LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
LetsUpp Marathi pinned «इयत्ता दुसरीच्या बालभारती गणितात अंकवाचनाची नवी पद्धत तुम्हाला योग्य वाटते का?»
🎯 सरकारी सेवेत 2 लाख पदे रिक्त

LetsUp । Update

राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांची 1 लाख 91 हजार पदे रिक्त; आर्थिक पाहणी अहवालाने सादर केली आकडेवारी.

💁‍♂ काय आहे अहवाल? : राज्याचा 2018-19 च्या आर्थिक पाहणी अहवालनुसार 1 जुलै 2018 रोजी शासनाच्या सेवेत गट अ ते गट ड पर्यंतची 7 लाख 17 हजार मंजूर पदे आहेत. त्यापैकी 5 लाख 27 हजार पदे भरण्यात आली आहे. मात्र अद्याप 1 लाख 91 हजार पदे रिक्त असल्याची माहिती आकडेवारीतुन समोर आली आहे.

🧐 34 हजार कंत्राटी पदे रिक्त : सरकारी सेवेतील इ गटातील म्हणजेच कंत्राटी पद्धतीवरची 2 लाख 96 हजार मंजूर पदे आहेत. त्यापैकी 2 लाख 36 हजार कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरती करण्यात आली असून उरलेली 34 हजार पदे रिक्त आहे.

📍 सरकारी रुग्णालयात किमान 50 टक्के पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम थेट रुग्णसेवेवर होत आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💁‍♂ बँकेतील पैसे सुरक्षित ठवेण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ उपाय

LetsUp । Special

👀 फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ : बँक फसवणुकीच्या घटनांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकी मोठ्या प्रमाणात आहेत. आता ग्राहकांना सावध करताना फसवणुकीपासून वाचण्यासाठी एसबीआय ने काही उपाय सांगितले आहे.

----------------------
👍 इंस्टाग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा स्पेशल अपडेट :
फॉलो इंस्टाग्राम : https://instagram.com/Letsup.in
----------------------

📍 एसबीआय मध्ये 23,734,74 कोटी रुपयांच्या एकूण 6,793 फसवणुकी समोर आल्या आहेत.

👍 जाणून घ्या टिप्स

1) तुमचं बँक खातं आणि नेट बँकिंग यांची माहिती कोठेही लिहू नका अथवा फोनमध्ये सेव्ह करून ठेवू नका.

2) दर काही दिवसांच्या अंतराने तुमचा इंटरनेट बँकिंग पासवर्ड बदलत राहा.

3) तुमच्या फोनमध्ये बँक खात्याचा नंबर, एटीएम कार्ड, पासवर्ड या माहितीचे फोटो ठेवलेत तर माहिती लीक होऊ शकते. त्यामुळे असे करणे टाळा.

4) तुमच्या उपकरणामध्ये अँटिव्हायरस स्कॅन नेहमी चालू ठेवा.

5) ओपन नेटवर्क, पब्लिक डिव्हाइस आणि फ्री वायफाय वापरू नका. असे केल्याने तुमची खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता आहे.

6) नेहमी वन टाइम पासवर्ड ( OTP ) च्या साहाय्याने ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन करा. यामुळे अधिक सुरक्षित ट्रॅन्झॅक्शन होते.

7) बँकेच्या संदर्भातील वेगवेगळे पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड व्हेरिफिकेशन कोड आणि युपीआय पिन इत्यादी कुणालाही सांगू नका.

8) फिशिंग ई-मेल वर कधीही क्लिक करू नका. यातून फसवणुकीची शक्यता असते.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे ओम बिर्लांचे नाव निश्चित

अब्जाधीशांच्या यादीतून अनिल अंबानींना वगळले
शाओमी च्या फोन्सवर मिळवा बंपर सूट

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani18June

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत जानेवारी ते मे 2019 दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत 2.62 टक्क्यांची वाढ

● आता रेल्वे पोलिसही पेपरलेस होणार, जवळपास 35 सेवा पोलिसांना केवळ एका क्लिकवर मिळणार

● उत्तरप्रदेश सरकारचा आपली प्रसिद्धी निवेदने आता संस्कृत भाषेतूनही प्रकाशित करण्याचा निर्णय

● रिलायन्स एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आता अब्जाधीशांच्या सूचीतून बाहेर

● अमेरिकेने घुसखोरांना हाकलण्यासाठी सुरू केली प्रक्रिया, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली माहिती

● आज (दि.19) शिवसेनेचा 53वा स्थापना दिवस, विविध कार्यक्रमांचे आयोजन, मुख्यमंत्री राहणार उपस्थित

● दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना 21 जून रोजी 3 वाजल्यापासून आपल्या शाळेत मिळणार : राज्य बोर्ड

● ‘होंडा’ची नवीन Honda Amaze Ace लॉन्च, कारची किंमत 7.89 ते 9.72 लाख रुपयांच्या दरम्यान

● इंग्लंडचा अफगाणिस्तानावर एकतर्फी विजय, 148 धावा करणारा कर्णधार मॉर्गन ठरला सामनावीर

● बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता 'बाबा' या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार

● अहमदनगर - मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनानंतर जामखेड 3, शेवगाव 2 व नगर तालुक्यातील 1 अशा एकूण 6 छावण्या बंद

● अहमदनगर - कामकाजाची वेळ सुरू होऊनही 71 जण कार्यालयात हजर नसल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत समोर, नोटिसा बजावण्याचे आदेश

● अहमदनगर - मोकाट जनावरांच्या हल्ल्यात 3 वर्षांची बालिका गंभीर जखमी, उपचाराचा खर्च मनपा उचलणार, आयुक्तांचे आश्वासन

📞 जाहिरातीसाठी संपर्क: 7875190190

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏏 इंग्लंडचा एकतर्फी विजय; आज न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका लढत

LetsUp | #CWC 2019

यजमान इंग्लंडने दुबळ्या अफगाणिस्तानावर 150 धावांनी मात करत मिळवला एकतर्फी विजय

💁‍♂ इंग्लंडने अफगाणिस्तानपुढे 398 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ 8 बाद 247 धावांपर्यंतच मजल मारता आली

🏆 71 चेंडूत 148 धावांची स्फोटक खेळी (17 षटकार, 4 चौकार) करणारा कर्णधार मॉर्गन ठरला सामनावीर

🔝 इंग्लंड 5 सामन्यात 8 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानी, अफगाणिस्तानला 5 सामन्यात अद्यापही गुणांचे खाते उघडता आलेले नाही

आज न्यूझीलंड Vs दक्षिण आफ्रिका

🧢 वनडे वर्ल्डकपमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने येणार आहेत

👉 आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडला रोखण्याचे खडतर आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर असणार

🧐 आमने-सामने इतिहास :

70 वनडे - दक्षिण आफ्रिका : 41 विजय I न्यूझीलंड : 24 विजय I टाय : 5
वर्ल्डकप 7 वनडे - न्यूझीलंड : 5 विजय I दक्षिण आफ्रिका 2 विजय

🎯 स्थळ : एजबॅस्टन, बर्मिंगहॅम. I वेळ : दुपारी 3 पासून.

👌 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup
📣 जगभरातील सर्वोत्तम शिक्षणसंस्थाची यादी; देशात आयआयटी मुंबई सर्वोत्तम

LetsUp | Update

📝 जगभरातील सर्वोत्तम 200 शिक्षण संस्थांची नावे ‘क्यू एस रँकिंग’ या जागतिक मानांकन संस्थेने केली प्रकाशित

👍 देशातील शिक्षणसंस्थांमध्ये आयआयटी मुंबई सर्वोत्तम, विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईने क्रमवारीत हे स्थान पटकाविले

👉 क्रमवारीत आयआयटी मुंबई 152व्या स्थानी, आयआयटी दिल्ली 182व्या स्थानी तर बेंगळूरुची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ 184व्या स्थानी आहे

🧐 23 भारतीय संस्थांपैकी 4 संस्थांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत वरचे स्थान मिळवले असून 7 संस्थांना मात्र या यादीत टिकाव धरता आलेला नाही

🔝 मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ सर्वोच्च स्थानी : यादीत अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे याच विद्यापीठातील ‘मॅसॅच्युसेट्स् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेने तब्बल 8 वर्षे सर्वोत्तम शिक्षण संस्थेचे स्थान कायम राखले आहे.

🎯 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup
💁‍♂ ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमामध्ये बदल; किमान शैक्षणिक अट शिथिल

LetsUp | Update

📍 वाहन चालक परवान्यासाठी आवश्यक असलेली किमान शिक्षणाची अट शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय

🧐 यामुळे आता अशिक्षित व्यक्तीलाही वाहन परवाना मिळू शकतो, आत्तापर्यंत ड्राईव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी किमान आठवी पास असणे आवश्यक होते

🤔 निर्णय का? : सध्या वाहतूक आणि माल वाहतूक क्षेत्रात जवळपास 22 लाख चालकांची कमतरता आहे. तसेच देशात मोठ्या संख्येवर बेरोजगार युवक असून त्यांना रोजगार मिळावा यासाठी हे पाऊल उचलले आहे

📝 त्यानुसार केंद्रीय मोटर वाहन 1989 च्या नियम 8 मध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु, लवकरच त्यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात येणार

👍 शैक्षणिक अर्हता हटवली तरी प्रशिक्षण आणि कौशल्य चाचणीवर केंद्राकडून भर, रस्ते वाहतूक सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट

🎯 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup
💁‍♂ ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमामध्ये बदल; किमान शैक्षणिक अट शिथिल

LetsUp | Update

📍 वाहन चालक परवान्यासाठी आवश्यक असलेली किमान शिक्षणाची अट शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय

🧐 यामुळे आता अशिक्षित व्यक्तीलाही वाहन परवाना मिळू शकतो, आत्तापर्यंत ड्राईव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी किमान आठवी पास असणे आवश्यक होते

🤔 निर्णय का? : सध्या वाहतूक आणि माल वाहतूक क्षेत्रात जवळपास 22 लाख चालकांची कमतरता आहे. तसेच देशात मोठ्या संख्येवर बेरोजगार युवक असून त्यांना रोजगार मिळावा यासाठी हे पाऊल उचलले आहे

📝 त्यानुसार केंद्रीय मोटर वाहन 1989 च्या नियम 8 मध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु, लवकरच त्यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात येणार

👍 शैक्षणिक अर्हता हटवली तरी प्रशिक्षण आणि कौशल्य चाचणीवर केंद्राकडून भर, रस्ते वाहतूक सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट

🎯 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup
🏍 भारताची पहिली इलेक्ट्रिक बाईक 'आरव्ही 400' लॉन्च

LetsUp | Auto

📍 Revolt Intellicorp कंपनीने भारत आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Revolt RV 400' केली लॉन्च

👍 या बाईकची प्री-बुकिंग येत्या 25 जूनपासून अमेझॉन इंडिया आणि Revoltmotors.com वर करता येणार

😍 अवघ्या 1 हजार रुपयांत तुम्ही या बाईकची बुकिंग करू शकता, मात्र अद्याप या बाईकच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही

----------------------
📣 कार इन्शुरन्सवर मिळवा 80 टक्क्यापर्यंत डिस्काउंट, अवघ्या 2 मिनिटांत 3 टप्य्यात मिळेल पॉलिसी, त्यासाठी क्लिक करा : 👉 https://urlzs.com/EJt74
----------------------

💁‍♂ जाणून घ्या फिचर्स :

तुम्ही तुमचा स्मार्टफोन कनेक्ट करून My Revolt App च्या मदतीने या बाईकला सुरु करू शकता; यासोबत चावी, सेल्फ स्टार्टची सुविधा देखील उपलब्ध आहे
अ‍ॅपच्या मदतीने तुमची किती बॅटरी शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता. अजून आपण किती दूर जाऊ शकतो? हे कळणार आहे. यासोबतच बॅटरी लाईफ पर्संटेजमध्ये दिसणार आहे
अ‍ॅपच्या मदतीने युझर अगदी सहज बाईक ट्रॅक करू शकतो
चार्जिंग करण्यासाठी वेग-वेगळे मोड असून यात ऑन बोर्ड किंवा पोर्टेबल चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे
हि बाईक AI (Artificial Intelligence) वर काम करत असल्यामुळे तुम्ही व्हाईस कमांड देखील देऊ शकता

🎯 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup
📣 फेसबुककडून 'लिब्रा' क्रिप्टोकरन्सीची घोषणा

LetsUp । Special

फेसबुकने ग्राहकांसाठी सादर केली स्वतःची 'लिब्रा' क्रिप्टोकरन्सी.

🎯 'लिब्रा' या आभासी चलनाच्या आधारे फेसबुकच्या ग्राहकांना पैशाची बचत, पैसे पाठवणे आणि खर्च करणे अगदी सोपे होणार आहे. एखादा मेसेज पाठवण्याइतके हे सोपे असणार आहे, असे फेसबुकने म्हटले आहे.

💁‍♂ पुढील वर्षी लॉंच होणार! : फेसबुकतर्फे पुढील वर्षापासून ही क्रिप्टोकरन्सी सादर करण्याची शक्यता आहे. 'लिब्रा' जागतिक पातळीवरील डिजीटल चलन म्हणून विकसित केले जाणार आहे.

👉 असे करा व्यवहार : हा आर्थिक व्यवहार ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येतील. लिब्राद्वारे ऑनलाइन व्यवहारांसाठी कॅलिब्रा (Calibra) हे वॉलेट सुद्धा फेसबुकतर्फे तयार करण्यात आलं आहे.

🗣 या वॉलेटचा फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सअॅप या सर्वांमध्ये करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

📍 2 अब्ज युझर्स : फेसबुकच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे जगभरात सुमारे दोन अब्ज युजर्स आहेत. त्यामध्ये व्हॉट्‌सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक यांचा समावेश आहे.

🎯 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup
📢 इंटरनेट वापरात भारत दुसऱ्या स्थानी

LetsUp । Update

जगातील इंटरनेट युझर्सच्या यादीमध्ये चीन प्रथम तर भारत दुसऱ्या क्रमांकावर.

💁‍♂ इंटरनेट वापरकर्त्यांच्या जगभरातील संख्येत वाढ होत आहे. नुकत्याच जाहीर अहवालानुसार, भारत जगात इंटरनेट वापरात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ही माहिती मेरी मीकर यांच्या इंटरनेटच्या वापरावर आलेल्या अहवालात समोर आली आहे.

📝 अहवाल :
एकूण 3 अब्ज 80 लाख इंटरनेट वापरकर्ते जगात आहेत.
जगातील लोकसंख्येपैकी ही संख्या अर्धी आहे.
यामध्ये चीन 21 टक्क्यांसह जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
भारत 12 टक्के इंटरनेट वापरकर्त्यांसह दुसऱ्यास्थानी आहे.
तर, 8 टक्के इंटरनेट वापरकर्ते अमेरिकेत आहेत.

📍 जिओ इफेक्ट : जिओने 5 सप्टेंबर 2016 साली भारतीय बाजारपेठेत पाऊल टाकले होते. इंटरनेट ग्राहकांत स्वस्त सेवेमुळे कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. जिओच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही यामुळे दर कमी करावे लागले होते.

🎯 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ सनी देओल यांची खासदारकी धोक्यात

दूरदर्शनचे प्रेक्षपण आता बांगलादेशातही

*बायपास रोड' सिनेमाचे पोस्टर रिलीज

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani19June
____________

🛍 Amazon Wardrobe Refresh Sale‎ सुरू. मिळवा ब्रँडेड कपड्यांवर 80% पर्यंत सूट...ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा : 👉 https://amzn.to/2IpqUPb

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● देशातील सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एका समितीची स्थापना : राजनाथ सिंह

● लष्करी अधिकाऱ्यांना पुन्हा मिळणार 'सरकारी रेशन'; नवीन संरक्षण मंत्र्यांनी बदलला 2017 चा निर्णय

● भारताने आयात कर वाढवल्याने बाजारात दिसणारी चकचकीत वॉशिंग्टन सफरचंद आता महागणार

----------------------
🌕 आज संकष्टी चतुर्थी | चंद्रोदय : 9.52 Pm
----------------------

● श्रीलंकेने आपला पहिला उपग्रह 'रावण-1 'अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून सोडला

● वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरु झाकीर नाईकला 31 जुलै रोजी विशेष कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश

● सर्वोच्च न्यायालयाची सरकारला नोटीस; मराठा आरक्षण अध्यादेशावर आता येत्या 24 जूनला सुनावणी

● शिवसेना आणि भाजपात सगळं समसमान पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

● सारेगामा कंपनीने आपल्या 'कारवा' मॉडेलची 2.0 ही नवीन आवृत्ती सादर करण्याची केली घोषणा

● न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा; चार गडी राखून मात, केन विल्यमसन ठरला सामनावीर

● पॅरालिम्पियन दीपा मलिकवर बायोपिक, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही भूमिका करण्याची दाट शक्यता

● अहमदनगर - शहरी भागासह ग्रामीण भागातील तातडीच्या रुग्णांसाठी सुरू केलेल्या 108 रुग्णवाहिका आता जैव इंधनावर धावणार

● अहमदनगर - आंतरराष्ट्रीय जलरंग चित्र स्पर्धेत नगरचे चित्रकार योगेश हराळे यांनी जलरंगात रेखाटलेल्या व्यक्तीचित्राला 'अमंग द बेस्ट' पुरस्कार मिळाला

● अहमदनगर - मानधन नव्हे तर वेतन मिळावे या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा; वेतन वाढीच्या आश्वासनाच्या पूर्ततेची मागणी

📞 जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏏 न्यूझीलंडचा विजय; आज बांगलादेश गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला रोखणार?

LetsUp | #CWC 2019

न्यूझीलंडने आपली अपराजित मालिका कायम राखताना दक्षिण आफ्रिकेचा 4 गड्यांनी केला पराभव

💁‍♂ दक्षिण आफ्रिकेने दिलेले 242 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले

🏆 विलियमसनने 138 चेंडूत नाबाद 106 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला

🔝 यासह न्यूझीलंडने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी घेतली झेप, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्ड कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात

आज बांगलादेश Vs ऑस्ट्रेलिया

🧢 गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन संघ आज आमने-सामने येणार आहेत

👉 ऑस्ट्रेलियाचे पारडे या सामन्यात जड असले तरी बांगलादेशचा संघ सहजासहजी हार पत्करणार नाही

🧐 आमने-सामने इतिहास :

वन डे 20 I ऑस्ट्रेलिया : 18 विजय I बांगलादेश : 1 विजय I अनिर्णित : 1
वर्ल्डकप 3 I ऑस्ट्रेलिया : 2 विजय I बांगलादेश : 0 I टाय : 1

🎯 स्थळ : ट्रेंट ब्रिज क्रिकेट ग्राऊंड, नॉटिंगहॅम. I दुपारी 3 वाजता.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🧐 आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर

LetsUp | International

1) श्रीलंकेचा ‘रावण’ अवकाशात :

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून श्रीलंकेने आपला पहिला उपग्रह 'रावण-1' अवकाशात सोडला.

या उपग्रहाबरोबरच जपान आणि नेपाळचे 'बर्ड थ्री' श्रेणीतील प्रत्येकी एक उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले.
हा उपग्रह श्रीलंकेच्याच थरिंदू दयारत्ने आणि दुलानी चमिका या अवकाश वैज्ञानिकांनी जपानच्या मदतीने विकसित केला आहे.
या उपग्रहाचे निर्धारित कालमान वर्षभराचे असले तरी तो 5 वर्षांपर्यंत कार्यरत राहण्याची अपेक्षा आहे.
श्रीलंका आणि आसपासच्या प्रदेशाची छायाचित्रे काढणे हे या उपग्रहाचे प्रमुख काम असेल.

2) वॉशिंग्टन सफरचंदांना फटका :

वॉशिंग्टन सफरचंदांचा उद्योग हा निर्यातीवर अवलंबून आहे. अशात भारताने आयात कर वाढवल्याने वॉशिंग्टन सफरचंद आता महागणार आहेत. या सफरचंदावरचा कर आता 70 टक्के झाला आहे.

3) इच्छामरणाच्या तरतुदीचा कायदा मंजूर :

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात बऱ्या होऊ न शकणाऱ्या रुग्णांना इच्छामरणाची परवानगी देणारा कायदा करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक कायदा अंमलात आला आहे.

या कायद्यानुसार व्हिक्टोरियातील बऱ्या होऊ न शकणाऱ्या रुग्णांना इच्छा मरण घेता येईल. मात्र त्यासाठी त्यांना 68 सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करावी लागेल.

राज्याचे मुख्यमंत्री डॅनियल अँड्रय़ूज यांनी सांगितले की, अशा प्रकरणात निर्णय घेण्यासाठी 120 डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले असून नवीन कायद्यात सहवेदनेचा व करूणेचा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे.

4) अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदी मार्क एस्पर :

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी लष्करी अधिकारी मार्क एस्पर यांचे नाव संरक्षण मंत्रिपदासाठी निश्चित केले आहे.

ट्रम्प यांनी सांगितले, की सध्याचे लष्कर सचिव मार्क एस्पर हे हंगामी पातळीवर संरक्षण मंत्री म्हणून काम पाहतील. मार्क यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे, ते संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी चांगली पार पाडू शकतील असा विश्वास वाटतो.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😴 झोपेशी निगडित काही रोचक तथ्य!

LetsUp | Do U Know

1) झोपेच्या कमतरतेमुळे, आपला मेंदू महत्त्वपूर्ण आणि महत्त्वपूर्ण नसणाऱ्या कामांतील फरक करण्यास विसरून जातो.

2) मनुष्य आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश किंवा जवळपास 25 वर्षांचा काळ झोपण्यात खर्च करतो.

3) जेव्हा तुम्ही आनंदी असता. तेव्हा कमी झोप असेल तरी काही विशेष फरक पडत नाही.

4) सर्वसाधारणपणे मांजरीचे 70% आयुष्य झोपण्यात खर्च होते.

5) कोणीही व्यक्ती न झोपता जास्तीत-जास्त 11 दिवस जगू शकतो.

6) झोपल्यानंतर शिंक येणे जवळ-जवळ अशक्य आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🚗 यापुढे मॉलमध्ये नि:शुल्क पार्किंग

LetsUp । Pune

🎯 पुण्यात आजपासून सर्व मॉल्स आणि मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग नि:शुल्क करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

📝 याबाबत महापालिकेने शहरातील सर्व मॉल आणि मल्टिप्लेक्सना तशा नोटीस बजावल्या आहे.

💁‍♂ का घेतला निर्णय? : पार्किंग शुल्काच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी हा निर्णय घेतलाआहे. पार्किंग शुल्क आकारणाऱ्या मॉल व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

🤔 अमंलबजावणी कधी होणार? : सध्या तरी हा निर्णय फक्त कागदावरच राहिल्याचं दिसून येत आहे. कारण प्रत्यक्षात अनेक मॉल आणि मल्टिप्लेक्समधे वाहनांच्या पार्किंगसाठी अजूनही पैसे घेतले जात असल्याचं दिसून येत आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🤦‍♂ देवदर्शनासाठी गेलेली नववधू प्रियकरासोबत फरार

LetsUp । #Ahmednagar

💁‍♂ देवदर्शनासाठी गेलेली नववधू आपल्या प्रियकरासोबत फरार, पाथर्डी तालुक्यातील घटना

🧐 नेमकं प्रकरण काय? : शेवगाव तालुक्यातील एका युवकाचा नुकताच तरुणीशी विवाह झाला होता. हे नवदाम्पत्य देवदर्शनासाठी मढी येथे गेले होते. यावेळी नवदाम्पत्यसह नवरीचा प्रियकर देखील आला होता. अशात संधीचा फायदा घेऊन नवऱ्याला चुकवून नवरी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली.

📍 घटना सीसीटीव्हीत कैद : शोधाशोध करूनही आपली पत्नी दिसत नसल्याने नवरदेवाने देवस्थान सामितीच्या कार्यालयात तक्रार नोंदवली. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर समजले की, नववधू आपल्या प्रियकरासोबत दुचाकीवरून पळून गेली आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💧 पाण्यासाठी नगरकरांचे मध्यरात्रीचे जागरण थांबणार

LetsUp । Ahmednagar

पाण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जागरण करणाऱ्या नगरकरांना मनपाकडून मिळणार दिलासा

👍 पाईपलाईनमध्ये दुरुस्ती : कापडबाजारातील तेलीखुंट येथे पाणीपुरवठा विभागाने पाईपलाईनमध्ये मोठी दुरुस्ती केली आहे. त्यामुळे मध्यरात्री होणारा पाणीपुरवठा थांबणार आहे.

🗣 पुढील महिन्यात लवकरच वेळापत्रक जाहीर करून पहाटे नियमित पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती उपमहापौर मालन ढोणे यांनी दिली.

😍 या भागांना होणार फायदा : तोफखाना, सर्जेपुरा, दिल्ली दरवाजा, रंगभवन, पोलीस मुख्यालय, गोकुळवाडी, रामवाडी, लालटाकी परिसर, कराचीवाला नगर, विराज कॉलनी, प्रभाग क्रमांक 9, 10, 12 मधील मोठ्या परिसराला या पाईपलाईन दुरुस्तीचा फायदा होणार आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup