LetsUpp Marathi
5.29K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🎯 जीवनात यशस्वी होण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या

Letsup । Motivation

💁‍♂ आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हायचं असतं. आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान बहुतेकवेळा आपल्याला मिळालेल्या यश-अपयशावर ठरतो. त्यामुळेच जर आपल्याला यशस्वीच व्हायचे असेल तर पुढील गोष्टींवर प्रभुत्व मिळणे गरजेचे आहे.

आत्मविश्वास - कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण स्वतःवर विश्वास असेल तर यश आपोआपच मिळते. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

निर्णय क्षमता - निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर सतत होय किंवा नाही या द्वंद्वामुळे नेमके काय करायचे हेच कळत नाही, त्यामुळे याचा परिणाम कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे सक्षम निर्णय घेता आला पाहिजे मग तो चूक असो वा बरोबर.

अपयशाची भीती बाळगू नये- बऱ्याच लोकांना कोणतेही काम करण्याआधी आपल्याला ते जमेल की नाही याची भीती आधीच असते. थोडक्यात आपण अपयशी होऊ म्हणून ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो. पण अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा मनात जिद्द ठेऊन काम करणे गरजेचे आहे.

प्रबळ ईच्छा शक्ती- ईच्छा तिथे मार्ग ही म्हण अगदी बरोबर आहे. कोणतेही काम करताना आपली ईच्छा प्रबळ असेल तर ते काम नक्की होते. यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे फार महत्वाचे असते. पैसे, सामर्थ्य आणि विद्या असेल आणि ईच्छा शक्ती नसेल तर ती व्यक्ती कधीच यश प्राप्त करू शकत नाही.

नकारात्मक विचार काढून टाका - मनात नकारात्मक विचार असणे म्हणजे अपयशाला आमंत्रणच आहे. नकारात्मक विचारांमुळे जीवनात फक्त निराशाच हाती येते. त्यामुळे नकारात्मक दृष्टिकोन बदलणे गरजेचा आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

लोकसभा निवडणूकीच्या 5 व्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.08 टक्के मतदान

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

फनी चक्रीवादळग्रस्त ओडिशा राज्याला पंतप्रधान मोदींनी जाहीर केली 1 हजार कोटींची मदत
______

रमजान (मंगळवार, 7 मे) सहेरी 4.37am
_____
राफेल प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी 10 मे पर्यंत पुढे ढकलली

नॉर्वेमध्ये सुरु झाले युरोपमधील पहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट

अमेरिकेचा गोल्फर टायगर वूड यास मिळणार अमेरिकेचा सर्वोच नागरी सन्मान

मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश, दुष्काळजन्य परिस्थिती निवारणासाठी राज्यात आचारसंहिता शिथिल

दुष्काळी भागातल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या आहारात वाढ, राज्य सरकारचे निर्देश
______

💹 Sensex : 38,600.34 | 🔽 −362.92 (0.93%)
💹 NIFTY: 11,598.25 | 🔽 −114.00 (0.97%)
🌟 Gold Rate : ₹32,600.00 for 10gm
_______

स्मार्टफोन विक्रीत अ‍ॅपलला मागे टाकत हुवावेची दुसऱ्या स्थानावर झेप

वर्ल्डकप: भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या दोन दिवसांत 'हाऊसफुल्ल'

नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर लॉन्च

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp News Updates

● पाचव्या टप्प्यात 7 राज्यांत 62.56 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक (74.6 टक्के) मतदान

● गेल्या 5 वर्षांत डेबिट कार्डांची संख्या दुपटीने वाढली, मात्र एटीएम केंद्रांच्या संख्येत 20 टक्क्यांनीच वाढ

● पंतप्रधान मोदींनी केला ओडिसातील परिस्थितीचा दौरा, 1000 कोटींच्या मदतीची केली घोषणा

---------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● आंतरराष्ट्रीय सीमेवर मासेमारी केल्यामुळे पाककडून 30 भारतीय मच्छिमारांना अटक, 6 बोटीही जप्त

● ब्रिटनच्या राजघराण्यासाठी गोड बातमी, प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेघन मार्केलने दिला मुलाला जन्म

● पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक पाणीवाटप करार लवकरच

● स्ट्रक्चरल ऑडिटनंतर मुंबईतील आणखी सहा पादचारी पूल धोकादायक असल्याचे आले आढळून

● गुगल मॅप्सवर पॉप्युलर डिशेस हे फिचर येणार, ही प्रणाली रिव्ह्यूजवर आधारित असणार

● चेपॉक स्टेडियमवर आज रंगणाऱ्या ‘क्वालिफायर-1’मध्ये मुंबई-चेन्नई आमने-सामने

● 'अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई, आत्तापर्यंत 312.95 कोटी रुपयांचा केला बिझनेस

● अहमदनगर - जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र, गेल्या 8 दिवसांमध्ये जिल्ह्यातील टँकरची संख्या 39 ने वाढली

● अहमदनगर - कमी पटसंख्येच्या शाळा रडारवर; जिल्ह्यातील 88 शाळांचा अहवाल सादर

● अहमदनगर - देयके न मिळाल्यास 10 मेनंतर छावण्या बंद; छावणीचालकांनी दिला इशारा

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
आयपीए 2019 : आज ठरणार फायनलचं पहिलं तिकीट कुणाला?

LetsUp | IPL Special

🎯 आयपीएलच्या 12व्या मोसमाच्या फायनलचे पहिले तिकीट कोणत्या संघाला मिळणार, याचा फैसला आज (दि.7) चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार

🏏 मुंबई इंडियन्स Vs चेन्नई सुपर किंग्स संघांमधला हा सामना आयपीएलच्या प्ले ऑफमधला क्वालिफायर वनचा सामना असून, या सामन्याला रात्री 7.30 वाजता सुरुवात होणार

👍 पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची दुसरी संधी 10 मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-2 सामन्याद्वारे मिळणार

🧐 इतिहास काय सांगतो?

मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी 3 वेळा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. मुंबईने 2013, 2015 व 2017 मध्ये तर चेन्नईने 2010, 2011 व 2018 मध्ये विजेतेपदाची किमया साधली आहे.

मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 26 लढती झाल्या असून मुंबईने 15 तर चेन्नईने 11 सामन्यांत बाजी मारली आहे.

मुंबईने यंदाच्या मोसमात चेन्नईविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे या लढतीकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 Letsup I General Knowledge

1) आशियाई विकास बँकचे (ADB) मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

उत्तर: मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स)

2) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) सूर्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी कोणती अंतराळ मोहीम पाठविण्याची योजना तयार केली आहे?

उत्तर : आदित्य-L1

3) ऑगस्टमध्ये आठव्या आशियाई युवा महिला हँडबॉल अजिंक्यपद या स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात केले जाणार आहे?

उत्तर : जयपूर (राजस्थान)

4) 2018 सालाचा ‘ACJ अन्वेषण पत्रकारिता पुरस्कार’ कोणाला दिला गेला?

उत्तर: निलीना एम. एस. (ACJ अर्थात एशियन कॉलेज ऑफ जर्नलिजम्स)

5) कोणत्या देशांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि लष्करी शासकांनी 'ट्रान्सिशनल मिलिटरी कौन्सिल (TMC)' नावाने संयुक्त नागरी-सैन्य परिषदेची स्थापना करण्यास मान्यता दिली?

उत्तर: सुदान

6) कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ‘वैश्विक अन्न धोरण अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला?

उत्तर : इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट (IFPRI)

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 AIATSL मध्ये 109 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे:

ड्यूटी मॅनेजर -टर्मिनल : 09
कस्टमर एजेंट : 100

----------------------
👏 आज रात्री 9 वाजता 'लेट्सअप वाणी' आपल्या सेवेत, दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी आता ऐका 'लेट्सअप वाणी' च्या रूपात!
----------------------

👍 नोकरी ठिकाण : मुंबई

🎯 थेट मुलाखत : (वेळ: 09:00 AM to 12:00 PM)

ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल :13 मे 2019
कस्टमर एजेंट : 14 मे 2019

📍 मुलाखतीचे ठिकाण : Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, Airport Gate No.-5, Sahar, Andheri-E, Mumbai-400099

🌐 अधिकृत वेबसाईट पाहा: https://ltsup.in/2Ww4ele

🗞 जाहिरात पाहा: https://ltsup.in/2H68GBT

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💁‍♂ जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचे महत्व

LetsUp | Special

वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकीच एक आहे. या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आवर्जून करतात.

🧐 अक्षय्य म्हणजे?:

संस्कृतमध्ये अक्षय्य या शब्दाचा अर्थ आहे, ज्याचा कधीच क्षय होत नाही, जे कधीच संपत नाही असं.
'अक्षय्य तृतीया' नाव पडण्याचे कारण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी अक्षय्य तृतीया असे म्हटले.

💁‍♂ सोनं का खरेदी करतात? : या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते. या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला पसंती दर्शवतात.

कारण अशी एक श्रद्धा आहे की, या दिवशी सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते. संपत्तीचा देव म्हणजे कुबेर यांनी शंकराची उपासना करून संपत्ती याच दिवशी मिळवली अशी धारणा आहे.

📍 सणाविषयी काही खास बाबी :

मंगल कृत्ये करण्यासाठी, व्रत आचरण्यासाठी, जपादी पुण्यकर्मे करण्यासाठी हा शुभदिवस आहे. हे पुण्यकर्म अक्षय फलदायी होते, अशी समजूत आहे.
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.
या दिवशी खरेदीसोबत दानाचेही फार मोठे महत्व आहे. या दिवशी केलेले दान अथवा चांगले कर्म कधीच क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचा ऱ्हास होत नाही.
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे.
गुजराथी लोक या तिथीला ‘आखातरी’ म्हणतात. शेतकरी आकिती म्हणतात व वेलींच्या बीजांची पेरणी करतात.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 आज जागतिक अस्थमा दिवस; काळजी घ्या!

LetsUp । Special

💁‍♂ दरवर्षी मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिवस म्हणून पाळला जातो. वाढलेली वाहनसंख्या व त्यामुळे होणारे वायू प्रदूषण, धूळ, धूर यामुळे अस्थमाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

🎯 हल्ली दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. काहींना याची अ‍ॅलर्जी होत असल्याने त्यांच्या श्वासनलिका अरुंद होऊन श्वसनास अडथळा येतो. तसेच धुळीचे कण, धूर, फुलांचे परागकण, थंड हवामान, पित्त, मानसिक ताण, व्यायाम, धूम्रपान अशा गोष्टी अस्थमा बळावण्यास कारणीभूत ठरतात. या आजाराकडे पूर्ण लक्ष दिले, तर त्यावर नियंत्रण मिळविता येते आणि रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.

💫 इन्हेलर थेरपी: इन्हेलर म्हणजे तोंडावाटे औषध ओढण्याचे उपकरण. इन्हेलरच्या माध्यमातून औषधे घेतल्यामुळे ते थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही व ते अधिक सुरक्षित असते.

👉 अस्थमाची लक्षणे:

श्वास घेण्यास त्रास होणे.
छातीत तणाव निर्माण होणे.
श्वास घेतांना घाबरल्यासारखं होणे.
श्वास घेताना घाम सुटणे.
अस्वस्थता जाणवणे.

🧐 गोष्टींची घ्या काळजी:

नेहमी सोबत इनहेलर ठेवा.
घर नेहमी स्वच्छ ठेवा.
धूळ-मातीपासून दू रहा.
व्यायाम आणि योगासने करुन शांत व्हा.
तोंडाने श्वास घेऊ नये.

📍 आकडेवारीनुसार, दमा आजाराने ग्रासलेल्या देशांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 व्हीव्हीपॅटची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

LetsUp । Update

विरोधी पक्षाची मतमोजणीसंदर्भात दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

💁‍♂ प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट चिठ्ठया व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मते यांची जुळणी करावी असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यातून काही साध्य होणार नाही असे विरोधकांचे म्हणणे होते.

👀 काय होती मागणी?: 50 टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील मतनोंदींची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. टीडीपी आणि काँग्रेससह देशातील 21 पक्षांनी या मागणीसंदर्भातील याचिका सर्वोच्य न्यायालयात दाखल केली होती.

📍 का फेटाळली याचिका? : यामुळे मतमोजणी प्रक्रियेला मोठा विलंब लागण्याची शक्यता आहे. शिवाय ज्या उद्देशाने मतदानासाठी व्हीव्हीएम पद्धती लागू करण्यात आली त्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल.

🗣 एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
😱 देशभरात 6 वर्षात वाघांच्या मृत्यूत वाढ!

LetsUp । Update

🧐 2012 ते 2018 या 6 वर्षांच्या कालावधीत देशात तब्बल 656 वाघांचा झाला मृत्यू.

👉 नॅशनल टाइगर कंझर्वेशन अथॉरिटी (एनटीसीए) यांनी जारी केली माहिती.

🎯 आकडेवारीनुसार, 31.5 टक्के म्हणजेच 207 वाघांचा मृत्यू अवैध शिकार व विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने

👀 2014 च्या गणनेनुसार देशभरातील अंदाजे 40 टक्के म्हणजे 2,226 वाघ हे शिकार करण्यास असमर्थ ठरत असल्याने, मनुष्याशी संघर्ष करताना बळी पडले. 2016 नंतरच्या वाघांच्या मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे विद्यूत प्रवाहाचा धक्का हेच ठरले.

💁‍♂ राज्य आणि वाघांचा मृत्यू:

मध्यप्रदेश : 148
महाराष्ट्र : 107
कर्नाटक : 100
उत्तराखंड : 82

📍 वर्ष 2012 आणि 2015 मध्ये दोन अंकी असलेली वाघांच्या मृत्यूची संख्या वाढून, 2016 च्या पुढे ती तीन अंकी झाली.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 पालक व पाल्यामध्ये हवा सुसंवाद

LetsUp | Parenting

💁‍♂ जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक. सध्याच्या परिस्थितीमध्ये पालक व पाल्यामधील संवाद हरवत चालला आहे. यामुळे दोघांच्या विचारात साम्य आढळत नाही, यामुळे पाल्य व पालक चिंताग्रस्त असतात.

----------------------
😍 अ‍ॅमेझॉनवर 'मेगा समर सेल' चे शेवटचे काही तास शिल्लक, खरेदीची संधी सोडू नका! 👉 डिस्काउंट ऑफरसाठी क्लिक करा: https://amzn.to/2JjtWFs
----------------------

🧐 पालकांसाठी काही खास टिप्स

तुम्ही तुमच्या पाल्यावर विश्वास ठेवा. परीक्षेच्या निकालामुळे पाल्यावरील विश्वास कमी होऊ देऊ नका.

इतर मुलांशी तुमच्या पाल्याची तुलना करू नका.

चांगले गुण मिळवण्यासाठी पाल्याने केलेल्या मेहनतीचे कौतुक करा.

पाल्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करत त्यास पुढे जाण्यासाठी त्यांना पाठिंबा द्या.

पाल्याशी स्पष्ट पण व मोकळा संवाद कायम ठेवा.

तुमचे निर्णयाचे ओझे पाल्यावर लादू नका.

त्याला जो करिअरचा पर्याय निवडायचा आहे, त्याला पाठिंबा द्या.

शिक्षणानंतर कुठले काम करायला त्याला आवडेल, याचाही जरूर विचार व्हावा.

मुलांशी योग्य पद्धतीने संवाद साधणे व त्यांना समजून घेणे, ही जबाबदारी पालकांचीच.

सकारात्मक ऊर्जा व प्रोत्साहन मुलांना दिले पाहिजे.

आपला पाल्य युनिक म्हणजेच एकमेवद्वितीय आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे.

व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी तुम्ही त्याचे मित्र व मार्गदर्शक बनणे अपेक्षित असते.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 *आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी*

आचार संहिता उल्लघंन केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवव्यांदा निवडणूक आयोगाची क्लीन चिट

ओडिशातील 'फणी' चक्रीवादळानंतर प्रशासनाकडून बचावकार्यात दिरंगाई, नागरिकांकडून संताप व्यक्त

बिहारमधील हॉटेलमध्ये सापडल्या ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

मारुती सुझुकीनंतर आता टाटा मोटर्सने घेतला लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय

------------------
*रमजान (मंगळवार, 8 मे) सहेरी 4.37am*
------------------

अमेरिका-चीन व्यापारयुद्ध चिघळणार; आयात शुल्क वाढविण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

ब्रिटनच्या राजघराण्यात चिमुकल्याचे आगमन, अभिनेत्री मेगन मार्कलने दिला गोंडस बाळाला जन्म

कर्जात बुडालेल्या एअर इंडियाची मुंबईतील इमारतीची होणार विक्री, राज्य सरकारने लावली चौदाशे कोटींची बोली

हुंदाईने भारतीय बाजारात ग्रँड आय 10 चं CNG व्हेरिअंट केलं लाँच, पेट्रोल व्हर्जनपेक्षा असणार महाग

जगातील टॉप 10 लोकप्रिय संघात मुंबई इंडियन्सचा समावेश, इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला साडेतीन कोटी व्ह्युज

श्रीया पिळगांवकर लवकरच झळकणार 'भंगड़ा पा ले' या हिंदी सिनेमात

👏 *दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी आता ऐका 'लेट्सअप वाणी' च्या रूपात* : http://bit.ly/2WrQHL7
LetsUp News Updates

● आर्थिक वर्ष 2018-19 मधील कर वसुली तब्बल 82 हजार कोटींनी घट झाल्याची आकडेवारी समोर

● एच-1बी व्हिसाठी मोजावे लागणार जादा पैसे, शुल्क वाढीचा अमेरिकी प्रशासनाचा प्रस्ताव

● भारताची इराणकडून होणारी इंधन आयात संपुष्टात; आयातीचे प्रमाण 57 टक्क्यांनी कमी झाले

● सर्वात जास्त फॉलो होणारे पंतप्रधान मोदी दुसरे नेते, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा अव्वल

● दुष्काळासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 2160 कोटी रूपयांचा मदतनिधी, शेतकऱ्यांना दिलासा

● एफआरपी थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश

● ब्रेक कॅलिपर बोल्ट दुरुस्त करण्यासाठी रॉयल एन्फील्डने बुलेट व बुलेट इलेक्ट्राच्या 7000 दुचाकी परत बोलावल्या

● सोनी कंपनीने जीटीके-पीजी 10 हा पार्टी स्पीकर केला सादर, स्पीकरचे मूल्य 19,990 रूपये

● चेन्नई सुपर किंग्सचा धुव्वा उडवून मुंबई इंडियन्स फायनलमध्ये; सूर्यकुमार यादव ठरला सामनावीर

● अभिनेता सलमान खानच्या किकचा सिक्वेल येणार; दीपिका पदुकोणची वर्णी लागण्याची शक्यता

● अहमदनगर - निघोज ऑनर किलिंग प्रकरण उत्तर प्रदेशातून पित्याला अटक, घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

● अहमदनगर - अक्षय्यतृतियेच्या मुहूर्तावर यंदा केवळ 15 कोटींची उलाढाल, दुष्काळामुळे उलाढाल निम्म्यावर

● अहमदनगर - ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त 3 हजार 100 आंबे वापरून करण्यात आली होती आकर्षक सजावट

📞 जाहिरातीसाठी संपर्क: 7875190190

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
मुंबई फायनलमध्ये; आज दिल्ली Vs हैदराबाद आमने-सामने

LetsUp | IPL Special

"कॉलिफायर-1' लढतीत चेन्नईवर 6 विकेटने विजय मिळवत मुंबईचा थाटात अंतिम फेरीत प्रवेश

💁‍♂ चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर 131 धावांत रोखल्यानंतर मुंबईने हे आव्हान 18.3 षटकात पार केले

👉 यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला मुंबईने सलग तीन वेळा पराभूत करत पाचव्यांदा फायनलमध्ये केला प्रवेश

🏆 सूर्यकुमार यादवने 54 चेंडूत नाबाद 71 धावांची निर्णायक खेळी केली, त्याला सामानावीराचा पुरस्कार देण्यात आला

🧐 चेन्नईला शुक्रवारी (दि.10) अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार

🏏 आज दिल्ली Vs हैदराबाद भिडणार

🧢 एलिमिनेटर सामना : यात जो जिंकेल त्याला चेन्नईसोबत सोबत दोन हात करावे लागणार

👍 ठिकाण : एसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम

🎯 वेळ : रात्री 7.30 वाजता

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🤔 तंत्रज्ञानात कुठं काय?

LetsUp | Tech

1) गुगलचे दोन स्मार्टफोन्स सादर : गुगलने पिक्सल मालिकेतील 3A आणि 3A XL हे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहेत.

📍 फिचर्स काय? :

पिक्सल 3 A मॉडेलमध्ये 5.7 इंच आकारमानाचा, फुल एचडी क्षमतेचा व 18:5:9 अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले आहे.
3A XL मॉडेलमध्ये 6 इंच आकारमानाचा याच प्रकारातील व 18:9 अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे.
पिक्सल 3 A मॉडेलमध्ये 3,000 तर 3A XLमध्ये 3,700 मिलीअँपिअर क्षमतांच्या बॅटरीज असून दोन्हीमध्ये फास्ट चार्जींगचा सपोर्ट दिलेला आहे.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 670 हा वेगवान प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम 4 जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी आहे.
यात अतिशय दर्जेदार कॅमेरे असून मागील बाजूस 12 तर समोर 8 मेगापिक्सल्सचा कॅमेरा असणार आहे. यामध्ये नाईट साय, प्लेग्राऊंड, पोर्ट्रेट मोड, एचडीआर आदी फिचर्स दिलेले आहेत.
हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे असून याला लवकरच क्यू या आवृत्तीचे अपडेट मिळणार आहे.

🧐 किंमत काय? भारतात या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे 39,999 आणि 44,999 रूपये आहे. 15 मे पासून हे मॉडेल्स ग्राहकांना प्रत्यक्षात खरेदी करता येणार आहेत. तथापि, याची आगाऊ नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

2) अँड्रॉईड ऑटो अ‍ॅपचे अपडेट सादर: गुगलने आपल्या अँड्रॉईड ऑटो अ‍ॅपचे अपडेट सादर केले असून यात डार्क मोडसह अन्य सुुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. अँड्रॉइड ऑटो या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर आपला स्मार्टफोन अथवा अन्य स्मार्ट उपकरण हे कारच्या डॅशबोर्डवर असणार्‍या इन्फोटेनमेंट/ नेव्हिगेशन सिस्टीमला संलग्न करू शकतो.

3) भारतात लाँच होणार 'ब्लॅक शार्क 2' : शाओमी गेमिंग बेस स्मार्टफोन ब्लॅक शार्क 2 लवकरच भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी उत्तम दर्जाचे हार्डवेअर दिलेले आहेत.

🎯 'ब्लॅक शार्क 2' ची खासियत :

ब्लॅक शार्क 2 फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर दिला आहे.
या फोनमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे.
यामध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले आहे आणि 4000 mAh बॅटरी आहे.
विशेष म्हणजे फोनमध्ये 27W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
ब्लॅक शार्क 2 मध्ये स्क्रीनखाली फिंगरप्रिंट स्कॅनल दिला आहे.
गेमर्सच्या मदतीसाठी फोनच्या चारही बाजूने प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टम दिला आहे.
फोटोग्राफीसाठी यामध्ये 48+12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला आहे.
सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या फोनमध्ये दोन रंगाचा (फ्रोजेन सिल्व्हर आणि शॅडो ब्लॅक) पर्याय दिला आहे..

🧐 किंमत काय? फोनची किंमत चीनमध्ये 3,200 युआन आहे म्हणजे भारतीय रुपयात अंदाजे 33 हजार रुपये. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये 4,200 युआन म्हणजेच भारतीय रुपयात 43 हजार रुपये आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर

LetsUp | Entertainment

1) मानुषी दिसणार बायोपिकमध्ये : सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावरील ऐतिहासिक सिनेमामध्ये 'मिस इंडिया मानुषी छिल्लर आणि अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहेत.

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली होणाऱ्या या सिनेमात संयुक्‍ताच्या रोलसाठी मानुषीला साईन करण्यात आले आहे. आदित्य चोप्राच्या मते मानुषीचा स्क्रीन प्रेजेंटेशन सेन्स खूप चांगला आहे. प्रेमकथेवरील या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत.

2) सिद्धार्थ-मृण्मयी एकत्र झळकणार: अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे 'मिस यू मिस्टर' या आगामी मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रकाशित करण्यात आले. हा चित्रपट 21 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

3) हॉलिवूड रिमेकमध्ये परिणीती : अभिनेत्री परिणीती चोप्रा हॉलिवूडमध्ये हिट ठरलेल्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' या फिल्मच्या अधिकृत रिमेकमध्ये झळकणार आहे.

यात एमिली ब्लंटने साकारलेली भूमिका परिणीती रिमेकमध्ये साकारतेय. चित्रपटाचे दोन महिन्यांचे चित्रीकरण लवकरच इंग्लंडमध्ये सुरू होते आहे.

4) ‘जट लुधियाने दा’ गाणे प्रदर्शित : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या स्टुडंट ऑफ द इयर 2 चित्रपटातील नवीन गाणे ‘जट लुधियाने दा’ प्रदर्शित झाले आहे.

विशाल-शेखर यांनी ह्या गाण्याला संगीत दिले असून अंविता दत्तने हे गाणे लिहिले आहे. तर विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणे गायिले आहे. गाणे पहा : https://ltsup.in/2WqxpG6

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💥 पाकिस्तानातील दर्ग्यात बॉम्बस्फोट

LetsUp । Update

पाकिस्तानातील लाहोरमध्ये सूफी पंथीयांच्या धार्मिक स्थळावर बॉम्बस्फोट.

💁‍♂ बुधवार (दि.8) रोजी सुफी दर्ग्यातील दाता दरबारबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनात हा स्फोट झाला. यामध्ये 9 जण ठार झाले असून, मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात 24 जण जखमी झाले असून, यातील 8 जणांची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे.

🏥 जखमींना तातडीने उपचारासाठी मायो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

🚨 घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, हा बॉम्बहल्ला कोणी घडवून आणला याचा पोलीस शोध घेत आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 आज जागतिक 'रेड क्रॉस' दिवस

LetsUp । Update

💁‍♂ 8 मे हा दिवस दरवर्षी जागतिक रेडक्रॉस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. रेडक्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक हेन्री ड्युनान्ट यांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

🧐 का साजरा केला जातो?
1859 साली इटली आणि फ्रान्सने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले होते. या युद्धात अनेक जण जखमी झाले होते. हि परिस्थिती पाहून ड्युनान्ट यांनी स्थानिक लोकांची मदत घेऊन जखमींवर उपचार केले. त्यांनतर 1863 साली सामाजिक र्कायकर्ते एकत्र येऊन पाचजणांची समिती स्थापन केली. या समितीने आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना केली.

🎯 संस्थेची उद्दीष्टे? : रेडक्रॉससाठी जागतिक स्तरावर मानवता- संकटात असलेल्या माणसांना सुखी आणि सुरक्षित, आरोग्यदायी आयुष्य लाभावे यासाठी काम करणे. नि:पक्षपातीपणा- माणसांमध्ये देश, धर्म, जात यावरुन भेद न करता त्यांची मदत करणे. कोणत्याही वादात न पडता तटस्थ राहून संकटात असलेल्यांची मदत करणे.

📙 पुस्तक प्रकाशन: युद्धामुळे सामान्य जनतेचे कसे हाल होतात? यावर पुस्तकाच्या लिखाणातून त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी ‘ सुव्हेनियर ऑफ सॉलफेरिनो ‘ हे पुस्तक फ्रेंच भाषेत लिहून काढले. हे पुस्तक युरोप खंडात प्रचंड गाजले.

👍 विशेष
आज जगातील प्रत्येक देश या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहेत.
सन्मान म्हणून 1917 साली या आंतरराष्ट्रीय संस्थेला नोबेल पारितोषिक दिले गेले.
संघटनेचे बोधचिन्ह मानवी अनुकंपेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣आता ड्रायव्हिंग लायसन्स होणार स्मार्ट

LetsUp । Update

ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्याच्या नियमामध्ये केंद्र सरकारकडून बदल.

💁‍♂ 1 ऑक्टोबर 2019 नंतर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पूर्ण देशात एकसारखेच होणार आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारनं सूचना जारी केली आहे. या नव्या डीएल किंवा आरसीमध्ये फक्त 15 ते 20 रुपयांचा खर्च येणार आहे.

📍 आता प्रत्येक राज्यात लायसन्स आणि आरसी बुकचा रंग एकसारखाच असणार आहे.

👉 हे आहेत फायदे

नव्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीमध्ये पहिल्यांदाच मायक्रोचिप आणि क्यूआर कोड राहणार आहे.

वाहनधारकाने नियमांचं उल्लंघन केल्यास ते लपून राहणार नाही.

ट्रॅफिक पोलिसांजवळील डिव्हाइसमध्ये कार्ड टाकल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन होऊन वाहनचालकांची माहिती मिळणार.

दिव्यांग चालकांचा विचार करून खास डिझाईन करण्यात आलं आहे.

प्रदुषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही आरसी बुकमध्ये राहणार आहे.

💳 राज्यात 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाड्यांचं नोंदणी प्रमाणपत्र पीवीसीवर आधारित होणार आहे.

👍 या निर्णयामुळे वाहनधारकांसह ट्रॅफीक पोलीसांनाही मोठा फायदा होणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup