LetsUpp Marathi
5.29K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💥 पुण्यातील मुळशी धरणात बुडून तिघांचा मृत्यू

LetsUp | Breaking

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वळणे गावात 3 विद्यार्थ्यांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

💁‍♂ पुण्यातील भारती विद्यापीठ येथे MBAचे शिक्षण घेणारे हे विद्यार्थी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर

👉 मयत विद्यार्थ्यांची नावे : संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिवकुमार अशी धरणात बुडालेल्‍यांची नावे आहेत

🔎 घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांना तिघांचा मृतदेह शोधण्यात आले यश

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 संजय गांधी निराधार योजना

LetsUp । Govt. Schemes

🎯 उद्देश: शासनाच्या वतीने राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना 1980 पासून राबविण्यात येत आहे.

📍 योजनांसाठी अटी:

किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
वय- 65 वर्षांपेक्षा कमी
कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये 21,000/- पर्यंत

💁‍♂ लाभाचे स्वरूप

लाभार्त्यांस दरमहा रुपये 600/- अनुदान

एका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये 900/- प्रतिमाह अनुदान

🧐 आवश्यक कागदपत्रे:

वयाचा दाखला
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
अपंगत्व/ सिव्हील सर्जन/ सरकारी हॉस्पिटलच्या रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला

🏢 संपर्क साधण्याचे ठिकाण: अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, तहसलिदार कार्यालय, तलाठी कार्यालय

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🙏 श्री स्वामी समर्थ यांची आज पुण्यतिथी

LetsUp | Special

🎯 श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (इ.स.1856-1878) हे इसवी सनाच्या 19 व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते अवतार मानले जात.

👌 'भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे' असे सार्थ आशीर्वचन देणारे श्री स्वामी समर्थ हे इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट येथे आले. स्वामींनी अक्कलकोट येथे जवळपास 22 वर्ष वास्तव्य केले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा प्रदान केली.

📍 1878 साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला. स्वामींना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवास स्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. आजही स्वामींचे भक्त जागो जागी आहेत.

👏 आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 जाणून घ्या कॉमर्स क्षेत्रातील संधी

LetsUp । Career

🎯 बहुतांश वेळा दहावी, बारावीनंतर कॉमर्स शाखा निवडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉमर्समधील संधी बाबत योग्य ती माहिती नसते. कोणतेही क्षेत्र निवडताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या, व उत्तम करिअर कसे करायचे याबाबत आपण जाणून घेऊ

💁‍♂ बहुतांश क्षेत्रात कॉमर्सची गरज: अकाउंटिंग, टॅक्सेशन, प्रशासन, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, इन्शुरन्स, डिफेन्स, स्टॉक मार्केट, बँकिंग, फायनान्स, लॉ, टॅक्स कान्सल्टिंग, इंटरनॅशनल बिझनेस, पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, मल्टीमीडिया, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत कॉमर्स पदवीधारकांना संधी असते.

🧐 या गोष्टींची आवश्यकता:

मातृभाषेसोबत इंग्रजी आणि इतर भाषेवर प्रभुत्व हवे
मेहनत आणि ग्लोबल अवेअरनेस असणे आवश्यक
अवांतर वाचन करून जास्तीत जास्त ज्ञानात भर पाडणे
सतत नवनवीन गोष्टींचा शोध घेणे

📍 या क्षेत्रात अनेक संधी असून, ज्ञान आणि अनुभावरून या क्षेत्रातील पगार ठरतात. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आयत्या नोट्सवर अवलंबून न राहता रेफरन्स बुक्स आणि अवांतर वाचन या वरून अभ्यास करावा. तसेच दररोज किमान दोन वृत्तपत्रे आणि महिन्यातून एकदा एक तरी मासिक वाचावे

💫 करिअरसाठी पदवीसोबत पदव्युत्तर कोर्स केल्यास त्याचा चांगला फायदा होतो

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
😱 ओडिशातून 8 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

Letsup । Update

फनी चक्रीवादळ ओडिशातील पुरी येथील किनारपट्टीला धडकण्याची शक्यता

🧐 बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या फनी चक्रीवादळाने अतितीव्र रुप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ओडिशा किनारपट्टी भागातील 8 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच ओएनजीसीने त्यांच्या 500 कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

📍 महत्वाचे
गेल्या दोन दिवसांत ओडिशातील 89 रेल्वेगाड्या रद्द
सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश
ओडिशामधील 11 जिल्ह्यात आचार संहिता हटविण्यात आली
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके महत्वाच्या ठिकाणी तैनात

या वादळाच्या प्रभावामुळे ओडिशातील 11 जिल्ह्यांत, मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

UPA च्या कार्यकाळात 6 सर्जिकल स्ट्राईक; काँग्रेसने जाहीर केली यादी

पंतप्रधान मोदी व अमित शहांच्या आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी 6 मेपर्यंत निर्णय घ्या: सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

केरळमध्ये मुस्लिम शिक्षण संस्थेकडून शाळा, महाविद्यालयात बुरखा बंदी!

थायलंडचा 66 वर्षीय राजा वजिरालॉन्गकॉर्नने महिला सुरक्षारक्षकासोबत केले लग्न

दुबईच्या वाळवंटात साकारतेय जगातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क

अमेरिकन गायक निक जोनासचा भाऊ जो जोनस, 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम सोफी टर्नर सोबत अडकला लग्नबंधनात.

मुंबईतील मान्सूनपूर्व कामासाठी निवडणूक आचारसंहिता शिथील करा, मुंबई महापौरांची मागणी
____________

💹 Sensex : 38,981.43 | 🔽 −50.12 (0.13%)
💹 NIFTY: 11,724.75 | 🔽 −23.40 (0.20%)
🌟 Gold Rate : ₹32,420.00 for 10gm
____________

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही: नागपूर खंडपीठाचा निर्णय

चालू वर्षभरात लाँच होणार 'फेसबुक मॅसेंजर'चे डेस्कटॉप व्हर्जन

आयसीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जागतिक क्रमवारीत कसोटीमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी कायम

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अर्जुन कपूर च्या 'इंडियास मोस्ट वॉन्टेड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.
_________________

Flipkart offers attractive discounts on various products including electronics, retail and many more. To avail the offers on Flipkart, click here: https://www.flipkart.com/?affid=advtletsu
LetsUp News Updates

● बंगालच्या उपसागरातील फनी चक्रीवादळ आज (दि. 3) दुपारनंतर ओडिशा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

● वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारला मोठा झटका

● आता पाकिस्तानमध्येही मसूद अझहरला बंदी, संयुक्त राष्ट्राच्या आदेशानंतर पाकिस्तानकडून कारवाई

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● पंतप्रधान मोदींविरोधात उभ्या राहिलेल्या 118 शेतकऱ्यांची उमेदवारी रद्द, फक्त एक शेतकरी रिंगणात

● राष्ट्रीय आयोगाकडून प्रियांका गांधींना नोटीस जारी; प्रियांकाच्या सभेत लहान मुलांनी दिल्या होत्या घोषणा

● डॉ. झाकीर नाईकविरोधात ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल,193.6 कोटींची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप

● गुगलने लोकेशनसह अन्य संग्रहीत होणारी माहिती स्वयंचलीत पध्दतीत नष्ट करण्याचे फिचर केले सादर

● IPL 2019 : सुपर ओव्हरमध्ये मुंबईची हैदराबादवर मात; जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर

● कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी; वनडेत भारत दुसऱ्या स्थानी

● प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, सारा अली खानने पटकावला 'इन्स्टाग्रामर्स ऑफ द इअर'चा किताब

● अहमदनगर - पोलिस दलात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल नगरमधील 7 पोलिसांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले

● अहमदनगर - नगर जिल्ह्यातील 17 हजार 967 विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी केली नोंदणी, जिल्ह्यातील दहा केंद्रांवर ही परीक्षा होणार

● अहमदनगर - महापालिका आयुक्तांच्या दालनातील बोल्हेगाव फाटा रस्ता आंदोलनातील बूट फेक प्रकरणाच्या निषेधार्थ सलग सहाव्या दिवशी महापालिका बंदच राहिली

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🏏 सुपरओव्हरमध्ये मुंबईचा विजय; प्ले ऑफमध्ये धडक

LetsUp | Ipl Special

सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईने हैदराबाद संघावर रोमहर्षक विजय मिळवत प्ले-ऑफमधील प्रवेश केला निश्चित

🎯 तत्पूर्वी, मुंबईने दिलेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला 162 धावाच करता आल्याने मॅच टाय झाली

💁‍♂ सुपर ओव्हरचा रोमांच असा:

🎾 मुंबईने जसप्रीत बुमराहकडे बॉल दिला

बुमराहच्या पहिल्याच बॉलवर मनिष पांडे 2 रन घ्यायच्या प्रयत्नात धावबाद
दुसऱ्या बॉलला मार्टन गप्टीलने एक रन काढून मोहम्मद नबीला स्ट्राईक दिला
नबीने बुमराहच्या तिसऱ्या बॉलला सिक्स मारली आणि चौथ्या बॉलला तो आऊट झाला
सुपर ओव्हरमध्ये दोनच विकेट गमावल्यामुळे हैदराबादला उरलेले दोन बॉल खेळायला मिळाले नाहीत

🎾 हैदराबादने राशिद खानकडे बॉल सोपविला

मुंबईला विजयासाठी 9 धावांचे आव्हान होते
राशिदच्या पहिल्याच बॉलला हार्दिक पांड्याने सिक्स मारला
यानंतर दुसऱ्या बॉलला त्याने एक रन काढून पोलार्डला स्ट्राईक दिला
मग पोलार्डने तिसऱ्या बॉलवर दोन रन काढून मुंबईला विजय मिळवून दिला

👀 पहा सुपर ओव्हरचा थरार : https://ltsup.in/2Lhupe4

👍 मुंबई प्ले ऑफमध्ये दाखल: हैदराबादविरुद्धच्या पराभवामुळे मुंबईची टीम प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे. 13 मॅचपैकी 8 मॅचमध्ये मुंबईचा विजय आणि 5 मॅचमध्ये पराभव झाला आहे. मुंबईच्या खात्यात सध्या 16 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

🏆 निर्णायक षटक टाकून महत्वपूर्ण बळी घेणारा जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण लागू नाही

LetsUp | Update

🎯 वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही : नागपूर खंडपीठ

👉 हा निर्णय पदव्युत्तर दंतवैद्यकीय प्रमाणेच सर्व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लागू असणार आहे.

न्यायालय काय म्हटले?:

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 16 टक्के मराठा आरक्षण देण्यात आले होते.
मराठा आरक्षणसंदर्भातील कायदा 30 नोव्हेंबर 2018 रोजी अस्तित्वात आला.
मात्र वैद्यकीय पद्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 16 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबरलाच सुरु झाली होती.
त्यामुळे यंदाच्या वर्षी मराठा आरक्षण लागू होणार नाही.

🗣 महसूलमंत्री काय म्हणाले? : न्यायालयाचा निर्णय हा यंदासाठी आहे. पुढील वर्षासाठी नाही. पुढील वर्षापासून आरक्षण लागू होणार आहे. आता दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💁‍♂ राहण्यासाठी सर्वात महागडे देश, 2019

LetsUp | Statistics

1. स्वित्झर्लंड
2. आइसलँड
3. नॉर्वे
4. बहामास
5. लक्समबर्ग
6. जपान
7. डेन्मार्क
8. हाँगकाँग
9. दक्षिण कोरिया
10. आयर्लंड
11. फ्रान्स
12. नेदरलँड
13. इस्रायल
14. बेल्जियम
15. फिनलंड

(CEOWORLD)

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🤔 'फनी' चं नावं कसं ठरलं? चक्रीवादळांची नावं कशी ठरतात?

LetsUp | Special

घातक असे फनी चक्रीवादळ आज ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आणि त्याच्याविषयी अनेक चर्चा सुरु झाल्या. या चक्रीवादळाला 'फनी' नाव का ठेवले? चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? आज याबाबत जाणून घेऊयात...

'फनी' चं नावं कसं ठरलं? : 'फनी'चा उच्चर 'फोनी' असा होतो. तर त्याचा अर्थ 'साप' आहे. 'फनी' चक्रीवादळाचं नाव बांगलादेशकडून सुचवण्यात आलेल्या नावामधील आहे.

🧐 चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? : 1953पासून अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांची नावे ठरण्यास सुरुवात झाली.

हिंद महासागर क्षेत्रातील 8 देशांनी (बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंका) भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचे 2004पासून नामकरण करण्याची व्यवस्था केली. या प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी 8, अशी 64 नावे ठरवून दिली आहेत.

🎯 चक्रीवादळ कसे तयार होते?: जेव्हा शीत कटिबंधातून येणारी थंड हवा आणि उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण हवा एकत्र होते, तेव्हा समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यालाच चक्रीवादळ असे संबोधले जाते. शीतोष्ण आणि उष्ण असे चक्रीवादळाचे दोन प्रकार असतात.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎬 मनोरंजन घडामोडीवर एक नजर

LetsUp | Entertainment

1) 'पीएम नरेंद्र मोदी' ला हिरवा कंदील : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा पीएम नरेंद्र मोदी' च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे. अखेर 24 मे 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

2) ''वेलकम होम'चे पोस्टर लॉंच: अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा 'वेलकम होम' चित्रपट येत्या 14 जूनला प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं? असा प्रश्न उपस्थित करत त्याचा शोध चित्रपटात घेण्यात आला आहे.

3) 'हाफ तिकीट' आता चीनमध्ये : राष्ट्रीय पुरस्कार विजेता दाक्षिणात्य चित्रपट 'काक मुत्ताई'चा मराठी रिमेक असलेल्या 'हाफ तिकीट' आता चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीतच पाहता येणार असून त्याला चिनी सबटायटल्सची जोड असणार आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.

4) 'चले आना' गाणं प्रदर्शित : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातील 'चले आना' हे नवीन गाणं नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट 17 मे च्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. *गाणे पहा* : http://bit.ly/2Jceknd

5) येतोय कारगिल हिरोवर बायोपिक : 1998 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाचे हिरो भारतीय जवान कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शेरशाह' असे या बायोपिकचे नाव असून, बात्रा यांची व्यक्तिरेखा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस

LetsUp । Special

🎯 जगातील सर्व देशांमधील सरकारे, सत्ताधारी आणि राजे या सर्वांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्व कायम लक्षात राहावे, यासाठी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.

💁‍♂ कशी झाली सुरुवात?: आफ्रिकेतील नामेबियाची राजधानी विंडहोक येथे 3 मे 1991 रोजी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी एका विशेष मोहीमेला सुरुवात केली. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. 1993 मध्ये युनेस्कोने हा दिवस साजरा करण्यास मंजुरी दिल्यानंतर 3 मे हा दिवस जगभरात पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

📍 या वर्षीची थीम: माध्यमांनी निवडणुकांमध्ये आणि लोकशाही टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभवावी.

💫 युनेस्कोने यावर्षी इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथे पत्रकार स्वातंत्र्य दिवस निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

🏵 युनेस्कोचे महासंचालक आज जगभरातील माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पत्रकारांना, गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज या पुरस्काराने गौरवणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🔺 कोन आणि त्रिकोण प्रकार

Letsup । Education

🧐 तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडानी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 3 बाजू व 3 कोन असतात .

💁‍♂ कोनावरुन पडणारे त्रिकोणाचे प्रकार:

लघुकोन त्रिकोण - ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात, त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात. लघुकोनाचे माप 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते.

काटकोन त्रिकोण - ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो, त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. काटकोनाचा कोण 90 अंशाचा असतो.

विशालकोन त्रिकोण - ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो, त्या त्रिकोणास विशालकोन त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा लहान असतो.

🎯 बाजूवरुन पडणारे प्रकार:

समभूज त्रिकोण - ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समभूज त्रिकोण असे म्हणतात.

समद्विभूज त्रिकोण- ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समद्विभूज त्रिकोण असे म्हणतात.

विषमभूज त्रिकोण- ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू असमान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला विषमभूज त्रिकोण असे म्हणतात.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान भागात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी

मुंबई: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'बाजीराव' या पांढऱ्या वाघाचा मृत्यू

सुट्टी नाकारल्याने संतापलेल्या जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळी घालून केली हत्या, आसाममधील धक्कादायक घटना

इस्रो’च्या माजी प्रमुख ए.एस.किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

भारतविरोधात ‘दहशतवाद’ हे पाकिस्तानचे हत्यार, अमेरिकेची गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी माइकल मोरेल यांचे वक्तव्य

ऑस्ट्रेलियात वन्यजीव तज्ञांना सापडला तीन डोळ्यांचा साप, लांबी तब्बल 15 इंच
______

💹 Sensex : 38,963.26 | 🔽 −1.87 (0.047%)
💹 NIFTY: 11,712.25 | 🔽 −12.50 (0.11%)
🌟 Gold Rate : ₹32,350.00 for 10gm
_______

मुंबईतील आर.के.स्टुडिओ अखेर ‘गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीने घेतला विकत, त्याठिकाणी बांधण्यात येणार आलिशान फ्लॅट्स

गडचिरोली स्फोटातील शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे निवडणूक आयोगाने मागितला सभांच्या खर्चाचा तपशील

इलेक्ट्रोनिक आणि टेलीकम्युनीकेशन ब्रांड हुवावे लॉंच करणार जगातील पहिला 5G टीव्ही

टी-20 क्रिकेट क्रमवारीत भारताचं स्थान घसरलं, भारत पाचव्या तर पाकिस्तान अव्वल स्थानी कायम

अभिनेता आयुष्यमान खुराणा 'ड्रिम गर्ल' या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp News Updates

● बेरोजगारीच्या दराची एप्रिलमध्ये उसळी, दर 7.6 टक्क्यांवर पोहोचला : सीएमआयई

● ‘फनी’ चक्रीवादळाच्या तडाख्यात ओडिशात आठ मृत्युमुखी; अनेक झोपडय़ा उडून गेल्या

● वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेवर डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम, ते बारावे सदस्य असतील

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● भारतीय गुंतवणूकदारांची लंडनला गुंतवणुकीसाठीचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणून मान्यता

● पाकिस्तान सरकारकडून मसूद अझहरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश, प्रवासबंदीही लागू

● निवडणूक आयोगाकडून सरकारला दुष्काळासंदर्भात कामाची परवानगी, मात्र कामाचा प्रचार न करण्याचे आदेश

● हुवावे लाँच करणार जगातील पहिला 5 जी टीव्ही, या वर्षाच्या अखेरीस बाजारात येण्याची शक्यता

● कोलकाताकडून पंजाबचा सात विकेट्सनी धुव्वा, शुभमन गिल ठरला सामनावीर

● ICC T-20 Ranking : भारताची पाचव्या स्थानी घसरण, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर

● ‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहानचे ‘स्कायफायर’ या सीरिजद्वारे वेब विश्वात पदार्पण

● पुणे - शहराला लोकसंख्येच्या तुलनेत किती पाणी कोटा द्यायचा, याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; याबाबत पुढील सुनावणी 12 जून रोजी होणार

● पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा, शुक्रवारी दिवसभरात 35 अंश सेल्सिअस कमाल व 20 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

● पुणे - उपकार्यकारी अभियंता विभागात 160 रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लिपीक सचिन मुकुंद थोरात अटकेत

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 IITM, पुणे येथे 60 जागांसाठी भरती

LetsUp । Job

🎯 पदाचे नाव: ज्युनिअर/ सिनिअर रिसर्च फेलो (JRF/SRF)

🧐 शैक्षणिक पात्रता : (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc./M.S./M.Tech/ सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
(ii) NET/GATE/LS (CSIR/UGC/ICAR).

👉 वयाची अट : 20 मे 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

📍 नोकरी ठिकाण : पुणे

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 20 मे 2019

🌐 अधिकृत वेबसाईट पाहा : https://ltsup.in/2ZWFPaw

🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2ZWPn56

👨‍💻 ऑनलाईन अर्ज करा : https://ltsup.in/2DMXyb4

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 Letsup I General Knowledge

1) ICCच्या ताज्या वार्षिक क्रमवारीत कोणता देश कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी आहे?

उत्तर : भारत

2) 'द थर्ड पिलर - हाऊ मार्केट्स अ‍ॅण्ड स्टेट्‍स लीव्ह द कम्युनिटी बिहाइंड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर : रघुराम राजन

3) NITI आयोगाच्या ‘SDG भारत’ निर्देशांकाच्या कोणत्या राज्याने संयुक्त निर्देशांकात प्रथम स्थान मिळवले?

उत्तर : केरळ

4) भारताची ‘चंद्रयान-2’ मोहीम एक लँडर पाठवविणार असून त्याचे नाव काय आहे?

उत्तर: विक्रम

5) आफ्रिकेच्या कोणत्या देशाने जगातली सर्वात मोठी वैद्यकीय ड्रोन वितरण सेवा सुरू केली?

उत्तर : घाना

6) फुटबॉल रायटर्स असोसिएशन (FWA) या संस्थेकडून कोणत्या ब्रिटिश फुटबॉलपटूला ‘2019 FWA फुटबॉलर ऑफ द इयर’ हा सन्मान दिला गेला?

उत्तर : रहीम स्टर्लिंग

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
👌 आता इन्श्युरन्स पॉलिसीदेखील पोर्ट करता येणार

LetsUp । Update

📍 विमा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, इन्श्युरन्स पॉलिसीदेखील (विमा) पोर्ट करता येणार

🧐 जर विमा ग्राहक सध्या वापरत असलेल्या कंपनीच्या सेवा आणि पॉलिसी फीचर्सने समाधानी नसतील, तर ते ग्राहक हेल्थ पॉलिसी अन्य कोणत्याही कंपनीमध्ये पोर्ट करू शकतात

💁‍♂ पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया अशी :

ग्राहकाला त्याच्या मूळ पॉलिसीच्या एक्सपायरी डेटच्या कमीत-कमी 45-60 दिवस अगोदर नव्या इन्श्युरन्स पॉलिसीसोबत संपर्क करावा लागेल.
यानंतर ग्राहकाला एक प्रपोजल अर्ज भरावा लागेल.
नवी इन्श्युरन्स कंपनी जुन्या इन्श्युरन्स कंपनीशी संपर्क करुन मेडिकल आणि क्लेम हिस्ट्रीची पडताळणी करेल.
नव्या इन्श्युरन्स कंपनीला आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्र मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत आपली पॉलिसी स्वीकारावी लागेल.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC