LetsUpp Marathi
5.29K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
📣आता ड्रायव्हिंग लायसन्स होणार स्मार्ट

LetsUp । Update

ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्याच्या नियमामध्ये केंद्र सरकारकडून बदल.

💁‍♂ 1 ऑक्टोबर 2019 नंतर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पूर्ण देशात एकसारखेच होणार आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारनं सूचना जारी केली आहे. या नव्या डीएल किंवा आरसीमध्ये फक्त 15 ते 20 रुपयांचा खर्च येणार आहे.

📍 आता प्रत्येक राज्यात लायसन्स आणि आरसी बुकचा रंग एकसारखाच असणार आहे.

👉 हे आहेत फायदे

नव्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीमध्ये पहिल्यांदाच मायक्रोचिप आणि क्यूआर कोड राहणार आहे.

वाहनधारकाने नियमांचं उल्लंघन केल्यास ते लपून राहणार नाही.

ट्रॅफिक पोलिसांजवळील डिव्हाइसमध्ये कार्ड टाकल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन होऊन वाहनचालकांची माहिती मिळणार.

दिव्यांग चालकांचा विचार करून खास डिझाईन करण्यात आलं आहे.

प्रदुषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही आरसी बुकमध्ये राहणार आहे.

💳 राज्यात 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाड्यांचं नोंदणी प्रमाणपत्र पीवीसीवर आधारित होणार आहे.

👍 या निर्णयामुळे वाहनधारकांसह ट्रॅफीक पोलीसांनाही मोठा फायदा होणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 आधारकार्ड मधील जन्मतारीख बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

LetsUp । Special

💁‍♂ जर आपल्या आधार कार्ड मध्ये जन्म तारीख बरोबर नसेल तर, आपण ते आधार केंद्रावर किंवा ऑनलाईन बदलू शकतो. तसेच यूआयडीएआयवर दिलेल्या माहितीनुसार, तारखेच्या बदलासाठी खालील कागदपत्र वैध असतील. या कागदपत्रांसह आपण आधार सुधारू शकतो.

👉 कागदपत्र:

जन्माचा दाखला
पासपोर्ट
ग्रुप 'ए' गॅझेटेड ऑफिसराने लेटरहेड वर दिलेला बर्थ सर्टिफिकेट
पॅन कार्ड
कोणत्याही सरकारी बोर्ड किंवा विद्यापीठाचे मार्कशीट
सरकारी फोटो ओळखपत्र ज्यामध्ये जन्मतारीख दर्शनीय असेल.
केंद्र / राज्य सरकारचे पेन्शन पेमेंट ऑर्डर
केंद्र सरकारच्या आरोग्य केंद्राचे आरोग्य कार्ड.

📍 आधारावरील जन्म तारखेत सुधारणा करण्यासाठी आपल्याला हे कागदपत्र ऑनलाईन स्कॅन करावे लागतील.

🧐 या व्यतिरिक्त बँक, पोस्ट ऑफिस आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये देखील आपण जन्मतारीख सुधारू शकतो.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 *_ऐका हो ऐका..!!_*

👉 _जाणून घेऊया आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात_

*लेट्सअप वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा* : 👉 http://bit.ly/2VoRjEQ
LetsUp News Updates

● रिझर्व्ह बँकेकडून सलग तिसऱ्या पतधोरणामध्ये रेपो दरात पाव टक्का कपात केली जाण्याची शक्यता

● नीरव मोदीला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला, पुढील सुनावणी 30 मे रोजी

● श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : पोलिसांनी सात आत्मघातकी दहशतवाद्यांना केली अटक

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● अखेर अणू करारामधून इराणचीही माघार, अमेरिकेकडून नव्याने निर्बंध लादले गेल्याचा परिणाम

● राज्यात या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान झालेल्या 9 हजार 96 रस्ते अपघातांत 3 हजार 434 जणांचा मृत्यू

● वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र लढवणार, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

● 'ईईएसएल'तर्फे आता बाजारभावापेक्षा 30 टक्के कमी दराने 'एअर कंडिशनर' उपलब्ध करून देण्यात येणार

● जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी महाराष्ट्राचे चेतन पाठारे यांची नियुक्ती

● IPL 2019 एलिमीनेटर : दिल्लीची हैदराबादवर 2 विकेटने मात; ऋषभ पंत ठरला सामनावीर

● अभिनेत्री विद्या बालन महान गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये काम करणार

● अहमदनगर - जिल्ह्यातील धरणे गेली खपाटीला; महिन्यात तीव्र पाणीटंचाई भासणार, अवघा 6 टक्केच जलसाठा

● अहमदनगर - सव्वा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही महापालिका प्रशासनाने वृक्षलागवडीची पूर्वतयारी केली नसल्याचे चित्र समोर

● अहमदनगर - चारा छावण्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या अनुदानातील 33 टक्के रक्कम तत्काळ छावणीचालकांना अदा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने केले नियोजन

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
दिल्लीची हैदराबादवर मात; आता चेन्नईशी गाठ

LetsUp | IPL Special

ऋषभ पंतच्या स्फोटक खेळीच्या जोरावर एलिमीनेटर लढतीत दिल्लीकडून हैदराबादचा 2 विकेटने पराभव

🎯 हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 163 धावांचे दिलेले आव्हान दिल्लीने 1 बॉल आधी पूर्ण केले

🏆 ऋषभ पंतने 21 चेंडूंमध्ये 49 धावांची वादळी खेळी केली, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला

💁‍♂ आता चेन्नई आणि दिल्ली यांच्यात क्वालिफायर-2 चा सामना उद्या (दि. 10 मे) रंगणार, जो जिंकेल त्याला फायनल खेळण्याची संधी मिळेल

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
सावधान! पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज 2 तास वाहतूक बंद

LetsUp | Local

💁‍♂ आज गुरुवारी दि. 9 मे रोजी दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार

👍 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मार्गदर्शक कमानी उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे

🧐 या कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे

👉 हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाने मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 कंपनी आणि स्थापना वर्ष

LetsUp | Statistics

Tesla : 2003
Lexus : 1989
Hyundai : 1967
Ferrari : 1939
Toyota : 1937
Volkswagen : 1937
Nissan : 1933
Volvo : 1927
Mercedes-Benz : 1926
Jaguar : 1922
Mazda : 1920
BMW : 1916
Audi : 1909
GM : 1908
Ford : 1903
Dodge : 1900
Fiat : 1899
Renault : 1898
Peugeot : 1896
Benz : 1883

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤨 तुम्हाला माहित आहे का?

LetsUp | Do U Know

1) नवजात बाळापासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत सर्व लोक शिंकतात. मात्र शिंक येताना माणसाचे हृदय धडकणे 1 मिलीसेकंदाने थांबते.

2) आपण किती काळ जागे राहू शकतो? तर याचे उत्तर आहे 11 दिवस. प्रत्यक्षात 11 दिवसांपेक्षा अधिक काळ कुणी जागू शकत नाही.

3) आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण इतके असते कि, त्यापासून एक इंच लांबीचा खिळा बनू शकेल.

4) प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे जसे वेगळे असतात तसेच प्रत्येकाच्या जिभेचा ठसाही वेगळा असतो. जीभ हा माणसाचा सर्वात मजबूत स्नायू आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 पाकिस्तानातून भारतात येणार रुह अफजा सरबत

LetsUp | International

पवित्र रमजानाच्या महिन्यात भारतीय बाजारपेठेतून रुह अफजा सरबत गायब.

💁‍♂ भारतात पवित्र रमजान महिना सुरु आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम लोक दिवसभर रोजा पकडतात आणि सायंकाळी इफ्तारची सुरुवात रुह अफजा सरबताने करतात. परंतु बाजरपेठेत रुह अफजा सरबताचा साठा कमी झाल्याने, भारतात त्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

🗣 भारत सरकारने परवानगी दिली तर, वाघा बॉर्डरच्या मार्गे आम्ही भारताला रुह अफजाचा पुरवठा करु शकतो, असं हमदर्द कंपनीचे पाकिस्तानमधील प्रमुख उस्मान कुरैशी यांनी म्हटलं आहे.

🧐 उत्पादन का घटले? : सरबत निर्मितीसाठी जे हर्बल्स वापरले जातात ते उपलब्ध होत नसल्याने हि समस्या निर्माण झाली आहे. जवळपास 15 एप्रिल पासून रुह अफजाचं उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. तरी काही आठवड्यांमध्ये रुह अफजा दुकानांमध्ये पुन्हा उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📱 हवामान बदलाची माहिती मिळणार मोबाईलवर

LetsUp | Update

‘कॉमन अलर्ट प्रोटोकॉल’ चाचणीच्या माध्यमातून मिळणार हवामानाचा अंदाज

💁‍♂ भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे दिली जाणारी हवामान बदलाची माहिती यंदाच्या पावसाळ्यापासून आता देशभरात थेट प्रत्येकाच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. कॉमन अलर्ट प्रोटोकॉलमार्फत हि सेवा पुरविण्यात येणार असून, याबाबतच्या चाचण्या विविध भारतीय भाषांमध्ये सुरू आहेत.

🧐 शेतकऱ्यांना फायदा : वादळी वारा व ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस, गारपीट, ढगफुटी, विजा यांमुळे अनेकदा मोठी वित्तहानी होत असते. या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या आपत्तीची माहिती अगोदरच मिळाल्याने होणारे नुकसान टाळता येणार आहे.

🗣 संबंधित भौगोलिक क्षेत्रातील हवामान बदलाची माहिती त्या क्षेत्रातील मोबाइल धारकाला मिळणार आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣25 हजार भारतीय जाणार हज यात्रेला

LetsUp । Update

जुलै महिन्यात सुरु होणाऱ्या हज यात्रेसाठी महाराष्ट्र हज समितीची तयारी पूर्ण

💁‍♂ हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी यावेळी 'हाजी मित्र' असणार आहे. हे हाजी मित्र हज यात्रेकरूंना त्यांच्या घरापासून ते विमानतळापर्यंतच्या प्रवासाकरिता मदत करतील. राज्यातून मुंबई, नागपूर, औरंगाबाद विमानतळाहून यात्रेकरू जेद्दाहसाठी रवाना होणार आहे. अशी माहिती, राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी दिली.

नागपूर विमानतळावरून 15 विमाने उड्डाणे घेणार आहे. यातून 2 हजार 387 यात्रेकरू असणार आहे. यामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगढ व विदर्भातील इतर जिल्ह्यांतील हजयात्रेकरूंचा समावेश आहे.

🎯 विदर्भातून जाणाऱ्या यात्रेकरूंचे ऑनलाईन रिपोर्टिंग करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रवासाची कागदपत्रे अगोदरच त्यांना दिली जाईल. त्यानंतर साहित्य स्कॅनिंग करून त्यांना विमातळावर पोहचविण्यात येईल.

📍 हज यात्रेसाठी सौदी अरेबिया सरकारने भारताला 25 हजारांचा अतिरिक्त कोटा मंजूर केला आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 डिजिटल मार्केटिंगमध्ये बनवा करिअर

LetsUp । Career

🧐 डिजिटल मार्केटिंग आज स्थितीत सर्वात कौशल्य पूर्ण शिक्षण आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या आहेत. त्यामुळे याक्षेत्रात करियर हा उत्तम पर्याय आहे.

📚 अभ्यासक्रमाचे स्वरूप : डिजिटल मार्केटिंगचे अभ्यासक्रम अनेक प्रकारे उपलब्ध आहेत. यात डिस्प्ले ऍडव्हरटाइज, सर्च इंजिन मार्केटिंग, सर्च इंज ऑप्टिमायजेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, इ-मेल मार्केटिंग, मोबाइल मार्केटिंग आदी प्रमुख अभ्यासक्रमाचा उल्लेख करावा लागेल.

👨‍💼 पात्रता: या अभ्यासक्रमाला कोणताही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. मात्र, मार्केटिंग अणि जाहिरातीशी निगडित असलेल्या मंडळींना या अभ्यासक्रमाचा फायदा होऊ शकतो. यात तीन दिवसांपासून ते एक वर्षापर्यंतचे विविध कोर्स विविध शैक्षणिक संस्थांत उपलब्ध आहेत.

🏢 शिक्षण संस्था :

इंडियन स्कूल ऑफ बिझनेस संस्था- हैदराबाद
डिजिटल मार्केटिंग इन बिझनेस ग्रोथ - बंगळूर
भारतीय व्यवस्थापन संस्था - काशीपूर
भारतीय व्यवस्थापन संस्था - रांची

नोकरीच्या संधी कोठे?

डिजिटल मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
सर्च इंजिन ऑप्टमायझेशन एक्सक्युटिव्ह
सोशल मीडिया मार्केटिंग एक्स्पर्ट
सर्च एंजिन मार्केटर
मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
इनबॉउन्ड मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
कॉपी रायटर
ई-मेल मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
परफॉर्मन्स मार्केटर

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 _*सादर आहे देश विदेशाची कहाणी.. लेट्सअप वाणी*_

👉 जाणून घेऊया आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात

लेट्सअप वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/2H81Yeq
LetsUp News Updates

● असोचेम-पीडब्ल्यूसीच्या अहवालानुसार भारतात 2022 पर्यंत 85.8 कोटी स्मार्टफोन वापरकर्ते होतील

● राफेलप्रकरण फेरविचार याचिका : आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

● राजीव गांधी हत्याकांडातील 7 आरोपींच्या मुक्ततेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● भूषण रामकृष्ण गवई आणि सूर्यकांत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव

● चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे 45.8 अंश सेल्सिअस इतक्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद

● बलात्काराचा आरोप असलेल्या अभिनेता करण ओबेरॉयची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

● मारुती सुझुकीने नुकतीच Wagon R भारतीय बाजारात नव्या रुपात केली लाँच, किंमत 7 लाखांच्या आस-पास

● आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान आयपीएल क्वालिफायर टू सामना रंगणार

● क्रोएिशयाचे खेळाडू इगोर स्टिमॅक (51) भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होण्याची शक्यता

● अभिनेता सलमान खानचा ईदला प्रदर्शित होणारा चित्रपट 'भारत'चं तिसरं 'ऐथे आ' हे गाणं प्रदर्शित

● अहमदनगर - चारा छावण्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेले अनुदान छावणीचालकांच्या खात्यावर शुक्रवारपासून (दि.10) जमा होण्यास सुरुवात होणार

● अहमदनगर - नगर-औरंगाबाद महामार्गावर नगर तालुक्यातील जेऊर येथे वाहन उलटून एक महिला ठार; तीन जण जखमी

● अहमदनगर - मनपा शाळेतील 105 विद्यार्थी जि. प. शाळेत होणार वर्ग, मनपाने पाठवले पत्र, शाळा होणार अखेर बंद

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 राफेल आणि अयोध्या प्रकरणी आज सुनावणी

LetsUp । Update

राफेल प्रकरणी फेरविचार मागणीच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

🧐 फेरविचार याचिका : राफेल प्रकरणात न्यायालयीन निकालानंतर काही कागदपत्रे नंतर उघडकीस आली तसेच सरकारनेही आपल्या आधीच्या प्रतिज्ञापत्रात दुरुस्ती केली त्यामुळे 14 डिसेंबरला न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.

📍 या मागणीसाठीच्या याचिकांवर आज (दि.10) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

💁‍♂ अयोध्या प्रकरणी सुनावणी आज

👍 अयोध्या प्रकरणी न्यायालयाचे खंडपीठ आज (दि.10) रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी घेणार आहे

👀 अहवालावर खंडपीठ विचार करणार: अयोध्या प्रकरणाचा वाद सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय मध्यस्थता समितीने आपला अंतरिम अहवाल न्यायालयाला सोपवला आहे. यावर विचार करण्यासाठी सुनावणी घेणार आहे. समितीने बंद लिफाफ्यात सोपवलेल्या अहवालावर खंडपीठ विचार करणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
आज चेन्नई Vs दिल्ली भिडणार

LetsUp । Ipl Special

🏏 आयपीएलच्या 12 व्या सत्रातील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सपुढे चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असणार

👍 या सामन्यातील विजेता संघ रविवारी (दि. 12) मुंबई इंडियन्सविरुद्ध विजेतेपदासाठी भिडणार

🧐 आयपीएलच्या इतिहासात दिल्ली डेअरडेविल्सने एकदाही फायनलमध्ये धडक मारलेली नाही. त्यामुळे दिल्ली यंदा इतिहास घडविणार काय? याकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असेल

🎯 दुसरीकडे, चेन्नईला मोठ्या लढतींची सवय असून हा संघ तीनदा विजेता, तर चारवेळा उपविजेता राहिला आहे, ते याची पुनरावृत्ती करतात? हे पाहणे रंजक ठरेल

सामना : सायं. 7.30 वाजता.

📍 ठिकाण : एसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤔 जाणून घ्या पीएफ आणि पीपीएफ मधील फरक!

LetsUp । Education

बऱ्याचदा पीएफ आणि पीपीएफ यामधील फरक अनेकांना माहीत नसतो. चला तर मग आज जाणून घेऊयात यातील नेमका फरक काय आहे...

1) पीएफ: नोकरदारांना निवृत्तीनंतर आर्थिक फायदा व्हावा म्हणून ही योजना आहे. नोकरदारांच्या पगारातील काही ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते.

तुमच्या पीएफमध्ये कापलेला हा हिस्सा जमा होतो. पीएफचे व्याज दर सरकार ठरवते.
प्रत्येक महिन्याला कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12 टक्के कापून पीएफ खात्यात टाकते. त्याबरोबर कंपनी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्याकडून 12 टक्के पैसे पीएफ खात्यात टाकते.
पीएफ खातेधारकांना पीएफ खाते उघडताच तुम्हाला आपोआप विमा सुरू होतो. तुम्हाला 6 लाखापर्यंत इन्शुरन्स मिळतो.
पीएफधारकांचे खाते निष्क्रिय असले तरी 3 वर्ष त्यात व्याज पडत राहते. पण 3 वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहिले तर मात्र व्याज मिळत नाही.
नव्या नियमांनुसार 5 वर्षाहून अधिक काळ खाते निष्क्रिय राहिले तर त्यातील पैसे काढायला कर लागतो.
तुम्ही पीएफमधले 90 टक्के पैसे काढू शकता. जुन्या नोकरीतला पीएफ नव्या नोकरीत ट्रान्सफर होऊ शकतो. पीएफमधून पेंशनचा फायदाही मिळतो.

2) पीपीएफ : केंद्र सरकार चालवत असलेली पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही योजना आहे. त्यात तुम्ही इच्छेप्रमाणे पैसे गुंतवू शकता. ते ते ऐच्छिक आहे. प्रत्येक 3 महिन्यांनी पीपीएफचा व्याज दर नक्की होतो.

कुठल्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्टात तुम्ही पीपीएफ अकाऊंट उघडू शकता. तुम्हाला यासाठी कुठल्या कंपनीचे कर्मचारी असणे गरजेचे नाही.
पीपीएफ म्हणजे सुरक्षित आणि टॅक्सही वाचेल अशी गुंतवणूक असून तुम्ही यात वर्षाला कमीत-कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता.
पीपीएफची खासीयत अशी की, तुम्हाला दर महिन्याला तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळू शकते. अर्थात, हे सर्व क्रेडिट मॅच्युरिटीनंतरच होते.
पीपीएफमध्ये 5 तारखेच्या आत पैसे भरले तर आधीची रक्कम आणि नंतर टाकलेली रक्कम या दोन्हीवर व्याज मिळते.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ अयोध्या वाद: 3 महिन्यांची मुदतवाढ

Letsup | Update

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली

👍 सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची दिली मुदतवाढ

🗣 सरन्यायाधीश रंजन गोगोई काय म्हणाले?:

जर मध्यस्थ निर्णयाबाबत आशावादी आहेत आणि त्यांना 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ हवी आहे, तर त्यात गैरकाय?, हे प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 भारताकडून पाकिस्तानला यावर्षी सर्वाधिक चहा निर्यात होणार

LetsUp । National

यंदाच्या यावर्षी भारतातून पाकिस्तानला अडीच कोटी किलो चहाची निर्यात होणार आहे.

💁‍♂ पुलवामा हल्ल्यानंतर आता भारत-पाक व्यापार पुन्हा सुरू झाला असून 2019 मध्ये भारताकडून पाकला 2 ते 2.5 कोटी किलोग्रॅम चहा निर्यात करण्यात येणार आहे.

----------------------
👍 लेट्सअप जॉईन करा :
इंस्टाग्राम : https://ltsup.in/2vFUitw I टेलिग्राम : https://telegram.me/letsup
----------------------

📍 गेल्यावर्षी भारताने पाकिस्तानला 1.58 कोटी किलो चहाची निर्यात केली होती.

🧐 केनियात उत्पादनात घट : केनियात यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चहाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे चढ्या दरात केनियाकडून चहाची आयात करणे हे पाकिस्तानच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.

🎯 भारतातून परदेशात चहाची निर्यात:

2018 मध्ये रशियाने भारताकडून 4.8 कोटी किलो चहा विकत घेतला.
इराणने 3.6 कोटी किलो चहाची आयात केली होती.
इजिप्तने 1.13 किलो कोटी चहा विकत घेतला होता.
इराणमध्येही चहाची निर्यात करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

2020 पर्यंत भारताची चहा निर्यात 30 कोटी किलोग्रॅमवर जाण्याची शक्यता

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup