटर पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 7 असते.

5) पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 4 असते.

6) बेसबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 9 असते.

7) व्हॉलीबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 6 असते.

8) बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 5 असते.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏆 केवळ अर्धा ग्राम सोन्यात साकारली वर्ल्डकपची प्रतिकृती

LetsUp । Special

वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर बंगळूरच्या सोनाराने बनवली सोन्याची ट्रॉफी

📍 बंगळुरूमधील सोनार नागराज रेवणकर यांनी चक्क 1.5 सेंटीमीटरची वर्ल्डकपची सोन्याची ट्रॉफी साकारली आहे. हा चषक एवढा छोटा आहे की, अगदी बोटाच्या तळभागावर बसू शकतो. याचे वजन 0.49 ग्रॅम एवढे आहे.

💁‍♂ सोशलवर चर्चा : सोन्यात साकारण्यात आलेली ट्रॉफीची चिमुकली प्रतिकृती सोशलवर चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांची ही कलाकृती बघण्यासाठी त्यांच्या दुकानात लोक गर्दी करत आहेत.

😍 टीम इंडियाला शुभेच्छा : नागराज म्हणाले कि, टीम इंडियाच्या गुडलक साठी ही ट्रॉफी साकारावी असे मनात आले. टीम इंडियाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळावा यासाठी ही ट्रॉफी लोकांसमोर सादर केली.

👍 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर

LetsUp । Update

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आर्थिक पाहणी अहवाल राज्यसभेत सादर.

💁‍♂ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा सर्वेक्षण अहवाल सादर केला. यामध्ये 2019-20 या आर्थिक वर्षातील जीडीपी दर 7 टक्के राहील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आर्थिक विकास दर अधिक आहे.

📍 अहवाल :
खासगी गुंतवणूक वाढून जीडीपी दरात वाढ होण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती कमी होऊ शकते.
निर्यातीवरील विकास दर कमी राहण्याची शक्यता

📊 जीडीपी दर : 2018-2019 या आर्थिक वर्षात विकास दर 6.8 टक्के होता. त्याआधी 2017-18 मध्ये विकास दर 7.2 टक्के होता.

📉 निवडणुकांमुळे विकासदरात घट : देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीतील निकालाच्या अनिश्चिततेमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील विकास दरावर परिणाम झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या तिमाहीत विकास दर केवळ 5.8 टक्के होता.

👍 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (शुक्रवारी) लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार, 'अर्थसंकल्पा'कडे सर्वांचे लक्ष

● जागतिक बँकेकडून धरणांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी राज्याला तब्बल 940 कोटी रुपयांचा निधी मिळणार

● गेल्या 3 वर्षांत सीबीआयच्या 36 अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले, सरकारकडून राज्यसभेत माहिती

● पाकिस्तान तणावामुळे भारतीय विमान कंपन्यांना 550 कोटींचा फटका, एअर इंडियाचे सर्वाधिक 491 कोटींचे नुकसान

● कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित खटल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालय येत्या 17 जुलै रोजी निर्णय देणार

● दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयला आवश्यक ते सहकार्य करत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

● उपअभियंत्यावरील चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक, जवळपास 40 जणांवर गुन्हा दाखल

● फलक बसवण्याचे काम सुरु असल्यामुळे दि. 9 जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 2 तास बंद राहणार

● देवेंद्र फडणवीसांनी नोंदविला नवा विक्रम, 1972नंतर पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे ठरले एकमेव मुख्यमंत्री

● वेस्ट इंडिजची आफगाणिस्तानवर 23 धावांनी मात, 77 धावांची खेळी करणारा शे होप ठरला सामनावीर

● अभिनेत्री तेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, 'अग्गंबाई सासूबाई' या आगामी मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 विंडीजचा शेवट गोड; आज पाकिस्तान-बांगलादेश लढत

LetsUp | #CWC 2019

वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करत विश्वचषक मोहिमेचा शेवट गोड केला

👉 विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा यंदाच्या विश्वचषकातला 9 सामन्यांमधला सलग नववा पराभव ठरला

💁‍♂ विंडीजने दिलेल्या 312 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 288 धावांपर्यंत मजल मारता आली

🏆 शे होपने 92 चेंडूत 77 धावांची खेळी केली, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

पाकिस्तान Vs बांगलादेश

🧢 वनडे वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तानची साखळी फेरीतील अखेरची लढत बांगलादेशशी होणार

👀 उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला काय करावे लागेल? :

पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी लागेल
पाकिस्तान जर नाणेफेक हरला आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी घेतली तरी त्यांचे आव्हान तिथेच संपेल
पाकिस्तानने जर 350 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशला 311 धावांनी पराभूत करावे लागेल
पाकिस्तानने 400 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशचा 316 धावांनी पराभव करावा लागेल
पाकिस्तानने 450 धावा केल्यास त्यांना बांग्लादेशचा 321 धावांनी पराभव करावा लागेल
पाकिस्तानचा संघ जर 300 धावांच्या आता बाद झाला तर त्यांचे आव्हान तिथेच संपेल

🧐 आमने-सामने इतिहास :

एकदिवसीय : 36 I पाकिस्तान : 31 I बांगलादेश : 5, टाय/ रद्द : 0
विश्वचषकात : 1 I पाकिस्तान : 0, बांगलादेश : 1, टाय / रद्द : 0

🎯 स्थळ : लॉर्ड्स, लंडन. I वेळ : दु. 3 पासून.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ आता जिओची 'डिजीटल उडान' मोहीम

LetsUp | Tech

📍 इंटरनेट साक्षरतेला गती देण्यासाठी रिलायन्स जिओची फेसबुकच्या सहकार्याने 'डिजीटल उडान' या नावाने नवीन मोहीम सुरू

याच्या अंतर्गत युजरला प्रत्येक शनिवारी इंटरनेट वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार
यात युजर्सना जिओ फोनचे फिचर्स, वेगवेगळे अ‍ॅप्स, फेसबुकचा वापर आणि इंटरनेट सुरक्षा याबद्दल माहिती दिली जाणार
युजर्सना ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमातून 10 भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार, लवकरच यात अन्य भाषांचा समावेश होणार
ही ऑफलाईन मोहीम असून सध्या 13 देशांमध्ये 200 गावांमध्ये उपलब्ध आहे
येत्या काही महिन्यांमध्ये याला तब्बल 7 हजार ठिकाणी लाँच केले जाणार आहे

🗣 100% डिजिटल साक्षरतेसाठी देशातील प्रत्येक शहरात आणि गावात ही मोहिम घेऊन जाण्याचा संकल्प : आकाश अंबानी, रिलायन्स जिओ संचालक

👍 इंस्टाग्राम स्टोरीमधूनच ग्रुप चॅट शक्य

📣 इंस्टाग्रामने आणले नवे स्टिकर, याद्वारे आपल्याला एखाद्या ठराविक स्टोरीवर चर्चा करण्यासाठी ग्रुप चॅट सुरू करता येणार

💫 फॉलोअर्सपैकी स्टोरी पाहणाऱ्याने जर त्या स्टिकरवर टॅप केले तर त्यांना एका प्रायव्हेट चॅटमध्ये अ‍ॅड केले जाईल. अर्थात मूळ स्टोरी जोडणाऱ्याना त्यावर नियंत्रण देण्यात आलेले आहेच

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 अर्थसंकल्प आणि इतिहास

LetsUp | Special

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्या वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसा अर्थसंकल्पाला एक मोठा इतिहास आहे. म्हणून आज आपण पहिल्यांदा अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? कोणी आणि कशाप्रकारे सादर केला? अशा अनेक गोष्टी जाणून घेऊ...

1) जेम्स विल्सन यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिला अर्थसंकल्प 18 फेब्रुवारी 1869 मध्ये सादर करण्यात आला. जेम्स इंडियन काऊन्सिलचे (स्वातंत्र्यपूर्व) वित्तीय सदस्य होते.

2) देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉन मथाई (दुसरे अर्थमंत्री) यांनी 1949-50 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात प्रथमच योजना आयोग आणि पंचवार्षिक योजनांचा उल्लेख करण्यात आला होता.

3) सी. डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी असताना 1951-52 चा अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता. असे करणारे ते एकमात्र ‘रिझर्व्ह बँक गव्हर्नर’ होते.

4) अर्थसंकल्पात विदेशी संबंधांबाबत चर्चा अथवा उल्लेख करण्यात येत नाही. परंतु, सुरुवातीच्या अर्थसंकल्पात, विदेश संबंधावरदेखील प्रकाशझोत टाकला जात असे.

📍 काही विशेष बाबी :

1) देशाच्या पहिला महिला पंतप्रधान आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत.

2) अर्थ संकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली. यंदा सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या.

3) 'या' टीमनं तयार केलं 'बजेट' : मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ति सुब्रमण्यम, महसूल सचिव अजय भूषण पांडेय, वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग, निर्गुंतवणूक सचिव अतानु चक्रवर्ती, खर्चविषयक सचिव गिरीश चंद्र मुर्मू, वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 अर्थसंकल्प सादर; सेन्सेक्समध्ये घसरण (भाग-1)

LetsUp । Budget Special

📍 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प केला सादर

🤔 अर्थसंकल्पात काय-काय तरतुदी? :

याच वर्षी भारत 3 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल
2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य
59 मिनिटात छोट्या दुकानदारांना कर्ज देणारी योजना
सरकारी बँकांना 70 हजार कोटी देण्याचे जाहीर
1, 2, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी येणार
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण, सेन्सेक्सने 40,000चा आकडा गाठला होता.
केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे थेट करांमध्ये गेल्या दोन वर्षांत 78 टक्क्यांपर्यंत वाढ
3 कोटी उद्योजकांना पेन्शन दिले जाणार
2014-2019 या काळात देशातला अन्न सुरक्षेवरचा खर्च दुप्पट केला
जीएसटी नोंदणीकृत लघु-मध्यम उद्योगांना 2 टक्के व्याजदराने भांडवल देणार
4 वर्षांत गंगा नदीवर कार्गो यायला लागतील; जलवाहतुकीवर मोदी सरकारचा भर
विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता
विविध क्षेत्रातली परकिय गुंतवणूक वाढवणार
ग्रामीण उद्योगांमध्ये विविधता आणणार
पशुपालन उद्योगासाठी विशेष योजना 70000 नवे व्यावसायिक घडवण्यासाठी प्रयत्न
प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 1,25,000 किमीचे रस्ते तयार करणार
नोंदणीकृत कंपन्यांनधील जनभागिदारी वाढवणार
स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनचं स्वतंत्र चॅनेल सुरू करणार
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सूट देणार
सामाजिक संस्थांसाठी नवा शेअर बाजार सुरू करणार
रेल्वेत आदर्श भाडे योजना लागू करणार
रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 50 हजार कोटी
गंगा नदीत परिवहन वाढवण्यावर भर
रेल्वेत पीपीपी मॉडेलवर भर देणार
देशात 2022 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधणार, प्रत्येक घराला वीज, गॅस, शौचालय देणार
2024 पर्यंत हर घर जल केंद्राचं जल मिशन
पिण्यायोग्य पाणी सगळ्यांना मिळावं हे सरकारचं प्राधान्य, जलशक्ती मंत्रालयाची स्थापना पाण्याच्या स्रोतांचा वापर, व्यवस्थापन करणार
ग्रामसडक योजनेसाठी 80 हजार कोटींची तरतूद
अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार; त्यांना 180 दिवस वाट बघावी लागणार नाही
35 कोटी एलईडी बल्बचं वाटप
18,341 कोटींच्या विजेची बचत
रोबो आणि विशेष मशिन्ससाठी बँका अर्थसहाय्य करणार
2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त होणार
मागील वर्षभरात 1 लाख कोटींनी एनपीए कमी झाला

👍 यंदा ब्रीफकेस परंपरेला छेद : अर्थ संकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली. यंदा सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या. तर यावेळस अर्थसंकल्पाला 'बही खाता' असे नाव देण्यात आले आहे.

👌 दुसऱ्या महिला अर्थमंत्री : भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या निर्मला सीतारामण या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. याआधी 49 वर्षापूर्वी म्हणजेच 28 फेब्रुवारी 1970 रोजी केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● आता 50 हजारांवर रोख व्यवहारांसाठी पॅनऐवजी आधार क्रमांकही वापरता येणार, केंद्राकडून बँका व इतर संस्थांना सिस्टिम्स अपग्रेड करण्याची सूचना

● सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हार्मेंट या संस्थेच्या अहवालानुसार, वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे भारतीयांचे आयुष्य दोन वर्षे सहा महिन्यांनी घटले

● गडचिरोली भुसुरुंग स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) घेतला हाती, 15 पोलीस झाले होते शहीद

● 'जय श्री राम'असा जयघोष ही प. बंगालच्या संस्कृतीचा भाग नाही, नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचे मत

● तिवरे धरण फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पथकाची स्थापना, दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश

● मुंबईतील अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई, पहिल्या टप्यात पालिकेच्या 23 ठिकाणच्या वाहनतळ परिसरात कारवाई होणार

● विधानसभेला अडीच कोटी मतांचे लक्ष्य ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आवाहन

● व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फिचरच्या माध्यमातून आता कोणताही शेअर करण्यात आलेला मेसेज हा नक्की किती जणांनी फॉरवर्ड केलाय हे समजणार

● श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय, शतकवीर रोहित शर्मा ठरला सामनावीर; सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडशी टक्कर

● शाहरुख खानच्या 'बार्ड ऑफ ब्लड'मधून अभिनेता इमरान हाशमी वेबवर्ल्डमध्ये एन्ट्री करणार, येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 सेलमधून शॉपिंग करताय? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

LetsUp | Special

जुलै-ऑगस्ट हा काळ जसा पावसामुळे अल्हाददायी असतो तसेच विविध ठिकाणी असणारे कपड्यांचे सेल आणि विविध ऑफर्स यामुळे देखील चर्चेत असतो.

प्रत्येकालाच ब्रँडेड कपडे आवडतात. परंतु त्यांच्या किमती अवाक्याबाहेर असल्याने बऱ्याचदा अनेकांना मनाला मुरड घालावी लागते. परंतु, जुलै ऑगस्ट या काळात विविध ठिकाणी ब्रँडेड कपड्यांवर देखील ऑफर्स असतात आणि या सेलमधून कपडे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

🤷‍♀ खरेदीला कधी जाल? : सेल सुरु झाल्यावर एक प्रश्न असतो कि, नेमकं खरेदीला जावं कधी? तर सेलच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करणं फायदेशीर असतं कारण सेलचा स्टॉक नवा असतो आणि जर आठवड्याच्या सुट्ट्या सोडून शॉपिंग केली तर गर्दी देखील कमी असते. तुम्ही निवांत खरेदीचा आनंद लुटू शकता.

सेलच टायमिंग : कधी-कधी सेलमध्ये असणारे कपडे जुने असतात. त्यामुळे खरेदी करताना सेलमधील कपड्यांचं टायमिंग आणि ते कपडे सध्या ट्रेंड मध्ये आहेत कि नाही? याची खात्री करून घ्यावी. खरेदी करायची म्हणून करू नये.

🧐 सेलमध्ये असणारे ब्रॅण्ड्स : पेन्टालून्स, झारा, एलेन सोली, लेविस आणि अजूनही इतर ब्रॅण्ड्स अ‍ॅण्ड ऑफ सीजन सेलमध्ये आकर्षक ऑफर्स देऊन ग्राहकांना खरेदीची ओढ लावतात. आपल्या आवडीच्या ब्रॅण्ड्सवर 80% पर्यंत सूट मिळत असल्यावर कोणाला खरेदीचा मोह आवरेल?

🤔 साईजचा घोळ होत नाही : आपण सहसा ऑनलाईन शॉपिंग करत असतो ज्यामुळे आपल्याला खरेदीचा आनंद बाहेर जाऊन लुटता येत नाही. मात्र सेल हि संधी आपल्याला देतो.

बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग मुळे होतं असं कि, आपली साईज असते एक आणि कपडे येतात भलत्याच साईजचे. मग रिटर्न पॉलिसीचे नुसार जे मिळेल त्यात समाधान मानावे लागते आणि त्यात वेळ वाया जातो तो वेगळाच. सेलमध्ये मात्र आपल्याला हवे ते कपडे ट्राय करून पाहता येतात त्यामुळे साईजचे घोळ होत नाही.

👉 बार्गेनची संधी : सेलमध्ये असणाऱ्या किंमती या फायनल किंमती असतात असा आपला समज असतो. मात्र खरं तर त्या किंमती खरोखर वाजवी आहेत का? हे पडताळून पाहणे आपल्या अधिकाराच्या अखत्यारीत आहे.

👀 डोळे उघडे ठेऊन शॉपिंग करा : कपड्यांचा पोत, प्रकार आणि ते किती काळ टिकू शकतात? याचा विचार करणे गरजेचे असते. कपड्यांचे उत्पादन कधी झाले त्याची तारीख जरूर पहा. तसेच कपडे डॅमेज झालेले तर नाहीत ना याची पडताळणी करूनच खरेदी करा.

🤨 ब्रँडची खात्री करून घ्या : सेल आहे म्हणलं कि, आपण शॉपिंग करतो आणि मग फायनल बिल करताना आपल्या लक्षात येतं कि आपण खरेदी केलेल्या कपड्यांच्या ब्रँडवर सेलच नाही आहे. असं होऊ नये असं वाटत असेल तर आधीच सेल कोणत्या ब्रँडवर आहे याची खात्री करून घ्या.

रिटर्न पॉलिसी जाणून घ्या : प्रत्येक मॉलमध्ये रिटर्न पॉलिसी वेगवेगळी असते. त्याचा अभ्यास आधीच केला तर नंतर होणार मानसिक ताण कमी होऊ शकतो.

कधीकधी घेतलेले कपडे किंवा वस्तू नाही आवडल्या तर त्या जागी रिटर्नमध्ये दुसरी वस्तू त्याच कॅटेगरीमधून घ्यावी लागते तर कधी-कधी त्या रकमेतून तुम्ही इतर कोणतीही वस्तू तेवढ्या किंमतीची असेल तर खरेदी करू शकता. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शॉपिंग करणे फायदेशीर ठरते.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारत-आफ्रिकेचा विजय; सेमीफायनलमध्ये आमने-सामने कोण?

LetsUp | #CWC 2019

भारताकडून ‘लंकादहन’

विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय

💁‍♂ 265 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल (111) आणि रोहित शर्मा (103) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 39 चेंडू राखून जिंकला सामना

दक्षिण आफ्रिकेचा ‘शेवट गोड’

विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला

💁‍♂ अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आफ्रिकेच्या 325 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 315 धावांमध्ये आटोपला

📣 भारत-आफ्रिकेच्या विजयाने उपांत्य फेरीचे बदलले गणित खालीलप्रमाणे :

1) भारत Vs न्यूझीलंड भिडणार

🎯 ठिकाण : अमिरात ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर. I दिनांक व वेळ : मंगळवारी 9 जुलै रोजी दु. 3 वाजता

2) ऑस्ट्रेलिया Vs इंग्लंड लढणार

🎯 ठिकाण : एजबस्टन, बर्मिंगहॅम. I दिनांक व वेळ : गुरुवारी 11 जुलै रोजी दु. 3 वाजता

💫 सेमी फायनलमधील विजेत्यांचा अंतिम सामना लॉर्ड्सवर रविवार 14 जुलैला रंगणार आहे

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
साप्ताहिक राशीभविष्य; 7 ते 13 जुलै 2019

LetsUp | Astrology

मेष : या आठवड्यात धार्मिक स्थळांना भेटी द्याल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल.

वृषभ : प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल.

मिथुन : आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्या वक्तृत्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल

कर्क : आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.

सिंह : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे.

कन्या : नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. नवीन परिचय होतील.

तूळ : सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

वृश्चिक : धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करत बसू नका.

धनु : दुसऱ्यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत.

मकर : व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे.

कुंभ : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. नाविन्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.

मीन : आपल्या मतांचा आदर केला जाईल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. शुभकार्याचे आयोजन केले जाईल.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧢 धोनी, 'माही' आणि बरंच काही!

LetsUp | Birthday Special

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 38 वा वाढदिवस. वयाच्या 23 व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवणं असो किंवा वर्ल्ड कप जिंकून देणं असो प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी कामगिरी धोनीने वारंवार करत क्रिकेटरसिकांवर आपली विलक्षण छाप पाडली. आज त्याच्या कारकिर्दीतील काही विशेष कामगिरीवर नजर टाकुयात...

1) आयसीसीच्या सर्व मालिका जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने 2007मध्ये टी-20, 2011मध्ये वनडे वर्ल्ड कप तर 2013मध्ये आयसीसी चॅम्पियन्स टॉफी जिंकली होती.

2) 2007मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता. टी-20 प्रकारात सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचा विक्रम आहे. त्याने 72 पैकी 41 सामन्यात विजय मिळवला आहे.

3) धोनी हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याने भारतीय संघाला 27 कसोटी, 110 वनडे आणि 41 टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.

4) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2009मध्ये प्रथमच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.

5) धोनीने केवळ 42 सामन्यात आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान काढले होते. आयसीसी क्रमवारीत इतक्या वेगाने अव्वल स्थान गाठणारा धोनी हा सर्वात वेगवान क्रिकेटपटू ठरला आहे.

6) धोनीने अनेक वेळा षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. वनडेत धोनीने 9 वेळा षटकार मारून विजय मिळवून दिला असून हा देखील एक विक्रम आहे. अशी कामगिरी करणारा धोनी एकमेव खेळाडू आहे.

7) वनडेत विकेटकिपर म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने वनडेत नाबाद 183 धावांची खेळी केली आहे.

8) 2015मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत 3-0 असे पराभूत केले होते. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या 140 वर्षाच्या इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर एखाद्या संघाने क्लीन स्वीप केले होते.

9) धोनीने आतापर्यंत 348 सामने खेळले आहेत. या सामन्यातून त्याने 228 षटकार मारले आहे. वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही विकेटकिपरला अशी कामगिरी करता आलेली नाही.

10) 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीने षटकार मारत 28 वर्षानंतर भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. ज्या बॅटने धोनीने षटकार मारला होता त्याचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात बॅटची किमत एक लाख पाऊंड इतकी मिळाली.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

11) दुसऱ्यांदा फलंदाजीकरत आतापर्यंत चार वेळा विश्वचषक जिंकला आहे. यातील 2011मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 274 धावा करत मिळवलेला विजय हा सर्वोच्च आहे. यात धोनी असा एकमेवर फलंदाज आहे ज्याने षटकार मारत विजेतेपद मिळवले आहे.

12) विकेटकिपर असून देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 22 षटके टाकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध एक बोल्ड देखील घेतली आहे.

13) धोनीने अनेक वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवून दिला आहे. वनडे मध्ये धोनी 78 वेळा नाबाद राहिला आहे. हा देखील हा एक विक्रम आहे.

14) सातव्या क्रमांकावर फलंदाजीकरत सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने 33 सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत 2 शतके केली आहेत. यामध्ये नाबाद 139 ही सर्वोच्च खेळी आहे.

15) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्प करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने कसोटीत 38, वनडेत 122 आणि टी-20मध्ये 33 विकेट घेतल्या आहेत.

16) भारताचा सर्वात यशस्वी विकेटकिपर अशी धोनीची ओळख आहे. धोनीने कसोटीत 294 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय वनडेत 394 आणि टी-20त 87 विकेट घेतल्या आहेत. कसोटीमध्ये विकेटकिपर म्हणून कसोटीत द्विशतक करणारा धोनी एकमेव खेळाडू आहे.

17) धोनीने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत अशी कामगिरी केवळ 14 खेळाडूंना करता आली आहे. पण 50हून अधिकच्या सरासरीने 10 हजार धावा करणारा धोनी हा पहिला खेळाडू आहे. अशी कामगिरी विराट कोहलीने देखील केली आहे.

18) धोनीने आयपीएलमध्ये 104 सामने जिंकले आहेत. त्याच्या विजयाची टक्केवारी 60 टक्के इतकी आहे. या स्पर्धेत 100हून अधिक सामने जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

19) धोनीला चौकार आणि षटकारांचा राजा या नावाने ओळखले जाते. त्याने एकदिवसीय सामन्यात 825, कसोटीत 544 आणि टी-20मध्ये 116 चौकार लगावले आहेत. षटकारांबद्दल म्हणायचे झाल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये 228 षटकार तर,
कसोटीत 78 आणि टी-20मध्ये 52 षटकार लगावले आहेत.

20) धोनीने भारतीय संघाचे 10 वर्ष नेतृत्व केले आहे. 2007मध्ये टी-20च्या विजेतेपदापासून सुरु झालेला धोनीचा प्रवास 2017मध्ये संपला. कर्णधार म्हणून धोनीने भारतीय संघाचे 332 सामन्यात नेतृत्व केले. यात 60 कसोटी, 200 वनडे आणि 72 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.
LetsUp News Updates

● लष्कराच्या ताफ्यात नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा समावेश, अंधारातही उडवता येणार शत्रूचा रणगाडा

● देशात 6 महिन्यांतच 60 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती, मागील वर्षी 100 वाघांचा झाला होता मृत्यू

● दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार

● विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला राज्यभरातील रिक्षाचालकांचा नियोजित संप अखेर मागे

● माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांना 31 जुलैपर्यंत घाटात पर्यटनबंदी, दुर्घटनांच्या अनुषंगाने निर्णय

● बेस्ट बसचे किमान भाडे आजपासून फक्त 5 रुपये; भाडेकपातीच्या प्रस्तावास राज्य शासनाची मान्यता

● डीएसकेंच्या पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या 350 कोटींच्या आणखी 25 मालमत्ता जप्त

● आता चोरीला गेलेले मोबाईल फोन पुन्हा वापरणे शक्य होणार नाही; देशात सुरु होणार नवी यंत्रणा

● विश्वचषक सेमीफायनलमध्ये आज भारत-न्यूझीलंड भिडणार, लढतीत पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता

● बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट साहोमधील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 आज भारत Vs न्यूझीलंड भिडणार

LetsUp | #CWC 2019

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना आज (दि.9) भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये रंगणार

💁‍♂ भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा सामना रंगणार

🧢 या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले तरी न्यूझीलंडला कमी लेखणे भारताला महागात पडू शकेल

----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : https://urlzs.com/zorLC
----------------------

😇 नाणेफेकीचा कौल महत्वाचा? :

विश्वचषकात यंदा नाणेफेकीचा कौल अत्यंत निर्णायक ठरला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक विजय नोंदवण्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
आत्तापर्यंत 42 सामने झाले असून त्यात 14 सामन्यांत लक्ष्य गाठताना संघ जिंकले, तर 27 सामन्यांत संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत.
2007 च्या विश्वचषकात प्रथम फलंदाजी आणि निर्धारीत लक्ष्य गाठणाऱ्या संघांची आकडेवारी ही सारखीच म्हणजे 25-25 अशी होती. 2011 मध्ये ती 24-23 अशी तर 2015 ती 24-24 अशी होती.

👀 आज कुणाला संधी? :

लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचे स्थान निश्चित आहे.
आता उर्वरित चार स्थानांसाठी संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. सातव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकचे स्थान कायम ठेवायचे की केदार जाधवला पुन्हा संघात स्थान घ्यायचे.
रवींद्र जडेजाचे स्थान कायम ठेवून चहल, कुलदीप पैकी एकाची निवड करायची का?.
3 प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचे की भुवी, शमी पैकी एकाला विश्रांती द्यायची? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

🤔 पाऊस आला तर काय? :

या लढतीवर पावसाचे सावट असून आज पावसामुळे खेळ झाला नाही तर उद्या बुधवारचा दिवस त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
मात्र बुधवारीही खेळ झाला नाही तर भारत व न्यूझीलंड यांनी साखळी गटात केलेल्या कामगिरीचा निकष लावला जाईल. त्यानुसार गुणांच्या आधारे भारतास अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

🧐 आमने-सामने इतिहास :

वनडे 106 I भारत : 55 विजय I न्यूझीलंड : 45 विजय I टाय : 1 I अनिकाली : 5
वर्ल्डकप 8 I न्यूझीलंड : 4 विजय I भारत : 3 विजय I अनिकाली : 1

🎯 स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर. I वेळ : दुपारी 3 पासून.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁‍♂ Letsup I General Knowledge

1) ‘FIFA महिला फुटबॉल विश्वचषक 2019’ या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन संघात झाला? कुणी मारली बाजी?

उत्तर: अमेरिका Vs नेदरलँड I अमेरिका (चौथ्यांदा)

2) पोलंडमध्ये कुटनो अ‍ॅथलेटिक्स मिट 2019 या स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?

उत्तर : हिमा दास (200 मीटर 23.65 सेकंदात पूर्ण)

3) कोणत्या भारतीय राज्यात तिसरी आंतरराष्ट्रीय सूर्यफूल बियाणे आणि तेल परिषद 2019 (ISSOC) आयोजित केली जाणार आहे?

उत्तर : मुंबई (महाराष्ट्र) I 19 ते 20 जुलै 2019 दरम्यान

4) वर्तमान (17 व्या) लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : ओम बिर्ला

5) भारताच्या साहाय्याने युद्धग्रस्त लोकांसाठीचा गृहनिर्माण प्रकल्पाचा भाग म्हणून कोणत्या देशाने त्याच्या पहिल्या मॉडेल गावाचे उद्घाटन केले?

उत्तर : श्रीलंका ('रानीदुगमा')

6) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा पार करण्याचा विक्रम करणारा जगातला दुसरा सर्वात वेगवान खेळाडू ठरणारा भारतीय कोण?

उत्तर : जसप्रित बुमराह (57 सामन्यांमध्ये 100 बळी)

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 प्रतीक्षा संपली! 'सेक्रेड गेम्स 2'चा ट्रेलर प्रदर्शित

LetsUp | Entertainment

बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

25 दिवसांत काय होणार? त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कहाणी आहे. यामध्ये काय होणार हे पाहणे हा प्रेक्षकांच्या औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

👀 ट्रेलर पहा : http://bit.ly/2G33zRL

🎬 ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित :

अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट 'साहो'मधील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून प्रभास आणि श्रद्धा यांच्या भन्नाट केमिस्ट्री दिसतेय.

ध्वनी भानूशालीने हे गाणे गायले असून तनिष्क बागचीने हे गाणे लिहिले आहे आणि या गाण्याला संगीतही दिले आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.14 ऑग्सट रोजी साहो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

👀 गाणं पहा : http://bit.ly/2YQD2yN

🎬 ‘बाबा’ चा टीझर नक्की पहा! :

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजय दत्तची पहिली निर्मिती असलेला ‘बाबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट संजयने त्याच्या वडीलांना सुनील दत्त यांना समर्पित केला असून या चित्रपटाची निर्मिती संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स अंतर्गत करण्यात येत आहे.

👀 टीझर पहा : http://bit.ly/2Jp2oOV

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 नवोदय विद्यालय समितीमध्ये 2,370 जागांसाठी मेगा भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :

असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) : 05
पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B) : 430
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (ग्रुप-B) :1154
विविध श्रेणी शिक्षक (ग्रुप-B) : 564
स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) : 55
लीगल असिस्टंट (ग्रुप-C) : 01
केटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) : 26
निम्नश्रेणी लिपिक (ग्रुप-C) : 135

----------------------
📍 नोंदणी करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, लाखो संधी एकाच ठिकाणी सादर आहे तुमच्यासाठी, 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------

📍 लेखी परीक्षा/CBT : 05 ते 10 सप्टेंबर 2019

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 9 ऑगस्ट 2019

🗞 अधिक माहिती व जाहिरात पाहण्यासाठी : http://bit.ly/32a67Y1

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👌 विजेसंदर्भात नवं धोरण तयार; विजेची सबसिडी आता बँक खात्यात

LetsUp | National

📍 केंद्र सरकारकडून विजेसंदर्भात नवं धोरण तयार, यामुळे वीजचोरी रोखण्यास मदत मिळणार

📝 नव्या धोरणात काय-काय? :

केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाकडून सदर धोरण तयार
या नव्या धोरणाची ऑगस्ट महिन्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार
यातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार
ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार

🧐 अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही :

वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या ग्राहकांकडून वीजपुरवठ्या अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाहीत
ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशनदरम्यान वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रक्रियेलाही ग्राहकांच्या खात्याशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता केवळ पुरवठा केलेल्या विजेचेच पैसे वसूल करता येणार

👍 एका क्लिकवर घरातील वीज बंद! :

आता आपल्याला बाहेर राहूनही अ‍ॅपच्या माध्यमातून घरातील वीज बंद करता येणार
या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरीवर लक्ष ठेवता येणार
या मीटरमुळे कंपनीचा मीटर रिडिंग घेण्याचा व बिले वाटण्याचा खर्च वाचणार
विजेचे ऑडिट करता येईल. तसेच मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup