LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
LetsUp News Updates

● फोर्ब्जकडून जगातल्या 2 हजार सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी जाहीर, यात भारताच्या 57 कंपन्यांचा समावेश

● ग्रामीण भागातील लोकांना आता सुविधा सेवा केंद्रांवरून पुन्हा आधारसंबंधी सेवा उपलब्ध होणार

● केंद्र सरकारचा राज्य सरकारी विमा योजनेतील अंशदान दर 6.5 टक्क्यांवरून 4 टक्के करण्याचा निर्णय

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● राष्ट्रपती भवनात उद्या 15 जून रोजी होणार नीती आयोगाची बैठक; पंतप्रधान मोदी असणार अध्यक्षपदी

● गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भविष्यवाणी, 'भारत आणि इंग्लंडमध्ये होणार विश्वचषक फायनल'

● रक्त संकलनात वाढ, राज्यात सर्वाधिक रक्त संकलनात मुंबई पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

● ज्येष्ठ अभिनेते व रंगभूषाकार तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अनंतराव जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

● वैद्यकीय मराठा आरक्षण; आव्हान याचिका फेटाळली, वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

● भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आलेत

● ‘दबंग 3’च्या आयटम सॉंगमध्ये दिसणार ‘लव्हयात्री’ फेम अभिनेत्री वरिना हुसेन

● अहमदनगर - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी परिवहन महामंडळाच्या नगर विभागाकडून जादा वाहतुकीचे नियोजन; 300 जादा बसेस सोडणार

● अहमदनगर - आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले दिसेल : खासदार सुजय विखे

● अहमदनगर - केडगाव उपनगरामध्ये काही ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन्स असल्याचे स्पष्ट, महापौर वाकळे यांनी दिले कारवाईचे आदेश

● अहमदनगर - जिल्ह्यातील 3 हजार 285 शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात येणार, बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरु

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏏 भारत-न्यूझीलंड सामना रद्द; आज इंग्लड Vs वेस्टइंडीज सामना

LetsUp | #CWC 2019

भारत-न्यूझीलंड सामन्यात अखेर पावसानेच मारली बाजी, सामना रद्द केल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला

💁‍♂ आता भारताचा पुढील सामना येत्या रविवारी 16 जूनला पाकिस्तानसोबत होणार आहे

👀 विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की, एका विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा अधिक सामने एकही चेंडू न खेळता पावसामुळे रद्द झाले आहेत

💁‍♂ विश्वचषकात एकही चेंडूचा खेळ न होता रद्द झालेले सामने

श्रीलंका Vs वेस्ट इंडिज : 1979
ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश : 2015
पाकिस्तान Vs श्रीलंका : 2019
बांगलादेश Vs श्रीलंका : 2019
भारत Vs न्यूझीलंड : 2019

🗣 धवनच्या दुखापतीवर विराट अपडेट : दरम्यान विराटने शिखर धवनच्या दुखापती बाबत अपडेट दिले आहे. विराट म्हणाला, 'दोन आठवडे तरी त्याला प्लास्टर असेल. तो लवकर बरा होईल. साखळी फेरीत शेवटच्या सामन्यासाठी किंवा सेमी फायनलपर्यंत तरी तो संघात परत येईल.

👍 गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी : 10 संघांच्या गुणतालिकेत 7 गुणांसह न्यूझीलंड पहिल्या, 6 गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर 5 गुणांसह भारत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

🚫 पंतला ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी! : आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांनुसार फक्त संघात निवड झालेल्या खेळाडूंनाच संघासोबत प्रवास करता येतो आणि ड्रेसिंग रुममध्ये जाता येते. त्यामुळे रिषभ पंत जरी इंग्लंडला पोहोचला तरी त्याला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नाही.

आजचा सामना (14 जून)

🧢 इंग्लड Vs वेस्टइंडीज
👉 ठिकाण : द रॉझ बाउल, साउथम्पटन.
🕒 वेळ : दुपारी 3 वाजता.

साउथम्पटनमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे या लढतीतही पावसाची शक्यता आहे

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💁‍♂ देशभरातील डॉक्टर आज संपावर; आरोग्यसेवा कोलमडणार!

LetsUp | National

कोलकात्यामध्ये एनआरएस वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांचा आज (दि.14) एक दिवसाचा संप

🎯 हा संप सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार, यादरम्यान तातडीची वैद्यकिय सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग आणि वॉर्डमधील सेवा बंद राहणार

👉 या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशपातळीवर सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून काम करणार

🧐 नेमकं प्रकरण काय? : कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी एका वृद्धाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एका निवासी आणि एका इंटर्न डॉक्टरला मारहाण केली. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे

देशभरातील लाखो डॉक्टर आज संपावर गेल्याने त्याचा फटका रुग्णांना बसणार, अशात वैद्यकीय सेवा कोलमडण्याची शक्यता आहे

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👨‍⚕ आज जागतिक रक्तदान दिवस; करूया संकल्प रक्तदाता होण्याचा

LetsUp | Special

दरवर्षी 14 जून रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.

🎯 यंदाची थीम काय? : "Blood donation and universal access to safe blood transfusion"

🧐 रक्तदान दिवस आणि इतिहास :

जगातील रक्तसंक्रमणाची गरज आणि आवश्यक असलेल्या व्यक्तीस रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
14 जून 1868 रोजी कार्ल लँडस्टीनरच्या (Karl Landsteiner) वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
सन 2004 मध्ये "World Health Organization, रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटीजचे आंतरराष्ट्रीय फेडरेशन" यांनी 14 जून रोजी सर्वप्रथम साजरा केला गेला.

👍 लक्षात ठेवा!

रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही.
सुदृढ, सशक्त, रोग न झालेला कोणताही व्यक्ती रक्तदान करू शकतो.
वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते.
रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो.
रक्तदाताचे वजन साधारणतः 45 किलोच्या वर असावे.
रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
एकावेळी कोणाच्याही शरीरातून 471 एमएलपेक्षा जास्त रक्त घेतले जात नाही.
रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धुम्रपान करु नये. तसेच 48 तासांपूर्वी मद्यपान करु नये.
रक्तदान केल्यानंतर ज्यूस, चिप्स, फळं यांसारखा आहार करावा.

🤔 रक्ताविषयी तुम्हाला माहित आहे का?

जगातील पहिली रक्तपेढी 1937 साली स्थापन झाली.
मांजर या प्राण्यात रक्ताचे 11, कुत्र्यात 10 तर गाईमध्ये रक्ताचे 800 प्रकारचे रक्तगट असतात.
नवजात बाळाच्या शरीरात 250० मिली रक्त असते तर वृद्ध व्यक्तीच्या शरीरात 5 लिटर रक्त असते. हे प्रमाण शरीराच्या एकूण वजनाच्या 3 टक्के असते.
साधारणतः भारतात दर 3 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. जगात दररोज 40 हजार युनिट रक्त लागते.
आपल्या धमन्यातून वाहणारे रक्त सरासरी तशी 400 किमी वेगाने वाहते म्हणजे एका दिवसात रक्त शरीरात 9,500 किमीचा प्रवास करत असते.
रक्ताच्या एका थेंबात 10 हजार पांढऱ्या पेशी असतात आणि 1,50,000 प्लेटलेट असतात.

🤝 संकल्प करूया : अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते. म्हणूच रक्तदान सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. चला तर मग, आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प करूया.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! IIT-JEE चा निकाल जाहीर

LetsUp | Breaking

Indian Institute of Technology (IIT) प्रवेशसाठीच्या IIT-JEE Advanced प्रवेश निकाल जाहीर

🔝 महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ताने या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. 27 मे रोजी IIT मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.

🎯 विशेष :
कार्तिकेयनं जेईई ऍडव्हान्स परीक्षामध्ये 372 पैंकी 346 गुण मिळवले आहे.
जेईई ऍडव्हान्समध्ये टॉप करणारा कार्तिकेय सोशल मीडियाचा वापर करत नाही.

💁‍♂ पर्सेटाइल पद्धत : यंदा जेईईमध्ये पर्सेटाइल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब करण्यात आला होता. जागतिक स्तरावर वापरली जाणारी आणि अधिक शास्त्रशुद्ध अशी ही पद्धत आहे.

👉 येथे पाहू शकता निकाल :
1) jeeadv.ac.in
2) cbseresults.nic.in
3) results.nic.in

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 राज्यातील धरणांच्या दुरुस्तीसाठी 960 कोटी निधी मंजुर

LetsUp । Update

राज्यातील धरणांच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेने 960 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.

🎯 धरण दुरुस्ती प्रकल्प : देशातील धरणांच्या दुरुस्तीसाठी केंद्र शासनाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी साडेचार ते पाच हजार कोटी रुपये खर्च आहे. त्यापैकी राज्यातील धरण दुरुस्तीसाठी 960 कोटी रुपयांचा निधी जागतिक बँकेकडून उपलब्ध होणार आहे.

👍 या निधीतून राज्यातील 150 ते 175 धरणांची दुरुस्ती करणे शक्‍य होणार आहे.

💁‍♂ विशेष :
राज्यात सुमारे अडीच हजार धरणे आहेत.
यातील काही धरणे ही 100 वर्षे जुनी आहेत.
त्यापैकी 20 ते 25 धरणे ही मोठी आहेत.

🧐 तपासणीसाठी 4 पथके : धरणांच्या तपासणीसाठी विभागनिहाय चार पथके स्थापन करण्यात आली आहे. या पथकांमध्ये पाटबंधारे विभागाचे अभियंते, भूवैज्ञानिक, जलविद्युत क्षेत्रातील तज्ज्ञ आदी असणार आहे. हे पथक विभागनिहाय धरणांची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे.

📍 दुरुस्तीसाठी समिती स्थापन : या दुरुस्ती अभ्यासासाठी राज्यस्तरीय 16 जणांची समिती स्थापन केली आहे. ही समिती धरणांची निवड करणार आहे. दुरुस्तीचे निकष काय असतील, हे जागतिक बँकेने ठरवून दिले आहेत.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्त

LetsUp । Update

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची वर्णी

💁‍♂ विखेंचे प्रतिस्पर्धी : लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यातच विधानसभा निवडणुकाही जवळ आल्याने काँग्रेसने पक्षांतर्गत फेरबदल करत बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

📍 उपनेते व गटनेतेपद ? :

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

आमदार नसीम खान यांची विधानसभा उपनेतेपदी निवड केली आहे.

विजय वडेट्टीवार यांच्याकडे विधानसभेच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
जगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती

LetsUp । Education

💁‍♂ वस्तूचे नाव प्रमुख उत्पादक देश

तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.
गहू - चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.
मका - अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.
कापूस - चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.
ताग - बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान.
कॉफी - ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.
चहा - भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.
ज्वारी-बाजारी - भारत, चीन, रशिया.
बार्ली - रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.
रबर - मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.
ऊस - भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.
तंबाखू - अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त
कोको - घाना, ब्राझिल, नायजेरिया.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🌾 शेतकऱ्यांना 15 दिवसांत पिक कर्ज

LetsUp । Update

पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ, केंद्र सरकारने बॅंकांना दिले आदेश

🎯 सरकारचे विशेष अभियान : यामध्ये पात्र शेतक-यांचे अर्ज मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करावे, असे आदेश केंद्र सरकारने बॅँकांना दिले आहे. पिककर्जासाठीच शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड दिले जाते.

🧐 एवढे किसान कार्ड कार्यरत? :

सध्या 6.95 कोटी किसान क्रेडिट कार्ड कार्यरत आहेत.
त्या अंतर्गत सबसिडीच्या अनुदानित दराने पिकांसाठी कर्ज दिले जात आहे.
पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांना देखील किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आले आहे.

📍 व्याजदर : शेती कर्जावरील व्याजदर 9.% आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 7 टक्के प्रभावी दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळविण्यासाठी दोन टक्के व्याज अनुदान देत आहे. कर्जाच्या परतफेडसाठी शेतकऱ्यांना 3% अतिरिक्त रक्कम दिली जाते, प्रभावी व्याज दर 4% आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ ममता बॅनर्जींकडून बंगाली भाषाची सक्ती

वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर
भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट?

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani14June

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● मालिका-चित्रपटांची शीर्षके हिंदी, प्रादेशिक भाषांमध्ये देणे बंधनकारक; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश

● झारखंडमध्ये पुन्हा एकदा मोठा नक्षलवादी हल्ला, 5 पोलीस शहीद तर काही पोलीस झाले जखमी

● एससीओ शिखर परिषदेत दहशतवादासंदर्भात सदस्य देशांचा जाहीरनामा प्रसिद्ध : परराष्ट्र मंत्रालय

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये थैमान घातलेल्या 'चमकी' तापामुळे आतापर्यंत 62 लहान मुलांचा मृत्यू

● बिहारमधील वृद्धांसाठी नव्या सार्वत्रिक पेन्शन योजनेची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केली घोषणा

● बिग बीं कडून पुलवामातील 49 शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत

● मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

● KTM ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच लाँच होणार, किंमत अंदाजे 1.5 लाख रुपये असणार

● इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून केली मात; नाबाद शतकी खेळी करणारा जो रुट ठरला सामनावीर

● अभिनेत्री परिणीती चोप्रा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये, त्यासाठी बॅडमिंटनचा सराव सुरु

● अहमदनगर - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी 15 जूनपासून होणार सुरू

● अहमदनगर - राहाता तालुक्यातील मदनापूर येथील कत्तखान्यावर पोलिसांनी छापा; 50 गोवंशीय जनावरांची सुटका

● अहमदनगर - 50 टक्के वसुली न करणाऱ्यावर कारवाई करा; महापौर बाबासाहेब वाकळे यांचे आदेश

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. मध्ये 248 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या अशी

कस्टमर एजेंट : 111
ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल : 06
ड्यूटी ऑफिसर : 10
ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/Administration) : 11
असिस्टंट (HR/Administration) : 06
डेटा एनालिस्ट : 02
हॅंडीमन : 100
ऑफिसर (HR/Administration) : 01
ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/Administration) : 01

👍 नोकरी ठिकाण: मुंबई, नाशिक, शिर्डी, कोल्हापूर, नांदेड & दिल्ली

💸 फी : General/ OBC: ₹500/- (SC/ST/ExSM : फी नाही)

🌐 अधिकृत वेबसाईट: http://bit.ly/2WHaYAG

🗞 जाहिरात पाहा : http://bit.ly/31BAxlp

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 एटीएमध्ये कॅश नसेल तर बॅंकेला होणार दंड

LetsUp । Special

तीन तासांपेक्षा जास्त काळ एटीएम कॅशलेस न ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना निर्देश

🧐 जाणून घ्या कारण? : बहुतांश वेळा एटीएम मध्ये कॅश नसल्याची समस्या आपल्याला भेडसावते. परंतु यापुढे 3 तासाहून अधिक काळ एटीएम कॅशलेस राहिल्यास संबंधित बँकांना दंड ठोठविला जाणार आहे, असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहे.

📍 छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस कॅश उपलब्ध नसत.

👉 छोट्यात छोटी रक्कम काढण्यासाठी नागरिकांना बॅंकांच्या रांगेत उभे राहावे लागते.

💁‍♂ बँकांकडून दुर्लक्ष : एटीएम मध्ये असलेल्या सेंसरच्या माध्यमातून एटीएममधील कॅशच्या ट्रेमध्ये किती कॅश आहे हे बँकांना कळते. एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसेल तरी काही वेळा बँका याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💁‍♂ 2021 ची जनगणना होणार ऑनलाईन

LetsUp । Update

देशात 2021 साली होणाऱ्या जनगणना मोहिमेस सुरुवात

🎯 पहिला प्रयोग : भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्तांच्या कार्यालयामार्फत देशात जनगणना केली जाते. 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत माहितीचे संकलन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

📍 दोन महिने चाचणी : महाराष्ट्राच्या जनगणना संचालक रश्मी झगडे म्हणाल्या की, सन 2021 च्या जनगणनेसाठी चाचणीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. या चाचणी ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे.

💫 ऑनलाईनचे फायदे :
ऑनलाईन चाचणी यशस्वी झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
संशोधकांनाही आवश्यक तेव्हा जनगणनेची माहिती उपलब्ध होणार आहे.
तसेच प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धत सुनिश्चित करणे शक्य होणार आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎯 मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार

LetsUp । Update

अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला.

💁‍♂ राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवार (ता.16) रोजी होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

💫 या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून 2 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल.

👀 ही नावे चर्चेत :
मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे व आशिष शेलारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता.
अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक, व शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक अशा दोघांना संधी मिळू शकते.
रामदास आठवले यांच्या रिपाइंला एक मंत्रीपद मिळू शकेल.

📍 शिवसेनेत रस्सीखेच : मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद हवे आहे. शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद देण्यास रामदास कदम, सुभाष देसाई व दिवाकर रावते यांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरण्याची शक्यता कमी आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😍 उद्या वटपौर्णिमा; जाणून घ्या काही खास गोष्टी

LetsUp । Special

🎯 पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.

💁‍♂ कथा : सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या महिन्यात सर्व विवाहित महिला आपल्या सौभाग्यचे रक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून आजच्या दिवशी महिला प्रार्थना करतात.

🧐 वटवृक्षच का? : वटवृक्षाला संस्कृतमध्ये ‘अक्षयवृक्ष’ असे म्हटले जाते. ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘क्षय’ म्हणजे विनाश! ज्याचा कधीही विनाश होत नाही, अर्थात जो पुन्हा जिवंत होतो, वाढत जातो तो अक्षय वृक्ष म्हणजेच वटवृक्ष. त्यामुळेच पूर्वजांनी त्याला पूजेचा मान दिला आहे. म्हणूनच सावित्रीने नवर्‍याच्या आयुष्यवर्धनासाठी वडाचीच निवड केली असावी.

🌳 औषधी वटवृक्ष :
वटवृक्षाच्या सालींपासून अनेक रोगांवर गुणकारी औषधं बनवली जातात.
वटवृक्ष हा 24 तास प्राणवायू सोडणारा वृक्ष आहे.
स्त्रीच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा उपयोग होतो.
वटवृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे.
या वृक्षाची पाने तोडल्यावर निघाणार्‍या चिकने विंचवाचे विष कमी होण्यास मदत मिळते.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ पंतप्रधान मोदी 30 जूनला जनतेशी साधणार संवाद

भारत-पाक सामन्यापूर्वी कोहलीने घेतली पत्रकार परिषद
उद्धव ठाकरे उद्या अयोध्या दौऱ्यावर

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 bit.ly/Ltsupwani15June

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर बनविण्याचे लक्ष्य, नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं राज्यांना आवाहन

● बिहार, ओडिशा आणि गुजरातमधील 6 रिक्त जागांसाठी 5 जुलै रोजी मतदान: निवडणूक आयोग

● पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर संपावर ठाम, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे आवाहन धुडकावलं
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● बिहारमध्ये 60 वर्षांवरील सर्व वृद्ध व्यक्तींना मिळणार पेन्शन, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

● आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंना गन्नवरम विमानतळावर व्हीआयपी सुरक्षा नाकारली

● कर्नाटकाला दुष्काळासाठी हवीय 2064 कोटींची मदत,मुख्यमंत्री कुमारस्वामींनी पंतप्रधान मोदींशी भेटून केली चर्चा

● पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी ‘बेस्ट’च्या ताफ्यात या वर्षअखेर पर्यावरणस्नेही 80 बस दाखल होणार

● वाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका वाढला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

● पाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दुधाचा दर तब्बल 200 रुपये प्रतिलीटर

● विश्वचषक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने केला श्रीलंकेचा 87 धावांनी पराभव

● ‘सूर्यवंशी’ सिनेमात ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर पुन्हा एकदा अक्षय कुमार थिरकणार

● अहमदनगर: नगर जिल्हा विभाजनाबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री राम शिंदेसोबत बसून चर्चा करणार - खासदार डॉ. सुजय विखे

● अहमदनगर : राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला आमदार संग्राम जगतापांची दांडी; नगरसेवकांनीही फिरवली पाठ

● अहमदनगर : जिल्ह्यातील जवळपास 23 शासकीय रुग्णालयांमध्ये बसविले जाणार सीसीटीव्ही कॅमेरा

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup