LetsUpp Marathi
5.3K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
😇 सत्य स्वीकारलं कि, सामर्थ्य वाढायला लागतं!

LetsUp | Motivation

आयुष्यात जेव्हा अपयश येते तेव्हा एकटेपणा जाणवतोच. या काळात इतर व्यक्ती तुम्हाला मानसिक आधार देऊ शकतात, काही वेळा मदतही करतात. पण ती परिस्थिती, त्याचे परिणाम यांना तुम्हाला एकट्यानेच सामोरे जावे लागते.

उदा. परीक्षेची तयारी करण्यासाठी मित्रमैत्रिणी, पालक, शिक्षक मदत करायला तत्पर असतात. पण प्रत्यक्षात पेपरला सामोरे जाणे, प्रश्नांची योग्य उत्तर देणे हे तुम्हालाच करणे भाग आहे.

आयुष्याकडे तटस्थपणे पाहिलं तर या सत्याची अधिक तीव्रतेने जाणीव होते. खरंच तुम्ही आम्ही सगळेजण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकटे आहोत. पण बहुतांश व्यक्ती या एकटेपणाचा अर्थ `एकाकी’ असा लावतात. जे चुकीचे आहे.

एकाकीपण यातून नकळतच नकारात्मक भावनेचे सूर जन्माला येतात. इतर व्यक्ती तुमच्या आयुष्याचा भाग आहेत. पण आयुष्यातील घटनांना सामोरं मात्र एकट्यानेच जायचं असतं. हे सत्य स्वीकारायला काय हरकत आहे?

तुम्ही ही गोष्ट एकदा स्वीकारली की तुमचं मन प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भक्कम होतं. त्याचं सामर्थ्य वाढायला लागतं. निर्णय घेण्याचा, त्याची जबाबदारी स्वीकारण्याचा, त्यावर ठाम राहण्यासाठी आवश्यक असलेला करारीपणा येतो. शिवाय आत्मविश्वास निर्माण होतो, हे विसरू नका!

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजार उसळला

सैराट फेम रिंकू राजगुरूच्या नव्या सिनेमाचा टीझर रिलीज
हुआवे कंपनीला गुगलने दिला दणका

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/2QaWBOG

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यात मिळून सरासरी 67.11 टक्के मतदान, आतापर्यंतचे हे सर्वाधिक मतदान

● वेब अॅपना अन्य उपग्रह वाहिन्यांप्रमाणे परवान्याच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव ट्रायच्या विचाराधीन

● एक्झिट पोलचे शेअर बाजारात सकारात्मक पडसाद, गुंतवणूकदारांना 5.33 लाख कोटींचा फायदा

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● पीजी मेडिकल प्रवेश : राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केली स्वाक्षरी

● राज्यातील 146 ग्रामपंचायतींसाठी आणि सरपंचपदाच्या 62 रिक्त जागांसाठीही 23 जून रोजी मतदान

● विरोधी पक्षनेत्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेणार, महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांचा एकमताने ठराव मंजूर

● अमूलने दूधाच्या किंमतीत दोन रुपयांनी केली वाढ, आज मंगळवारपासून (21 मे) ही दरवाढ लागू होणार

●‘सुझुकी’ची Gixxer SF 250 भारतात लाँच, या बाइकची एक्स-शोरुम किंमत 1.71 लाख रुपये

● आंद्रे रसल आणि ख्रिस गेल हे दोघे विंडीजला टॉप 4 मध्ये पोहोचवतील : अनिल कुंबळे

● ‘पी.एम नरेंद्र मोदी’ 24 मे रोजी एकाच दिवशी झळकणार 40 देशांमध्ये, विवेक ऑबेरॉयने दिली माहिती

● अहमदनगर - आज मंगळवारपासून पुन्हा उष्णतेची लाट येणार, ती 24 मेपर्यंत कायम राहण्याचा वेधशाळेने वर्तविला अंदाज

● अहमदनगर - महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग 19 दिवसांच्या रजेवर, पुन्हा एकदा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे कार्यभार

● अहमदनगर - कर्जत तालुका पंचायत समितीच्या सदस्य साधना कदम यांनी सभापतिपदी निवड होताच पुन्हा केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🥛 अमूल दूध महागले; आजपासून दरवाढ

LetsUp | Update

अमूलने दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी केली वाढ, ही नवी दरवाढ आजपासूनच (दि.21) लागू

🎯 दुधावरील प्रक्रिया खर्चात वाढ झाल्याने अमूलने आपल्या अमूल ताजा (टोण्ड मिल्क) आणि अमूल गोल्ड (फुल क्रिम मिल्क) दुधाच्या दरात केली वाढ

👉 आतापर्यंत 42 रुपये लिटर दराने मिळणारे टोण्ड मिल्क 44 रुपयांवर तर 52 रुपयांना मिळणाऱ्या फुल क्रिम मिल्कचा दर 54 रुपये होणार

💁‍♂ ही नवी दरवाढ महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल, कोलकाता, उत्तराखंडमध्येही लागू होणार

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 EPFO मध्ये 280 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव : असिस्टंट

UR : 113
EWS : 28
SC : 42
ST : 21
OBC : 76
Total : 280

👍 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

🧐 वयाची अट : 25 जून 2019 रोजी 20 ते 27 वर्षे (SC/ST :05 वर्षे सूट, OBC :03 वर्षे सूट)

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

💸 फी : General/ OBC: ₹500/- (SC/ST/ PWD/ EWS/महिला:₹250/-)

प्रवेशपत्र: 20 ते 30 जुलै 2019
पूर्व परीक्षा: 30 & 31 जुलै 2019

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 25 जून 2019

🗞 अधिक माहितीसाठी भेट द्या : https://ltsup.in/2WTEJdy

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 Letsup I General Knowledge

1) कोणत्या पुरुष टेनिसपटूने ‘इटालियन ओपन 2019’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावले?

उत्तर: राफेल नदाल (81 वे विजेतेपद)

2) कोणत्या राज्यासाठी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने कलम क्र. 324 अंतर्गत आदेश दिला?

उत्तर : पश्चिम बंगाल

3) कोणते राज्य परदेशी बाजारपेठेत मसाला कर्जरोख्यांची विक्री करणारे पहिले भारतीय राज्य बनले?

उत्तर : केरळ

4) कोणत्या देशाला भारताने मे महिन्यात दोन ‘Mi-24 लढाऊ हेलिकॉप्टर’ पुरविले आहे?

उत्तर : अफगाणिस्तान

5) डिजिटल देयकांना प्रोत्साहन देण्यासाठी RBI ने नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते?

उत्तर: नंदन निलेकणी

6) अमेरिकेच्या नव्या इमिग्रेशन धोरणानुसार कुशल कामगारांचा कोटा वाढवून 12% वरून किती करण्यात येणार आहे?

उत्तर : उत्तर : 57%

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 मतदान संपताच इंधन दरवाढ सुरु

LetsUp | Update

🎯 अखेरच्या टप्प्याच्या मतदानानंतर इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यास केली सुरुवात

👀 सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढ :

सोमवार : पेट्रोल : 9 तर डिझेल : 16 पैशांची वाढ
मंगळवार : पेट्रोल : 5 तर डिझेल : 9 पैशांची वाढ

👉 आज मुंबईत पेट्रोलचा दर 76.78 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 69.36 रूपये प्रति लिटर इतका झाला आहे

💫 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी इंधन कंपन्यांनी इंधन दरवाढ टाळली होती. उलटपक्षी, गेल्या 10 दिवसांत पेट्रोलचे दर 1.80 रुपयांनी तर, डिझेलचे दर 63 पैशांनी कमी झाले होते.

🔥 आणखी भडका उडणार: अमेरिका व इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे नसल्याने तसेच, ओपेक देशांकडून पुरेसा इंधनपुरवठा होत नाही.

या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत कच्च्या इंधनाचे दर प्रतिबॅरल 90 अमेरिकी डॉलरपर्यंत उसळी घेतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतासारख्या देशांवर याचा थेट परिणाम होणार असून देशांतर्गत पेट्रोल व डिझेल दरात आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ पालकांच्या 'या' सवयी मुलांसाठी ठरतात घातक!

LetsUp | Parenting

व्यवसाय, ऑफिसच्या कामामुळे म्हणा किंवा इतर कारणाने आजच्या पालकांची व्यस्तता वाढली आहे. अशात आई-वडील फॉलो करत असलेल्या अनेक सवयी मुलांवर परिणाम करत असतात. भविष्यात जाऊन या सवयी मुलांसाठी घातक बनतात. आज या सवयींबद्दल जाणून घेऊयात...

1) व्यस्त लाईफस्टाईल : रात्री जागरण करणं, व्यायाम न करणं अशा गोष्टी कामाच्या गडबडीत पालक करत नाही. याचा परिणाम मुलांवर देखील होतो. मुलंही तसंच रुटीन फॉलो करतात. जे चुकीचे आहे.

2) चुकीचा आहार : बऱ्याचदा पालक मुलांना घरच्या आहाराऐवजी बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्याची सवय लावतात. काही काळाने जंकफूड मुलाचं फेवरेट होतं. भविष्यात हि सवय हानिकारक ठरते.

3) टीव्ही पाहत जेवणे : लहान मुलं जेवायचा कंटाळा करतात तेव्हा त्यांना टीव्ही पाहत भरवलं जातं. पण हे चुकीचं आहे. कारण यामुळे मुलांचं लक्ष हे जेवणावर नाही तर टीव्हीत जास्त असतं. अशात मुलांना शरिरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक मिळत नाहीत.

4) मुलांचा अभ्यास न घेणे : मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे अनेक पालक त्यांना खासगी क्लासला पाठवतात. मात्र पालकांनी अशाप्रकारे मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो.

लक्षात घ्या, मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी देखील चांगल्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे. घरामध्ये स्वच्छता ठेवा, शांत वातावरण ठेवा, कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्या, मोठ्यांचा आदर करा म्हणजे लहान मुलं देखील अशाच पद्धतीने वागतील, हो कि नाही?

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤨 म्हणून यंदा लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास उशीर होणार

LetsUp | Update

🎯 देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता होणार सुरुवात

👉 सुरुवातीला पोस्टल मतांची त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएमची मोजणी होईल. एकाच वेळी जास्तीत जास्त 14 ईव्हीएमची मोजणी केली जाते

👍 सकाळी अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. मात्र अंतिम निकाल हाती येण्यासाठी शुक्रवारची (दि.24) पहाट उजाडण्याची शक्यता

उशीर का होणार? :

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 1 याप्रमाणे 5 मशीनमधील स्लिपची मोजणी शेवटी करण्यात येणार आहे
व्हीव्हीपॅटच्या या मोजणीसाठी अतिरिक्त 5 तास लागणार, यामुळे अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री 2 सुद्धा वाजू शकतात
जर कोणी हरकत घेतली तर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤨 आपल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम वाढणार

LetsUp | Update

भारतीय नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) कार आणि दुचाकी वाहनांवरचा थर्ड पार्टी प्रीमियम वाढवण्याचा आणला प्रस्ताव

📝 काय आहे IRDA चा प्रस्ताव?:

1000 सीसीच्या क्षमतेच्या कारचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 2120 रुपये केला पाहिजे. पहिल्यांदा हा 1850 रुपये होता.

1000 सीसी आणि 1500 सीसी असणाऱ्या कारच्या प्रीमियममध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे. तो 2863 रुपयांवरून वाढून 3300 रुपये केला पाहिजे.

1500 सीसीहून जास्त क्षमता असलेल्या कारच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमध्ये कोणत्याही बदलाचा प्रस्ताव नाही.

75 सीसी क्षमतेच्या दुचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम वाढवून 582 रुपये केला पाहिजे. पहिल्यांदा यासाठी 427 रुपये मोजावे लागत होते.

75 सीसी आणि 150 सीसीमधील वाहनांच्या प्रीमियममध्ये बदल प्रस्तावित असून तो 720 रुपयांवरून वाढवून तो 750 रुपये केला पाहिजे.

150 सीसी आणि 350 सीसीच्या क्षमतेच्या दुचाकी वाहनांचा इन्शुरन्स प्रीमियम 985 रुपयांवरून 1193 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.

350 सीसीच्या दुचाकी वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्सचा तसेच 1500 सीसी इंजिनहून अधिक क्षमता असलेल्या कारच्या प्रीमियममध्ये कोणताही बदलाचा प्रस्ताव नाही.

📍 जोपर्यंत नवे दर लागू होणार नाही, तोपर्यंत आपल्याला जुन्या दराने प्रीमियम भरावा लागणार आहे. 29 मेपर्यंत या नव्या दरासंबंधीच्या प्रस्तावावर चर्चा होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

🧐 निकालापूर्वीच विरोधी पक्षांची तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी

झोमॅटोची ग्राहकांना खास कॅशबॅक ऑफर
बाहुबली फेम प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/30xFOdl

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● राज्यात दुष्काळग्रस्त भागात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पाऊस) प्रयोग करण्याच्या सरकारच्या हालचाली

● राज्यात सरसकट कर्जमाफी करण्यासंदर्भातील चाचपणी राज्य सरकारने केली सुरू

● एनडीएतील 36 घटक पक्षांचे नेते डिनरला उपस्थित, तीन पक्षांनी पत्र लिहून पाठिंबा दर्शवलाय : राजनाथ सिंह

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● उद्योगपती अनिल अंबानींकडून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्डविरोधातील पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे

● महसूल, नफा व आर्थिक उलाढालीच्या निकषावर रिलायन्स इंडस्ट्रीज ठरली देशात अव्वल कंपनी

● सहाशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ भारतात तस्करीसाठी नेणारी पाकिस्तानी बोट जप्त

● एसटी महामंडळाकडून 19 दुष्काळग्रस्त गावे दत्तक, टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात

● शाओमी बंद करतोय Redmi Note 7, तीन महिन्यांपुर्वीच झाला होता लॉन्च, शाओमीने दिला दुजोरा

● विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी जाणाऱ्या अंतिम संघात इंग्लंडने जोफ्रा आर्चरला दिली संधी

● अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतेय

● पुणे - शहरातील गुरुवारची पाणीकपात रद्द केली जाणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांचे संकेत

● पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून मार्च 2019 अखेरपर्यंत 38 कोटी 12 लाख रुपयांची पाणीपट्टी करवसूली, सर्वाधिक करवसुली बारामती तालुक्यात

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🚀 इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा; RISAT-2B उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

LetsUp | Update

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज बुधवारी RISAT-2B या उपग्रहाचे केले यशस्वी प्रक्षेपण

----------------------
🌕 आज संकष्टी चतुर्थी | चंद्रोदय : 10.23pm
----------------------

🎯 इस्रोच्या पीएसएलव्ही 46 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने श्रीहरीकोटा येथील तळावरून RISAT-2B अवकाशात सोडण्यात आला

👍 यानंतर 615 किलो वजनाचा हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 555 किमी उंचीवर स्थिर करण्यात आला

💫 RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर शेती, वन खाते, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी होईल

📍 पीएसएलव्ही प्रक्षेपकाची ही 46 वी यशस्वी मोहीम होती

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤨 तुम्हाला माहित आहे का?

LetsUp | Do U Know

1) जगात सफरचंदाच्या इतक्या जाती आहेत, की रोज एक जातीचे सफरचंद खाल्ले तर संपूर्ण जातींच्या सफरचंदांची चव घेण्यास 20 वर्षे लागतील.

2) लायटरचा शोध काडेपेटीच्या आधी लागला आहे.

3) कोकाकोलाचा मुळचा रंग हिरवा होता.

4) शहामृगाच्या मेंदूपेक्षा त्याचे डोळे मोठे असतात.

5) झुरळाचे डोके कापले तरी ती कित्येक दिवस जिंवंत राहू शकतात.

6) वटवाघाळे गुहेतून बाहेर पडली की, प्रथम डाव्या दिशेने जातात.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ वर्ल्डकपसाठी टीम इंडिया इंग्लंडकडे रवाना

LetsUp | Sports

📍 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना

🧐 यंदा विश्वचषक स्पर्धेत 1992 नंतर प्रथमच राऊंड रॉबिन पद्धतीचा अवलंब, त्यामुळे स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार

दरम्यान, भारतीय संघ 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या लढतीमधून स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करणार

💫 भारताने आतापर्यंत सन 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात आणि सन 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप जिंकला आहे

🧢 टीम इंडिया: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, विजय शंकर, दिनेश कार्तिक, केएल राहुल, रविंद्र जडेजा

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😱 इन्स्टाग्रामच्या 4 कोटी 90 लाख युजर्सचा डेटा लीक!

LetsUp | Tech

आता इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर, तब्बल 4.9 कोटी हाय प्रोफाईल युजर्सचा डेटा झाला लीक.

💁‍♂ टेकक्रंचने दिलेल्या माहितीनुसार, यात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी, राजकारणी, फूड ब्लॉगर यांसारख्या व्यक्तींचा समावेश आहे.

🧐 या प्रसिद्ध व्यक्तींचे फॉलोअर्स, खाजगी माहिती, प्रोफाईल फोटो, फोन नंबर, ईमेल अकाऊंट यांसारख्या गोष्टी लीक झाल्या.

🎯 मुंबईतील सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी 'चॅटरबॉक्स'ने याबाबतची माहिती हॅक केल्याची समोर, दरम्यान या प्रकरणावर चॅटरबॉक्सने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

🔎 इन्स्टाग्रामकडून याबाबत चौकशी सुरु, थर्ड पार्टीद्वारे अशाप्रकारे डेटा हॅक करु शकतं का? याबाबतही तपास सुरु आहे.

🗣 इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्यांनी काय म्हटले? :

चॅटरबॉक्सकडे युजर्सचे फोन आणि ईमेलची माहिती नेमकी कशी पोहोचली? ती खरी आहे का? याबाबत सध्या चौकशी सुरु आहे.
तसेच कोणतीही थर्ड पार्टी डेटा लीक करु शकते का? याबाबत सध्या टेक्निकल टीम तपास करत आहे.
त्याशिवाय यापुढे डेटा लीक होऊ नये, यासाठी योग्य ती पावलं उचलली जाणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 मतमोजणीच्या तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष तयार

LetsUp | Update

💁‍♂ लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी आणि ईव्हीएमसंबंधित तक्रारी हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने नियंत्रण कक्ष केले तयार.

🎯 निवडणुकीच्या निकालापर्यंत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असणार असुन यासाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

👍 नियंत्रण कक्ष करणार मदत:

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 011303052123 हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
हेल्पलाईनमुळे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे.
24 तास सुरु असणारी ही हेल्पलाइन देशातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी सुरु करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही सुरक्षा, ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक अडचण याबाबतीत मदतीसाठी या नियंत्रण कक्षातून मदत केली जाईल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💥 विरोधकांना झटका! व्हीव्हीपॅट मोजणीत बदल होणार नाही

LetsUp | Update

🧐 विरोधकांची व्हीव्हीपॅटमधील 50 टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबतच मोजणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

💁‍♂ यामुळे व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही बदल होणार नाही, आजपर्यंत व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी जशी होत होती, तशीच मोजणी होणार

📍 लोकसभा निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय विरोधकांना मोठा झटका मानला जात आहे

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; जाणून घ्या कसे आहे नियोजन!

LetsUp । Ahmednagar

नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाचे नियोजन सुरु आहे. आज बुधवारी मतमोजणीची रंगीत तालीम झाली. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ प्रशासनाचे नियोजन कसे आहे?

🎯 नगर लोकसभा मतदारसंघात सामाविष्ठ विधानसभा मतदारसंघ : शेवगांव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड.

नगर मतदान संघातील एकूण मतदार : 18 लाख 54 हजार 248
नगर मतदान संघात प्रत्यक्ष झालेले मतदान : 11 लाख 91 हजार 521
नगर मतदान संघात मतदानाची टक्केवारी : 64.26 टक्के

🎯 शिर्डी लोकसभा मतदारसंघात सामाविष्ठ विधानसभा मतदारसंघ : अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर.

एकूण मतदार : 15 लाख 84 हजार 303
प्रत्यक्ष झालेले मतदान : 10 लाख 22 हजार 461
मतदानाची टक्केवारी : 64.54 टक्के

👍 मतदारसंघ : मतदान केंद्र I मतमोजणीच्या फेर्‍या

अकोले : 308 I 22
संगमनेर : 280 I 20
शिर्डी : 273 I 20
कोपरगाव : 270 I 20
श्रीरामपूर : 310 I 23
नेवासा : 269 I 20
शेवगांव : 365 I 26
राहुरी : 308 I 22
पारनेर : 365 I 26
अहमदनगर : 292 I 21
श्रीगोंदा : 345 I 25
कर्जत-जामखेड : 355 I 26

🤔 मतमोजणी नियोजन कसे?:

मतमोजणी कक्षांची संख्या : 6
मतमोजणी टेबल : 84
पाली मतपत्रिका मतमोजणी टेबल : 1
मतमोजणी पर्यवेक्षक : 84
मतमोजणी सहाय्यक : 84
सूक्ष्म निरीक्षक : 84
आकडेवारी एकत्रीकरण कर्मचारी : 12
रो ऑफिसर : 6
शिपाई : 120
सिलींग स्टाफ : 36

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup