LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
😱 शहरात प्रतिदिन 4 टन कचरा

LetsUp । Pune

🎯 महापालिकेकडे नोंदणीकृत रूग्णालये, दवाखाने, रक्त पेढया आदीकडून, प्रतिदिन 3 ते 4 मेट्रिक टन जैव वैद्यकीय कचरा घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे जमा होत आहे.

👌 जमा झालेल्या कचऱ्यापैकी 1.20 टन कच-यावर पुनप्रक्रिया क्रिया केली जात आहे.

🚛 कचरा संकलित करण्यासाठी 7 जीपीएस यंत्रणायुक्त वाहनांची सोय करण्यात आली आहे.

📍 या कच-याची योग्य विल्हेवाट न लावल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत घातक ठरू शकते.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 दहावीचा निकाल आज नाही

LetsUp । Update

सोशलवर निकालाबाबतच्या सुरु असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, बोर्डाचे आवाहन

💁‍♂ गेल्या काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर दहावीचा निकाल आज जाहीर होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज दहावीचा निकाल जाहीर होणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावीच्या बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला : https://twitter.com/LetsUp_
--------------------

📍 अफवांवर विश्वास ठेऊ नका : सोशल माध्यमांमध्ये दहावीच्या निकालाबाबत फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. तो मेसेज चुकीचा असून दहावीच्या निकालाची तारीख बोर्डाने अजून जाहीर केली नाही. अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी दिली.

🤔 काय आहेत अफवांची कारणे? : दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागतो. हे लक्षात घेता 6 ते 8 जून दरम्यान निकाल लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. यामुळे सोशल माध्यमांमध्ये आज निकाल जाहीर होणार आहे असा मेसेज व्हायरल होत होता.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🏡 देशात घर विक्रीत 13 टक्‍क्‍यांनी वाढ

LetsUp । Update

रिऍल्टी क्षेत्रातील माहिती संकलन करणारी कंपनी सीबीआरईने सादर केला अहवाल.

🎯 गेल्या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी ते मार्च या काळात घरांच्या विक्रीत 13 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामध्ये मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि दिल्ली या शहरात घरांची विक्री अधिक झाली आहे, अशी माहिती अहवालातून देण्यात आली आहे.

🤔 काय आहेत कारणे? : बऱ्याच शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, जे लोक राहण्यासाठी घरे खरेदी करू इच्छितात त्यांच्याकडून घराची खरेदी होत आहे. तसेच सरकारने किफायतशीर घरांना चालना दिली आहे. या कारणामुळे घरांची विक्री वाढली आहे.

💁‍♂ 3 महिन्यात 30 हजार घरांची विक्री : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात 30 हजार घरांची विक्री झाली आहे. ही आकडेवारी पुणे, हैदराबाद, बेंगलोर, कोलकत्ता, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या सात शहरासाठी आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ स्वच्छ भारत योजनेमुळे भुजल प्रदूषणात घट

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
प्रवीण तरडेंच्या 'सरसेनापती हंबीबराव' चे पोस्टर रिलीज

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani06June

----------------------
👏 लेट्सअप सेवेबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा. पुढील लिंकवर क्लिक करून योग्य ती माहिती भरून आपण आपल्या आयडिया, सूचना तसेच बदल सुचवू शकता : 👉 http://bit.ly/2QSxAIn
----------------------

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी वा रद्द होण्याचे संकेत

● सामरिक शक्ती मजबूत करण्यासाठी भारत इस्त्राइलकडून 300 कोटीत 100 स्पाइस बॉम्ब खरेदी करणार

● 'विप्रो'चे संस्थापक अझीम प्रेमजी 30 जुलै रोजी होणार निवृत्त; कंपनीने केली अधिकृत घोषणा

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय, निती आयोगाच्या पुनर्रचनेला दिली मंजुरी

● राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे निश्चित, दिल्लीत 9 जून रोजी शिक्कामोर्तब

● जागा वाटपाच्या मुद्दय़ावर ‘आमचं ठरलंय’, नाराजीचा, वादाचा कुठलाच मुद्दा नाही : उद्धव ठाकरे

● हुआवे (Huawei) 11 जून रोजी भारतीय बाजारात बहुचर्चित 'Honor 20' सीरीज स्मार्टफोन लॉन्च करणार

● ऑस्ट्रेलियाची वेस्ट इंडिजवर 15 धावांनी मात; संघर्षपूर्ण 92 धावा करणारा नॅथन कूल्टर नाईल ठरला सामनावीर

● महेंद्रसिंग धोनीने ग्लोव्ह्जवरील सैन्याचा बलिदान बॅज काढावा, आयसीसीने बीसीसीआयला केली विनंती

● सलमान आणि आलिया भट्ट यांचा 'इन्शाअल्लाह' चित्रपट पुढील वर्षीच ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

● पुणे - विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांसह 'नो एन्ट्री'तून येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे वाहतूक पोलिसांना आदेश

● पुणे- विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागवार बैठकांना सुरुवात, भोसरी विधानसभा मतदारसंघातील बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती

● पुण्यातील कमाल तापमानात एका दिवसात सहा अंशांची घट; गुरुवारी 34.7 अंश सेल्सियस कमाल व 25.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💁‍♂ भारत इस्त्राइलकडून खरेदी करणार 100 स्पाईस बॉम्ब

LetsUp | National

🤝 भारताने संरक्षण खात्याअंतर्गत इस्रायलसोबत केला नवीन करार

👉 यानुसार भारतीय वायू सेना इस्रायलकडून 300 कोटी रुपयांचे 100 बॉम्ब खरेदी करणार

👍 पुढील 3 महिन्यात हे 100 स्पाईस बॉम्ब भारतीय वायुसेनेच्या दलात दाखल होणार

💫 भारतीय वायूसेनेकडून 'बालाकोट' हल्ल्यांमध्ये याच स्पाईस बॉम्बचा झाला होता वापर

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💁‍♂ भारत इस्त्राइलकडून खरेदी करणार 100 स्पाईस बॉम्ब

LetsUp | National

🤝 भारताने संरक्षण खात्याअंतर्गत इस्रायलसोबत केला नवीन करार

👉 यानुसार भारतीय वायू सेना इस्रायलकडून 300 कोटी रुपयांचे 100 बॉम्ब खरेदी करणार

👍 पुढील 3 महिन्यात हे 100 स्पाईस बॉम्ब भारतीय वायुसेनेच्या दलात दाखल होणार

💫 भारतीय वायूसेनेकडून 'बालाकोट' हल्ल्यांमध्ये याच स्पाईस बॉम्बचा झाला होता वापर

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🧐 धोनीचे 'ते' ग्लोव्ह्ज आणि चर्चा

LetsUp | Trending

🎯 टीम इंडियाच्या पहिल्या मॅचनंतर सोशल मीडियावर महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जची चर्चा रंगली आहे

💁‍♂ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या ग्लोव्ह्जवर इंडियन पॅरा स्पेशल फोर्सच्या रेजिमेंटल डॅगरचे चिन्ह होते, या चिन्हाला ‘बलिदान चिन्ह’ असे म्हटले जाते

🤔 ‘बलिदान चिन्ह’ काय आहे? : पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे हे विशेष बलिदान चिन्ह असते. या चिन्हावर देवनागरी लिपीमध्ये ‘बलिदान’ असे लिहीलेले असते हे चिन्ह चांदीपासून बनवलेले असते. या चिन्हावर लाल रंगाच्या प्लास्टिकचे आवरणंही असते.

📍 ICC ची BCCIकडे विनंती : ICCच्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळाडूला कोणतेही राजकीय, धार्मिक किंवा वांशिक संदेश दाखवता येत नाहीत.

त्याचाच आधार घेत धोनीने या पुढील वर्ल्ड कपच्या सामन्यात इंडियन पॅरा स्पेशल फोर्सच्या रेजिमेंटल डॅगरचं चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालू नयेय अशी विनंती ICCने BCCIकडे केली आहे.

धोनीच्या समर्थनार्थ ट्रेंड : दरम्यान ICCच्या या विनंतीनंतर धोनीने त्याचे ग्लोव्ह्ज मॅचमध्ये वापरावेत असे त्याच्या अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे.

ट्विटरवर #DhoniKeepTheGlove असा ट्रेंड सध्या चालू आहे. धोनीने आपल्या देशाच्या सैन्याप्रती दाखवलेले हे प्रेम असून त्यात काहीच चूक नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💁‍♀ स्कीन टोन आणि शोभून दिसणारे रंग

LetsUp | Lifestyle

प्रत्येकजण ट्रेंडिंग फॅशन लक्षात घेऊन त्यानुसार आवडत्या रंगाचे कपडे खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र यातील प्रत्येक रंग शोभून दिसेलच असे होत नाही. म्हणून प्रत्येकालाच शोभून दिसतील असे काही रंग आहेत ते पाहुयात...

1) मस्टर्ड कलर : कार्यक्रम, लग्न समारंभात तुम्हाला जरा हटके दिसायचे असेल तर पिवळ्या रंगातल्या मस्टर्ड यलो या शेडचे कपडे नक्कीच तुम्ही ट्राय करायला हवे. विशेष म्हणजे हे कुठल्याही स्कीन टोनवर शोभून दिसतात.

2) ब्राईट पिंक : या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हा रंग प्रत्येक स्कीन टोनवर उठून दिसतो. डार्क रंगाच्या जीन्सवर घातलेला ब्राईट पिंकचा टॉप नक्कीच इतराचे लक्ष वेधून घेतो. पार्टीसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.

3) ऑलिव्ह ग्रीन : विशेषतः आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी जाताना जर तुम्ही ऑलिव्ह ग्रीन कलरचे कपडे परिधान केले तर तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच अधिक आकर्षक दिसेल.

4) कोरल : नवीन फॅशनचा विचार करता कपडे खरेदी करताना केशरी रंग मिक्स असलेला कोरल कलर ट्राय करायला हरकत नाही. कारण हा रंग कुठल्याही स्कीन टोनवर शोभून दिसतो.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 जिल्ह्यात 16 चारा छावण्या सुरू

LetsUp । Pune

जिल्ह्यातील चाराटंचाईची दखल घेत राज्य शासनाकडून 16 छावण्यांना मंजुरी.

🎯 16 चारा छावण्यांमध्ये तब्बल 7 हजारांपेक्षा अधिक जनावरे दाखल करण्यात आली आहे.

💁‍♂ जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सर्वाधिक सहा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत.

📍 सर्वाधिक दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या पुरंदरमध्ये यावेळी फक्त एक चारा छावणी आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 ऐतिहासिक! आंध्रप्रदेश सरकारमध्ये 5 उपमुख्यमंत्री

LetsUp | Update

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी विधीमंडळाच्या बैठकीत केली घोषणा.

🎯 सत्तेत सर्वाना समान संधी : सत्तेत सर्व जातींना समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे. यामध्ये एससी, एसटी, मागास, अल्पसंख्यांक आणि कापू समुदायीतील प्रत्येकी एकाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे.

💁‍♂ दोन उपमुख्यमंत्री पद्धत : सत्तासमतोल राखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांचा प्रयोग आजवर अनेक राज्यांनी केला आहे. आंध्रप्रदेशच्या आधीच्या सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी दोन उपमुख्यमंत्री नेमले होते. तर उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्येही काही काळ दोन उपमुख्यमंत्री होते.

📍 एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असण्याचा देशाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 ब्रेकिंग! उद्या लागणार दहावीचा निकाल

LetsUp । Breaking

एसएससी बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर

🎯 त्यानुसार दहावीचा ऑनलाइन निकाल उद्या शनिवारी दि. 8 जून रोजी दुपारी 1 वाजता होणार जाहीर.

📍 मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे दहावी परीक्षा घेण्यात आली होती

📅 विशेष म्हणजे गेल्या वर्षाही दहावीचा निकाल 8 जून रोजी लागला होता.

👨‍💻 दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून 17 लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते.

🧐 येथे पाहू शकाल निकाल :

maharashtraeducation.com
mahresult.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in

📱 मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना आसन क्रमांक नोंदवून 57766 या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🚆 ट्रेनमध्ये वाजवले जातात 11 प्रकारचे वेगवेगळे हॉर्न

LetsUp । Special

💁‍♂ ट्रेनच्या हॉर्न केवळ हॉर्न नसून त्याला एक अर्थही असतो. भारतीय रेल्वेमध्ये 11 प्रकारच्या हॉर्नचा वापर केला जातो.

🎯 या प्रत्येक हॉर्नला एक अर्थ असतो. चला जाणून घेऊन वेगवेगळ्या हॉर्नचा अर्थ...

----------------------
👍 इंस्टाग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा स्पेशल अपडेट:
फॉलो इंस्टाग्राम : https://instagram.com/Letsup.in
----------------------

01) जर चालकाने एकदा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, ट्रेन यार्डमध्ये जाण्यासाठी तयार आहे.

02) दोनदा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, चालक गार्डला ट्रेन सुरू करण्याचा संकेत मागत आहे.

03) तीन वेळा छोटा हॉर्न वाजवला तर ट्रेन नियंत्रणाबाहेर गेली आहे. याने गार्डला संकेत दिला जातो की, व्हॅक्यूम ब्रेकचा वापर करावा.

04) चार वेळा छोटा हॉर्न वाजवला तर समजून घ्या की, इंजिनमध्ये बिघाड आहे आणि गाडी पुढे जाऊ शकणार नाही किंवा काही दुर्घटना झाली आहे.

05) चालकाने एकदा मोठा हॉर्न आणि एक छोटा हॉर्न वाजवला तर याने गार्डला संकेत दिला जातो की, एकदा गाडी सुरू होण्यापूर्वी त्याने ब्रेक पाइप सिस्टीमची तपासणी करावी.

06) तसेच जर चालकाने दोन मोठे आणि दोन छोटे हॉर्न वाजवले तर याचा अर्थ होतो की, गार्डने इंजिनकडे यावं.

07) चालकाने पुन्हा पुन्हा मोठा वाजवला तर गाडी कोणत्याही स्टेशनवर न थांबता पुढे जाणार आहे.

08) चालकाने थांबून थांबून मोठा हॉर्न वाजवला याचा अर्थ होतो की, गाडी रेल्वे फाटकाला क्रॉस करत आहे.

09) एक मोठा आणि एक छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, रेल्वे विभागली जात आहे.

10) त्यासोबतच चालकाने दोन छोटे आणि एक मोठा हॉर्न वाजवला तर कुणीतरी आपातकालीन चेन ओढली आहे.

11) चालकाने 6 वेळा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, पुढे काहीतरी मोठा धोका आहे.

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🎯 10 वी च्या मुलांनो चिंता नको, रहा टेन्शन फ्री!

💁‍♂ दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असून निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकते बरोबरच मनामध्ये काहीशी धाकधूक देखील असते.

👍 मुलांनो टेन्शनला बाय बाय करण्यासाठी व तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे, तुमच्यासाठी काही खास टिप्स. जाणून घ्या....

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ उत्तर प्रदेशात वादळामुळे 19 जणांचा मृत्यू

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीस
सूर्यवंशी सिनेमात झळकणार अभिनेता गुलशन ग्रोवर

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 http://bit.ly/ltsupwani07June

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● रिझव्‍‌र्ह बँकेकडून कर्जबुडवेपणा निश्चित करण्यासाठी मुदतवाढ (30 दिवस); तडजोडीचा मार्गही खुला

● आभासी चलन बाळगणे, त्यांची खरेदी-विक्री करणे आता देशात गुन्हा समजण्यात येणार

● चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी विम्यात येत्या 16 जूनपासून वाढ होणार

● केंद्राने केंद्रीय दक्षता आयोगातील रिक्त महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ

● देशात यंदा 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी MBBSच्या 5 हजार जागा वाढवण्यात येणार

● पाकिस्तानची भारताला पुन्हा चर्चेची ऑफर; शाह महमूद कुरैशी यांचे विदेश मंत्री जयशंकर यांना पत्र

● अखेर ब्रिटीश पंतप्रधान थरेसा मे यांनी कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदाचा दिला राजीनामा

● राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये घट नाहीच; गेल्या वर्षीच्या तुलनेत सापळ्यांची (375) संख्या सारखीच

● राज्‍यातील सर्व शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 'लंचटाइम' आता अर्ध्या तासाचा

● महेंद्रसिंह धोनीच्या बॅजसंदर्भातील अपील आयसीसीने फेटाळले; बॅज नसलेले ग्लोव्हज वापरण्याची सूचना

● बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तन्वर तिच्या आगामी वेबसिरीजमध्ये वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार

● अहमदनगर - जिल्ह्यातील काही भागांत शुक्रवारी सायंकाळनंतर जोरदार अवकाळी पावसाने लावली हजेरी

● अहमदनगर - सन 2019-20 या वर्षात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता, यासाठी 40 कोटी रुपये निधी मंजूर

● अहमदनगर - मागण्यांसाठी जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन; सरकारच्या धोरणाचा केला निषेध

● अहमदनगर - मैत्रेय या गुंतवणूक कंपनीत नगर जिल्ह्यातील सुमारे 25 हजार गुंतवणूकदारांचे तब्बल 22 कोटी 54 लाख रुपये अडकल्याचे स्पष्ट

📞 जाहिरातीसाठी संपर्क: 7875190190

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! दहावीचा निकाल जाहीर; टक्केवारी घसरली!

LetsUp | Breaking

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, यंदा दहावीचा निकाल 77.10 टक्के लागला आहे

👍 यंदाही मुलींनी मारली बाजी, यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 10.64 टक्क्यांनी जास्त आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 83.05 टक्के लागला आहे.

😱 निकालाचा टक्का घसरला : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12.31 टक्क्यांनी निकाल कमी लागला असून गेल्या 5 वर्षांमधील यंदा दहावीचा सगळ्यात कमी निकाल लागला आहे. याआधी 2007 मध्ये 78 टक्के निकाल लागला होता.

📝 विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी 10 जूनपासून अर्ज करता येईल.

🎯 परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

💁‍♂ विभागवार टक्केवारी : पुणे : 82. 48 I नागपूर : 67.27 I औरंगाबाद : 72.20 I मुंबई : 77.04 I कोल्हापूर : 86.58 I अमरावती : 71.98 I नाशिक : 77.58 I लातूर : 72.87 I कोकण : 88.38

🌐 दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल.

👨‍💻 निकालासाठी संकेतस्थळे :

mahresult.nic.in
maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🚫 आभासी चलन बाळगणे गुन्हा ठरणार

LetsUp | National

आभासी चलनामध्ये (Cryptocurrency) व्यवहार करणाऱ्यांना मोठा झटका, कारण आता आभासी चलनाचे सर्व मार्ग बंद होणार आहे.

📝 केंद्र सरकारने 'बॅनिंग ऑफ क्रिप्टो करन्सी अ‍ॅण्ड रेग्युलेशन ऑफ डिजिटल करन्सी बिल 2019'मध्ये दिला प्रस्ताव.

💁‍♂ त्यानुसार कोणीही व्यक्ती आभासी चलनाची निर्मिती करील, जवळ बाळगेल, त्यांची विक्री करील, नष्ट करण्याचा प्रयत्न करील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यवहार करील त्यांना 10 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

या प्रस्तावामुळे देशात आभासी चलनाला मान्यता मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

🧐 म्हणून शिक्षेची तरतूद : देशात आभासी चलनाच्या (क्रिप्टो करन्सी) वापरावर बंदी असतानाही काही मंडळी चोरीछुपे व्यवहार करीत असल्याचे आढळून आले आहे. अशांना पायबंद घालण्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
🌊 जागतिक महासागर दिन

LetsUp । Special

💫 समुद्रातील वाढते प्रदूषण या समस्या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी 8 जून रोजी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो.

🤔 कशी झाली सुरुवात?: जगातील समुद्रांमध्ये वाढते प्रदूषणाची समस्या लक्षात घेत, कॅनडाने 1992 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत या संदर्भातला प्रस्ताव मांडला होता. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने, हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला आहे.

💁‍♂ प्रदूषणाची कारणे व परिणाम: मानवी हस्तक्षेप, सांडपाणी, प्लास्टिक कचरा, अशा विविध कारणांमुळे समुद्र प्रदूषित होत आहे. याचा परिणाम सागरी जिवांवर होतोय. साधारण 70 टक्के प्राणवायू हा समुद्रातून येतो. त्यामुळे समुद्र वाचवणं गरजेचं आहे. समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे.

📍 हेतू : जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन,अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्वाचे आहे.

🎯 विशेष :

पृथ्वीवर जेवढे पाणी आहे, त्यातले जवळजवळ 97 टक्‍के पाणी हे महासागरांत आहे.
महासागर हा प्रार्थनांचा सर्वात मोठा स्रोत आहे. ज्यामुळे साधारण 2.6 अब्ज लोक महासागराला प्रथिनांचा प्राथमिक स्रोत मानतात.
मानवाने उत्सर्जित केलेल्या कार्बन डायऑक्‍साइडपैकी 30 टक्‍के महासागरांमध्ये शोषून घेतला जातो.

🙏 सागरी साधन संपत्तीचे जतन करुयात पर्यावरणाचे रक्षण करूया!

🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup