LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ उत्तर प्रदेशात वादळामुळे 19 जणांचा मृत्यू

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीस
सूर्यवंशी सिनेमात झळकणार अभिनेता गुलशन ग्रोवर

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 http://bit.ly/ltsupwani07June

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● रिझव्‍‌र्ह बँकेकडून कर्जबुडवेपणा निश्चित करण्यासाठी मुदतवाढ (30 दिवस); तडजोडीचा मार्गही खुला

● आभासी चलन बाळगणे, त्यांची खरेदी-विक्री करणे आता देशात गुन्हा समजण्यात येणार

● चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी विम्यात येत्या 16 जूनपासून वाढ होणार

● केंद्राने केंद्रीय दक्षता आयोगातील रिक्त महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ

● देशात यंदा 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी MBBSच्या 5 हजार जागा वाढवण्यात येणार

● पाकिस्तानची भारताला पुन्हा चर्चेची ऑफर; शाह महमूद कुरैशी यांचे विदेश मंत्री जयशंकर यांना पत्र

● अखेर ब्रिटीश पंतप्रधान थरेसा मे यांनी कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदाचा दिला राजीनामा

● राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये घट नाहीच; गेल्या वर्षीच्या तुलनेत सापळ्यांची (375) संख्या सारखीच

● राज्‍यातील सर्व शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 'लंचटाइम' आता अर्ध्या तासाचा

● महेंद्रसिंह धोनीच्या बॅजसंदर्भातील अपील आयसीसीने फेटाळले; बॅज नसलेले ग्लोव्हज वापरण्याची सूचना

● बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तन्वर तिच्या आगामी वेबसिरीजमध्ये वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार

● अहमदनगर - जिल्ह्यातील काही भागांत शुक्रवारी सायंकाळनंतर जोरदार अवकाळी पावसाने लावली हजेरी

● अहमदनगर - सन 2019-20 या वर्षात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता, यासाठी 40 कोटी रुपये निधी मंजूर

● अहमदनगर - मागण्यांसाठी जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन; सरकारच्या धोरणाचा केला निषेध

● अहमदनगर - मैत्रेय या गुंतवणूक कंपनीत नगर जिल्ह्यातील सुमारे 25 हजार गुंतवणूकदारांचे तब्बल 22 कोटी 54 लाख रुपये अडकल्याचे स्पष्ट

📞 जाहिरातीसाठी संपर्क: 7875190190

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! दहावीचा निकाल जाहीर; टक्केवारी घसरली!

LetsUp | Breaking

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, यंदा दहावीचा निकाल 77.10 टक्के लागला आहे

👍 यंदाही मुलींनी मारली बाजी, यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 10.64 टक्क्यांनी जास्त आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 83.05 टक्के लागला आहे.

😱 निकालाचा टक्का घसरला : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12.31 टक्क्यांनी निकाल कमी लागला असून गेल्या 5 वर्षांमधील यंदा दहावीचा सगळ्यात कमी निकाल लागला आहे. याआधी 2007 मध्ये 78 टक्के निकाल लागला होता.

📝 विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी 10 जूनपासून अर्ज करता येईल.

🎯 परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

💁‍♂ विभागवार टक्केवारी : पुणे : 82. 48 I नागपूर : 67.27 I औरंगाबाद : 72.20 I मुंबई : 77.04 I कोल्हापूर : 86.58 I अमरावती : 71.98 I नाशिक : 77.58 I लातूर : 72.87 I कोकण : 88.38

🌐 दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल.

👨‍💻 निकालासाठी संकेतस्थळे :

mahresult.nic.in
maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🚫 आभासी चलन बाळगणे गुन्हा ठरणार

LetsUp | National

आभासी चलनामध्ये (Cryptocurrency) व्यवहार करणाऱ्यांना मोठा झटका, कारण आता आभासी चलनाचे सर्व मार्ग बंद होणार आहे.

📝 केंद्र सरकारने 'बॅनिंग ऑफ क्रिप्टो करन्सी अ‍ॅण्ड रेग्युलेशन ऑफ डिजिटल करन्सी बिल 2019'मध्ये दिला प्रस्ताव.

💁‍♂ त्यानुसार कोणीही व्यक्ती आभासी चलनाची निर्मिती करील, जवळ बाळगेल, त्यांची विक्री करील, नष्ट करण्याचा प्रयत्न करील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यवहार करील त्यांना 10 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

या प्रस्तावामुळे देशात आभासी चलनाला मान्यता मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

🧐 म्हणून शिक्षेची तरतूद : देशात आभासी चलनाच्या (क्रिप्टो करन्सी) वापरावर बंदी असतानाही काही मंडळी चोरीछुपे व्यवहार करीत असल्याचे आढळून आले आहे. अशांना पायबंद घालण्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🌊 जागतिक महासागर दिन

LetsUp । Special

💫 समुद्रातील वाढते प्रदूषण या समस्या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी 8 जून रोजी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो.

🤔 कशी झाली सुरुवात?: जगातील समुद्रांमध्ये वाढते प्रदूषणाची समस्या लक्षात घेत, कॅनडाने 1992 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत या संदर्भातला प्रस्ताव मांडला होता. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने, हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला आहे.

💁‍♂ प्रदूषणाची कारणे व परिणाम: मानवी हस्तक्षेप, सांडपाणी, प्लास्टिक कचरा, अशा विविध कारणांमुळे समुद्र प्रदूषित होत आहे. याचा परिणाम सागरी जिवांवर होतोय. साधारण 70 टक्के प्राणवायू हा समुद्रातून येतो. त्यामुळे समुद्र वाचवणं गरजेचं आहे. समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे.

📍 हेतू : जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन,अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्वाचे आहे.

🎯 विशेष :

पृथ्वीवर जेवढे पाणी आहे, त्यातले जवळजवळ 97 टक्‍के पाणी हे महासागरांत आहे.
महासागर हा प्रार्थनांचा सर्वात मोठा स्रोत आहे. ज्यामुळे साधारण 2.6 अब्ज लोक महासागराला प्रथिनांचा प्राथमिक स्रोत मानतात.
मानवाने उत्सर्जित केलेल्या कार्बन डायऑक्‍साइडपैकी 30 टक्‍के महासागरांमध्ये शोषून घेतला जातो.

🙏 सागरी साधन संपत्तीचे जतन करुयात पर्यावरणाचे रक्षण करूया!

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🚆 खुशखबर! रेल्वेत मिळवणार मसाज सेवा

LetsUp । Special

प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे विभागाने घेतला पुढाकार.

💁‍♂ भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिल्यांदा प्रवाशांच्या सोयीसाठी धावत्या रेल्वेमध्ये मसाज सेवा पुरविली जाणार आहे. यामुळे महसूल वाढलेच पण पर्यटकांची संख्याही वाढेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : https://urlzs.com/zorLC
----------------------

🎯 इंदोरपासून होणार सुरुवात: सध्या मसाजची सुविधा इंदोर येथून चालणाऱ्या 39 गाड्यांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये हि सेवा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

💰 महसूल वाढीचा हेतू : ही योजना रेल्वेच्या योजनेचा एक भाग आहे, ज्यामध्ये सर्व क्षेत्र आणि विभागांना नवीन आणि नाविन्यपूर्ण कल्पना देण्यास सांगितले होते. या अनोख्या प्रयोगामुळे रेल्वेला 20 लाख रुपये अतिरिक्त वार्षिक महसूल मिळू शकतो असा अंदाज आहे.

💵 शुल्क - मसाजचे तीन पॅकेज करण्यात आले असून यामध्ये गोल्ड स्कीम - 100 रुपये, डायमंड- 200 आणि प्लेटिनम स्कीम - 300 रुपये दर असणार आहे.

वेळ : मसाजची सुविधा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
😍 पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास स्पॉट

LetsUp । Travel

💁‍♂ पावसाळा म्हणजे सगळ्यांचाच आवडता ऋतू. पावसाळा म्हणलं कि सगळ्यांचंच मन पावसाळी पिकनिक करण्यासाठी हट्ट धरत असतं. खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे काही खास पिकनिक स्पॉट...

--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला: https://twitter.com/LetsUp_
--------------------

माळशेज घाट: हा घाट पावसाळ्यात अतिशय नयनरम्य असतो. घाटाच्या दोन्ही बाजूने अवाढव्य दरडी, त्यातून झुळुझुळू वाहणारे धबधबे, गार वारा आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा हे माळशेज घाटाचं वैशिष्ठय.

ठोसेघर धबधबा : जोमाने कोसळणारा पाऊस आणि त्यातंच खळाळून वाहणारे धबधबे असं मनमोहीत दृश्य पाहायचे असेल तर ठोसेघर धबधबा येथे नक्की भेट द्या. साताऱ्यापासून वीस किमी अंतरावर असलेल्या ठोसेघर गावात हा धबधबा आहे.येथे चुलीवर बनवलेल्या अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद देखील घेऊ शकता.

भंडारदरा: अहमदनगरमधील अकोला तालुक्यातील भंडारदरा हे ठिकाण पावसाळी पिकनिकसाठी एक हटके स्पॉट आहे.येथील विल्सन डॅम आणि आर्थूर लेक ही ठिकाणे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत. दरवर्षी पावसाळ्यात येथे काजवा महोत्सव भरतो.

रतनवाडी : अहमदनगरमधील रतनवाडी हे भंडारदरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. रतनवाडीला रतनगड किल्ला आणि अमृतेश्वर मंदिर हे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. तुम्ही जर ट्रेकिंगचे शौकीन असाल तर आपण नक्की भेट द्या.

घाटघर : अहमदनगर येथील अकोल्यातील घाटघर म्हणजे ओलेचिंब होण्यासाठीचे सुयोग्य ठिकाण. घाटघर येथे दरवर्षी पावसाळ्यात 5000 मीमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. हिरवीगार झाडे, अवाढव्य डोंगर, मोठा जलविद्युत प्रकल्प ही घाटघरची ओळख.

कळसुबाई : जर तुम्हाला पावसाळ्यात दाट हिरव्यागार झाडीतून पावसात भिजत ट्रेकिंग करावं वाटत असेल तर कळसुबाई हे ठिकाण तुमच्यासाठीच बनलेले आहे. कळसूबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखले जाते.

चिखलदरा : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे पावसाळ्यात जाण्यासाठी उत्तम दर्जाचे हिल स्टेशन आहे. चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन म्हणून देखील ओळखले जाते.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ पंतप्रधान मोदींना मालदीवच्या सर्वोच्च पुरस्कार जाहीर

अखेर मान्सून केरळमध्ये दाखल
मनसे पीएम मोदींना पाठवणार 10 हजार पोस्टकार्ड

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani08June

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🤔 वारंवार लोन रिजेक्ट होतंय?

🎯 मग तुम्हाला सिबिल स्कोर म्हणजे काय? ते माहिती असायलं हवं!

🧐 सिबिल स्कोर म्हणजे काय?:

सिबिल भारतातील अग्रगण्य बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून सर्वसामान्य व्यक्तींच्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड बद्दल माहिती गोळा करते.

नंतर ही माहिती सिबिल क्रेडिट अहवालाच्या स्वरूपात सादर करते, ज्यास सिबिल क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट इन्फर्मेशन रिपोर्ट (सीआयआर) देखील म्हणतात.

या माहितीच्या आधारे सिबिल एक आकडा बनवते ज्याला सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणतात.

📍 सिबिल स्कोर व्यक्तीच्या कर्ज विषयक व्यवहारांची माहिती वापरून बनवलेला असतो. पुढे हाच सिबिल स्कोअर बँका एखाद्या व्यक्तीला कर्ज देतांना विचारात घेतात.

👉 चला तर मग तुमचा सिबिल स्कोअर पाहून घ्या : https://click.laplink.mobi/SHHL2

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये; 30 हजार नागरिकांबरोबर करणार योगा

● विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार नसेल तर निवडणुकांवर बहिष्कार घालू - प्रकाश आंबेडकरांचा इशारा

● आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना लिहिले पत्र

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● मुंबई विभागाचा निकाल 77.04 टक्के, गेल्यावर्षी 90.41 टक्के होता, गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी निकाल

● राज्यात तंत्रशिक्षणाच्या एक लाख जागा घटल्या, नोकरीच्या संधी नसल्याने विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

● CBSE आणि ICSE बोर्डाचे महत्त्व वाढवण्यासाठी दहावीचा निकाल घसरवला? - धनंजय मुंडे

● पाकिस्तानात दहशतवाद्यांनी घडविला बॉम्बस्फोट, स्फोटात लष्कराचे चौघे ठार

● अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली नासाला चंद्रावर जाण्याच्या मोहीमा थांबवण्याची सुचना

● डेल कंपनीने आपला लॅटीट्युड 7400 हा टु-इन-वन लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत दाखल करण्याची केली घोषणा

● विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशवर 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला

● विनाअनुदानित शिक्षकांची व्यथा मांडणारा 'सर' सिनेमा मुंबईच्या चित्रपट महोत्सवात झळकणार

● पुणे : पुरंदर येथे ‘छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर

● पुणे : अॅमेझॉन कंपनीला गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले

● पुणे : सोशल मीडियामुळे एकाला आत्महत्येपासून रोखण्यात पोलिसांना यश

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏆 इंग्लंडची बांगलादेशवर तर न्यूझीलंडची अफगाणिस्तानवर मात

LetsUp | Sports

विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात इंग्लंडचा बांगलादेशवर 106 धावांनी दणदणीत विजय.

📍 इंग्लंडने दिलेल्या 387 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 280 धावांत गारद झाला.

🏏 इंग्लडच्या जेसन रॉय (153), जॉनी बेअरस्टो ( 51), व जोस बटलर (65) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने मोठी धावसंख्या उभी केली.
___________

👍 न्यूझीलंडची अफगाणिस्तानवर 7 गड्यांनी मात

💁‍♂ विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा अफगाणिस्तानवर सात गाडी राखत दणदणीत विजय.

🏏 अफगाणिस्तानने दिलेले 173 धावांचे आव्हान न्यूझीलंडने सहज पार करत शानदार विजय मिळवला.

1⃣ विजयाबरोबरच गुणतालिकेत न्यूझीलंडने अव्वल स्थान कायम राखले.
_____________

🏏 आज भारत Vs ऑस्ट्रेलिया

🎯 दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे मनौधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाची आज ऑस्ट्रेलियाशी लढत आहे.

📍 विश्वचषक स्पर्धेतील अपराजित्व राखण्याकरिता भारताकरिता ही लढत महत्वाची आहे.

दोन्ही संघाची कामगिरी : विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धऑस्ट्रेलियाची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. 11 लढतीत ऑस्ट्रेलियाने तब्बल 8 लढती जिंकल्या आहेत. उभय संघात झालेल्या 136 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 77 तर भारताने 49 लढती जिंकल्या आहेत.

वेळ - दुपारी 3 वाजता

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
साप्ताहिक राशीभविष्य; 09 ते 15 जून 2019

LetsUp | Astrology

मेष : जिद्द ठेवा: व्यवसाय-नोकरीत क्षुल्लक तणाव दूर करण्याची संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवे गुंतवणूकदार मिळतील. सर्व सोपे समजू नका. जिद्द ठेवा. प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.

वृषभ : स्पर्धेत जिंकाल : तुमच्या क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. व्यवसायात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. डोळय़ांची काळजी घ्याघर, वाहन खरेदी कराल. कौटुंबिक तणाव कमी होईल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

मिथुन : वाद वाढवू नका: उद्योगधंद्यात नवी संधी मिळेल. नोकरीत कामाचा व्याप राहील.मैत्रीत दुरावा येईल. वाद वाढवू नका. कुटुंबात नाराजी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनावर दडपण येईल.

कर्क : वेळेचे भान ठेवा : आत्मविश्वासाच्या जोरावर कामे करता येतील. अतिशयोक्तीने कुठेही वावरू नका. व्यक्त होताना प्रसंग, वेळेचे भान ठेवा. कायदा पाळा. वाहनापासून धोका होईल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे.

सिंह : पदाधिकार मिळेल : नोकरी मिळेल, पण ती टिकवा. व्यवसायास दिशा मिळेल. नवीन कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. घरासंबंधीची चिंता मिटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पदाधिकार मिळण्याची आशा निर्माण होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल.

कन्या : प्रेमाला चालना : कौटुंबिक जबाबदारी कुशलतेने पूर्ण कराल. रविवार, सोमवार वाद वाढवू नका. वाहन जपून चालवा. तुमचे सहाय्य घेण्यासाठी विरोधक, मित्रपक्ष येतील. कोर्टाचे काम संपवा. प्रेमाला चालना मिळेल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल.

तूळ : संयम ठेवा : क्षेत्र कोणतेही असो, कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. संयम ठेवा, धंद्यात दूरदृष्टी ठेवा. गिऱहाईकाबरोबर नम्र रहा. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक करू नका. पदासाठी वाट पाहावी लागेल. मैत्रीत, कुटुंबात नमते धोरण ठेवा.

वृश्चिक : मित्रपक्षाच सहकार्य : उद्योगधंद्यात मोठे काम मिळेल, परंतु नीट पारखून घ्या. यांत्रिक बिघाडामुळे काम वेळेवर होणे कठीण होईल. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. विरोधक चहुबाजूंनी हल्ले करतील. मित्रपक्ष उपयोगी पडेल. प्रवासात सावध रहा.

धनु : मैत्रीत दुरावा: कुठल्याही क्षेत्रात सुरुवातीच्या चर्चेत नमते धोरण ठेवावे लागेल. मनोबल टिकून राहील. नोकरीत सहकारी त्रास देतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कटकारस्थाने होतील.मैत्रीत दुरावा संभवतो. प्रकृतीची काळजी घ्या.

मकर : संमिश्र आठवडा : आठवडय़ाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे करा. धंद्यात निश्चित धोरण ठरवताना काळजी घ्या. योग्य व्यक्ती आणि मित्रांचा सल्ला घ्या. ध्येयावर लक्ष ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. आठवडा संमिश्र असेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिंकाल,

कुंभ : मनावर दडपण येईल: प्रगतीचा किनारा थोडा दूर दिसेल. व्यवसायात प्रगती होईल. मंगळवार, बुधवार राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव वाढेल. मनावर दडपण येईल. आठवडय़ाच्या शेवटी दिशा मिळेल. प्रेमाने काम करून घ्या. व्यवहारात सावध रहा.

मीन : मन अस्थिर : व्यवसायात मोठे काम मिळेल. क्षुल्लक वादाला महत्त्व देऊ नका. गोड बोलून हेतू साध्य करा. नोकरीत वरिष्ठ तुमची बाजू घेतील. मनाची अस्थिरता राहील. कला क्षेत्रात यश मिळेल. आठवडा दगदगीचा राहील.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 ..‘त्या’ बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस

LetsUp । National

भारतीय हवाई दलाचं बेपत्ता विमान AN-32 विषयी माहिती देणाऱ्याला हवाई दलानं जाहीर केलं इनाम.

🧐 काय आहे घटना? : एएन-32 मालवाहतूक विमान सोमवारी (3 जून) दुपारी बेपत्ता झाले आहे. हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले व दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. संपर्क तुटताच हवाई दलाने विमानाचा शोध सुरू केला, मात्र अद्याप या विमानाचा शोध लागलेला नाही.

📞 संपर्क क्रमांक : बेपत्ता विमानाच्या लोकेशनची माहिती 0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या क्रमांकावर देता येईल असं ही विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी म्हटलं आहे.

📍 या बेपत्ता विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🥭 हापूस आंब्याचा केक

LetsUp । Recipe

💁‍♂ साहित्य: मैदा - 1 कप (110 ग्रॅम), हापूस आंब्याचा रस 4 वाटय़ा, पिठी साखर - अर्धा कप (100 ग्रॅम), दूध - 3 ते 4 कप, बटर 1/3 कप (80 ग्रॅम), काजू - 2 चमचे, बेदाणे - 2 चमचे, बेकिंग पावडर - 1 चमचा, बेकिंग सोडा - पाव चमचा

🍽 कृती - एका भांड्यात रवा घ्या. त्यात दही, दूध, साखर, लोणी/तूप सगळे जिन्नस नीट कालवून ठेवा. हे मिश्रण 4/5 तास झाकून ठेवा. त्यांनतर त्यात बेकिंग पावडर व आंब्याचा रस मिक्स करा. ड्राय फ्रुट्स घालून चांगले मिक्स करा. ओव्हनच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता.

ओव्हनमध्ये 150 ते 180 तापमानाला 40 ते 45 मिनिटे बेक करा. केकचा रंग ब्राऊन झाला याचा अर्थ केक तयार झाला आहे. खात्री करून घेण्यासाठी केकमध्ये सुरी टोचून पाहू शकता. केक सुरीला चिकटला नाही म्हणजे केक तयार झाला असे समजावे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🌱 अंजीर लागवड पद्धती

LetsUp । Agri

💁‍♂ अंजीर फळातील अन्नमूल्ये व पोषणक्षमता यामुळे हे फळ खाण्यासाठी उपयोगात आणतात. महाराष्ट्रात जवळपास 400 हेक्टर क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली आहे.
____________

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
_________

🌤 हवामान व जमीन : अंजिराच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी ऊन आणि कोरडे हवामान पोषक आहे. तसेच यासाठी सरासरी 600 ते 650 मिलीमीटर पाऊसाची आवश्यकता असते. अंजीर लागवडीसाठी तांबूस रंगाची चिकन माती, आणि १ मीटरच्या खाली मुरमाचा ठार असलेली जमीन योग्य असते.

📍 अंजिराच्या जाती : पुणे अंजीर, दिनकर, दिएन्ना, एक्सेल, कोनाद्रीया

🧐 लागवड पद्धत : अंजिराच्या झाडाची अभिवृद्धी फ़ाटेकलम किंवा गुटिकलम तयार करून करता येते. लागवडीसाठी जमिनीत 5 x 5 मीटर आणि हलक्या जमिनीत 4.5 x 3.0 अंतरावर 60 x 60 x 60 सेंमी. आकाराचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात 10% कार्बारिल भुकटी किंवा फॉलीडॉल पावडर 100 ते 150 ग्राम मिसळावी. लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांच्या अंतराने कलामांना पाणी द्यावे.

💧 खते व पाणीपुरवठा : झाडाला सुरुवातीला नियमित खते द्यावीत. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला 10 किलो शेणखत. 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद व 50 ग्रॅम पालाश छाटणीच्या वेळी द्यावे. पूर्ण वाढलेल्या 5 ते 6 वर्षाच्या झाडाला 40 ते 50 किलो शेणखत, 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद व 275 ग्राम पालाश छाटणीच्या वेळी द्यावे. फळधारणेनंतर एक महिन्याने पुन्हा 400 ग्रॅम नत्र द्यावे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ भारत - बांगलादेश बैठक पुढील आठवड्यात

तामिळनाडूत हिंदी भाषा हटाव मोहीम
अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार 74 वर्षीय वृद्धेच्या भूमिकेत

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/Ltsupwani09june

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि खूनप्रकरणाचा निकाल आज (दि.10) विशेष न्यायालयात लागणार

● देशातील जल संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्या (दि.11) राज्ये-केंद्र सरकारची बैठक, उपाययोजनांवर होणार चर्चा

● यंदा देशातील 21 विमानतळांवरून 2 लाख भारतीय हज यात्रा करणार : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● जून अखेरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील रिक्षा चालक-मालक 9 जुलैपासून संपावर जाणार

● महाराष्ट्रात शिवसेनेसोबत विधानसभेला युती ही राहणारच पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर स्पष्ट

● व्हर्च्युअल असिस्टंट Amazon Alexa आता अधिक स्मार्ट, कॅबपासून तर रेस्टॉरंटपर्यंत बुकिंग करण्यात समर्थ

● भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी धुव्वा, सलामीवीर शिखर धवन (117) ठरला सामनावीर

● राफेल नदालने डॉमनिक थिमचा पराभव करत जिंकले 12 व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद

● फिफा महिला विश्वचषक 2019 : ब्राझीलकडून जमैकाचा तर इंग्लंडकडून स्कॉटलंडचा पराभव

● कॅन्सरवरील यशस्वी उपचारांनंतर येत्या सप्टेंबर महिन्यात अभिनेते ऋषी कपूर मायदेशी परतणार

● अहमदनगर - रविवारी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने लावली हजेरी, बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या

● अहमदनगर - झेडपी कर्मचारी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत अहवालातील चुकांवरून विरोधकांकडून संचालक मंडळ धारेवर; संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

● अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील मुळा नदीपात्रात घारगाव पोलिसांची कारवाई; अवैध वाळूची वाहतूक करणारी वाहने पकडली

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup