LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🏆 न्यूझीलंडची श्रीलंकेवर तर ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर मात

LetsUp | Sports

🎯 विश्वचषक स्पर्धेतील सामन्यामध्ये न्यूझीलंडचा श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय

🏏 श्रीलंका संघाने दिलेले 137 धावांचे आवाहन, न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी केवळ 16.1 षटकातच पूर्ण केलं.

🎾 न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. तसेच ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी-ग्रँडहोम, जेम्स निशम, मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

🏏 ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर 7 गड्यांनी मात

💁‍♂ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचा अफगाणिस्तानवर सात गाडी राखत दणदणीत विजय

👍 अफगाणिस्तानने दिलेले 208 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 34.5 षटकांत 3 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.

👌 ऑस्ट्रेलियाच्या फिंचने 49 चेंडूंत 66 धावा केल्या तर वॉर्नरने 114 चेंडूंत नाबाद 89 धावा केल्या.

आजचा सामना
दक्षिण आफ्रिका Vs बांगलादेश
वेळ : दुपारी 3 वा.
स्टेडियम : द ओव्हल

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
साप्ताहिक राशीभविष्य; 02 जून ते 08 जून 2019

LetsUp | Astrology

मेष - बदली, पगारवाढ
नोकरीमध्ये बढतीचे, पगार वाढीचे योग आहेत. व्यवसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचा दिवस आहे. वरिष्ठांशी जुळवून घ्या. वादाचे प्रसंग टाळा. नवविवाहितांना संततीयोग आहे. नाते सुदृढ होईल.

वृषभ - गुंतवणूक फायदेशीर
घरात आनंदाचे वातावरण टिकवण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रलोभनांना बळी पडू नका. व्यक्तिगत आयुष्यात काही मोहाचे क्षण येतील. व्यवसायात यश मिळेल. नवी धंद्यात पैसे गुंतवा. घरातील बाळकृष्णाला तुळस वाहा. .

मिथुन - वाहन खरेदीचा योग
नवीन नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळेल. वाहन सौख्य लाभेल. नव्या वाहनाच्या खरेदीचा योग आहे. अवश्य खरेदी करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल.

कर्क - शुभ योग
व्यवसाय, उद्योगात यश मिळेल. स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल ग्रहमान. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल. एखादी नवीन विद्या शिकण्यास सुरुवात करा. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या.

सिंह - छोटय़ांच्या सहवासात
घरातील लहानांचे लाड करा. त्यांचा सहवास तुम्हाला या आठवडयात मिळणार आहे. त्यांना नवे वस्त्र घेऊन द्या. घरात थोडेवाद होण्याची शक्यता संभावते, त्याकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थ्यांसाठी काहीसा कठीण काळ आहे. एकाग्रता महत्वाची आहे.

कन्या - शुभ संधी
वास्तुखरेदीचे योग आहेत. चांगल्या संधी चालत येतील. व्यवहार करा. तब्येतीची काळजी घ्या. ज्येष्ठांनी जास्त चालणे टाळावे. नोकरीच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. कामावर लक्ष केंद्रित करा.

तूळ - भरभराट होईल
महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. घरात आनंदाचे वातावरण राहील. सोने खरेदी होईल. नोकरी व्यवसायात भरभराट होईल. विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा असून शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावेल.

वृश्चिक - आनंदाचा आस्वाद
हा आठवडा लाभदायी आहे. घरात चांगले वातावरण राहील. जवळचा एखादा प्रवास घडेल. आनंददायी अनुभव येतील. घरातील लहानांची काळजी घ्या.

धनु - खरेदीचा योग
वाहन खरेदीचे योग संभवतात. योग चांगला आहे. घरातही लहानसहान वस्तूंची खरेदी होईल. केलेल्या मेहनतीचे चीज होईल. सहलीचा योग संभवतो. सकारात्मकता वाढेल. विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा आहे.

मकर - उत्कर्ष होईल
कष्ट आणि मेहनत म्हणजे मकर रास. मेहनतीचे फळ या आठवडयात नक्कीच मिळेल. थंड पदार्थ खा. गुलकंद आवर्जून खा. नातेवाईंकांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता. मुलांचा उत्कर्ष होईल. त्यांना नवीन कामांच्या संधी प्राप्त होतील.

कुंभ - नवी खरेदी
अविवाहितांना चांगली स्थळे चालून येतील. विवाह जुळेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल. जवळच्या व्यक्तीस जपा. कामाच्या ठिकाणी कुरबुरी होतील. सावध राहा.

मीन - चालत राहा
व्यायाम आणि आहार यांचे योग्य संतुलन करा. अन्यथा प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल. कामावर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक शक्ती मिळेल. जवळच्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😋 गरमागरम आलू पराठा

LetsUp | Recipe

🍽 साहित्य : 2 वाट्या कणीक, अर्धा चमचा मीठ, 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, 3 मोठे उकडलेले बटाटे, 7-8 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या वाटून, 1 चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर, मीठ, साखर चवीनूसार, पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप

💁‍♀ कृती : कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी. त्यांनतर बटाटे किसून घेऊन किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा. भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत.

बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत. कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा. नंतर जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा. तयार आहे गरमागरम आलू पराठा.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🚍 एसटीचा प्रवास आता कॅशलेस

LetsUp । Update

एसटीच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा

💁‍♂ जाणून घ्या कार्डविषयी : या स्मार्ट कार्डची किंमत 50 रुपये असणार असून सुरुवातीला 300 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत 5 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल.

💳 इतरांनाही लाभ मिळणार : हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणीही व्यक्ती किंवा मित्र एसटीमधून हे कार्ड स्वाईप करुन प्रवास करु शकतील.

🚆 रेल्वे स्टेशनवर सुविधा उपलब्ध : यापूर्वी रेल्वेच्या तिकीट लाईनमध्ये उभं राहू नये म्हणून प्रवाश्यांसाठी एटीव्हीएम सुविधा सुरु करण्यात आली होती. याच पार्श्ववभूमीवर आता एसटी मध्ये देखील प्रवासी तिकीट काढण्यासाठी नवीन रिचार्जकार्ड उपलब्ध होणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

📍 एसटी प्रवासाशिवाय शॉपींगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💰 ग्राहकांसाठी पोस्टाच्या खास योजना

पैसे गुंतवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या काही खास योजना सुरु.

🎯 पैसे गुतंवणूक करण्यासाठी पोस्टाच्या अनेक योजना फायदेशीर आहेत. या योजनामार्फत गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळत आहेत. बँक योजनेच्या तुलनेत सर्वाधिक फायदा पोस्ट ऑफिसच्या योजनेत मिळतो.

👍 बँक आणि पोस्ट ऑफिसच्या व्याज दराची तुलना केली तर पोस्ट ऑफिसची योजना नक्की लाभदायक ठरू शकतात.

💁‍♂ योजना व फायदे :
1) पोस्ट ऑफिस टाईम डिपोजिट अकाऊंट : या योजनेत 7.8 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकता.

2) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट : या योजनेत सध्या 8 टक्कांपर्यंत व्याज मिळत आहे. जर या योजनेत एक लाख रुपये जमा केल्यानंतर 8 टक्के व्याजाच्या हिशोबाने वीस वर्षानंतर 4.8 लाख रुपये होतात.

3) किसान विकास पत्र : या योजनेत जास्तीत जास्त 7.7 टक्के व्याज मिळते. या योजनेत 4 महिन्यांपासून ते 9 वर्षांपर्यंत पैसे जमा करु शकता. या योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 20 वर्षात 4.6 लाख एवढी रक्कम जमा होईल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🌾 पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ.

LetsUp । Update

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकारने वाढवली पीक विमा योजनेची व्याप्ती.

🎯 योजना : शेतकऱ्यांना नेहमीच बदलत्या हवामानाचा फटका बसतो. या काळात शेतकऱ्यांना पीकविमा योजना आधार ठरत, परंतु अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहतात.

यावर उपाय म्हणून सरकारने सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीम स्तर 70 टक्के केला आहे. योजनेंतर्गत खातेदाराला किंवा त्याच्या मुलाला तसेच भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

📍 कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक राहणार आहे.

📅 ऑनलाइन अर्जासह विमा हप्ता भरण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत.

💁‍♂ या पिकांसाठी योजना लागू : भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कारले, मूग, उडीद, तूर, कापूस, मका आणि कांदा या तेरा प्रमुख पिकांसाठी योजना लागू असणार आहे.

🧐 योजनेच्या अटी - हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न झाल्याने होणारे नुकसान, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान, आदींसाठी विम्याचा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी पेरणी न झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त असणे बंधनकारक असणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🌾 पिस्ता ची शेती

LetsUp । Agri

🎯 भारतात विविध पदार्थांमध्ये सुका मेवा वापरला जातो. भारतात पिस्ताच्या विविध जाती उपलब्ध होतात. यामध्ये जम्मू-काश्मीर मधील केरमन, पीटर, चिंकू, रेड, अलेप्पो आणि जॉली यांचा समावेश होतो. तर जाणून घेऊया पिस्ता ची शेती कशी करतात....

🌦 हवामान आणि तापमान : या पिकाला दिवसात कमाल 36 डिग्री सेंटीग्रेड तापमान चालू शकते.

🧐 जमीन आणि माती : या पकियाचे उत्पादन घेण्याआधी मातीची चाचणी आवश्यक
7.0 ते 7.8 सामू असलेली जमीन पिस्ता शेतीसाठी योग्य मानली जाते.

💁‍♂ जमिनीची मशागत : पिस्ता शेतीसाठी जमिनीची खोलगट नांगरणी करणे आवश्यक आहे. जमिनीच्या आत सहा ते सात फुटापर्यंत जर टणक भाग असेल तर तो तोडून जमीन समतल करावी. कारण पिस्ता ची मुळे जमिनीत खोलवर जातात.

🌱 रोप व्यवस्थापन रोप लावण्यासाठी खोल खड्डा खणावा, यामुळे मुळे योग्य रीतीने सामावली जातील.या पिकाला पाणी लागते तरी पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे.सिंचन व्यवस्था असलेल्या बागेसाठी रोपांमध्ये 6 मीटर x 6 मीटर अंतर ठेवावे. विनासिंचन बागेसाठी रोपांमध्ये 8 मीटर x10 मीटर अंतर ठेवावे.

📍 कापणी
पिस्ताच्या झाडाला उत्पादन सुरु होण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागतो.
कापणी करताना अविकसित फळांची कापणी होणार नाही याची काळजी घ्यावी.

👍 उत्पादन
पिस्ताचे उत्पादन हवामान, जाती तसेच शेती व्यवस्थापनाचा दर्जा यावर अवलंबून आहे.
रोप लागवडीच्या 10-12 वर्षानंतर प्रत्येक झाड 8 ते 10 किलो उप्तादन देते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ वर्ल्डकपपूर्वी कर्णधार कोहलीला दुखापत

15 जूनपर्यंत विदर्भात मान्सूनची शक्यता
अक्षय कुमारचा मिशन मंगल 9 ऑगस्टला रिलीज होणार

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://audioboom.com/posts/7277722-letsup-wani-02-june-2019

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● यंदा अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत 1.10 लाख भाविकांची नोंदणी, 1 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान यात्रा

● काश्मीरमध्ये 2019 च्या सुरुवातीच्या 5 महिन्यांमध्ये तब्बल 101 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर

● देशभरातील 10 लाख उमेदवारांनी काल रविवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सनदी सेवा पूर्वपरीक्षा दिली

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● जम्मू-काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांनी हिंसाचाराच्या मार्गाचा त्याग करत सुरक्षा दलांपुढे पत्करली शरणागती

● जेटमधील दोन हजार कर्मचाऱ्यांना स्पाइसजेटमध्ये सामावून घेतले जाणार, जेट कर्मचाऱ्यांना दिलासा

● अमेरिकेचे व्हिसा धोरण कडक; अर्जदारांना समाजमाध्यम वापराची माहिती देणे बंधनकारक

● हेल्मेट न घातल्याने राज्यात 2 वर्षांत 9 हजार 621 दुचाकीस्वारांचा मृत्यू, महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून माहिती समोर

● OPPO ने Oppo F11 Pro आणि Oppo A5 या दोन स्मार्टफोनवर 2 हजार रुपयाची दिली सूट

● विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला 21 धावांनी पराभूत केले, शकिब अल हसन ठरला सामनावीर

● 'मेन इन ब्लॅक- इंटरनॅशनल'च्या हिंदी आवृत्तीचे ट्रेलर रिलीज, यासाठी सिद्धांत आणि सान्याचे डबिंग

● अहमदनगर - कोपरगाव, राहुरी, नेवाशात रविवारी (दि.2) सरी; तापमानात काही प्रमाणात झाली घट

● अहमदनगर - जिल्ह्यात रोजगार हमी योजनेवर तब्बल सव्वाअकरा हजार मजूर; दुष्काळाची तीव्रता वाढल्याने मजुरांच्या संख्येत दुपटीने वाढ

● अहमदनगर - जिल्ह्यातील जवळपास 3 हजार 285 शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या, ज्येष्ठता यादी लवकरच प्रसिद्ध होणार

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🏏 बांगलादेशचा आफ्रिकेला धक्का; आज पाकिस्तानसमोर इंग्लंडचे आव्हान

LetsUp | Sports

बांगलादेशने यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या धक्कादायक कामगिरीची नोंद करताना दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी मिळवला विजय

👉 प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने विक्रमी धावसंख्येची (330) नोंद केली. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 8 बाद 309 धावा केल्या

🏆 बांगलादेशकडून अष्टपैलू खेळी करणाऱ्या शकिब अल हसनला (75 धावा, 1 बळी) सामनावीराचा पुरस्कार मिळाला

आज इंग्लंड Vs पाकिस्तान :

विश्‍वचषक स्पर्धेची खराब सुरूवात करणाऱ्या पाकिस्तानसमोर आज इंग्लंडचे खडतर आव्हान असणार आहे. सध्या पाकिस्तानचा संघ कमालिचा बॅकफुटवर पडलेला असला तरी आजच्या सामन्यात ते विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील हे नक्‍की.

🎯 स्थळ : ट्रेंटब्रिज I वेळ : दु. 3.00 वा

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
राज्यात 2 दिवस वादळी पाऊस

LetsUp | Update

💁‍♂ राज्यात विविध ठिकाणी पुढील 2 दिवस (दि. 3 आणि 4 जून) पूर्वमोसमी वादळी पावसाचा हवामान विभागाने वर्तवला अंदाज

👉 विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे

🎯 भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे

💫 राज्यात इतर ठिकाणीही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने अखेर उष्णतेपासून दिलासा मिळणार

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 तोंडाची चांगली स्वच्छता न करणं ठरू शकतं घातक!

LetsUp | Health

साधारणतः आपण कायम शारीरिक स्वच्छता किती महत्वाची गोष्ट आहे यावर बोलत असतो, मात्र आपलं शरीर योग्य आहारावर निरोगी राहतं. आणि यात मौखिक स्वच्छतेचे खूप महत्व आहे.

मौखिक स्वच्छता जर पाळली गेली नाही तर पचनक्रियेसंदर्भातील अनेक आजार होऊ शकतात हे आपण जाणतोच; मात्र मौखिक अस्वच्छता इतरही प्रकारे आपले आरोग्य धोक्यात घालू शकते. जर तुम्ही रोज तोडांची चांगल्याप्रकारे स्वच्छता करत नसाल तर तुम्हाला हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका होऊ शकतो.

🤔 यामागचे खरे कारण काय? :

तोंडात आढळणारे बॅक्टेरिया फार घातक असतात. हे बॅक्टेरिया धमन्यांमध्ये रक्त गोठवतात, ज्यामुळे शरीरातील इतर अवयवांना व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही.

हेच बॅक्टेरिया जेव्हा तुमच्या मेंदूच्या धमण्या किंवा हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लड क्लॉटिंग करतात, तेव्हा व्यक्ती ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकची शिकार होते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🚲 आज जागतिक बायसिकल दिन

Lets Up | Special

मानव विकासाच्या प्रक्रिये दरम्यान विविध वाहने निर्मित झाली. त्यातील एक वाहन जे आपल्या आरोग्यासाठी आणि निसर्गासाठी अत्यंत फायदेशीर आहे ते म्हणजे सायकल. याच सायकलची महत्ता ओळखून युनायटेड नेशन्सने पुढाकार घेत 'जागतिक बायसिकल दिन' साजरा करण्याचे नक्की केले. त्यानुसार 3 जून 2018 पासून हा दिन साजरा केला जातो.

🤔 'बायसिकल' दिन का साजरा केला जातो?

हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश खरं तर, प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणाप्रती त्यांची बांधिलकी समजून देऊन प्रदूषण कमी करण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा आहे.
सायकल हे अत्यंत निसर्गोपयोगी वाहन आहे. इतर वाहनांसारखे, सायकल कुठल्याही प्रदूषणास कारणीभूत ठरत नाही.
अत्यंत कमी खर्चात सामान्य माणूस देखील या वाहनाचा वापर करू शकतो आणि त्यामुळेच सायकल हे वाहन लोकप्रिय ठरते.
सायकल वापराने ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषण कमी करण्यास मदत होते.

🚴‍♀ सायकल वापराचे फायदे :

सायकल वापराने स्ट्रोक्स, हार्ट प्रॉब्लेम्स, काही कॅन्सर, आणि डायबेटीसचा धोका कमी होतो. सायकलिंग हा चांगला खेळसुद्धा आहे आणि कुठल्याही वयात आरोग्यदायी राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रात ओळखला जाणारा मार्ग आहे.

📍 जगातील सायकल निर्मितीमध्ये भारत हा चीन नंतरचा दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😳 शोभायात्रेत मुलींकडे रायफल, तलवारी

LetsUp | Pune

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पुण्यातील निगडीमध्ये विनापरवाना शोभायात्रा

🗡 शोभायात्रेत मुलींच्या हातात दिल्या एअर रायफली आणि तलवारी

🚨 याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात 'विहिंप'च्या 3 नेत्यांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

👮‍♂ अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही, पोलिसांची माहिती

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 तंत्रज्ञान-ऑटोमोबाईल कुठं काय?

LetsUp | Tech-Auto

1) iTunes होणार बंद! :

वृत्तानुसार, अ‍ॅपल कंपनी लवकरच iTunes हे अ‍ॅप बंद करण्याच्या विचारात आहे. म्युझिकच्या दुनियेत क्रांती आणणारे हे सॉफ्टवेअर 9 जानेवारी 2001 रोजी लाँच झाले होते. आता 18 वर्षांचा हा प्रवास संपण्याची शक्यता आहे.

🤔 iTunes का बंद होणार? : आता जगभरात अनेक प्रकारच्या सब्सक्रिप्शन बेस्ड म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिस उपलब्ध आहेत, यात कंपनीच्या अ‍ॅपल म्युझिक या अ‍ॅपचाही समावेश आहे. या सर्वांचा परिणाम आयट्यून्सवर झाल्याने हे अ‍ॅप बंद करुन त्याऐवजी एखादी नवी सेवा कंपनी सुरू करु शकते.

2) आलंय 4 दरवाजांचं फ्रिज :

Haier कंपनीने नाविन्यपूर्ण अशा फोर-डोअर बॉटम माऊंटेड रेफ्रिजरेटरच्या (बीएमआर) अनावरणाची घोषणा केली. यात 100 टक्के रेफ्रीजरेटरचा पर्याय आहे.

मजबूत आणि अधिक रुंद अशा काचेच्या कप्प्यांची रचना असलेल्या या रेफ्रिजरेटरमधील रेफ्रिजरेटर विभागात वॉल पार्टिशन नाही. त्यामुळे, ग्राहकांना सुनियोजित पद्धतीने वस्तू साठवण्यासाठी अधिक जागा सहज उपलब्ध होते.

3) ह्युंदाईची 'जेनिसिस' येणार :

'ह्युंदाई' आपल्या 'जेनिसिस' या ब्रॅन्डची अलिशान गाडी भारतात लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांची ही नवी गाडी मर्सिडीज, बीएमडब्लू सारख्या गाड्यांच्या बरोबरीची असेल.

देशभरात काही निवडक शहरात 'ह्युंडाई' लहान सहान शोरूम आणि एक्सपेरिअन्स सेंटर्स चालू करणार आहे. 2020 नंतर कंपनी 'जेनेसिस' भारतात विक्रीसाठी उपलब्ध करेल, असा अंदाज बांधला जात आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💥 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण; हिंदी भाषेची अनिवार्यता नाही!

LetsUp | Breaking

📝 केंद्र सरकारने आज सोमवारी आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात केले बदल

💁‍♂ कलम 4.5.9 अंतर्गत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामधून हिंदी भाषेची अनिवार्यता वगळली

👉 आता देशभरात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यास 3 भाषांपैकी 1 भाषा अनिवार्य असणार

🧐 इंग्रजी भाषा सोडून हिंदी भाषा शिकायची की नाही? हे आपल्याला ठरवता येणार

💫 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामध्ये हिंदी भाषा शिकविण्याच्या प्रस्तावावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असता केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ सरकारकडून अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

LetsUp | National

📍 केंद्र सरकारकडून येत्या 5 वर्षांसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल

👍 राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याचे सरकारने म्हटले

🤔 अजित डोवाल कोण? :

1968च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डोवाल यांनी 'आयबी'मध्ये अनेक वर्षे सेवा केली आहे.
त्यांनी 'आयबी'चे प्रमुखपदही सांभाळले असून पाकिस्तानमध्ये तब्बल 6 वर्षे वास्तव्य केले आहे.
त्यांना 1988मध्ये 'किर्ती चक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत.
सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवेळी रणनिती आखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👌 आकर्षणाच्या महामंत्राने बदला तुमचे आयुष्य!

Lets Up | Motivation

प्रत्येक मनुष्याला आपली सगळी स्वप्नं पूर्ण व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येकजण त्यासाठी कमी-अधिक प्रमाणात प्रयत्न करत असतो. मग असे काय होते कि, काहीच लोक त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होतात? ती लोकं, एक मंत्र अंगिकारतात आणि तोच मंत्र आज आपण जाणून घेणार आहोत.

----------------------
👍 टेलिग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा अपडेट :
फॉलो टेलिग्राम : https://telegram.me/letsup
----------------------

🤔 आकर्षणाचा मंत्र काय? :

आपल्याला विशिष्ट पद्धतीत विचार करायची सवय लागलेली असते आणि त्याच पद्धतीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो.
आकर्षणाचा मंत्र सांगतो कि, तुम्ही जो विचार करता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येते. तुमच्या विचारांमध्ये तुमचे आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. हीच क्षमता अंगीकारून तुमचे आयुष्य सुखकर होऊ शकते.
आपण हे जाणतोच कि, जेव्हा आपण आपली स्वप्न खूप स्पष्टपणे मांडतो तेव्हा आपण एक प्रकारे ती साध्य करण्यासाठी आपल्या मनाला तयार करत असतो.
मानसशास्त्रात, आकर्षणाच्या मंत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. मानसशास्त्रात अनेक कथा देखील या सिद्धांतावर आधारित आहेत, ज्यातून हा सिद्धांत खरा आहे हे सिद्ध होतं.

🧐 फक्त सकारात्मक विचाराने बदल घडतो का? :

जेव्हा आपली स्वप्नं खरी करण्यासाठी आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्या विचारात स्पष्टता असेल तर आपण आपल्या धेय्याकडे यशस्वीरीत्या वाटचाल करू शकतो.
परंतू फक्त सकारात्मक विचार करणे हे प्रगतीचं पहिलं पाऊल असू शकतं. पूर्ण प्रवास हा तुमचे प्रयत्न आणि सातत्य यावर अवलंबून असतो.

📍 या महामंत्राने तुम्ही नातेसंबंध, आर्थिक स्थिती, मानसिक आणि शारीरिक आरोग्य, आत्मविश्वास आणि व्यापार सर्वच ठिकाणी बदल घडवू शकता.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

अभिनेत्री पायल रहतोगीचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
नवाजुद्दीन सिद्दीकीचा नवा चित्रपट येतोय

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/letsupwani03june2019

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup