LetsUpp Marathi
5.29K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🧐 तंत्रज्ञानात कुठं काय?

LetsUp | Tech

1) फेसबुकची ‘क्रिप्टोकरन्सी’ येणार :

आता फेसबुकच्या ‘ग्लोबल कॉइन’चे आगमन होणार आहे. अर्थात, फेसबुकही आता आपली स्वतःची ‘क्रिप्टोकरन्सी’ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

हे आभासी चलन 2020च्या पहिल्या तिमाहीत जगभरात जारी केले जाण्याची शक्यता आहे. फेसबुकखेरीज अन्य ईकॉमर्स संकेतस्थळांवरील खरेदीसाठीही हे चलन वापरता येईल. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवरून एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही ‘ग्लोबलकॉइन’ उपयुक्त ठरेल.

फेसबुकने यासंदर्भात जगभरातील बँकांशी बोलणीही सुरू केली असून वर्षभरात डझनभर देशांत हे चलन कार्यान्वित होईल.

2) गुगलचा फोन 28 हजारांनी स्वस्त :

गुगल कंपनीने पिक्सल 3XLच्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या मुल्यात तब्बल 28 हजार रूपयांची कपात केली आहे. याशिवाय, याच्या 128 जीबी स्टोरेजच्या मॉडलमध्येही तब्बल 26 हजारांची कपात करण्यात आलेली आहे.

पिक्सल 3 एक्सएलच्या 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 83,000 रुपये होती, तर 4 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेजची किंमत 92,000 रुपये होती. पण आता किंमतीत कपात झाल्याने हे दोन्ही व्हेरिअंट्स ग्राहकांना अनुक्रमे 54,999 रुपये आणि 65,999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

3) लवकरच TikTok चा फोन :

लोकप्रिय टिक टॉक अ‍ॅपची निर्मिती करणारी बाइटडान्स ही कंपनी स्वत: आता मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहे. या फोनमध्ये टिक टॉक व इतर अ‍ॅप प्रीलोडेड असणार आहे.

बाइटडान्सचा हा नवा मोबाइल कसा असेल, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. बाइटडान्सचे टिक टॉकसह बातम्या, संगीत, व्हिडिओ आदींशी संबंधित अ‍ॅप्स आहेत. हे सर्व अ‍ॅप या मोबाइलमध्ये प्री लोडेड असणार आहेत.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🗻 आज 'माउंट एव्हरेस्ट' दिवस

LetsUp । Special

🎯 जगातील सर्वात उंच पर्वतशिखर अर्थात माउंट एव्हरेस्ट. हिमालय पर्वतातील या शिखराची उंची 8,848 मीटर (29,029 फूट) इतकी असून हे शिखर नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला 'सगरमाथा' म्हणून ओळखतात तर तिबेटमध्ये 'चोमो लुंग्मा' म्हणतात.

🧐 शिखराचे नामकरण कसे? : सन 1856 मध्ये ब्रिटिश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये या शिखराची उंची 29,029 फूट इतकी निश्चित करण्यात आली. या अगोदर हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते.

सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की, हिमालयाचे 15 वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे. त्यावेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख ॲन्ड्र्यू वॉ यांनी निवृत्त कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.1856 पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.

💁‍♂ चढाईसाठी सोईस्कर मार्ग कोणते?: नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. याव्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत. परंतु ते फारसे वापरले जात नाहीत. या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग सोपा व सोईस्कर असल्याने गिर्यारोहकांच्या पसंतीचा आहे. याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी 1953 मध्ये पहिली चढाई केली होती.

👌 मराठी पाऊल : 19 मे 1998 रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. भारतीय पथकाचे नेतृत्व करताना सुरेंद्र चव्हाण यांना 1998 मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ नवा ट्रेंड! 'जेसीबी की खुदाई' सोशलवर व्हायरल

LetsUp । Special

🎯 सोशल मिडीयावर कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ट्रेंड होत असलेलं 'जेसीबी की खुदाई” होय. सोशल मीडियावर या ट्रेंडच्या जोक्सने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

🧐 कशी झाली ट्रेंडची सुरुवात? : हैदाराबादमधील एका खासदाराच्या वक्तव्यानंतर हे सुरु झाल्याचं बोललं जात आहे. "भारतीय लोक बेरोजगार असल्यानं त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो. इतका की एखाद्या ठिकाणी जेसीबीचं काम सुरु असेल तर लोक तिथे थांबून पाहत बसतात. असं वक्तव्य त्या खासदारान केलं होतं. त्यानंतर या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली आहे.

🙏 'जेसीबी' कंपनीने मानले आभार : मोठ्या प्रमाणावर हा ट्रेण्ड सुरु असल्याचं पाहून 'जेसीबी' या कंपनीने देखील याची दखल घेतली आहे. 'भारतीय लोकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहोत', असं ट्वीट जेसीबी कंपनीकडून करण्यात आलं आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 प्रथमच शेळ्या-मेंढ्यासाठी सुरु होणार छावण्या

LetsUp । Update

शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिल्यादांच चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

💁‍♂ राज्यातील दुष्काळी भागातील जनावरांसाठी छावण्या सुरु आहेत. राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच चारा छावणीमधील जनावरांना टँकरद्वारे पाणी देण्यात येणार आहे.

🗓 बिले तातडीने अदा करा : चारा छावण्यांची बिले जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी तपासून घ्यावीत, व तातडीने बिलांची रक्कम अदा करावेत. त्यात विलंब करू नये. असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे.

🚽 छावण्यांमध्ये उभारणार स्वच्छतागृहे : जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये उपस्थित असतात. त्यांच्यासाठी तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

📍 दुष्काळाची झळ : जिल्ह्यातील सुमारे 5 ते 6 लाख शेळ्या-मेंढ्या व इतर जनावरांचे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हाल सुरू आहेत.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ उन्हाळ्यात चेहऱ्याच्या समस्या कशा सोडवाल?*

LetsUp । Tips

🧐 उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे खूप गरजेची असते. यासाठी आपण काही उपाय जाणून घेऊयात...

दुधाची साय : सॉफ्ट, तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्यावर साय लावणं फायदेशीर ठरतं. चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास साय महत्वाची ठरते. साय तेलकट असते त्यामुळे चेहरा मुलायम होतो, तसेच चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत होते. दूधाची साय घ्या व त्यामध्ये चिमूटभर हळद एकत्र करून कॉटन बॉल्सच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
_____________

🧐 बोर्डाच्या निकालात दरवर्षी मुलींची सरशी का? जाणून घेऊया : 👉 http://bit.ly/2YTpwKa
_____________

बेसन : बेसन, चंदन, हळद इत्यादी पदार्थ एकत्र करून एक मिश्रण तयार करा व चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा याचा वापर करा. तुम्ही आवश्यक असेल तर दररोजही चेहऱ्यावर हे मिश्रण लावू शकता. या फेस पॅकमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी नैसर्गिक असल्यामुळे याचे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत.

गुलाब पाणी : 2 ते 3 कॉटन बॉल्स गुलाब पाण्यामध्ये भिजवून फ्रीजमध्ये ठेवून द्या. काही वेळानंतर त्या कॉटन बॉल्सनी तुमच्या चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी मसाज करा. लक्षात ठेवा की, मसाज करण्याआधी तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. गुलाब पाण्याने चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.

स्क्रबिंग : आपल्या स्किन टाइपनुसार, स्क्रबची निवड करा. स्क्रब करताना हातांना चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवा. ही स्क्रब करण्याची योग्य पद्धत आहे. स्क्रब केल्यानंतर स्किन टाइपनुसार, फेस पॅक लावा आणि 10 मिनिट ठेवल्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. सकाळ उठल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल.

मुलतानी माती : जर तुमची स्किन ऑयली असेल तर चेहऱ्यावर मुलतानी माती लावा व 10 ते 15 मिनिटनंतर चेहरा धुवून टाका. मुलतानी माती लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि फ्रेश लूक मिळण्यासही मदत होते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ मंत्रिपद नको, अरुण जेटलींचे मोदींना पत्र

संजय गांधी उद्यानातील वाघाचा कॅन्सरने मृत्यू
पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर नक्षली संघटनांची कागदपत्रे

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani29may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या आज सायंकाळी होत असलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाचे भव्य प्रांगण सज्ज

● देशातील 102 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 84 शहरांना वायू प्रदूषणातून मुक्त करण्यासाठीची योजना तयार

● उत्तर भारतात पुढचे 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट, दिल्ली-एनसीआर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानला हवामान विभागाचा इशारा

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांची चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या (सीओएससी) अध्यक्षपदी नियुक्ती

● गेल्या वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीतून राज्य सरकारला 25 हजार 323 कोटी रूपयांचा विक्रमी महसूल प्राप्त

● शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश

● पायल तडवी आत्महत्या प्रकरण : तिन्ही आरोपी डॉक्टर्सना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी

● Hyundai च्या Hyundai Venue ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद, बूकिंग 20 हजारांच्या पार

● बकिंगहॅम पॅलेसजवळ रंगला क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा, आज यजमान इंग्लंडपुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

● बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीचा विनोदी भयपट ‘कोका कोला’ येतोय, यात ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार

● अहमदनगर - राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन अभियानात नगर जिल्हा परिषद राज्यात प्रथम; वर्षभरात जिल्ह्यात 2 हजार 250 बायोगॅस सयंत्र उभारले

● अहमदनगर - आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जातील चूका दुरुस्त करण्यासाठी शिक्षण विभागाची येत्या 4 जूनपर्यंत मुदत

● अहमदनगर - जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या 314 पक्षी प्रजातींची नोंद असणारी पक्षीसूची येथील प्राध्यापक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी केली तयार

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ मोदी सरकारचा आज शपथविधी; 14 देशांचे प्रमुख, 6000 पाहुणे येणार

LetsUp । Update

🎯 नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, राष्ट्रपती भवनात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे.

🧐 आज 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता नरेंद्र मोदींसोबतच मंत्रिमंडळातील इतर सदस्यही शपथ घेतील, मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल? याबाबत उत्सूकता कायम आहे.

👉 या सोहळ्यासाठी 14 देशांचे प्रमुख, मुख्यमंत्री, सिने-कलाकार व अन्य मान्यवर असे मिळून सहा हजार पाहुणे उपस्थित राहतील.

सोहळ्यासाठी कोण-कोण उपस्थित राहणार? :

BIMSTEC समुहातील देशांचे प्रमुख, शांघाय संघटनेचे अध्यक्ष (SCO), किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि मॉरिशिअसचे पंतप्रधान उपस्थित राहतील.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील.
एनडीएमधील घटकपक्षांचे प्रमुख तसेच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

📍 मंत्रिमंडळात नितीन गडकरी, स्मृती इराणी, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, जे. पी. नड्डा यांचा समावेश निश्चित मानला जात आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 आजपासुन रंगणार विश्‍वचषक स्पर्धा; जाणून घ्या स्पर्धेचे स्वरूप

LetsUp । Sports

🏏 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा आज 30 मे पासून ते 14 जुलै 2019 दरम्यान इंग्लंड व वेल्समध्ये रंगणार आहे.

👉 क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्ये 1975, 1979, 1983 आणि 1999 नंतर पाचव्यांदा विश्वचषकाचे आयोजन होत आहे.

🤔 यंदाच्या वर्ल्ड कपचे स्वरुप काय आहे? :

‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या या 12व्या पर्वात जगातील अव्वल 10 देश जगज्जेतेपदासाठी झुंजताना दिसणार आहे.
तब्बल 46 दिवस रंगणाऱ्या या महासंग्रामात राऊंड रॉबिन पद्धतीनुसार एकूण 48 एकदिवसीय सामने होणार आहेत.
साखळीत प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विजय मिळवून बाद फेरी गाठताना सर्व संघांची कसोटी लागणार आहे.
सामन्यांच्या वेळा (भारतीय प्रमाणवेळ) दुपारी 3 पासून (प्रकाशझोतातील लढती सायंकाळी 6 पासून)

इंग्लंड Vs दक्षिण अफ्रिका सामना : यंदाचा पहिला सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान लंडन येथील प्रसिद्ध ओव्हल मैदानावर होणार आहे.

इंग्लंडपुढे विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात प्रतिभावान गोलंदाजांचा भरणा असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. तर इंग्लंडला पराभूत करण्यासाठी आफ्रिकेच्या खेळाडूंना सर्वस्व पणाला लावावे लागेल.

💁‍♂ विश्‍वचषक विजेते वर्ष I संघ I कर्णधार :

1975 I वेस्ट इंडिज I क्‍लाईव्ह लॉईड
1979 I वेस्ट इंडिज I क्‍लाईव्ह लॉईड
1983 I भारत I कपिल देव
1987 I ऑस्ट्रेलिया I ऍलन बॉर्डर
1992 I पाकिस्तान I इम्रान खान
1996 I श्रीलंका I अर्जुन रणतुंगा
1999 I ऑस्ट्रेलिया I स्टिव्ह वॉ
2003 I ऑस्ट्रेलिया I रिकी पॉन्टिंग
2007 I ऑस्ट्रेलिया I रिकी पॉन्टिंग
2011 I भारत I महेंद्रसिंग धोनी
2015 I ऑस्ट्रेलिया I मायकल क्‍लार्क
2019 I ???? I ????

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 ट्रू कॉलरच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संदीप पाटील

LetsUp । National

👍 ट्रू कॉलरने फ्लिपकार्टचे कार्यकारी संदीप पाटील यांना त्यांच्या भारतीय व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून केले नियुक्त

🗣 कंपनीने सांगितले कि, पाटील ट्रू कॉलरच्या ग्लोबल मॅनेजमेंट टीमचा भाग असतील. ही टीम भारतात दररोज 10 दशलक्ष वापरकर्ते व्यवस्थापित करते. ते दिल्ली, मुंबई आणि बेंगलुरूमध्ये स्थित ट्रू कॉलरच्या टीमचे देखील निरीक्षण करतील.

🤔 संदीप पाटील कोण? :

फ्लिपकार्टमध्ये काम करण्याशिवाय त्यांनी लंडनमधील मॅककिन्से अ‍ॅण्ड कंपनी येथेही काम केले आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईमधून त्यांनी बी. टेकची डिग्री तर लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 अ‍ॅमेझॉनच्या संस्थापकाची पत्नी दान करणार अर्धी संपत्ती

LetsUp । International

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची पत्नी सेवाभावी संस्थेला दान करणार अठराशे कोटी डॉलर

🧐 निर्णय का घेतला? : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस व पत्नी मॅककेन्झी यांचा घटस्फोट होणार आहे. यानंतर त्यांना पतीकडून मोठी रक्कम मिळणार आहे. यातील निम्मी रक्कम म्हणजे 1 लाख 26 हजार कोटींचे दान करण्याचा निर्णय मॅककेन्झी यांनी जाहीर केला आहे.

🎯 सेवाभावी संस्थेला दान करणार : 2010 मध्ये वॉरेन बफेट यांनी ‘गिव्हींग प्लेज’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. चीन, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि इंग्लंडच्या देशातील अब्जाधीशांह बिल गेट्स यांनी या संस्थेला दान दिले आहे. मॅककेन्झी यांनी या संस्थेला दान करण्याच्या प्रतिज्ञेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.

💰 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : जेफ बेझोस हे ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. जेफ यांची नेटवर्थ 137 अब्ज डॉलर असल्याची नोंद आहे.

📍 सामाजिक कार्याला दान केल्यानंतर जगातील सर्वात दानशूर व्यक्तींच्या यादीत मॅककेन्झी यांचा समावेश होणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 आर्थिक दुर्बलांना यंदा आरक्षण नाही : SC

LetsUp । Update

उच्च वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण नाही. राज्य सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती.

💁‍♂ न्यायालयाचा निर्णय काय आहे? : खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. महाराष्ट्र सरकारने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात केलेल्या या आरक्षणाची अंमलबजावणी केली.

पण विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यापूर्वी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने या अभ्यासक्रमासाठी वाढीव जागा निर्माण करणं गरजेचं आहे. सध्याच्या एकूण जागा लक्षात घेता खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना आरक्षण देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

📍 राज्य सरकाराला धक्का : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणापाठोपाठ आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाला स्थगिती देऊन राज्य सरकाराला मोठा झटका दिला आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤔 तुम्हाला माहित आहे का?

LetsUp । Do U Know

🎯 रुग्णालयात डॉक्टर नेहमी पांढऱ्या कोटमध्ये का दिसतात हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. परंतु डॉक्टर आणि इतर कर्मचारी असे कपडे परिधान करण्यामागे काही खास कारण आहे. जाणून घेऊया कारणे....

--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला : https://twitter.com/LetsUp_
--------------------

💁‍♂ ही आहेत कारणे:

रुग्ण आणि डॉक्टर किंवा रुग्णालयातील अन्य कर्मचारी यांच्यातील फरक ओळखता यावा यासाठी रुग्णालयातील कर्मचारी पांढऱ्या कोटचा वापर करत असतात.

पांढरा रंग शांती, पवित्रता आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये कायम सकारात्मक वातावरण असावा यासाठी या रंगाला प्राधान्य देण्यात येतं.

त्याप्रमाणेच जंतूसंसर्ग होऊ नये यासाठीदेखील पांढऱ्या रंगाचा उपयोग होतो.

पांढऱ्या रंगामुळे शरीराचं तापमान स्थिर राहतं. त्याप्रमाणेच पांढरा रंग स्वच्छतेचंदेखील प्रतिक आहे.

या कोटासोबतच त्याला असलेले मोठे खिसेदेखील असतात. या खिशांमध्ये डॉक्टरांना आवश्यक सामान ठेवता यावं यासाठी, हे खिसे मोठे ठेवण्यात येतात.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 कृषी क्षेत्रातील करिअर संधी

LetsUp । Career

👍 बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्‍या कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी जाणवतो. देशातील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात या या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी संधी आहे.

📍 पात्रता : बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक.

📚 पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम

1) बी.एस्सी (कृषी)
2) बी.एस्सी (उद्यानविद्या)
3) बी.एस्सी (वनशास्त्र)
4) बी.एफ.एस्सी
5) बी.एस्सी (कृषी जैवतंत्रज्ञान)
6) बी.एस्सी (पशुसंवर्धन)
7) बी.टेक (अन्नशास्त्र)
8) बी.बी.ए. (कृषी)
9) बी.टेक (कृषी अभियांत्रिकी)
10) बी.एस्सी (गृहविज्ञान)

💁‍♂ प्रवेश प्रक्रिया : कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीला मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी धरण्यात येते. शेती विषय बारावीला घेतला असल्यास त्याचे १० गुण वाढीव मिळतात. ७/१२चा उतारा असणाऱ्या शेतीधारकांच्या तसेच भूमिहीन शेतमजुरांच्या (तहसीलदार/नायब तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक) पाल्यासाठी १२ टक्के वाढीव गुण प्रवेशासाठी धरले जातात.

🎓 करिअर संधी : महसूल विभाग, वन विभाग, पोलीस खाते, वित्त विभाग इत्यादी विभागांमध्ये वर्ग-१, वर्ग-२ पर्यंतच्या सर्व पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी/ विकास अधिकारी, अन्न महामंडळ, पणन महामंडळ व खादी ग्रामोद्योग या ठिकाणीही कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

🏤 ही आहेत कृषि विद्यापीठे

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर, 413722
http://mpkv.mah.nic.in
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, 444104
http://pdkv.mah.nic.in
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, 431402
http://mkv2.mah.nic.in
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, 415712
http://www.dbskkv.org

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

मणिपूरमधील काँग्रेसच्या 12 आमदारांनी दिला राजीनामा
लवकरच येणार 'मिस्टर इंडिया' सिनेमाचा सिक्वेल

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 http://bit.ly/ltsupwani30may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👑 नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान

LetsUp । Update

दिग्गजांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन परिसरात शपथविधी सोहळा संपन्न.

💁‍♂ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार (दि.30) रोजी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मोदींना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.

या सोहळ्याला राहुल गांधी, सोनिया गांधी,मनमोहन सिंग,अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उद्धव ठाकरे, मुकेश अंबानी, रजनीकांत, कमल हासन, कंगना रणौत, शाहरूख खान यांच्यासह अनेक दिग्गज शपथविधीस उपस्थित होते.

👍 कॅबिनेट मंत्र्यांची नावे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, स्मृती इराणी, रामविलास पासवान, निर्मला सीतारमण, डी. व्ही. सदानंद गौडा, गजेंद्रसिंह शेखावत, गिरीराज सिंह, अरविंद सावंत, महेंद्रनाथ पांडेय, प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नकवी, धमेंद्र प्रधान, अर्जुन मुंडा, रमेश पोखरियाल निशंक, एस. जयशंकर, थावरचंद गेहलोत, हरसिमरतकौर बादल, रवीशंकर प्रसाद, नरेंद्रसिंह तोमर.

📍 महाराष्ट्रातील राज्यमंत्री : रावसाहेब दानवे, रामदास आठवले आणि संजय धोत्रे

👌 वैशिष्ट्ये :
बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यासह इतर देशांतील दिग्गज उपस्थित.
या सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं.
यंदाच्या शपथविधीला पाकिस्तानच्या नेत्यांना वगळण्यात आले आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील 24 कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले 9 राज्यमंत्री, तर 24 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

● श्रीनगर- जम्मू काश्‍मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार

● आता बलाढ्य डिजिटल कंपन्यांना (गुगल, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, फेसबुक) प्रत्येक देशात करत असलेल्या व्यवसायावर कर द्यावा लागणार

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यासाठी भारतावरील बंदीची मुदत पाकिस्तानने 14 जूनपर्यंत वाढवली

● फरार हिरे व्यावसायिक नीरव मोदीच्या कोठडीला लंडनमधील कोर्टाने 27 जूनपर्यंत दिली मुदतवाढ

● टीव्ही शोमध्ये सहभागी होऊ नका, काँग्रेस प्रवक्त्यांना सूचना; 1 महिना टीव्ही शोच्या डिबेटमध्ये काँग्रेस प्रवक्त्यांना न बोलावण्याची टीव्ही चॅनेल्सना विनंती

● पश्चिम रेल्वेमार्गावर धावत असलेल्या वातानूकुलित लोकलच्या तिकीट दरांमध्ये वाढ, उद्या शनिवार दि. 1 जूनपासून ही भाडेवाढ लागू होणार

● व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी 'कंटिन्युअस ऑडिओ मॅसेज' हे नवीन फिचर दिले

● वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी मात, बेन स्टोक्स ठरला सामनावीर

● अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’चा ट्रेलर रिलीज, हा चित्रपट 28 जूनला प्रदर्शित होणार

● अहमदनगर - आचारसंहितेमुळे रखडलेल्या जिल्हा परिषद बदली प्रक्रियेस आता 7 जूनपर्यंत मुदतवाढ

● अहमदनगर - कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील आज शुक्रवारी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार

● अहमदनगर - जिल्ह्यात 2 लाख 75 हजार मेट्रिक टन खताची मागणी, त्यानुसार राज्यस्तरावरून 2 लाख 26 हजार मेट्रिक खतांचे आवंटन मंजूर

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🏏 इंग्लंडची आफ्रिकेवर मात; आज वेस्ट इंडिज-पाकिस्तान आमनेसामने

LetsUp । Sports

💁‍♂ वर्ल्डकप 2019च्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी मात

🧐 312 धावांचे आव्हान पेलताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 207 धावांवर संपुष्टात आला

🏆 79 चेंडूंत 9 चौकारांसह 89 धावा फटकावणारा व 2 बळी घेणारा बेन स्टोक्स ठरला सामनावीर

आज वेस्टइंडिज Vs पाकिस्तान सामना :

वेस्टविंडीजच्या तगड्या पण बेभरवशाच्या संघाविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज आज मैदानात उतरेल

🤔 आमने-सामने इतिहास काय?

133 वनडे I वेस्ट इंडिज : 70 विजय I पाकिस्तान : 60 विजय I टाय : 3

🎯 वर्ल्डकपमध्ये आमनेसामने :

10 वनडे I वेस्ट इंडिज : 7 विजय I पाकिस्तान : 3 विजय

📍 स्थळ : ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम I वेळ : दुपारी 3 पासून

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 पाऊस लांबणीवर; विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट!

LetsUp । Update

बळीराजाला आणखी 2 आठवडे पावसाची प्रतीक्षा करावी लागणार

💁‍♂ कारण राज्यात 12 जूनपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा हवामान विभागाने वर्तविला अंदाज

🎯 हवामान विभागाचा अंदाज काय? :

20 मे च्या सुमारास मान्सूनचे आगमन झाले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे केरळमध्येही मान्सूनचे आगमन झालेले नाही.
अशात स्थानिक स्थितीमुळे केरळासह महाराष्ट्रातील काही भागात येत्या सप्ताहात पावसाच्या काही सरी कोसळतील.
येत्या आठवड्यात ईशान्य भारतात जोरदार पाऊस कोसळेल, बिहार, झारखंड, दक्षिण कर्नाटकातील काही भाग, केरळ आणि लक्षद्वीप येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
6 ते 12 जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील.

🌞 उष्णतेची लाट कायम :

सध्याच्या हवामानात काहीच बदल नोंदविण्यात येणार नसल्याची चिन्हे असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील हवामान तापदायकच राहणार आहे. 2 जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

वायव्येकडून सिंध आणि बलुचिस्तानकडून राजस्थानमार्गे महाराष्ट्रापर्यंत येणारे उष्ण आणि कोरडे वारे हे उष्णतेच्या लाटेचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup