LetsUpp Marathi
5.3K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

🏏 अभिनेता कमल हसन यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर
अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/ltsupwani18may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● लोकसभा निवडणूक 2019 च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील 59 जागांसाठी आज रविवारी मतदान

●‘पीएमओ’, नीती आयोगाला दोषमुक्त ठरविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करणार : निवडणूक आयोग

● राजकीय पक्षांना निधी देण्याऱ्या देणगीदारांनी मोठया प्रमाणात निवडणूक रोख्यांची खरेदी, साडेतीन हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांची विक्री

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची चिन्हं निर्माण

● छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुदानच्या नागरिकाकडून 35 हजार अमेरिकन डॉलर्स जप्त

● राज्यातील उसाचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरने वाढले; सोलापूर, मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागांत लक्षणीय वाढ

● मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते राज्य सरकारच्या अध्यादेशालाही आव्हान देणार

● विव्होने नवीन स्मार्टफोन VIVO Y3 केला लाँच, फोनची किंमत अंदाजे 15 हजार 200 रुपये आहे

● सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्याकडून पदकाची अपेक्षा

●‘लक्ष्मी बॉम्ब’मध्ये अक्षय कुमार ट्रान्सजेंडर भूताच्या भूमिकेत, जून 2020 ला चित्रपट प्रदर्शित होणार

● पुणे - लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महापालिकेच्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे संकेत

● पुण्याच्या तापमानाने पुन्हा गाठली चाळीशी, शनिवारी पुण्यात 40 अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे 40.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

● पुणे - आदित्य प्रतिष्ठानचा कलाभूषण पुरस्कार ज्येष्ठ कथ्थककार पंडित बिरजू महाराज यांना प्रदान

● पुणे - जहांगीर रुग्णालयाकडून अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या काही निकषांचे उल्लंघन, एफडीएने बजावलेला 1 लाखाचा दंड रुग्णालयाने भरला

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 ‘एक राज्य-एक चलन’ योजना सुरु

LetsUp | Update

राज्य वाहतूक विभागाने 'एक राज्य-एक चलन' योजना केली सुरू, त्याअंतर्गत कारवाईसाठी पोलिसांना नवे अत्याधुनिक 'ई-चलन' मशिन मिळणार

👉 त्यामुळे आता डिजिटल चलनाद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार

👍 सुरुवातीच्या टप्प्यात काही शहरात ही यंत्रणा सुरू करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे

🎯 ई-चलन मशिनचे फायदे काय?

पावती पुस्तके वापर आणि रेकॉर्ड सांभाळण्याची गरज नाही
अपघाताचा फोटोसह कंट्रोलरुमला माहिती मिळणार
वाहनांची संपूर्ण अचूक माहिती ऑनलाइन मिळणे शक्य
वाहनक्रमांक, मालकाचे नाव, मोबाइल नंबर, इंजिन नंबर मशिनवर पाहता येणार
नेटवर्क नसल्यास ऑफलाईन कारवाई शक्य

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🌟 साप्ताहिक राशीभविष्य; 19 ते 25 मे 2019

LetsUp | Astrology

मेष : या आठवड्यात खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. योग्य विचार करूनच पुढचे पाऊल उचला. गैरसमजापासून दूर राहणे हितकारक ठरणार आहे.

वृषभ: या आठवड्यात प्रकृतीबाबत तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. पथ्यपाणी सांभाळा. कुटुंबातील व्यक्ती नाराज होणार नाहीत याची दक्षता घ्या.

मिथुन : या आठवड्यात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन कामे पार पाडू शकता. पूर्वी न केलेल्या कामांना प्राधान्य द्या फायदा होईल. कौटुंबिक प्रवास शक्यतो टाळावा.

कर्क: या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकेल. प्रवासाचे योग संभवतात. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल.

सिंह: सर्व बाबतीत आपण सावध राहणेच योग्य ठरणार आहे. कोणावरही विश्वास न ठेवता वस्तुस्थितीनुसार वागा. हुशारीने योग्य निर्णय घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

कन्या : आपल्या क्षमतेनुसार करण्याचे धोरण स्वीकारल्यास पुष्कळ गोष्टी साध्य करता येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग संभवतात. व्यावहारिक विचाराने वागणे इष्ट राहील.

तूळ : या आठवड्यात इतरांच्या मदतीची अपेक्षा न करणेच योग्य राहील. हितशत्रूंबाबत चिंता करण्याचे कारण नाही. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.

वृश्चिक : बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. प्रवासाचे योग येतील. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळू शकेल. राजकीय व क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी प्राप्त होऊ शकेल.

धनू: या आठवड्यात काही ठिकाणी यश मिळू शकते, तर दुसरीकडे आव्हानांना सामोरे जावे लागते. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे.

मकर : प्रत्येक बाबतीत सतर्क राहणेच महत्त्वाचे राहणार आहे. आपण साडेसातीच्या पर्वातून जात आहात, हे विसरू नका.

कुंभ : आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. प्रत्येक निर्णयात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हितकारक ठरणार आहे.

मीन: आपणास बऱ्यापैकी कामकाजात सुलभता जाणवू लागेल. प्रवासाचे योग येतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. नातलगांशी काहीशी तडजोड करणे योग्य ठरेल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ देश आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येची टक्केवारी

LetsUp | Statistics

जपान : 27%
इटली : 23%
जर्मनी : 21%
फ्रान्स : 1 9%
स्पेन : 1 9%
यूके : 18%
कॅनडा : 17%
पोलंड : 16%
यूएस : 15%
रशिया : 14%
चीन : 10%
ब्राझिल : 8%
तुर्की : 8%
मेक्सिको : 7%
भारत : 6%
इंडोनेशिया : 5%
पाकिस्तान : 4%
सौदी : 3%
यूएई : 1%

(जागतिक बँक)

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😋 तयार करा आंब्याचा केक!

LetsUp | Recipe

💁‍♂ साहित्य: 2 वाट्या रवा, 1 वाटी साखर, पाऊण वाटी लोणी किंवा तूप, 1 वाटी दही, 1 वाटी दूध, 1 वाटी आंब्याचा पल्प्, 1 चमचा बेकिंग पावडर, काजू बदाम बेदाणे हे सगळे ड्राय फ्रुट्स थोडे-थोडे किंवा ऑप्शनल.

🍽 कृती: एका भांड्यात रवा घेऊन त्यात दही, दूध, साखर, लोणी/तूप सगळे जिन्नस नीट कालवून ठेवा. हे मिश्रण 4/5 तास झाकून ठेवा. त्यानंतर त्यात बेकिंग पावडर, आंब्याचा रस व ड्राय फ्रुटस घालून चांगले मिक्स करा. ओव्हनच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. प्रीहीटेड ओव्हनमध्ये 150 ते 180 तापमानाला 40 ते 45 मिनिटे बेक करा. तुमचा केक आता तयार झाला आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👍 'सर्वोत्तम सेंद्रिय खत 'निंबोळी अर्क'

LetsUp । Agri

सध्याच्या काळात रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची प्रत खालावली आहे. त्यामुळे जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. अशात सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय शेतीचे मुख्य घटक म्हणजे सेंद्रिय खते. त्यातील एक 'निंबोळी अर्क'. आज त्याबाबत जाणून घेऊयात...

💁‍♂ 5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत:

उन्हाळ्यात निंबोळ्या जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात व साठवण करावी.
फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तेवढ्या बारीक कराव्यात. 5 किलो चुरा 9 लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा.
1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबण्याचा चुरा वेगळा भिजत ठेवावा.
दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. त्या अर्कात 1 लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा अर्क एकूण 10 लिटर होईल एवढे पाणी टाकावे.

वरीलप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा.

निंबोळी अर्क अधिक प्रभावी करण्यासाठी अर्ध्या किलो हिरव्या मिरचीचा बारीक ठेचा किंवा 200 ग्रॅम तंबाखू पूड (पाण्यात उकळून थंड करून अर्क काढावा) किंवा 250 ग्रॅम गूळ किंवा निरमा पावडरची 10 लिटर अर्कामध्ये फवारणीपूर्वी 24 तास अगोदर टाकून भिजवा. हे मिश्रण 3-3 तासांच्या अंतराने ढवळत रहा व वापरण्यापूर्वी फडक्याने गाळून घ्या.

📍 निंबोळी अर्क फवारणीमध्ये किमान 12 ते 15 दिवसांचे अंतर असावे तसेच कडक उन्हात फवारणी टाळावी.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 वर्ल्डकपचा इतिहास काय?

LetsUp | Sports

येत्या 30 मे पासून वर्ल्डकप 2019 स्पर्धेला सुरुवात होत आहे. यंदा वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. 1975 ते 2015 दरम्यान वर्ल्डकप विजेता संघ कोणते आहेत? तसेच वर्ल्डकपचा इतिहास काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात...

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😍 जाणून घ्या भारताजवळील सर्वात स्वस्तात मस्त देश

LetsUp | Travel

1) थायलंड : थायलंडचे नाव घेताच निसर्गरम्य बीच आठवतात. तुम्हाला येथे केवळ 250 रुपयांपर्यंत रुम मिळू शकते. तसेच 200 रुपयांत जेवण मिळू शकते.

2) नेपाळ : नेपाळ नैसर्गिक सुंदरतेने नटलेले आहे. इथे तुम्ही 600 रुपयांत तीन वेळा जेवणाचा आनंद घेऊ शकता. तसेच 270 रुपयांत तुम्ही रुमही बुक करु शकता.

3) व्हिएतनाम : स्वस्त खाणे आणि भरपूर शॉपिंगसाठी तुम्ही या देशाची निवड करु शकता. इथे व्हिएतनामी डिशची मजा केवळ 66 रुपयांत घेता येते. तसेच 200 रुपयांपर्यंत रुम बुक करण्याची सुविधा आहे.

4) चीन : चीनमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागणार नाही.या देशाची खासियत म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा खर्च फक्त 66 रुपये इतका होतो.

5) इंडोनेशिया : नैसर्गिक सौंदर्याची मजा लुटायची असल्यास इंडोनेशियाला नक्की भेट द्यावी. इंडोनेशियात तुम्ही केवळ 67 रुपयांत डिनर करु शकता. तसेच 250 रुपयांत हॉटेल बुक करु शकता.

6) कंबोडिया : कंबोडियामध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाही. येथे हॉटेलमध्ये तुम्ही 250 रुपयांपर्यंत जेवण करू शकता.

7) पेरु : जगातील कुल आणि जादुई ठिकाण म्हणजे पेरु. येथे तुम्ही 500 रुपयांत रुम बुक करु शकता. 350 रुपयांत तुम्हाला जेवण मिळते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👌 स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराने सतराव्यांदा केलं मतदान

LetsUp | Update

👉 स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार असलेले शाम शरण नेगी यांनी आपल्या आयुष्यातील 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. वयाची शंभरीपार केलेले नेगी गेली 68 वर्षे मतदानाचा हक्क बजावत आहेत. हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथे राहणारे नेगी हे निवृत्त शिक्षक असून सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे यासाठी ते नेहमी आग्रही आहेत. नेगी यांच्या हालचालींवर वार्धक्य आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या 100 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या 1 हजार 011 मतदारांपैकी नेगी एक आहेत.

👉 किन्नोर येथे पहिले मतदान 25 ऑक्टोबर 1951 मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मंडी-महासु (मंडी) या क्षेत्रासाठी मतदान केले होते. निवडणूक आयोगाने 1952 च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये त्याआधीच निवडणूका घेण्यात आल्या. नेगी यांनी त्यावेळी किन्नोर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

🏏 लोकसभेसाठीच्या सातव्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.03 टक्के मतदान

देशातील अनेक राज्यांचा पाणीसाठा चिंताजनक पातळीवर
8,00,000 तिकिटांसाठी तब्बल 3 कोटी अर्ज

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 https://ltsup.in/ltsupwani19may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● लोकसभा निवडणूक 2019 : सातव्या व अखेरच्या टप्प्यात 59 जागांसाठी सरासरी 61 टक्के मतदान

● एक्झिट पोल : 8 मोठ्या सर्व्हे एजन्सींच्या सर्वेक्षणात एनडीए बहुमताच्या जवळ, आता प्रतीक्षा 23 मेची

● राजकीय पक्षांकडून फेसबुक व गुगल आदी डिजिटल माध्यमांत प्रचारासाठी 53 कोटींपेक्षा अधिक खर्च

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● ब्रिटनमध्ये नवीन शस्त्र कायदा मंजूर; शिख बांधवांना पारंपारिक कृपाणाचा अधिकार कायम

● श्रीलंकेतील अनेक सरकारी विभाग तसेच परराष्ट्र मंत्रालयासह काही मंत्रालयाच्या वेबसाईट्सवर सायबर अटॅक

● राजस्थानच्या आरोग्य कल्याण ब्लड बँकेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त देशातील पहिले ब्लड बँक वॉलेट जारी

● अरुणाचल प्रदेश : बंदी घातलेल्या एनएससीएन (के) या अतिरेकी संघटनेच्या तिघांना अटक, शस्त्रास्त्र जप्त

● अॅमेझॉनच्या भारतीय ग्राहकांना अॅपच्या माध्यमातून देशांतर्गत विमानांचे तिकीट आरक्षित करता येणार

● युवराज सिंगचा निवृत्तीचा विचार? जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक

● 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार रमाबाईंची भूमिका

● अहमदनगर - शहरातील जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे आवाहन

● अहमदनगर - डॉ. अशोक विखे यांचे उद्यापासून लोणी येथे होणारे उपोषण तूर्त स्थगित, आचारसंहिता संपल्यानंतर 27 मे नंतर करणार उपोषण

● अहमदनगर - योगासने व मल्लखांब प्रात्यक्षिकांच्या एरियल स्पोर्ट्सच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नगरमधील तिघांची राष्ट्रीय पंच म्हणून निवड

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 जाणून घ्या सर्व एक्झिट पोलचे आकडे एकाच ठिकाणी

LetsUp | Politics

देशभरातील अनेक एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यानुसार देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा अंदाज बहुतेक सर्व संस्था-वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे यंदा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या जागाही वाढण्याचा अंदाज आहे. याबाबत जाणून घेऊयात...

🎯 एक्झिट पोल : (भाजप+), (काँग्रेस+), (इतर)

टीव्ही 9-सी व्होटर : (287), (128), (127)

टाईम्स नाऊ-VMR : (306), (132), (104)

एबीपी-नेल्सन : (267), (127), (148)

न्यूज 24 - टुडेज चाणक्य : (340), (70), (133)

न्यूज नेशन : (282-290), (111-126), (130-138)

न्यूज 18- IPSOS : (336), (82), (124)

इंडिया न्यूज-पोल स्ट्रॅट : (287), (128), (127)

न्यूज एक्स : (242), (164), (136)

रिपब्लिक-जन की बात : (305), (124), (87)

💁‍♂ महाराष्ट्रात कुणी किती जागा दिल्या?

🎯 एक्झिट पोल : (भाजप+), (काँग्रेस+), (इतर)

टीव्ही 9-सी व्होटर : (34), (14), (00)

टाईम्स नाऊ -VMR : (38), (10), (00)

एबीपी-नेल्सन : (34), (13), (01)

न्यूज 24 - टुडेज चाणक्य : (38), (10), (00)

न्यूज नेशन : (33-35), (13-15), (00)

न्यूज 18- IPSOS : (41-45), (3-6), (01)

इंडिया न्यूज -पोल स्ट्रॅट : (34), (14), (00)

न्यूज एक्स : (36), (11), (01)

रिपब्लिक-जन की बात : (34-39), (8-12), (01)

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👌 आरोग्यासाठी हळद फार गुणकारी

LetsUp | Health

आयुर्वेदात हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे. सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे. हळदीच्या वापरामुळे जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे. आज त्याबाबत जाणून घेऊ...

1) हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन औषध म्हणून काम करते. जे शरीरातील सूज कमी करण्यास मदतगार ठरते.

2) बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायला हवे.

3) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.

4) हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. तसेच रक्त साफ होण्यासही मदत होते.

5) हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.

6) हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो.

7) एका रिसर्चनुसार, हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाईप-2 च्या डायबिटीजचा धोकाही टळतो.

8) गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ ऑटोमोबाईल-तंत्रज्ञान कुठं काय?

LetsUp | Auto-Tech

1) Amazon ची नवी सेवा : आता Amazon च्या भारतीय ग्राहकांना त्यांच्या अ‍ॅपच्या माध्यमातून देशांतर्गत विमानांचे तिकीट आरक्षित करता येणार आहे.

दरम्यान, प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकीट रद्द केल्यास अ‍ॅमेझॉन कोणतेही शुल्क आकारणार नाही. याव्यतिरिक्त शॉपिंग, पैसे ट्रान्सफर करणे, बिल पेमेंट, मोबाइल रिचार्जही ‘अ‍ॅमेझॉन पे’च्या अ‍ॅपच्या सहाय्याने करता येतील.

2) Honda CBR650R ची डिलिव्हरी सुरु : होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडियाने आपल्या नव्या मिडलवेट स्पोर्टबाईक Honda CBR650R ची डिलिव्हरी सुरु केली आहे. भारतात या बाईकची किंमत 7.70 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.

या बाईकमध्ये 4 सिलेंडर असलेले 649 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन लिक्विड कुलिंगसह उपलब्ध आहे. 649 सीसी चे इंजिन 12,000rpm सह 94bhp पावर जेनरेट करते. तसेच 64Nm चा पीक टॉर्क देते.

3) जगातील पहिली 3D प्रिंटेड कार सादर : लॉस एंजेलिस येथील स्टार्टअप कंपनी डिव्हर्जेंटने 3 डी-प्रिंटिंग तंत्राद्वारे जगातील पहिली हायपर कार 'ब्लेड' (Blade) सादर केली आहे.

एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये जे तंत्रज्ञान वापरले जाते ते या कारचे डिझाईन बनवण्यासाठी वापरले आहे. या कारचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याची गति आणि डिझाईन आहे.

4) वापरा Snapchat Baby Filter : स्नॅपचॅटने आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये बेबी फिल्टरचा पर्याय दिला आहे. या माध्यमातून तुमचा चेहरा डिटेक्ट होवून मग फोटो क्लिक होतो आणि मग चेहरा लहान मुलाप्रमाणे बदलतो.

या सर्व प्रक्रियेसाठी केवळ 2-3 सेकंद लागतात. विशेष म्हणजे फक्त फोटो काढतानाच नव्हे तर काढलेला फोटो देखील तुम्ही या फिचरद्वारे लहान मुलासारखा करु शकता.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😳 बँक ऑफ बडोदाच्या 800-900 शाखा होणार बंद?

LetsUp | Update

💁‍♂ कार्यक्षमता वाढविण्यासाठी बँक ऑफ बडोदाने देशातील 800 ते 900 शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचे ठरवले

🧐 का घेतला निर्णय? :

माहितीनुसार, देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणानंतर एकाच ठिकाणी दोन्ही बँकांच्या शाखा चालविण्यात येत होत्या. ज्याची काही आवश्यकता नव्हती.
अनेक ठिकाणी तर तिन्ही बँकांच्या शाखा एकाच इमारतीमध्ये चालत असल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एप्रिलपासूनच बँकेच्या शाखांचा आढावा सुरु असून त्यानुसार काही शाखांचे अन्यत्र स्थलांतर किंवा काही शाखा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत.

📍 बँक ऑफ बडोदाच्या देशभरात 9,500 शाखा असून बँकेचे 13 हजार 400 एटीएम कार्यरत आहेत, तर एकूण कर्मचारीसंख्या 85 हजार असून ग्राहकसंख्या 12 कोटी आहे

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

1) टायगरला करायचाय बायोपिक : टायगर श्रॉफला बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्‍शन हिरो बरोबर डान्सिंग स्टार म्हणूनही ओळखले जाते.

सध्या बायोपिकचा ट्रेन्ड सुरू आहे. अशात अनेकांनी मोठ्या व्यक्‍तींचे रोल साकारले आहेत. तशी आपल्याला संधी मिळाली, तर मायकेल जॅक्‍सनच्या रोल करायची संधी मिळावी, अशी त्याची ईच्छा आहे.

2) 'जोया फॅक्टर' ची रिलीज डेट नक्की! : दाक्षिणात्य सुपरस्टार सलमान दुलकर लवकरच 'जोया फॅक्टर' या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर झळकणार आहे.

अगोदर हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता वर्ल्ड कपच्या कारणास्तव ही रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा चित्रपट आता सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3) वर्षाअखेर येणार 'सत्यशोधक' : फुले दांपत्यावर आधारित 'सत्यशोधक' हा चित्रपट या वर्षअखेरीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

4) 'सडक 2'च्या चित्रीकरणास सुरुवात : बॉलिवूडमध्ये एकेकाळी सुपरहिट ठरलेल्या 'सडक' चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. 'यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी झळकणार आहे.

पुजा भट्ट आणि संजय दत्तच्याही भूमिका चित्रपटाच्या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून याबद्दलची माहिती आलियाने भावनिक पोस्ट शेअर करत दिली आहे. महेश भट्ट यांच्या हातात असलेल्या क्लॅपचा फोटो आलियाने शेअर केला.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤨 चर्चा! आदिल रशीदने केला धोनी स्टाईल रनआऊट

LetsUp | Viral

🎯 इंग्लंड वि. पाकिस्तान पाचव्या वन डे दरम्यान इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने केला अश्यक्यप्राय रनआऊट

🧐 धोनीने 2016च्या वन डे सामन्यात न्यूझीलंडच्या रॉस टेलरला असेच धावबाद केले होते त्याची रशीदने कॉपी केल्याची चर्चा सुरु आहे

🏏 धोनी स्टाईलने धावबाद: हा प्रसंग पाचव्या वन डे सामन्याच्या 27व्या षटकात घडला. सर्फराज अहमदने रशीदच्या गोलंदाजीवर चेंडू हलकाच टोलवला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला असलेला बाबर रन घेण्यासाठी धावला.

पण, सर्फराजने त्याला माघारी जाण्यास सांगितले आणि खेळपट्टीच्या मध्यभागात आल्यानंतर तो माघारी येण्यासाठी परतला. तेव्हा जोस बटलरने चेंडू रशीदच्या दिशेने फेकला आणि रशीदने धोनी स्टाईलने बाबरला धावबाद केले.

👀 व्हिडिओ पहा: https://ltsup.in/2LSP4FC

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😇 सत्य स्वीकारलं कि, सामर्थ्य वाढायला लागतं!

LetsUp | Motivation

आयुष्यात जेव्हा अपयश येते तेव्हा एकटेपणा जाणवतोच. या काळात इतर व्यक्ती तुम्हाला मानसिक आधार देऊ शकतात, काही वेळा मदतही करतात. पण ती परिस्थिती, त्याचे परिणाम यांना तुम्हाला एकट्यानेच सामोरे जावे लागते.

उदा. परीक्षेची तयारी करण्यासाठी मित्रमैत्रिणी, पालक, शिक्षक मदत करायला तत्पर असतात. पण प्रत्यक्षात पेपरला सामोरे जाणे, प्रश्नांची योग्य उत्तर देणे हे तुम्हालाच करणे भाग आहे.

आयुष्याकडे तटस्थपणे पाहिलं तर या सत्याची अधिक तीव्रतेने जाणीव होते. खरंच तुम्ही आम्ही सगळेजण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकटे आहोत. पण बहुतांश व्यक्ती या एकटेपणाचा अर्थ `एकाकी’ असा लावतात. जे चुकीचे आहे.

एकाकीपण यातून नकळतच नकारात्मक भावनेचे सूर जन्माला येतात. इतर व्यक्ती तुमच्या आयुष्याचा भाग आहेत. पण आयुष्यातील घटनांना सामोरं मात्र एकट्यानेच जायचं असतं. हे सत्य स्वीकारायला काय हरकत आहे?

तुम्ही ही गोष्ट एकदा स्वीकारली की तुमचं मन प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भक्कम होतं. त्याचं सामर्थ्य वाढायला लागतं. निर्णय घेण्याचा, त्याची जबाबदारी स्वीकारण्याचा, त्यावर ठाम राहण्यासाठी आवश्यक असलेला करारीपणा येतो. शिवाय आत्मविश्वास निर्माण होतो, हे विसरू नका!

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup