LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂ जाणून घ्या स्विस बँकांतील निधीत भारत कितव्या क्रमांकावर?

LetsUp | Update

📍 स्विस नॅशनल बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, स्विस बँकांतील निधीत ब्रिटन पहिल्या तर भारत 74 व्या क्रमांकावर आहे.

👉 2018 मध्ये जगातून स्विस बँकांत ठेवण्यात आलेला निधी 99 लाख कोटींनी झाला कमी, ही घसरण 4 टक्के आहे.

🧐 भारतीय संस्था व व्यक्ती यांनी स्विस बँकात ठेवलेला निधी 6 टक्क्यांनी कमी होऊन 2018 मध्ये 6,757 कोटी रूपयांवर आला, गेल्या दोन दशकातील ही नीचांकी पातळी आहे.

💫 स्वित्झर्लंडमध्ये गुंतवण्यात आलेल्या एकूण सर्व देशांच्या पैशाचा विचार करता त्यात भारतीय व्यक्ती व संस्था यांचा पैसा केवळ 0.07 टक्के आहे.

🤔 कुणाचा क्रमांक कितवा? : ब्रिटन पहिल्या क्रमांकावर, तर पहिल्या दहात बहामाज, जर्मनी, लक्झेमबर्ग, केमन बेटे, सिंगापूर यांचाही समावेश आहे.

ब्रिक्स देशात रशियाचा क्रमांक विसावा असून चीन 22 वा, तर दक्षिण आफ्रिका 60 वा, ब्राझील 65 वा आहे. मॉरिशस (71), न्यूझीलंड (59), फिलिपिन्स (54), व्हेनेझुएला (53), सेचेलिस (52), थायलंड (39), कॅनडा (36), तुर्की (30), इस्रायल (28), सौदी अरेबिया (21), पनामा (18), जपान (16), इटली (15), ऑस्ट्रेलिया (13), संयुक्त अरब अमिरात (12), गर्नसे (11) या प्रमाणे क्रमवारी आहे.

भारताच्या शेजारील देश पाकिस्तान (82), बांगलादेश (89), नेपाळ (109), श्रीलंका (141), म्यानमार 187), भूतान (193) याप्रमाणे क्रमवारी आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👨‍⚕ आज राष्ट्रीय डॉक्टर दिन; 'ते' देव नव्हे पण देवासारखे नक्की!

LetsUp । Special

दरवर्षी 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि प्रतिथयश डॉ. बिधान चंद्रा रॉय यांच्या स्मृती प्रित्यर्थ 1 जुलै हा दिवस दरवर्षी भारतभर ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ म्हणून साजरा केला जातो.

👍 1991 पासून मेडिकल कौन्सिलच्या प्रयत्नाने डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा दिवस डॉक्टर दिन म्हणून घोषित झाला.

💁‍♂ डॉक्टरांवर हल्ले का वाढले? :

भारतातील 75 टक्के डॉक्टरांना कधी ना कधी हिंसेला सामोरे जावे लागते.
सर्वाधिक हिंसा, अतिदक्षता कक्ष, अपघात विभाग, आणि शस्त्रक्रियेनंतरचा वॉर्ड यामध्ये होतात.
रुग्णांच्या नातेवाईकांच्या डॉक्टरांकडून वाढलेल्या अपेक्षा यामागचे प्रमुख कारण आहे.
अपुऱ्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी डॉक्टरांना जबाबदार ठरविण्याची प्रवृत्ती.
आरोग्य सुविधांचा वाढलेला खर्च.
रुग्णांच्या नातेवाइकांवर कारवाई होणार नाही हा गैरसमज.
डॉक्टर आणि नातेवाईक यांच्यातील संवादाचा अभाव.
प्रदीर्घ चालणाऱ्या न्यायिक प्रक्रियेवर अविश्वास, झुंडशाही ही प्रमुख कारणे सांगता येतील.

🤝 डॉक्टर-रुग्णातील नातं महत्वाचं : हल्ली विविध कारणामुळे डॉक्‍टर-रुग्ण संवाद, डॉक्‍टर-रुग्ण नात्यातील विश्‍वास हरवत चालला आहे. बऱ्याचदा आपल्या रुग्णासोबत अघटित घडल्यावर प्रचंड राग येतो अन्‌ तो डॉक्‍टरांवर काढला जातो. जे चुकीचे आहे.

आज प्रत्येकजण व्यस्त आहे. लवकर ट्रीटमेंट व्हावी असे सर्वांना वाटणे साहजिक आहे. अशात डॉक्‍टर-रुग्ण संवाद दुतर्फा झाला पाहिजे. त्या संवादाच्या प्रतिसादाची दोन्ही बाजूने वाट पाहिली पाहिजे.

पूर्वी नातेवाइकांकडे वेळ होता. विश्‍वास होता. आता साशंकता निर्माण झाली आहे. लक्षात घ्या, डॉक्‍टर देव नाही. तो फक्त रिलीफ देऊन मार्गदर्शन देत उपचार करतो. हे समाजाने समजून घेण्याची गरज आहे.

🧐 लक्षात घ्या 'हि' बाजू : कोणत्याही प्रकारच्या रुग्णावर उपचार करताना सर्व खबरदारी घेऊनही डॉक्टरांची काहीही चूक नसताना अचानक गुंतागुंत होऊ शकते, अनपेक्षित असलेला त्रास उद्भवू शकतो आणि ते कोणाच्याच हातात नसते. पण असं काही अघटित झालं तर मात्र ‘बिचारा’ डॉक्टर, हॉस्पिटलची निर्जीव इमारत बळीचा बकरा ठरतात. तसं म्हटलं तर डॉक्टरची चूक होत नाही असंही नाही.

रुग्णावरील उपचारात हलगर्जीपणा होऊ शकतो, रुग्ण दगावू शकतो. अशा अकल्पित प्रसंगी योग्य उपचार मिळाले नाहीत असे वाटल्यास कोर्ट आहेत, मेडिकल काऊन्सिल आहे, कंझ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट आहे. त्यामध्ये तक्रार करता येते आणि डॉक्टर चुकले असतील तर त्यांना शिक्षाही देता येते. नुकसानभरपाई मिळू शकते. पण शिक्षा देण्याचा बडगा पेशंट किंवा गावगुंड-टग्यांनी, पुढाऱ्यांनी हातात घेणे निश्चितच कायदेशीर नाही.

👍 आपल्याला अहोरात्र सेवा देणाऱ्या, स्वतःच्या आरोग्याची चिंता न करता केवळ आपल्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या, देशातील तमाम डॉक्टरांना 'लेट्सअप'कडून डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा!

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 जीएसटी @ 2 वर्षे; वर्षभरातील एकूण जीएसटी कलेक्शन किती?

LetsUp | Special

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीस आज (दि.1) दोन वर्षे पूर्ण होत आहे. वस्तू व सेवा कर कायद्याची घोषणा 30 जून 2017 रोजी, तर अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून सुरू करण्यात आली होती.

जीएसटीमुळे भारतात एकच सामायिक बाजारपेठेचे तत्त्व अमलात आणताना आंतरराज्य व्यापारातील अडथळे दूर झाले होते. या पार्श्वभूमीवर आज आपण जीएसटी म्हणजे काय? गेल्या वर्षभरात एकूण जीएसटी कलेक्शन किती झाले? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 टीम इंडियाला झटका! विजय शंकर 'आऊट'; मयांक अग्रवाल 'इन'

LetsUp | Breaking

वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान टीम इंडियाला लागोपाठ तिसरा झटका, अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे संघाबाहेर

💁‍♂ बीसीसीआयने आयसीसीकडे शंकरच्या जागी मयांक अग्रवालला संधी देण्यासाठी केली औपचारिक विनंती

👍 मयांक अग्रवाल ओपनिंग फलंदाज असल्याने तो के एल राहुलची जागा घेऊ शकतो. तसेच ऋषभ पंत ऐवजी राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते

🤔 मयांक अग्रवाल कोण? :

कर्नाटककडून क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूने आत्तापर्यंत एकूण 75 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 48.71 च्या सरासरीने 3,605 धावा केल्या आहेत
मयांकने यंदाच्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👨‍🌾 आज कृषी दिन; आव्हाने आणि उपाय

LetsUp | Special

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.

समोर अनेक संकटं असली तरी बळीराजा वर्षभरातील सण उत्‍सव आणि विविध दिवस साजरे करत असतो. त्‍याचप्रमाणे आज संपूर्ण महाराष्‍ट्रात ‘कृषी दिन’ उत्साहात साजरा होत आहे.

सद्यस्‍थितीला दुष्काळ, अतिवृष्टी, वातावरणातील बदल, दिवसेंदिवस घटत चालेली पाणी पातळी आणि सरकाची शेतीविषयी असलेली आनास्‍था ही आजच्या शेतीपुढली मोठी आव्हाने आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात...

🧐 मोठी आव्हाने आणि उपाय :

शेतकऱ्यांसाठी सरकारने राबविलेल्‍या विविध योजना विशेष करून गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.
शेतकर्‍यांसाठी शेतीपुरक उद्योग आणि धोरणात्‍मक पातळीवर योजना राबिणेही महत्‍वाचे आहे.
शेतीच्या नेमक्या समस्या लक्षात घेऊन, काळानुसार त्यावर उत्तर शोधणे गरजेचे आहे.
शेतीच्या मालाला हमी भाव नसल्‍याने आजची शेती अडचणीत आहे. त्‍यामुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणेही गरजेचे आहे.
शेतकरी आणि ग्राहक यांमधील दलालांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक अशा प्रणालीचा मोठ्या प्रमाणात विस्तार व्हायला हवा.
मनुष्यबळ हा एक शेतकऱ्यासमोरील खूप मोठा प्रश्न आहे. त्यावर विचार होणे गरजेचे आहे.
शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, विस्तार यंत्रणा, अ‍ॅग्रिकल्चरल ग्रॅज्युएट्स आणि सरकार अशा सर्वांच्या विचारप्रक्रियेत बदल होणे गरजेचे आहे.
शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो. मात्र, दुधाला भाव मिळत नसल्‍याने दूध व्यवसायही तोट्यात आहे. त्याचाही विचार व्हायला हवा.

💫 अशात सरकारने दुरदृष्‍टी दाखवून शेतकरी विरोधी असलेले कायदे रद्द करून बळीराजाच्या विकासासाठी विविध धोरणात्‍मक योजना राबवायला हव्यात.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्र सरकार ग्रामीण भागातील स्वस्त वाहतूक सेवेसाठी बचत गट किंवा त्यांच्या सदस्यांना वाहनासाठी 6.50 लाख बिनव्याजी कर्ज देणार

● देशभरातील 18 शहरांमधील 50 ठिकाणी सीबीआयचे छापे, याप्रकरणी देशभरात 14 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत

● राज्यभरातील एकूण पाऊसबळींची संख्या 40वर, मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या नियोजनातील त्रुटी उघड

● पावसामुळे नागरिकांची होणारी गैरसोय रोखण्यासाठी उपाययोजना राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

● डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपींची हायकोर्टात जामिनासाठी धाव; 4 जुलैला होणार सुनावणी

● रत्नागिरी : चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; गावातील 10 ते 20 ग्रामस्थ बेपत्ता, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

● अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार

● ख्यातनाम कार निर्माती कंपनी Kia Motors च्या Seltos 22 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केली जाणार

● भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, उपांत्य फेरीत इंट्री, रोहित शर्मा ठरला सामनावीर

● सिल्वेस्टर स्टेलॉनच्या रॅम्बो या प्रसिद्ध चित्रपट सिरिजमधील अखेरचा चित्रपट 'रॅम्बो लास्ट ब्लड' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारत उपांत्य फेरीत; आज इंग्लंड-न्यूझीलंड आमनेसामने

LetsUp | #CWC 2019

विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, अखेर उपांत्य फेरीचे तिकीट केले पक्क

💁‍♂ भारताने दिलेल्या 315 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 286 धावांवर आटोपला

🏆 सलामीवीर रोहित शर्माने शानदार (104) शतक झळकावले, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

📍 सामन्यातील विशेष घडामोडी :

विश्वचषकाच्या इतिहासात भारताने सातव्यांदा उपांत्य फेरीत केला प्रवेश
रोहित शर्मा एकाच विश्‍वचषकात चार शतके ठोकणारा दुसरा तर पहिला भारतीय खेळाडू ठरला
विश्‍वचषक स्पर्धेत 500 धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला
भारताकडून एकाच सामन्यात धोनी, पंत व कार्तिक हे तीन यष्टीरक्षक खेळले

आज इंग्लंड Vs न्यूझीलंड लढत

🧢 वर्ल्ड कप स्पर्धेत आज इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आपल्या उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी लढणार

👉 इंग्लंडला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजच सामना 'करा या मरा' असाच असणार

👉 दुसरीकडे न्यूझीलंडचा नेट रनरेट सरस असल्याने पराभूत होऊनही न्यूझीलंडला उपांत्य फेरीत दाखल होण्याची संधी आहे

🧐 आमने-सामने इतिहास :

वन-डे : 89 I इंग्लंड : 40 विजय I न्यूझीलंड : 43 विजय I टाय : 2 I अनिर्णित : 4
वर्ल्ड कप : 8 I न्यूझीलंड : 5 विजय I इंग्लंड : 3 विजय

🎯 स्थळ : रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट. I वेळ : दुपारी 3 पासून

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👀 निरीक्षण! दरवर्षी हिमालयातील 6 शिखरे वितळताहेत

LetsUp | Update

📝 नॅशनल सेंटर फॉर पोलर अ‍ॅण्ड ओशियन रिसर्च (एनसीपॉर) संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार दरवर्षी सहा हिमशिखरे वर्षाला 13 ते 33 मिलीमीटरने वितळत आहेत

👉 सुत्री ढाका, बातल, बारा शिगरी, समुद्र टापू, गेपांग घाच आणि कुन्झुम अशी या 6 हिमशिखरांची नावे आहेत.

🔎 या शिखरांचे वस्तुमान, त्यातील ऊर्जा आणि त्यांचा जलीय समतोल वरील अभ्यासांतर्गत तपासण्यात येत आहे.

🗣 केंद्रीय भूविज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली माहिती

🤔 शिखरे वितळण्यामागे कारण काय? :

हिमशिखरांचे हे वितळणे प्रत्येक शिखरानुसार तसेच भौगोलिक जडणघडण व वातावारणानुसार वेगवेगळे आहे.
बातल व सुत्री ढाकाया शिखरांवरील बर्फाचा थर कमी होण्यामध्ये या शिखरांवरील कचऱ्याचा वाटा अधिक आहे.
सहाही हिमशिखरांचे बिघडलेले आरोग्य हे नैसर्गिक व मानवनिर्मित आहे.

📍 एनसीपॉर काय करते? :

भूविज्ञान मंत्रालयांतर्गत काम करणार ही संस्था आहे.
या संस्थेने पश्चिम हिमालयाचा अभ्यास हाती घेतला आहे.
हिमाचल प्रदेशात लाहौल-स्पिती प्रदेशातील चंद्र खोऱ्यात 2013 पासून अभ्यास सुरू करण्यात आला आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💆‍♀ चेहऱ्यावर डाग आहेत? मग 'हे' करा!

LetsUp | Tips & Tricks

अनेक लोक बटाटा खाणं टाळतात. कारण त्यांचा असा समज असतो की, बटाटा खाल्याने वजन आणि शुगर दोन्ही वाढते. परंतु असं अजिबात नाही. बटाट्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो.

बटाटा चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, पूरळ आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बटाट्याचे फेसपॅक कसे तयार करावे याबाबत सांगणार आहोत...

जर तुम्हाला चेहऱ्याचा रंग उजळवायचा असेल आणि काळपटपणा दूर करायचा असेल तर त्यासाठी बटाटा, लिंबू आणि मुलतानी मातीचा फेसपॅक ट्राय करा. बटाटा आणि लिंबू यामध्ये अशी तत्व असतात जी त्वचेची रोमछिद्र खुली करून त्यातील घाण बाहेर काढण्यासाठी मदत करतात.

लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेवरील अतिरिक्त तेल दूर करते, ज्यामुळे ऑईली स्किनची समस्या दूर होते. तसेच मुलतानी मातीमधील मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. जे त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आणि वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच हे डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठीही मदत करतात.

💁‍♂ असा तयार करा फेस पॅक :

एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याची साल काढून बारिक करून घ्या.
त्यामध्ये 2 चमचे मुलतानी माती आणि एक लिंबू पिळून घ्या.
तयार पॅक व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा.
एक तासापर्यंत ठेवा आणि त्यानंतर हाताने मसाज करून थंड पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवून टाका.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 अंबाती रायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

LetsUp । Breaking

विश्वचषकात संधी न मिळाल्याने नाराज अंबाती रायडूने घेतला निवृत्तीचा निर्णय

🧐 का घेतला निर्णय? : विश्वचषकांमध्ये रायडू राखीव खेळाडूंमध्ये होता. विजय शंकर आणि शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही रायडूची निवड झाली नाही. यामुळे निराश झालेल्या रायडूने निवृत्तीची घोषणा केली.

📉 कामगिरी :
रायुडूने 50 एकदिवसीय सामन्यात 1694 धावा केल्या आहे.
यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळी नाबाद 124 धावांची आहे.
रायडूने 3 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहे.
2004 मध्ये रायुडूने अंडर-19 च्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषावले आहे.

💁‍♂ रायडूला का डावलले? : अनेकदा मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्डकप साठीच्या संघात त्याची निवड झाली नाही.

🏏 या देशाकडून खेळण्यासाठी ऑफर?: आमच्या संघाकडून खेळ अशी ऑफर आइसलँड संघाने रायडूला दिली आहे. आइसलँड क्रिकेटनं ट्विटद्वारे ही माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रायुडू आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😍 सुप्रीम कोर्टाचे निकालपत्र आता मराठीत

LetsUp । Update

सुप्रीम कोर्टातील खटल्यांचे निकालपत्र आता मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार.

🧐 प्रादेशिक भाषांमध्ये निकाल : आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर केवळ इंग्रजी भाषेतच निकालपत्र अपलोड करण्यात येत होतं. मात्र, हेच निकालपत्र आता मराठी हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तुलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल.

📍 प्रक्रिया पूर्ण : हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल हिंदीमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यापूर्वीही केली होती. त्यानुसार प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्रं उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाल्याचं म्हटलं जात आहे.

📆 महिना अखेरीस सुरु : जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होणार आहे. सुरुवातीला 500 पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

👍 : लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

1) 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलर प्रदर्शित :

सस्पेन्स, थ्रीलर आणि रोमान्सने भरलेला 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

2 मिनिटे आणि 37 सेकंदांच्या हा ट्रेलर फार दमदार आहे. या ट्रेलरमध्ये कंगना राणावत आणि राजकुमार रावची तुफान जुगलबंदी पाहायला मिळते.

👉 ट्रेलर पहा : http://bit.ly/2RO4Q43

2) 'चल पुढे चाल तू'चा टिझर प्रदर्शित :

मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'स्माईल प्लिज' चित्रपटाच्या अँथमचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

अनेक दिग्गज आणि नामांकित अशा मराठी कलाकारांच्या मांदियाळीत नटलेले हे गाणे प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.

👉 गाणे पहा : http://bit.ly/2xnyV0W

3) जबरिया जोडी' चा ट्रेलर पहा : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राच्या आगामी 'जबरिया जोडी' चित्रपटाच्या ट्रेलरला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 2 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

👉 ट्रेलर पहा : http://bit.ly/2YqbxM2

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● देशात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवरील अत्याचारांत मागील दोन दशकांत पाचपट वाढ

● काल (दि.3) जगभरात व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प, फोटो-व्हिडीओ डाऊनलोड करण्यास अडचण, अखेर सेवा पूर्ववत

● पेटीएमवर जूनमध्ये एकूण 70 कोटी व्यवहारांची नोंद, यूपीआयमध्ये गुगल पे आघाडीवर

● पाकिस्तानकडून हाफिज सईदविरोधात मोठी कारवाई; टेरर फंडिंगप्रकरणी गुन्हा दाखल

● राज्य शासनाच्या मेगा भरतीचा मार्ग अखेर मोकळा, मराठा आरक्षणाच्या सुधारणा विधेयकावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राजपत्र जाहीर

● राज्याच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

● मराठवाड्यात बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र थांबेना, दोन आठवड्यात 39 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

● विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी झेड 1 प्रो स्मार्टफोन केला लाँच, यात पंच होल डिस्प्लेसह अनेक सरस फिचर्स

● इंग्लंडकडून न्यूझीलंडचा 119 धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश, जॉनी बेअरस्टो ठरला सामनावीर

● भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या भूमिकेसाठी अभिनेत्री तापसी पन्नूची निवड

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🙏 पुण्यतिथी विशेष! जाणून घेऊ स्वामी विवेकानंद यांचे विचार

LetsUp | Special

भारत भूमीसाठी तन, मन, धन व प्राण अर्पण करणारी अनेक नवरत्‍ने भारतात होऊन गेली. त्यापैकी एक दैदिप्यमान रत्‍न म्हणजे स्वामी विवेकानंद.

त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे आणि विविध विषयांच्या सखोल अभ्यासाद्वारे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. तल्लख बुद्धीच्या स्वामींनी जगाला खरे अध्यात्म समजावून सांगितले. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रेरक विचार जाणून घेऊयात...

1) दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

2) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल. कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

3) व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

4) आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

5) दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

6) स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

7) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

8) तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.

9) आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.

10) संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 इंग्लंड उपांत्य फेरीत; आज अफगाणिस्तान-वेस्ट इंडिज सामना

LetsUp | #CWC 2019

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडच्या संघाचा 119 धावांनी उडवला धुव्वा

👉 या विजयाने पाकिस्तानचे विश्वचषकातले उरलेसुरले आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे

💁‍♂ इंग्लंडने दिलेल्या 306 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 186 धावांमध्ये आटोपला

🏆 सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 106 धावांची खेळी केली, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

अफगाणिस्तान Vs वेस्ट इंडिज

🧢 उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेले अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज आज प्रतिष्ठा राखण्यासाठी झुंजणार

👉 अफगाणिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय नोंदवण्यासाठी लढणार, दुसरीकडे वेस्ट इंडिज शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल

👍 ख्रिस गेलचा अखेरचा विश्वचषक : कारकीर्दीतील चौथा विश्वचषक खेळणाऱ्या ख्रिस गेलचा हा विश्वचषकातील शेवटचा सामना असून, अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो उत्सुक असेल. गेलने (39 वर्षीय) आत्तापर्यंत विश्वचषकाच्या 8 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 235 धावा केल्या आहेत.

🧐 आमने-सामने : एकदिवसीय : 5 I अफगाणिस्तान : 3 I वेस्ट इंडिज : 1 I टाय : 0 I रद्द :1

🎯 स्थळ : हेडिंग्ले, लीड्स. I दुपारी 3 पासून.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 तुम्हाला हे माहिती आहे का?

LetsUp | Do you know

1) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याची सामान्य वेळ 90 मिनट असते.

2) स्केटिंग खेळण्या जाणाऱ्या परिसराला रिंक म्हटले जाते.

3) कबड्डी आणि बुद्धिबळ खेळाचा जन्म भारतात झाला आहे.

4) वॉटर पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 7 असते.

5) पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 4 असते.

6) बेसबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 9 असते.

7) व्हॉलीबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 6 असते.

8) बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 5 असते.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏆 केवळ अर्धा ग्राम सोन्यात साकारली वर्ल्डकपची प्रतिकृती

LetsUp । Special

वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर बंगळूरच्या सोनाराने बनवली सोन्याची ट्रॉफी

📍 बंगळुरूमधील सोनार नागराज रेवणकर यांनी चक्क 1.5 सेंटीमीटरची वर्ल्डकपची सोन्याची ट्रॉफी साकारली आहे. हा चषक एवढा छोटा आहे की, अगदी बोटाच्या तळभागावर बसू शकतो. याचे वजन 0.49 ग्रॅम एवढे आहे.

💁‍♂ सोशलवर चर्चा : सोन्यात साकारण्यात आलेली ट्रॉफीची चिमुकली प्रतिकृती सोशलवर चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांची ही कलाकृती बघण्यासाठी त्यांच्या दुकानात लोक गर्दी करत आहेत.

😍 टीम इंडियाला शुभेच्छा : नागराज म्हणाले कि, टीम इंडियाच्या गुडलक साठी ही ट्रॉफी साकारावी असे मनात आले. टीम इंडियाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळावा यासाठी ही ट्रॉफी लोकांसमोर सादर केली.

👍 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर

LetsUp । Update

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आर्थिक पाहणी अहवाल राज्यसभेत सादर.

💁‍♂ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा सर्वेक्षण अहवाल सादर केला. यामध्ये 2019-20 या आर्थिक वर्षातील जीडीपी दर 7 टक्के राहील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आर्थिक विकास दर अधिक आहे.

📍 अहवाल :
खासगी गुंतवणूक वाढून जीडीपी दरात वाढ होण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती कमी होऊ शकते.
निर्यातीवरील विकास दर कमी राहण्याची शक्यता

📊 जीडीपी दर : 2018-2019 या आर्थिक वर्षात विकास दर 6.8 टक्के होता. त्याआधी 2017-18 मध्ये विकास दर 7.2 टक्के होता.

📉 निवडणुकांमुळे विकासदरात घट : देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीतील निकालाच्या अनिश्चिततेमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील विकास दरावर परिणाम झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या तिमाहीत विकास दर केवळ 5.8 टक्के होता.

👍 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (शुक्रवारी) लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार, 'अर्थसंकल्पा'कडे सर्वांचे लक्ष

● जागतिक बँकेकडून धरणांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी राज्याला तब्बल 940 कोटी रुपयांचा निधी मिळणार

● गेल्या 3 वर्षांत सीबीआयच्या 36 अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले, सरकारकडून राज्यसभेत माहिती

● पाकिस्तान तणावामुळे भारतीय विमान कंपन्यांना 550 कोटींचा फटका, एअर इंडियाचे सर्वाधिक 491 कोटींचे नुकसान

● कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित खटल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालय येत्या 17 जुलै रोजी निर्णय देणार

● दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयला आवश्यक ते सहकार्य करत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

● उपअभियंत्यावरील चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक, जवळपास 40 जणांवर गुन्हा दाखल

● फलक बसवण्याचे काम सुरु असल्यामुळे दि. 9 जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 2 तास बंद राहणार

● देवेंद्र फडणवीसांनी नोंदविला नवा विक्रम, 1972नंतर पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे ठरले एकमेव मुख्यमंत्री

● वेस्ट इंडिजची आफगाणिस्तानवर 23 धावांनी मात, 77 धावांची खेळी करणारा शे होप ठरला सामनावीर

● अभिनेत्री तेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, 'अग्गंबाई सासूबाई' या आगामी मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 विंडीजचा शेवट गोड; आज पाकिस्तान-बांगलादेश लढत

LetsUp | #CWC 2019

वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करत विश्वचषक मोहिमेचा शेवट गोड केला

👉 विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा यंदाच्या विश्वचषकातला 9 सामन्यांमधला सलग नववा पराभव ठरला

💁‍♂ विंडीजने दिलेल्या 312 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 288 धावांपर्यंत मजल मारता आली

🏆 शे होपने 92 चेंडूत 77 धावांची खेळी केली, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

पाकिस्तान Vs बांगलादेश

🧢 वनडे वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तानची साखळी फेरीतील अखेरची लढत बांगलादेशशी होणार

👀 उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला काय करावे लागेल? :

पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी लागेल
पाकिस्तान जर नाणेफेक हरला आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी घेतली तरी त्यांचे आव्हान तिथेच संपेल
पाकिस्तानने जर 350 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशला 311 धावांनी पराभूत करावे लागेल
पाकिस्तानने 400 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशचा 316 धावांनी पराभव करावा लागेल
पाकिस्तानने 450 धावा केल्यास त्यांना बांग्लादेशचा 321 धावांनी पराभव करावा लागेल
पाकिस्तानचा संघ जर 300 धावांच्या आता बाद झाला तर त्यांचे आव्हान तिथेच संपेल

🧐 आमने-सामने इतिहास :

एकदिवसीय : 36 I पाकिस्तान : 31 I बांगलादेश : 5, टाय/ रद्द : 0
विश्वचषकात : 1 I पाकिस्तान : 0, बांगलादेश : 1, टाय / रद्द : 0

🎯 स्थळ : लॉर्ड्स, लंडन. I वेळ : दु. 3 पासून.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup