LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🚲 आज जागतिक बायसिकल दिन

Lets Up | Special

मानव विकासाच्या प्रक्रिये दरम्यान विविध वाहने निर्मित झाली. त्यातील एक वाहन जे आपल्या आरोग्यासाठी आणि निसर्गासाठी अत्यंत फायदेशीर आहे ते म्हणजे सायकल. याच सायकलची महत्ता ओळखून युनायटेड नेशन्सने पुढाकार घेत 'जागतिक बायसिकल दिन' साजरा करण्याचे नक्की केले. त्यानुसार 3 जून 2018 पासून हा दिन साजरा केला जातो.

🤔 'बायसिकल' दिन का साजरा केला जातो?

हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश खरं तर, प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणाप्रती त्यांची बांधिलकी समजून देऊन प्रदूषण कमी करण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा आहे.
सायकल हे अत्यंत निसर्गोपयोगी वाहन आहे. इतर वाहनांसारखे, सायकल कुठल्याही प्रदूषणास कारणीभूत ठरत नाही.
अत्यंत कमी खर्चात सामान्य माणूस देखील या वाहनाचा वापर करू शकतो आणि त्यामुळेच सायकल हे वाहन लोकप्रिय ठरते.
सायकल वापराने ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषण कमी करण्यास मदत होते.

🚴‍♀ सायकल वापराचे फायदे :

सायकल वापराने स्ट्रोक्स, हार्ट प्रॉब्लेम्स, काही कॅन्सर, आणि डायबेटीसचा धोका कमी होतो. सायकलिंग हा चांगला खेळसुद्धा आहे आणि कुठल्याही वयात आरोग्यदायी राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रात ओळखला जाणारा मार्ग आहे.

📍 जगातील सायकल निर्मितीमध्ये भारत हा चीन नंतरचा दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😳 शोभायात्रेत मुलींकडे रायफल, तलवारी

LetsUp | Pune

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पुण्यातील निगडीमध्ये विनापरवाना शोभायात्रा

🗡 शोभायात्रेत मुलींच्या हातात दिल्या एअर रायफली आणि तलवारी

🚨 याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात 'विहिंप'च्या 3 नेत्यांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

👮‍♂ अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही, पोलिसांची माहिती

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 तंत्रज्ञान-ऑटोमोबाईल कुठं काय?

LetsUp | Tech-Auto

1) iTunes होणार बंद! :

वृत्तानुसार, अ‍ॅपल कंपनी लवकरच iTunes हे अ‍ॅप बंद करण्याच्या विचारात आहे. म्युझिकच्या दुनियेत क्रांती आणणारे हे सॉफ्टवेअर 9 जानेवारी 2001 रोजी लाँच झाले होते. आता 18 वर्षांचा हा प्रवास संपण्याची शक्यता आहे.

🤔 iTunes का बंद होणार? : आता जगभरात अनेक प्रकारच्या सब्सक्रिप्शन बेस्ड म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिस उपलब्ध आहेत, यात कंपनीच्या अ‍ॅपल म्युझिक या अ‍ॅपचाही समावेश आहे. या सर्वांचा परिणाम आयट्यून्सवर झाल्याने हे अ‍ॅप बंद करुन त्याऐवजी एखादी नवी सेवा कंपनी सुरू करु शकते.

2) आलंय 4 दरवाजांचं फ्रिज :

Haier कंपनीने नाविन्यपूर्ण अशा फोर-डोअर बॉटम माऊंटेड रेफ्रिजरेटरच्या (बीएमआर) अनावरणाची घोषणा केली. यात 100 टक्के रेफ्रीजरेटरचा पर्याय आहे.

मजबूत आणि अधिक रुंद अशा काचेच्या कप्प्यांची रचना असलेल्या या रेफ्रिजरेटरमधील रेफ्रिजरेटर विभागात वॉल पार्टिशन नाही. त्यामुळे, ग्राहकांना सुनियोजित पद्धतीने वस्तू साठवण्यासाठी अधिक जागा सहज उपलब्ध होते.

3) ह्युंदाईची 'जेनिसिस' येणार :

'ह्युंदाई' आपल्या 'जेनिसिस' या ब्रॅन्डची अलिशान गाडी भारतात लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांची ही नवी गाडी मर्सिडीज, बीएमडब्लू सारख्या गाड्यांच्या बरोबरीची असेल.

देशभरात काही निवडक शहरात 'ह्युंडाई' लहान सहान शोरूम आणि एक्सपेरिअन्स सेंटर्स चालू करणार आहे. 2020 नंतर कंपनी 'जेनेसिस' भारतात विक्रीसाठी उपलब्ध करेल, असा अंदाज बांधला जात आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💥 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण; हिंदी भाषेची अनिवार्यता नाही!

LetsUp | Breaking

📝 केंद्र सरकारने आज सोमवारी आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात केले बदल

💁‍♂ कलम 4.5.9 अंतर्गत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामधून हिंदी भाषेची अनिवार्यता वगळली

👉 आता देशभरात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यास 3 भाषांपैकी 1 भाषा अनिवार्य असणार

🧐 इंग्रजी भाषा सोडून हिंदी भाषा शिकायची की नाही? हे आपल्याला ठरवता येणार

💫 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामध्ये हिंदी भाषा शिकविण्याच्या प्रस्तावावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असता केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ सरकारकडून अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

LetsUp | National

📍 केंद्र सरकारकडून येत्या 5 वर्षांसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल

👍 राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याचे सरकारने म्हटले

🤔 अजित डोवाल कोण? :

1968च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डोवाल यांनी 'आयबी'मध्ये अनेक वर्षे सेवा केली आहे.
त्यांनी 'आयबी'चे प्रमुखपदही सांभाळले असून पाकिस्तानमध्ये तब्बल 6 वर्षे वास्तव्य केले आहे.
त्यांना 1988मध्ये 'किर्ती चक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत.
सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवेळी रणनिती आखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👌 आकर्षणाच्या महामंत्राने बदला तुमचे आयुष्य!

Lets Up | Motivation

प्रत्येक मनुष्याला आपली सगळी स्वप्नं पूर्ण व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येकजण त्यासाठी कमी-अधिक प्रमाणात प्रयत्न करत असतो. मग असे काय होते कि, काहीच लोक त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होतात? ती लोकं, एक मंत्र अंगिकारतात आणि तोच मंत्र आज आपण जाणून घेणार आहोत.

----------------------
👍 टेलिग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा अपडेट :
फॉलो टेलिग्राम : https://telegram.me/letsup
----------------------

🤔 आकर्षणाचा मंत्र काय? :

आपल्याला विशिष्ट पद्धतीत विचार करायची सवय लागलेली असते आणि त्याच पद्धतीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो.
आकर्षणाचा मंत्र सांगतो कि, तुम्ही जो विचार करता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येते. तुमच्या विचारांमध्ये तुमचे आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. हीच क्षमता अंगीकारून तुमचे आयुष्य सुखकर होऊ शकते.
आपण हे जाणतोच कि, जेव्हा आपण आपली स्वप्न खूप स्पष्टपणे मांडतो तेव्हा आपण एक प्रकारे ती साध्य करण्यासाठी आपल्या मनाला तयार करत असतो.
मानसशास्त्रात, आकर्षणाच्या मंत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. मानसशास्त्रात अनेक कथा देखील या सिद्धांतावर आधारित आहेत, ज्यातून हा सिद्धांत खरा आहे हे सिद्ध होतं.

🧐 फक्त सकारात्मक विचाराने बदल घडतो का? :

जेव्हा आपली स्वप्नं खरी करण्यासाठी आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्या विचारात स्पष्टता असेल तर आपण आपल्या धेय्याकडे यशस्वीरीत्या वाटचाल करू शकतो.
परंतू फक्त सकारात्मक विचार करणे हे प्रगतीचं पहिलं पाऊल असू शकतं. पूर्ण प्रवास हा तुमचे प्रयत्न आणि सातत्य यावर अवलंबून असतो.

📍 या महामंत्राने तुम्ही नातेसंबंध, आर्थिक स्थिती, मानसिक आणि शारीरिक आरोग्य, आत्मविश्वास आणि व्यापार सर्वच ठिकाणी बदल घडवू शकता.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

अभिनेत्री पायल रहतोगीचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
नवाजुद्दीन सिद्दीकीचा नवा चित्रपट येतोय

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/letsupwani03june2019

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● 2018-19मध्ये विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या 6 हजार 800 प्रकरणांची नोंद, रिझर्व्ह बँकेने दिली धक्कादायक माहिती

● केंद्रीय दूरसंचार मंत्रालयातर्फे चालू वर्षातच फाइव्ह जी व अन्य बॅण्डसंबंधीच्या स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल : दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद

● भारतीय हवाई दलाच्या एएन -32 या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले, या विमानात एकूण 13 जण होते

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● तामिळनाडू सरकारचा नवा फतवा, राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी फक्त पारंपारिक कपडे परिधान करावे लागणार

● महात्मा गांधींविषयी ट्वीट भोवले, आयएएस निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली

● गोदावरीत पाणी आणून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आश्वासन

● Saregama ने लाँच केले ‘कारवां’चे मोबाईल व्हर्जन, किंमत 3,990 रुपये; ‘सारेगामा कारवां’च्या अधिकृत संकेतस्थळावरुन खरेदी करता येणार

● पाकिस्तानने यजमान इंग्लंडला 14 धावांनी पराभूत करत केले शानदार पुनरागमन, मोहम्मद हाफीज ठरला सामनावीर

● दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका, वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार

● ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या लोकप्रियता चार्टच्यानुसार, दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये ‘थलायवा’ रजनीकांतच सर्वाधिक लोकप्रिय

● अहमदनगर - भंडारदरा अभयारण्य परिसरात रात्री 9 नंतर काजवा महोत्सव पाहण्यास जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना बंदी, रात्री 12नंतर पर्यटक दिसल्यास 1 हजार रुपये दंड

● अहमदनगर - महापालिकेच्या शहरातील उद्यानांना अचानक भेटी देऊन तेथील स्वच्छता तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची झाडाझडती घेण्याचा महापौर बाबासाहेब वाकळे यांचा निर्णय

● अहमदनगर - येत्या दोन आठवड्यात बँकांना दिलेल्या खरीप कर्ज वाटपाचे अधिकाधिक उद्दिष्ट साध्य करा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे निर्देश

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🏏 पाकिस्तानचा विजय; आज अफगाणिस्तान-श्रीलंका भिडणार

LetsUp | Sports

🎯 आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने यजमान इंग्लंडला 14 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील गुणांचे खाते उघडले

👉 पाकिस्तानने इंग्लंडला 50 षटकात 349 धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 50 षटकात 9 बाद 334 धावा करू शकला

🏆 अष्टपैलू खेळी करणाऱ्या मोहम्मद हाफिजला (84 धावा, 1 बळी) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला

अफगाणिस्तान Vs श्रीलंका

🧐 वनडे वर्ल्डकपमध्ये आज मंगळवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान विजयासाठी झुंजणार

💫 या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे दोन्ही संघ पहिल्या-वहिल्या विजयाच्या शोधात असतील

📝 आमने-सामने इतिहास : 3 वनडे - श्रीलंका : 2 विजय I अफगाणिस्तान : 1 विजय

🎯 स्थळ : सोफिया गार्डन्स, कार्डिफ. I वेळ : दु. 3 पासून

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 मुंबई उच्च न्यायालयात 182 जागांसाठी भरती

LetsUp | Job

🎯 पदाचे नाव : लिपिक

👍 शैक्षणिक पात्रता :

(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि
(iii) MS-CIT किंवा समतुल्य.

🧐 वयाची अट : 03 जून 2019 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

📍 नोकरी ठिकाण : मुंबई I फी: 25/- ₹

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 17 जून 2019

🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/31846L5

👨‍💻 ऑनलाईन अर्ज करा : https://ltsup.in/2WDiewL

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! 'MHT-CET'चा निकाल जाहीर

LetsUp | Breaking

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

👍 विद्यार्थ्यांना https://mhtcet2019.mahaonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार

🧐 निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार, त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला, याबाबतची माहितीही दिली जाणार

💁‍♂ या परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थ्यांनी दिली होती प्रत्यक्ष परीक्षा

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ अभिनयाचे 'अशोक' सम्राट

LetsUp | Special

📺 मराठी चित्रपटसृष्टी काही अनमोल अभिनेत्यांनी खूप गाजवली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा अभिमानाने उमटवला. अशोक सराफ हे त्यातलं अत्यंत आदरणीय नाव.

👉 अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. मूळचे बेळगावचे असलेले अशोक सराफ, मुंबईत आपले शिक्षण घेऊन 1969 मध्ये चित्रपटसृष्टीत सक्रिय झाले.

🧐 अशी हि बनवा बनवी, पांडू हवालदार, आयत्या घरात घरोबा, नवरी मिळे नवऱ्याला अशा अनेक चित्रपटातून त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. अनेक हिंदी चित्रपट, मराठी नाटकं आणि मालिकांमधून सुद्धा ते रसिकांच्या भेटीला आले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीने तर मराठी सिनेमा प्रचंड गाजवला.

🤔 त्यांना 'मामा' म्हणून का संबोधतात? : अशोक सराफ यांना ‘मामा’ हे नाव पडण्यामागेदेखील रंजक किस्सा आहे. जो त्यांनीच एके ठिकाणी सांगितला होता. "काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता. तो अनेक वेळा सेटवर त्याच्या मुलीला घेऊन येत असते.

त्यावेळी मला पाहिल्यानंतर त्याची मुलगी कायम माझ्याकडे बोट दाखवत हे कोण? असं विचारायची, त्यावेळी प्रकाशने तिला हे अशोक मामा असून तू त्यांना ‘अशोक मामा’ म्हणत जा असं सांगितलं.तेव्हापासून ती मला मामा म्हणते. विशेष म्हणजे कालांतराने तिच्यामुळे सेटवरील प्रत्येक जण मला हळूहळू मामा म्हणू लागले आणि मला मामा हे नवीन नाव मिळालं”.

💁‍♂ अविस्मरणीय डायलॉग :

"वक्खा विख्खी उक्खू"
"आणि हा माझा बायको!"
"कॉक्रोच मारने के वास्ते बेगॉन नहीं मिले तो पॅरागॉन भी चलता है!"
"इस देश में राजनीती में सिस्टिम हो ना हो... सिस्टिम में राजनीती जरूर होती है"
"तुम्ही दिलेले चाळीस रुपये पण वारले"
"जाऊबाई ...इतक्यात नका जाऊ बाई जाऊबाई"

💫 आज अशोक सराफ यांचा 72वा वाढदिवस. एका अत्यंत हरहुन्नरी, संवेदनशील आणि रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!💐

🎂 हॅपी बर्थडे मामा : https://ltsup.in/2F2LSSb

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 नदीपात्रावर पालिकेचा वॉच; पोलिसांकडून जीएसटीसकट दंडवसुली

LetsUp । Pune

👍 नदी पात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय

👨‍✈ विविध कारणास्तव नदीप्रदूषणात भर पडत असून, हे रोखण्यासाठी नदीपात्रात महापालिकेकडून 24 तास सुरक्षारक्षकाची नियुक्ती.

📍 आता कचरा करणाऱ्यांवर 5 ते 25 हजारांपर्यंत दंड, पालिकेकडून आतापर्यंत 13 वाहनांवर कारवाई.

--------------------

🚳 पुणे वाहतूक पोलिसांकडून जीएसटीसकट दंडवसुली!

💁‍♂ वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून आता नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर दंड तसेच दंडाच्या रक्कमेवर 18 टक्के वस्तू व सेवाकर आकारला जाणार.

🧐 येत्या 10 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार, यामुळे नियमांचे पालन होण्यास मदत मिळणार.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🌱 जिल्ह्यात वन विभागाकडून दीड कोटी रोपे तयार

LetsUp । Ahmednagar

राज्य सरकारच्या वृक्ष लागवड योजनेसाठी वनविभागाने जिल्ह्यात 70 लाख खड्डे खोदले.

🎯 राज्य सरकारच्या 50 कोटी वृक्ष लागवड योजनेत यंदा नगर जिल्ह्यात एक कोटी 17 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वन विभागाकडून आतापर्यंत तब्बल एक कोटी रोपे तयार केली असून, मागील वर्षातील 50 लाख रोपे उपलब्ध आहेत.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे सध्या या योजनेची पूर्वतयारी करण्यात येणार आहेत.

🧐 संवर्धनाकडे दुर्लक्ष : जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळ आहे. पाणीटंचाई असल्याने रोपांना टँकरद्वारे पाणी द्यावे लागत आहे. परंतु, सरकारी कार्यालयाकडून रोपांचे संवर्धन व संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. योजना यशस्वीसाठी रोपे लागवडी बरोबरच संवर्धन गरजेचे आहे.

📍 ऑनलाईन नोंद : वनविभागाला रोपांच्या लागवडीची माहिती ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे. यासाठी मोबाइल अ‍ॅपही तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती ऑनलाइन द्यावी लागणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 राधाकृष्ण विखेंनी सोपविला आमदारकीचा राजीनामा

LetsUp | Update

विधानभवनात विधानसभा अध्यक्षांची भेट घेत विखेंनी सोपविला राजीनामा

🤔 काय म्हणाले विखे? : काँग्रेसमध्ये माझी कोंडी होत असून, आता माझी इथे घुसमट होत आहे. मला अनेक आमदार भेटत आहेत परंतु, त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मी मात्र आज एकटा राजीनामा देत आहे.

💁‍♂ विखे पाटील भाजपच्या वाटेवर? : आमदारकीचा राजीनामा दिल्यानं आता विखे पाटील यांचा भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 9 जून रोजी विखे पाटील यांचा भाजप प्रवेश होणार, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

📍 काँग्रेस आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत : राज्यातील काँग्रेस नेतृत्व ज्या पद्धतीने काम करीत आहे त्याबाबत नाराजी असल्याने काँग्रेसचे 8-10 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

🧐 काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार हे देखील भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत. मात्र आमदार सत्तार यांच्या प्रवेशास भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध सुरू आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😱 केरळमध्ये पुन्हा परतला ‘निपाह’ व्हायरस

LetsUp । Update

जीवघेणा निपाह व्हायरस पुन्हा एकदा भारतात दाखल

💁‍♂ केरळच्या कोच्ची शहरातील 23 वर्षाचा एक तरुण या व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. अशी माहिती, राज्याच्या आरोग्य मंत्री के.के.शैलजा यांनी दिली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांनाही ताप आला असून त्यांना देखील देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

💉 रक्त तपासणी : या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांची पुण्यातील राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि केरळमधील इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी अँड इंफेक्शियस डिजीज येथे तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली.

🗣 केरळ सरकारने राज्यात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

📍 आजराची लक्षणे : निपाह व्हायरस संसर्गात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात.

🧐 कसा पसरतो व्हायरस? : हा व्हायरस वटवाघळांपासून पसरतो. वटवाघळाने जर कोणत्या फळाचा चावा घेतलेला असल्यास आणि जर ते फळ किंवा भाजी माणसाने किंवा जनावराने खाल्ल्यास त्याला निपाहची लागण होते. या आजारात माणसाच्या मृत्यूची शक्यता 74.5 टक्के आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😍 भारतीय अर्थव्यवस्था पोहचणार पाचव्या स्थानावर

LetsUp । National

भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन येणार.

💁‍♂ यंदा ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. आयएचएस मार्केटच्या अहवालात ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अहवालानुसार भारत जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रॅकिंमध्ये पुढे सरकत राहणार आहे.

----------------------
👍 इंस्टाग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा स्पेशल अपडेट :
फॉलो इंस्टाग्राम : https://instagram.com/Letsup.in
----------------------

🎯 विशेष :

2025 पर्यंत भारत जपानलाही मागे सोडून आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
2019-23 दरम्यान जीडीपी सरासरी वाढ ही सात टक्के राहणार आहे.
पुढील दोन दशकांमध्ये प्रती वर्षी 75 लाख लोकांना काम मिळत राहणार आहे.

💰 आर्थिक वृद्धी : देशाची जीडीपी 3000 अब्ज डॉलर म्हणजेच 2.10 लाख अब्ज रुपयांवर पोहोचणार आहे. भारत आशियाई देशांसाठी आर्थिक वाढीचे इंजिन असणार आहे. यामुळे आशियातील व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्वाची भुमिका निभावणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ यापुढे नव्या बँकांना परवाना नाही- आरबीआयचा निर्णय

रेडमी नोट 6 प्रो वर दोन हजारांची सूट
हृतिकचा 'सुपर 30' चा ट्रेलर लॉंच

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/317W84L

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● अमरनाथ यात्रेनंतर जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार : निवडणूक आयोग

● कांद्याच्या देशांतर्गत भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून यंदा 50 हजार टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय

● देशातील सुमारे 5 लाख कॉलेज शिक्षकांची रिक्त पदे येत्या सहा महिन्यांत भरावीत, विद्यापीठ अनुदान आयोगाचे आदेश

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● आर्थिक वर्ष 2017-18 चे वार्षिक रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 30 जून असणार

● शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन येत्या जुलै महिन्यात होणार

● गुगल मॅप्सवर नवे फीचर्स; देशातील 10 शहरांचे बस, रेल्वे व ऑटो स्टँडचे रिअल टाइम अपडेट्स मिळणार

● विश्वचषकातील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज; आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार

● श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर 34 धावांनी विजय, चार विकेट घेणारा नुवान प्रदीप ठरला सामनावीर

● कुस्तीपटू बबिता फोगट अडकणार विवाह बंधनात; भारत केसरी मल्ल विवेक सुहागशी करणार लग्न

● बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा 'भारत' चित्रपट 70 देशातील 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर रिलीज होणार

● अहमदनगर - केडगाव येथील अविष्कार राजकुमार आंधळे 99.99 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम

● अहमदनगर - दिलीप थोरे यांची माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती

● अहमदनगर - झेडपी कर्मचारी जिल्हास्तरीय बदली प्रक्रियेस सुरुवात; काल मंगळवारी दुसऱ्या दिवसखेर विविध विभागांतील 110 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

● अहमदनगर - सावेडीतील महापालिकेचा कचरा डेपो 10 जूनपर्यंत अन्यत्र स्थलांतरित करावा, अन्यथा नागरिकांसह ठिय्या आंदोलन; आमदार संग्राम जगताप यांचा मनपा आयुक्तांना इशारा

● अहमदनगर - गेल्या 5 महिन्यात शहरामध्ये साडेसहाशेहून अधिक मद्यपी चालकांवर पोलिसांकडून कारवाई

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup