LetsUpp Marathi
5.29K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

मणिपूरमधील काँग्रेसच्या 12 आमदारांनी दिला राजीनामा
लवकरच येणार 'मिस्टर इंडिया' सिनेमाचा सिक्वेल

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 http://bit.ly/ltsupwani30may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👑 नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान

LetsUp । Update

दिग्गजांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन परिसरात शपथविधी सोहळा संपन्न.

💁‍♂ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार (दि.30) रोजी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मोदींना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.

या सोहळ्याला राहुल गांधी, सोनिया गांधी,मनमोहन सिंग,अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उद्धव ठाकरे, मुकेश अंबानी, रजनीकांत, कमल हासन, कंगना रणौत, शाहरूख खान यांच्यासह अनेक दिग्गज शपथविधीस उपस्थित होते.

👍 कॅबिनेट मंत्र्यांची नावे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, स्मृती इराणी, रामविलास पासवान, निर्मला सीतारमण, डी. व्ही. सदानंद गौडा, गजेंद्रसिंह शेखावत, गिरीराज सिंह, अरविंद सावंत, महेंद्रनाथ पांडेय, प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नकवी, धमेंद्र प्रधान, अर्जुन मुंडा, रमेश पोखरियाल निशंक, एस. जयशंकर, थावरचंद गेहलोत, हरसिमरतकौर बादल, रवीशंकर प्रसाद, नरेंद्रसिंह तोमर.

📍 महाराष्ट्रातील राज्यमंत्री : रावसाहेब दानवे, रामदास आठवले आणि संजय धोत्रे

👌 वैशिष्ट्ये :
बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यासह इतर देशांतील दिग्गज उपस्थित.
या सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं.
यंदाच्या शपथविधीला पाकिस्तानच्या नेत्यांना वगळण्यात आले आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील 24 कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले 9 राज्यमंत्री, तर 24 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

● श्रीनगर- जम्मू काश्‍मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार

● आता बलाढ्य डिजिटल कंपन्यांना (गुगल, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, फेसबुक) प्रत्येक देशात करत असलेल्या व्यवसायावर कर द्यावा लागणार

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यासाठी भारतावरील बंदीची मुदत पाकिस्तानने 14 जूनपर्यंत वाढवली

● फरार हिरे व्यावसायिक नीरव मोदीच्या कोठडीला लंडनमधील कोर्टाने 27 जूनपर्यंत दिली मुदतवाढ

● टीव्ही शोमध्ये सहभागी होऊ नका, काँग्रेस प्रवक्त्यांना सूचना; 1 महिना टीव्ही शोच्या डिबेटमध्ये काँग्रेस प्रवक्त्यांना न बोलावण्याची टीव्ही चॅनेल्सना विनंती

● पश्चिम रेल्वेमार्गावर धावत असलेल्या वातानूकुलित लोकलच्या तिकीट दरांमध्ये वाढ, उद्या शनिवार दि. 1 जूनपासून ही भाडेवाढ लागू होणार

● व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी 'कंटिन्युअस ऑडिओ मॅसेज' हे नवीन फिचर दिले

● वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी मात, बेन स्टोक्स ठरला सामनावीर

● अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’चा ट्रेलर रिलीज, हा चित्रपट 28 जूनला प्रदर्शित होणार

● अहमदनगर - आचारसंहितेमुळे रखडलेल्या जिल्हा परिषद बदली प्रक्रियेस आता 7 जूनपर्यंत मुदतवाढ

● अहमदनगर - कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील आज शुक्रवारी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार

● अहमदनगर - जिल्ह्यात 2 लाख 75 हजार मेट्रिक टन खताची मागणी, त्यानुसार राज्यस्तरावरून 2 लाख 26 हजार मेट्रिक खतांचे आवंटन मंजूर

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🏏 इंग्लंडची आफ्रिकेवर मात; आज वेस्ट इंडिज-पाकिस्तान आमनेसामने

LetsUp । Sports

💁‍♂ वर्ल्डकप 2019च्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी मात

🧐 312 धावांचे आव्हान पेलताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 207 धावांवर संपुष्टात आला

🏆 79 चेंडूंत 9 चौकारांसह 89 धावा फटकावणारा व 2 बळी घेणारा बेन स्टोक्स ठरला सामनावीर

आज वेस्टइंडिज Vs पाकिस्तान सामना :

वेस्टविंडीजच्या तगड्या पण बेभरवशाच्या संघाविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज आज मैदानात उतरेल

🤔 आमने-सामने इतिहास काय?

133 वनडे I वेस्ट इंडिज : 70 विजय I पाकिस्तान : 60 विजय I टाय : 3

🎯 वर्ल्डकपमध्ये आमनेसामने :

10 वनडे I वेस्ट इंडिज : 7 विजय I पाकिस्तान : 3 विजय

📍 स्थळ : ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम I वेळ : दुपारी 3 पासून

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 पाऊस लांबणीवर; विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट!

LetsUp । Update

बळीराजाला आणखी 2 आठवडे पावसाची प्रतीक्षा करावी लागणार

💁‍♂ कारण राज्यात 12 जूनपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा हवामान विभागाने वर्तविला अंदाज

🎯 हवामान विभागाचा अंदाज काय? :

20 मे च्या सुमारास मान्सूनचे आगमन झाले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे केरळमध्येही मान्सूनचे आगमन झालेले नाही.
अशात स्थानिक स्थितीमुळे केरळासह महाराष्ट्रातील काही भागात येत्या सप्ताहात पावसाच्या काही सरी कोसळतील.
येत्या आठवड्यात ईशान्य भारतात जोरदार पाऊस कोसळेल, बिहार, झारखंड, दक्षिण कर्नाटकातील काही भाग, केरळ आणि लक्षद्वीप येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
6 ते 12 जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील.

🌞 उष्णतेची लाट कायम :

सध्याच्या हवामानात काहीच बदल नोंदविण्यात येणार नसल्याची चिन्हे असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील हवामान तापदायकच राहणार आहे. 2 जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

वायव्येकडून सिंध आणि बलुचिस्तानकडून राजस्थानमार्गे महाराष्ट्रापर्यंत येणारे उष्ण आणि कोरडे वारे हे उष्णतेच्या लाटेचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ देश आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण

LetsUp | Statistics

दक्षिण सुदान : 96%
इथियोपिया : 74%
केनिया : 56%
नायजेरिया : 50%
पाकिस्तान : 46%
फिलिपिन्स : 38%
व्हिएतनाम : 27%
थायलंड : 25%
चीन : 25%
भारत : 24%
दक्षिण अफ्रिका : 23%
ब्राझिल : 22%
इंडोनेशिया : 22%
तुर्की : 12%
मेक्सिको : 11%
इजिप्त : 11%

(World Bank)

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 खातेवाटप जाहीर; जाणून घ्या कोणाला कोणते खाते?

LetsUp | Breaking

केंद्र सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज शुक्रवारी (दि.31) मंत्र्यांची खातेनिहाय यादी अखेर प्रसिद्ध

💁‍♂ खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे :

पंतप्रधान नरेंद्र मोदी : कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही असेल.
अमित शहा : केंद्रीय गृहखाते
निर्मला सितारामन : केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
राजनाथ सिंह : संरक्षण मंत्रालय
एस. जयशंकर : परराष्ट्र मंत्रालय
नितीन गडकरी : परिवहन
पीयुष गोयल : रेल्वे मंत्री
धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम
रविशंकर प्रसाद : कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय
स्मृती इराणी : केंद्रीय मनुष्यबळ खाते
राम विलास पासवान : ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
नरेंद्र सिंह तोमर : कृषी व शेतकरी
प्रकाश जावडेकर : पर्यावरण आणि माहिती प्रसारण
हरसिमरत कौर बादल : अन्न प्रक्रिया उद्योग
रमेश पोखरियाल निशंक : केंद्रीय मनुष्यबळ खाते
थावर चंद गहलोत : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
अर्जुन मुंडा : आदिवासी व्यवहार
डॉ. हर्षवर्धन : आरोग्यमंत्री
किरेन रिजीजू : क्रीडा
मुख्तार अब्बास नक्वी :अल्पसंख्यांक मंत्री
प्रल्हाद जोशी : संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री
डॉ. महेंद्रनाथ पांडे : उद्योजग कौशल्य विकास मंत्रालय
अरविंद सावंत : अवजड उद्योग मंत्रालय
गिरिराज सिंह : पशुसवंर्धन आणि मत्स पालन
गजेंद्रसिंह शेखावत : जल मंत्रालय

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😱 पुण्यात रस्त्यावर लाखो लीटर पाणी!

LetsUp | Pune

💁‍♂ महापालिकेकडून गुरुवारी रात्री (दि.29) मध्यरात्रीपासून रस्त्यावर हजारो लीटर पाणी वाया घालविल्याचा प्रकार समोर

👉 विमाननगर भागात व्हॉल्व फुटल्याने काल रात्री 11.30 पासून सकाळपर्यंत धोधो पाणी वाहत होते

🎯 तक्रार देऊनही तातडीने कारवाई न झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी, अखेर आज सकाळी पाण्याची गळती रोखली असून दुरूस्तीचे काम झाले

🧐 नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त : पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. याप्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांनी केली मागणी

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 आज जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस

LetsUp । Special

🎯 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी भारतात सुमारे 10 लाख लोकांचा मृत्यू होतो. देशात प्रौढांमध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचं प्रमाण अधिक आहे. पण, आता अल्पवयीनही अशा पदार्थांचं सेवन करताना दिसतात. याच पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो.

🚬 सिगारेटच्या धुरात काय असते? : सिगारेटच्या धुरात टार नावाचा पदार्थ असतो, ज्यात 4,000 रसायने असतात. या रसायनांपैकी 43 रसायने कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. या धुरात नायट्रोजन ऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइड हे दोन विषारी वायू देखील असतात. या धुरातला मुख्य घटक म्हणजे निकोटीन. हे सहजासहजी व्यसन लावणारे शक्‍तिशाली ड्रग आहे.

😱 या आजारांची शक्यता : तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते.

📍 आकडेवारी :
भारतात तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या सर्वांत मोठी आहे.
भारतात, 56.4 % स्त्रियांना आणि 44.9 % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे.
90% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्‍सर आणि इतर कॅन्सर होण्‍याचे कारण धूम्रपान आहे.

💁‍♂ जाणून घ्या उपाय : समतोल आहार,हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश जेवणात असू द्या. वेळेवर झोप, व्यायामाची सवय लावून घ्या. सकारात्मक विचार ठेवा, नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. मन सिगारेटकडे ओढले जात असेल तर मधूर संगीत ऐका. आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीसोबत राहा. अशी जीवनशैली ठेवाल तर आपोआपच सिगारेटसारख्या जीवघेण्या सवयीपासून दूर राहाता येईल.

💰 सिगारेट कंपन्या जाहिरातींवर दरवर्षी जवळजवळ सहाशे कोटी डॉलर खर्च करतात

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😱 पाण्याअभावी कोयना धरणातील वीजनिर्मिती बंद

LetsUp । Update

कोयना धरणात केवळ दहा टक्केच पाणीसाठा शिल्लक

💁‍♂ धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहेत. पुढील आदेश प्राप्त झाल्यावरच वीजनिर्मिती चालू करावी, असे पत्र महानिर्मिती कंपनीला देण्यात आले आहे.

💧 पाणी कपातीचे आवाहन : वीजकंपनीने पाण्याचा वापर करू नये, यासाठी कोयना प्रकल्पाने पाणी कपातीचे आवाहन केले होते. या आवाहनाला महानिर्मिती कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत वीज निर्मितीसाठी शिल्लक असलेले तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.

----------------------
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
----------------------

👉 दुष्काळजन्य परिस्थिती : राज्य शासनाने राज्यातील दुष्काळजन्य आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पावसाळा सुरु होईपर्यंत राखीव पाणी कोटा शिल्लक ठेवून कोयनेतून निर्माण होणारी वीजनिर्मिती बंद केली आहे.

📍 भारनियमनाचे संकट? : महानिर्मिती कंपनीची वीज निर्मितीची क्षमता 13602 मेगावॅट इतकी आहे. यापैकी 1956 मेगावॉट वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातून होते. वीज निर्मितीची क्षमता सुमारे दोन हजार मेगावॉटने अचानक कमी झाल्याने येत्या काही दिवसात राज्यावर भारनियमनाचे संकट ओढवू शकते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 जैन संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रमाचे आयोजन

LetsUp । Ahmednagar

भारतीय जैन संघटनेच्या अभियानाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद लाभला.

🎯 अहमदनगर जिल्ह्यामध्ये अंदाजे 80 ते 100 तलावातून गाळ काढण्याचा मानस संघटनेने केला आहे. आत्तापर्यंत 10 कामाअंतर्गत 33 तलाव स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे. सदर तलावातील गाळ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

👌 गाळाचे फायदे : शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार आहे. हा गाळ शेतात टाकल्याने जमीन अधिक सुपीक होते. तसेच तलावात पाणी साठ्याचे प्रमाणात वाढ होते.

💫 सदर प्रकल्प हा भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या प्रकल्प अंतर्गत आदेश चंगेडिया अध्यक्षस्थानी असून, नगर तालुका अध्यक्ष प्रशांत गांधी यांचे या कार्यास सहकार्य लाभले आहे.

👨‍💻 हा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी भेट द्या आमच्या 'आय लव्ह नगर' च्या फेसबुक पेजला

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

1) पहा, 'गेम ओव्हर'चा थरारक ट्रेलर :

अभिनेत्री तापसी पन्नू आता 'गेम ओव्हर' या नव्या थरारपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

🤔 ट्रेलरमध्ये काय? : अंगाचा थरकाप उडवणारी एखादी घडना घडून गेल्यानंतर दरवर्षी जेव्हा त्या घटनेची तारीख जवळ येते, तेव्हा मनात एक प्रकारची भीती निर्माण होत असते. तापसीसुद्धा अशाच मानसिक परिस्थितीत असून या भीतीवर मात करण्यासाठी ती मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेताना दिसते. तसेच तिच्या भोवती सतत व्हिडिओ गेम सुरु असल्याचे दिसते आहे.

👀 ट्रेलर पहा : https://ltsup.in/30ZQcuP

2) ‘आर्टिकल 15’चा ट्रेलर रिलीज :

अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशतील सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट 28 जूनला प्रदर्शित होणार आहे.

🤔 ट्रेलरमध्ये काय? : दलित समाजावर होणारे अन्याय ट्रेलरमध्येमध्ये दिसतात. जातीय भेदभाववरून समाजात होणाऱ्या भीषण घटना बघून अंगावर काटा उभा राहतो. उत्तर प्रदेशातील येथे पगारात तीन रुपयांची वाढ मागणाऱ्या मुलींवर झालेल्या बलात्काराची कथा यात दिसते. 27 मे 2014 रोजी ही घटना घडली होती.

👀 ट्रेलर पहा : https://ltsup.in/2HMbiF4

3) ‘भारत’ विरोधात न्यायालयात याचिका :

अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विपिन त्यागी यांनी ही याचिका दाखल केली असून त्यांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.

🎯 ‘भारत’ शब्द हटवण्याची मागणी : ‘भारत' हे आपल्या देशाचे नाव असून तो कोणत्याही व्यावसायिक हेतूने वापरता येऊ शकत नाही. या चित्रपटातील मुख्य भूमिकेचे नाव देखील 'भारत' आहे.

चित्रपटातील काही डायलॉगमुळे देशभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या नावात आणि चित्रपटात केला गेलेला ‘भारत’ या शब्दाचा वापर हटवावा’, अशी मागणी करण्यात आली आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती

LetsUp । Education

01.) आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय

02.) आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.

03.) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

04.) भारतीय राष्ट्रवादाचे जनक- सुरेंद्रनाथ चटर्जी

05.) भारतीय असंतोषाचे जनक- लोकमान्य टिळक.

--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला : https://twitter.com/LetsUp_
--------------------

06.) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.

07.) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

08.) भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक- दादासाहेब फाळके.

09.) भारताच्या अनुविज्ञानाचे जनक- डॉ.होमी भाभा.

10.) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.

11.) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

12.) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक- लॉर्ड रिपन.

13.) भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

14.) भारताच्या धवलक्रांतीचे जनक- डॉ.व्हार्गीस कुरियन.

15.) भारतीय भूदान चळवळीचे जनक- आचार्य विनोबा भावे.

16.) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार- विक्रम साराभाई.

17.) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक- सॅम पित्रोदा.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेटची पहिली बैठक

विश्वचषक स्पर्धेत वेस्टइंडीजचा पाकिस्तानवर विजय
'तारक मेहता' फेम दयाबेन ने खरेदी केली 60 लाखांची कार

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani31may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● सरसकट सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय, यामुळे 15 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार

● 4 जुलैला आर्थिक सर्वेक्षण तर अर्थसंकल्प 5 जुलैला सादर होणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती

● संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 17 जून 26 जुलैदरम्यान, तर लोकसभेच्या अध्यक्षांची निवड 19 जूनला होण्याची शक्यता

● नक्षलवादी आणि दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय

● राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये देशातील सर्वाधिक तापमान, 49.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद

● जानेवारी ते मार्चच्या तिमाहित आर्थिक विकासदर घसरून 5.8 टक्क्यांवर, तर मार्च 2018 ते मार्च 2019 या गेल्या आर्थिक वर्षाचा विकासदर 6.8 टक्क्यांवर

● पावसाळी अधिवेशनाला 17 जूनपासून सुरुवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल : वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

● यामाहा म्युझिक इंडियाने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत पहिला भारतीय कीबोर्ड PSR I500 केला सादर, किंमत 23,990 रुपये

● विश्वचषक 2019 : वेस्ट इंडिजकडून पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा, आज ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान आमनेसामने

● रेमो डिसुझाच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर 3डी’ या चित्रपटासाठी ‘मुक्कला मुकाबला’ गाणे पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा नव्या रुपात

● अहमदनगर - आता पुन्हा शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू, गेल्या दोन दिवसांमध्ये शंभरहून अधिक जणांवर कारवाई करून दंड वसूल

● अहमदनगर - नगरमध्ये शेळ्या-मेंढ्यासाठी चारा छावण्या; पशुपालकाला कितीही शेळ्या-मेंढ्या छावण्यांमध्ये आणता येणार

● अहमदनगर - दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाचा निर्णय परस्पर घेता येणार नाही, पक्षात अद्याप चर्चा झाली नाही : खासदार उदयनराजे

📞 जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ मोठा निर्णय! सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 6 हजार

LetsUp | National

🎯 नव्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेत आणि पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत केला बदल

👉 त्यानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ आता देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार

👌 सरसकट सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान मिळणार, यामुळे जवळपास 14.5 कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार

💫 याआधी 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या (अल्पभूधारक) शेतकऱ्यांना सरकारकडून 6 हजारांचा निधी दिला जात होता

🗣 नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबत दिली माहिती

😍 पेन्शन योजनाही घोषित :

बैठकीत शेतकरी आणि लघू उद्योजकांसाठी पेन्शन योजनाही केली घोषित
याअंतर्गत, आता सरकारकडून 18 ते 40 वर्ष वयाच्या शेतकरी आणि लघू उद्योजकांना वयाच्या 60 व्या वर्षी दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळणार
ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना महिन्याला फक्त 55 रुपये भरायचे आहेत

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😳 धक्कादायक! 'जीडीपी' 5.8 टक्के; बेरोजगारीचा 45 वर्षातील उच्चांक

LetsUp | Update

💁‍♂ केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार काही धक्कादायक आकडेवारी समोर

🧐 त्यानुसार देशाचा आर्थिक विकास दर जीडीपी 5.8 टक्क्यांपर्यंत खाली, हा पाच वर्षातील निच्चांक

कृषी आणि औद्योगिक उत्पादन ढासळल्यामुळे एकूण विकास दर झाला कमी

👉 चिंतेची बाब म्हणजे हा विकास दर चीनपेक्षाही कमी आहे

💥 2017-18 या आर्थिक वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर, हा 45 वर्षांतील रेकॉर्ड आहे

🎯 महिलांपेक्षा पुरुषांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण जास्त असून पुरुष 6.2 टक्के ते महिला 5.7 टक्के बेरोजगार आहेत. शहरात हे प्रमाण 7.8 टक्के तर ग्रामीण भागात 5.3 टक्के आहे

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🥛 आज जागतिक दुग्ध दिवस

LetsUp । Special

💁‍♂ दूध पिण्याचे काही फायदे

मजबूत दात - दूध कॅल्शियमचा सर्वात चांगला स्रोत आहे. दुधात विटामिन- डी चे प्रमाण चांगले असते.

स्वस्थ त्वचेसाठी - दूध हे त्वचेस कोमल, मुलायम आणि चमकदार बनवते.

स्वस्थ हाडे - मुलांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी दूध पिणे जरुरी आहे.

वजन नियंत्रित - ज्या महिला रोज दूध पितात त्यांचे वजन हे दूध न पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत कमी असते.

उर्जेचा स्रोत - जेव्हा कधीही तुम्हाला थकल्यासारखे वाटते, मग एक ग्लास थंड दूध प्या. तुम्हाला काही वेळातच ताजेतवाने वाटेल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🔥 गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा वधारल्या!

LetsUp । Update

आता सामान्यांचं बजेट कोलमडणार, कारण गॅस सिलेंडरच्या किंमतीत आज (दि.1) पुन्हा एकदा वाढ

💁‍♂ विना अनुदानित सिलेंडरची किंमत 25 रुपयांनी तर अनुदानीत सिलेंडरच्या किंमतीत 1 रुपये 23 पैश्यांनी वाढ

🤔 किंमतीत वाढ का? : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि रुपयाची किंमत कमी झाल्याने सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे

👉 सबसिडी गॅसची किंमती :

दिल्ली - 497 रुपये
मुंबई - 495.09 रुपये,
कोलकत्ता - 500.52 रुपये
चेन्नई - 485.25 रुपये

🧐 बिना सबसिडी गॅसची किंमती :

दिल्ली - 737.50 रुपये
मुंबई - 763.50 रुपये,
कोलकत्ता - 709.50 रुपये
चेन्नई - 753.00 रुपये

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup