LetsUpp Marathi
5.3K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂ उन्हाळ्यात या ठिकाणांवर एन्जॉय करा सुट्टीचे दिवस

Letsup । Travel

🎯 उन्हाळ्याच्या सुट्टीचे आता फक्त काही दिवसच राहिले आहेत. तुम्हाला हिल स्टेशनवर जाऊन ही सुट्टी घालवायची असेल तर रिलॅक्स होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला 5 बेस्ट डेस्टिनेशन सांगणार आहोत.

हाफलोंग - हाफलोंग हे आसाममधलं अत्यंत नयनरम्य हिल स्टेशन आहे. दक्षिण आसाममध्ये असलेलं हे थंड हवेचं ठिकाण सिलचर शहराच्या अगदी जवळ आहे. या हिल स्टेशनला भेट देणाऱ्यांसाठी याठिकाणी ट्रॅकिंग आणि पॅराग्लायडिंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. इथल्या नद्या, सुंदर तलाव आणि परवतरांगा मन मोहून घेतात.

खिर्सू - त्रासदायक उन्हापासून काही दिवस सुटका करून घ्यायची असेल तर उत्तराखंडातलं खिर्सू हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणाला फार काही प्रसिद्धी मिळाली नसली तरी मन शांत आणि प्रसन्न करण्यासाठी थंड हवेचं हे ठिकाण बेस्ट आहे. इथलं निसर्ग सौदर्य मन मोहून घेतं.

मसिनागुडी - पक्षी आणि प्राणी प्रेमिंसाठी आणि फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी तामिळनाडूतलं मसिनागुडी हे ठिकाण अगदी उत्तम आहे. पक्षांप्रमाणेच याठिकाणी तुम्हाला वाघ, हत्तींसह सांबर आणि हरणांचे कळप पाहायला मिळतील. उन्हामुळे त्रासलेल्यांसाठी हे ठिकाण सुद्धा बेस्ट आहे.

कलिम्पोग - रखरखत्या उन्हाळ्यात जर तुम्हाला अल्हाददायी वातावरणात फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर पश्चिम बंगालमधल्या कलिम्पोग या गावाला तुम्ही भेट द्याला हवी. काळेभोर रस्ते आणि त्या दुतर्फा पसरलेले चाहाचे मळे, दोन नद्यांचा संगम आणि इथल्या एतिहासीक वास्तू पाहण्यासारख्या आहेत.

चिटकुल - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिह्यातंल हे थंड हवेचं ठिकाण फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. याठिकाणी तुम्हाला लियुग मंदिर, अल्पाइनचं घनदाट जंगल, बस्पा नदी अशा अनेक गोष्टींचा तुम्हाला आनंद घेता येईल. वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हे डेस्टिनेशन अगदी बेस्ट आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📱 महिलांची छेडछाड रोखण्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित

LetsUp । International

अ‍ॅपच्या मदतीने महिला छेडछाडीच्या घटनांना बसणार रोख

💁‍♂ महिलांसोबतची छेडछाड रोखण्यासाठी टोकियो पोलिसांनी अँटी ग्रॉपिंग अ‍ॅपची निर्मिती केली आहे. जपानच्या महिलांची या अ‍ॅपला चांगलीच पसंती मिळत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान महिला अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी विकसित केले अ‍ॅप.

🧐 महिला छेडछाड झाल्यावर डिजी पोलिस अ‍ॅपची मदत घेऊ शकतात, या अ‍ॅपद्वारे ‘स्टॉप इट’ असा संदेश दिसतो. या संदेशात लिहलेले असते की, येथे एक छेडछाड करणारा आहे, कृपया मदत करा. पीडिता जवळपास असलेल्या लोकांचीही या संदेशाद्वारे मदत घेऊ शकते.

📍 पीडीत महिला मदत मागण्यासाठी घाबरतात. पण, एसओएस संदेश मोडचा उपयोग करून इतर प्रवाशांना न सांगतासुद्धा छेडछाड करण्याऱ्या व्यक्तीबद्दल माहिती देऊ शकतात.

💫 दर महिन्याला जवळपास 10 हजार महिला युझर्स हे अ‍ॅप डाउनलोड करत आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💣 पाचशे किलो वजनाच्या बॉम्बची यशस्वी चाचणी

LetsUp । National

स्वदेशी बनावटीचा हा गाईडेड बॉम्ब डीआरडीओने विकसित केला आहे.

💁‍♂ भारताच्या संरक्षण संशोधन विकास संस्थेने 500 किलो वजनाच्या इनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी केली. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण रेंजवर ही चाचणी करण्यात आली.

🎯 वायू सेनेच्या लढाऊ क्षमतेत वाढ : 2.5 टन एवढ्या वजनाचा हा बॉम्ब 300 किमी उंचीवरून हवेतून जमिनीकडे मारा करण्यासाठी उपयुक्त आहे. या बॉम्बमुळे भारतीय वायू सेनेच्या लढाऊ क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होईल.

🗣 बॉम्बद्वारे करण्यात आलेला मारा हा अचूक आणि सुस्पष्टपणे घेण्यात आला असल्याने, चाचणी यशस्वी झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

🚀 वेग क्षमता : हा बॉम्ब ध्वनीपेक्षा किमान तिप्पट म्हणजे 2.8 मॅक वेगाने मारा करू शकते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला

निवडणुकीच्या काळात साडेचार लाख लिटर दारू जप्त
नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani25

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक

● ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीत सोपविला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

● एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी, पंतप्रधानपदासाठी ३५३ खासदारांचा मोदींना पाठिंबा

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● अफगाणिस्तानातील सुमारे सहा लाख मुले कुपोषणामुळे मृत्यूच्या वाटेवर

● कामाठीपुरा येथून 100 पेक्षा अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांची मुंबई पोलिसांकडून सुटका

● पत्रकार मारहाण प्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

● सुरत आग दुर्घटना प्रकरणी क्लास चालकाला पोलिसांनी केली अटक

● काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत विचार नाही, नारायण राणेंनी दिले स्पष्टीकरण

● भारतीय टीम विश्वचषकात 'मेन इन ब्लू' ऐवजी भगव्या रंगात दिसण्याची शक्यता

● बहुचर्चित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाकडं प्रेक्षकांनी फिरवली पाठ

● अहमदनगर : शहराच्या ५२९ व्या स्थापना दिनानिमित्त रसिक ग्रुपच्या वतीने गझल मैफलचे आयोजन

● अहमदनगर : साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य पथकाची नियंत्रण पथके झाली सज्ज

● अहमदनगर: भाजपचा प्रचार केल्याचा राग धरून एकास मारहाण, पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल.

● अहमदनगर : खैरी प्रकल्पातून अवैध वाळू उपसा करणा-या पंधरा वाळूतस्करांवर कारवाई, 43 लाखाचा मुद्देमाल जप्त


🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🏏 न्यूझीलंडकडून भारताचा दारुण पराभव

LetsUp । Sports

वर्ल्डकप आधीच पहिल्याच सराव सामन्यात भारताच्या पदरी पराभव.

💁‍♂ ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकून फलंदाजी करत न्यूझीलंडपुढे विजयासाठी 180 धावांचे माफक लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडने हे लक्ष्य केवळ 37.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सनने 67 तर रॉस टेलरने 71 धावांची खेळी केली.

📍 वर्ल्डकप सुरु होण्याआधीच भारताला पराभवाचा धक्का बसला.

😒 निराशाजनक कामगिरी: सलामीवीर रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात दोन धावा करून माघारी परतला. त्यानंतर शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली देखील बाद झाले, आणि 10.3 षटकांत भारताची 4 बाद 34 अशी दयनीय अवस्था झाली.

🎾 भेदक गोलंदाजी : वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघ 'क्लीन बोल्ड' झाला. बोल्टने चार गडी टिपत भारताची पहिली फळी भेदून काढली.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
साप्ताहिक राशीभविष्य; 26 मे ते 01 जून 2019

LetsUp | Astrology

मेष - विद्यार्थी वर्गास अतिशय चांगला आठवडा आहे. अगदी थोडे का होईना, घरात सोन्याची खरेदी करून ठेवा. त्या वेळी पीत वस्त्र धारण करा. सोने तिजोरीत ठेवा. लक्ष्मीचा वास राहील. पोटाच्या विकारांपासून सावध राहा.

वृषभ - घरातील तुळशीला रोज पाणी घालण्याचा नेम ठेवा. मनोकामना पूर्ण होतील. हिरवा रंग परिधान करा. कुटुंबातील वादविवाद तुमच्या मध्यस्थीने मिटतील. वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल. दानधर्म करा. मुलाची शिक्षणात प्रगती होईल.

मिथुन - स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. मेहनतीत कसूर नको. अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार होईल. खरेदी करताना सावधानता बाळगा. जोडीदाराचा सल्ला अवश्य विचारात घ्या. नवीन वास्तू अत्यंत फलदायी ठरेल. जांभळा रंग जवळ बाळगा.

कर्क - एखादी लहानशी शस्त्रक्रिया होईल. त्यानंतर प्रकृतीच्या काही तक्रारी राहणार नाहीत. भागीदारीत पैसे गुंतवा. कायदेविषयक कामे यशस्वी होतील. देवघरात लक्ष्मीची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे प्रस्थापित करा. रोज पूजा करा. लाल रंग महत्त्वाचा.

सिंह - कामाच्या बाबतीत या आठवडय़ात तुमचा कस लागणार आहे. अत्यंत संयम बाळगण्याची जरूर आहे. कोणत्याही वादात सापडू नका. घरातील लहानांचे हट्ट पुरवा. त्यांच्यासाठी वेळ काढा. भगवा रंग परिधान करा. घरातील वातावरण तुम्हाला पाठिंबा देणारे असेल.

कन्या - पांढरा रंग फलदायी. दररोज घरातील शिवलिंगाला पांढरे फुल वाहा. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. वरिष्ठांची मर्जी लाभेल. त्यांना दुखवू नका. बढतीचे योग आहेत. कर्तव्यात कसूर नको. वातावरण चांगले आणि अर्थपूर्ण राहील.

तूळ - भावंडांना तुमच्याकडून मोलाची मदत मिळेल. कौटुंबिक सहलीचे आयोजन होईल. गणेशाची उपासना सुरू ठेवा. पतीला कामात यश मिळेल. निळा रंग महत्त्वाचा ठरेल. व्यवसायात एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल.

वृश्चिक - निळा रंग महत्त्वाचा आहे. व्यवसाय, उद्योगात यश मिळेल. स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल ग्रहमान. नवीन नाते निर्माण होईल. विठोबा-रखुमाईचे दर्शन घ्या. घरात तुळशीचे रोप स्वहस्ते लावा.

धनू - हाती आलेली संधी दवडू नका. केशरी रंग जवळ बाळगा. घराबाहेर पडताना नेहमी उजवे पाऊल आधी घराबाहेर ठेवा. ज्या कामासाठी जाल त्यात यश मिळेल. कार्यालयीन वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

मकर - किमती वस्तूंची खरेदी होईल. पिवळा रंग जवळ बाळगा. नेकी कर दर्या मे दाल हे तत्त्व ठेवा. तरुणांना प्रेमात यश मिळेल. हवाबदलाचा त्रास संभवतो. घरातील लहानांची प्रगती होईल. त्यामुळे मन आनंदी राहील. स्थावर लाभ होतील.

कुंभ - आर्थिक लाभ भरपूर होतील. पण मदत करताना पैसे खूप खर्च होतील. प्रसिद्धी आणि यश दोन्ही गोष्टी प्रसन्न आहेत. आपले हितशत्रू ओळखा. घरात विवाह योग आहेत. लाल रंग जवळ बाळगा. संत सज्जनांची उपासना करा.

मीन - कलावंतांना आठवडा फार चांगला जाईल. हातून उत्तम कला निर्मिती होईल. गोड पदार्थ टाळा. स्वकीयांसोबत वेळ चांगला जाईल. बाळकृष्णाला तुळस वाहा. स्वतःही तुलसीचे सेवन करा. राखाडी रंग जवळ बाळगा. आर्थिक व्यवहारात यश मिळेल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😋 चविष्ट गाजरचा हलवा

LetsUp । Recipe

🍽 साहित्य:1 किलो गाजर, 1 लीटर दूध, 1 चमचा इलायची, अर्धा कप पाणी, 3 चमचे तुप, 2 चमचे किशमिश, 2 चमचे बदाम, 2 चमचे पिस्ता, 450 ग्रॅम साखर

💁‍♀ कृती : सुरूवातीला गाजर धुवुन त्याचा किस बनवुन घ्या. किशमीश पाण्यात अर्धा तास भिजवुन ठेवा. सगळया सुक्यामेव्याला बारीक कापुन घ्या. पातेल्यात पाणी टाका व पाणी उकळल्यावर त्यात गाजराचा किस टाका, आता 10 ते 15 मिनिट शिजु दया. आता त्यात दुध टाका व 1 तासापर्यंत मंद आचेवर शिजु दया.

शिजल्यानंतर त्यात साखर टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडया वेळानंतर तुप टाका बारीक केलेली इलायची पुड त्यात वरतुन भुरका, किसमीस टाका आणि चांगल्या त-हेने सर्व जिन्नस एकत्र करा. त्यात बदाम पिस्ता टाकुन गरम गरम सर्व्ह करा.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🏆 यंदाच्या वर्ल्डकप बाबत काही खास गोष्टी

LetsUp । Sports

यंदाचा वर्ल्डकप ठरणार इतिहासातील सर्वात महागडा वर्ल्डकप

🏏 30 मे पासून वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. यामध्ये भारत- पाक सामन्यांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते. याच्या माध्यमातून आयाेजकांना काेट्यावधी रुपयांचा महसुल मिळतो. यासाठी आयसीसी देखील भारत आणि पाक या सामन्यानुसार विश्वचषकातील वेळापत्रकाचे नियाेजन करते. या सामन्यात सर्वाधिक जाहीराती असतात.

🎯 काही विशेष :
यंदा भारत-पाक सामना रविवार हाेणार
या सामन्यादरम्यान जवळपास 100 काेटींचा महसुल जमा हाेताे.
10 सेकंदाचा जाहिरात दर 25 लाख व एचडीला 18 लाख आहे.
पहिल्यांदा सिनेप्लेक्स आणि क्रुजवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण

💰 वर्ल्डकप खर्च : भारतात 2011 ला वर्ल्डकपच्या आयाेजनासाठी आयसीसीने 834 काेटी रुपये दिले हाेते. तर 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मंडळाला 1250 काेटी व यंदा इंग्लंडला 1390 काेटी रुपये मिळणार आहे. ईसीबीला तिकीट विक्रीमधून 353 काेटींच्या महसुलाची यंदा आशा आहे.

📺 येथे पाहू शकता सामने : भारतामध्ये ऑयनॉक्स, युएइमध्ये नाेवाे आणि रिल, बहरीनमध्ये नाेवावर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहेत.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 भारताशी शांतता चर्चेसाठी पाकिस्तान तयार

LetsUp । National

शांतता व समृद्धीबाबत चर्चेसाठी पाकिस्तानकडून सकारात्मक हालचाली सुरू

🎯 भारत - पाक यांच्यामधील प्रलंबित मुद्द्यांवर चर्चेसाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. शनिवारी मुल्तान येथे आयोजित इफ्तार पार्टीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी ही भूमिका मांडली.

💁‍♂ काय म्हणाले इम्रान खान : भारतातील लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय झाल्यास दोन्ही देशांदरम्यान शांततेसाठी तसेच काश्मीर मुद्द्यावर चर्चेसाठी चांगली संधी निर्माण होऊ शकते, असे वक्तव्य पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते.

📍 तणावपूर्ण संबंध : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले होते. नवे मोदी सरकार भारत-पाक संबंधांची दिशा ठरवणार आहे. याच कारणामुळे पाकिस्तानने चर्चेला प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

💁‍♂ 30 मे रोजी होणार नरेंद्र मोदींचा शपथविधी

निवडणुकीतील पराभवामुळे लालू प्रसाद यादव यांचा अन्नत्याग
पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर अंधाधुंद गोळीबार

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा:👉 https://audioboom.com/posts/7271600-letsup-wani-26-may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद येथे जात घेतले मातोश्रींचे आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत राज्यात 4 लाख 88 हजार 766 मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती

मुकेश अंबानींने बद्रीनाथ व केदारनाथाच्या चरणी प्रत्येकी एक-एक कोटी रूपयांचे दान केले अर्पण

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

गोरक्षणाच्या नावाखाली निरपराधांना होणारी मारहाण व हत्या रोखाव्या, एमआयएमचे खासदार ओवैसींची
मागणी

आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांची तिकिटे संपली

ड्युटीवरून परतणाऱ्या महिला पोलिसाचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग

राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या टप्प्यास आजपासून सुरुवात

सॅमसंग गॅलक्सी ए 50 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल दीड हजार रुपयांची सूट

भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पत्नी, मुलांना इंग्लंडला बोलवा, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा अजब फतवा

पागलपंती सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता जॉन अब्राहम झाला जखमी

पुणे: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना एक जूनपर्यंत सीबीआय कोठडी

पुणे : पेपर संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्याची मुदत पाळण्यात पुणे विद्यापीठ अपयशी

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😱 अबब! निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

LetsUp । Politics

17 व्या लोकसभा निवडणुकीतील बहुतांश खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

💁‍♂ यंदाच्या लोकसभेतील 542 सदस्यांपैकी तब्बल 233 सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. निवडणूक लढताना उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.

📌 केरळच्या इडुक्की मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेसचे डेन कुरिअकोसे यांच्याविरोधात तब्बल 204 गुन्हे दाखल आहे.

🧐 पक्ष निहाय संख्या :

भाजप : 116
संयुक्त जनता दल : 10
काँग्रेस : 29
द्रमुक : 11
तृणमूल : 9

👉 गुन्हेगारीचा टक्का वाढला : गेल्या 2009 आणि 2014 च्या लोकसभांच्या तुलनेत यंदा 2019 मध्ये गुन्हेगारी सदस्यांचे प्रमाण 44 टक्क्यांनी वाढले आहे.

📍 गंभीर गुन्हे दाखल : जवळपास 159 सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांविरोधात गुन्ह्यांचा समावेश आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
देशातील 25 राज्यांना महिना 1 कोटी दंड

LetsUp । Update

प्लास्टिक कचरा कृती योजना सादर न केल्याने कारवाई

💁‍♂ देशातील पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचरा कृती योजना 30 एप्रिलपर्यंत सादर न केल्याने त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळास दरमहा 1 कोटी रूपये भरपाई द्यावी लागणार आहे. हरित लवादाच्या आदेशाचे पालन झाले नाही, तर 1 मे 2019 पासून हा दंड आकारण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

🧐 तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अतिरिक्त संचालक एस.के. निगम यांनी सांगितले, की राज्यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे पालन केलेले नसून यात केवळ दंडच नव्हे तर तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.

📍 प्लास्टिक कचरा : महाराष्ट्रासह 22 राज्यांत प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती, पण ठोस नियंत्रणाअभावी या बंदीचे पालन योग्य प्रकारे झाले नाही. त्यामुळे प्लास्टिकचा साठा करणे, ते विकणे असे प्रकार शहरांमध्ये सुरू झाले आहेत.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ बिग बॉसच्या घरात या सेलिब्रेटींची एन्ट्री

LetsUp । Special

मराठी ‘बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनची धुमधडाक्यात सुरुवात.

🎯 ‘कलर्स’ मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सीजनमध्ये कोणते सदस्य असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर रविवारी रात्री पार पडलेल्या ग्रॅण्ड प्रीमियरमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी या सस्पेन्सवरून पडदा हटवला.

🎭 बिग बॉस 2 च्या घरातील सेलिब्रेटींची नावे : अभिजित केळकर, दिगंबर नाईक, किशोरी शहाणे, माधक देवचक्के, मैथिली जावकर, नेहा शितोळे, शेफ पराग कान्हेरे, रूपाली भोसले, शिक ठाकरे, शिकानी सुर्वे, सुरेखा पुणेकर, वैशाली माडे, वीणा जगताप, विद्याधर जोशी, अभिजित बिचुकले.

🏠 …असे आहे ‘बिग बॉस’चे घर :

‘बिग बॉस’चे घर उमंग कुमार यांनी डिझाईन केले आहे.
गोरेगावच्या फिल्मसिटीत 14 हजार चौरस फूट जागेमध्ये हे घर उभारण्यात आले.
या घराला मराठमोळय़ा वाडय़ाचे स्वरूप दिले आहे.
घरामध्ये तुळशी वृंदावन, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, स्मोकिंग झोन, जेल देखील आहे.

😍 येत्या 100 दिवस बिग बॉसच्या घरात काय काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🏆 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच लागू होणार हे नियम

LetsUp । Sports

आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे सात नवे नियम लागू केले आहेत.

🎯 आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2015 पासून नवे सात नियम लागू केले आहेत. हे सारे नियम वनडे क्रिकेटमध्ये लागू करण्यात आले आहेत. मात्र वर्ल्डकपमध्ये हे नियम पहिल्यांदाचा लागू केले जाणार आहेत.

🧐 जाणून घ्या सात नियम :

आऊट : हेल्मेटला चेंडू लागून झेल घेतल्यास फलंदाज बाद ठरणार आहे. मात्र, हँडल द बॉल च्या परिस्थितीत फलंदाजाला बाद दिले जाणार नाही.

बॉल बाउन्स - दोनवेळा बाउन्स टाकल्यास तो नो बॉल दिला जाणार आहे. याशिवाय फ्री हिटसुद्धा मिळणार आहे.

बॅटचा आकार निश्चित - फलंदाज आणि गोलंदाजांत समान लढत व्हावी यासाठी बॅटचा आकार निश्चित करण्यात आला आहे. यात बॅटची लांबी 108 मि.मी. जाडी 67 मिमीपेक्षा जास्त नसेल. पंचांना शंका आली तर ते बॅटची लांबी, रुंदी मोजू शकतात.

रनआउट - स्टम्पिंगवेळी बॅट रेषेवर असताना नॉटआउट दिलं जात होतं, मात्र यापुढे बॅट रेषेवर असली तरी बाद दिलं जाणार आहे. जर फलंदाजाचा पाय किंवा बॅट क्रीजमध्ये आणि हवेत असले तरी फलंदाज नॉटआउट असेल.

नो बॉलच्या धावा वेगळ्या खात्यात - जर एखादा गोलंदाज नो बॉल फेकतो तेव्हा लेग बायच्या धावा या नोबॉल म्हणून मोजल्या जात होत्या. यापुढे त्या नोबॉलच्या खात्यात न लिहता वेगळ्या लिहल्या जातील.

गैरवर्तन - एखाद्या खेळाडूचे वर्तन चुकीचे वाटल्यास पंचांना त्या खेळाडूला मैदानातून बाहेर घालवण्याचे अधिकार पंचांना देण्यात आले आहेत.

रिव्ह्यू - फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणारा संघ या दोघांपैकी कोणी डीआरएस घेतला आणि अंपायर्स कॉलमुळे जर पंचांचा निर्णय अंतिम राहिला तर संघाचा रिव्ह्यू वाया जाणार नाही.

📍 वादग्रस्त रनआउट, खेळाडूंची पंचांशी हुज्जत यासारख्या प्रकारांवर आयसीसीने केलेल्या नियमांची अंमलबजावणी या वर्ल्ड कपमध्ये केली जाणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🍵 उत्तम आरोग्यासाठी ग्रीन कॉफी फायदेशीर

LetsUp | Health

🎯 बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल तब्येत खराब होण्याचं प्रमाण वाढत आहे. अशात अनेक जण या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. सतत वाढणारं वजन, थकवा जाणवणे, या समस्या जाणवत असल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा.

💁‍♂ ग्रीन कॉफीचे फायदे खालीलप्रमाणे :

ग्रीन कॉफीमध्ये असणारे मिनरल्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडेंट्स शरीरातील शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

जर कोणाला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल आणि ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात केली, तर शरीराला नुकसान होण्याचा धोकाही कमी होतो.

ग्रीन कॉफीमध्ये क्रोनॉलोजीकल अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे रोज ग्रीन कॉफी पिण्याने शरीरातील उर्जा टिकून राहते आणि थकवा जाणवत नाही.

मिनरल्स आणि विटॅमिन भरपूर असलेली ग्रीन कॉफी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. ग्रीन कॉफीमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

ग्रीन कॉफीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही बचाव करण्यास मदत होते.

दररोज एक कप ग्रीन कॉफी पिण्याने शरीरात ट्यूमर तयार होण्याची शक्यता कमी होते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

LetsUp । Update

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी निकालाची तारीख झाली जाहीर

🎯 फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवार (दि. 28 मे) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.

📍 यंदा नऊ विभागातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

💁‍♂ या ठिकाणी निकाल पाहू शकता :

1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) www.maharashtraeducation.com

📱 एसएमएसद्वारे मिळवा निकाल : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.

निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत.
गुणपडताळणी 29 मे ते 7 जून या कालावधीत करता येणार आहे.
उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून पर्यंत अर्ज करता येईल.
पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 ऑटोमोबाईलमध्ये कुठं काय?

LetsUp । Auto

क्रॉसओव्हर मायक्रो एसयूवी - यावर्षी लाँच होणारी मारूती सुझुकीची नवीन कार मायक्रो कार 2018 मध्ये सुरू झालेल्या फ्यूचर एस संकल्पनेवर आधारीत आहे. ही नवीन कार सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीच्या आसपास बाजारात आणली जाईल. ही कार फक्त पेट्रोल इंजिनावर असणार आहे.

सात आसनी वॅगनआर - मारुती सुझुकीची यावर्षी लाँच होणारी दुसरी कार 'वॅगनआर' ही सात आसनी असणार आहे. मारुतीचे प्रीमियम आउटलेट नेक्साकडून या कारची विक्री होऊ शकते. या सात आसनी कारमध्ये 5+2 अशी सीटिंग लेआउट आहे. सात आसनी वॅगनआरमध्ये 1.2 लिटर चे सीरिज इंजिन असू शकते.

विटारा ब्रेझा - विटारा ब्रेजा ही कार लाँच होणार आहे. पेट्रोल इंजिनवर आधारीत ब्रेझा कारची बऱ्याच काळापासून प्रतिक्षा आहे. 1.5 लिटर के-सीरिज पेट्रोल इंजिन असेल. ज्यामुळे 104 बीएचपी ऊर्जा आणि 138 एनएम पीक टॉर्क निर्माण होईल. हे इंजिन सुझुकीच्या हायब्रिड सिस्टीमसह येणार आहे. ज्यामुळे ही कार चांगले मायलेज देईल.

अर्टिगा स्पोर्ट - मारुती सुझुकीची यावर्षी लोकप्रिय असलेली आर्टिगाची आता लक्झरी व्हर्जन येणार आहे. ही कार आर्टिगा स्पोर्ट या नावाने लाँच केली जाईल. ही कार सहा आसनी एमपीव्ही असून ही कार 2+2+2 या सीटिंग लेआउटसह येणार आहे. हे टॉप मॉडेल असणार आहे. कंपनी या कारची विक्री प्रीमियम आउटलेट नेक्समधून करणार आहे.

😍 कार इन्शुरन्सवर मिळवा 80 टक्क्यापर्यंत डिस्काउंट, अवघ्या 2 मिनिटांत 3 टप्य्यात मिळेल पॉलिसी, त्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.do/eSWT2