LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

'मोगरा फुलला' 14 जूनला होणार रिलीज :
अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिका असलेला 'मोगरा फुलला' हा सिनेमा 14 जून 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक नातेसंबंध जोपासणारा कौटुंबिक सिनेमा आहे.

या सिनेमाची गाणी अभिषेक कणखरनी लिहिली असून रोहित राऊतने ती संगीतबद्ध केली आहेत. शंकर महादेवन, रोहित राऊत, बेला शेंडे, जसराज जोशी यांनी ती गायली आहेत. सिनेमात स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक यांसह अन्य कलाकार आहे.

रिंकू ठरतेय मराठीतील महागडी अभिनेत्री : सैराट सिनेमाने प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. लवकरच रिंकूचा 'मेकअप' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या सिनेमासाठी रिंकूला तब्बल 27 लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे.

'सूर्यवंशी' या दिवशी होणार प्रदर्शित: बॉक्स ऑफिसवर क्लॅशपासून वाचण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी' सिनेमाची तारिख बदलली आहे. हा सिनेमा 2020 मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु याच दिवशी संजय लीला भंन्साळी दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' प्रदर्शित होणार आहे.

पडद्यावर दोन मोठ्या कलाकारांचे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने दोन्ही सिनेमांना नुकसान होते. यामुळे रोहित शेट्टीने आपल्या 'सूर्यवंशी' सिनेमाची प्रदर्शनाची तारिख बदलली आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🦎 पाल घरातून घालवण्यासाठी करा हे उपाय

LetsUp । Tips

🎯 अनेकांच्या घरात पाल येण्याची मोठी समस्या असते. पाल स्वयंपाकघरात असेल तर ती खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये पडण्याचाही धोका असतो. तर काही घरगुती उपायांनी पाल घालवण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या काही उपाय...

----------------------
👍 इंस्टाग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा स्पेशल अपडेट :
फॉलो इंस्टाग्राम : https://ltsup.in/2vFUitw
----------------------

कांदा-लसून : कांद्याचा रस आणि काही लसनाच्या पाकळ्यांचा रस एकत्र करा. त्यात थोडं पाणी मिसळून हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरा. ज्या ठिकाणी पाल येते त्याठिकाणी हे मिश्रण शिंपडावं. त्यामुळे पाल आपोआप निघून जाईल. लसनाच्या पाकळ्याही पाल येते त्या ठिकाणी ठेवल्यासह फायदा होतो.

काळी मिरी : काळी मिरी पावडर पाण्यात मिसळून एका बाटलीत भरा. त्यानंतर हे पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा त्यामुळे पाल घरात येण्यास प्रतिबंध लागतो.

मोरपिस : घरात ज्या ठिकाणी पाल आली आहे, त्याठिकाणी मोरपिस लावल्यासही पाल घरांतून पळून जाते. पालीला मोरपिस म्हणजे साप किंवा कोणतातरी प्राणी वाटतो, जो तिला खाईल. त्यामुळे पाल त्या जागी येत नाही.

अंड्याचं कवच : पाल येण्याच्या ठिकाणी अंड्याचं कवच ठेवल्यानेही पाल घरात येत नाही. खिडक्यांच्या कोपऱ्यात कवच ठेवल्याने पालींना आत येण्यास अटकाव होतो.

कॉफी आणि तंबाखू : कॉफीमध्ये तंबाखू मिसळून त्याचे गोळे तयार करा. ज्या ठिकाणांहून पाल येते त्या ठिकाणी हे गोळे ठेवल्यानेही पाल घरात येत नाही.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ सोनिया गांधी पहिल्यांदाच रायबरेली दौऱ्यावर

नीरव मोदीचा जामीन अर्ज चौथ्यांदा नाकरला
सॅमसंगचा गॅलक्सी एम 40 स्मार्टफोन भारतात लॉंच

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani12June

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😍 शेवटचे काही तास शिल्लक!

👍 नक्की लाभ घ्या अ‍ॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्टचा

🎉 मोबाईल आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट!

🎯 विविध मॉडेल्सवर डिस्काऊंट, नो-कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर्स आदी मिळणार

👍 नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची अखेरची संधी सोडू नका!

होम प्रॉडक्टवर 75% डिस्काउंट I गोल्ड कॉईनवर 10% डिस्काउंट

👉 ऑफरसाठी क्लिक करा: https://amzn.to/31jEJ9m

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● काश्मीरमध्ये CRPF च्या पथकावर दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद तर एका दहशतावाद्याचा खात्मा

● पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी; जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट आणखी वाढवण्याचा निर्णय

● गुजरातमधील 1 लाख 60 हजार नागरिक सुरक्षितस्थळी; वायू चक्रीवादळाच्या मुकाबल्यासाठी लष्कर, हवाई दलाची पथके तैनात

● मॅरी मिकरच्या इंटरनेटसंबंधी 2019च्या अहवालानुसार, इंटरनेटच्या वापराबाबत भारत जगात दुसऱ्या स्थानावर

● RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची लवकरच इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती होण्याची शक्यता

● बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील 2100 शेकऱ्यांचे कर्ज फेडले, याबाबत स्वत:च्या ब्लॉगद्वारे दिली माहिती

● मुंबईत पाणी महागणार; पाणीपट्टीचे दर अडिच टक्क्याने वाढले, 16 जून पासून नवीन दरवाढ लागू होणार

● PUBG खेळणाऱ्यांसाठी आनंदाची, अनेक चाचण्यांनंतर भारतात ‘PUBG Lite’ हे नवं व्हर्जन लाँच होणार

● ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर 41 धावांनी शानदार मात; सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ठरला सामनावीर

● रणवीर-दीपिका पदुकोण ही बहुचर्चित जोडी '83' चित्रपटामध्ये ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारणार

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏏 ऑस्ट्रेलियाचा विजय; आज भारत-न्यूझीलंड भिडणार

LetsUp | #CWC 2019

डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि पॅट कमिन्सच्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 41 धावांनी विजय

💁‍♂ ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान समोर 307 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 266 धावाच करू शकला

🏆 107 धावांची जिगरबाज खेळी करणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ठरला सामनावीर

----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा: http://bit.do/eT6Mg
----------------------

भारत Vs न्यूझीलंड

🧢 यंदाच्या विश्वचषकात आत्तापर्यंत अपराजित असलेले संघ म्हणजे भारत आणि न्यूझीलंड आज भिडणार

ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे दोन्ही संघांचा विजयरथ पाऊस रोखण्याची चिन्हे

🧐 आमने-सामने इतिहास :

वर्ल्डकप 7 वनडे I न्यूझीलंड : 4 विजय I भारत : 3 विजय
106 वनडे I भारत : 55 विजय I न्यूझीलंड : 5 विजय I अनिर्णित : 5 I टाय : 1

🎯 स्थळ : ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम. I वेळ : दु. 3 वाजता

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 दहावी-बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर

LetsUp | Update

🎯 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी : लेखी परीक्षा 17 ते 30 जुलै
बारावी : लेखी परीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा : 9 ते 16 जुलै (शाळा आणि कॉलेजस्तरावर)

🌐 परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://mahahsscboard.maharashtra.gov.in/

🗣 छापील वेळापत्रकच अंतिम : वेबसाईटवरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी मिळणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल : डॉ. अशोक भोसले, राज्य शिक्षण मंडळ सचिव

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🚫 आज पुणे-मुंबई महामार्गावर मेगाब्लॉक

LetsUp | Pune-Mumbai

📍 आज (गुरुवारी) 12 ते 2 या वेळात या महामार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार

💁‍♂ त्यानुसार मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने वळविण्यात येणार तर या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेबण्यात येणार

🤔 मेगाब्लॉक का? : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे मेगाब्लॉकचा निर्णय

📣 महामार्ग पोलिसांचे आवाहन : हा बदल केवळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे. तर पुण्याकडे येणारी वाहतूक नियमितपणे सुरू असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे महामार्ग पोलिसांच्या वतीने आवाहन

टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🤔 तुम्हाला माहित आहे का?

LetsUp | Do U Know

1) रशिया हा सर्वाधिक प्राणवायू निर्माण करणारा जगातील एकमेव देश आहे. कारण रशिया आकाराने मोठा आहेच पण जगातील झाडांच्या एकूण संख्येपैकी 25 टक्के झाडे एकट्या रशियात आहेत.

2) डेन्मार्कमध्ये सरकारने नवजात बाळांची नावे असणारी 7 हजार नावांची यादी तयार केली आहे त्यातून निवडून एक नाव बाळाला ठेवता येते.

3) जपानमध्ये तुम्ही इमोशनल सिनेमा पाहायला जात असाल तर भाडोत्री सोबत घेऊ शकता. हा सोबती तुमच्याबरोबर सिनेमा पाहतो आणि तुम्ही भावना वेगाने रडत असाल तर तो तुमचे अश्रू पुसतो.

4) मलेशियामध्ये पिवळे टी शर्ट वापरण्यावर बंदी आहे. कारण तेथे काही वर्षापूर्वी विरोधकांनी पिवळे कपडे घालून निदर्शने केली आणि पंतप्रधानांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर!

LetsUp । Update

शुक्रवार 14 जून रोजी होणारा मंत्री मंडळाचा विस्तार लांबणीवर गेला आहे.

🧐 विस्तार लांबणीची कारणे? :

मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेसोबत भाजपमध्येही धुसफूस पाहायला मिळत आहे.
पद आणि विभागांचं वाटप निश्चित होत नाहीत, तोपर्यंत विस्तारावर निर्णय नको. अशी परिस्थितीत निर्माण.
आयात नेत्यांना विस्तारात प्राधान्य मिळत असल्याने दोन्ही पक्षात अंतर्गत कलह सुरू.
विधानपरिषदेतल्या आमदारांना मंत्रिपद द्यायला विधानसभेतल्या आमदारांचा विरोध.

💫 विधानसभेची तयारी सुरु : ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. लोकसभेत मिळालेल्या यशानंतर शिवसेना-भाजपने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमिवर मंत्रिमंडळात कोणाच्या पदरी काय पडणार याबाबत सस्पेंस कायम आहे.

📍 पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? याबाबत नेत्यांमध्ये उत्सुकता.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😍 पोस्टाच्या गुंतवणूक योजना

LetsUp । Govt. Scheme

🎯 उत्तम भविष्यासाठी गुंतवणूक हा योग्य पर्याय आहे. पण, कुठे आणि कशी गुंतवणूक करावी? हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो. यासाठी आम्ही तुम्हाला देतोय पोस्ट गुंतवणुकीच्या काही पर्यायांची माहिती...

💁‍♂ गुंतवणुकीसाठी या योजना फायदेशीर :

1) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट : ही एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये दीड लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असतं. या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास 8.5 टक्के व्याज मिळतं.

2) किसान विकास पत्र : या योजनेंतर्गत 100 महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कमेच्या दुप्पट पैसे तुमच्या खात्यात जमा होणारी ही योजना आहे. कमीत कमी 1000 रुपये भरून तुम्ही ही योजना सुरू करू शकता.

3) सुकन्या योजना : पोस्ट ऑफिसची ही स्कीम मुलींकरता आहे. या योजनेत एका वित्तीय वर्षात तुम्ही 1,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत 9.2 टक्के व्याज दिलं जातंय. खातं उघडल्यानंतर 14 वर्षांपर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता. मुलगी जेव्हा 21 वर्षांची होईल तेव्हा तुम्ही पैसे काढून घेऊ शकता.

4) मासिक उत्पन्न योजना : या योजनेंतर्गत तुम्हाला 8.40 टक्के दरानं व्याज मिळतं. परंतु, हा दर दरवर्षी बदलतो. या खात्यात कमीत कमी 1500 रुपये ठेवणं जरुरी आहे.

5) सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम : वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी ही योजना आहे. लाभार्थी पाच वर्षांसाठी आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकतो. यावर, शिल्लक असलेल्या रकमेवर 9 टक्के व्याज मिळतं.

6) टाईम डिपॉझिट स्कीम (टीडीएस) : टीडीएस ही योजना पाच वर्षांसाठी आहे. कमीत कमी 200 रुपये भरून ही योजना तुम्ही सुरू करू शकता. पहिली चार वर्ष 8.4 टक्के व्याज मिळतं.

7) सेव्हिंग अकाऊंट : पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक 4 टक्क्यांनी व्याज दिलं जातं. केवळ 20 रुपये भरून कोणतीही व्यक्ती आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकते.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 भारत बनवणार अंतराळात स्वतःच स्पेस स्टेशन

LetsUp । Breaking

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) अंतराळात स्वत:चं स्पेस स्टेशन बनवण्याच्या तयारीत

💁‍♂ भारताचं स्वत:चं स्पेस स्टेशन बनवण्याची योजना इस्रोत सुरू आहे. भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'गगनयान मिशन'चाच हा विस्तार असेल. अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिली.
________

मायमराठीत यंदा सर्वाधिक नापास का? तुमची प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupsurvey
_________

🛰 गगनयान मोहीम : डिसेंबर 2021 पर्यंत अवकाशात माणूस पाठवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. गगनयान मोहिमेद्वारे भारताचं हे स्वप्न साकार होणार आहे.

👍 नियोजित वेळेत हे उद्दिष्ट गाठले तर स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक असणार आहे.

👌 विशेष :

चांद्रायन-2 नंतर भारताने आता शुक्र आणि सुर्याच्या अभ्यासाचे लक्ष्य निश्चत केले आहे.
भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमांसाठी याचा मोठा फायदा होऊ शकतो.
अंतराळ क्षेत्रात सर्वात आघाडीवर असलेला देश होण्याचं भारताच उद्दिष्ट आहे.

📍 सध्या अंतराळात दोनच स्थानके असून, एक आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक तर दुसरे चीनचे स्वतःचे अंतराळस्थानक आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👗 फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या वाटा

LetsUp | Career

👉 जुन्या स्टाईलचे कपडे नवे रुपडं धारण करून ते पुन्हा बाजारात आणणे आणि त्याला चांगल्या प्रकारे किंमत मिळवून देणे, हे कसब आणि कौशल्य फॅशन डिझायनरचे असते. चित्रकलेची, रेखाटनाची आवड तसेच निरीक्षण, कल्पकता, सृजनशीलता, नावीन्य, निर्मिती, तंत्रज्ञान, संवाद कौशल्य इत्यादींचे ज्ञान आवश्यक आहे. यामध्ये 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत अशा वेगवेगळ्या कालावधीचे अभ्यासक्रम असतात.

कोर्सेस आणि अभ्यासक्रम : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि पर्ल या व्यतिरिक्त अन्य संस्थांतूनही प्रशिक्षण घेता येते. फॅशन डिझाईनमध्ये गारमेंट, लेदर, अ‍ॅक्सेसेरिज आणि ज्वेलरी डिझाईन तसेच फॅशन बिझनेस मॅनेजमेंट, फॅशन रिटेल मॅनेजमेंट, फॅशन मार्केटिंग हे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

पात्रता : विज्ञान, कला, वाणिज्य यांसारख्या कोणत्याही शाखेचे विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतात. काही संस्थामध्ये प्रवेशापूर्वी चाचणी परीक्षाही घेतात, तर काही ठिकाणी केवळ 10-12 वीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. अनेक संस्थेत प्रवेशासाठी लेखी परीक्षा, समूह चर्चा, मुलाखत यांचा प्रवेशासाठी निकष ठेवण्यात येतो.

करिअरच्या वाटा : या क्षेत्रात क्रिएटिव्हीटी आणि टॅलेंटला अनेक संधी उपलब्ध आहेत.फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रोडक्शन, मार्केटिंग, फॅशन रिटेल कंपनी, ब्युटीक्स, एक्स्पोर्ट हाऊस, मॅन्युफॅक्चिरग युनिट या ठिकाणी संधी मिळतील. फॅशन मीडिया क्वालिटी कंट्रोल, फॅशन अ‍ॅक्सेसरिज डिझाईन आणि ब्रँड प्रमोशन, कॉश्च्यूूम डिझायनर, फॅशन कन्सल्टंट, टेक्निकल डिझायनर, ग्राफिक डिझायनर, प्रोडक्शन पॅटर्न मेकर, फॅशन कोऑर्डीनेटर आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अनुभवानंतर स्वत:चा व्यवसाय सुद्धा सुरू करता येऊ शकतो.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ वायुदलाच्या AN-32 विमानातील सर्व जवानांचा मृत्यू

मीटू प्रकरणात नाना पाटेकरांना क्लीनचीट
बहुचर्चित 'साहो' सिनेमाचा टिझर रिलीज

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani13June

---------------------------

😍 फ्लिपकार्टवर 'नॉक आऊट' सेल सुरु, स्मार्टफोन खरेदीवर मिळवा सूट, वडिलांना गिफ्ट देऊन यंदाचा 'फादर्स डे' बनवा खास , 👉 त्यासाठी क्लिक करा: http://fkrt.it/qZye4cNNNN

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😍 खुशखबर! फ्लिपकार्टवर ऑफरचा पाऊस

💁‍♂ सादर आहे आपल्यासाठी 'नॉक आऊट' सेल (16 जून पर्यंत)...

🎉 सेलमध्ये ऑनर, रेडमी, ओप्पो, व विवो या मोबाईलवर मिळवा खास ऑफर

🧐 सेलमध्ये नामांकित स्मार्टफोन्सवर सूट :

ऑनर 9N : ~15,999 नव्हे 8,999 ₹ (4 जीबी रॅम आणि 64 जीबी)
ऑनर 9i : 19,499 नव्हे 8,999 ₹ (4 जीबी रॅम आणि 64 जीबी)
रेडमी 6 : 8,999 नव्हे 7,499 ₹ (Up To 64 जीबी)
रेडमी नोट 6 प्रो : 17,999आणि 13,999 ₹
रेडमी नोट 7S : 10,999 ₹
विवो व्ही 15प्रो आणि विवो वाय 81 : अनुक्रमे 26,990 आणि 7,990 ₹
ओप्पो एफ 11 प्रो : 28,990 नव्हे 20,990 ₹ (6 जीबी रॅम आणि 64 जीबी)

🎯 विविध मॉडेल्सवर डिस्काऊंट, नो-कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर्स आदी मिळणार

📱 यंदाचा 'फादर्स डे' बनवा खास... द्या तुमच्या वडिलांना स्मार्टफोन गिफ्ट...

अवघ्या 199 रुपयांमध्ये खरेदी करा आपल्या आवडीचे मोबाईल कव्हर

👍 मग विचार कसला करताय? अशी संधी परत येत नाही, त्वरा करा!

👉 ऑफरसाठी क्लिक करा : http://fkrt.it/qZye4cNNNN

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● फोर्ब्जकडून जगातल्या 2 हजार सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी जाहीर, यात भारताच्या 57 कंपन्यांचा समावेश

● ग्रामीण भागातील लोकांना आता सुविधा सेवा केंद्रांवरून पुन्हा आधारसंबंधी सेवा उपलब्ध होणार

● केंद्र सरकारचा राज्य सरकारी विमा योजनेतील अंशदान दर 6.5 टक्क्यांवरून 4 टक्के करण्याचा निर्णय

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● राष्ट्रपती भवनात उद्या 15 जून रोजी होणार नीती आयोगाची बैठक; पंतप्रधान मोदी असणार अध्यक्षपदी

● गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भविष्यवाणी, 'भारत आणि इंग्लंडमध्ये होणार विश्वचषक फायनल'

● रक्त संकलनात वाढ, राज्यात सर्वाधिक रक्त संकलनात मुंबई पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

● ज्येष्ठ अभिनेते व रंगभूषाकार तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अनंतराव जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

● वैद्यकीय मराठा आरक्षण; आव्हान याचिका फेटाळली, वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

● भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आलेत

● ‘दबंग 3’च्या आयटम सॉंगमध्ये दिसणार ‘लव्हयात्री’ फेम अभिनेत्री वरिना हुसेन

● अहमदनगर - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी परिवहन महामंडळाच्या नगर विभागाकडून जादा वाहतुकीचे नियोजन; 300 जादा बसेस सोडणार

● अहमदनगर - आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले दिसेल : खासदार सुजय विखे

● अहमदनगर - केडगाव उपनगरामध्ये काही ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन्स असल्याचे स्पष्ट, महापौर वाकळे यांनी दिले कारवाईचे आदेश

● अहमदनगर - जिल्ह्यातील 3 हजार 285 शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात येणार, बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरु

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏏 भारत-न्यूझीलंड सामना रद्द; आज इंग्लड Vs वेस्टइंडीज सामना

LetsUp | #CWC 2019

भारत-न्यूझीलंड सामन्यात अखेर पावसानेच मारली बाजी, सामना रद्द केल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला

💁‍♂ आता भारताचा पुढील सामना येत्या रविवारी 16 जूनला पाकिस्तानसोबत होणार आहे

👀 विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की, एका विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा अधिक सामने एकही चेंडू न खेळता पावसामुळे रद्द झाले आहेत

💁‍♂ विश्वचषकात एकही चेंडूचा खेळ न होता रद्द झालेले सामने

श्रीलंका Vs वेस्ट इंडिज : 1979
ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश : 2015
पाकिस्तान Vs श्रीलंका : 2019
बांगलादेश Vs श्रीलंका : 2019
भारत Vs न्यूझीलंड : 2019

🗣 धवनच्या दुखापतीवर विराट अपडेट : दरम्यान विराटने शिखर धवनच्या दुखापती बाबत अपडेट दिले आहे. विराट म्हणाला, 'दोन आठवडे तरी त्याला प्लास्टर असेल. तो लवकर बरा होईल. साखळी फेरीत शेवटच्या सामन्यासाठी किंवा सेमी फायनलपर्यंत तरी तो संघात परत येईल.

👍 गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी : 10 संघांच्या गुणतालिकेत 7 गुणांसह न्यूझीलंड पहिल्या, 6 गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर 5 गुणांसह भारत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

🚫 पंतला ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी! : आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांनुसार फक्त संघात निवड झालेल्या खेळाडूंनाच संघासोबत प्रवास करता येतो आणि ड्रेसिंग रुममध्ये जाता येते. त्यामुळे रिषभ पंत जरी इंग्लंडला पोहोचला तरी त्याला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नाही.

आजचा सामना (14 जून)

🧢 इंग्लड Vs वेस्टइंडीज
👉 ठिकाण : द रॉझ बाउल, साउथम्पटन.
🕒 वेळ : दुपारी 3 वाजता.

साउथम्पटनमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे या लढतीतही पावसाची शक्यता आहे

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💁‍♂ देशभरातील डॉक्टर आज संपावर; आरोग्यसेवा कोलमडणार!

LetsUp | National

कोलकात्यामध्ये एनआरएस वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांचा आज (दि.14) एक दिवसाचा संप

🎯 हा संप सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार, यादरम्यान तातडीची वैद्यकिय सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग आणि वॉर्डमधील सेवा बंद राहणार

👉 या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशपातळीवर सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून काम करणार

🧐 नेमकं प्रकरण काय? : कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी एका वृद्धाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एका निवासी आणि एका इंटर्न डॉक्टरला मारहाण केली. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे

देशभरातील लाखो डॉक्टर आज संपावर गेल्याने त्याचा फटका रुग्णांना बसणार, अशात वैद्यकीय सेवा कोलमडण्याची शक्यता आहे

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👨‍⚕ आज जागतिक रक्तदान दिवस; करूया संकल्प रक्तदाता होण्याचा

LetsUp | Special

दरवर्षी 14 जून रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.

🎯 यंदाची थीम काय? : "Blood donation and universal access to safe blood transfusion"

🧐 रक्तदान दिवस आणि इतिहास :

जगातील रक्तसंक्रमणाची गरज आणि आवश्यक असलेल्या व्यक्तीस रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
14 जून 1868 रोजी कार्ल लँडस्टीनरच्या (Karl Landsteiner) वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
सन 2004 मध्ये "World Health Organization, रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटीजचे आंतरराष्ट्रीय फेडरेशन" यांनी 14 जून रोजी सर्वप्रथम साजरा केला गेला.

👍 लक्षात ठेवा!

रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही.
सुदृढ, सशक्त, रोग न झालेला कोणताही व्यक्ती रक्तदान करू शकतो.
वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते.
रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो.
रक्तदाताचे वजन साधारणतः 45 किलोच्या वर असावे.
रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
एकावेळी कोणाच्याही शरीरातून 471 एमएलपेक्षा जास्त रक्त घेतले जात नाही.
रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धुम्रपान करु नये. तसेच 48 तासांपूर्वी मद्यपान करु नये.
रक्तदान केल्यानंतर ज्यूस, चिप्स, फळं यांसारखा आहार करावा.

🤔 रक्ताविषयी तुम्हाला माहित आहे का?

जगातील पहिली रक्तपेढी 1937 साली स्थापन झाली.
मांजर या प्राण्यात रक्ताचे 11, कुत्र्यात 10 तर गाईमध्ये रक्ताचे 800 प्रकारचे रक्तगट असतात.
नवजात बाळाच्या शरीरात 250० मिली रक्त असते तर वृद्ध व्यक्तीच्या शरीरात 5 लिटर रक्त असते. हे प्रमाण शरीराच्या एकूण वजनाच्या 3 टक्के असते.
साधारणतः भारतात दर 3 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. जगात दररोज 40 हजार युनिट रक्त लागते.
आपल्या धमन्यातून वाहणारे रक्त सरासरी तशी 400 किमी वेगाने वाहते म्हणजे एका दिवसात रक्त शरीरात 9,500 किमीचा प्रवास करत असते.
रक्ताच्या एका थेंबात 10 हजार पांढऱ्या पेशी असतात आणि 1,50,000 प्लेटलेट असतात.

🤝 संकल्प करूया : अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते. म्हणूच रक्तदान सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. चला तर मग, आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प करूया.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup