LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💪 हवाई दलाची ताकद वाढणार; 'सुखोई'मध्ये 'ब्रह्मोस' जोडले जाणार

LetsUp | National

🎯 सरकारकडून सुखोई लढाऊ विमानात ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडण्याचे काम वेगाने सुरु

💁‍♂ ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेता येईल, अशादृष्टीने 40 सुखोई लढाऊ विमानांच्या बनावटीत बदल केले जाणार, यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार

👉 सरकारने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड आणि ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड यांना या हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले

👍 हे काम पूर्ण झाल्यानंतर सुखोईद्वारे समुद्र किंवा जमिनीवर मारा करण्याच्या वायुसेनेच्या क्षमतेत आणखी वाढ होणार

💫 सुखाई विमानाची उड्डाण क्षमता आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या ताकदीच्या जोरावर युद्धभूमीत हवाई दलाचे वर्चस्व वाढणार

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

LetsUp | Breaking

'सिक्सर किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने क्रिकेट विश्वाला केला अलविदा

👍 मुंबईत एका पत्रकार परिषदेत युवराजने निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांचे मानले आभार

💁‍♂ अतुलनीय कामगिरी :

भारतीय संघाला 2011चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकवून देण्यात युवराजचे मोलाचे योगदान होते.
2011 विश्वचषकात दमदार कामगिरी केल्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते.

👌 लढवय्या युवराज : यशाच्या परमोच्च शिखरावर असतानाच युवराजला कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर परदेशात जाऊन त्याने या आजारावर उपचार घेतले. पुढे जाऊन या आजारपणातून सावरत त्याने क्रिकेच्या मैदानावर पुनरागमनही केले.

पण, 2017 नंतर मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवला आले नाही. 2012 मध्ये त्याने अखेरची कसोटी खेळली. तर, अखेरचा एकदिवसीय आणि टी-20 सामना 2017 मध्ये खेळला होता.

📍 आकडेवारी : कसोटी सामने : 40 I एकदिवसीय सामने : 304 I टी-20 सामने : 58

🏏 कसोटी कामगिरी :
सामने : 40 I धावा : 1,900
100/50 : 3/11
सर्वोत्तम खेळी : 169 धावा
सरासरी : 33.92

🏏 एकदिवसीय कामगिरी :
सामने : 304 I धावा : 8,701
100/50 : 14/52
सर्वोत्तम खेळी : 150 धावा
सरासरी : 36.55

🏏 टी-20 कामगिरी :
सामने : 58 I धावा : 1,177
100/50 : 0/8
सर्वोत्तम खेळी : 77 धावा
सरासरी : 28.02

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🧐 ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवीन लाँचेस

LetsUp | Auto

🛵 TVS Jupiter ZX स्कूटर नव्या अवतारात :

TVS ने आपली लोकप्रिय स्कूटर Jupiter ZX नव्या अवतारात लाँच केली आहे. ही स्कूटर ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन्ही प्रकारात सादर करण्यात आली.

ड्रम ब्रेक असलेल्या व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 56 हजार 93 रुपये तर डिस्क ब्रेक असलेल्या व्हेरिअंटची किंमत 58 हजार 645 रुपये आहे. सीबीएस अर्थात कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टिमचे एसबीटी हे फीटर या स्कूटरमध्ये आहे.

----------------------
😍 कार इन्शुरन्सवर मिळवा 80 टक्क्यापर्यंत डिस्काउंट, अवघ्या 2 मिनिटांत 3 टप्य्यात मिळेल पॉलिसी, त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/EJt74
----------------------

🚗 'सहारा' ची इलेक्ट्रिक गाडी येणार! :

भारतातील प्रसिद्ध कंपनी सहारा इंडिया 'सहारा इव्होल्स' या ब्रँडसह ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरणार आहे. सहारा इव्होल्स' या ब्रँडखाली सहारा इलेक्ट्रिक गाड्यांचे सर्वात मोठे उत्पादन सुरू करणार आहे.

या गाड्या पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनांऐवजी वीजेवर चालतील. यात दोन, तीन व चारचाकी गाड्यांचा समावेश असेल. गाड्या चार्ज करण्यासाठी चार्जिंग सेंटर्सचे मोठं जाळं निर्माण करण्याचाही सहाराचा विचार आहे.

🚖 लँड रोव्‍हरची डिस्कव्हरी लाँच :

‘जॅग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया’ने भारतात ‘2019 लँड रोव्‍हर डिस्‍कव्‍हरी’च्‍या 2.0 लिटर डिझेल व्हेरिअंटची घोषणा केली. या कारची किंमत 75.18 लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी आहे.

एस, एसई, एचएसई व एचएसई लक्‍झरी ट्रिममध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या या नवीन व्हेरिअंटमध्ये 2.0 लिटर उच्‍च शक्‍तीच्‍या डिझेल इग्‍नेनिअम इंजिनाची शक्‍ती आहे. हे इंजिन 177 केडब्‍ल्‍यूचे पॉवर आऊटपुट आणि 500 एनएमच्या सर्वोच्‍च टॉर्कची निर्मिती करते. .

🎯 'पिआजिओ'ची सर्वात स्वस्त स्कूटर :

‘पिआजिओ इंडिया’ने भारतात ‘वेस्पा’ मालिकेतील नवीन स्कूटर लाँच केली आहे. वेस्पा अर्बन क्लब असे या स्कुटर ला नाव देण्यात आले आहे.

या नव्या स्कूटरची दिल्लीमध्ये 73 हजार 733 रुपये इतकी एक्स शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे. ही नवीन स्कूटर 4 रंगामध्ये उपलब्ध असून यात ग्लॉसी येलो, ग्लॉसी रेड, एझुरो प्रोव्हेंझा आणि मेझ ग्रे या चार रंगांचे पर्याय आहेत.

🧐 नवे फीचर्स काय? : 10-इंचाचे ब्लॅक अ‍ॅलॉय व्हिल्स आणि दोन्ही बाजूंना ड्रम, कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टिम (CBS) तसेच मोबाइल कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आले असून एका क्लिकद्वारे स्कूटरमधील सर्व फीचर्सचा वापर करता येईल.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👁 करूया संकल्प दृष्टिदानाचा!

LetsUp | Special

दरवर्षी 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृती करण्यात येते. आज या दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ काही महत्वाच्या गोष्टी...

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
विचाराअंती निष्कर्षावर पोहोचावे!

LetsUp | Motivation

👨‍👦एका गावातील वडील आणि मुलगा नावेतून दुसऱ्या शहरात जात होते. बराच काळ समुद्रातून जाताना अचानक वादळ आले आणि त्यांची नाव एका बेटावर पोहोचली. पिता-पुत्राला वाटले की, आता आपली शेवटची वेळ जवळ आली आहे. तरीही दोघेजण मदत शोधण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना गेले. यामुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

🙇‍♂ मुलाने देवाकडे प्रार्थना केली "हे देवा! या बेटावर फळ-फुल लागलेले वृक्ष निर्माण व्हावेत. ज्यामुळे माझी भूक मिटेल." लगेच त्या बेटावर रसरशीत फळांची झाडे उगवली. मुलाला हा तर चमत्कार झाल्यासारखे वाटले. त्यानंतर त्याने देवाकडे मागणी केली की "हे देवा! मला या बेटावरून बाहेर पडण्यासाठी एक नाव मिळावी."

त्याचक्षणी किनाऱ्यावर एक नाव आली. तो नावेमध्ये बसून एकटाच निघाल्यानंतर अचानक आकाशवाणी झाली "हे मुला तू एकटाच जात आहेस, तुझ्या वडिलांना सोबत घेणार नाही का?" मुलगा म्हणाला, त्यांना सोडून द्या. प्रार्थना तर त्यांनीही केली असेल तर परंतु तुम्ही त्यांची एकही इच्छा पूर्ण केली नाही. कदाचित यांचे मन पवित्र नसेल, त्यामुळे त्यांना याचे फळ भोगू द्या.

🙏 आकाशवाणीने सांगितले "तुला माहिती आहे का? तुझ्या वडिलांनी काय प्रार्थना केली होती?" मुलगा म्हणाला नाही. आकाशवाणीने सांगितले की, तुझ्या वडिलांनी एकच प्रार्थना केली "हे देवा! माझा मुलगा जे काही मागेल ते त्याला देऊन टाकावे". आकाशवाणी ऐकून मुलाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने बेटावर वडिलांना शोधून त्यांनाही सोबत घेऊन गेला.

सांगायचे तात्पर्य असे कि, आपण अनेकदा सत्य जाणून न घेता, कोणत्याही व्यक्तीविषयी आपले मत तयार करून घेतो, जे चुकीचे आहे. यामुळे आपल्याला नुकसानही सहन करावे लागते आणि अपमानालाही सामोरे जावे लागते. यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी संपूर्ण खात्री पटल्याशिवाय ठराविक मत निश्चित न केलेलंच योग्य.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरण : तिघांना जन्मठेप, इतर तीन आरोपींना पाच वर्षाची शिक्षा

● एका वर्षात 10 लाख रुपयांची रोकड वितरित केल्यास त्यावर कर आकारणी करण्याचा केंद्र सरकारचा विचार

● दिल्लीच्या सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून नॅशनल अ‍ॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाइल सिस्टम-2 खरेदी करणार

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● भारतीय हवाई दलाच्या एएन 32 विमानाचा अद्याप शोध नाही; शोधमोहीम अखंडितपणे सुरूच

● पाकिस्तानशी लागून असलेल्या सीमावर्ती भागावर लष्कराची करडी नजर; जनरल बिपीन रावत यांची माहिती

● सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे उच्च न्यायालयातील मराठा आरक्षणांवरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब

● राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये यंदा जवळपास 1 लाख 37 हजार 300 जागा उपलब्ध

● आषाढी एकादशीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) 3 हजार 724 बसेस धावणार

● Nokia 8.1 स्मार्टफोनच्या 4GB आणि 6GB रॅम अशा दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत 7 हजार रुपयांची कपात

● महेश भट्ट यांच्या 'अर्थ' या चित्रपटाचा रिमेक येणार, यातील स्मिता पाटील यांच्या भूमिकेसाठी जॅकलिन फर्नांडिसच्या नावाला पसंती

● अहमदनगर - सन 2019-20 या वर्षात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 66 रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने रस्त्यांचा दर्जा सुधारणार

● अहमदनगर - आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन सादर करण्यात येणाऱ्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शिक्षण विभागाकडून 11 जूनपर्यंत मुदतवाढ जाहीर

● अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विविध कारणांनी बंद पडलेल्या सर्व पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्यासाठी तातडीने प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या खा. विखे यांच्या सूचना

● अहमदनगर - राज्यपालांकडून नगर शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी कौन्सिलवर निवड

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏏 आफ्रिका-वेस्ट इंडिज सामना रद्द; आज श्रीलंका Vs बांगलादेश सामना

LetsUp | #CWC 2019

पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिका- वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना रद्द करण्यात आला

🎯 यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण बहाल, यासह द. आफ्रिकेने उघडले गुणांचे खाते

----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : http://bit.do/eT6Mg
----------------------

आज श्रीलंका Vs बांगलादेश

📍 वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात लढत रंगणार

दोन्ही संघांच्या प्रत्येकी 3 लढती झाल्या असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित 6 पैकी किमान 5 लढती जिंकणे आवश्यक

🧐 आमने-सामने इतिहास :

एकदिवसीय सामने : 45 I श्रीलंका : 36 I बांगलादेश : 7 I टाय / रद्द : 2
विश्वचषकात सामने : 3, श्रीलंका : 3 I बांगलादेश : 0, टाय / रद्द : 0

👉 स्थळ : ब्रिस्टल. I वेळ : दु. 3.00 वाजता

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🚫 2020 नंतर जुन्या वाहनांना ‘नो एंट्री’

LetsUp | National

💁‍♂ 1 एप्रिल 2020 नंतर जुनी वाहने रस्त्यावर आणू देणार नसल्याचे केंद्र सरकारने दिले संकेत.

🎯 जुन्या वाहनांमुळे देशात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय.

👍 जुन्या वाहनांचे प्रमाण कमी व्हावे तसेच जुनी वाहने भंगारात घालण्यासाठी आकर्षक योजना तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न.

🗣 एका मुलाखतीदरम्यान केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

📍 केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जुनी वाहने मोडीत घालण्यासाठी भंगार योजनेचा प्रस्ताव तयार केला होता.

📝 प्रस्तावात काय म्हटले आहे? :

भंगार योजनेच्या नियमावलीमध्ये 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे वापरात असलेल्या व्यावसायिक वाहनांच्या मालकांनी आपली वाहने भंगारात घालून नव्या वाहनांची खरेदी करण्याची तयारी दाखविल्यास त्यांना आर्थिक सवलत देण्यात येईल.
15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या व्यावसायिक वाहन भंगारात घातल्यानंतर पंधरा लाख रुपयांपर्यंतचे नवे व्यावसायिक वाहन खरेदी केल्यास संबंधिताला पाच लाख रुपयांपर्यंत सवलत देण्यात येईल.

हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास सध्या रस्त्यावर धावणारी 2.80 कोटी वाहने भंगारात निघण्याची शक्यता

💫 'महिंद्रा आणि महिंद्रा'चा पुढाकार; सिरोची स्थापना :

'महिंद्रा आणि महिंद्रा' कंपनीने 'एमएसटीसी' या सरकारी कंपनीच्या सहकार्याने गेल्या वर्षीपासून जुन्या गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
त्यासाठी दोन्ही कंपन्यांनी मिळून 'सिरो'(सीईआरओ) या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीने जुन्या वाहनांची खरेदी करण्यासाठीचा पहिला प्रकल्प ग्रेटर नोएडामध्ये उभारला आहे.

🧐 'सिरो' काय करणार? : 'सिरो' ग्राहकांकडून जुनी वाहने खरेदी करून त्या बदल्यात ग्राहकांना योग्य ती किंमत देईल. यानंतर जुन्या वाहनांचे भंगारात रूपांतर करण्यात येईल. जुन्या वाहनांची किंमत त्यांचे आयुष्यमान आणि सध्याच्या स्थितीवर निश्चित करण्यात येणार आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 384 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव : शहर समन्वयक

🎓 शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Sc./B.Arch/ B.Planning
(ii) 01 वर्ष अनुभव

🧐 वयाची अट : 01 जून 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत.

----------------------
📍 नोंदणी करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, लाखो संधी एकाच ठिकाणी सादर आहे तुमच्यासाठी, 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------

👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र I फी नाही.

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 17 जुलै 2019

🗞 जाहिरात पहा : http://bit.ly/2WBSDEZ

👉 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/2KHv46A

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎯 Letsup I General Knowledge

1) कोणत्या पुरुष टेनिसपटूने फ्रेंच ओपन (रोलँड गॅरोस) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले?

उत्तर : राफेल नदाल (बाराव्यांदा जेतेपद)

2) भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाकडून 300 कोटी रुपयांचे शंभर “SPICE 2000” हे गाईडेड बॉम्ब विकत घेण्यासाठी करार केला?

उत्तर : इस्राईल

3) निर्देशने करणार्‍या लोकांना ठार मारण्याच्या क्रूर कारवाईनंतर आफ्रिकी संघाने (AU) नागरी प्रशासनाच्या स्थापनेपर्यंत कोणत्या देशाचे सदस्यत्व निलंबित केले?

उत्तर : सुदान

4) कोणत्या राज्य सरकारने महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी नव्या प्रकाराचे ‘पिंक सारथी’ वाहन सादर केले?

उत्तर : कर्नाटक

5) 2019 सालाचा संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘इक्वेटर’ पारितोषिक कोणत्या भारतीय संघटनेला प्राप्त झाला?

उत्तर : डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी

6) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?

उत्तर : धीरूभाई नारनभाई पटेल

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 384 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव : शहर समन्वयक

🎓 शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Sc./B.Arch/ B.Planning
(ii) 01 वर्ष अनुभव

🧐 वयाची अट : 01 जून 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत.

----------------------
📍 नोंदणी करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, लाखो संधी एकाच ठिकाणी सादर आहे तुमच्यासाठी, 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------

👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र I फी नाही.

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 17 जुलै 2019

🗞 जाहिरात पहा : http://bit.ly/2WBSDEZ

👉 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/2KHv46A

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😱 दुखापतग्रस्त शिखर धवन विश्वचषकातून बाहेर

LetsUp । Breaking

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात जखमी भारतीय सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातून ३ आठवड्यांसाठी बाहेर

💁‍♂ भारतीय संघाला मोठा धक्का : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात धवनच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं.

📍 भारत- पाक सामन्यास मुकला : विश्वचषकात भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध 13 जून रोजी होणार आहे. या सामन्यात शिखर धवन खेळू शकणार नाहीच. पण त्यापुढचा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही शिखर धवन मुकणार आहे. भारत - पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मँचेस्टर इथं सामना होणार आहे.

🤔 सलामीवीर कोण ? : धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत सलामीला के एल राहुल. खेळण्याची शक्यता आहे. राहुलशिवाय विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये सलामीला येऊन मोठ्या खेळी केल्या आहेत.

शिखर धवनच्या अनुपस्थितीत रवींद्र जाडेजा किंवा विजय शंकर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.

टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
ब्रेकिंग! वायुसेनेच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले

LetsUp । Breaking

भारतीय वायुसेनेचं गायब झालेलं AN-32 विमानाचे अवशेष अखेर अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात सापडले.

🧐 कोठे सापडले अवशेष? : शोध मोहिमेदरम्यान या बेपत्ता विमानाचे काही भाग दिसले आहेत. विमानानं उड्डाण केलेल्या ठिकाणाहून 15 ते 50 किमी अंतरावर हे अवषेश सापडले आहेत. तर विमानाच्या अन्य भागाचा शोध घेणे सुरू आहे. भारतीय वायुसेनेनं ट्वीट करून त्याची माहिती दिली आहे.

💁‍♂ घटनाक्रम :
हे विमान 3 जून रोजी जोराहाट येथून निघाले होते व त्यानंतर ते बेपत्ता झाले होते.
या विमानामध्ये 8 क्रू मेंबरसह 13 प्रवासी होते.
विमानातील कुणी वाचलं आहे का, याचा शोध सध्या घेतला जात आहे.

💰 बक्षीस जाहीर : विमानाची माहिती देणार्‍याला 5 लाखांचे बक्षिस हवाई दलाकडून जाहीर करण्यात आले होते. तसेच विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व यंत्रणा कामाला लावल्या होत्‍या.

टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎯 मुलांच्या अंगभूत गुणांना ओळखून चालना द्या

LetsUp । Parenting

💫 व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विकास म्हणजे शिक्षण, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यानुसार आपल्या लाडक्या पाल्यांचे गुण ओळखून त्यांच्या विकासाकडे जर लक्ष दिले तर त्यांच जीवन उजळून निघेल व पालकांनाही समाधान मिळेल.

👉🏻 पाल्याच्या विकासासाठी पालकांनी या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

💁‍♂ पालकांसाठी टिप्स

स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करतांना मुलं जीवाचं रान करतात, याची जाणीव पालकांनी ठेवावी

पालकांनी पाल्यांवर दबाव टाकू नये, दबाव टाकल्याने मुलं आत्मविश्वास गमावतात

धोपटमार्ग अवलंबवावा असा आग्रह पालकांनी करू नये

पाल्याच्या बुद्धीमत्ता पाहून, त्याची आवड जपावी

आपल्या पाल्याच्या शारीरिक व मानसिक स्‍थ‌ितीचा विचारही पालकांनी करावा

पाल्याला अभ्यासात पालकांनी सहकार्य करणे अपेक्षीत

पाल्याचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी पालकांनी वर्तवणुकीत परिवर्तन करावे

आपल्या इच्छा आकांक्षा मुलांनी पूर्ण कराव्यात ही अपेक्षाचं मुळी चुकीची. त्यांना कशात रस आहे हे जाणून त्याचप्रमाणे मार्ग काढणे हे हितकरच

आई-वडिलांनी कोणतीही जबरदस्ती न करता मुलांना हवे ते विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 बँक खातेधारकांना मिळणार या सवलती

LetsUp । Special

भारतीय रिझर्व्ह बँकेने किमान खातेधारकांच्या सोयीसाठी लागू केली नवी नियमावली.

1 जुलैपासून खातेधारकांना चेकबूकसह अन्य काही सोयी मोफत मिळणार आहे. यासह खातेधारकांना किमान शिल्लक रक्क्म ठेवण्याची सक्तीही बँका करू शकणार नाहीत.

--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला: https://twitter.com/LetsUp_
--------------------

😍 खातेधारकांना मिळणार या सुविधा :

डिपॉझिट्स : खातेधारकांना खात्यात रक्कम जमा करण्याची सोय संबंधित बँकेच्या कोणत्याही शाखेतून उपलब्ध होणार आहे. याशिवाय एटीएम आणि मशिनद्वारे रक्कम जमा करण्यासाठीही सुविधा उपलब्ध आहे.

ई-डिपॉझिट्स : खातेधारकांना चेक, इलेक्ट्रॉनिक्स सेवा, केंद्रीय आणि राज्य स्तरीय एजन्सीच्या माध्यमाद्वारे रक्कम जमा करण्याची सुविधा आहे.

डिपॉझिट्स मर्यादा : खातेधारकांना त्यांच्या मूलभूत बचत बँक ठेव खात्यात महिन्यातून तीनवेळा रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. याशिवाय रक्कमेवर कोणतिही मर्यादा नाही.

एटीएम : सर्व खातेधारकांसाठी एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड देणे अनिवार्य आहे.मूलभूत बचत बँक ठेव खाते धारकांना चार वेळा खात्यातून रक्कम काढण्याची सोय उपलब्ध आहे.

चेकबुक : मूलभूत बचत बँक ठेव खाते धारकांना कोणत्याही शुल्काविना चेकबुक वितरीत करावे लागू शकते. त्यासाठी ग्राहकांना कोणत्याही किमान शुल्काची आवश्यकता भासणार नाही.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎯 मुलांच्या अंगभूत गुणांना ओळखून चालना द्या

LetsUp । Parenting

💫 व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विकास म्हणजे शिक्षण, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यानुसार आपल्या लाडक्या पाल्यांचे गुण ओळखून त्यांच्या विकासाकडे जर लक्ष दिले तर त्यांच जीवन उजळून निघेल व पालकांनाही समाधान मिळेल.

👉🏻 पाल्याच्या विकासासाठी पालकांनी या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

💁‍♂ पालकांसाठी टिप्स

स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करतांना मुलं जीवाचं रान करतात, याची जाणीव पालकांनी ठेवावी

पालकांनी पाल्यांवर दबाव टाकू नये, दबाव टाकल्याने मुलं आत्मविश्वास गमावतात

धोपटमार्ग अवलंबवावा असा आग्रह पालकांनी करू नये

पाल्याच्या बुद्धीमत्ता पाहून, त्याची आवड जपावी

आपल्या पाल्याच्या शारीरिक व मानसिक स्‍थ‌ितीचा विचारही पालकांनी करावा

पाल्याला अभ्यासात पालकांनी सहकार्य करणे अपेक्षीत

पाल्याचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी पालकांनी वर्तवणुकीत परिवर्तन करावे

आपल्या इच्छा आकांक्षा मुलांनी पूर्ण कराव्यात ही अपेक्षाचं मुळी चुकीची. त्यांना कशात रस आहे हे जाणून त्याचप्रमाणे मार्ग काढणे हे हितकरच

आई-वडिलांनी कोणतीही जबरदस्ती न करता मुलांना हवे ते विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😍 आनंदाची बातमी! अ‍ॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट' सुरू

💁‍♂ 3 दिवसीय फॅब फोन फेस्टमध्ये स्मार्टफोन्सवर मिळणार अविश्वसनीय सूट

🎉 मोबाईल आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट!

🧐 सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर मोठी सूट :

वनप्लस 6T : 41,999 नव्हे 27,999 ₹ (8 जीबी रॅम आणि 128 जीबी)
शाओमी Mi A2 : ~17,499~ नव्हे 10,999 ₹
आयफोन XR : 59,999 ₹ (64 जीबी) I 64,999 ₹ (128 जीबी)
सॅमसंग गॅलेक्सी M 30 आणि एम 20 : अनुक्रमे 14,990 आणि 9,990 ₹
रेडमी 7चे विविध व्हेरियंट : ~9,999~ नव्हे 7,999 ₹
विवो व्ही प्रो आणि विवो नेक्स : अनुक्रमे 26,990 आणि 39,990 ₹
ओप्पो एफ 11 प्रो : ~29,990~ नव्हे 23,990 ₹

🎯 यात ग्राहकांना विविध मॉडेल्सवर डिस्काऊंट, नो-कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर्स आदी मिळणार

👍 ऐका ना, नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची हि संधी सोडू नका!

होम प्रॉडक्टवर टक्के 75% डिस्काउंट
गोल्ड कॉईनवर 10% डिस्काउंट

👉 ऑफरसाठी क्लिक करा : https://amzn.to/31jEJ9m

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्र सरकारने सैन्याचे सामर्थ्य वाढवण्यासाठी नव्या संशोधन संस्थेच्या स्थापनेला दिली मंजुरी

● देशातील मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडणार; केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती

● जम्मू काश्मीर : सोपोर येथे झालेल्या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला कंठस्नान; इंटरनेट सेवा बंद

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● निवृत्त आयएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रिन्सिपल सचिव म्हणून नियुक्त

● येत्या 30 जूनपासून पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या दुसऱ्या मालिकेतील पहिला भाग प्रसारित होणार

● भारताकडून आकारले जाणारे 50 टक्के आयात शुल्क (हार्ले डेव्हिडसन) अस्वीकारार्ह : डोनाल्ड ट्रम्प

● नविन प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात हॉंगकॉंग येथे पुन्हा एकदिवसीय बंद, स्थानिक व्यावसायीकांची घोषणा

● सर्वाधिक ब्रँड मूल्य राखणाऱ्या कंपन्यांच्या जागतिक सूचीत गुगलला मागे टाकत अ‍ॅमेझॉनने पहिल्या स्थानी

● टोयोटा कंपनीने हॅचबॅक प्रकारातील आपली ‘ग्लांझा’ ही नवीन कार भारतीय बाजारात केली लाँच

● आज वर्ल्ड कपमध्ये पाकची ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत; 50 टक्के हलक्या पावसाची शक्यता

● सलमानच्या ‘भारत’ चा धुमाकूळ सुरूच; जगभरात कमाईचा 250 कोटींचा टप्पा गाठला

● अहमदनगर - नागरिकांच्या आहारात पौष्टिक तृणधान्यांचा वापर वाढवण्यासाठी तसेच याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दल नियुक्त

● अहमदनगर - नगर शहरात काटवण खंडोबा येथे तंबाखूजन्य पदार्थापासून मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा

● अहमदनगर - नवीन प्रकल्प उभारण्याऐवजी जुन्या उद्यानांचा विकास गरजेचा; नगर शहर सुधार समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏏 बांगलादेश-श्रीलंका सामना रद्द; आज पाकची ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत

LetsUp | #CWC 2019

इंग्लंडमधील लहरी हवामानाचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात यंदा सर्वाधिक फटका

💁‍♂ पावसामुळे बांगलादेश व श्रीलंका यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला

😇 या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही; यंदा पावसामुळे रद्द झालेला हा तिसरा सामना होता

----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : http://bit.do/eT6Mg
----------------------

पाकिस्तान Vs ऑस्ट्रेलिया

🧢 क्रिकेट विश्वचषकामध्ये आज बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ आमने-सामने भिडणार

👉 अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस दुखापतीमुळे संघाबाहेर, पर्यायी खेळाडू म्हणून मिचेल मार्शची इंट्री

टॉन्टन येथे आठवडाभरापासून हलका पाऊस सुरू असल्यामुळे या लढतीतही 50 टक्के हलक्या पावसाची शक्यता

🧐 आमने-सामने इतिहास :

एकूण सामने : 103 I पाकिस्तान : 32 विजयी I ऑस्ट्रेलिया : 67 विजयी I रद्द : 3 I टाय : 1
वर्ल्ड कपमध्ये : 9 I ऑस्ट्रेलिया : 5 विजय I पाकिस्तान : 4 विजय

🎯 स्थळ : कौंटी ग्राउंड टॉन्टन, टॉन्टन. वेळ : दुपारी 3 पासून.

👌 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup