LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🤔 उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?

LetsUp | Health

सध्या राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत आहे. या वाढत्‍या उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. त्‍यामुळे उष्माघाताची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? ते पाहुयात...

1) डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. शक्यतो फ्रिजमधले थंडगार पाणी पिणे टाळावे.

2) नियमित सब्जा घातलेले पाणी प्या. यामुळे शरीराला थंडावा मिळत राहील.

3) उन्हातून एसीत किंवा एसीतून लगेच उन्हात जाऊ नका. कारण शरीराला झटकन बदललेल्या तापमानाशी जुळवून घेणे कठीण जाते.

4) गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता शोषून घेतात. त्यामुळे शक्यतो फिकट रंगाचे कपडे, सूती कपडे वापरावेत.

5) उन्हात फिरताना पांढरा स्कार्फ किंवा डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच घराबाहेर पडा.

6) दही, ताकाचा आहारात समावेश करा. तेलकट तूपकट वर्ज्य करुन हलका आहार घेत रहा.

7) लिंबूपाणी, कोकम सरबत किंवा कैरीचे पन्हे पिण्यावर भर द्यावा.

8) कलिंगड, ताडगोळा, खरबूज, जाम अशी फळे भरपूर खावीत. यामुळे, आरोग्याला फळांतील नैसर्गिक जीवनसत्त्वे थेट मिळतील.

दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळता येणार नसेल, तर किमान वरील गोष्टी दुर्लक्षित करू नका. कारण उष्माघात शरीराला आतून कमकुवत बनवतो हे लक्षात ठेवा.

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🧐 ऑटोमोबाईल कुठं काय?

LetsUp | Auto

1) बलेनोचे हायब्रिड मॉडेल लॉन्च: मारुती सुझुकी कंपनीने 1.2 ड्युअल जेट आणि बीएस स्टेज 6 इंजिन असलेली नवीन हायब्रीड बलेनो बाजारात उतरवली आहे.

नव्या मॉडेलनंतर बलेनोचे नेहमीचे 1.2 लीटर आणि हायब्रीड असे दोन प्रकार उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना यासाठी 5.58 लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे. इंजिनच्या नव्या अत्याधुनिक तंत्रामुळे पेट्रोलची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

2) Ducati ची Scrambler लाँच: इटलीची कंपनी डुकाटीने स्क्रॅम्बलर मोटरसायकलची नवी आवृत्ती बाजारात आणली आहे. स्क्रॅम्बलरच्या मालिकेत आयकॉन, फुल थ्रोटल, कॅफे रेसर आणि डेझर्ट स्लेड यांसारखे मॉडल्स आहेत.

कंपनीच्या जाहिरातीनुसार नव्या आयकॉनची किंमत 7.89 लाख रुपये, फुल थ्रोटलची किंमत 8.92 लाख रुपये, कॅफे रेसरची किंमत 9.78 लाख रुपये आणि डेझर्ट स्लेडची किंमत 9.93 लाख रुपये आहे. कंपनीच्या देशातील सर्व 9 डिलरशिपमध्ये बाईकसाठी बुकिंग सुरू झाली आहे.

3) अल्टो 800 ची नवीन आवृत्ती : मारूती सुझुकी कंपनीने अल्टो 800 या लोकप्रिय मॉडेलची नवीन आवृत्ती विविध व्हेरियंटच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना सादर केली आहे.

🎯 नवीन फिचर्स :

यात प्रामुख्याने डिझाईन, अंतर्गत भाग आणि सुरक्षाविषयक फिचर्समध्ये बदल करण्यात आलेला आहे.
आता ड्रायव्हरच्या बाजूने सुरक्षेसाठी एयर बॅगची सुविधा देण्यात आलेली आहे.
ईबीडी प्रणालीसह एबीएस सिस्टीम प्रदान केलेली आहे.
रिअर पार्कींग सेन्सर, सिटबेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टीमचाही अंतर्भाव केलेला आहे.
कारची डिझाईनदेखील थोड्या प्रमाणात बदलण्यात आलेली आहे.
या मॉडेलमध्ये 796 सीसी क्षमतेचे, थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन प्रदान करण्यात आले आहे.
हे इंजिन बीएस-6 या मानकानुसार विकसित करण्यात आले असून याला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समीशन प्रणालीशी संलग्न करण्यात आले आहे. यात सीएनजीचा पर्याय दिलेला नाही.

💰 विविध व्हेरियंटचे मूल्य : मारूती सुझुकीच्या नवीन अल्टो मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य हे स्टँडर्ड आवृत्ती 2.94 लाख; स्टँडर्ड (ओ) 2.97 लाख; एलएक्सआय 3.50 लाख; एलएक्सआय (ओ) 3.55 लाख आणि व्हीएक्सआय 3.72 लाख रूपये इतके आहे.

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 श्रीलंकेत बुरखा बंदी

LetsUp | International

बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर बंदीचा निर्णय

💁‍♂ निर्णय का?: चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तिची ओळख पटण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून, हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी दिली

दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्याने घेण्यात आला हा निर्णय

संविधानाने दिलेल्या आणीबाणीच्या काळातील कायद्याच्या आधारे निर्णयाची अंमलबजावणी

🗣 सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करून जाऊ नका, असं आवाहन ऑल सिलोन जमैयतूल उलेमा या श्रीलंकेतील मुस्लिम संघटनांनी महिलांना केलं आहे

📍 आज सोमवार (दि.29) पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💃 आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस; जाणून घ्या महत्व

LetsUp | International Dance Day

💁‍♂ दरवर्षी 29 एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (इ.स.1727-1810) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.

📍 युनेस्कोची एक सह संघटना असलेली आयटीआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था यांच आयोजन करतं. ही संस्था 1982 पासून हा दिवस साजरा करते.

🎯 दिवसाचे महत्व: जगभरात नृत्यकला साजरी करणे, नृत्यकलेने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धर्माच्या विविधतेच्या सीमा ओलांडून सर्वाना ‘नृत्या’च्या द्वारे एकत्र आणणे, आणि नृत्यकलेचे समाजातले स्थान उंचावणे हा मुख्य उद्देश या दिवसामागे आहे.

💫 भारतीय नृत्यशैली: नृत्य ही एक 64 कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत.

🧐 भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार:

महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य
तामिळनाडू - भरतनाट्यम
केरळ - कथकली
आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
पंजाब - भांगडा, गिद्धा
गुजरात - गरबा, रास
ओरिसा - ओडिसी
जम्मू आणी काश्मीर - रौफ
आसाम - बिहू, जुमर नाच
उत्तरखंड - गर्वाली
मध्य प्रदेश - कर्मा, चार्कुला
मेघालय - लाहो
कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
मिझोरम - खान्तुंम
गोवा - मंडो
मणिपूर - मणिपुरी
अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
झारखंड - कर्मा
छत्तीसगढ - पंथी
राजस्थान - घूमर
पश्चिम बंगाल - गंभीरा
उत्तर प्रदेश - कथक

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 जाणून घ्या ‘ऋकार’, ‘रकार’, ‘रफार’ आणि ‘काकपद’ म्हणजे काय?

LetsUp | Learn

मराठी व्याकरण समजून घेताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. आज अशाच काही साध्या पण महत्वपूर्ण प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊयात. ‘ऋकार’, ‘रकार’, ‘रफार’आणि ‘काकपद’ आपण अनेकदा वापरतो. मात्र ते कुठे, कधी आणि कसे वापरायचे? हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आज त्याबाबत जाणून घेऊयात...

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 आत्मविश्वास वाढवणारे निवडक सुविचार

LetsUp | Motivation

💁‍♂ आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देत नाही, पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो. आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी आम्ही तुमच्या साठी काही खास सुविचार घेऊन आलो आहे. जे वाचून तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्‍या चढाव्या लागतात.

विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.

विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे, याचेच नाव खरे शिक्षण.

विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.

सावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि दृष्ट निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.

स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील.

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🧐 तपासून पहा तुमचे आधारकार्ड सुरक्षित आहे का?

LetsUp । Special

💁‍♂ आधारकार्डच्या माध्यमातून नागरिकांची खाजगी माहिती लीक अशा घटना आपण ऐकल्या असतील. म्हणूनच आपल्या आधारकार्डाचा वापर कुठे होतोय, याबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

👍🏻 अशाप्रकारे मिळवा माहिती:
सर्वप्रथम uidai.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करत, my aadhar यावर क्लिक करा. त्यामध्ये आधार सर्व्हिसेस या सेक्शनला सिलेक्ट करून आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर रिडायरेक्टेड पेजवर जा. तिथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक CAPTCHA यासह टाका. त्यानंतर ओटीपी ऑप्शन सिलेक्ट करून तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.

पुढील पेजवर जाऊन अगोदरचे ऑप्शन ऑथेंटिकेशन टाईप निवडा आणि ऑल म्हणून डिफॉल्ट सेट करा.

आता तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन रिक्वेस्टची यादी दिसेल. या यादीला तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्म तारिख पासवर्डअसते.

👀 त्यानंतर या यादीमध्ये तुमचे आधार कार्ड कुठे कुठे वापरलं आहे, याची संपूर्ण माहिती मिळेल.

📍 या यादीमध्ये तुम्हाला काही संशयास्पद वाटले तर, तुम्ही UIDAI ला संपर्क साधून याबाबत तक्रार करु शकता.

📞 यासाठी 1947 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत देशात 59.25 राज्यात सरासरी 52.07 टक्के मतदान

सोशल मीडिया अकाउंट आधारशी लिंक करावे, भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

राफेल प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा दिलगिरी व्यक्त केली

मध्यरात्री घरात घुसून गोंधळ घातल्या प्रकरणी भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीला अटक

आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात याचिका दाखल

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी यासीन भटकळ वर आरोप निश्चित

अमेरिकेतील पोवे शहरामध्ये एका अज्ञातांकडून धार्मिक कार्यक्रमामध्ये बेछूट गोळीबार, 1 ठार तर तिघेजण जखमी

पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे, सरकारने ही मोहिम स्थगित केली

बांबूच्या लाकडाचा वापर करुन, कंपनी फोर्ड ब्रोन्कोने बनवली जगातील पहिली 100 टक्के इलेक्ट्रिक कार

IPL: स्टॅम्पला बॅट मारणे रोहित शर्माला पडले महागात, आयपीएलने ठोठावला सामन्याच्या मानधनाचा 15 टक्के दंड

'कंचना' चित्रपटाच्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन साकारणार तृतीयपंथाची भूमिका

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp News Updates

● देशभरात चौथ्या टप्प्यात 64 तर राज्यात 57 टक्के मतदान; बंगालमध्ये भरघोस प्रतिसाद

● राफेल निर्णय फेरविचार याचिका : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

● जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, देशभरात 24 विद्यार्थ्यांना 100 पर्सेटाईल

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● आमच्या देशात दहशतवादी आणि जिहादी संघटना आहेत, पाकिस्तानी लष्कराची कबुली

● इंडोनेशियामध्ये पूराने घातले थैमान, आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू; हजारो विस्थापित

● विदर्भातील शहरे जगात सर्वाधिक उष्ण; हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्ष

● राज्यात उष्णतेचा कहर कायम; उष्माघाताचे 8 तर पाणीटंचाईचे 3 बळी, दोघांवर उपचार सुरु

● एक्यूफिटकडून भारतीय ग्राहकांसाठी एम 2 हा फिटनेस बँड सादर, यात फिटनेस ट्रॅकींगचे सर्व फिचर्स प्रदान

● सनरायजर्स हैदराबादचा किंग्ज XI पंजाबवर दमदार विजय; डेव्हिड वॉर्नर ठरला सामनावीर

● अभिनेता करण सिंह ग्रोवर आणि त्याची पत्नी बिपाशा बासू लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार

● पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात 58.21 टक्के, तर शिरूर मतदार लोकसभा मतदारसंघात 58.4 टक्के मतदान

● पुणे - येत्या गुरुवारी म्हणजे 2 मे रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

● पुणे : सहकारनगर भागात एसबीआय बँकेचे एटीएमफोडुन 10 लाखांची रोकड लंपास; पोलिस घटनास्थळी दाखल दाखल

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांडमध्ये 600 जागांसाठी भरती

LetsUp । Job

💁♂ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

मेट / वॉशरमन / कुक / टेलर / उपकरणे रिपेयर/ कारपेंटर : 51
पोर्टर : 541
सफाईवाला : 08

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2IQTjPA

👨💻 अधिकृत वेबसाईट पाहा : https://ltsup.in/2GJqEJ2

🌐लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🧐 IPL 2019: प्लेऑफसाठी जोरदार चुरस

LetsUp । Ipl Special

आता आयपीएलचा 12वा मोसम शेवटच्या टप्प्यात, अजूनही प्ले ऑफमध्ये कोणत्या टीम प्रवेश करणार याबाबत उत्सुकता कायम आहे

👀 सध्याच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर प्लेऑफच्या शेवटच्या 2 स्थानांसाठी 5 टीममध्ये टक्कर पाहायला मिळत आहे

👉 यामध्ये मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या टीमचा समावेश असून बंगळुरूची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे

👍 दोन टीम प्लेऑफमध्ये : दिल्ली आणि चेन्नईच्या टीम प्लेऑफमध्ये आधीच पोहोचल्या आहेत. या टीमनी 12 पैकी 8 मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही टीमकडे प्रत्येकी 16-16 पॉईंट्स आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्लीची टीम पहिल्या तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

💁‍♂ मुंबईला एक विजय आवश्यक : मुंबईची टीम तिसऱ्या क्रमांकावर असून मुंबईने 12 पैकी 7 मॅच जिंकून 14 पॉईंट्स कमावले आहेत.

उरलेल्या 2 पैकी एक मॅच जिंकली तरी मुंबईची टीम प्लेऑफमध्ये प्रवेश करेल, पण दोन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, तर इतर टीमची कामगिरी आणि मुंबईचा नेट रनरेट यावर प्लेऑफचे भवितव्य अवलंबून असेल.

🤔 हैदराबाद संधी : पॉईंट्स टेबलकडे बघितलं तर हैदराबादला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची जास्त संधी आहे. मात्र संघ उर्वरित सामन्यात पराभूत झाल्यास त्यांचे गणित बिघडू शकते. मग त्यांना नेट रनरेट आणि इतर संघाच्या पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे.

केकेआर, राजस्थान आणि पंजाबचा संघर्ष : प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी केकेआर, राजस्थान आणि पंजाबला उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. तरीही प्लेऑफचं गणीत नेट रनरेटवर अवलंबून असेल.

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
😳 नेपाळच्या सीमेवर हिममानव; नेटिझन्स चकीत

LetsUp । Update

🎯 भारतीय सैन्याला हिममानवाच्या पावलाचे (32 X 15) सापडले ठसे, यासंदर्भात सैन्यदलाने ट्विट करुन दिली माहिती

👍 नेपाळ सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ हे ठसे वाढले, हिममानवाला स्थानिक लोक यती म्हणून संबोधतात

💁‍♂ हिममानव अर्थात यती : नेपाळ सीमेवरील हिमपर्वतरांगांमध्ये लोकांमध्ये एका केसाळ, उंच आणि धिप्पाड राक्षसासारख्या दिसणाऱ्या हिंस्त्र हिममानव फिरत असल्याची मान्यता आहे. या हिममानवाला स्थानिक लोकं यती या नावाने संबोधतात.

भारतीय लष्कराने केलेल्या या ट्विटमुळे जगभरात पुन्हा एकदा 'खरंच हिममानव अस्तित्वात आहे का?' या चर्चेने धरला जोर

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 Letsup I General Knowledge

1) ISISशी संबंधित कोणत्या संस्थेवर श्रीलंकेच्या सरकारने बंदी घातली आहे?

उत्तर : नॅशनल थौहीद जमात (NTJ) आणि जमाते मिलाथू इब्राहिम (JMI)

2) फनी चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवरील कोणते राज्य सर्वाधिक गंभीरपणे प्रभावित झाले?

उत्तर : आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू

3) UN-हॅबिटॅट या संघटनेचा सुरक्षित शहरे कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?

उत्तर : वर्ष 1966

4) जगातला सर्वात लठ्ठ आणि वजनदार पोपट कोणता आहे?

उत्तर : काकापो (न्यूझीलँड)

5) सुरक्षित शहरे कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातले सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे?

उत्तर : चेन्नई

6) लंडनच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीकडून फेलोपदासाठी निवडल्या गेलेल्या प्रथम भारतीय महिला संशोधक कोण?

उत्तर : डॉ. गगनदीप कांग

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 अभिनेते ऋषी कपूर कॅन्सरमुक्त

LetsUp । Update

कॅन्सर आजाराने ग्रस्त असलेले बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती ठीक

🎯 ऋषी कपूर यांचा आजार ठीक झाला असून ते कॅन्सरमुक्त झाले आहेत, अशा आशयाची फेसबुक पोस्ट दिग्दर्शक राहुल रवैल यांनी पोस्ट केली आहे.

💫 रवैल यांनी ऋषी कपूरसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

📍 फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🛰 इस्रो 5 'कमांडो' सॅटेलाईट सोडणार; सैन्याची ताकद वाढणार

LetsUp । Update

💁‍♂ दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यासाठी इस्रोची तयारी, यामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार

👍 त्यानुसार पुढील 10 महिन्यांमध्ये ते 8 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडणार आहेत

🧐 यातील या 5 उपग्रहांपैकी एक कार्टोसॅट सिरिज आणि 4 रीसॅटचे उपग्रह असून अन्य 3 उपग्रह हे जीसॅट सिरिजमधील आहेत

फेब्रुवारी 2020 पर्यंत हे उपग्रह लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे

🎯 10 महिन्यांमध्ये खालील उपग्रह लॉन्च होणार:

रीसॅट-2बी : मे 2019
कार्टोसॅट-3 : जून 2019
रीसॅट-2बीआर1 : जुलै 2019
जीसॅट-1(न्यू) : सप्टेंबर 2019
रीसॅट-2बीआर 2 : ऑक्टोबर 2019
जीसॅट-2 : नोव्हेंबर 2019
रीसॅट-1ए : नोव्हेंबर 2019
जीसॅट-32 : फेब्रुवारी 2020

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🙏 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आज जयंती

Letsup । Special

💫 तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे.

💁‍♂ अमरावती जिल्ह्यातील शहीद यावली नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव माणिकदेव बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट) होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत अडकोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकडोजी’ ठेवले होते.

👌 देव, धर्म, वर्ण, संसार, श्रम, संपत्ती, जीवनशिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विचार मांडले आहेत. आयुष्यभर ते खेड्यापाड्यात फिरले. हा देश त्यांनी बघितला. त्यातून लोकांची दुःख दूर झाली पाहिजे, या उर्मीने ते झटत राहिले. ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.

👍 विशेष:
1949 मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडून त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाली.
जपानमध्ये 1955 मध्ये भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
18 देशांच्या समितीचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
विदर्भ साहित्य संघाच्या तुमसर संमेलनात त्यांचा थोर साहित्यिक म्हणून गौरविण्यात आले.
युद्धजन्य परिस्थितीत सैन्यास धीर देण्यासाठी स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गायली.

🎯 देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करु शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला.

📍 कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

🙏 अशा या महान संतांची आज जयंती आहे, त्यांना विनम्र अभिवादन

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
👍 उन्हाळी सुट्टीत पालकांनी करावयाच्या गोष्टी

LetsUp | Parenting

🎯 परिक्षा संपली, पालकांसमोर यक्ष प्रश्न उभा राहतो. उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी करायचं काय? हा पेच पालकांसमोर निर्माण होतो. मग वेळेअभावी यावर उपाय म्हणून पालकवर्ग मुलांना समर कॅप्स, एक्टिव्हिटी क्लासेस, किंवा समर ट्युशन्सना पाठवतात. मात्र या व्यतिरिक्त उन्हाळी सुट्टीमध्ये पालक मुलांसाठी खालील काही नवीन गोष्टी करू शकतात.

मुलांना हुला हूप, दोरीच्या उड्या, जादूचे प्रयोग, लगोरी, विटीदांडू, ठिकरीचा खेळ अशी जुनी खेळ त्यांना शिकवता येईल. यामध्ये त्यांच्या मित्रमंडळींना सहभागी करुन घेऊ शकता.

सुट्टीत मुलांच्या आवडीचे पदार्थ आईस्क्रिम, केक, कुकीज्, जेली, पुडींग हे असे पदार्थ खास त्यांना बनवायला शिकवा. या कामात त्यांना तुम्हीदेखील मदत करा.

यंदाच्या सुट्टीत मुलांना अंगठ्याचे, हाताचे, पायाचे छापे काढत त्यातून तयार होणारी विविध चित्रे काढायला शिकवा. हे नेहमीपेक्षा काहितरी वेगळं असल्याने त्यांना नक्की आवडेल.

पालकांनी सुट्टीच्या दिवसांचे नियोजन करून रोज सकाळी उठल्यावर दरदिवसाचे प्लॅन पाहून, मुलासोबत वेळ घालवावा.

मुलांना जितकी दिवस सुट्टी तितक्या दिवसांसाठी पालकांनी काहीतरी मजेदार बाबी शोधून काढायच्या. यामुळे, सुट्टीचा प्रत्येक दिवस मुलांना काहितरी नवं सरप्राईज मिळेल.

😍 सुट्टीचा काळ जर का इतका उत्साहात गेला, तर सुरु होणारं मुलांचं नवं शालेय वर्ष दणक्यात सुरु होईल. आणि लहानग्यांकडे सुट्टीतील अविस्मरणीय गोष्टींचा साठा जमा होईल.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

राफेल डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्राला पाठवली नोटीस, उत्तर देण्यासाठी 4 मे पर्यंतची मुदत

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जन्मठेप, सुरत सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

'फणी' चक्रिवादळ लवकरच ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याचा इशारा

भारतात श्रीलंकेसारखे स्फोट घडवण्याचा कट? केरळमध्ये संशयितास अटक

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी भारतीय उद्योजक नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांची शिक्षा

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र

गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल 89.59 टक्के, यंदाही मुलींची बाजी
______

💹 Sensex : 39,031.55 | 🔽 −35.78 (0.092%)
💹 NIFTY: 11,748.15 | 🔽 −6.50 (0.055%)
🌟 Gold Rate : ₹32,840.00 for 10gm
________

टिसीएल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड सिस्टीमवर चालणारा स्मार्ट टिव्ही केला लॉंच

उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने इंग्लडच्या अ‍ॅलेक्स हेल्सची संघातून हकालपट्टी

राणी मुखर्जी पुन्हा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, 'मर्दानी 2'चा फर्स्ट लुक रिलीज

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
जय जय महाराष्ट्र माझा,
करू उद्घोष हरित क्रांतीचा,
ऱ्हास टाळू पर्यावरणाचा,
गर्जा महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
LetsUp News Updates

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही, निवडणूक आयोगाकडून मोदींना क्लीन चीट

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक छळाचा खटला तक्रारदाराने मागे घेतला

जम्मू-श्रीनगर येथील कार बॉम्बस्फोट प्रकरणी 6 जणांना अटक, यातील तिघेजण उच्चशिक्षित तर एकजण पीएचडी संशोधक आहे

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती

जेट एअरवेजच्या 100 वैमानिक आणि 450 केब्रिन क्रू सदस्यांना टाटाच्या विस्तारा एअरलाइन्सने आपल्या सेवेत सामावून घेतले आहे

पुलवामा हल्ल्याच्या वक्तव्यावरून अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, माजी पत्रकाराची हायकोर्टात याचिका दाखल

चीनी कंपनी शाओमीचा नवीन अविष्कार, सादर केला वायरलेस इलेक्ट्रिक झाडू

IPL: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पावसामुळं अनिर्णित; बेंगळुरू स्पर्धेबाहेर,

स्टुडंट ऑफ द ईयर 2' मधलं Hook Up Song आऊट, आलिया आणि टायगरची दिसली भन्नाट केमिस्ट्री

अहमदनगर : जादा जनावरे दाखविणारे छावणीचालक प्रशासनाच्या रडारवर

अहमदनगर : मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक यंत्रणेने सुरू केलेल्या मतदार हेल्पलाइनचा साडे आठ हजार जणांना फायदा

अहमदनगर : जिल्ह्यात ग्रीन आर्मीचे सव्वादोन लाख सदस्य; 3 वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा मानस

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC