LetsUpp Marathi
5.3K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
LetsUp News Updates

● लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, सकाळी 8 वाजेपासून कल हाती येणार

● हवाई दलातील पहिली महिला फायटर पायलट लेफ्ट. भावना कांत युद्धासाठी सज्ज

● सुप्रीम कोर्टात पदोन्नतीसाठी केंद्राने हायकोर्टांतील चार मुख्य न्यायमूर्तींच्या नावांना दिली मंजुरी

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धार पुलवामा, श्रीलंका हल्ल्यांनंतर दृढ : सुषमा स्वराज

● एअर इंडिया देश-विदेशात उड्डाणांची संख्या वाढवणार, दुबईसाठी रोज 1 हजार आसने वाढतील

● राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र, उष्माघाताच्या दोन बळींची नोंद, 26 मेपर्यंत राहणार लाट

● Mercedes-Benz ची BS-VI ई-क्लास सेदान कार लाँच, किंमत 58.5 लाख ते 62.5 लाखादरम्यान

● यंदा वर्ल्डकप स्पर्धेचे भारतातील सात प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार

● अभिनेता विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी, त्याच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांकडून वाढ

● ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये अभिनेता शाहरुख खान झळकण्याची शक्यता, चर्चा सुरु

● अहमदनगर - नगर व शिर्डी मतदारसंघाची गुरुवारी दुपारी 3 पर्यंत ईव्हीम मोजणी पूर्ण होईल, आज सकाळी 8 वाजता सुरू होणार मतमोजणी : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

● अहमदनगर - ईव्हीम मोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार 5 व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करणार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींची माहिती

● अहमदनगर - महापालिकेसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठ्यात कपात करावी, पाटबंधारे विभागाने दिले आदेश

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ 'काऊंट डाऊन' सुरू; आज फैसला!

LetsUp | Election Update

आता उत्सुकता संपली, सतराव्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे.

----------------------
👉 पहिल्या फेरीतील कल असे :
नगर लोकसभा मतदारसंघ: भाजपचे सुजय विखे 11,800 मताने आघाडीवर
शिर्डी लोकसभा मतदारसंघ : शिवसेनेचे सदाशिव लोखंडे 23 हजार मतांनी आघाडीवर
----------------------

🧐 मतमोजणी कशी होणार?:

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल आणि नंतर मशिन्स उघडल्या जाणार आहेत..
व्हीव्हीपॅटची पडताळणी ही सर्वात शेवटी होणार असल्याने फक्त औपचारिक घोषणा उशीरा होईल. त्याआधीचे सर्व कल कळणार आहेत. दुपारपर्यंत सर्व कल हाती येण्याची शक्यता आहे.

👍 प्रशासन सज्ज:

राज्यातल्या 48 लोकसभा मतदार संघांच्या मतमोजणीसाठी 38 ठिकाणी मतमोजणी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत.
मतमोजणीसाठी सुमारे 1 लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

👨‍💻 पहा संकेतस्थळावर निकाल :
https://ceo.maharashtra.gov.in
https://results.eci.gov.in

वरील संकेतस्थळावर निकाल पाहण्यास मिळणार आहेत. त्याचबरोबर 1950 या टोल फ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात आला असून तिथेही 022-22040451 / 54 या क्रमांकावर माहिती मिळणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤔 लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?

LetsUp | Special

देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात...

सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात.

तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.

🎯 कमाल मर्यादा 550 : भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤔 महाराष्ट्रात कोण आघाडीवर?

LetsUp | Election Special

📍 अहमदनगर
• डॉ. सुजय विखे (भाजप) : 2,77,967
• संग्राम जगताप (राष्ट्रवादी) : 1,67,731

📍 शिर्डी
• सदाशिव लोखंडे (शिवसेना) : 2,41,625
• भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) : 1,68,409

----------------------
🎯 इतिहासाची पुनरावृत्ती होणार कि, नवा इतिहास घडणार, जाणून घ्या सर्व घडामोडींचे सर्वात जलद अपडेट आमच्या पेजवर : https://ltsup.in/2QgATZz
----------------------

📍 बारामती
• सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) : 3,71,564
• कांचन कुल (भाजप) : 2,98,334

📍 पुणे
• गिरीश बापट (भाजप) : 89,826
• मोहन जोशी (काँग्रेस) : 41,857

📍 औरंगाबाद
• इम्तियाज जलील : 93,840
• चंद्रकांत खैरे (शिवसेना) : 71,502

📍 बीड
• प्रीतम मुंडे (भाजप) : 2,03,180
• बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) : 1,48,886

📍 नागपूर :
• नितीन गडकरी (भाजप) : 58,830
• नाना पटोले (काँग्रेस) : 38,206

📍 सोलापूर
• डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) : 1,75,342
• सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) : 1,28,926

📍 जळगाव
• उन्मेष पाटील (भाजप) : 2,02,563
• गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) : 76,120

📍 जालना
• रावसाहेब दानवे (भाजप) : 1,29,568
• विलास औताडे (काँग्रेस) : 58,592

📍 माढा
• रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) : 1,86,052
• संजय शिंदे (राष्ट्रवादी) : 1,79,748

📍 सांगली
• संजयकाका पाटील (भाजप) : 1,20,489
• विशाल पाटील (स्वाभिमानी) : 81,008

📍 सातारा
• नरेंद्र पाटील (शिवसेना) : 1,27,747
• उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) : 1,62,191

📍 कोल्हापूर
• संजय मंडलिक (शिवसेना) : 2,17,319
• धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) : 1,29,319

📍 हातकणंगले
• धैर्यशील माने (शिवसेना) : 1,35,392
• राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) : 1,02,967

📍 नाशिक
• हेमंत गोडसे (शिवसेना) : 61,863
• समीर भुजबळ(राष्ट्रवादी) : 42,101

📍 पालघर
• राजेंद्र गावित (शिवसेना) : 2,82,885
• बळीराम जाधव (बविआ) : 2,45,285

📍 मुंबई उत्तर
• गोपाळ शेट्टी (भाजप) : 1,96,522
• उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) : 67,344

📍 मुंबई वायव्य
• गजानन कीर्तीकर (शिवसेना) : 1,06,916
• संजय निरूपम (काँग्रेस) : 57,412

📍 मुंबई ईशान्य
• मनोज कोटक (भाजप) : 3,15,084
• संजय दिना पाटील (राष्ट्रवादी) : 1,87,377

📍 मुंबई उत्तर-मध्य
• पूनम महाजन (भाजप) : 1,70,574
• प्रिया दत्त (काँग्रेस) : 95,712

📍 मुंबई दक्षिण-मध्य
• राहुल शेवाळे (शिवसेना) : 1,59,154
• एकनाथ गायकवाड (काँग्रेस) : 1,06,726

📍 मुंबई दक्षिण
• अरविंद सावंत (शिवसेना) : 1,49,348
• मिलिंद देवरा (काँग्रेस) : 1,03,870

📍 मावळ
• श्रीरंग बारणे (शिवसेना) : 4,61,126
• पार्थ पवार (राष्ट्रवादी) : 3,13,637

📍 शिरूर
• शिवाजीराव आढळराव (शिवसेना) : 2,61,998
• डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) : 2,82,460

👉 टीप : सदर आकडेवारी दुपारी 12 वाजेपर्यंतची आहे.

🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/D3pLLU
🎯 एनडीए पुन्हा 300 पार; 2014 पेक्षा मोठा विजय?

LetsUp | Election Update

लोकसभेच्या 543 पैकी 350 हुन अधिक जागांवर भाजपप्रणीत एनडीए आघाडीवर आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीवर एक नजर टाकुयात...

🧐 लोकसभा 2019 : आत्तापर्यंतची आकडेवारी :

NDA : 350
UPA : 93
अन्य : 99

👉 टीप : वरील आकडेवारी अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो.

----------------------
🎯 इतिहासाची पुनरावृत्ती होणार कि, नवा इतिहास घडणार, जाणून घ्या सर्व घडामोडींचे सर्वात जलद अपडेट आमच्या पेजवर : https://ltsup.in/2QgATZz
----------------------

📍 2014 च्या निवडणुकीत NDA ला 336 तर भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. UPA ला 59 आणि काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावे लागले.

💁‍♀ लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी :

• 2014 : 282 जागा
• 2009 : 116 जागा
• 2004 : 138 जागा
• 1999 : 182 जागा
• 1996 : 161 जागा

🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/D3pLLU
👀 पुण्यात काही अपेक्षित, काही अनपेक्षित!

LetsUp | Election Update

📍 पुणे
• गिरीश बापट : 3,29,365
• मोहन जोशी : 1,58,710

📍 शिरूर
• डॉ. अमोल कोल्हे : 6,34,108 (विजयी)
• शिवाजीराव आढळराव : 5,75,279

📍 बारामती
• सुप्रिया सुळे : 6,83,352 (विजयी)
• कांचन कुल : 5,28,329

📍 मावळ
• श्रीरंग बारणे : 7,13,701 (विजयी)
• पार्थ पवार : 4,97,352

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤔 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची कारणे काय?

LetsUp | Special

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला लोकांनी पसंती देत एनडीएला भरभरुन मतदान केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती देण्यामागे अनेक कारणे होती. त्यातील काहींवर नजर टाकुयात...

1) सगळ्या जागांवर मोदी : देशभरात एनडीएकडून सगळ्या जागांवर मोदींसाठीच मतदान मागण्यात आले. त्यामुळे भाजपला या प्रचाराचा फायदा झाला.

2) देशभक्ती मुद्दा : विरोधी पक्षाला न जुमानता भारतीय जनता पार्टीने प्रचाराच्या शेवटपर्यंत देशभक्ती हा मुद्दा आक्रमकपणे निवडणुकीच्या अजेंड्यावर ठेवला.

3) राष्ट्रीय सुरक्षा : दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यासाठी मोदी सरकारने आक्रमक पाऊले उचलली. हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.

4) भारताला पाठिंबा : भारताने जगाच्या प्रत्येक देशापर्यंत दहशतवाद हा मुद्दा प्रभावीपणे पोहचवला. त्यामुळे जागतिक स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला.

5) हिंदूत्त्व मुद्दा : वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदीर, तसेच केदारनाथ-बद्रीनाथ येथील दौरे, गंगाघाटावर पूजापाठ, आरती यासारख्या कार्यक्रमातून हा मुद्दा दिसून आला.

6) स्वच्छता अभियान : स्वच्छता अभियान, परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या योजना नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठेचा विषय केला. यामुळे या अभियानात अनेक महत्त्वाचे नेते, अभिनेते, सामान्य माणूसही जोडला गेला.

7) आयुष्यमान भारत योजना : आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 करोडपेक्षा अधिक लोक जोडले गेले आहेत. त्यांना पाच लाखांपर्यंत विमा मिळेल. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला.

8) उज्ज्वला योजना : मोदी सरकारची ही योजना ग्रामीण महिलांसाठी लाभदायक ठरल्याचा चांगला प्रचार झाला. 'मन की बात'मधून या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतही मोदींनी चर्चा केली.

9) महागाई व भ्रष्टाचार : भाजपच्या कार्यकाळात चलनवाढ नियंत्रणाखाली असल्याचा दावा करण्यात आला. त्याचबरोबर मागील सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात वापरला गेला.

10) विरोधकांची भ्रष्ट आघाडी : एकीकडे विरोधकांची भ्रष्ट आघाडी तर दुसरीकडे एकटे नरेंद्र मोदी अशी ही लढाई असल्याचा प्रचार मोदींनी केला.

11) सुशासन : नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रशासकीय विभाग शिस्तबद्धपद्धतीने काम करायला लागली. भ्रष्टाचार कमी झाला. यासारखे मुद्दे भाजपाकडून प्रचारात वापरण्यात आले.

12) आक्रमक प्रचार : लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून देशभरात भाजपकडून जवळपास 1000हून जास्त रोड शो, सभा घेण्यात आल्या. तसेच प्रत्येक प्रचारात आक्रमक प्रचार करण्यात आला.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ लोकसभा निवडणूक : तुमचा खासदार कोण?

LetsUp | Election

पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून सुप्रिया सुळे, मावळमधून श्रीरंग बारणे तसेच शिरूरमधून अमोल कोल्हे यांनी मारली बाजी. निकालाबाबत सविस्तर जाणून घेऊयात. *टीप* : आकडेवारीमध्ये किंचित बदल होऊ शकतो.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले

● चंद्राबाबू नायडू यांनी राज्यापालांकडे दिला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

● काँग्रेसला देशातील जवळपास 17 राज्यांमध्ये एकही जागा मिळत नसल्याचे चित्र समोर

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● आमची युती विधानसभा तसेच त्यापुढील निवडणुकांतही कायम राहील, मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही

● मुंबईत काँग्रेसला क्लीन स्वीप, सहाही जागा शिवसेना भाजपला राखण्यात मिळाले यश

● राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत

● लोकसभा निवडणुक निकाल : महाराष्ट्रातील 6 डॉक्टर लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट

● महाराष्ट्रात राज ठाकरेंचा फायदा उचलण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी, मनसेने केला आरोप

● यंदा वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ नवीन जर्सीत दिसणार, ही जर्सी नारंगी रंगाची असेल

● अभिनेत्री दिव्या खोसला कुमार 'सत्यमेव जयते 2' मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार

● अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवघ्या 5 हजार 394 मतदारांनी 'नोटा'चे बटण दाबण्यास दिली पसंती

● अहमदनगर - जिल्ह्यात इतिहास घडला, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन; विकासकामामुळे यशाचा दावा

● अहमदनगर - कर्जत-जामखेडमध्ये विखेंना कमी मताधिक्क्य, नगर शहर मतदारसंघात आमदार जगताप यांची पिछेहाट

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😱 देशातील 17 राज्य काँग्रेसमुक्त!

LetsUp | Politics

🎯 यंदा लोकसभा निवडणुकीत देशातील 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश काँग्रेसमुक्त, तर 6 राज्यांत काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली

🧐 या राज्यांमध्ये काँग्रेसला जागा नाही! : आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, मणिपूर, नागालँड, मिझोरम, दिल्ली, ओडिशा, सिक्किम, राजस्थान, चंदीगड, डागर आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप यांना एकही जागा मिळाली नाही.

👀 देशात दिग्गजांचा पराभव : शत्रुघ्न सिन्हा, राहुल गांधी (अमेठी), मल्लिकार्जुन खर्गे, शीला दीक्षित, मिलिंद देवरा, उर्मिला मातोंडकर, प्रत्याशी विजेंदर, मेहबूबा मुफ्ती, जया प्रदा, कन्हैया कुमार, अशोक चव्हाण, अनंत गीते आणि हंसराज अहिर.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसा ठार

LetsUp । Update

हिज्बुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसाचा लष्कराच्या कारवाईत खात्मा

💁‍♂ कुख्यात अतिरेकी झाकीर मुसा हा पुलवामामध्ये सुरक्षा फौजांच्या जाळ्यात अडकून ठार झाला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पुलवामामधल्या त्रालमध्ये वेढा घालून ही कारवाई केली.

🗣 दहशतवादी मुसा याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

🧐 कोण आहे झाकीर मुसा?: झाकिर मुसा याने चंदीगडमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडून झाकीर हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत भरती झाला. बुरहान वानीनंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा चेहरा म्हणून तो समोर आला होता.

📍 परिसरातून एके 47 आणि रॉकेट लॉन्चरही जप्त करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 Letsup I General Knowledge

1) इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?

उत्तर : जोको विडोडो

2) प्रतिष्ठित मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे प्रथम अरबी भाषेचे लेखक/लेखिका कोण आहेत?

उत्तर : जोखा अलहार्थी (ओमान)

3) जपानकडून ‘द ऑर्डर ऑफ द राईजिंग सन, गोल्ड अ‍ॅण्ड सिल्वर स्टार’ हा सन्मान कोणत्या भारतीयाला दिला गेला?

उत्तर : माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन

4) कोणत्या देशाने 'गोल्डन कार्ड' कायमस्वरूपी निवासी योजना सादर केली आहे?

उत्तर : संयुक्त अरब अमिरात (UAE)

5) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा MCA21 हा ई-प्रशासनासंबंधीचा उपक्रम आहे?

उत्तर : कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय

6) ‘UN वर्ल्ड इकनॉमिक सिचुएशन अ‍ॅण्ड प्रोस्पेक्ट्स अ‍ॅज ऑफ मिड-2019’ या अहवालानुसार वर्ष 2020 साठी भारतीय GDP वृद्धीदर किती असणार?

उत्तर : 7.1%

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎬 Movie Review : 'पीएम नरेंद्र मोदी'

LetsUp | Movie Review

🎯 दिग्दर्शक ओमंग कुमार यांचा बहुचर्चित सिनेमा 'पीएम नरेंद्र मोदी' आज रिलीज झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा बनविण्यात आला आहे.

🧐 सिनेमाची कथा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेला संघर्ष आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतो. घरची हलाखीची परिस्थिती, चहा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह, सिनेमात दाखविण्यात आला आहे. मोदी यांची देशभक्ती, लोकांना मदत करण्याची भावना, तसेच जीवनात वेगळेकाहीतरी करायचे हे ध्येय त्यांनी बाळगले. मोदी आपले सगळे जीवन समाज कार्यात वाहून देतात.

सिनेमात मोदी यांचा गुजरात मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ दाखविण्यात आलेला आहे. राजकीय शिखरावर चढताना आलेल्या अडचणी पार करत मोदींचा राजकीय प्रवास यामध्ये चित्रित करण्यात आला आहे. मोदींचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच माहीत आहे. या चित्रपटात देखील आपल्याला तोच पाहायला मिळतो. त्यामुळे काही नवीन पाहायला मिळेल अशी आशा असणाऱ्या लोकांचा नक्कीच अपेक्षाभंग होतो.

🎭 अभिनय : विवेक ऑबेरॉयने चांगले काम केले आहे. रतन टाटा (बोमन इराणी), अमित शहा (मनोज जोशी), नरेंद्र मोदी यांची आई (जरीना वहाब) वगळता सगळ्याच व्यक्तिरेखा मोजून केवळ ३-४ दृश्यांसाठी पाहायला मिळतात. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या व्यक्तिरेखांना खूपच कमी वाव मिळाला असला तरी या भूमिका लक्षात राहातात. पण सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग या व्यक्तिरेखा उभ्या करण्यात दिग्दर्शकाला अपयश आलेले आहे.

💁‍♂ सिनेमा पाहावा कि नाही? : मोदींच्या आयुष्यावरील सिनेमासाठी आणखी दमदार संहिता, दिग्दर्शन आणि कलाकारांची आवश्यकता होती, ही गोष्ट सिनेमा अखेर जाणवते. पण तरीही नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात आलेले चढ-उतार पाहायचे असतील तर हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही.

Ratings : 2.5/5

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे देणार राजीनामा

LetsUp । International

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी शुक्रवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली

💁‍♂ ब्रेक्झिटची कोंडी सोडण्यास असमर्थ ठरल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 7 जून रोजी मे या राजीनामा देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

----------------------
👍 इंस्टाग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा स्पेशल अपडेट :
फॉलो इंस्टाग्राम : https://instagram.com/Letsup.in
----------------------

📍 यानंतर नवीन पंतप्रधान निवडला जाईल आणि तोच आता ब्रेक्झिटबाबत पुढचा निर्णय घेईल, अशी माहिती मिळते आहे.

🗣 मी या देशाची दुसरी महिला पंतप्रधान होते, पण शेवटची नक्कीच नाही. देशाचं पंतप्रधानपद भूषवणं माझ्यासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे," असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून आश्रू आले.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 काळ व काळाचे प्रकार

LetsUp | Education

💁‍♂ वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.

🧐 काळाचे प्रमुख 3 प्रकार

वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ

👉 वर्तमानकाळ : क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.

📍 वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार :
साधा वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ
पूर्ण वर्तमान काळ
चालू पूर्ण वर्तमानकाळ

👉 भूतकाळ: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात.

📍 भूतकाळचे 4 उपप्रकार :
साधा भूतकाळ
अपूर्ण/चालू भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

👉 भविष्यकाळ : क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.

📍 भविष्यकाळाचे 4 उपप्रकार :
साधा भविष्यकाळ
अपूर्ण / चालू भविष्यकाळ
पूर्ण भविष्यकाळ
रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 ....या महिला संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार

LetsUp । Politics

महाराष्ट्रातील 48 विजयी उमेदवारांमध्ये केवळ 8 महिलांचा समावेश.

🎯 लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैंकी भाजपा 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, एआयएम 1 आणि अपक्ष 1 जागेवर विजय मिळवलाय. या 48 उमेदवारांमध्ये 8 महिला या संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना दिसतील.

💁‍♂ कोण आहेत या 8 महिला?

सुप्रिया सुळे,(राष्ट्रवादी काँग्रेस): बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या कांचन कूल यांना पराभूत केले.

पूनम महाजन,(भाजपा): उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला.

डॉ. प्रीतम मुंडे,(भाजपा) : बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपिनाथ मुंडे यांनी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना पराभवाची धूळ चारली.

डॉ. हिना गावित,(भाजपा) : नंदूरबारमधील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार ऍड. के सी पाडवी यांच्यावर 95 हजार मतांनी विजय मिळवला.

रक्षा खडसे, (भाजपा) : रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे यांनी काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांचा पराभव केला.

नवनीत कौर राणा,(अपक्ष) : अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.

भावना गवळी,(शिवसेना): यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना पुंडलिकराव गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना पराभूत केले.

भारती पवार,(भाजपा) : दिंडोरी मतदार संघातून भाजपाच्या डॉ. भारती प्रवीण पवार यांनी काँग्रेसच्या धनराज महाले यांना हरवले.

📍 भाजपानं राज्यात 7 महिलांना उमेदवारी दिली तसेच काँग्रेसनं 3, राष्ट्रवादीने 1, तर शिवसेनेन 1 महिलेलाच तिकीट दिलं होतं.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

🧐 ..या दिवशी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधान पदाची शपथ

रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या
ओप्पोचा नवा स्मार्टफोन ओप्पो के 3 लाँच

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani24may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू

● भारताच्या बनावट नोटा आढळल्या प्रकरणी काठमांडू विमानतळावर सहा जणांना अटक

● एव्हरेस्ट शिखर उतरताना 3 भारतीयांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून पराभवानंतर दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य

● रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार जणांच्या टोळीकडून 18 जणांना 70 लाखांचा गंडा

● सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या हस्ते शपथ

● साध्वी प्रज्ञा जिंकल्या तर समाधी घेण्याची घोषणा करणारे 'मिर्ची बाबा' झाले गायब

● माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नावाचे भव्य स्मारक बोरिवलीत उभारण्यात आले

● खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम व एल. सरिता देवी यांना सुवर्णपदक

● अभिनेता विवेक ऑबेरॉयने केले सलमान खानच्या 'भारत' सिनेमाचे प्रमोशन

● पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत '' नोटा ''चीही चलती : 11 हजार नोटाचा वापर

● पुणे : कर्मचारी असल्याचे सांगून रुग्णाचे दागिने लंपास, संचेती रुग्णालयातील धक्कादायक घटना

● पुणेः पाणी समजून डिझेल प्यायल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🏦 पेटीएम बनली भारतातील पहिली पेमेंट्स बँक

LetsUp । Special

पीपीबीएल ही भारतातील नफा कमावणारी पहिली पेमेंट्स बँक बनली.

💁‍♂ पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने आज आपल्या संचालनाला दोन वर्षे पूर्ण केली आहे. कंपनीने 2018-19 या आर्थिक वर्षात 19 कोटी रुपयांच्या नफा वृद्धीची नोंद केली आहे.

🎯 बँकेचे प्रमुख वैशिष्ट्ये

पीपीबीएल ही मोबाइल बँकिंग व्यवहारांत अग्रस्थानावर आहे.
साडेचार कोटींहून अधिक ग्राहकांना रुपे डेबिट कार्डचे वितरण
चालू खात्यासाठी शून्य बॅलन्सची सुविधा हे या पेमेंट बँकेचे प्रमुख वैशिष्ट्य

💰 एप्रिल 2019 मध्ये आमच्या बचत खात्यांमध्ये 500 कोटी रु पेक्षा जास्त ठेवी आहेत. यामुळे ठेवींच्या बाबतीत पेटीएम भारतातील सर्वात मोठी पेमेंट बँक ठरत आहोत.

🗣 पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार गुप्ता म्हणाले, “गेल्या वर्षापासून बँकेची कामगिरी उत्कृष्ट होत आहे. ग्राहकांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू

LetsUp | Update

राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने वित्त विभागाकडे पाठविला प्रस्ताव

🎯 राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रस्ताव राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने वित्त विभागाकडे पाठवला आहे. वित्त विभागाकडून मंजुरी मिळताच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.

राज्यात सन 2003 मध्ये पहिल्यांदा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात आला होता.

त्यानंतर 2015 मध्येही राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत.

💁‍♂ सुमारे 30 कोटी खर्च अपेक्षित : राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाला सादर केला आहे. या प्रयोगांसाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

📍 साधारण जुलै, ऑगस्टमध्ये राज्यातील दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले जातील.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup