LetsUpp Marathi
5.29K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂ बिग बॉसच्या घरात या सेलिब्रेटींची एन्ट्री

LetsUp । Special

मराठी ‘बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनची धुमधडाक्यात सुरुवात.

🎯 ‘कलर्स’ मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सीजनमध्ये कोणते सदस्य असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर रविवारी रात्री पार पडलेल्या ग्रॅण्ड प्रीमियरमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी या सस्पेन्सवरून पडदा हटवला.

🎭 बिग बॉस 2 च्या घरातील सेलिब्रेटींची नावे : अभिजित केळकर, दिगंबर नाईक, किशोरी शहाणे, माधक देवचक्के, मैथिली जावकर, नेहा शितोळे, शेफ पराग कान्हेरे, रूपाली भोसले, शिक ठाकरे, शिकानी सुर्वे, सुरेखा पुणेकर, वैशाली माडे, वीणा जगताप, विद्याधर जोशी, अभिजित बिचुकले.

🏠 …असे आहे ‘बिग बॉस’चे घर :

‘बिग बॉस’चे घर उमंग कुमार यांनी डिझाईन केले आहे.
गोरेगावच्या फिल्मसिटीत 14 हजार चौरस फूट जागेमध्ये हे घर उभारण्यात आले.
या घराला मराठमोळय़ा वाडय़ाचे स्वरूप दिले आहे.
घरामध्ये तुळशी वृंदावन, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, स्मोकिंग झोन, जेल देखील आहे.

😍 येत्या 100 दिवस बिग बॉसच्या घरात काय काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🏆 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच लागू होणार हे नियम

LetsUp । Sports

आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे सात नवे नियम लागू केले आहेत.

🎯 आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2015 पासून नवे सात नियम लागू केले आहेत. हे सारे नियम वनडे क्रिकेटमध्ये लागू करण्यात आले आहेत. मात्र वर्ल्डकपमध्ये हे नियम पहिल्यांदाचा लागू केले जाणार आहेत.

🧐 जाणून घ्या सात नियम :

आऊट : हेल्मेटला चेंडू लागून झेल घेतल्यास फलंदाज बाद ठरणार आहे. मात्र, हँडल द बॉल च्या परिस्थितीत फलंदाजाला बाद दिले जाणार नाही.

बॉल बाउन्स - दोनवेळा बाउन्स टाकल्यास तो नो बॉल दिला जाणार आहे. याशिवाय फ्री हिटसुद्धा मिळणार आहे.

बॅटचा आकार निश्चित - फलंदाज आणि गोलंदाजांत समान लढत व्हावी यासाठी बॅटचा आकार निश्चित करण्यात आला आहे. यात बॅटची लांबी 108 मि.मी. जाडी 67 मिमीपेक्षा जास्त नसेल. पंचांना शंका आली तर ते बॅटची लांबी, रुंदी मोजू शकतात.

रनआउट - स्टम्पिंगवेळी बॅट रेषेवर असताना नॉटआउट दिलं जात होतं, मात्र यापुढे बॅट रेषेवर असली तरी बाद दिलं जाणार आहे. जर फलंदाजाचा पाय किंवा बॅट क्रीजमध्ये आणि हवेत असले तरी फलंदाज नॉटआउट असेल.

नो बॉलच्या धावा वेगळ्या खात्यात - जर एखादा गोलंदाज नो बॉल फेकतो तेव्हा लेग बायच्या धावा या नोबॉल म्हणून मोजल्या जात होत्या. यापुढे त्या नोबॉलच्या खात्यात न लिहता वेगळ्या लिहल्या जातील.

गैरवर्तन - एखाद्या खेळाडूचे वर्तन चुकीचे वाटल्यास पंचांना त्या खेळाडूला मैदानातून बाहेर घालवण्याचे अधिकार पंचांना देण्यात आले आहेत.

रिव्ह्यू - फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणारा संघ या दोघांपैकी कोणी डीआरएस घेतला आणि अंपायर्स कॉलमुळे जर पंचांचा निर्णय अंतिम राहिला तर संघाचा रिव्ह्यू वाया जाणार नाही.

📍 वादग्रस्त रनआउट, खेळाडूंची पंचांशी हुज्जत यासारख्या प्रकारांवर आयसीसीने केलेल्या नियमांची अंमलबजावणी या वर्ल्ड कपमध्ये केली जाणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🍵 उत्तम आरोग्यासाठी ग्रीन कॉफी फायदेशीर

LetsUp | Health

🎯 बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल तब्येत खराब होण्याचं प्रमाण वाढत आहे. अशात अनेक जण या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. सतत वाढणारं वजन, थकवा जाणवणे, या समस्या जाणवत असल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा.

💁‍♂ ग्रीन कॉफीचे फायदे खालीलप्रमाणे :

ग्रीन कॉफीमध्ये असणारे मिनरल्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडेंट्स शरीरातील शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

जर कोणाला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल आणि ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात केली, तर शरीराला नुकसान होण्याचा धोकाही कमी होतो.

ग्रीन कॉफीमध्ये क्रोनॉलोजीकल अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे रोज ग्रीन कॉफी पिण्याने शरीरातील उर्जा टिकून राहते आणि थकवा जाणवत नाही.

मिनरल्स आणि विटॅमिन भरपूर असलेली ग्रीन कॉफी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. ग्रीन कॉफीमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

ग्रीन कॉफीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही बचाव करण्यास मदत होते.

दररोज एक कप ग्रीन कॉफी पिण्याने शरीरात ट्यूमर तयार होण्याची शक्यता कमी होते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

LetsUp । Update

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी निकालाची तारीख झाली जाहीर

🎯 फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवार (दि. 28 मे) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.

📍 यंदा नऊ विभागातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

💁‍♂ या ठिकाणी निकाल पाहू शकता :

1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) www.maharashtraeducation.com

📱 एसएमएसद्वारे मिळवा निकाल : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.

निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत.
गुणपडताळणी 29 मे ते 7 जून या कालावधीत करता येणार आहे.
उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून पर्यंत अर्ज करता येईल.
पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 ऑटोमोबाईलमध्ये कुठं काय?

LetsUp । Auto

क्रॉसओव्हर मायक्रो एसयूवी - यावर्षी लाँच होणारी मारूती सुझुकीची नवीन कार मायक्रो कार 2018 मध्ये सुरू झालेल्या फ्यूचर एस संकल्पनेवर आधारीत आहे. ही नवीन कार सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीच्या आसपास बाजारात आणली जाईल. ही कार फक्त पेट्रोल इंजिनावर असणार आहे.

सात आसनी वॅगनआर - मारुती सुझुकीची यावर्षी लाँच होणारी दुसरी कार 'वॅगनआर' ही सात आसनी असणार आहे. मारुतीचे प्रीमियम आउटलेट नेक्साकडून या कारची विक्री होऊ शकते. या सात आसनी कारमध्ये 5+2 अशी सीटिंग लेआउट आहे. सात आसनी वॅगनआरमध्ये 1.2 लिटर चे सीरिज इंजिन असू शकते.

विटारा ब्रेझा - विटारा ब्रेजा ही कार लाँच होणार आहे. पेट्रोल इंजिनवर आधारीत ब्रेझा कारची बऱ्याच काळापासून प्रतिक्षा आहे. 1.5 लिटर के-सीरिज पेट्रोल इंजिन असेल. ज्यामुळे 104 बीएचपी ऊर्जा आणि 138 एनएम पीक टॉर्क निर्माण होईल. हे इंजिन सुझुकीच्या हायब्रिड सिस्टीमसह येणार आहे. ज्यामुळे ही कार चांगले मायलेज देईल.

अर्टिगा स्पोर्ट - मारुती सुझुकीची यावर्षी लोकप्रिय असलेली आर्टिगाची आता लक्झरी व्हर्जन येणार आहे. ही कार आर्टिगा स्पोर्ट या नावाने लाँच केली जाईल. ही कार सहा आसनी एमपीव्ही असून ही कार 2+2+2 या सीटिंग लेआउटसह येणार आहे. हे टॉप मॉडेल असणार आहे. कंपनी या कारची विक्री प्रीमियम आउटलेट नेक्समधून करणार आहे.

😍 कार इन्शुरन्सवर मिळवा 80 टक्क्यापर्यंत डिस्काउंट, अवघ्या 2 मिनिटांत 3 टप्य्यात मिळेल पॉलिसी, त्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.do/eSWT2
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ स्विस बँकेतील 11 भारतीय खातेदारांच्या नावाचा खुलासा

म्हाडाच्या एका घरासाठी तीनशे अर्ज
रणवीर सिंग झळकणार गुजराती सिनेमात

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/letsupwani27may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● नरेंद्र मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी BIMSTEC देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण, 30 मे रोजी सोहळा

● डीआरडिओने 'आकाश एमके 1 एस' या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी

● राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम; सर्व कार्यक्रम रद्द, काँग्रेसपुढे महापेच निर्माण झाल्याचे चित्र

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर आणि अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे दीर्घ आजाराने निधन

● मराठा आरक्षण अध्यादेशावर उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस, 10 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश

● महाराष्ट्र बोर्ड बारावीचा आज दुपारी 1 वाजता निकाल, संकेतस्थळ : www.mahresult.nic.inwww.hscresult.mkcl.org

● काँग्रेसच्या 4 आमदारांसह राधाकृष्ण विखे-पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये : सूत्रांची माहिती

● लोकसभा निवडणुकीच्या दणदणीत यशाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे

● नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र

● आयुषमान खुराना अभिनित 'आर्टिकल-15' चित्रपटाचे टीझर रिलीज, ट्रेलर 30 मे ला प्रदर्शित होणार

● अहमदनगर - जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात नेण्यास दोन महिने बंदी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा आदेश

● अहमदनगर - राज्यातील जिल्हा परिषदांतील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस 7 जूनपर्यंत मुदतवाढ

● अहमदनगर - कोपरगाव शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

● अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 28 मे ते 9 जून दरम्यान जिल्ह्यात अतिसार नियंत्रण मोहीम राबवणार

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👌 भारताची गगनभरारी! आकाश-1 एसची यशस्वी चाचणी

LetsUp | Update

📍 संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) आकाश-1 एस या हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची (मिसाईल) यशस्वी चाचणी केली.

💁‍♂ आकाश-1 एस ही एक नवीन आवृत्ती असून यामध्ये स्वदेशी बनावटीच्या साधनांचा वापर करण्यात आला आहे.

💪 लष्कराला मिळाली बळकटी :

ब्रह्मोसप्रमाणेच हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. याचा वेग 2.5 मॅक अर्थात 3,087 किलोमीटर प्रतितास एवढा आहे.
25-30 किलोमीटरपर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याचा अचूक वेध हे क्षेपणास्त्र घेऊ शकते.
हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत 60 किलो वजनाचे विस्फोटक सोबत घेऊन जाण्यास सक्षम असून कोणत्याही वातावरणामध्ये हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते.
हे क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्राचे फायटर जेट्स, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्र आणि हवेतून जमिनीवर हल्ला करणारे क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करू शकते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 SAIL मध्ये 142 जागांसाठी भरती

LetsUp । Jobs

💁‍♂ पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

📍 शाखा/विषय व पद संख्या अशी :

मेकॅनिकल : 66
मेटलर्जीकल : 07
इलेक्ट्रिकल : 41
केमिकल : 10
इंस्ट्रुमेंटेशन : 15
माइनिंग : 03

👍 शैक्षणिक पात्रता : (i) 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी. (ii) GATE 2019

🧐 वयाची अट : 14 जून 2019 रोजी 18 ते 28 वर्षे. (SC/ST :05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

👉 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

💸 फी : General/ OBC: ₹700/- (SC/ST/PWD/EWS: ₹100/-)

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 14 जून 2019

🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2EzApt2

👨‍💻 ऑनलाईन अर्ज : https://ltsup.in/2W9wjlX

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! 12 वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी

LetsUp । Breaking

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

👉 राज्याचा निकाल 85.88 टक्के इतका, मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत दिली माहिती

👍 यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा 7.85 टक्के अधिक

राज्यभरातून विद्यार्थ्यांनी नोंदणी : 14 लाख 23 हजार 503
प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या : 14 लाख 21 हजार 936
मुलींची संख्या : 6 लाख 30 हजार 254
मुलांची संख्या : 7 लाख 91 हजार 682
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या : 12 लाख 21 हजार 159

💫 गुण पडताळणीसाठी 29 मे ते 7 जून आणि छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून या या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.

🎯 यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल घसरला

शाखा : 2014 टक्केवारी I 2019 टक्केवारी

विज्ञान : 95.85 (2014) I 92.60 (2019)
कला : 78.93 (2014) I 76.45 (2019)
वाणिज्य : 89.50 (2014) I 88.28 (2019)
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : 82.18 (2014) I 78.93 (2019)

📍 विभागनिहाय निकाल (टक्के) असा : पुणे : 87. 88 I नागपूर : 82.51 I औरंगाबाद : 87.29 I मुंबई : 83.85 I कोल्हापूर : 87.12 I अमरावती : 87.55 I नाशिक : 84.77
I लातूर : 86.08 I कोकण : 93.23

💁‍♂ या ठिकाणी निकाल पाहू शकता :

1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) www.maharashtraeducation.com

📱 SMSद्वारे मिळवा निकाल : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये SMS पाठवून निकाल मिळवता येईल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 अहमदनगर शहराचा 529 वा स्थापना दिवस

LetsUp । Special

💁‍♂ आज 28 मे आपल्या लाडक्या "अहमदनगर "शहराचा 529 वा वाढदिवस आहे. गेल्या काही वर्षात अहमदनगर शहराने अनेक चढउतार पाहिलेत. स्थापना दिवसानिमित्त शहरात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. उत्कृष्ट हवामान असलेले हे शहर आता बदलत्या काळानुसार अत्याधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे.

🧐 अहमदनगरची स्थापना कशी झाली? : पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाल्याने या आनंदाप्रित्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ 28 मे 1490 या दिवशी मलिक अहमदने रोवली. हाच दिवस नगर शहराचा स्थापना दिन मानला जातो.

👉 आजपर्यंतच्या 529 वर्षांच्या वाटचालीत निजामशाही, मोगलशाही, मराठेशाही, पेशवाई, ब्रिटीश व स्वातंत्रोत्तर स्वकियांचा कालखंड अनुभवलेल्या नगर शहराची तुलना कैरो व बगदाद या शहरांशी होत असे. सुलताना चाँदबिबी व तिचा पराक्रम येथील मातीतच घडलेला. 1942च्या चले जाव चळवळीत सहभागी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेलांसह अन्य राष्ट्रीय नेत्यांना येथील भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध केले होते.

🎯 विशेष : जवाहरलाल नेहरू येथील भुईकोट किल्ल्यामध्ये स्थानबद्ध असताना त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथाचे लिखाण केले. तर या ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉटस ऑन पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला. तसेच पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🐅 महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245

LetsUp । Update

देशात व्याघ्रगणना पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245 असल्याचे स्पष्ट झाले आहे.

🎯 भारतीय वन्यजीव संस्थानमार्फत व्याघ्रगणना केली जाते. कॅमेऱ्यांमार्फत 45 दिवस पाहणी करून वाघांची संख्या ठरविण्यात आल्याने ती अचूकतेच्या अधिक जवळ असल्याचा दावा केला जात आहे.

📍 राज्यात 2014 च्या व्याघ्रगणनेच्या अहवालानुसार 190 वाघ होते. मात्र, गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या 55 ने वाढली आहे.

🧐 काय म्हणाले वनमंत्री? : वाघांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही जाणीवपूर्वक काम केले आहे. जंगलातली घनता वाढावी, तृणभक्षी जनावरे जंगलात असावीत, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. वाघांची संख्या वाढणे, हे आमच्या मिळालेल्या प्रयत्नांना आलेले यश आहे.

💁‍♂ वाघांची संख्याबाबत माहिती

👉 वर्ष - देशातील - राज्यातील संख्या
2010 - 1700 - 169
2014 - 2226 - 190
2018 - 2500 - 245

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 पतंजलीचे दुग्धजन्य पदार्थ बाजारात

LetsUp । Update

योगगुरु रामदेवबाबांच्या पतंजलीचे स्वस्त दूग्धजन्य पदार्थांची बाजारात एन्ट्री

💁‍♂ पतंजलीने नवे दुग्धजन्य पदार्थ लॉन्च केले आहेत. गायीच्या दुधासह आता लस्सी, ताक आणि दहीदेखील मिळणार आहे. अशी माहिती योग गुरु रामदेव बाबांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

😍 स्वस्त पदार्थ : पतंजलीचं ताक दोन्ही प्रकारे मीठ आणि मीठाशिवाय उपलब्ध आहे. दही हे अमूल आणि मदर डेरीच्या दह्यापेक्षा पाच रुपयांनी स्वस्त आहे. अमूल आणि मदर डेरीने दुधाचे दर प्रतीलिटर दोन रुपयांनी वाढवल्याच्या काही दिवसातच रामदेव बाबा यांच्या पतंजली डेअरीने बाजारात स्वस्त दुग्धजन्य पदार्थ आणले आहेत.

🚛 या दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा हरियाणा आणि राजस्थानमधून होणार आहे.

💫 काही विशेष :
इतरांपेक्षा स्वस्त आणि गुणवत्तेत दर्जेदार प्रॉडक्ट असल्याचा कंपनीचा दावा.
आगामी काळात पतंजली हर्बल मिल्क आणि फुल क्रीम मिल्क सादर करणार.

💰 दुधाचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात : सध्या दिवसाला 4 लाख दुधाचा पुरवठा करणे आमचे लक्ष्य आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधाचा मोबदला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा

LetsUp । Special

🎯 आयुष्यात बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांच्या करिअरचा टर्निग पॉईंटसाठी हा काळ महत्वाचा असतो. यामुळे बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या काही वाटा आपण पाहू....

आर्टीस्ट : तुम्हीजर क्रियेटीव्ह नेचरचे असाल, कोणताही गोष्ट वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची कला तुमच्यामध्ये असले तर, समजून जा तुम्ही एक कलाकार आहात. त्याचा प्रत्यक्ष जीवनात करिअर म्हणून वापर करता येऊ शकतो. म्हणून, कलेशी संबंधित कोणताही कोर्स तुम्ही करू शकता. हे कोर्सेस विविध संस्थांमध्ये 6 महिने ते 2 वर्षे किंवा त्याहूनही अधिक कालावधीसाठी शिकवले जातात.

हॉटेल मॅनेजमेंट : हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला 12वी पास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, सेल्फ कॉन्फडन्स आणि कम्यूनिकेशन स्किल याच्या आधारावर तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता. हा कोर्स सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि बॅचलर डिग्री अशा स्वरूपात उपलब्ध आहे. हा कोर्स केल्यावर तुम्ही जॉब करू शकता तसेच, स्वत:चा व्यवसायही करू शकता.

आर्कीटेक्चर : तुम्ही जर सायन्समधून 12वी पास असाल तर, त्यातही तुमचा जर गणित विषय असेल तर, तुम्ही आर्कीटेक्चर फिल्डसाठी ट्राय करू शकता. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एण्ट्रन्स एग्झाम द्यावी लागते. या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी तूम्ही जर, तुमचा पोर्टफोलियो डिझाईन केला असेल किंवा एखादा प्रोजेक्ट केला असेल तर तुमची प्रवेश निश्चितीची शक्यता अधिक वाढते.

मर्चंट नेव्ही : मर्चंट नेव्हीत प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 60% गुणांनी 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडवाले (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) असणे गरजेचे आहे. एन्ट्रान्स एग्झाम पास झाल्यावर तुम्हीला या कोर्ससाठी अप्लाय करता येऊ शकते.

टेक्निकल फिल्ड : आपल्यापैकी अनेक लोकांना यंत्राबाबत जाणून घेण्याची इच्छा आणि आवड असते. कोणतेही यंत्र हातात पडले की, ते खोलने, जोडणे त्यातून नवे काही निर्माण करणे असे प्रकार अशा लोकांकडून होता. अशा मंडळींसाठी 12 नंतर टेक्निकल फिल्ड केव्हाही चांगले. आपण टेक्निकल फिल्डचे ट्रेनिंग करून या क्षेत्रात करिअर करू शकता.

इतर कोर्सेस : याशिवाय आपण डिप्लोमा इन फिल्म, एनिमेशन, कॅमेरा आणि लाईटींग, डिप्लोमा इन फिल्म मेकींग आणि व्हिडिओ प्रॉडक्शन यातही प्रयत्न करू शकता. हे सर्व कोर्सेस तुम्हाला 6 महिने ते 2 वर्षे कालावधीत पूर्ण करता येतात.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून

LetsUp । Update

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे.

🎯 अधिवेशनाची रूपरेखा : या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प 18 जून रोजी मांडला जाणार आहे. यानंतर 21 व 24 जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. तर राज्यपालांचे अभिभाषण चर्चा 19 व 20 जून रोजी होईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे नियोजन ठरवण्यात आले आहे.

💁‍♂ हे अधिवेशन तीन आठवडे चालणार असून, या अधिवेशनात कामकाजाचे केवळ 12 दिवस असणार आहेत.

📍 मंत्रिमंडळ विस्तार शक्यता! : पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 5 ते 10 जून दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ ममता बॅनर्जींच्या पक्षातील आमदारांचा भाजपात प्रवेश

राज्यातील धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक
'बंटी और बबली' सिनेमाचा सिक्वेल येणार

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani28may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर भाजपमध्ये मंत्रिमंडळाबाबत हालचाली सुरु, यंदा 20 टक्के बदल करण्यात येणार

● एल्डोरॅडो या वेबसाईटनुसार चंद्रपूर जगातील सर्वाधिक हॉट शहर, मंगळवारी चंद्रपूरचे तापमान 47.8 अंश

● राजीव गांधी विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून 11.1 किलो सोने तर दीड कोटींचे विदेशी चलनही जप्त

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात पुन्हा कृत्रिम पावसाचा प्रयोग; राज्य सरकारचा निर्णय

● विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना विद्युत शुल्कात माफीची सवलत 2024 पर्यंत लागू, राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

● विधानसभा एकत्र लढण्याबाबत विरोधी पक्षांशी चर्चा; वंचित आघाडी, मनसेबाबत वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका

● मुंबईतील डॉक्टर पायल तडवी रॅगिंग आणि आत्महत्येप्रकरणी तीन आरोपींपैकी एका महिला डॉक्टरला अटक

● ओप्पो कंपनीने रेनो आणि रेनो 10 एक्स झूम हे उच्च श्रेणीतील मॉडेल्स भारतीय ग्राहकांना केले सादर

● सराव सामन्यात भारताची बांगलादेशवर 95 धावांनी मात, राहुल आणि धोनी हे विजयाचे शिल्पकार ठरले

● 'करीना कपूर'चे छोट्या पडद्यावर पदार्पण; Dance India Dance शो जज करण्यासाठी घेतले तब्बल 80 कोटी मानधन

● अहमदनगर - शहराच्या 529 व्या स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पण

● अहमदनगर - नगरची शुभांगी राजू भंडारे चक्क भारतीय फुटबॉल संघात, वंचित फुटबॉल स्पर्धेत खेळणार

● अहमदनगर - लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील जिल्हा परिषदांना कर्मचारी बदली प्रक्रिया राबवता आली नाही. त्यामुळे ‘झेडपी’ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 7 जूनपर्यंत मुदतवाढ

● अहमदनगर - पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना जिल्‍ह्यात 2019-20 या वर्षात राबवण्‍यात येणार

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 दुसऱ्या सराव सामन्यात भारताची बांगलादेशवर मात

LetsUp | Sports

कार्डीफच्या मैदानावर दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 95 धावांनी मात केली

💁‍♂ प्रथम फलंदाजी करताना महेंद्रसिंह धोनी (113) आणि लोकेश राहुल (108) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 359 धावांपर्यंत मजल मारली

🧐 प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा डाव 264 धावांवर आटोपला, त्यांच्याकडून मुशफिकुर रहीम (90) आणि लिटन दास (73) यांनी झुंज दिली

👉 भारताकडून गोलंदाजीत युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराह यांनी 2 बळी घेत आश्वासक मारा केला

भारताचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 जून रोजी द रॉझ बाउल, साउथम्पटन येथे रंगणार आहे

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

1) अफवांवर माधुरीचा खुलासा:

गेल्या काही दिवसांपासून ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार असल्याच्या चर्चा होत्या. आता खुद्द माधुरीने या सर्व अफवा असल्याचा खुलासा केला आहे.

माधुरी म्हणाली, “माझ्या जीवनावर आधारित कोणत्याही बायोपिकच निर्मिती करण्यात येणार नाही. या अफवा कुठून पसरल्या हे मला माहित नाहीय. परंतु माझ्या जीवनावर आधारित बायोपिक व्हावा अशी माझी इच्छा नाही. मला आयुष्यात अजून खूप काही करायचे आहे”.

2) ‘खामोशी’साठी श्रृती गाणार :

अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि प्रभूदेवा यांचा हॉरर थ्रिलर असलेला ‘खामोशी’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. माहितीनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्री श्रृती हसन एक गाणे गाणार आहे.

श्रृतीने ‘खामोशी’ चित्रपटातील गाण्याविषयी आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, प्रभूदेवा यांच्या चित्रपटासाठी आता मला गायनाची संधी मिळत असल्याने मी फार आनंदी आहे. ‘खामोशी’ चित्रपटाच्या थीमवरच आधारित हे गाणे राहणार आहे.

अभिनयाव्यतीरिक्त गायनातही श्रृती हसन ही अग्रेसर आहे. 1997 साली आलेल्या ‘चाची-420’ या चित्रपटापासूनच तिच्या गायनाची सुरुवात झाली. बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांसाठी श्रृतीने गाणे गायले आहे.

3) ‘काफिर’चा ट्रेलर प्रदर्शित :

झी 5 वरील ‘काफिर’ या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला चांगला प्रतिसाद आहे. ‘काफिर’मधून अभिनेत्री दिया मिर्झा वेबसीरिज विश्वात पदार्पण करत आहे.

यामध्ये मोहित रैना सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. एका दहशतवादी आरोपीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार-वकिलाचा प्रवास या सीरिजमध्ये दिसतो आहे. ही सीरिज 15 जूनला प्रक्षेपित होणार आहे.

👀 ट्रेलर पहा : https://ltsup.in/2HJd1v8

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup