LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🏏 आफ्रिका-वेस्ट इंडिज सामना रद्द; आज श्रीलंका Vs बांगलादेश सामना

LetsUp | #CWC 2019

पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिका- वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना रद्द करण्यात आला

🎯 यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण बहाल, यासह द. आफ्रिकेने उघडले गुणांचे खाते

----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : http://bit.do/eT6Mg
----------------------

आज श्रीलंका Vs बांगलादेश

📍 वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात लढत रंगणार

दोन्ही संघांच्या प्रत्येकी 3 लढती झाल्या असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित 6 पैकी किमान 5 लढती जिंकणे आवश्यक

🧐 आमने-सामने इतिहास :

एकदिवसीय सामने : 45 I श्रीलंका : 36 I बांगलादेश : 7 I टाय / रद्द : 2
विश्वचषकात सामने : 3, श्रीलंका : 3 I बांगलादेश : 0, टाय / रद्द : 0

👉 स्थळ : ब्रिस्टल. I वेळ : दु. 3.00 वाजता

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🚫 2020 नंतर जुन्या वाहनांना ‘नो एंट्री’

LetsUp | National

💁‍♂ 1 एप्रिल 2020 नंतर जुनी वाहने रस्त्यावर आणू देणार नसल्याचे केंद्र सरकारने दिले संकेत.

🎯 जुन्या वाहनांमुळे देशात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय.

👍 जुन्या वाहनांचे प्रमाण कमी व्हावे तसेच जुनी वाहने भंगारात घालण्यासाठी आकर्षक योजना तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न.

🗣 एका मुलाखतीदरम्यान केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

📍 केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जुनी वाहने मोडीत घालण्यासाठी भंगार योजनेचा प्रस्ताव तयार केला होता.

📝 प्रस्तावात काय म्हटले आहे? :

भंगार योजनेच्या नियमावलीमध्ये 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे वापरात असलेल्या व्यावसायिक वाहनांच्या मालकांनी आपली वाहने भंगारात घालून नव्या वाहनांची खरेदी करण्याची तयारी दाखविल्यास त्यांना आर्थिक सवलत देण्यात येईल.
15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या व्यावसायिक वाहन भंगारात घातल्यानंतर पंधरा लाख रुपयांपर्यंतचे नवे व्यावसायिक वाहन खरेदी केल्यास संबंधिताला पाच लाख रुपयांपर्यंत सवलत देण्यात येईल.

हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास सध्या रस्त्यावर धावणारी 2.80 कोटी वाहने भंगारात निघण्याची शक्यता

💫 'महिंद्रा आणि महिंद्रा'चा पुढाकार; सिरोची स्थापना :

'महिंद्रा आणि महिंद्रा' कंपनीने 'एमएसटीसी' या सरकारी कंपनीच्या सहकार्याने गेल्या वर्षीपासून जुन्या गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
त्यासाठी दोन्ही कंपन्यांनी मिळून 'सिरो'(सीईआरओ) या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीने जुन्या वाहनांची खरेदी करण्यासाठीचा पहिला प्रकल्प ग्रेटर नोएडामध्ये उभारला आहे.

🧐 'सिरो' काय करणार? : 'सिरो' ग्राहकांकडून जुनी वाहने खरेदी करून त्या बदल्यात ग्राहकांना योग्य ती किंमत देईल. यानंतर जुन्या वाहनांचे भंगारात रूपांतर करण्यात येईल. जुन्या वाहनांची किंमत त्यांचे आयुष्यमान आणि सध्याच्या स्थितीवर निश्चित करण्यात येणार आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 384 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव : शहर समन्वयक

🎓 शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Sc./B.Arch/ B.Planning
(ii) 01 वर्ष अनुभव

🧐 वयाची अट : 01 जून 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत.

----------------------
📍 नोंदणी करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, लाखो संधी एकाच ठिकाणी सादर आहे तुमच्यासाठी, 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------

👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र I फी नाही.

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 17 जुलै 2019

🗞 जाहिरात पहा : http://bit.ly/2WBSDEZ

👉 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/2KHv46A

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎯 Letsup I General Knowledge

1) कोणत्या पुरुष टेनिसपटूने फ्रेंच ओपन (रोलँड गॅरोस) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले?

उत्तर : राफेल नदाल (बाराव्यांदा जेतेपद)

2) भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाकडून 300 कोटी रुपयांचे शंभर “SPICE 2000” हे गाईडेड बॉम्ब विकत घेण्यासाठी करार केला?

उत्तर : इस्राईल

3) निर्देशने करणार्‍या लोकांना ठार मारण्याच्या क्रूर कारवाईनंतर आफ्रिकी संघाने (AU) नागरी प्रशासनाच्या स्थापनेपर्यंत कोणत्या देशाचे सदस्यत्व निलंबित केले?

उत्तर : सुदान

4) कोणत्या राज्य सरकारने महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी नव्या प्रकाराचे ‘पिंक सारथी’ वाहन सादर केले?

उत्तर : कर्नाटक

5) 2019 सालाचा संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘इक्वेटर’ पारितोषिक कोणत्या भारतीय संघटनेला प्राप्त झाला?

उत्तर : डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी

6) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?

उत्तर : धीरूभाई नारनभाई पटेल

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 384 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव : शहर समन्वयक

🎓 शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Sc./B.Arch/ B.Planning
(ii) 01 वर्ष अनुभव

🧐 वयाची अट : 01 जून 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत.

----------------------
📍 नोंदणी करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, लाखो संधी एकाच ठिकाणी सादर आहे तुमच्यासाठी, 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------

👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र I फी नाही.

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 17 जुलै 2019

🗞 जाहिरात पहा : http://bit.ly/2WBSDEZ

👉 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/2KHv46A

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😱 दुखापतग्रस्त शिखर धवन विश्वचषकातून बाहेर

LetsUp । Breaking

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात जखमी भारतीय सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातून ३ आठवड्यांसाठी बाहेर

💁‍♂ भारतीय संघाला मोठा धक्का : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात धवनच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं.

📍 भारत- पाक सामन्यास मुकला : विश्वचषकात भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध 13 जून रोजी होणार आहे. या सामन्यात शिखर धवन खेळू शकणार नाहीच. पण त्यापुढचा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही शिखर धवन मुकणार आहे. भारत - पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मँचेस्टर इथं सामना होणार आहे.

🤔 सलामीवीर कोण ? : धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत सलामीला के एल राहुल. खेळण्याची शक्यता आहे. राहुलशिवाय विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये सलामीला येऊन मोठ्या खेळी केल्या आहेत.

शिखर धवनच्या अनुपस्थितीत रवींद्र जाडेजा किंवा विजय शंकर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.

टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
ब्रेकिंग! वायुसेनेच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले

LetsUp । Breaking

भारतीय वायुसेनेचं गायब झालेलं AN-32 विमानाचे अवशेष अखेर अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात सापडले.

🧐 कोठे सापडले अवशेष? : शोध मोहिमेदरम्यान या बेपत्ता विमानाचे काही भाग दिसले आहेत. विमानानं उड्डाण केलेल्या ठिकाणाहून 15 ते 50 किमी अंतरावर हे अवषेश सापडले आहेत. तर विमानाच्या अन्य भागाचा शोध घेणे सुरू आहे. भारतीय वायुसेनेनं ट्वीट करून त्याची माहिती दिली आहे.

💁‍♂ घटनाक्रम :
हे विमान 3 जून रोजी जोराहाट येथून निघाले होते व त्यानंतर ते बेपत्ता झाले होते.
या विमानामध्ये 8 क्रू मेंबरसह 13 प्रवासी होते.
विमानातील कुणी वाचलं आहे का, याचा शोध सध्या घेतला जात आहे.

💰 बक्षीस जाहीर : विमानाची माहिती देणार्‍याला 5 लाखांचे बक्षिस हवाई दलाकडून जाहीर करण्यात आले होते. तसेच विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व यंत्रणा कामाला लावल्या होत्‍या.

टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎯 मुलांच्या अंगभूत गुणांना ओळखून चालना द्या

LetsUp । Parenting

💫 व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विकास म्हणजे शिक्षण, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यानुसार आपल्या लाडक्या पाल्यांचे गुण ओळखून त्यांच्या विकासाकडे जर लक्ष दिले तर त्यांच जीवन उजळून निघेल व पालकांनाही समाधान मिळेल.

👉🏻 पाल्याच्या विकासासाठी पालकांनी या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

💁‍♂ पालकांसाठी टिप्स

स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करतांना मुलं जीवाचं रान करतात, याची जाणीव पालकांनी ठेवावी

पालकांनी पाल्यांवर दबाव टाकू नये, दबाव टाकल्याने मुलं आत्मविश्वास गमावतात

धोपटमार्ग अवलंबवावा असा आग्रह पालकांनी करू नये

पाल्याच्या बुद्धीमत्ता पाहून, त्याची आवड जपावी

आपल्या पाल्याच्या शारीरिक व मानसिक स्‍थ‌ितीचा विचारही पालकांनी करावा

पाल्याला अभ्यासात पालकांनी सहकार्य करणे अपेक्षीत

पाल्याचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी पालकांनी वर्तवणुकीत परिवर्तन करावे

आपल्या इच्छा आकांक्षा मुलांनी पूर्ण कराव्यात ही अपेक्षाचं मुळी चुकीची. त्यांना कशात रस आहे हे जाणून त्याचप्रमाणे मार्ग काढणे हे हितकरच

आई-वडिलांनी कोणतीही जबरदस्ती न करता मुलांना हवे ते विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 बँक खातेधारकांना मिळणार या सवलती

LetsUp । Special

भारतीय रिझर्व्ह बँकेने किमान खातेधारकांच्या सोयीसाठी लागू केली नवी नियमावली.

1 जुलैपासून खातेधारकांना चेकबूकसह अन्य काही सोयी मोफत मिळणार आहे. यासह खातेधारकांना किमान शिल्लक रक्क्म ठेवण्याची सक्तीही बँका करू शकणार नाहीत.

--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला: https://twitter.com/LetsUp_
--------------------

😍 खातेधारकांना मिळणार या सुविधा :

डिपॉझिट्स : खातेधारकांना खात्यात रक्कम जमा करण्याची सोय संबंधित बँकेच्या कोणत्याही शाखेतून उपलब्ध होणार आहे. याशिवाय एटीएम आणि मशिनद्वारे रक्कम जमा करण्यासाठीही सुविधा उपलब्ध आहे.

ई-डिपॉझिट्स : खातेधारकांना चेक, इलेक्ट्रॉनिक्स सेवा, केंद्रीय आणि राज्य स्तरीय एजन्सीच्या माध्यमाद्वारे रक्कम जमा करण्याची सुविधा आहे.

डिपॉझिट्स मर्यादा : खातेधारकांना त्यांच्या मूलभूत बचत बँक ठेव खात्यात महिन्यातून तीनवेळा रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. याशिवाय रक्कमेवर कोणतिही मर्यादा नाही.

एटीएम : सर्व खातेधारकांसाठी एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड देणे अनिवार्य आहे.मूलभूत बचत बँक ठेव खाते धारकांना चार वेळा खात्यातून रक्कम काढण्याची सोय उपलब्ध आहे.

चेकबुक : मूलभूत बचत बँक ठेव खाते धारकांना कोणत्याही शुल्काविना चेकबुक वितरीत करावे लागू शकते. त्यासाठी ग्राहकांना कोणत्याही किमान शुल्काची आवश्यकता भासणार नाही.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎯 मुलांच्या अंगभूत गुणांना ओळखून चालना द्या

LetsUp । Parenting

💫 व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विकास म्हणजे शिक्षण, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यानुसार आपल्या लाडक्या पाल्यांचे गुण ओळखून त्यांच्या विकासाकडे जर लक्ष दिले तर त्यांच जीवन उजळून निघेल व पालकांनाही समाधान मिळेल.

👉🏻 पाल्याच्या विकासासाठी पालकांनी या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

💁‍♂ पालकांसाठी टिप्स

स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करतांना मुलं जीवाचं रान करतात, याची जाणीव पालकांनी ठेवावी

पालकांनी पाल्यांवर दबाव टाकू नये, दबाव टाकल्याने मुलं आत्मविश्वास गमावतात

धोपटमार्ग अवलंबवावा असा आग्रह पालकांनी करू नये

पाल्याच्या बुद्धीमत्ता पाहून, त्याची आवड जपावी

आपल्या पाल्याच्या शारीरिक व मानसिक स्‍थ‌ितीचा विचारही पालकांनी करावा

पाल्याला अभ्यासात पालकांनी सहकार्य करणे अपेक्षीत

पाल्याचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी पालकांनी वर्तवणुकीत परिवर्तन करावे

आपल्या इच्छा आकांक्षा मुलांनी पूर्ण कराव्यात ही अपेक्षाचं मुळी चुकीची. त्यांना कशात रस आहे हे जाणून त्याचप्रमाणे मार्ग काढणे हे हितकरच

आई-वडिलांनी कोणतीही जबरदस्ती न करता मुलांना हवे ते विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😍 आनंदाची बातमी! अ‍ॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट' सुरू

💁‍♂ 3 दिवसीय फॅब फोन फेस्टमध्ये स्मार्टफोन्सवर मिळणार अविश्वसनीय सूट

🎉 मोबाईल आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट!

🧐 सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर मोठी सूट :

वनप्लस 6T : 41,999 नव्हे 27,999 ₹ (8 जीबी रॅम आणि 128 जीबी)
शाओमी Mi A2 : ~17,499~ नव्हे 10,999 ₹
आयफोन XR : 59,999 ₹ (64 जीबी) I 64,999 ₹ (128 जीबी)
सॅमसंग गॅलेक्सी M 30 आणि एम 20 : अनुक्रमे 14,990 आणि 9,990 ₹
रेडमी 7चे विविध व्हेरियंट : ~9,999~ नव्हे 7,999 ₹
विवो व्ही प्रो आणि विवो नेक्स : अनुक्रमे 26,990 आणि 39,990 ₹
ओप्पो एफ 11 प्रो : ~29,990~ नव्हे 23,990 ₹

🎯 यात ग्राहकांना विविध मॉडेल्सवर डिस्काऊंट, नो-कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर्स आदी मिळणार

👍 ऐका ना, नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची हि संधी सोडू नका!

होम प्रॉडक्टवर टक्के 75% डिस्काउंट
गोल्ड कॉईनवर 10% डिस्काउंट

👉 ऑफरसाठी क्लिक करा : https://amzn.to/31jEJ9m

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्र सरकारने सैन्याचे सामर्थ्य वाढवण्यासाठी नव्या संशोधन संस्थेच्या स्थापनेला दिली मंजुरी

● देशातील मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडणार; केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती

● जम्मू काश्मीर : सोपोर येथे झालेल्या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला कंठस्नान; इंटरनेट सेवा बंद

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● निवृत्त आयएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रिन्सिपल सचिव म्हणून नियुक्त

● येत्या 30 जूनपासून पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या दुसऱ्या मालिकेतील पहिला भाग प्रसारित होणार

● भारताकडून आकारले जाणारे 50 टक्के आयात शुल्क (हार्ले डेव्हिडसन) अस्वीकारार्ह : डोनाल्ड ट्रम्प

● नविन प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात हॉंगकॉंग येथे पुन्हा एकदिवसीय बंद, स्थानिक व्यावसायीकांची घोषणा

● सर्वाधिक ब्रँड मूल्य राखणाऱ्या कंपन्यांच्या जागतिक सूचीत गुगलला मागे टाकत अ‍ॅमेझॉनने पहिल्या स्थानी

● टोयोटा कंपनीने हॅचबॅक प्रकारातील आपली ‘ग्लांझा’ ही नवीन कार भारतीय बाजारात केली लाँच

● आज वर्ल्ड कपमध्ये पाकची ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत; 50 टक्के हलक्या पावसाची शक्यता

● सलमानच्या ‘भारत’ चा धुमाकूळ सुरूच; जगभरात कमाईचा 250 कोटींचा टप्पा गाठला

● अहमदनगर - नागरिकांच्या आहारात पौष्टिक तृणधान्यांचा वापर वाढवण्यासाठी तसेच याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दल नियुक्त

● अहमदनगर - नगर शहरात काटवण खंडोबा येथे तंबाखूजन्य पदार्थापासून मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा

● अहमदनगर - नवीन प्रकल्प उभारण्याऐवजी जुन्या उद्यानांचा विकास गरजेचा; नगर शहर सुधार समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏏 बांगलादेश-श्रीलंका सामना रद्द; आज पाकची ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत

LetsUp | #CWC 2019

इंग्लंडमधील लहरी हवामानाचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात यंदा सर्वाधिक फटका

💁‍♂ पावसामुळे बांगलादेश व श्रीलंका यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला

😇 या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही; यंदा पावसामुळे रद्द झालेला हा तिसरा सामना होता

----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : http://bit.do/eT6Mg
----------------------

पाकिस्तान Vs ऑस्ट्रेलिया

🧢 क्रिकेट विश्वचषकामध्ये आज बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ आमने-सामने भिडणार

👉 अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस दुखापतीमुळे संघाबाहेर, पर्यायी खेळाडू म्हणून मिचेल मार्शची इंट्री

टॉन्टन येथे आठवडाभरापासून हलका पाऊस सुरू असल्यामुळे या लढतीतही 50 टक्के हलक्या पावसाची शक्यता

🧐 आमने-सामने इतिहास :

एकूण सामने : 103 I पाकिस्तान : 32 विजयी I ऑस्ट्रेलिया : 67 विजयी I रद्द : 3 I टाय : 1
वर्ल्ड कपमध्ये : 9 I ऑस्ट्रेलिया : 5 विजय I पाकिस्तान : 4 विजय

🎯 स्थळ : कौंटी ग्राउंड टॉन्टन, टॉन्टन. वेळ : दुपारी 3 पासून.

👌 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎯 तंत्रज्ञान घडामोडींवर एक नजर

LetsUp | Tech

1) Twitter Account हॅक; हे करा!

सध्या अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशात जर तुमचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यास नेमके काय करावे हे कळत नाही. म्हणून आज त्याबाबत जाणून घेऊया...

सर्वप्रथम support.twitter.com/forms/signin या लिंकवर जा.
या ठिकाणी were you able to access your account? असा एक पर्याय दिसेल.
त्यानंतर 'नो' असा पर्याय निवडा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
पुढे ड्रॉप डाऊनचा फॉर्म आला असेल तर तिथे योग्य ती माहिती भरा. यामुळे तुमचे ट्विटर अकाऊंट नियंत्रणात येईल.
यासोबतच सायबर क्राईमकडे आपल्या अकौंटची तक्रार करणे गरजेचे आहे.

2) Google Maps चे नवे फिचर :

आता गुगल लवकरच एक नवे फिचर सादर करणार आहे. यामुळे तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

या फिचर अंतर्गत तुमची टॅक्सी चुकीच्या मार्गाने जात असल्यास तुम्हाला लगेचच अलर्ट केले जाईल. चुकीच्या मार्गाने 500 मीटर गेल्यास Google Maps लगेचच अलर्ट देईल. तुम्ही प्रवास करत असेपर्यंत हे फिचर काम करेल. यामुळे तुम्ही रस्ता चुकण्याचेही भीती नाही.

3) शाओमीचं नवं अपडेट; जाहिरातींपासून सुटका :

'शाओमी'कडे त्यांच्या स्मार्टफोनमधील जाहिरातींचे प्रमाण वाढले असल्याची तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर कंपनीने त्यांच्या जाहिराती कमी केल्या आहेत. मात्र यासाठी युजर्सला त्यांचा स्मार्टफोन अपडेट करावा लागणार आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 जगातील शंभर श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर; यादीत एकच भारतीय!

LetsUp | Update

फोर्ब्सने जाहीर केली 2019सालच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या अव्वल शंभर जणांच्या यादी

🎯 यादीत लिओनेल मेस्सी अव्वल स्थानी असून यादीत स्थान पटकावणारा विराट कोहली एकमेव भारतीय आहे

💁‍♂ श्रीमंत खेळाडूंची यादी अशी :

1) लिओनेल मेस्सी (फुटबॉल) :
127 मिलियन डॉलर

2) ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉल) :
109 मिलियन डॉलर

3) नेयमार (फुटबॉल) :
105 मिलियन डॉलर

4) कॅनेलो अल्वारेज (बॉक्सर) :
94 मिलियन डॉलर

5) रॉजर फेडरर (टेनिसपटू) :
93.4 मिलियन डॉलर

6) रसेल विल्सन (फुटबॉलपटू) :
89.5 मिलियन डॉलर

7) अ‍ॅरोन रॉजर्स (फुटबॉलपटू) :
89.3 मिलियन डॉलर

8) लेब्रोन जेम्स (बास्केटबॉल) :
89 मिलियन डॉलर

9) स्टीफन करी (बास्केटबॉल) :
79.8 मिलियन डॉलर

10) केव्हीन डुरांट (बास्केटबॉल) :
65.4 मिलियन डॉलर

100) विराट कोहली (क्रिकेट) :
25 मिलियन डॉलर

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💁‍♂ सरकारकडून अल्पसंख्याक समाजातील 5 कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

LetsUp | National

📍 केंद्र सरकारच्या वतीने अल्पसंख्य समाजातील 5 कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुढील 5 वर्षे 3 प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जाणार

👍 या शिष्यवृत्त्यांमध्ये 50 टक्के विद्यार्थिनींना सामावून घेतले जाणार, अल्पसंख्य कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची दिली

🗣 अब्बास नक्वी काय म्हणाले?

दहावीपर्यंत, दहावीनंतर आणि व्यावसायिक-तांत्रिक शिक्षणासाठीअशा 3 शिष्यवृत्त्यांचा लाभ अल्पसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळणार
ज्या विद्यार्थिनींचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे, त्यांना शिक्षणाची संधी मिळू शकेल. रोजगार मिळवण्यासाठी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाची गरज असते
अल्पसंख्य समाजातील विद्यार्थिनींना नामांकित शिक्षण संस्थांमधून हे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार
आर्थिकदृष्ट्या मागास मुलींसाठी 10 लाख बेग हजरत महल बालिका शिष्यवृत्त्याही दिल्या जाणार

🧐 मोफत प्रशिक्षण : मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, पारसी या अल्पसंख्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण-तरुणीसाठी केंद्र-राज्यातील प्रशासकीय सेवा, बँकिंग क्षेत्र, रेल्वे आदी क्षेत्रांत रोजगार मिळावा यासाठी मोफत प्रशिक्षणही दिले जाणार

🎯 मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण :

अल्पसंख्य समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘पढो-बढो’ ही मोहीम राबवली जाणार
आधुनिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मदरशांमध्ये शिक्षकांना हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, संगणक आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार
मुख्यधारेतील शिक्षण संस्थांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार असून हा कार्यक्रम पुढील महिन्यापासून सुरू होणार
प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालये, आयटीआय, पॉलिटेक्निक महाविद्यालये, विद्यार्थिनींसाठी वसतीगृहे बांधली जाणार

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🌊 ‘वायू’ चक्रीवादळाचा धोका; गुजरातमध्ये हाय अलर्ट

LetsUp । Update

‘वायू’ चक्रीवादळ 13 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

💁‍♂ हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे वादळ 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. या पार्शवभूमीवर हवामान विभागाकडून सौराष्ट्र आणि कच्छ विभागात रेड अलर्ट जारी केला आहे.

🚫 शाळा कॉलेज बंद : ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवू शकतो अशा 10 जिल्ह्यांमध्ये 13 आणि 14 जून रोजी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याची घोषणा केली आहे.

👌 सुरक्षा व्यवस्था तैनात : गुजरात प्रशासन या वादळापासून लोकांना वाचविण्यासाठी सज्ज झाले आहे. आपतकालीन परिस्थितीमध्ये 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या 26 टीम तैनात करण्यात आल्या आहे.

गुजरातसोबतच महाराष्ट्रालाही या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🛰 15 जुलैला चांद्रयान-2 झेपावणार

LetsUp । Breaking

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचा मुहुर्त अखेर निश्चित.

🎯 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. प्रेक्षपणासह या संपूर्ण मोहिमेवर 978 कोटी रुपये खर्च होतील, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ.के.सिवान यांनी दिली आहे.

💁‍♂ असं आहे 'चांद्रयान-2' : 'चांद्रयान-2'चे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. रोव्हर हे एक रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन 27 किलो असून लांबी 1 मीटर आहे. लँडरचे वजन 1.4 टन आणि लांबी 3.5 मीटर आहे. तर ऑर्बिटरचे वजन 2.4 टन आणि लांबी 2.5 मीटर इतकी आहे. यानाचं एकूण वजन 3800 किलो आहे.

📍 या देशांची यशस्वी मोहीम : चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीनला यश आले आहे.

👍 विशेष : 'चांद्रयान-2'च्या निमित्तानं अवघ्या दहा वर्षांत 'इस्रो' दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

'मोगरा फुलला' 14 जूनला होणार रिलीज :
अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिका असलेला 'मोगरा फुलला' हा सिनेमा 14 जून 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक नातेसंबंध जोपासणारा कौटुंबिक सिनेमा आहे.

या सिनेमाची गाणी अभिषेक कणखरनी लिहिली असून रोहित राऊतने ती संगीतबद्ध केली आहेत. शंकर महादेवन, रोहित राऊत, बेला शेंडे, जसराज जोशी यांनी ती गायली आहेत. सिनेमात स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक यांसह अन्य कलाकार आहे.

रिंकू ठरतेय मराठीतील महागडी अभिनेत्री : सैराट सिनेमाने प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. लवकरच रिंकूचा 'मेकअप' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या सिनेमासाठी रिंकूला तब्बल 27 लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे.

'सूर्यवंशी' या दिवशी होणार प्रदर्शित: बॉक्स ऑफिसवर क्लॅशपासून वाचण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी' सिनेमाची तारिख बदलली आहे. हा सिनेमा 2020 मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु याच दिवशी संजय लीला भंन्साळी दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' प्रदर्शित होणार आहे.

पडद्यावर दोन मोठ्या कलाकारांचे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने दोन्ही सिनेमांना नुकसान होते. यामुळे रोहित शेट्टीने आपल्या 'सूर्यवंशी' सिनेमाची प्रदर्शनाची तारिख बदलली आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🦎 पाल घरातून घालवण्यासाठी करा हे उपाय

LetsUp । Tips

🎯 अनेकांच्या घरात पाल येण्याची मोठी समस्या असते. पाल स्वयंपाकघरात असेल तर ती खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये पडण्याचाही धोका असतो. तर काही घरगुती उपायांनी पाल घालवण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या काही उपाय...

----------------------
👍 इंस्टाग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा स्पेशल अपडेट :
फॉलो इंस्टाग्राम : https://ltsup.in/2vFUitw
----------------------

कांदा-लसून : कांद्याचा रस आणि काही लसनाच्या पाकळ्यांचा रस एकत्र करा. त्यात थोडं पाणी मिसळून हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरा. ज्या ठिकाणी पाल येते त्याठिकाणी हे मिश्रण शिंपडावं. त्यामुळे पाल आपोआप निघून जाईल. लसनाच्या पाकळ्याही पाल येते त्या ठिकाणी ठेवल्यासह फायदा होतो.

काळी मिरी : काळी मिरी पावडर पाण्यात मिसळून एका बाटलीत भरा. त्यानंतर हे पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा त्यामुळे पाल घरात येण्यास प्रतिबंध लागतो.

मोरपिस : घरात ज्या ठिकाणी पाल आली आहे, त्याठिकाणी मोरपिस लावल्यासही पाल घरांतून पळून जाते. पालीला मोरपिस म्हणजे साप किंवा कोणतातरी प्राणी वाटतो, जो तिला खाईल. त्यामुळे पाल त्या जागी येत नाही.

अंड्याचं कवच : पाल येण्याच्या ठिकाणी अंड्याचं कवच ठेवल्यानेही पाल घरात येत नाही. खिडक्यांच्या कोपऱ्यात कवच ठेवल्याने पालींना आत येण्यास अटकाव होतो.

कॉफी आणि तंबाखू : कॉफीमध्ये तंबाखू मिसळून त्याचे गोळे तयार करा. ज्या ठिकाणांहून पाल येते त्या ठिकाणी हे गोळे ठेवल्यानेही पाल घरात येत नाही.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup