LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🎬 Movie Review : कागर

LetsUp | Movie Review

एकीकडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा 'कागर' अखेर प्रदर्शित झाला. अस्सल गावरान भाषा, मातीतील गोडवा आणि गावपातळीवर रंगणारं राजकारण या चित्रपटामध्ये उत्तमरित्या रेखाटण्यात आलं आहे.

🤔 कथा : विराईनगर येथे आमदारकीसाठी एकाच राजकीय पक्षामधील दोन व्यक्तींमध्ये वैर निर्माण झालेलं असतं. या वैराचा फायदा पक्षातील तिसरीच व्यक्ती घेते. प्रभाकर देशमुख अर्थात गुरुजी (सुहास पळशीकर) हे राजकीय गुरु असतात. मात्र आपल्या लेकीने प्रियदर्शनी देशमुख अर्थात राणीने (रिंकू राजगुरू) आमदारकी लढावी असा त्यांचा मानस असतो.

यासाठी ते युवराजला (शुभंकर तावडे) त्यांचा मोहरा बनवतात. मात्र राणीवर प्रेम करणाऱ्या आणि गुरुजींवर विश्वास ठेवणाऱ्या युवराजला त्यांचा डाव समजतच नाही. परिणामी युवराज यात फसतो. मग राणीचा संघर्ष सुरु होतो. मग राणी नक्की काय करते? युवराजचं काय होतं? यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

🎭 कलाकारांचा अभिनय : चित्रपटात वेगवेगळ्या टप्प्यांवरील बदलत जाणारा रिंकूचा अभिनय बघताना लाजवाब वाटतो. शुभंकर तावडेने आपल्या पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे.

तसेच इतर सहकलाकार मिलिंद फाटक, महेश भोसले, उमेश जगताप, शशांक शिंदे यांनी देखील आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.

🎶 संगीत कसे? : संगीत छान आहे. चित्रपटामधील काही गाणी अगोदरच हिट झाली आहे. योग्य प्रसंगानुरुप या गाण्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना मजा येते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद मानेची ही ग्रामीण भागातील अत्यंत साधी आणि सरळ कथा नक्कीच पाहण्यासारखी आहे. रिंकूच्या चाहत्यांसाठी तर वेगळं सांगण्याची गरज नाही.

Ratings: 3/5

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 लवकरच CRPF, BSF, NSG ताफ्यात अत्याधुनिक गाड्या

LetsUp | Update

💁‍♂ भारत सरकार सुरक्षा दलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करणार, यासाठी 613 कोटी 96 लाखांचे बजेट पास

📍 यामधून CRPF आणि BSF साठी माईन प्रोटेक्डेट म्हणजेच स्फोटांपासून संरक्षण करणाऱ्या गाड्या, बुलेटप्रूफ जॅकेट, रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार

🧐 राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी (NSG) 16 कोटी 84 लाखांची तरतूद, या पैश्यांमधून रिमोटने चालणारी सात वाहने (आरओव्ही) विकत घेतली जाणार

👍 या गाड्यांमुळे सुरक्षादलांना नक्षलवादी तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणाऱ्या एलईडी हल्ल्यांना अधिक सक्षमपणे उत्तर देता येईल

🎯 आरओव्हीची (Remotely Operated Vehicle) वैशिष्ट्ये:

या गाड्यांच्या मादतीने इमारती, बस, मेट्रो तसेच रेल्वे स्थानकांमध्ये जवानांच्या उपस्थितीशिवाय एलईडी निकामी करता येऊ शकणार
या गाड्या 15 डिग्रीमध्ये शिड्या तसेच चढ उतार असणाऱ्या ठिकाणी 8 किलोपर्यंतचे वजन घेऊन जाऊ शकणार
या गाड्यांवर एमएमजी गन, एमपी फाइव्ह हत्यारे आणि शॉर्टगन सारखी हत्यारे लावण्याची सोय आहे
या गाड्यांवरील कॅमेरासारख्या सिस्टीमुळे गाडीच्या आजूबाजूचा परिसर रिमोटने ती चालवणाऱ्यांना थेट केबिनमध्ये दिसण्याची सोय, यात एक्स रे स्कॅनर्सचीही सोय उपलब्ध

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💥 ब्रिटनमध्ये टाटा स्टीलच्या प्रकल्पात स्फोट

LetsUp । Update

ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट वेल्समधील टाटा स्टीलच्या प्रकल्पात झाले तीन स्फोट

💁‍♂ माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला स्फोट, यात 2 जण झाले जखमी

🎯 या प्लांटमध्ये 4 हजार हून अधिक कर्मचारी काम करतात. या स्फोटांमुळे स्थानिकांची घरे हादरली तसेच दूरपर्यंत आगीचे लोळ पसरले होते

💫 दरम्यान, प्लांटमध्ये लागलेली आग नियंत्रणात आली असल्याची टाटा स्टीलची माहिती

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🚘 मारुती डिझेल कारची विक्री थांबवणार

LetsUp । Update

मारुती सुझुकी कंपनी डिझेलवर चालणाऱ्या कारचे उत्पादन व विक्री एप्रिल २०२० पासून बंद करणार

💁‍♂ प्रदूषणविषयक BS-VI नियमावली लागू होत असल्याने कंपनीने घेतला निर्णय. या नियमावलीचे पालन करायचे झाल्यास डिझेल वाहनाचा उत्पादन खर्चात वाढ होऊ शकते. असे कंपनीचे अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी सांगितले.

🗓 वार्षिक अहवाल :

मारूतीने मार्च 31 पर्यंत वर्षभरात 17.53 लाख डिझेल गाड्या विकल्या आहेत.
डिझेल कारच्या विक्रीचा कंपनीच्या वार्षिक महसुलात 23 टक्के हिस्सा आहे
मारुतीचा देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारपेठेत 51 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे

💫 पेट्रोल आणि सीएनजी मॉडेल: मारुती कंपनी आता डिझेल कारऐवजी पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटसोबत काही नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.

बंदच्या घोषणेनंतर कंपनीचे शेअरमध्ये 1.95 टक्के घसरण

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 खुशखबर! केवळ 20 रुपयांत उघडा सेव्हिंग खातं

LetsUp | Update

पोस्टाची खास ऑफर, २० रुपयांमध्ये ग्राहक उघडू शकतात सेव्हिंग खाते

🎯 पोस्टात सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठीचे शुल्क इतर बँकेच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. मात्र या खात्यात आपल्याला किमान 50 रुपये बॅलन्स ठेवावा लागतो.

🧐 सुविधा :
बँकेतल्या सेव्हिंग अकाऊंट सारखीच सुविधा मिळणार
ग्राहकाला ATM सेवा उपलब्ध
या अकाऊंटवर 4 टक्के व्याज दिले जाणार
10 हजारांपर्यंतच्या रकमेवर कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही
दोन ते तीन जण मिळून संयुक्त खातंही उघडू शकतात.
खाते सुरु राहण्यासाठी तीन वर्षांतून एकदा तरी व्यवहार आवश्यक

💫 चेक नको असलेलं सेव्हिंग अकाऊंट 20 रुपयांमध्ये उघडता येणार नाही. त्यात किमान 50 रुपये ठेवावे लागणार आहे. तर चेकची सुविधा असलेलं खातं उघडण्यासाठी 500 रुपये भरावे लागणार, तसेच त्यात कमीत कमी 500 रुपये बॅलन्स आवश्यक आहे.

💁‍♂ खातं उघडण्यासाठी: सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म पोस्ट ऑफिसशिवाय इतर साइटवरून डाऊनलोड करता येतो. अकाउंटसाठी KYC पूर्ण करणे गरजेच आहे.

📍 कागदपत्रे : मतदार कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ऍड्रेस प्रूफमध्ये बँकेचं पासबुक, पासपोर्ट, रेशन कार्ड, विजेचं बिल, फोनचं बिल, आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तसेच पासपोर्ट साइज फोटो आणि संयुक्त खात्यात इतर खातेधारकांचे फोटो असणं गरजेचं आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💁‍♂ फेसबुक युझर्सची संख्या 8 टक्क्यांनी वाढली

Letsup । Update

जगभरात 2.38 अब्जाहून अधिकजण वापरतात फेसबुक.

🎯 माहितीनुसार, सोशल नेटवर्किंगचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, फेसबुकच्या युजर्स संख्या 8 टक्क्यांनी वाढली आहे.

📍 आकडेवारी:

मार्च 2019 मध्ये 1.56 अब्ज 'डेली अ‍ॅक्टीव्ह युजर्स' होते.
2.1 अब्जापेक्षाही अधिकजण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅप किंवा मेसेंजरचा वापर करतात.
2.7 अब्ज लोक दरदिवशी फेसबुक कंपनीशी निगडित सोशल नेटवर्किंगचा वापर करतात.
सुमारे 50 कोटी युजर्स फेसबुक स्टोरीज हे फीचर्स वापरतात.

💫 सप्टेंबर 2018 मध्ये फेसबुक स्टोरीज फीचर्सचा वापर करणाऱ्यांची संख्या 30 कोटीपर्यंत गेली होती.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💁‍♂🧐 विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

LetsUp | Education

🎯 भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ.

पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)
पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)
पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)
पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)
पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)
पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली
पहिले व्यापारी विमानोड्डापण- कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)
पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)
पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)
पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा
पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)
पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)
पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल
पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)
पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)
पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)
पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा
पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात
भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता
पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)
भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेला भीषण आग, आग विझताना लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू

PM Narendra Modi: सुप्रीम कोर्टाने फेटाळली निर्मात्यांची याचिका; 19 मे नंतर होणार प्रदर्शित

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी भाजपामध्ये केला प्रवेश

नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या न्यायालयाने फेटाळला, 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत वाढ

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी, 30 एप्रिलला शिक्षेचा फैसला

ब्रिटनमधील वेल्समधील पोर्ट तालबोट येथील टाटा स्टीलवर्क्स प्लांटमध्ये तीन स्फोट, 2 जण जखमी
___________

💹 Sensex : 39,067.33 | 🔼 +336.47 (0.87%)
💹 NIFTY: 11,754.65 | 🔼 +112.85 (0.97%)
🌟 Gold Rate : ₹32,905.00 for 10 gm
___________

जम्मू-काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग, चीनची कबुली

शाओमीने भारतात लॉन्च केला स्मार्ट एलईडी बल्ब, मोबाइलने करता येईल नियंत्रित

इंग्लडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप 2019 नंतर इयान गूल्ड अंपायरिंगला अलविदा करणार

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्या दिवशी कमावले 1186 कोटी
___________________________
*काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा लाईव्ह पाहण्यासाठी क्लिक करा* 👉🏻 ltsup.in/RahulgandhiLive

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp News Updates

● श्रीलंकेत पुन्हा स्फोट आणि गोळीबार, संपूर्ण देशात कर्फ्यू

● नरेंद्र मोदींकडे आहे 38,750 रूपये कॅश; एकूण संपत्ती 2.51 कोटी, 5 वर्षात 50 टक्क्यांनी वाढ

● उत्तरप्रदेशातील साखर कारखाने विकीप्रकरणी सीबीआय तपास सुरू

● श्रीलंकेत ‘आयएस’चे 130 संशयित असल्याची माहिती श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी दिली

● भारतीय रिझर्व्ह बँक 20 रुपयांची नवी नोट चलनात आणणार, जुनी नोट चलनात राहणार

● महाराष्ट्रात तापमानात वाढ; बहुतांश ठिकाणी पारा 40 अंश पार

● 60 हजारांहून अधिक पोलीस सज्ज; चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

● IPL: मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी दणदणीत विजय

● गार्मीनचा विवोस्मार्ट 4 अॅक्टीव्हिटी ट्रॅकर भारतात सादर

● इरफान खान सोबत 'अंग्रेजी मीडियम' सिनेमा मध्ये झळकणार अभिनेत्री करीना कपूर

● अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील तमाशा कलावंतांना मारहाण प्रकरणी 13जणांविरोधात गुन्हा दाखल

● अहमदनगर : रस्ता काम रखडल्याच्या विषयावरून महापालिकेचे शहर अभियंतावर आंदोलकाने फेकला बूट

● अहमदनगर : केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची आज राहात्यात सभा

● अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचार आज थंडवणार

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
एअर इंडियाचे सर्व्हर डाऊन, प्रवाशांचे हाल

LetsUp | Update

🎯 तांत्रिक कारणामुळे देशभरात एअर इंडियाची विमानसेवा ठप्प

💁‍♂ कंपनीचं सीता सर्व्हर आज (दि.27) रोजी पहाटे 3.30 वाजेपासून बंद पडल्यानं एअर इंडियाच्या विमानांची उड्डाणे थांबली आहेत. यामुळे देशभरातील सर्वच विमानतळांवर प्रवासी खोळंबले आहे.

📍 2 हजार प्रवासी अडकले: एका प्रवाश्याने ट्विट करत सांगितले कि, मुंबई विमानतळावर किमान 2 हजार प्रवासी अडकले आहेत.

विमानतळावर अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने, प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण

🗣 सर्व्हर डाऊन झाल्याने हि समस्या उद्भवली आहे. आमचे अभियंते यावर काम करत असून, लवकरच सर्व्हर सुरळीत सुरु होईल, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💰 देशात सत्तर हजार कोटी रुपये बेवारस

LetsUp | Update

🧐 विविध क्षेत्रात गुंतवणूक केलेली तब्बल सत्तर हजार कोटी रक्कम रुपये बेवारस पडून

💁‍♂ भारतीय बँकांमध्ये, पोस्टात, शेअर्समध्ये, इन्शुरन्समध्ये कोट्यावधी रुपये बेवारस पडले आहे. या रकमेचे मालक एक तर जिवंत नाहीत किंवा ही गुंतवणूक करून विसरून गेले आहेत. या मुळेच अशा मालकांची रक्कम बेवारस पडून असते.

👀 कोठे किती रक्कम?

इन्व्हेस्टमेंट या कंपनी: पीयरलेस जनरल फायनान्स अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये 1504 कोटींची गुंतवणूक केलेली आहे.

शेअर्समध्ये 25 हजार कोटी: शेअर्समध्ये गुंतवलेले 25 हजार कोटी बेवारस पडले असून, यातील चार हजार कोटींचे शेअर्स आयईपीएफला हस्तांतरित करण्यात आले आहे.

बँकेत 20 हजार कोटी: जून 2018 च्या आकडेवारीनुसार बँकांमध्ये एकूण वीस हजार कोटी रुपये बेवारस आहे. ज्या बँक खात्यांवर 10 वर्षे कोणीही दावा केला नाही, ती रक्कम बँकांच्या मालकीची होतात.

पोस्टात 9,395 कोटी: पोस्ट ऑफिसमधील खात्यांमध्ये एकूण नऊ हजार 395 कोटी रुपये असून, ही खाती मॅच्युअर झाली असून कोणीही त्यावर दावा केलेला नाही.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🏆 वर्ल्डकपसाठी केवळ एका भारतीय पंचाची निवड

LetsUp | Sport

🗓 वर्ल्डकपसाठी आयसीसीने जाहीर केली 22 पंचांची यादी

🎯 आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीने 22 पंचाची निवड केली. यामध्ये 16 पंच व सहा सामानाधिकारी असणार आहे. पंचाच्या या यादीमध्ये भारताचे सुंदरम रवी यांची निवड झाली आहे

💁‍♂ 16 पंच पुढीलप्रमाणे: अलिम दार, कुमार धर्मसेना, मराइस इरास्मस, ख्रिस गफॅनी, इयान गोल्ड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, निगेल लोंग, ब्रूस ऑक्सनफोर्ड, सुंदरम रवी, पॉल रेफेल, रॉड टकर, जोएल विल्सन, मायकेल गॉफ, रुचिरा पल्लियागुरुज, पॉल विल्सन

👉 सहा सामनाधिकारी: ख्रिस ब्रॉड, डेव्हिड बून, अँडी पायक्रॉफ्ट, जेफ क्रो, रंजन मदुगले, रिची रिचर्डसन

तब्बल 11 वर्षांनी एलीट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आलेले सुंदरम रवी हे पहिले भारतीय ठरले
या आधी 2004 मध्ये एस.वेंकटराघवन हे या पॅनेलमध्ये होते

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💵 बाजारात लवकरच 20 रुपयांची नोट येणार

LetsUp । Update

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 20 रुपयांची नवी नोट बाजारात घेऊन येत आहे.

💁‍♂ या नवीन नोटेवर गव्हर्नर शक्तीकांत दास यांची सही असणार आहे. दरम्यान 20 रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचा देखील वापर कायम राहणार आहे, अशी घोषणा रिझर्व बँकेने केली आहे.

🎯 जाणून घ्या नव्या नोटेविषयी:

20 रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची असेल.
नोटेच्या पाठीमागे वेरुळ लेण्यांचे छायाचित्र असणार
63 मिमी लांब आणि 129 मिमी रुंद या नोटेचा आकार असणार आहे
नोटेच्या समोरच्या भागावर रोमन आणि देवनागरी लिपीमध्ये आकडे
नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र असणार
आरबीआय, भारत, इंडिया आणि 20 ही नावे नोटेवर लिहिलेली असणार

📍 गेल्या दोन-तीन वर्षांत आरबीआयने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
📣 हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये 826 जागांसाठी भरती

LetsUp । Update

🧐 पदसंख्या: 826 जागा

🎯 पदाचे नाव व संख्या
ITI ट्रेड अप्रेन्टिस- 561
MCVC अप्रेन्टिस - 25
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेन्टिस - 103
टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेन्टिस- 137

👨‍💻 शैक्षणिक पात्रता:

ITI ट्रेड अप्रेन्टिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
MCVC अप्रेन्टिस: व्यावसायिक विषयासह 12 वी उत्तीर्ण.
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेन्टिस: BE/B.Tech.
टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेन्टिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा.

👉🏻 नोकरी ठिकाण: नाशिक

💰 शुल्क: फी नाही

👍 वयोमर्यादा: आयटीआय नियमानुसार

🖥 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2019

🗞 अधिकृत वेबसाईट: http://bit.ly/2Zy0MbD

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
💁‍♂ जाणून घ्या भारतात कोठे कोणत्या वस्तू लोकप्रिय आहे.

Letsup । Travel

🧐 एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तुम्ही तिथली आठवण म्हणून एखादी वस्तू घरी आणता. मात्र, कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू प्रसिद्ध आहे या गोष्टी जाणून घेण्यासाठी हि माहिती तुम्हाला फायदेशीर ठरेल.

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमध्ये जर तुम्ही फिरायला गेलात तर तिथल्या काश्मिरी शॉल आणि गालीचे नक्की खरेदी करा. या वस्तू खरेदी केल्यास तिथल्या आठवणी तुमच्या कायम स्मरणात राहतील.

हरियाणा: कलाकुसरीच्या आणि पितळ धातु पासून तयार केलेल्या अनेक वस्तू हरियाणात मिळतील. येथील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूसुद्धा प्रसिद्ध आहेत.

कर्नाटक: कर्नाटकमध्ये उत्तम प्रकारचं रेशीम मिळतं. भारतात रेशमाचं सर्वात जास्त उत्पादन कर्नाटकमध्येच घेतलं जातं. त्यामुळे इथल्या रेशमापासून विणलेल्या मुलायम वस्तू तुम्ही खरेदी करू शकता.

गुजरात: काचेच्या लहान-मोठ्या तुकड्यांपासून सजविलेल्या अनेक वस्तू तुम्हाला गुजरातमध्ये मिळतील. स्वतःसाठी किंवा कुणाला गिफ्ट देण्यासाठी या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. अशा अनेक वस्तू तुम्हाला अहमदाबादध्ये खरेदी करता येतील.

झारखंड: येथील पितळी धातुपासून तयार केलेल्या वस्तू प्रसिध्द आहेत. पितळ वितळवून त्यापासून देवी देवातांच्या सुबक आणि सुंदर मूर्ती या राज्यात घडविल्या जातात. त्या तुम्ही खरेदी करून घरात ठेवल्या तर नक्कीच आठवणी ताज्या राहतील.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर 'चक्रीवादळ' येऊन धडकणार असल्याचा, भारतीय हवामान खात्याचा इशारा

बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी पूनम यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाची शिफारस केली

देशातील बेरोजगारीचा दर 7.9 टक्क्यांवरून 8.1 वर पोहोचला, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल

दोन मतदान ओळखपत्र बाळगल्या प्रकरणी गौतम गंभीरवर गुन्हा दाखल

महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची अफवा, कर्नाटक पोलिसांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रात तापमानात वाढ; पुढील तीन दिवस उष्णतेचा कहर कायम राहणार

श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट; सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांसह 15 ठार

चीनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधानांचा अपमान; इम्रान खान यांच्या स्वागतासाठी चीनचे अधिकारी अनुपस्थितीत
----------------------
📣 आवाहन! 'लेट्सअप'वर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसार प्रसिद्ध केला जातो. कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याची पडताळणी करावी. यातील कोणत्याही माहितीच्या अथवा आवाहनाच्या सत्यतेबाबत 'लेट्सअप' हमी घेऊ शकत नाही.! 👏
----------------------
Realme 3 Pro स्मार्टफोनचं अजून एक व्हेरिअंट लाँच, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेलं हे नवं व्हेरिअंट कंपनीने बाजारात आणलं आहे.

भारताच्या अभिषेक वर्माने नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेत, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात गोल्डमेडल जिंकले

सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा 'दबंग 3'चे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून, हा सिनेमा 20 डिसेंबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
अब्राहम लिंकन म्हणतात की मला जर झाड कापायला 10 तास मिळाले तर मी 8 तास कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी घालवेल.
🌞 पुढील 2 दिवस उष्णतेची लाट राहणार

Letsup । Update

🧐 राज्यात कमाल तापमानाने गाठली उच्चांकी, उन्हाचे चटके आणि उकाड्याने नागरिक हैराण

🎯 कोकण, महाबळेश्वर वगळल्यास सर्वत्र कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याचे निदर्शनास

💁‍♂ शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये (46.7 अंश सेल्सिअस) तर सर्वाधिक किमान तापमानाची कोल्हापूरमध्ये (25.9 अंश सेल्सिअस) नोंद

आणखी 2 ते 3 दिवस तापमानवाढ आणि उष्णतेची लाट काय राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
साप्ताहिक राशीभविष्य; 28 एप्रिल ते 4 मे 2019

LetsUp | Astrology

मेष : घरात उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुणमंडळी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. मनस्वास्थ लाभेल. प्रवासाचे योग आहेत.

वृषभ : मनातील कल्पना आकारात घेतील. आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल. भावंडांसोबत सुसंवाद साधाल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल.

मिथुन : आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल.

कर्क : मोठ्या व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. आशावादी धोरण स्वीकारा. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल.

सिंह : आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. पैसा कमवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यापेक्षा आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन घ्यावा. सुयोग्य विचार आपणांस शक्ती देतील.

कन्या : नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ घडून येतील. बढती बदलीचे योग येतील. दैनंदिन कामे सुरळीत पार पडल्याने नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.

वृश्चिक : धार्मिक स्थळांना भेटी द्याल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराल. प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. जवळचे प्रवास टाळावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.

धनू : कामाचा ताण जाणवणार नाही. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. काही प्रभावी लोकांनी मदत केल्याने उत्साह वाटेल.

मकर : प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार आहे. बौद्धीक व कला क्षेत्रात सुसंधी लाभतील. आपल्या आरोग्याच्या तक्ररींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कुंभ : नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील.

मीन : थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल.

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎬 पहा, KBCचं प्रोमो सॉंग; नागराज मंजुळेंनी गायलं रॅप

LetsUp | Trending

🎯 कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचे टायटल सॉंग रिलीज, गाण्याला सोशल मीडियावर तुफान पसंती

👨‍🎤 गाण्याच्या सुरुवातीला रॅप स्टाईलमध्ये नागराजच्या आवाजात काही ओळी असून उर्वरित गाणं हे संगीत दिग्दर्शक ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी गायिले आहे

👉 'म्हणूनच जग म्हणतं, नाही का, उत्तर शोधलं की जगणं बदलतं' या थीमअंतर्गत हे गाणं तयार केलं आहे

👀 गाणं पहा: https://ltsup.in/2V1oUET

लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC