LetsUpp Marathi
5.3K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂ अमेरिकेच्या स्थलांतरविषयक धोरणांत बदल; भारतीयांना होणार फायदा

LetsUp | International

📍 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे इमिग्रेशन धोरण केले जाहीर

🧐 आता बिल्ड अमेरिका व्हिसा पद्धत: अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड पद्धत बंद करण्यात येणार असून त्याऐवजी आता बिल्ड अमेरिका व्हिसा पद्धत लागू होणार आहे.

🗣 डोनाल्ड ट्रम्प काय म्हटले?

तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे.
आता केवळ लॉटरीपदधतीने नव्हे किंवा तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात म्हणून नव्हे तर तुमच्यातील उच्च दर्जाचे कौशल्य आणि तुमच्या गुणवत्तेच्या आधारावरच आता व्हिसा जारी केले जातील.
आम्हाला आमचा देशही घडवायचा आहे. येथील नागरीकांच्या हिताचीही काळजी घ्यायची आहे. त्याचाही विचार करून हे नवीन व्हिसा धोरण अंमलात येत आहे.

👍 भारतीयांना होणार फायदा : नव्या धोरणानुसार अतिकुशल कर्मचाऱ्यांचा कोटा 12 टक्‍क्‍यांवरून 57 टक्के करण्यात येणार आहे. या धोरणाचा हजारोंच्या संख्येतील भारतीयांना लाभ होणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 इस्रोची नवीन मोहीम; मिशन 'शुक्र'

LetsUp | Science

👍 आता इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा घेतला निर्णय, या यानाद्वारे शुक्राशी संबंधित माहिती घेतली जाणार

🔎 मोहीमेत काय अभ्यास केला जाणार?

पुढील 10 वर्षात 7 अंतराळ मोहीमा काढण्याचा इस्रोचा मानस असून त्यातली एक मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.
2023 मध्ये 'शुक्र' मोहीम काढली जाण्याची शक्यता आहे. इस्रोच्या मंगळयान मोहीमेला मिळालेल्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्र ग्रहावर कसं वातावरण आहे? शुक्र आणि पृथ्वी यांच्यात साम्यस्थळं आहेत ती नेमकी काय आहेत? विविध थर, सूर्याशी असणारा संबंध या सगळ्याबाबत अभ्यास केला जाणार आहे.
जगभरातल्या सुमारे 20 देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

📍 आता शुक्राबाबतची मोहीम कशी असेल? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😍 खुशखबर! मान्सून अंदमानमध्ये दाखल

LetsUp | Update

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज शनिवारी मान्सून (नैऋत्य मोसमी वारे) अंदमानात दाखल

👍 वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर

💁‍♂ येत्या 3-4 दिवसांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी वातावरण अनुकूल, येत्या 48 तासात निकोबार बेटांवर पावसाचा हवामान खात्याने वर्तवला अंदाज

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
निर्णय घेण्याच्या विविध पद्धती!

LetsUp | Special

परिस्थिती आणि गरजेनुसारही निर्णय घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. सामुहिक आणि वैयक्तिक पातळीवर निर्णय घेतानाही अशाच पद्धतींचा आधार घ्यावा लागतो. अशाच काही पद्धतींबद्दल सविस्तर जाणून घेऊयात....

1) हुकुमशाही : यात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकाच व्यक्तीकडे असतात. त्याने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावाच लागतो. या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची असते.

2) चर्चा/ समूह निर्णय पद्धत : यात निर्णय प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व व्यक्ती एकत्र बसून चर्चा करतात. अनेक पर्यायांचा विचार करून त्यांचे फायदे-तोटे लक्षात घेऊन त्यापैकी सर्वसंमतीने एका पर्यायाची निवड करतात. यात परिणामांची जबाबदारी सर्व सदस्यांवर असते.

3) सल्ला : या निर्णय घेण्याची जबाबदारी असणारी व्यक्ती आपल्या सहकार्यांचा सल्ला घेते. त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर व्हावा हा या मागचा हेतू असतो. परंतु हा सल्ला सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते.

4) जबाबदारी: काही वेळेस निर्णय हे इतरांवर सोपवले जातात. दुसऱ्या व्यक्तीच्या क्षमतेवर जेव्हा पूर्ण विश्वास असेल, तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. यात परिणामाची जबाबदारी ही निर्णय दुसऱ्यावर सोपवणाऱ्याची असते.

5) विचार: काही लोक हे परिणामांचा परिपूर्ण विचार करून मगच निर्णय घेतात. या निर्णयांची सर्वस्वी जबाबदारी निर्णय घेण्याऱ्याची असते.

6) प्रयोग: काही निर्णय हे प्रयोग करून नंतर निर्णय घेतले जातात. उदा. : वैद्यक शास्त्रात माणसावर एखाद्या औषधाचा काय परिणाम होईल? हे तपासण्यासाठी ते औषधाचा आधी प्राण्यांवर वापर केला जातो.

7) ट्रायल अ‍ॅण्ड एरर : प्रत्यक्ष कृती करून तिच्या परिणामांची शहानिशा केली जाते. योग्य परिणाम येईपर्यंत प्रयोग केले जातात.

लक्षात घ्या, निर्णय घेतला गेला त्याच्या इतकेच तो कोणत्या पद्धतीने घेतला गेला हे ही महत्त्वाचे असते. ज्या ठिकाणी जी पद्धत उपयोगी पडेल आणि ध्येय साधले जाईल त्या ठिकाणी ती पद्धत वापरावी लागते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

🏏 अभिनेता कमल हसन यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर
अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/ltsupwani18may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● लोकसभा निवडणूक 2019 च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील 59 जागांसाठी आज रविवारी मतदान

●‘पीएमओ’, नीती आयोगाला दोषमुक्त ठरविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करणार : निवडणूक आयोग

● राजकीय पक्षांना निधी देण्याऱ्या देणगीदारांनी मोठया प्रमाणात निवडणूक रोख्यांची खरेदी, साडेतीन हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांची विक्री

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची चिन्हं निर्माण

● छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुदानच्या नागरिकाकडून 35 हजार अमेरिकन डॉलर्स जप्त

● राज्यातील उसाचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरने वाढले; सोलापूर, मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागांत लक्षणीय वाढ

● मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते राज्य सरकारच्या अध्यादेशालाही आव्हान देणार

● विव्होने नवीन स्मार्टफोन VIVO Y3 केला लाँच, फोनची किंमत अंदाजे 15 हजार 200 रुपये आहे

● सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्याकडून पदकाची अपेक्षा

●‘लक्ष्मी बॉम्ब’मध्ये अक्षय कुमार ट्रान्सजेंडर भूताच्या भूमिकेत, जून 2020 ला चित्रपट प्रदर्शित होणार

● पुणे - लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महापालिकेच्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे संकेत

● पुण्याच्या तापमानाने पुन्हा गाठली चाळीशी, शनिवारी पुण्यात 40 अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे 40.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

● पुणे - आदित्य प्रतिष्ठानचा कलाभूषण पुरस्कार ज्येष्ठ कथ्थककार पंडित बिरजू महाराज यांना प्रदान

● पुणे - जहांगीर रुग्णालयाकडून अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या काही निकषांचे उल्लंघन, एफडीएने बजावलेला 1 लाखाचा दंड रुग्णालयाने भरला

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 ‘एक राज्य-एक चलन’ योजना सुरु

LetsUp | Update

राज्य वाहतूक विभागाने 'एक राज्य-एक चलन' योजना केली सुरू, त्याअंतर्गत कारवाईसाठी पोलिसांना नवे अत्याधुनिक 'ई-चलन' मशिन मिळणार

👉 त्यामुळे आता डिजिटल चलनाद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार

👍 सुरुवातीच्या टप्प्यात काही शहरात ही यंत्रणा सुरू करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे

🎯 ई-चलन मशिनचे फायदे काय?

पावती पुस्तके वापर आणि रेकॉर्ड सांभाळण्याची गरज नाही
अपघाताचा फोटोसह कंट्रोलरुमला माहिती मिळणार
वाहनांची संपूर्ण अचूक माहिती ऑनलाइन मिळणे शक्य
वाहनक्रमांक, मालकाचे नाव, मोबाइल नंबर, इंजिन नंबर मशिनवर पाहता येणार
नेटवर्क नसल्यास ऑफलाईन कारवाई शक्य

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🌟 साप्ताहिक राशीभविष्य; 19 ते 25 मे 2019

LetsUp | Astrology

मेष : या आठवड्यात खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. योग्य विचार करूनच पुढचे पाऊल उचला. गैरसमजापासून दूर राहणे हितकारक ठरणार आहे.

वृषभ: या आठवड्यात प्रकृतीबाबत तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. पथ्यपाणी सांभाळा. कुटुंबातील व्यक्ती नाराज होणार नाहीत याची दक्षता घ्या.

मिथुन : या आठवड्यात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन कामे पार पाडू शकता. पूर्वी न केलेल्या कामांना प्राधान्य द्या फायदा होईल. कौटुंबिक प्रवास शक्यतो टाळावा.

कर्क: या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकेल. प्रवासाचे योग संभवतात. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल.

सिंह: सर्व बाबतीत आपण सावध राहणेच योग्य ठरणार आहे. कोणावरही विश्वास न ठेवता वस्तुस्थितीनुसार वागा. हुशारीने योग्य निर्णय घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

कन्या : आपल्या क्षमतेनुसार करण्याचे धोरण स्वीकारल्यास पुष्कळ गोष्टी साध्य करता येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग संभवतात. व्यावहारिक विचाराने वागणे इष्ट राहील.

तूळ : या आठवड्यात इतरांच्या मदतीची अपेक्षा न करणेच योग्य राहील. हितशत्रूंबाबत चिंता करण्याचे कारण नाही. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.

वृश्चिक : बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. प्रवासाचे योग येतील. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळू शकेल. राजकीय व क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी प्राप्त होऊ शकेल.

धनू: या आठवड्यात काही ठिकाणी यश मिळू शकते, तर दुसरीकडे आव्हानांना सामोरे जावे लागते. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे.

मकर : प्रत्येक बाबतीत सतर्क राहणेच महत्त्वाचे राहणार आहे. आपण साडेसातीच्या पर्वातून जात आहात, हे विसरू नका.

कुंभ : आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. प्रत्येक निर्णयात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हितकारक ठरणार आहे.

मीन: आपणास बऱ्यापैकी कामकाजात सुलभता जाणवू लागेल. प्रवासाचे योग येतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. नातलगांशी काहीशी तडजोड करणे योग्य ठरेल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ देश आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येची टक्केवारी

LetsUp | Statistics

जपान : 27%
इटली : 23%
जर्मनी : 21%
फ्रान्स : 1 9%
स्पेन : 1 9%
यूके : 18%
कॅनडा : 17%
पोलंड : 16%
यूएस : 15%
रशिया : 14%
चीन : 10%
ब्राझिल : 8%
तुर्की : 8%
मेक्सिको : 7%
भारत : 6%
इंडोनेशिया : 5%
पाकिस्तान : 4%
सौदी : 3%
यूएई : 1%

(जागतिक बँक)

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😋 तयार करा आंब्याचा केक!

LetsUp | Recipe

💁‍♂ साहित्य: 2 वाट्या रवा, 1 वाटी साखर, पाऊण वाटी लोणी किंवा तूप, 1 वाटी दही, 1 वाटी दूध, 1 वाटी आंब्याचा पल्प्, 1 चमचा बेकिंग पावडर, काजू बदाम बेदाणे हे सगळे ड्राय फ्रुट्स थोडे-थोडे किंवा ऑप्शनल.

🍽 कृती: एका भांड्यात रवा घेऊन त्यात दही, दूध, साखर, लोणी/तूप सगळे जिन्नस नीट कालवून ठेवा. हे मिश्रण 4/5 तास झाकून ठेवा. त्यानंतर त्यात बेकिंग पावडर, आंब्याचा रस व ड्राय फ्रुटस घालून चांगले मिक्स करा. ओव्हनच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. प्रीहीटेड ओव्हनमध्ये 150 ते 180 तापमानाला 40 ते 45 मिनिटे बेक करा. तुमचा केक आता तयार झाला आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👍 'सर्वोत्तम सेंद्रिय खत 'निंबोळी अर्क'

LetsUp । Agri

सध्याच्या काळात रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची प्रत खालावली आहे. त्यामुळे जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. अशात सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय शेतीचे मुख्य घटक म्हणजे सेंद्रिय खते. त्यातील एक 'निंबोळी अर्क'. आज त्याबाबत जाणून घेऊयात...

💁‍♂ 5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत:

उन्हाळ्यात निंबोळ्या जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात व साठवण करावी.
फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तेवढ्या बारीक कराव्यात. 5 किलो चुरा 9 लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा.
1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबण्याचा चुरा वेगळा भिजत ठेवावा.
दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. त्या अर्कात 1 लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा अर्क एकूण 10 लिटर होईल एवढे पाणी टाकावे.

वरीलप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा.

निंबोळी अर्क अधिक प्रभावी करण्यासाठी अर्ध्या किलो हिरव्या मिरचीचा बारीक ठेचा किंवा 200 ग्रॅम तंबाखू पूड (पाण्यात उकळून थंड करून अर्क काढावा) किंवा 250 ग्रॅम गूळ किंवा निरमा पावडरची 10 लिटर अर्कामध्ये फवारणीपूर्वी 24 तास अगोदर टाकून भिजवा. हे मिश्रण 3-3 तासांच्या अंतराने ढवळत रहा व वापरण्यापूर्वी फडक्याने गाळून घ्या.

📍 निंबोळी अर्क फवारणीमध्ये किमान 12 ते 15 दिवसांचे अंतर असावे तसेच कडक उन्हात फवारणी टाळावी.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 वर्ल्डकपचा इतिहास काय?

LetsUp | Sports

येत्या 30 मे पासून वर्ल्डकप 2019 स्पर्धेला सुरुवात होत आहे. यंदा वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. 1975 ते 2015 दरम्यान वर्ल्डकप विजेता संघ कोणते आहेत? तसेच वर्ल्डकपचा इतिहास काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात...

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😍 जाणून घ्या भारताजवळील सर्वात स्वस्तात मस्त देश

LetsUp | Travel

1) थायलंड : थायलंडचे नाव घेताच निसर्गरम्य बीच आठवतात. तुम्हाला येथे केवळ 250 रुपयांपर्यंत रुम मिळू शकते. तसेच 200 रुपयांत जेवण मिळू शकते.

2) नेपाळ : नेपाळ नैसर्गिक सुंदरतेने नटलेले आहे. इथे तुम्ही 600 रुपयांत तीन वेळा जेवणाचा आनंद घेऊ शकता. तसेच 270 रुपयांत तुम्ही रुमही बुक करु शकता.

3) व्हिएतनाम : स्वस्त खाणे आणि भरपूर शॉपिंगसाठी तुम्ही या देशाची निवड करु शकता. इथे व्हिएतनामी डिशची मजा केवळ 66 रुपयांत घेता येते. तसेच 200 रुपयांपर्यंत रुम बुक करण्याची सुविधा आहे.

4) चीन : चीनमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागणार नाही.या देशाची खासियत म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा खर्च फक्त 66 रुपये इतका होतो.

5) इंडोनेशिया : नैसर्गिक सौंदर्याची मजा लुटायची असल्यास इंडोनेशियाला नक्की भेट द्यावी. इंडोनेशियात तुम्ही केवळ 67 रुपयांत डिनर करु शकता. तसेच 250 रुपयांत हॉटेल बुक करु शकता.

6) कंबोडिया : कंबोडियामध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाही. येथे हॉटेलमध्ये तुम्ही 250 रुपयांपर्यंत जेवण करू शकता.

7) पेरु : जगातील कुल आणि जादुई ठिकाण म्हणजे पेरु. येथे तुम्ही 500 रुपयांत रुम बुक करु शकता. 350 रुपयांत तुम्हाला जेवण मिळते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👌 स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराने सतराव्यांदा केलं मतदान

LetsUp | Update

👉 स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार असलेले शाम शरण नेगी यांनी आपल्या आयुष्यातील 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. वयाची शंभरीपार केलेले नेगी गेली 68 वर्षे मतदानाचा हक्क बजावत आहेत. हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथे राहणारे नेगी हे निवृत्त शिक्षक असून सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे यासाठी ते नेहमी आग्रही आहेत. नेगी यांच्या हालचालींवर वार्धक्य आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या 100 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या 1 हजार 011 मतदारांपैकी नेगी एक आहेत.

👉 किन्नोर येथे पहिले मतदान 25 ऑक्टोबर 1951 मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मंडी-महासु (मंडी) या क्षेत्रासाठी मतदान केले होते. निवडणूक आयोगाने 1952 च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये त्याआधीच निवडणूका घेण्यात आल्या. नेगी यांनी त्यावेळी किन्नोर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

🏏 लोकसभेसाठीच्या सातव्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.03 टक्के मतदान

देशातील अनेक राज्यांचा पाणीसाठा चिंताजनक पातळीवर
8,00,000 तिकिटांसाठी तब्बल 3 कोटी अर्ज

यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 https://ltsup.in/ltsupwani19may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● लोकसभा निवडणूक 2019 : सातव्या व अखेरच्या टप्प्यात 59 जागांसाठी सरासरी 61 टक्के मतदान

● एक्झिट पोल : 8 मोठ्या सर्व्हे एजन्सींच्या सर्वेक्षणात एनडीए बहुमताच्या जवळ, आता प्रतीक्षा 23 मेची

● राजकीय पक्षांकडून फेसबुक व गुगल आदी डिजिटल माध्यमांत प्रचारासाठी 53 कोटींपेक्षा अधिक खर्च

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● ब्रिटनमध्ये नवीन शस्त्र कायदा मंजूर; शिख बांधवांना पारंपारिक कृपाणाचा अधिकार कायम

● श्रीलंकेतील अनेक सरकारी विभाग तसेच परराष्ट्र मंत्रालयासह काही मंत्रालयाच्या वेबसाईट्सवर सायबर अटॅक

● राजस्थानच्या आरोग्य कल्याण ब्लड बँकेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त देशातील पहिले ब्लड बँक वॉलेट जारी

● अरुणाचल प्रदेश : बंदी घातलेल्या एनएससीएन (के) या अतिरेकी संघटनेच्या तिघांना अटक, शस्त्रास्त्र जप्त

● अॅमेझॉनच्या भारतीय ग्राहकांना अॅपच्या माध्यमातून देशांतर्गत विमानांचे तिकीट आरक्षित करता येणार

● युवराज सिंगचा निवृत्तीचा विचार? जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक

● 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार रमाबाईंची भूमिका

● अहमदनगर - शहरातील जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे आवाहन

● अहमदनगर - डॉ. अशोक विखे यांचे उद्यापासून लोणी येथे होणारे उपोषण तूर्त स्थगित, आचारसंहिता संपल्यानंतर 27 मे नंतर करणार उपोषण

● अहमदनगर - योगासने व मल्लखांब प्रात्यक्षिकांच्या एरियल स्पोर्ट्सच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नगरमधील तिघांची राष्ट्रीय पंच म्हणून निवड

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 जाणून घ्या सर्व एक्झिट पोलचे आकडे एकाच ठिकाणी

LetsUp | Politics

देशभरातील अनेक एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यानुसार देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा अंदाज बहुतेक सर्व संस्था-वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे यंदा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या जागाही वाढण्याचा अंदाज आहे. याबाबत जाणून घेऊयात...

🎯 एक्झिट पोल : (भाजप+), (काँग्रेस+), (इतर)

टीव्ही 9-सी व्होटर : (287), (128), (127)

टाईम्स नाऊ-VMR : (306), (132), (104)

एबीपी-नेल्सन : (267), (127), (148)

न्यूज 24 - टुडेज चाणक्य : (340), (70), (133)

न्यूज नेशन : (282-290), (111-126), (130-138)

न्यूज 18- IPSOS : (336), (82), (124)

इंडिया न्यूज-पोल स्ट्रॅट : (287), (128), (127)

न्यूज एक्स : (242), (164), (136)

रिपब्लिक-जन की बात : (305), (124), (87)

💁‍♂ महाराष्ट्रात कुणी किती जागा दिल्या?

🎯 एक्झिट पोल : (भाजप+), (काँग्रेस+), (इतर)

टीव्ही 9-सी व्होटर : (34), (14), (00)

टाईम्स नाऊ -VMR : (38), (10), (00)

एबीपी-नेल्सन : (34), (13), (01)

न्यूज 24 - टुडेज चाणक्य : (38), (10), (00)

न्यूज नेशन : (33-35), (13-15), (00)

न्यूज 18- IPSOS : (41-45), (3-6), (01)

इंडिया न्यूज -पोल स्ट्रॅट : (34), (14), (00)

न्यूज एक्स : (36), (11), (01)

रिपब्लिक-जन की बात : (34-39), (8-12), (01)

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👌 आरोग्यासाठी हळद फार गुणकारी

LetsUp | Health

आयुर्वेदात हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे. सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे. हळदीच्या वापरामुळे जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे. आज त्याबाबत जाणून घेऊ...

1) हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन औषध म्हणून काम करते. जे शरीरातील सूज कमी करण्यास मदतगार ठरते.

2) बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायला हवे.

3) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.

4) हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. तसेच रक्त साफ होण्यासही मदत होते.

5) हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.

6) हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो.

7) एका रिसर्चनुसार, हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाईप-2 च्या डायबिटीजचा धोकाही टळतो.

8) गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ ऑटोमोबाईल-तंत्रज्ञान कुठं काय?

LetsUp | Auto-Tech

1) Amazon ची नवी सेवा : आता Amazon च्या भारतीय ग्राहकांना त्यांच्या अ‍ॅपच्या माध्यमातून देशांतर्गत विमानांचे तिकीट आरक्षित करता येणार आहे.

दरम्यान, प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकीट रद्द केल्यास अ‍ॅमेझॉन कोणतेही शुल्क आकारणार नाही. याव्यतिरिक्त शॉपिंग, पैसे ट्रान्सफर करणे, बिल पेमेंट, मोबाइल रिचार्जही ‘अ‍ॅमेझॉन पे’च्या अ‍ॅपच्या सहाय्याने करता येतील.

2) Honda CBR650R ची डिलिव्हरी सुरु : होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडियाने आपल्या नव्या मिडलवेट स्पोर्टबाईक Honda CBR650R ची डिलिव्हरी सुरु केली आहे. भारतात या बाईकची किंमत 7.70 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.

या बाईकमध्ये 4 सिलेंडर असलेले 649 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन लिक्विड कुलिंगसह उपलब्ध आहे. 649 सीसी चे इंजिन 12,000rpm सह 94bhp पावर जेनरेट करते. तसेच 64Nm चा पीक टॉर्क देते.

3) जगातील पहिली 3D प्रिंटेड कार सादर : लॉस एंजेलिस येथील स्टार्टअप कंपनी डिव्हर्जेंटने 3 डी-प्रिंटिंग तंत्राद्वारे जगातील पहिली हायपर कार 'ब्लेड' (Blade) सादर केली आहे.

एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये जे तंत्रज्ञान वापरले जाते ते या कारचे डिझाईन बनवण्यासाठी वापरले आहे. या कारचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याची गति आणि डिझाईन आहे.

4) वापरा Snapchat Baby Filter : स्नॅपचॅटने आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये बेबी फिल्टरचा पर्याय दिला आहे. या माध्यमातून तुमचा चेहरा डिटेक्ट होवून मग फोटो क्लिक होतो आणि मग चेहरा लहान मुलाप्रमाणे बदलतो.

या सर्व प्रक्रियेसाठी केवळ 2-3 सेकंद लागतात. विशेष म्हणजे फक्त फोटो काढतानाच नव्हे तर काढलेला फोटो देखील तुम्ही या फिचरद्वारे लहान मुलासारखा करु शकता.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup