LetsUpp Marathi
5.29K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
📣 दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल

Letsup । Update

दुष्काळ निवारणाची कामे करण्यास निवडणूक आयोगाची राज्य सरकारला परवानगी

🎯 महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. या मागणीनंतर निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली आहे.

📍 या अटींचे पालन करावे लागणार : ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया संपली आहे, त्या भागांत कामे करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र केलेल्या कामाची अवास्तव प्रसिद्धी करू नये, तसेच त्याचा राजकीय फायदाही घेऊ नये या अटीवरच आचारसंहिता शिथिल केली आहे.

राज्य सरकारने 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे
दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने 4714 कोटी रुपयांची मदत जाहीर
राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 19.63 टक्के पाणीसाठा शिल्लक
उष्णता वाढल्याने टँकरच्या मागणीत वाढ

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 आज जागतिक हास्‍य दिवस

Letsup । Special

🎯 रोजच्या जगण्यातल्या ताण-तणावांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात हसून खेळून राहणे आवश्यक आहे. माणसाच्या आयुष्यातील ताणतणाव, वाढती दगदग यामुळे नैराश्य आले आहे. हे टाळण्यासाठी व हसण्याचं महत्त्व समजून देण्यासाठीच, दरवर्षी मी महिन्यातला पहिला रविवार हा जागतिक हास्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

💁‍♂ हसण्याचे काही महत्वपूर्ण फायदे

फ्रेश राहण्यासाठी : चेहऱ्यावरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते.

मिळून -मिसळून राहा: एकटे राहण्यापेक्षा मिळून- मिसळून राह, मित्रांसोबत संवाद साधा यामुळे चांगला वेळ जातो व उत्साह कायम राहतो.

प्रतिकार क्षमता : आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकार क्षमता सक्षम होण्‍यास मदत होते. याच्यामुळे विविध संसर्ग यापासून बचाव होतो.

हृदयासाठी फायदेशीर : संशोधनानुसार 10 मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयगती तीव्र होते. तेवढ्या हृदयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे ठरते.

ऊर्जा वाढते: हसल्याने शरीरातील ऊर्जेच्या स्तर उंचावतो, यामुळे तुम्ही कामवार लक्ष केंद्रित करू शकता. व कामाची गुणवत्तासुद्धा वाढवू शकता.

सकारात्‍मक राहण्‍यास उपयुक्त: हसतमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते.

तणावापासून मुक्ती: हसल्यामुळे स्टड्ढेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात असतो. तणावपूर्ण परिस्थितीतही आनंदी रहा, यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते.

वजन नियंत्रणात : आनंदी राहिल्याने तणाव वाढत नाही. त्याप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहते.

दुखण्यावर नियंत्रण : हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा घटक क्रियाशील झाल्याने विविध भागात होत असलेले दुखणे कमी होण्‍यास मदत होते.

😃 हसण्याबद्दल काही गमतीशीर फॅक्टस

लहान बाळ दिवसभरात साधारणतः 300 वेळा हसतं.

प्रौढ व्यक्ती मात्र दिवसातून केवळ 20 वेळाच हसतात.

प्रेक्षकांपेक्षा बहुदा वक्ताच जास्त वेळा हसतो.

ग्रुपमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त हसतात.

📍 विविध लाफ्टर क्लबतर्फे नेहमीच हा संदेश दिला जातो.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🌟 साप्ताहिक राशीभविष्य; 5 ते 11 मे 2019

LetsUp | Astrology

मेष : ह्या आठवड्याची सुरवात खूपच चांगली होणार आहे. आपल्या व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्या आपण सहजपणे दूर करू शकाल. व्यापारी भागीदारीचा आपणास मोठा फायदा होईल.

वृषभ : आठवड्याच्या सुरवातीस मानसिक अशांतता जाणवेल. व्यापारात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात एखाद्या नवीन कामाच्या सुरवातीमुळे आपणास आर्थिक लाभ होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात यशस्वी होण्यासाठी अध्यात्मिक बैठकीचा आधार घ्यावा.

मिथुन : यश प्राप्तीसाठी अपार कष्ट करावे लागतील. आर्थिक दृष्ट्या आठवड्याची सुरवात काहीशी कमकुवतच असेल. कौटुंबिक कारणांसाठी पैसे खर्च होतील. कौटुंबिक कार्यात भावंडे व कुटुंबीयांचा सहवास लाभेल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल.

कर्क : ह्या आठवड्यात आपले मन कमकुवत राहील. नोकरीत उद्दिष्ट गाठण्याकडे लक्ष देत असताना नकारात्मक विचारांमुळे अडथळे निर्माण होतील. आठवड्याच्या अखेरीस केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून भविष्यात फायदा होईल.

सिंह : ह्या आठवड्यात व्यापारासाठी एखादा प्रवास करावा लागेल. आपणास विदेशातून लाभ होईल. नोकरीत सहकारी आपल्याशी चांगले वागतील. ह्या आठवड्यात विविध क्षेत्रात आपले कौशल्य दिसून येईल. कुटुंबात एखादा छोटासा शुभ प्रसंग होण्याची शक्यता आहे.

कन्या : व्यापाराशी संबंधित कार्यात लाभ होईल. वैवाहिक जीवनात माधुर्य टिकून राहील. मित्र व कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मनोरंजन व सहलीसाठी सुद्धा पैसे खर्च कराल.

तूळ : अनावश्यक कामांवर पैसा खर्च होऊ शकतो. महिला मित्रांकडून सुद्धा काही लाभ संभवतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात आपले परिश्रम वाढवावे लागतील. वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्याशी संबंधात गोडवा राहील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

वृश्चिक : नोकरी - व्यवसायात लाभ होऊ शकेल. व्यापारी बैठकीसाठी बाहेर जाण्याचे नियोजन करू शकाल. विद्यार्थ्यांना हा आठवडा मिश्र फलदायी आहे. त्यांना अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे लागेल.

धनू : कामाच्या धीम्या गतीमुळे वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आठवड्याच्या अखेर पर्यंत परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या सहलीसाठी किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा मध्यमच आहे.

मकर :आपण एखादी दीर्घ कालीन गुंतवणूक करू शकाल. एखादी संपत्ती सुद्धा खरेदी करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा उत्तम आहे. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष देऊ शकतील.

कुंभ : आजचे काम उद्यावर ढकलू नका. कार्यालयात आपण स्वतःला सिद्ध करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून त्यांना अभ्यासात यश प्राप्ती होईल.

मीन: एखाद्या नवीन कामाची सुरवात करू शकाल, व त्यात आपले मन सुद्धा रमेल. नशिबाची साथ मिळत असल्याचे जाणवेल. जवळच्या लोकांकडून एखादी भेटवस्तू सुद्धा मिळू शकेल. वैवाहिक जीवनात माधुर्य टिकून राहील.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎨 आज जागतिक व्यंगचित्रकार दिवस

LetsUp । Special

🎯 अनेकदा शब्दांमधून मांडण्याचा प्रयत्न करुनही ज्या गोष्टी व्यक्त होत नाहीत, अशा गोष्टी एका व्यंगचित्रातून सहजपणे मांडता येतात. कारण, चित्राच्या एका रेषेत हजारो शब्दांचा ऐवज सामावलेला असतो. आज जागतिक व्यंगचित्रकार असून या निमित्त जाणून घेऊ काही प्रसिद्ध व्यंगचित्रकारांबद्दल माहिती

💁‍♂ भारतातील 10 प्रसिद्ध व्यंगचित्रकार

आर.के.लक्ष्मण- सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर.के.लक्ष्मण याच नावाने सर्वजण ओळखतात.

शंकर : केरळमधील कायामकुलम येथे जन्मलेले शंकर यांना भारती व्यंगचित्रकारांचं पितामह म्हटलं जातं.

बाळासाहेब ठाकरे : महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावती नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे. मात्र ते एक व्यंगचित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध होते.

बी.वी.राममूर्ती : दक्षिण भारतातील पॉकेट कार्टूनचे जनक म्हणून बी वी राममूर्ती यांना ओळखले जाते.

मारिओ मिरांडा : दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू सोसाटींमधील जीवन तसंच गोव्यातील जीवनशैली व्यंगचित्रांद्वारे जिवंत करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं.

सुधीर तैलंग : बिकानेरमध्ये जन्मलेल्या सुधीर तैलंग हिंदी व्यंगचित्र जगतातील एक मोठं नाव आहे.

वी.टी.थॉमस : थॉमस यांचं कार्टून मलयाला मनोरमा साप्ताहिकाच्या शेवटच्या पानाची शान समजली जायची.

एन के रंगनाथन उर्फ रंगा : जगभरातील सेलिब्रेटीजचे स्वाक्षरी असणा-या व्यंगचित्रांचा रेकॉर्डमध्ये नाव नोंद असलेले रंगनाथन यांना रंगा या नावाने देखील ओळखलं जातं.

माया कामथ : पुरुषांचं वर्चस्व असणा-या या क्षेत्रात माया कामत यांचं नावदेखील सन्मानपुर्वक घेतलं जातं.

हरीश चंद्र शुक्ला उर्फ काक: काक यांनी हिंदी वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्थानिक विषयापासून ते आंतरराष्ट्रीय विषयापर्यंतची व्यंगचित्र लोकांपर्यंत पोहोचवली

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
😋 रताळ्याची चविष्ट कचोरी

LetsUp | Receipe

🍽 साहित्य : (सारणसाठी) : 1 मूठ चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी खोवलेलं खोबरं, 4-5 हिरव्या मिरच्या, 50 ग्रॅम बेदाणा, मीठ आणि साखर, पारीसाठी 250 ग्रॅम रताळी, 1 मोठा बटाटा, किंचितसं मीठ, साराण भरलेली कचोरी घोळण्यासाठी भगरीचं पीठ आणि तळण्यासाठी तूप.

💁‍♂ कृती : रताळी आणि बटाटे उकडून घ्यावेत. सोलून हाताने थोडे कुस्करून घ्यावेत. नंतर पुरणयंत्रातून काढून घ्यावेत. त्यात थोडं मीठ घालावं. अर्धा चमचा तूप घेऊन त्यावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅस बंद करून त्यात इतर सर्व वस्तू घालून सारण करावं. रताळ्याच्या मिश्रणाची पारी करून त्यात थोडं सारण भरावं. अशा हव्या तेवढ्या पाऱ्या करून सारण भरून ठेवाव्यात. आणि खाण्याच्या आधी भगरीच्या पीठात घोळून त्या तुपात तळून घ्याव्यात.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🚖 आता इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट्स

LetsUp । Update

प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक वाहनांना आता हिरवी नंबरप्लेट बसविण्यात येणार

💁‍♂ भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी, केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट बसविण्यात येणार असून, या वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाणार आहे. याबाबतचे आदेश केंद्राकडून राज्य सरकारला देण्यात आले आहे.

🎯 देशात पाच प्रकारच्या नंबरप्लेट :

खासगी वाहने - पांढरी नंबरप्लेट
टॅक्सी - पिवळी नंबरप्लेट
स्वतः चालक असलेल्या भाड्याच्या वाहनांसाठी - काळी नंबरप्लेट
सरकारी अधिकाऱ्यांची वाहने - निळी नंबरप्लेट
टेस्ट ड्राईव्हसाठी वापरल्या जाणाऱ्या कार - लाल नंबरप्लेट

📍 हिरव्या रंगाच्या या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगाने वाहन क्रमांक टाकण्यात येणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🏆 वर्ल्डकप 2019 वेळापत्रक

LetsUp । Update

🎯 क्रिकेट वर्ल्डकप 2019 चं वेळापत्रक आयसीसीनं जाहीर केलं आहे. 30 मे ते 14 जुलैपर्यंत सामने खेळवले जाणार आहे. 30 मे रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मॅचनं वर्ल्डकपला सुरुवात होईल.

🏏 दहा संघ : भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान या 10 देशांमध्ये 2019 चा वर्ल्डकप होणार आहे. तसंच 1992 साली खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकपनुसार प्रत्येक टीम एकमेकांविरोधात एक सामना खेळेल.

📍 टॉप 4 टीम सेमी फायनलमध्ये एकमेकांना भिडतील. 5 जूनला भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळाला जाणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

साध्वी प्रज्ञा सिंह यांना निवडणूक आयोगाची नोटीस, मंदिरात किर्तनाच्या माध्यमातून प्रचार केल्याचा काँग्रेसचा आरोप

पाकिस्तानकडून सीमेवर उखळी तोफांचा मारा, एक नागरिक जखमी

फनी वादळात 45 हजार कर्मचाऱ्यांनी वाचवले 12 लाख लोकांचे प्राण
----------------------
😍 लेट्सअपवर अक्षय तृतीया स्पेशल जाहिरातीसाठी संपर्क साधा : 7875190190
----------------------
जम्मू-काश्मिरमध्ये भाजप नेते गुल मुहम्मद मीर यांची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालुन हत्या

भारतीय किनारपट्टी भागात फ्रान्स करणार गुंतवणूक, गोव्यात फ्रान्स सरकारकडून गुंतवणूक परिषदेचे आयोजन

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बनवली टाकाऊपासून टिकाऊ जर्सी, जगभरातून कौतुक

ओडिशाच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांनी केली 10 कोटींची मदत जाहीर

गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी 18 जणांविरोधात गुन्हे दाखल

Asus Zenfone 6 हा स्मार्टफोन 16 मे रोजी होणार लॉंच, ग्राहकांना मिळणार दमदार फिचर्स

IPL 2019 : मुंबई इंडियन्स व कोलकत्ता नाईट रायडर्स आज आमने-सामने

वेद आणि विज्ञानाची कथा सांगणाऱ्या 'कानभट' मराठी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp News Updates

● लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी देशातील 7 राज्यातील 51 मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार

● ई-फायलिंगच्या वेबसाईटनुसार आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये प्राप्तिकराची ई-फायलिंग 6.6 लाखांनी घटली

● राफेल विमानांच्या खरेदीप्रकरणी फेरविचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

----------------------
😍 लेट्सअपवर अक्षय तृतीया स्पेशल जाहिरातीसाठी संपर्क साधा : 7875190190
----------------------

● श्रीलंकेतून 600 परदेशी नागरिकांची हकालपट्टी, यामध्ये 200 मुस्लिम धर्मगुरूंचाही समावेश

● महाराष्ट्राने ओडिशातील पुनर्वसन व मदतकार्यासाठी 10 कोटींची मदत देऊ केली

● राज्यात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या नावांची सूची तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात

● मुंबईने केला कोलकाताचा पत्ता कट; हैदराबाद प्ले ऑफ्समध्ये तर पंजाबकडून चेन्नईचा पराभव

● नोकिया कंपनी 7 मे रोजी भारतात नोकिया 4.2 स्मार्टफोन लाँच करणार : एचएमडी ग्लोबल

● हॉकी इंडियाने ज्युनियर महिला राष्ट्रीय कोचिंग कॅम्पसाठी 33 खेळाडूंच्या नावांची केली घोषणा

● अभिनेत्री माधुरी दीक्षित 'डान्स दिवाने' या रियालिटी शोच्या दुसऱ्या भागात परीक्षकाच्या भुमिकेत दिसणार

● अहमदनगर - नगर जिल्ह्यात 12 लाख नागरिकांची 761 टँकरने भागते तहान; पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा

● अहमदनगर - जिल्ह्यातील चारा छावण्यांमध्ये दाखल झालेल्या पशुधनाच्या चाऱ्यासाठी दररोज अडीच कोटींपेक्षा जास्त खर्च

● अहमदनगर - जिल्ह्यात यंदा जवळपास 95 हजार मेट्रिक टन कमी म्हणजे 2 लाख 2 हजार मेट्रीक टन खताचीच मागणी नोंदविण्यात आली

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💁‍♂ पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु, दिग्गजांच्या भवितव्याचा होणार फैसला

LetsUp | Politics

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 7 राज्यांत 51 जागांसाठी आज सोमवारी उत्साहात मतदान सुरु

🎯 एकूण 674 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यावेळी 8 कोटी 75 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील

🧐 देशात कुठे मतदान?: उत्तर प्रदेश : 14 I राजस्थान : 12 I मध्य प्रदेश : 7 I पश्चिम बंगाल : 7 I बिहार : 5 I झारखंड : 4 I जम्मू आणि काश्मीर : 2

दिग्गजांचा होणार फैसला: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, 'यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अर्जुन राम मेघवाल, राज्यवर्धनसिंह राठोड, साध्वी निरंजन ज्योती, जयंत सिन्हा

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
उन्हाळ्याच्या दिवसात सब्जा गुणकारी

LetsUp | Health

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात होत असलेला दाह कमी करण्यासाठी सब्जाचे सेवन मदतगार ठरते. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. ज्याचे अनेक फायदे आहेत ते पाहुयात...

1) सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

2) सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

3) बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले ठेवते.

4) गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासही मदत होते.

5) प्रदूषणाच्या काळात त्वचेला ठीक करण्यासाठी सब्जा फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

6) सब्जात असणारी व्हिटॅमिन, लोह, प्रोटिन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी ठरतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.

अनेक आजारांवर गुणकारी : टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरतो. सब्जाच्या सेवनाने उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते, अॅसिडिसी कमी होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, टॉक्सिन दूर होतात तसेच शरीराला एनर्जीही मिळते.

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
प्ले-ऑफच्या टीम ठरल्या; असे असतील सामने

LetsUp | Ipl Special

📍 मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद या चार टीम प्ले-ऑफसाठी झाल्या क्वालिफाय

👉 आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच 12 पॉईंट्ससह एखादी टीम (हैदराबाद) प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाली

💁‍♂ क्वालिफाय संघ, गुण (रनरेट) :

मुंबई : 18 (+0.421)
चेन्नई : 18 (+0.131)
दिल्ली : 18 (+0.044)
हैदराबाद : 12 (+0.577)

🎯 प्ले ऑफचे सामने असे :

7 मे (पहिली क्वालिफायर) : मुंबई Vs चेन्नई

8 मे (एलिमिनेटर सामना) : दिल्ली Vs हैदराबाद

10 मे (दुसरी क्वालिफायर) : पहिल्या सामन्यातील पराभूत संघ Vs एलिमिनेटर फेरीतील विजेता संघ

12 मे (फायनल सामना) : पहिल्या क्वालिफायर सामन्यातील विजेता Vs दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील विजेता

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🧐 ऑटोमोबाईलमध्ये कुठं काय?

LetsUp । Auto

1) बजाजची नवी बाईक लाँच : बजाज ऑटोने आपली नवी बाईक Bajaj Avenger 160 Street ABS लाँच केली आहे. नव्या सुरक्षा नियमांनुसार कंपनीने ही बाईक अँटी लॉक ब्रेकिंग (ABS) सिस्टिमसह लाँच केली आहे. या बाईकची किंमत 81 हजार 37 रुपये इतकी आहे.

2) Mahindra TUV300 लाँच : आता महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने 2019 Mahindra TUV300 फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे. या व्हर्जनमध्ये कारच्या आतून आणि बाहेरुन अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.

ग्राहकांना 7 आकर्षक रंगांमधून निवड करता येणार आहे. TUV300 फेसलिफ्ट व्हर्जनची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख ते 10.49 लाख रुपये आहे.

यामध्ये TUV300 एसयुव्हीच्या T4+ व्हेरिअंटची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप एंड T10 ऑप्शनल ड्युअल टोन ट्रिमची किंमत 10.49 लाख रुपये आहे.

3) ‘हीरो’च्या तीन नव्या बाईक लाँच : हीरो मोटोकॉर्प कंपनीने भारतात XPulse 200 आणि XPulse 200T या नव्या बाईक लाँच केल्या आहेत. याशिवाय कंपनीने Xtreme 200R चे एक नवं व्हर्जन Xtreme 200S लाँच केले आहे.

हीरो XPulse 200 दोन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आली आहे. या बाईकच्या Carb व्हेरिअंटची (कॅब्युरेटेड व्हर्जन) एक्स-शोरूम किंमत 97 हजार रुपये आहे. तर, फ्युअल-इंजेक्टेड व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 1.05 लाख रुपये आहे.

दुसरीकडे, XPulse 200T केवळ Carb व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली असून या बाईकची एक्स-शोरुम किंमत 94 हजार रुपये इतकी आहे. Xtreme 200S ची एक्स-शोरुम किंमत 98 हजार 500 रुपये इतकी आहे.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💁‍♂ उद्या सगळं ऐकायची तयारी ठेवा!

👂 कारण उद्या 'लेट्सअप वाणी' येणार आहे.

🧐 पण, हि वाणी आहे तरी कोण? त्यासाठी उद्याची वाट पहा!

👍 मग आता फक्त कान देऊन ऐकायचं... येणार वाणी ऐकुया देश-विदेशाची कहाणी...!

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर

LetsUp । Update

सीबीएसई बोर्डाचा दहावीच्या परिक्षेचा निकाल झाला जाहीर

🧐 आज (दि.6 मे) रोजी दुपारी 2 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पास होण्याचे प्रमाण चांगले आहे. दरम्यान, यंदा दहावीचा निकाल 91.1 टक्के लागला आहे

📍 विशेष: यंदा, 10 वी मध्ये एकूण 13 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 499 गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर, 24 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 498 गुण मिळवले आहेत

👉 निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :
www.cbse.nic.in
cbseresults.nic.in
results.nic.in

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💁‍♂ SBI चा फेलोशिप प्रोग्राम सुरू

LetsUp । Special

SBI फाउंडेशनच्या फेलोशिप प्रोग्राम 'यूथ फॉर इंडिया' ने तरुणाईसाठी फेलोशिप प्रोग्राम सुरू केला आहे.

🎯 SBI चे या प्रोग्रामचे वर्षे 2019-20 बॅचसाठी अर्ज सुरू झाले आहेत. या अंतर्गत ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्यात रूची असणारे तरुण-तरुणी रजिस्ट्रेशन करू शकतात.

💵 वेतन:
प्रोग्रामसाठी दरमहिना 15 हजार रुपये स्टायपेंड आणि एक हजार रुपये ट्रॅव्हलिंग अलाउंस दिला जाणार.
या कोर्सचा कालावधी 13 महिन्यांचा आहे.
कालावधी पुर्ण केल्यानंतर 50 हजार रुपये अतिरिक्त दिले जाणार.
फेलोशिप करणाऱ्या युवकांना मेडिकल इंश्योरंस सुविधा दिली जाणार आहे.

🧐 निवड पद्धती : फेलोशिपसाठी www.youthforindia.org वर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यांनतर निवड झालेल्या उमेद्वाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

📍 पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असणे आवश्यक.
वय कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 32 वर्षे असावे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 जीवनात यशस्वी होण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या

Letsup । Motivation

💁‍♂ आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हायचं असतं. आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान बहुतेकवेळा आपल्याला मिळालेल्या यश-अपयशावर ठरतो. त्यामुळेच जर आपल्याला यशस्वीच व्हायचे असेल तर पुढील गोष्टींवर प्रभुत्व मिळणे गरजेचे आहे.

आत्मविश्वास - कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण स्वतःवर विश्वास असेल तर यश आपोआपच मिळते. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

निर्णय क्षमता - निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर सतत होय किंवा नाही या द्वंद्वामुळे नेमके काय करायचे हेच कळत नाही, त्यामुळे याचा परिणाम कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे सक्षम निर्णय घेता आला पाहिजे मग तो चूक असो वा बरोबर.

अपयशाची भीती बाळगू नये- बऱ्याच लोकांना कोणतेही काम करण्याआधी आपल्याला ते जमेल की नाही याची भीती आधीच असते. थोडक्यात आपण अपयशी होऊ म्हणून ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो. पण अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा मनात जिद्द ठेऊन काम करणे गरजेचे आहे.

प्रबळ ईच्छा शक्ती- ईच्छा तिथे मार्ग ही म्हण अगदी बरोबर आहे. कोणतेही काम करताना आपली ईच्छा प्रबळ असेल तर ते काम नक्की होते. यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे फार महत्वाचे असते. पैसे, सामर्थ्य आणि विद्या असेल आणि ईच्छा शक्ती नसेल तर ती व्यक्ती कधीच यश प्राप्त करू शकत नाही.

नकारात्मक विचार काढून टाका - मनात नकारात्मक विचार असणे म्हणजे अपयशाला आमंत्रणच आहे. नकारात्मक विचारांमुळे जीवनात फक्त निराशाच हाती येते. त्यामुळे नकारात्मक दृष्टिकोन बदलणे गरजेचा आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

लोकसभा निवडणूकीच्या 5 व्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.08 टक्के मतदान

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

फनी चक्रीवादळग्रस्त ओडिशा राज्याला पंतप्रधान मोदींनी जाहीर केली 1 हजार कोटींची मदत
______

रमजान (मंगळवार, 7 मे) सहेरी 4.37am
_____
राफेल प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी 10 मे पर्यंत पुढे ढकलली

नॉर्वेमध्ये सुरु झाले युरोपमधील पहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट

अमेरिकेचा गोल्फर टायगर वूड यास मिळणार अमेरिकेचा सर्वोच नागरी सन्मान

मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश, दुष्काळजन्य परिस्थिती निवारणासाठी राज्यात आचारसंहिता शिथिल

दुष्काळी भागातल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या आहारात वाढ, राज्य सरकारचे निर्देश
______

💹 Sensex : 38,600.34 | 🔽 −362.92 (0.93%)
💹 NIFTY: 11,598.25 | 🔽 −114.00 (0.97%)
🌟 Gold Rate : ₹32,600.00 for 10gm
_______

स्मार्टफोन विक्रीत अ‍ॅपलला मागे टाकत हुवावेची दुसऱ्या स्थानावर झेप

वर्ल्डकप: भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या दोन दिवसांत 'हाऊसफुल्ल'

नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर लॉन्च

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp News Updates

● पाचव्या टप्प्यात 7 राज्यांत 62.56 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक (74.6 टक्के) मतदान

● गेल्या 5 वर्षांत डेबिट कार्डांची संख्या दुपटीने वाढली, मात्र एटीएम केंद्रांच्या संख्येत 20 टक्क्यांनीच वाढ

● पंतप्रधान मोदींनी केला ओडिसातील परिस्थितीचा दौरा, 1000 कोटींच्या मदतीची केली घोषणा

---------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● आंतरराष्ट्रीय सीमेवर मासेमारी केल्यामुळे पाककडून 30 भारतीय मच्छिमारांना अटक, 6 बोटीही जप्त

● ब्रिटनच्या राजघराण्यासाठी गोड बातमी, प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेघन मार्केलने दिला मुलाला जन्म

● पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक पाणीवाटप करार लवकरच

● स्ट्रक्चरल ऑडिटनंतर मुंबईतील आणखी सहा पादचारी पूल धोकादायक असल्याचे आले आढळून

● गुगल मॅप्सवर पॉप्युलर डिशेस हे फिचर येणार, ही प्रणाली रिव्ह्यूजवर आधारित असणार

● चेपॉक स्टेडियमवर आज रंगणाऱ्या ‘क्वालिफायर-1’मध्ये मुंबई-चेन्नई आमने-सामने

● 'अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई, आत्तापर्यंत 312.95 कोटी रुपयांचा केला बिझनेस

● अहमदनगर - जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र, गेल्या 8 दिवसांमध्ये जिल्ह्यातील टँकरची संख्या 39 ने वाढली

● अहमदनगर - कमी पटसंख्येच्या शाळा रडारवर; जिल्ह्यातील 88 शाळांचा अहवाल सादर

● अहमदनगर - देयके न मिळाल्यास 10 मेनंतर छावण्या बंद; छावणीचालकांनी दिला इशारा

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
आयपीए 2019 : आज ठरणार फायनलचं पहिलं तिकीट कुणाला?

LetsUp | IPL Special

🎯 आयपीएलच्या 12व्या मोसमाच्या फायनलचे पहिले तिकीट कोणत्या संघाला मिळणार, याचा फैसला आज (दि.7) चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार

🏏 मुंबई इंडियन्स Vs चेन्नई सुपर किंग्स संघांमधला हा सामना आयपीएलच्या प्ले ऑफमधला क्वालिफायर वनचा सामना असून, या सामन्याला रात्री 7.30 वाजता सुरुवात होणार

👍 पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची दुसरी संधी 10 मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-2 सामन्याद्वारे मिळणार

🧐 इतिहास काय सांगतो?

मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी 3 वेळा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. मुंबईने 2013, 2015 व 2017 मध्ये तर चेन्नईने 2010, 2011 व 2018 मध्ये विजेतेपदाची किमया साधली आहे.

मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 26 लढती झाल्या असून मुंबईने 15 तर चेन्नईने 11 सामन्यांत बाजी मारली आहे.

मुंबईने यंदाच्या मोसमात चेन्नईविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे या लढतीकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC