LetsUpp Marathi
5.3K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

🎁 बीएसएनल घेऊन आली आहे ग्राहकांसाठी खास धमाकेदार ऑफर जाणून घ्या... यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsup13may

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● देशातील किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 2.92 टक्क्यांवर पोहोचली, हा सहा महिन्यांतील उच्चांक

● नेत्रहिनांना चलनी नोटा ओळखण्यासाठी मदत व्हावी या हेतूने RBI चा मोबाईल अॅप तयार करण्याचा विचार

● लोकसभा निवडणूक : व्हीव्हीपॅट पावत्या सर्वात शेवटी मोजणार, त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● चिनी दुग्धपदार्थावरील बंदी कायम, मेलॅमाईन भेसळीमुळे ‘एफएसएसआय’चा निर्णय

● पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था यांच्यात कर्जाविषयी करार, मिळणार 6 अब्ज डॉलरचं कर्ज

● ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची ईडीकडून 8 तास चौकशी

● राज्यात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये उन्हाचा चटका आणखी वाढणार : हवामान विभाग

● हिरो मोटोकॉर्पने भारतात Maestro Edge 125 स्कूटर केली लाँच, किंमत सुरुवात 58 हजार पासून

● भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोमचे 51 किलो गटात व्यावसायिक पदार्पण

● रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये दाक्षिणात्य अभिनेता अभिमन्यू सिंग साकारणार खलनायकाची भूमिका

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤨 किरकोळ महागाईने गाठला 6 महिन्यांतील उच्चांक

LetsUp | Update

प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे देशातील किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 2.92 टक्क्यांवर पोहोचली

💁‍♂ केंद्र सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फ आकडेवारी घोषित, किरकोळ महागाईचा हा 6 महिन्यांतील उच्चांक आहे

📝 प्रसिद्ध आकडेवारी काय सांगते? :

फळभाज्या, मांस, मासे, अंडी यांच्या दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ महागाईवर झाला.
यापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये किरकोळ महागाईचा दर 3.38 टक्क्यांवर पोहोचला होता.
एप्रिलमध्ये फळभाज्यांच्या किंमतीत मार्चच्या तुलनेत 2.87 टक्क्यांनी वाढ झाली.
इंधनदरांत झालेली वाढही (2.56 टक्के) किरकोळ महागाईसाठी मारक ठरली.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 नीति आयोगात विविध पदांची भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव पद संख्या अशी :

यंग प्रोफेशनल्स : 60
इनोवेशन लीड : 12
मॉनिटरिंग & इवॅल्यूएशन लीड : 10
प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट : 02
सिनिअर प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट : 01
कंसलटेंट (Editor) : 01
पब्लिक पॉलिसी एनालिस्ट : 02

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: दि. 22 मे 2019

🗞 अधिक माहितीसाठी: https://ltsup.in/2Jh0j8F

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 आज छत्रपती संभाजी महाराज जयंती

LetsUp । Special

💁‍♂ छत्रपती संभाजीराजे भोसले (14 मे,1657–11 मार्च,1689) हेे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेणारे, प्रजेचे संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे मराठा साम्राज्य संस्थापक शिवाजी महाराज भोसले यांचे जेष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती.

पराक्रमी संभाजी महाराज: शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांनी आपल्याकडे घेतली. 16 जानेवारी इ.स.1681 रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर राज्याभिषेक झाला. अल्पवधीतच त्यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर मराठा साम्राज्याच्या विस्तार केला.

मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला. महाराजांनी गनिमी कावा करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी एकूण 120 युद्धे लढली व व ही सर्व युद्धे त्यांनी जिंकली असा उल्लेख आढळतो.

👌 शौर्य गाथा: संभाजी राजांनी आपल्या अतुल्य शौर्य आणि लष्करी तेजाने आपले सामर्थ्य सिद्ध केले. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी त्यांनी रामनगर येथील पहिली लढाई जिंकली. वयाच्या 14 व्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांना सोळा भाषा अवगत होत्या. शिवाजी महाराज जरी नौसेनेचे जनक असले तरी संभाजी महाराजांनी पाच जहाज बांधणीचे कारखाने उभारून मोलाचे योगदान दिले.

💪 ‘मोडेन पण वाकणार नाही’ हाच बाणा घेऊन जन्माला आलेल्या संभाजी महाराजांनी पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या 70 हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले.

📍 महाराजांची विशेष कामे:

जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला.
युध्द भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार केले.
दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले.
रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.

👀 छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे शत्रूच्या हाती लागले. 11 मार्च 1689 रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले.

🙏 स्वराज्याचे संरक्षक आणि शिवरायांच्या शंभू छावा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!

👏 लेट्सअपकडून त्रिवार वंदन: http://bit.ly/2HhQAN7

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 Letsup I General Knowledge

1) थ्रिसूर पूरम हा भारताच्या कोणत्या राज्यातला सर्वात लोकप्रिय उत्सव आहे?

उत्तर : केरळ (एप्रिल-मे)

2) 2019 सालाचा ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ यंदा कोणत्या तारखेला पाळण्यात आला?

उत्तर : 11 मे 2019 I संकल्पना : "प्रोटेक्ट बर्ड्स: बी द सोल्यूशन टू प्लास्टीक पोल्युशन"

3) सन 2019 मध्ये कोणाला ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत लोक मानले गेले आहे?

उत्तर : भारतीय उद्योगपती गोपीचंद हिंदुजा आणि श्रीचंद हिंदुजा

4) कन्व्हेंशन ऑन मायग्रेटरी स्पेसीज (CMS) हा कोणत्या जागतिक संस्थेचा एक भाग आहे?

उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP)

5) इंडियन स्टाफिंग फेडरेशन (ISF) याच्यानुसार, 2023 सालापर्यंत भारतीय तंत्रज्ञान उद्योगात अंदाजे किती मनुष्यबळ असेल?

उत्तर : 7 दशलक्ष

6) कोणत्या आशियाई देशात 2019 सालाच्या मे महिन्यात ‘मँकीपॉक्स’ रोगाचे देशातले पहिले-वहिले प्रकरण आढळले?

उत्तर : सिंगापूर (‘मँकीपॉक्स’ हा विषाणूजन्य रोग आहे.)

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
फेसबुकचे जनक 'मार्क झुकरबर्ग' यांचा आज वाढदिवस

LetsUp । Special

🎯 फेसबुक सारख्या जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमेरिकन करोडपती मार्क झुकरबर्ग यांचा आज वाढदिवस.

👀 झुकेरबर्ग यांचा जन्म 14 मे 1984 ला न्यूयॉर्क येथे झाला. माध्यमिक शाळेत शिकत असतानाच झुकेरबर्ग यांनी प्रोग्रॅमिंग शिकून घेतले होते. मार्क यांना कॉम्प्युटर प्रोग्रॅम तयार करण्यात आवड होती.

💁‍♂ हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्क यांनी आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. फेसबुक लोकांच्या पसंतीस उतरल्यामुळे अवघ्या दहा वर्षांतच फेसबुक हे 1 अब्ज लोकांपर्यंत पोहचले.

💰 नोव्हेंबर 2017 पर्यंत मार्क यांची संपत्ती 74.2 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी होती. फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांची गणना होती.

📍 झुकरबर्ग यांच्याविषयी काही खास:

मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चॅनची लव्हस्टोरी कॉलेजपासून सुरु होती.
मार्क यांना लाल-हिरव्या रंगाचा रंगांधळेपणा असल्याने फेसबुकचा रंग निळा आहे.
त्यांना कुत्रे फार आवडतात, त्याच्याकडे हंगेरियन ब्रीडचा कुत्रा असून त्याचं नाव बीस्ट आहे.
मायक्रोसॉफ्ट आणि एओएल (AOL) या कंपन्याने त्यांना ऑफर केली होती. पण त्याने हॉवर्डला जाण्याचा निर्णय घेतला.
मार्क यांनी हॉस्टेलवरील मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकची सुरुवात केली होती.
'सोशल नेटवर्क' नावाचा चित्रपटही मार्क झुकरबर्कवर बनवण्यात आला आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात होणार बदल

LetsUp । Update

नवीन गणवेशासाठी संरक्षण खात्याने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून मागवल्या सूचना.

💁‍♂ भारतीय सैन्यदलाच्या गणवेशामध्ये येत्‍या काळात बदल करण्याचा विचार संरक्षण मंत्रालयाकडून सुरू आहे. त्‍यामुळे भारतीय सैन्यदलात सेवेत असणारे अधिकारी येत्‍या काळात नव्या गणवेशात दिसण्याची चिन्हे आहेत.

📍 भारताच्या विविध राज्‍यातील हवामानातील विविधतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

🧐 या बदलांचा विचार सुरु: अमेरिका आणि इंग्लंडच्या गणवेशांमध्ये पुरस्कारांचे पदके भारतीय सैन्याप्रमाणे खांद्यावर नाही तर छातीवर लावले जातात. नव्या गणवेशात असे काही करता येईल का याचा विचार केला जातो आहे. तसंच नवीन गणवेशात शर्ट आणि पॅन्ट दोन वेगळ्या रंगांच्या घेता येतील का हेही विचारात घेतलं जातं आहे.

🗣 गणवेश बदलणं ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये अनेक स्तरांवर चर्चा होऊन नवीन गणवेशाचे डिझाइन निश्चित करण्यात येईल, अशी माहिती सेनेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

👔 जवानांकडे चार प्रकारचे गणवेश :

युद्धभूमीवरील गणवेश (कॉम्बॅट),
शांततेच्या काळातील गणवेश (पीस टाइम),
जेवतानाचा युनिफॉर्म (मेस)
विशेष कार्यक्रमांचा गणवेश (सेरिमोनियल)

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

👨‍⚕ वैद्यकीय प्रवेशासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय....

🌧 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मान्सूनमुळे वाढणार चिंता... यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani14may

🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/8PFcp7
LetsUp News Updates

● 'जैश'च्या एका फरार दहशतवाद्याला (अब्दुल मजीद बाबा) अटक करण्यात दिल्ली पोलिसांना मिळाले यश

● सिटी बँक आणि पेटीएम यांनी एकत्रितपणे क्रेडिट कार्ड योजना केली लाँच, कॅश बॅकचीही ऑफर

● जगभरात शिक्षणाची आर्थिक मदत 2% घटली, ही घट 28 कोटी 80 लाख डॉलरसमान

----------------------
फ्लिपकार्टवर 'बिग शॉपिंग डे' सुरु,
मिळवा 75% डिस्काउंट, 💳 क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शनवर 10% तात्काळ डिस्काउंट, 👉 त्यासाठी क्लिक करा : http://fkrt.it/sgcw7LuuuN
----------------------

● इराणकडून तेल आयातबाबतचा मुद्दा निवडणुकीनंतरचे सरकार हाताळील; इराणप्रश्नी भारताचा सावध पवित्रा

● आरोही पंडीत एलएसएमध्ये एकट्याने अटलांटिक महासागर ओलांडणारी पहिली महिली बनली

● राज्य सरकारचा वेळकाढूपणा दुष्काळग्रस्तांसाठी नुकसानदायक; हायकोर्टाने खडसावले

● वनप्लस कंपनीचा नवा फोन One Plus 7 आणि One Plus Pro सादर, याची किंमत ₹ 32,999 पासून सुरू होईल

● शाओमीची भन्नाट कल्पना, आता फोन वेंडिंग मशीनच्या माध्यमातून खरेदी करता येणार

● भारताच्या जी.एस. लक्ष्मी यांचा आयसीसीने इंटरनॅशनल पॅनल ऑफ मॅच रेफ्रीमध्ये केला समावेश

● आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाकडे पर्यायांची कमतरता नाही : मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री

● आता हृतिक रोशन आणि यामी गौतमचा ‘काबिल’ हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 तंत्रज्ञानात कुठं काय?

LetsUp | Tech

1) OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro लॉन्च

अखेर वनप्लसने दोन नवे स्मार्टफोन वनप्लस 7 प्रो आणि वनप्लस 7 लॉन्च केले. फोन्सची नावे आहेत.

वनप्लस 7 प्रो मध्ये 8 कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर आहे.
कंपनीनुसार, या मोबाईलची बॅटरी केवळ 20 मिनिटात 48 टक्के चार्ज होते.
हा फोन गरम होऊ नये यासाठी यामध्ये लिक्विड कुलिंग ही सिस्टिम वापरण्यात आली आहे.

6.7 इंचाचा FLUID AMOLED डिस्प्ले I ब्लु लाईट फिल्टर I फोनच्या समोरील आणि मागील बाजूस Curved edges I Quad HD+Resolution

👍 डॉल्बी सपोर्टेड स्पीकर्स: या मोबाईलमध्ये डॉल्बी सपोर्टेड स्पीकर्स देण्यात आले असून या फोनच्या कॅमेरामध्ये गुगल लेन्सचा सपोर्ट आहे. त्याच्या आधारे कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा फोटो काढल्यानंतर त्याच्याविषयी माहिती मिळवता येईल.

🎯 वनप्लस 7 प्रो च्या किंमती :

6 GB रॅम I 128 GB इंटर्नल : 48,999 ₹
8 GB रॅम I 256 GB इंटर्नल : 52,999 ₹
12 GB रॅम I 256 GB इंटर्नल : 57,999 ₹

🎯 वनप्लस 7 च्या किंमती :

6 GB रॅम I 128 GB इंटर्नल : 32,999 ₹
8 GB रॅम I 256 GB इंटर्नल : 37,999 ₹

2) व्हॉट्सअ‍ॅप लगेच अपडेट करा! : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्सना आवाहन केले आहे कि, तुमचे व्हॉट्सअ‍ॅप लवकर अपग्रेड करा. कारण व्हॉट्सअ‍ॅपवर 'स्पायवेअर' डिटेक्ट झाला आहे.

हा स्पायवेअर तुमच्या फोनमध्ये गुप्तहेरासारखं काम करतो, असे म्हटले जाते. हा स्पायवेअर अ‍ॅपवरून कॉलिंग केल्यावर फोनमध्ये शिरतो. या कथित स्पायवेअरच्या बाबतीत सांगितले जातं की, हा इस्त्राईलच्या एका सायबर ग्रुपने हा बनवला आहे.

बातमीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने यातील त्रुटी आता दूर केल्या आहेत. जेणे करून हा स्पायवेअर तुमच्या फोनमध्ये येणार नाही. यामुळे कंपनीने सांगितलं आहे की, युझर्सने हा व्हॉट्सअ‍ॅप अपग्रेड करणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच नेहमी आपली ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ देश आणि सौर ऊर्जा क्षमता मेगावॅट

LetsUp | Statistics

चीन : 175,018
जपान : 55,500
यूएस : 49,692
जर्मनी : 45,930
भारत : 26,869
इटली : 20,120
यूके : 13,108
ऑस्ट्रेलिया : 9,763
फ्रान्स : 9,483
साऊथ कोरिया : 7,862
तुर्की : 5,063
स्पेन : 4,744
कॅनडा : 3,113
साऊथ आफ्रिका : 2,595
मेक्सिको : 2,541
ब्राझील : 2,296
पाकिस्तान : 1,568

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 जीएस लक्ष्मी ICCच्या पहिल्या मॅच रेफ्री

LetsUp | Update

ICCच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलवरची पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात, आता या पॅनलमध्ये भारताच्या जीएस लक्ष्मी यांचा समावेश.

👍 या नियुक्तीसह लक्ष्मी आता महिला क्रिकेटच्या बरोबरीने पुरुषांच्या सामन्यासाठीही मॅचरेफ्री म्हणून काम करतील.

🧐 जीएस लक्ष्मी कोण? :

1986 ते 2004 या कालावधीत त्यांनी भारतीय संघासह साऊथ सेंट्रल रेल्वे, आंध्र प्रदेश, बिहार, पूर्व विभाग, दक्षिण विभाग अशा संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर पोलोसक यांनी पुरुषांच्या सामन्यात अंपायरिंग करत नवा मापदंड प्रस्थापित केला होता.
51 वर्षीय लक्ष्मी 2008 पासून भारतातील महिला क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
आतापर्यंत त्यांनी 3 महिला वनडे तसेच 3 महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम केले आहे.

💫 आयसीसीच्या अंपायर्स पॅनेलमध्ये नियुक्त होणाऱ्या कॅथी क्रॉस या पहिला महिला अंपायर होत्या. त्या गेल्या वर्षी निवृत्त झाल्या.

🗣 निवडीनंतर लक्ष्मी यांची प्रतिक्रिया :

आयसीसीच्या मॅचरेफ्री पॅनेलमध्ये नियुक्ती होणं हा माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान आहे. माझ्या नियुक्तीसह अन्य महिला मॅचरेफ्रीना प्रोत्साहन मिळेल.
खेळाडू म्हणून प्रदीर्घ कारकीर्दीनंतर मॅचरेफ्री म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्याकडे आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना या अनुभवासह जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न असेल.
आयसीसी, बीसीसीआय, क्रिकेटविश्वातील माझे वरिष्ठ, कुटुंबीय, सहकारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचे मी आभार मानते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंतची वाटचाल करू शकले आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎂 'धकधक गर्ल' माधुरीचा आज वाढदिवस

LetsUp | Birthday Special

आपल्या सुमधूर हास्याने आणि सौंदर्याने घायाळ करणाऱ्या 'धकधक गर्ल' चा अर्थात माधुरीचा दीक्षितचा आज वाढदिवस. 52 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माधुरीच्या सौंदर्याचे आजही लाखो लोक दिवाने आहेत. चला आज जाणून घेऊया तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी...

15 मे 1967 साली मुंबईमध्ये माधुरीचा जन्म झाला. शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. तिला लहाणपणापासून डॉक्टर बनण्याचीही इच्छा होती. पण, ती पूर्ण न झाल्याने तिने आपला जोडीदार डॉक्टरच निवडला. माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले.

1984 मध्ये 'अबोध' सिनेमातून माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र माधुरीला लगेच लोकप्रियता मिळाली नाही. जवळपास चार वर्षांनंतर 'तेजाब' सिनेमाने तिला खरी ओळख मिळाली. माधुरीने त्यानंतर राम लखन, परिंदा, दिल, साजन, बेटा, खलनायक, हम आपके हैं कौन, राजा आणि दिल तो पागल है या सारख्या सुपरहिट सिनेमांत काम केले.

💃 सर्वोत्तम नृत्यांगना : वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तिने कथ्थक नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. खुद्द कथ्थक नृत्यातील दिग्गज बिरजू महाराज यांनी माधुरी ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम नृत्यांगना असल्याचे म्हटले होते.

🎯 आधी अपयश मग यश : सुरुवातीला माधुरीच्या 'अबोध', 'स्वाती', 'हिफाजत', 'दयावान' आणि 'खतरों के खिलाडी' याचित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला होता. अखेर 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेजाब' या चित्रपटामुळे तिच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली.

👍 14 फिल्मफेअर नामांकनं : माधुरी ही अशी एकमेव अभिनेत्री आहे जिला 14 फिल्मफेअर नामांकनं, चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि दोन दुसऱ्या विभागातील पुरस्कारही मिळाले होते.

👀 वजनदार पोषाख : 'देवदास' चित्रपटातील 'काहे छेड छेड मोहे' या गाण्याच्या चित्राकरणाच्या वेळी माधुरीने घातलेल्या संपूर्ण पोषाखाचं वजन हे जवळपास तीस किलो इतकं होतं. नीता लुल्ला या फॅशन डिझायनरने हा पोषाख डिझाईल केला होता.

💸 सर्वाधिक मानधन : कारकिर्दीच्या एका टप्प्यावर यशशिखरावर असताना माधुरी हिंदी कलाविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती. 'हम आपके है कौन' या तिने जवळपास 2.7 कोटी रुपये आकारले होते, असे म्हटले जाते.

😍 एम.एफ. हुसैन यांनाही भुरळ : प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन हेसुद्धा 'हम आपके है कौन' या चित्रपटात माधुरीला पाहून भारावले होते. त्यांनी हा चित्रपट 67 वेला पाहिला होता. तिच्या 'आजा नचले' या चित्रपटासाठी तर त्यांनी संपूर्ण चित्रपटगृहातील तिकीटीच विकत घेतल्या होत्या.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 आज जागतिक कुटुंब दिवस

LetsUp | Special

🎯 15 मे 1994 रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात आला होता. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जागतिक कुटुंब दिवसाला विशेष महत्त्व आले आहे. आजच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धत दिवसेंदिवस वाढत आहे.

💁‍♂ चला तर आज जागतिक कुटुंबदिवसाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी आवश्यक गोष्टी जाणून घेऊयात…

सध्या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या उपकरणांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग व्यापून टाकला आहे. एकतर आपण फार कमी वेळ घरात असतो. त्यात या उपकरणांमुळे आपण घरातील व्यक्तींना वेळ देत नाही. त्यामुळे घरात आल्यावर मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही ही उपकरणे बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला आपले कुटुंब एकत्रित हवे असेल तर सर्वांना आवडेल, रुचेल असा एखादा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही एकत्रितपणे सायकलिंग करु शकता, एकत्रितपणे एखादे पुस्तक वाचू शकता, सगळ्यांना आवडतील अशी गाणी एकत्रितपणे ऐकू शकता.

घरातील सर्वांनी किमान सकाळचा नाष्ता किंवा रात्रीचे जेवण एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे दिवसभरातील सर्वांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल माहिती होते.

महिन्यातील एक दिवस सर्वांच्या वेळा बघून अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवसाच्या आऊटींगला जाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा एकमेकांमधील संवाद वाढण्यास मदत होईल.

मोकळ्या वेळात तुमच्या मुलांशी गप्पा मारा. त्यांना त्यांच्या शाळेतील, कॉलेजमधील गोष्टी, मित्रमैत्रीणींविषयीच्या गोष्टी विचारा. त्यानंतर तुमच्या लहानपणीच्या गोष्टीही शेअर करा. त्यामुळे मुलांना वेगळ्या गोष्टींची माहिती होईल.

💫 या दिवशी जगातील सर्व कुटुंबीय आनंदी, सुखी समृद्धी व एक‍त्र कुटुंबपद्धतीत राहावी, एवढीच या दिवशी अपेक्षा!

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 नौदल भरतीसाठी आता प्रवेश प्रक्रिया

LetsUp | National

नौदलाकडून अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार आहे.

💁‍♂ यंदाच्या सप्टेंबरमध्ये इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (आयएनईटी) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास थेट नौदलात अधिकारी होण्याची संधी मिळेल. या परीक्षेच्या माध्यमातून दोन प्रकारच्या (कायम आणि ठराविक कालावधीसाठी) सेवेतल्या अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

🧐 सध्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. आता आयएनईटीकडून उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणांच्या आधारे उमेदवार निवडले जातील.

दर सहा महिन्यांनी परीक्षेसाठी सूचना प्रसिद्ध केली जाईल.

भारतीय नौदलाच्या संकेतस्थळावर (joinindiannavy.gov.in) याबद्दलची माहिती उपलब्ध आहे.

या माहितीच्या आधारे अर्ज करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या पात्रतेनुसार पर्याय निवडू शकतात.

🎯 यूपीएसई परीक्षेद्वारे भरती: या परीक्षेसोबत यूपीएसईच्या माध्यमातून होणारी भरतीदेखील सुरूच असेल. यूपीएसई कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस एक्झामच्या (सीडीएस) माध्यमातून नौदलात अधिकाऱ्यांची भरती केली जाते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
😱 वापराविना आधार डिअ‍ॅक्टिवेट होणार

LetsUp | Special

🎯 प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. आधार कार्ड कागदपत्र नाही तर ओळख पत्र देखील आहे. कोणत्याही कामकाजात आधारची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते. UIDAI अनुसार तीन वर्षांपर्यंत व्यक्तीने आधार वापरले नाही तर आधार बंद होणार आहे.

🧐 जाणून घ्या आधाराचे स्टेटस: यासाठी आपल्याला UIDAI च्या संकेतस्थळाला भेट देत, सर्वप्रथम आधार सर्व्हिसेज पर्याय निवडा. नंतर 'वेरिफाय आधार नंबर' वर आपला आधार नंबर टाका. आपण आधार नंबर टाईप केल्यावर ग्रीन सिग्नल असेल तर अ‍ॅक्टिवेट आणि रेड सिग्नल असेल तर आधार कार्ड डिअ‍ॅक्टिवेट झाला आहे.

💁‍♂ या प्रकारे करा अ‍ॅक्टिवेट: आपले डिअ‍ॅक्टिवेट आधार पुन्हा अ‍ॅक्टिवेट करण्यासाठी आपल्याला सर्व आवश्यक कागदपत्रासह आधार केंद्रावर जावं लागेल. तेथे जाऊन आपल्याला आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल, नंतर बायोमेट्रिक वेरिफाय केलं जाईल. नंतर आपला आधार अ‍ॅक्टिवेट होईल. यासाठी आपल्याला 50 रुपये फीस देखील भरावी लागेल.

📱 या व्यतिरिक्त या प्रक्रियेत आपल्याला आपला एक वैध मोबाइल नंबर देखील द्यावा लागेल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ उन्हाळ्यात सन टॅनिंगची समस्या? हे उपाय नक्की करा

LetsUp | Tips

🎯 उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा काळवंडणे ही मोठी समस्या असते. कडक उन्हामध्ये फिरल्यास चेहऱ्यावर आणि शरीरावर तांबूस काळसर रंगाचे डाग उमटतात, त्यांना सनटॅन म्हटले जाते. उन्हाळ्यात त्वचा कोमल आणि स्वस्थ ठेवणे तसेच सनटॅनपासून बचाव करणे कठिण जाते. या समस्येवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगच्या समस्येसाठी काही सोपे उपाय...

एका वाटीत थंड दही घ्या आणि त्यात थोडी हळद मिसळा. हे मिश्रण आंघोळीच्या वीस मिनिटं आधी सन टॅन झालेल्या जागेवर लावून ठेवा. चेहऱ्यावर, गळ्यावरही लावू शकता. यामुळे टॅनिंग कमी करण्यास चांगली मदत होते.

काकडीच्या काही चकत्या बारिक करुन त्याचं मिश्रण तयार करा. यात दोन चमचे दूध पावडर आणि काही थेंब लिंबू रस मिसळा. हे मिश्रण प्रभावित झालेल्या भागावर लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून एक वेळा हा प्रयोग केल्याने त्वचा चमकदार होऊन टॅनिंगही कमी होते.

टॉमेटो दोन भागात कापून त्याच्या एका भागाने त्वचेवर चांगला मसाज करा. टॉमेटोचा रस काढून तोही लावता येतो. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. टॅनिंगची समस्याही दूर होते.

पपई केवळ खाण्यासाठईच नाही तर त्वचेसाठीही गुणकारी आहे. पपईमुळे त्वचा स्वच्छ होण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते. पपईचा गर काढून तो हाता-पायांवर, चेहऱ्यावर लावल्याने चांगला फायदा होतो. पपईमुळे त्वचेला पोषणही मिळते.

त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद फायदेशीर ठरते. टॅनिंग दूर करण्यासाठी हळद, लिंबू रस आणि कच्चं दूध हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. पहिल्या काही वेळांमध्ये फरक दिसू लागेल.

टॅनिंग घालवण्यासाठी लिंबूचा रस सर्वात सोप्पा आणि अतिशय गुणकारी उपाय आहे. लिंबू रस टॅन झालेल्या जागेवर लावा आणि 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे लवकर फायदा मिळतो. परंतु लिंबू रसाचे अधिक प्रमाणही ठेऊ नये, यामुळे त्वचेला नुकसान पोहचू शकते.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी

LetsUp | Wani

🚀 भारत लवकरच क्षेपणास्त्रांची पहिली बॅच निर्यात करणार..

नाशिक येथील ज्योतिष अधिवेशनाला विरोध... यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण

📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!

🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani15may

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup