LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👍 उन्हाळी सुट्टीत पालकांनी करावयाच्या गोष्टी

LetsUp | Parenting

🎯 परिक्षा संपली, पालकांसमोर यक्ष प्रश्न उभा राहतो. उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी करायचं काय? हा पेच पालकांसमोर निर्माण होतो. मग वेळेअभावी यावर उपाय म्हणून पालकवर्ग मुलांना समर कॅप्स, एक्टिव्हिटी क्लासेस, किंवा समर ट्युशन्सना पाठवतात. मात्र या व्यतिरिक्त उन्हाळी सुट्टीमध्ये पालक मुलांसाठी खालील काही नवीन गोष्टी करू शकतात.

मुलांना हुला हूप, दोरीच्या उड्या, जादूचे प्रयोग, लगोरी, विटीदांडू, ठिकरीचा खेळ अशी जुनी खेळ त्यांना शिकवता येईल. यामध्ये त्यांच्या मित्रमंडळींना सहभागी करुन घेऊ शकता.

सुट्टीत मुलांच्या आवडीचे पदार्थ आईस्क्रिम, केक, कुकीज्, जेली, पुडींग हे असे पदार्थ खास त्यांना बनवायला शिकवा. या कामात त्यांना तुम्हीदेखील मदत करा.

यंदाच्या सुट्टीत मुलांना अंगठ्याचे, हाताचे, पायाचे छापे काढत त्यातून तयार होणारी विविध चित्रे काढायला शिकवा. हे नेहमीपेक्षा काहितरी वेगळं असल्याने त्यांना नक्की आवडेल.

पालकांनी सुट्टीच्या दिवसांचे नियोजन करून रोज सकाळी उठल्यावर दरदिवसाचे प्लॅन पाहून, मुलासोबत वेळ घालवावा.

मुलांना जितकी दिवस सुट्टी तितक्या दिवसांसाठी पालकांनी काहीतरी मजेदार बाबी शोधून काढायच्या. यामुळे, सुट्टीचा प्रत्येक दिवस मुलांना काहितरी नवं सरप्राईज मिळेल.

😍 सुट्टीचा काळ जर का इतका उत्साहात गेला, तर सुरु होणारं मुलांचं नवं शालेय वर्ष दणक्यात सुरु होईल. आणि लहानग्यांकडे सुट्टीतील अविस्मरणीय गोष्टींचा साठा जमा होईल.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

राफेल डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्राला पाठवली नोटीस, उत्तर देण्यासाठी 4 मे पर्यंतची मुदत

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जन्मठेप, सुरत सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

'फणी' चक्रिवादळ लवकरच ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याचा इशारा

भारतात श्रीलंकेसारखे स्फोट घडवण्याचा कट? केरळमध्ये संशयितास अटक

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी भारतीय उद्योजक नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांची शिक्षा

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र

गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल 89.59 टक्के, यंदाही मुलींची बाजी
______

💹 Sensex : 39,031.55 | 🔽 −35.78 (0.092%)
💹 NIFTY: 11,748.15 | 🔽 −6.50 (0.055%)
🌟 Gold Rate : ₹32,840.00 for 10gm
________

टिसीएल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड सिस्टीमवर चालणारा स्मार्ट टिव्ही केला लॉंच

उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने इंग्लडच्या अ‍ॅलेक्स हेल्सची संघातून हकालपट्टी

राणी मुखर्जी पुन्हा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, 'मर्दानी 2'चा फर्स्ट लुक रिलीज

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
जय जय महाराष्ट्र माझा,
करू उद्घोष हरित क्रांतीचा,
ऱ्हास टाळू पर्यावरणाचा,
गर्जा महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
LetsUp News Updates

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही, निवडणूक आयोगाकडून मोदींना क्लीन चीट

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक छळाचा खटला तक्रारदाराने मागे घेतला

जम्मू-श्रीनगर येथील कार बॉम्बस्फोट प्रकरणी 6 जणांना अटक, यातील तिघेजण उच्चशिक्षित तर एकजण पीएचडी संशोधक आहे

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती

जेट एअरवेजच्या 100 वैमानिक आणि 450 केब्रिन क्रू सदस्यांना टाटाच्या विस्तारा एअरलाइन्सने आपल्या सेवेत सामावून घेतले आहे

पुलवामा हल्ल्याच्या वक्तव्यावरून अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, माजी पत्रकाराची हायकोर्टात याचिका दाखल

चीनी कंपनी शाओमीचा नवीन अविष्कार, सादर केला वायरलेस इलेक्ट्रिक झाडू

IPL: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पावसामुळं अनिर्णित; बेंगळुरू स्पर्धेबाहेर,

स्टुडंट ऑफ द ईयर 2' मधलं Hook Up Song आऊट, आलिया आणि टायगरची दिसली भन्नाट केमिस्ट्री

अहमदनगर : जादा जनावरे दाखविणारे छावणीचालक प्रशासनाच्या रडारवर

अहमदनगर : मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक यंत्रणेने सुरू केलेल्या मतदार हेल्पलाइनचा साडे आठ हजार जणांना फायदा

अहमदनगर : जिल्ह्यात ग्रीन आर्मीचे सव्वादोन लाख सदस्य; 3 वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा मानस

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 आज महाराष्ट्र दिन

LetsUp । Special

🎯 महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती झाली. मागील 50 वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि आज महाराष्ट्राचे नाव देशात आघाडीवर आहे. कला, साहित्य ,क्रीडा,व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा, तसेच कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवरआहे.

🧐 कशी झाली राज्याची स्थापना?: स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या या चळवळीत 105 वीरांनी आपले बलिदान दिले. या चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्‍ट्र राज्याची निर्मिती झाली. तसेच महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाला.

🙏 मौलिक योगदान: महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये एस.एम.जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादी‍अनेक महत्त्वांच्या व्यक्तींनी आपले मोलाचे योगदान दिले.

📍 अव्व्ल राज्यांमध्ये गणना: गेल्या काही काळात महाराष्ट्राने अतुलनीय प्रगती केली आहे. देशातील औद्योगिक प्रगतीमध्ये अग्रगण्य राज्य होण्याचा मान राज्याने मिळवला. आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक,सांस्कृतिक आणि एकूणच समाज उन्नतीसाठी राज्याचं नाव आज जगभरात अग्रक्रमाने घेतलं जातं. देशातल्या मोजक्याच सुखवस्तू राज्यामध्ये महाराष्ट्राची गणना होते.

💁‍♂ उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळेच महाराष्ट्र जगला, तर देश जगेल, असं म्हटलं जातं. महाराष्‍ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.

💫 राज्याचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
😱 राज्यातील जलसाठा घटला*

LetsUp | Update

🎯 राज्यातील धरणांमध्ये एप्रिल अखेर केवळ 19.63 टक्के पाणीसाठा शिल्लक

📍 राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या 17.69 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी तो 33.46 इतका होता. तर मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी या काळात 33.13 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो आता 28.92 टक्क्यांवर आला आहे

🧐 पाण्याची टक्केवारी:

औरंगाबादच्या धरणांमध्ये सध्या 2.73 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी तो 32.54 इतका होता.
नाशिक विभागात सध्या 16.2 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी तो 35.89 इतका होता.
नागपूर विभागात सध्या 8.67 टक्के इतका पाणीसाठा असून, तो गतवर्षी 16.82 इतका होता.
कोकणात गेल्यावर्षी 48.78 टक्के पाणीसाठा होता, यंदा तेथे केवळ 36.58 टक्के पाणी आहे.
मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या कोकणातही पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

🚒 टँकरद्वारे पाणीपुरवठा: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर याचार जिल्ह्यांमध्ये 757 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मे मध्ये ही संख्या दीड ते दोन हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#JayMaharashtra

गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा
अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा
जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती
निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी!!
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा
।।जय महाराष्ट्र।।
🧐 उन्हाळ्यात फूड पॉइझनिंग! असा करा बचाव

LetsUp | Tips

💁‍♂ उन्हाळ्यात बाहेरचा आहार घेणे अनेकदा त्रासदायक ठरते. उन्हाळ्यात खाद्य पदार्थ लवकर खराब होतात आणि यामुळेच फूड पॉइझनिंगचा त्रास उद्भवतो. अशात काही टिप्स लक्षात ठेवल्या तर यापासून वाचता येऊ शकते.

आलं : आलं हे अन्नपचनासाठी अतिशय फायदेशीर असते. फूड पॉयझनिंग झाल्यावर आलं घालून चहा प्या. आल्यामुळे फूड पॉयझनिंगची समस्या वाढवणाऱ्या बॅक्टेरीयांची वाढ होण्यास आळा बसतो.

जिरे : रोज एक चमचा जिरे वाटून त्याची पेस्ट खाल्याने फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल. जिऱ्यामुळे पचनक्रीया सुधारते.

केळ : केळं एकमेव फळ आहे जे पचनास हलकं असतं. फूड पॉयझनिंगच्या समस्येवर केळं खाणे फायदेशीर ठरते. पण त्याचा अतिरेक टाळा.

लिंबाचे सेवन: लिंबात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबेक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. म्हणून लिंबू पाणी पिण्याने बॅक्टेरिया मरतात. आपण रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिऊ शकता. शक्य असल्यास गरम पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकतात.

दही : दही एका प्रकारे अँटीबायोटिक आहे आणि यात जरा काळं मीठ घालून खाल्ल्याने आराम मिळेल.

लसूण : लसणात अँटी फंगल गुण असल्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 1-2 पाकळ्या घेतल्याने आराम मिळेल.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💥 ब्रेकिंग! घरगुती गॅसच्या किमतीत वाढ

LetsUp | Breaking

सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत केली वाढ, यामुळे सामन्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार

🎯 घरगुती सबसिडीमध्ये मिळणाऱ्या गॅसची किंमत 6 रुपयांनी तर सबसिडी नसलेल्या गॅसच्या किमतीत 22.5 रुपयांची झाली वाढ

📍 सुधारित दर हे आजपासून लागू होणार, यापूर्वी 1 एप्रिल रोजी गॅसच्या किमतीमध्ये करण्यात आली होती वाढ

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
LetsUp News Updates

● मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केली घोषणा

● गडचिरोलीत नक्षलींनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात सी-60 पथकातील 15 जवान शहीद

● जीएसटी उत्पन्नाचा एप्रिलमध्ये उच्चांक, सरकारला 1,13,865 कोटी रुपयांचे झाले उत्पन्न

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● लोकसभा निवडणूक : आतापर्यंत 3,000 कोटी रुपयांचा काळा पैसा निवडणूक आयोगाने केला जप्त

● अमेरिकेत एका भारतीय नागरिकाची, तर तीन भारतीय वंशाच्या लोकांची हत्या : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

● आचारसंहिता उल्लंघन : साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, तीन दिवस प्रचारबंदी

● राज्यात आजपासून MHT-CET, 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांच्या लॉग-इनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध

● Oppo F11 Pro ‘अँव्हेंजर्स एंडगेम एडिशन’चा सेल सुरू, या स्मार्टफोनचा मर्यादित साठा विक्रीसाठी

● चेन्नई सुपर किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 80 धावांनी धुव्वा, चेन्नईची गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप

●‘भारत’ सिनेमातील सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचे रोमॅन्टिक गाणं ‘चाशनी’ रसिकांच्या भेटीला

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🏏 दिल्लीचा धुव्वा; चेन्नई टॉपवर

LetsUp | Ipl Special

सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा 80 धावांनी उडवला

🔝 या विजयासह चेन्नई संघ पुन्हा अव्वल स्थानी पोहोचला, त्यांचे 18 तर दिल्लीचे 16 गुण झाले आहेत

🎯 चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 179 धावा केल्या, या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव अवघ्या 99 धावांत आटोपला

🏆 मोक्याच्या क्षणी 22 चेंडूत नाबाद 44 धावा कुटणारा महेंद्रसिंग धोनी ठरला सामनावीर

आज मुंबईविरुद्ध हैदराबाद लढत

💁‍♂ प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आज भिडणार

👍 प्ले ऑफसाठी मुंबई इंडियन्सला एका विजयाची तर सनरायझर्स हैदराबादला पुढील दोन्ही लढतींमध्ये विजय आवश्यक

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 आजपासून MHT-CET 2019 परीक्षा*

LetsUp | Update

👍 इंजिनीअरिंग, औषधनिर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेला आज (दि. 2) मेपासून सुरुवात

👉 राज्यातील विविध शहरांमध्ये दि. 2 ते 13 मे या कालावधीत MHT-CETच्या परीक्षा होणार, दिवासाला 2 सत्रांमध्येमध्ये ही परीक्षा सुरु

🎯 महाराष्ट्राच्या 3 लाख 96 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी केले अर्ज, यामध्ये पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये विद्यार्थी ही परीक्षा देणार

📝 आवश्यक कागदपत्रे : उमेदवाराचे आधार कार्ड/ ई-आधार कार्ड, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, चालक परवाना(ड्रायव्हिंग लायसन्स), मतदार ओळखपत्र फोटोसह, बँक पासबुक, उमेदवाराचे छायाचित्रासह अधिकृत लेटरहेडवर गॅझेटेड ऑफिसरने जारी केलेला फोटो, ओळख पुरावा, उमेदवाराला मान्यताप्राप्त शाळा / महाविद्यालयाद्वारे जारी केलेले अलीकडील ओळखपत्र

💁‍♂ विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी अशी :

लेझर प्रिंटरच्या साहाय्याने कागदावर हॉल तिकिटाची प्रिंट घ्या
हॉल तिकीट वैध असेल तरच उमेदवारांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी प्रतिमा योग्यरित्या मुद्रित केली जातात
आपल्या ऑनलाइन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी व उमेदवाराचा पत्ता याबाबत चुकीची माहिती भरली गेली असल्यास अंडरटेकिंगचा नमूना अर्ज भरून परीक्षा केंद्रावर घेऊन जावा
परीक्षेच्या दिवशी प्राधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
परीक्षा केंद्राच्या आत व गेटच्या आतमध्ये मित्र आणि पालकांना घेऊन जाऊ नका
परीक्षेत प्रत्येक उमेदवाराला एकदाच कच्च्या कामासाठी कागद दिला जातो. त्यामुळे मिळालेला कागद वाया घालवू नये

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🛰 'इस्रो'ची मोठी घोषणा; चांद्रयान-2 जुलैमध्ये झेपावणार

LetsUp | Update

🌕 भारताच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' या दुसऱ्या चंद्रमोहिमेचे प्रक्षेपण 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान करण्यात येणार

🚀 जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटामधून चांद्रयान-2 चं प्रक्षेपण होईल, यानंतर 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान- 2 चंद्रावर दाखल होईल

🎯 चांद्रयान-2 ची वैशिष्ट्ये :

चांद्रयान-2 चे वजन 3290 किलो इतके असेल
चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटर लॅण्डरपासून वेगळा होईल
यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि मग रोवर त्यापासून वेगळा होईल
रोवरमध्ये अत्याधुनिक उपकरणं तर ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणं, कॅमेरा आणि सेंसर असतील
हे दोन्ही चंद्राच्या पृष्ठभागावर मिळणारे मिनरल्स आणि इतर पदार्थांची माहिती पाठवतील. त्यावर इस्रो अभ्यास करेल

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🤨 तुम्हाला माहित आहे का?

LetsUp | Do U Know

🦁 सिंह 2 वर्षापर्यंत गर्जना करू शकत नाही.

🌝 चंद्र पृथ्वीच्या आकाराच्या 27% आहे.

----------------------
📣 *सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, निकाल पहा* : https://ltsup.in/2Lebpgp
----------------------

मानवी शरीर प्रत्येक सेकंदाला 2,500,000 नवीन लाल रक्त पेशी तयार करते.

🦟 डासांचे सरासरी आयुष्य 2 आठवडे असते.

🇺🇸 US व्हाईट हाऊसमध्ये तब्बल 132 खोल्या आहेत.

🕷 कीटकांच्या 900,000 पेक्षा अधिक ज्ञात प्रजाती आहेत.

🧂 समुद्राच्या पाण्यामध्ये अंदाजे 3.5% मीठ आहे.

🐝 दरवर्षी मधमाश्या सापांपेक्षा अधिक लोकांना मारतात.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💑 जो जोनस विवाहबंधनात

LetsUp | Entertainment

'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा दीर म्हणजेच अमेरिकन गायक निक जोनास याचा भाऊ जो जोनस विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

'गेम ऑफ थ्रोन्स' फेम सोफी टर्नर हिच्यासोबत एका खासगी सोहळ्यात त्या दोघांनी ख्रिस्ती धर्म पद्धतीनुसार लग्न केले आहे. माहितीनुसार, 1 मे रोजी या जोडीची विवाहनोंदणीही करण्यात आली.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💥 पुण्यातील मुळशी धरणात बुडून तिघांचा मृत्यू

LetsUp | Breaking

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वळणे गावात 3 विद्यार्थ्यांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

💁‍♂ पुण्यातील भारती विद्यापीठ येथे MBAचे शिक्षण घेणारे हे विद्यार्थी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर

👉 मयत विद्यार्थ्यांची नावे : संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिवकुमार अशी धरणात बुडालेल्‍यांची नावे आहेत

🔎 घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांना तिघांचा मृतदेह शोधण्यात आले यश

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 संजय गांधी निराधार योजना

LetsUp । Govt. Schemes

🎯 उद्देश: शासनाच्या वतीने राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना 1980 पासून राबविण्यात येत आहे.

📍 योजनांसाठी अटी:

किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
वय- 65 वर्षांपेक्षा कमी
कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये 21,000/- पर्यंत

💁‍♂ लाभाचे स्वरूप

लाभार्त्यांस दरमहा रुपये 600/- अनुदान

एका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये 900/- प्रतिमाह अनुदान

🧐 आवश्यक कागदपत्रे:

वयाचा दाखला
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
अपंगत्व/ सिव्हील सर्जन/ सरकारी हॉस्पिटलच्या रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला

🏢 संपर्क साधण्याचे ठिकाण: अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, तहसलिदार कार्यालय, तलाठी कार्यालय

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🙏 श्री स्वामी समर्थ यांची आज पुण्यतिथी

LetsUp | Special

🎯 श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (इ.स.1856-1878) हे इसवी सनाच्या 19 व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते अवतार मानले जात.

👌 'भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे' असे सार्थ आशीर्वचन देणारे श्री स्वामी समर्थ हे इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट येथे आले. स्वामींनी अक्कलकोट येथे जवळपास 22 वर्ष वास्तव्य केले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा प्रदान केली.

📍 1878 साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला. स्वामींना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवास स्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. आजही स्वामींचे भक्त जागो जागी आहेत.

👏 आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 जाणून घ्या कॉमर्स क्षेत्रातील संधी

LetsUp । Career

🎯 बहुतांश वेळा दहावी, बारावीनंतर कॉमर्स शाखा निवडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉमर्समधील संधी बाबत योग्य ती माहिती नसते. कोणतेही क्षेत्र निवडताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या, व उत्तम करिअर कसे करायचे याबाबत आपण जाणून घेऊ

💁‍♂ बहुतांश क्षेत्रात कॉमर्सची गरज: अकाउंटिंग, टॅक्सेशन, प्रशासन, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, इन्शुरन्स, डिफेन्स, स्टॉक मार्केट, बँकिंग, फायनान्स, लॉ, टॅक्स कान्सल्टिंग, इंटरनॅशनल बिझनेस, पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, मल्टीमीडिया, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत कॉमर्स पदवीधारकांना संधी असते.

🧐 या गोष्टींची आवश्यकता:

मातृभाषेसोबत इंग्रजी आणि इतर भाषेवर प्रभुत्व हवे
मेहनत आणि ग्लोबल अवेअरनेस असणे आवश्यक
अवांतर वाचन करून जास्तीत जास्त ज्ञानात भर पाडणे
सतत नवनवीन गोष्टींचा शोध घेणे

📍 या क्षेत्रात अनेक संधी असून, ज्ञान आणि अनुभावरून या क्षेत्रातील पगार ठरतात. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आयत्या नोट्सवर अवलंबून न राहता रेफरन्स बुक्स आणि अवांतर वाचन या वरून अभ्यास करावा. तसेच दररोज किमान दोन वृत्तपत्रे आणि महिन्यातून एकदा एक तरी मासिक वाचावे

💫 करिअरसाठी पदवीसोबत पदव्युत्तर कोर्स केल्यास त्याचा चांगला फायदा होतो

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
😱 ओडिशातून 8 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

Letsup । Update

फनी चक्रीवादळ ओडिशातील पुरी येथील किनारपट्टीला धडकण्याची शक्यता

🧐 बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या फनी चक्रीवादळाने अतितीव्र रुप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ओडिशा किनारपट्टी भागातील 8 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच ओएनजीसीने त्यांच्या 500 कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

📍 महत्वाचे
गेल्या दोन दिवसांत ओडिशातील 89 रेल्वेगाड्या रद्द
सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश
ओडिशामधील 11 जिल्ह्यात आचार संहिता हटविण्यात आली
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके महत्वाच्या ठिकाणी तैनात

या वादळाच्या प्रभावामुळे ओडिशातील 11 जिल्ह्यांत, मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC