🎯 SAIL मध्ये 142 जागांसाठी भरती
LetsUp । Jobs
💁♂ पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
📍 शाखा/विषय व पद संख्या अशी :
▪ मेकॅनिकल : 66
▪ मेटलर्जीकल : 07
▪ इलेक्ट्रिकल : 41
▪ केमिकल : 10
▪ इंस्ट्रुमेंटेशन : 15
▪ माइनिंग : 03
👍 शैक्षणिक पात्रता : (i) 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी. (ii) GATE 2019
🧐 वयाची अट : 14 जून 2019 रोजी 18 ते 28 वर्षे. (SC/ST :05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
👉 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💸 फी : General/ OBC: ₹700/- (SC/ST/PWD/EWS: ₹100/-)
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 14 जून 2019
🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2EzApt2
👨💻 ऑनलाईन अर्ज : https://ltsup.in/2W9wjlX
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

💥 ब्रेकिंग! 12 वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी
LetsUp । Breaking
⚡ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
👉 राज्याचा निकाल 85.88 टक्के इतका, मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत दिली माहिती
👍 यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा 7.85 टक्के अधिक
▪ राज्यभरातून विद्यार्थ्यांनी नोंदणी : 14 लाख 23 हजार 503
▪ प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या : 14 लाख 21 हजार 936
▪ मुलींची संख्या : 6 लाख 30 हजार 254
▪ मुलांची संख्या : 7 लाख 91 हजार 682
▪ उत्तीर्ण विद्यार्थी संख्या : 12 लाख 21 हजार 159
💫 गुण पडताळणीसाठी 29 मे ते 7 जून आणि छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून या या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.
🎯 यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल घसरला
शाखा : 2014 टक्केवारी I 2019 टक्केवारी
▪ विज्ञान : 95.85 (2014) I 92.60 (2019)
▪ कला : 78.93 (2014) I 76.45 (2019)
▪ वाणिज्य : 89.50 (2014) I 88.28 (2019)
▪ उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : 82.18 (2014) I 78.93 (2019)
📍 विभागनिहाय निकाल (टक्के) असा : पुणे : 87. 88 I नागपूर : 82.51 I औरंगाबाद : 87.29 I मुंबई : 83.85 I कोल्हापूर : 87.12 I अमरावती : 87.55 I नाशिक : 84.77
I लातूर : 86.08 I कोकण : 93.23
💁♂ या ठिकाणी निकाल पाहू शकता :
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) www.maharashtraeducation.com
📱 SMSद्वारे मिळवा निकाल : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये SMS पाठवून निकाल मिळवता येईल.

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 अहमदनगर शहराचा 529 वा स्थापना दिवस
LetsUp । Special
💁♂ आज 28 मे आपल्या लाडक्या "अहमदनगर "शहराचा 529 वा वाढदिवस आहे. गेल्या काही वर्षात अहमदनगर शहराने अनेक चढउतार पाहिलेत. स्थापना दिवसानिमित्त शहरात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. उत्कृष्ट हवामान असलेले हे शहर आता बदलत्या काळानुसार अत्याधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे.
🧐 अहमदनगरची स्थापना कशी झाली? : पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाल्याने या आनंदाप्रित्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ 28 मे 1490 या दिवशी मलिक अहमदने रोवली. हाच दिवस नगर शहराचा स्थापना दिन मानला जातो.
👉 आजपर्यंतच्या 529 वर्षांच्या वाटचालीत निजामशाही, मोगलशाही, मराठेशाही, पेशवाई, ब्रिटीश व स्वातंत्रोत्तर स्वकियांचा कालखंड अनुभवलेल्या नगर शहराची तुलना कैरो व बगदाद या शहरांशी होत असे. सुलताना चाँदबिबी व तिचा पराक्रम येथील मातीतच घडलेला. 1942च्या चले जाव चळवळीत सहभागी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेलांसह अन्य राष्ट्रीय नेत्यांना येथील भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध केले होते.
🎯 विशेष : जवाहरलाल नेहरू येथील भुईकोट किल्ल्यामध्ये स्थानबद्ध असताना त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथाचे लिखाण केले. तर या ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉटस ऑन पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला. तसेच पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते.

🐅 महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245
LetsUp । Update
⚡ देशात व्याघ्रगणना पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245 असल्याचे स्पष्ट झाले आहे.
🎯 भारतीय वन्यजीव संस्थानमार्फत व्याघ्रगणना केली जाते. कॅमेऱ्यांमार्फत 45 दिवस पाहणी करून वाघांची संख्या ठरविण्यात आल्याने ती अचूकतेच्या अधिक जवळ असल्याचा दावा केला जात आहे.
📍 राज्यात 2014 च्या व्याघ्रगणनेच्या अहवालानुसार 190 वाघ होते. मात्र, गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या 55 ने वाढली आहे.
🧐 काय म्हणाले वनमंत्री? : वाघांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही जाणीवपूर्वक काम केले आहे. जंगलातली घनता वाढावी, तृणभक्षी जनावरे जंगलात असावीत, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. वाघांची संख्या वाढणे, हे आमच्या मिळालेल्या प्रयत्नांना आलेले यश आहे.
💁♂ वाघांची संख्याबाबत माहिती
👉 वर्ष - देशातील - राज्यातील संख्या
▪ 2010 - 1700 - 169
▪ 2014 - 2226 - 190
▪ 2018 - 2500 - 245

📣 पतंजलीचे दुग्धजन्य पदार्थ बाजारात
LetsUp । Update
⚡ योगगुरु रामदेवबाबांच्या पतंजलीचे स्वस्त दूग्धजन्य पदार्थांची बाजारात एन्ट्री
💁♂ पतंजलीने नवे दुग्धजन्य पदार्थ लॉन्च केले आहेत. गायीच्या दुधासह आता लस्सी, ताक आणि दहीदेखील मिळणार आहे. अशी माहिती योग गुरु रामदेव बाबांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
😍 स्वस्त पदार्थ : पतंजलीचं ताक दोन्ही प्रकारे मीठ आणि मीठाशिवाय उपलब्ध आहे. दही हे अमूल आणि मदर डेरीच्या दह्यापेक्षा पाच रुपयांनी स्वस्त आहे. अमूल आणि मदर डेरीने दुधाचे दर प्रतीलिटर दोन रुपयांनी वाढवल्याच्या काही दिवसातच रामदेव बाबा यांच्या पतंजली डेअरीने बाजारात स्वस्त दुग्धजन्य पदार्थ आणले आहेत.
🚛 या दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा हरियाणा आणि राजस्थानमधून होणार आहे.
💫 काही विशेष :
▪ इतरांपेक्षा स्वस्त आणि गुणवत्तेत दर्जेदार प्रॉडक्ट असल्याचा कंपनीचा दावा.
▪ आगामी काळात पतंजली हर्बल मिल्क आणि फुल क्रीम मिल्क सादर करणार.
💰 दुधाचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात : सध्या दिवसाला 4 लाख दुधाचा पुरवठा करणे आमचे लक्ष्य आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधाचा मोबदला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली.

💁♂ बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा
LetsUp । Special
🎯 आयुष्यात बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांच्या करिअरचा टर्निग पॉईंटसाठी हा काळ महत्वाचा असतो. यामुळे बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या काही वाटा आपण पाहू....
▪ आर्टीस्ट : तुम्हीजर क्रियेटीव्ह नेचरचे असाल, कोणताही गोष्ट वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची कला तुमच्यामध्ये असले तर, समजून जा तुम्ही एक कलाकार आहात. त्याचा प्रत्यक्ष जीवनात करिअर म्हणून वापर करता येऊ शकतो. म्हणून, कलेशी संबंधित कोणताही कोर्स तुम्ही करू शकता. हे कोर्सेस विविध संस्थांमध्ये 6 महिने ते 2 वर्षे किंवा त्याहूनही अधिक कालावधीसाठी शिकवले जातात.
▪ हॉटेल मॅनेजमेंट : हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला 12वी पास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, सेल्फ कॉन्फडन्स आणि कम्यूनिकेशन स्किल याच्या आधारावर तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता. हा कोर्स सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि बॅचलर डिग्री अशा स्वरूपात उपलब्ध आहे. हा कोर्स केल्यावर तुम्ही जॉब करू शकता तसेच, स्वत:चा व्यवसायही करू शकता.
▪ आर्कीटेक्चर : तुम्ही जर सायन्समधून 12वी पास असाल तर, त्यातही तुमचा जर गणित विषय असेल तर, तुम्ही आर्कीटेक्चर फिल्डसाठी ट्राय करू शकता. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एण्ट्रन्स एग्झाम द्यावी लागते. या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी तूम्ही जर, तुमचा पोर्टफोलियो डिझाईन केला असेल किंवा एखादा प्रोजेक्ट केला असेल तर तुमची प्रवेश निश्चितीची शक्यता अधिक वाढते.
▪ मर्चंट नेव्ही : मर्चंट नेव्हीत प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 60% गुणांनी 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडवाले (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) असणे गरजेचे आहे. एन्ट्रान्स एग्झाम पास झाल्यावर तुम्हीला या कोर्ससाठी अप्लाय करता येऊ शकते.
▪ टेक्निकल फिल्ड : आपल्यापैकी अनेक लोकांना यंत्राबाबत जाणून घेण्याची इच्छा आणि आवड असते. कोणतेही यंत्र हातात पडले की, ते खोलने, जोडणे त्यातून नवे काही निर्माण करणे असे प्रकार अशा लोकांकडून होता. अशा मंडळींसाठी 12 नंतर टेक्निकल फिल्ड केव्हाही चांगले. आपण टेक्निकल फिल्डचे ट्रेनिंग करून या क्षेत्रात करिअर करू शकता.
▪ इतर कोर्सेस : याशिवाय आपण डिप्लोमा इन फिल्म, एनिमेशन, कॅमेरा आणि लाईटींग, डिप्लोमा इन फिल्म मेकींग आणि व्हिडिओ प्रॉडक्शन यातही प्रयत्न करू शकता. हे सर्व कोर्सेस तुम्हाला 6 महिने ते 2 वर्षे कालावधीत पूर्ण करता येतात.

📣 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून
LetsUp । Update
⚡ राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे.
🎯 अधिवेशनाची रूपरेखा : या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प 18 जून रोजी मांडला जाणार आहे. यानंतर 21 व 24 जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. तर राज्यपालांचे अभिभाषण चर्चा 19 व 20 जून रोजी होईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे नियोजन ठरवण्यात आले आहे.
💁♂ हे अधिवेशन तीन आठवडे चालणार असून, या अधिवेशनात कामकाजाचे केवळ 12 दिवस असणार आहेत.
📍 मंत्रिमंडळ विस्तार शक्यता! : पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 5 ते 10 जून दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ ममता बॅनर्जींच्या पक्षातील आमदारांचा भाजपात प्रवेश
▪ राज्यातील धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक
▪ 'बंटी और बबली' सिनेमाचा सिक्वेल येणार
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani28may

Audioboom
LetsUp Wani 28 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर भाजपमध्ये मंत्रिमंडळाबाबत हालचाली सुरु, यंदा 20 टक्के बदल करण्यात येणार
● एल्डोरॅडो या वेबसाईटनुसार चंद्रपूर जगातील सर्वाधिक हॉट शहर, मंगळवारी चंद्रपूरचे तापमान 47.8 अंश
● राजीव गांधी विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून 11.1 किलो सोने तर दीड कोटींचे विदेशी चलनही जप्त
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात पुन्हा कृत्रिम पावसाचा प्रयोग; राज्य सरकारचा निर्णय
● विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना विद्युत शुल्कात माफीची सवलत 2024 पर्यंत लागू, राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
● विधानसभा एकत्र लढण्याबाबत विरोधी पक्षांशी चर्चा; वंचित आघाडी, मनसेबाबत वेट अॅण्ड वॉचची भूमिका
● मुंबईतील डॉक्टर पायल तडवी रॅगिंग आणि आत्महत्येप्रकरणी तीन आरोपींपैकी एका महिला डॉक्टरला अटक
● ओप्पो कंपनीने रेनो आणि रेनो 10 एक्स झूम हे उच्च श्रेणीतील मॉडेल्स भारतीय ग्राहकांना केले सादर
● सराव सामन्यात भारताची बांगलादेशवर 95 धावांनी मात, राहुल आणि धोनी हे विजयाचे शिल्पकार ठरले
● 'करीना कपूर'चे छोट्या पडद्यावर पदार्पण; Dance India Dance शो जज करण्यासाठी घेतले तब्बल 80 कोटी मानधन
● अहमदनगर - शहराच्या 529 व्या स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पण
● अहमदनगर - नगरची शुभांगी राजू भंडारे चक्क भारतीय फुटबॉल संघात, वंचित फुटबॉल स्पर्धेत खेळणार
● अहमदनगर - लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील जिल्हा परिषदांना कर्मचारी बदली प्रक्रिया राबवता आली नाही. त्यामुळे ‘झेडपी’ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 7 जूनपर्यंत मुदतवाढ
● अहमदनगर - पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना जिल्ह्यात 2019-20 या वर्षात राबवण्यात येणार

🎯 दुसऱ्या सराव सामन्यात भारताची बांगलादेशवर मात
LetsUp | Sports
⚡ कार्डीफच्या मैदानावर दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 95 धावांनी मात केली
💁♂ प्रथम फलंदाजी करताना महेंद्रसिंह धोनी (113) आणि लोकेश राहुल (108) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 359 धावांपर्यंत मजल मारली
🧐 प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा डाव 264 धावांवर आटोपला, त्यांच्याकडून मुशफिकुर रहीम (90) आणि लिटन दास (73) यांनी झुंज दिली
👉 भारताकडून गोलंदाजीत युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराह यांनी 2 बळी घेत आश्वासक मारा केला
⚔ भारताचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 जून रोजी द रॉझ बाउल, साउथम्पटन येथे रंगणार आहे

🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर
LetsUp | Entertainment
1) अफवांवर माधुरीचा खुलासा:
गेल्या काही दिवसांपासून ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार असल्याच्या चर्चा होत्या. आता खुद्द माधुरीने या सर्व अफवा असल्याचा खुलासा केला आहे.
माधुरी म्हणाली, “माझ्या जीवनावर आधारित कोणत्याही बायोपिकच निर्मिती करण्यात येणार नाही. या अफवा कुठून पसरल्या हे मला माहित नाहीय. परंतु माझ्या जीवनावर आधारित बायोपिक व्हावा अशी माझी इच्छा नाही. मला आयुष्यात अजून खूप काही करायचे आहे”.
2) ‘खामोशी’साठी श्रृती गाणार :
अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि प्रभूदेवा यांचा हॉरर थ्रिलर असलेला ‘खामोशी’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. माहितीनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्री श्रृती हसन एक गाणे गाणार आहे.
श्रृतीने ‘खामोशी’ चित्रपटातील गाण्याविषयी आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, प्रभूदेवा यांच्या चित्रपटासाठी आता मला गायनाची संधी मिळत असल्याने मी फार आनंदी आहे. ‘खामोशी’ चित्रपटाच्या थीमवरच आधारित हे गाणे राहणार आहे.
अभिनयाव्यतीरिक्त गायनातही श्रृती हसन ही अग्रेसर आहे. 1997 साली आलेल्या ‘चाची-420’ या चित्रपटापासूनच तिच्या गायनाची सुरुवात झाली. बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांसाठी श्रृतीने गाणे गायले आहे.
3) ‘काफिर’चा ट्रेलर प्रदर्शित :
झी 5 वरील ‘काफिर’ या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला चांगला प्रतिसाद आहे. ‘काफिर’मधून अभिनेत्री दिया मिर्झा वेबसीरिज विश्वात पदार्पण करत आहे.
यामध्ये मोहित रैना सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. एका दहशतवादी आरोपीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार-वकिलाचा प्रवास या सीरिजमध्ये दिसतो आहे. ही सीरिज 15 जूनला प्रक्षेपित होणार आहे.
👀 ट्रेलर पहा : https://ltsup.in/2HJd1v8

YouTube
Kaafir | Official Trailer | A ZEE5 Original | Dia Mirza, Mohit Raina | Premieres 15th June On ZEE5
Amid the sprawling border of our country, begins the journey of a young Pakistani mother who comes into India under a strange series of circumstances and is ...
महाराष्ट्रातील सर्व निवडून आलेल्या खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी या नेटिन्झच्या मोहिमेशी तुम्ही सहमत आहात का?
Anonymous Poll
89%
होय
11%
नाही
🧐 तंत्रज्ञानात कुठं काय?
LetsUp | Tech
1) फेसबुकची ‘क्रिप्टोकरन्सी’ येणार :
आता फेसबुकच्या ‘ग्लोबल कॉइन’चे आगमन होणार आहे. अर्थात, फेसबुकही आता आपली स्वतःची ‘क्रिप्टोकरन्सी’ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
हे आभासी चलन 2020च्या पहिल्या तिमाहीत जगभरात जारी केले जाण्याची शक्यता आहे. फेसबुकखेरीज अन्य ईकॉमर्स संकेतस्थळांवरील खरेदीसाठीही हे चलन वापरता येईल. तसेच व्हॉट्सअॅपवरून एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही ‘ग्लोबलकॉइन’ उपयुक्त ठरेल.
फेसबुकने यासंदर्भात जगभरातील बँकांशी बोलणीही सुरू केली असून वर्षभरात डझनभर देशांत हे चलन कार्यान्वित होईल.
2) गुगलचा फोन 28 हजारांनी स्वस्त :
गुगल कंपनीने पिक्सल 3XLच्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या मुल्यात तब्बल 28 हजार रूपयांची कपात केली आहे. याशिवाय, याच्या 128 जीबी स्टोरेजच्या मॉडलमध्येही तब्बल 26 हजारांची कपात करण्यात आलेली आहे.
पिक्सल 3 एक्सएलच्या 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 83,000 रुपये होती, तर 4 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेजची किंमत 92,000 रुपये होती. पण आता किंमतीत कपात झाल्याने हे दोन्ही व्हेरिअंट्स ग्राहकांना अनुक्रमे 54,999 रुपये आणि 65,999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
3) लवकरच TikTok चा फोन :
लोकप्रिय टिक टॉक अॅपची निर्मिती करणारी बाइटडान्स ही कंपनी स्वत: आता मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहे. या फोनमध्ये टिक टॉक व इतर अॅप प्रीलोडेड असणार आहे.
बाइटडान्सचा हा नवा मोबाइल कसा असेल, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. बाइटडान्सचे टिक टॉकसह बातम्या, संगीत, व्हिडिओ आदींशी संबंधित अॅप्स आहेत. हे सर्व अॅप या मोबाइलमध्ये प्री लोडेड असणार आहेत.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Tech
1) फेसबुकची ‘क्रिप्टोकरन्सी’ येणार :
आता फेसबुकच्या ‘ग्लोबल कॉइन’चे आगमन होणार आहे. अर्थात, फेसबुकही आता आपली स्वतःची ‘क्रिप्टोकरन्सी’ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
हे आभासी चलन 2020च्या पहिल्या तिमाहीत जगभरात जारी केले जाण्याची शक्यता आहे. फेसबुकखेरीज अन्य ईकॉमर्स संकेतस्थळांवरील खरेदीसाठीही हे चलन वापरता येईल. तसेच व्हॉट्सअॅपवरून एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही ‘ग्लोबलकॉइन’ उपयुक्त ठरेल.
फेसबुकने यासंदर्भात जगभरातील बँकांशी बोलणीही सुरू केली असून वर्षभरात डझनभर देशांत हे चलन कार्यान्वित होईल.
2) गुगलचा फोन 28 हजारांनी स्वस्त :
गुगल कंपनीने पिक्सल 3XLच्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या मुल्यात तब्बल 28 हजार रूपयांची कपात केली आहे. याशिवाय, याच्या 128 जीबी स्टोरेजच्या मॉडलमध्येही तब्बल 26 हजारांची कपात करण्यात आलेली आहे.
पिक्सल 3 एक्सएलच्या 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 83,000 रुपये होती, तर 4 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेजची किंमत 92,000 रुपये होती. पण आता किंमतीत कपात झाल्याने हे दोन्ही व्हेरिअंट्स ग्राहकांना अनुक्रमे 54,999 रुपये आणि 65,999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
3) लवकरच TikTok चा फोन :
लोकप्रिय टिक टॉक अॅपची निर्मिती करणारी बाइटडान्स ही कंपनी स्वत: आता मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहे. या फोनमध्ये टिक टॉक व इतर अॅप प्रीलोडेड असणार आहे.
बाइटडान्सचा हा नवा मोबाइल कसा असेल, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. बाइटडान्सचे टिक टॉकसह बातम्या, संगीत, व्हिडिओ आदींशी संबंधित अॅप्स आहेत. हे सर्व अॅप या मोबाइलमध्ये प्री लोडेड असणार आहेत.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗻 आज 'माउंट एव्हरेस्ट' दिवस
LetsUp । Special
🎯 जगातील सर्वात उंच पर्वतशिखर अर्थात माउंट एव्हरेस्ट. हिमालय पर्वतातील या शिखराची उंची 8,848 मीटर (29,029 फूट) इतकी असून हे शिखर नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला 'सगरमाथा' म्हणून ओळखतात तर तिबेटमध्ये 'चोमो लुंग्मा' म्हणतात.
🧐 शिखराचे नामकरण कसे? : सन 1856 मध्ये ब्रिटिश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये या शिखराची उंची 29,029 फूट इतकी निश्चित करण्यात आली. या अगोदर हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते.
सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की, हिमालयाचे 15 वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे. त्यावेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख ॲन्ड्र्यू वॉ यांनी निवृत्त कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.1856 पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.
💁♂ चढाईसाठी सोईस्कर मार्ग कोणते?: नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. याव्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत. परंतु ते फारसे वापरले जात नाहीत. या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग सोपा व सोईस्कर असल्याने गिर्यारोहकांच्या पसंतीचा आहे. याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी 1953 मध्ये पहिली चढाई केली होती.
👌 मराठी पाऊल : 19 मे 1998 रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. भारतीय पथकाचे नेतृत्व करताना सुरेंद्र चव्हाण यांना 1998 मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला.

💁♂ नवा ट्रेंड! 'जेसीबी की खुदाई' सोशलवर व्हायरल
LetsUp । Special
🎯 सोशल मिडीयावर कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ट्रेंड होत असलेलं 'जेसीबी की खुदाई” होय. सोशल मीडियावर या ट्रेंडच्या जोक्सने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
🧐 कशी झाली ट्रेंडची सुरुवात? : हैदाराबादमधील एका खासदाराच्या वक्तव्यानंतर हे सुरु झाल्याचं बोललं जात आहे. "भारतीय लोक बेरोजगार असल्यानं त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो. इतका की एखाद्या ठिकाणी जेसीबीचं काम सुरु असेल तर लोक तिथे थांबून पाहत बसतात. असं वक्तव्य त्या खासदारान केलं होतं. त्यानंतर या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली आहे.
🙏 'जेसीबी' कंपनीने मानले आभार : मोठ्या प्रमाणावर हा ट्रेण्ड सुरु असल्याचं पाहून 'जेसीबी' या कंपनीने देखील याची दखल घेतली आहे. 'भारतीय लोकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहोत', असं ट्वीट जेसीबी कंपनीकडून करण्यात आलं आहे.

📣 प्रथमच शेळ्या-मेंढ्यासाठी सुरु होणार छावण्या
LetsUp । Update
⚡ शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिल्यादांच चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
💁♂ राज्यातील दुष्काळी भागातील जनावरांसाठी छावण्या सुरु आहेत. राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच चारा छावणीमधील जनावरांना टँकरद्वारे पाणी देण्यात येणार आहे.
🗓 बिले तातडीने अदा करा : चारा छावण्यांची बिले जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी तपासून घ्यावीत, व तातडीने बिलांची रक्कम अदा करावेत. त्यात विलंब करू नये. असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे.
🚽 छावण्यांमध्ये उभारणार स्वच्छतागृहे : जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये उपस्थित असतात. त्यांच्यासाठी तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
📍 दुष्काळाची झळ : जिल्ह्यातील सुमारे 5 ते 6 लाख शेळ्या-मेंढ्या व इतर जनावरांचे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हाल सुरू आहेत.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिल्यादांच चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
💁♂ राज्यातील दुष्काळी भागातील जनावरांसाठी छावण्या सुरु आहेत. राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच चारा छावणीमधील जनावरांना टँकरद्वारे पाणी देण्यात येणार आहे.
🗓 बिले तातडीने अदा करा : चारा छावण्यांची बिले जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी तपासून घ्यावीत, व तातडीने बिलांची रक्कम अदा करावेत. त्यात विलंब करू नये. असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे.
🚽 छावण्यांमध्ये उभारणार स्वच्छतागृहे : जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये उपस्थित असतात. त्यांच्यासाठी तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
📍 दुष्काळाची झळ : जिल्ह्यातील सुमारे 5 ते 6 लाख शेळ्या-मेंढ्या व इतर जनावरांचे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हाल सुरू आहेत.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ उन्हाळ्यात चेहऱ्याच्या समस्या कशा सोडवाल?*
LetsUp । Tips
🧐 उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे खूप गरजेची असते. यासाठी आपण काही उपाय जाणून घेऊयात...
▪ दुधाची साय : सॉफ्ट, तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्यावर साय लावणं फायदेशीर ठरतं. चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास साय महत्वाची ठरते. साय तेलकट असते त्यामुळे चेहरा मुलायम होतो, तसेच चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत होते. दूधाची साय घ्या व त्यामध्ये चिमूटभर हळद एकत्र करून कॉटन बॉल्सच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
_____________
🧐 बोर्डाच्या निकालात दरवर्षी मुलींची सरशी का? जाणून घेऊया : 👉 http://bit.ly/2YTpwKa
_____________
▪ बेसन : बेसन, चंदन, हळद इत्यादी पदार्थ एकत्र करून एक मिश्रण तयार करा व चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा याचा वापर करा. तुम्ही आवश्यक असेल तर दररोजही चेहऱ्यावर हे मिश्रण लावू शकता. या फेस पॅकमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी नैसर्गिक असल्यामुळे याचे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत.
▪ गुलाब पाणी : 2 ते 3 कॉटन बॉल्स गुलाब पाण्यामध्ये भिजवून फ्रीजमध्ये ठेवून द्या. काही वेळानंतर त्या कॉटन बॉल्सनी तुमच्या चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी मसाज करा. लक्षात ठेवा की, मसाज करण्याआधी तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. गुलाब पाण्याने चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.
▪ स्क्रबिंग : आपल्या स्किन टाइपनुसार, स्क्रबची निवड करा. स्क्रब करताना हातांना चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवा. ही स्क्रब करण्याची योग्य पद्धत आहे. स्क्रब केल्यानंतर स्किन टाइपनुसार, फेस पॅक लावा आणि 10 मिनिट ठेवल्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. सकाळ उठल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल.
▪ मुलतानी माती : जर तुमची स्किन ऑयली असेल तर चेहऱ्यावर मुलतानी माती लावा व 10 ते 15 मिनिटनंतर चेहरा धुवून टाका. मुलतानी माती लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि फ्रेश लूक मिळण्यासही मदत होते.

Instagram
Lets Up
बोर्डाच्या निकालात दरवर्षी मुलींची सरशी का? नुकतेच बोर्डाचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये मुलींनी चांगले गुण मिळवत अग्रस्थानावर आपले नाव कोरले आहे. काही वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर शिक्षण क्षेत्रात मुलींचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. यावर तज्ञांची…
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ मंत्रिपद नको, अरुण जेटलींचे मोदींना पत्र
▪ संजय गांधी उद्यानातील वाघाचा कॅन्सरने मृत्यू
▪ पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर नक्षली संघटनांची कागदपत्रे
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani29may
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Wani
💁♂ मंत्रिपद नको, अरुण जेटलींचे मोदींना पत्र
▪ संजय गांधी उद्यानातील वाघाचा कॅन्सरने मृत्यू
▪ पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर नक्षली संघटनांची कागदपत्रे
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani29may
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Audioboom
LetsUp Wani 29 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या आज सायंकाळी होत असलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाचे भव्य प्रांगण सज्ज
● देशातील 102 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 84 शहरांना वायू प्रदूषणातून मुक्त करण्यासाठीची योजना तयार
● उत्तर भारतात पुढचे 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट, दिल्ली-एनसीआर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानला हवामान विभागाचा इशारा
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांची चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या (सीओएससी) अध्यक्षपदी नियुक्ती
● गेल्या वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीतून राज्य सरकारला 25 हजार 323 कोटी रूपयांचा विक्रमी महसूल प्राप्त
● शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश
● पायल तडवी आत्महत्या प्रकरण : तिन्ही आरोपी डॉक्टर्सना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी
● Hyundai च्या Hyundai Venue ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद, बूकिंग 20 हजारांच्या पार
● बकिंगहॅम पॅलेसजवळ रंगला क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा, आज यजमान इंग्लंडपुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
● बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीचा विनोदी भयपट ‘कोका कोला’ येतोय, यात ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार
● अहमदनगर - राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन अभियानात नगर जिल्हा परिषद राज्यात प्रथम; वर्षभरात जिल्ह्यात 2 हजार 250 बायोगॅस सयंत्र उभारले
● अहमदनगर - आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जातील चूका दुरुस्त करण्यासाठी शिक्षण विभागाची येत्या 4 जूनपर्यंत मुदत
● अहमदनगर - जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या 314 पक्षी प्रजातींची नोंद असणारी पक्षीसूची येथील प्राध्यापक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी केली तयार