LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
LetsUp News Updates

● इसिसने स्वीकारली श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांची जबाबदरी; आतापर्यंत 40 संशयितांना अटक

● जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार, आशियात मधुमेहग्रस्त महिलांत अवेळी मृत्यूचा धोका जास्त

● ICICI- व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर यांना ईडी अधिकाऱ्यांसमोर 3 मे रोजी हजर राहण्यासाठी समन्स

● न्यायालयाचा अवमान प्रकरणी राहुल गांधी यांना नोटीस; 30 एप्रिल रोजी SCत होणार सुनावणी

● गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस बानोंना 50 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

----------------------
📣 आवाहन! 'लेट्सअप'वर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसार प्रसिद्ध केला जातो. कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याची पडताळणी करावी. यातील कोणत्याही माहितीच्या अथवा आवाहनाच्या सत्यतेबाबत 'लेट्सअप' हमी घेऊ शकत नाही.! 👏
----------------------

● मराठा क्रांती मोर्चा व्यंगचित्र प्रकरण; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरुद्ध वॉरंट

● कुस्तीपटू नरसिंह यादवला संजय निरुपमांचा प्रचार भोवला; पोलीस सेवेतून निलंबित

● रिअलमी 3 प्रो चे भारतात लाँचिंग, तो 29 एप्रिल पासून अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध

● अटीतटीच्या सामन्यात चेन्नईची हैदराबादवर मात, शेन वॉटसन ठरला सामनावीर

● चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाने पटकावले सुवर्णपदक

● ‘तेरे नाम’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खान कॅमिओ रोलमध्ये झळकण्याची शक्यता

● अहमदनगर - नगर दक्षिण मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार या मतदारसंघात सुमारे 65 टक्के मतदान

● अहमदनगर - लोकसभा इलेक्शन घडामोडी : शिराळ चिंचोंडीला फेरमतदान मागणी, बाबुर्डी बेंदला मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न

● अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे गोठ्याला लागलेल्या आगीत 29 जनावरांचा होरपळून मृत्यू, सुमारे 10 लाखांचे नुकसान

● अहमदनगर - जिल्ह्यात टँकरवर होणार 77 कोटी खर्च, पाणीपुरवठ्यासाठी टँकरला प्राधान्य; अन्य उपाययोजनांकडे दुर्लक्ष

📞 जाहिरातीसाठी संपर्क: 7875190190

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 उन्हाचा दाह; जलस्रोत संपू लागले!

LetsUp | Update

💁‍♂ राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने जलस्रोतांवर परिणाम, एका आठवड्यात 500 गावातील जलस्रोत पडले कोरडे

📍 आता टँकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाऱ्या गावांची संख्या 11 हजार 738 वर पोहोचली

💫 अनेक जिल्ह्यांत जनावरांच्या चारा-पाण्याची समस्याही गंभीर, दुष्काळग्रस्त 9 जिल्ह्यांत 1084 छावण्यांमध्ये 7 लाख 14 हजार जनावारांना सांभाळले जात आहे

👉 मराठवाड्यातील अडीच हजार नाशिक विभागातील एक हजारहून अधिक गावात टँकरने पाणी पुरवठा सुरु

😇 टँकरच्या मागणीत वाढ : भूजल पातळी खाली गेल्याने तसेच जलस्रोत कोरडे पडू लागल्याने विहिरी आणि बोरवेलमधूनही पाणी मिळणे मुष्कील होत असल्याने टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे

👀 छावण्यांच्या मागणीतही वाढ : जनावरांच्या छावण्यांच्या मागणीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना या नऊ जिल्ह्यात 1084 छावण्या सुरू आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळ असून तेथे 664 छावण्या सुरू असून एकट्या बीड जिल्ह्यात 590 छावण्या सुरू आहे

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडीवर एक नजर

LetsUp | Entertainment

1) लवकरच ‘तेरे नाम’चा सीक्वल : अभिनेता सलमान खानच्या चित्रपट कारकीर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट ‘तेरे नाम’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘तेरे नाम’च्या सीक्वलचे दिग्दर्शनही सतीश कौशिक करणार आहेत. ते दोन नव्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट करणार आहेत. सलमान या चित्रपटामध्ये कॅमिओ रोलमध्ये दिसू शकतो.

2) 'तुला पाहते रे' मध्ये राजनंदिनीची एंट्री: झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' मध्ये आता पुन्हा एकदा मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

हे ट्विस्ट म्हणजे मालिकेत राजनंदिनीची एंट्री. अभिनेत्री शिल्पा तुळस्कर राजनंदिनीची भूमिका साकारणार आहेत. त्यांनी मालिकेसाठी शूटिंगला सुरुवात केली असून एका वृत्तानुसार, आज 24 एप्रिलच्या एपिसोडद्वारे त्या प्रेक्षकांना भेटणार आहेत.

3) जजमेंटचा थरारक 'ट्रेलर': ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन निर्मित बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा 'जजमेंट' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित आहे. *ट्रेलर पहा* : https://ltsup.in/2GuRl44

4) बॉलिवूड स्टार्सच्या पत्नींवर चित्रपट : सध्याच्या बायोपिकच्या ट्रेन्डमध्ये दिग्दर्शक मधूर भांडारकर सुपरस्टारच्या पत्नीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सुपरस्टारच्या पत्नीच्या आयुष्यावरील हा पहिला चित्रपट असणार आहे.

हा चित्रपट शाहरूख खानची पत्नी गौरी खान, शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि राजेश खन्नाची पत्नी डिंपल खन्ना यांच्या आयुष्यावर हा आधारित असणार आहे. तसेच या चित्रपटाचे नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असे ठेवण्यात येणार आहे.

5) रिंकूला बायोपिकमध्ये करायचंय काम : सैराट फेम रिंकू राजगुरू तीन वर्षांनी 'कागर' द्वारे मोठ्या पडद्यावर परत येतेय. या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना रिंकूने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

यावेळी रिंकूने सावित्रीबाई फुले यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचीही भूमिका साकारायची इच्छा आहे. चित्रपट माध्यमात भविष्यात छायाचित्रण आणि दिग्दर्शन शिकायचे आहे,’ असे तिने सांगितले.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎂 जन्मदिवस क्रिकेटच्या देवाचा!

LetsUp | Special

क्रिकेटचा देव, भारतरत्न, महाराष्ट्राचा मानबिंदू अशा अनेक बिरुदावली कमी पडतील सचिनसाठी. पाय जमिनीवर रोवून आकाशाला गवसणी घालणारा लाखो लोकांचा आदर्श सचिन 46 आज वाढदिवस साजरा करत आहे.

🗣 सचिनबद्दल दिग्गजांचे गौरवोद्गार:

सर डॉन ब्रॅड्मन : सचिन तेंडुलकरची बॅटिंग पाहताना मी स्वत:ला त्याच्यात पाहतो.

मॅथ्यु हेडन: मी देव पाहिला आहे. भारताच्या ‘टेस्ट’ मॅचच्या संघात तो चौथ्या स्थानी बॅटिंगला येतो.

मार्क टेलर: आम्ही ‘भारतीय’ संघासमोर हरत नाही तर ‘सचिन’ या खेळाडूसमोर हरतो".

बराक ओबामा : मी सचिन खेळत असताना क्रिकेट बघतो. मला त्याचा खेळ आवडतो म्हणून नव्हे तर तो खेळताना माझ्या देशाचं ‘प्रोडक्शन’ 5% नी कमी का होतं? हे जाणून घ्यायला.

👉 संयमी सचिन, लढवय्या सचिन आजही आपल्यासाठी नक्कीच प्ररेणादायी आहे. आज त्याच्याबद्दल माहिती नसलेल्या काही गोष्टी वरील फोटोद्वारे (इमेज) जाणून घेऊयात.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💥 भूकंपाच्या धक्याने नेपाळ हादरले!

Letsup | Update

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये आज (दि.24) एका मागोमाग एक सलग तीनवेळा भूकंपाचे धक्के बसले.

🧐 तीनदा भूकंपाचा हादरा:

पहिला धक्का : स. 6 वाजून 15 मिनिटांनी I रिश्‍टर स्‍केल : 4.8
दुसरा धक्का : 6 वाजून 29 मिनिटांनी I रिश्‍टर स्‍केल : 5.2
तिसरा धक्का : 6 वाजून 40 मिनिटांनी I रिश्‍टर स्‍केल : 4.3

💁‍♂ सुदैवाने जीवितहानी नाही : काठमांडूत सकाळी झालेल्या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती, तर भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या उत्तर-पूर्व राज्यात उशीरा रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी 6.1 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ जाणून घ्या घामोळ्यावर घरगुती उपाय!

Letsup | Tips

ऋतू बदलला की बदललेल्या हवामानाचे परिणाम साहजिकच शरीरावर होतात. उन्हाळ्यात शरीरावर घामोळ्याची पुरळं आली की प्रचंड त्रास जाणवायला लागतो. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपचार पद्धती पुढीलप्रमाणे.

कच्चा बटाटा - कच्चा बटाटा गुलाब पाण्यात मिक्स करुन त्याचा लेप करावा. हा लेप 20 मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावून ठेवावा. नंतर थंड पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. आठवड्यातून 3 वेळा हा प्रयोग करावा.

चंदन पावडर - एका वाटीत एक चमचा चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करुन लेप करावा. हा लेप 20 ते 25 मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावावा. त्यानंतर थंड पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. हा प्रयोग आठवड्यातून 3 वेळा करावा.

बेकिंग सोडा - बेकिंग सोडा साध्या पाण्यामध्ये मिक्स करुन त्याची पेस्ट घामोळे झालेल्या भागावर लावाली. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. आठवड्यातून 4 वेळा हा प्रयोग करावा.

कडूलिंबाची पानं- कडूलिंबाच्या पानांची पेस्ट करुन ही पेस्ट 20 मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावाली. त्यानंतर घामोळे झालेला भाग स्वच्छ करा. आठवड्यातून 5 वेळा हा प्रयोग करावा. यामुळे घामोळ्यांचा त्रासापासून सुटका मिळेल.

बीट - बीट पाण्यात उकळावे. हे पाणी गाळून गार झाल्यावर बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. गोवर व कांजिण्यांच्या पुरळ वा फोडांवर हे पाणी मलमाप्रमाणे ब्रशने प्रत्येक 1 तासाने दोनदा लावावे. पुरळाच्या जागी होणारी आग व खाज कमी होण्यास यामुळे मदत होईल.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ तंत्रज्ञान क्षेत्रात कोठे काय? जाणून घ्या

Letsup | Tech

Infinix Smart plus 3 : स्मार्टफोन कंपनी इंफिनिक्स (Infinix)ने ट्रिपल रियर कॅमेरा असलेला 'स्मार्ट 3 प्लस' स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 6999 रुपये इतकी आहे.

oppo a9 : 'ओप्पो ए9' हा फोन चीनमध्ये 30 एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार आहे. ओप्पो ए9' फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असून वॉटरड्रॉप नॉच आणि ड्यूअल रिअर कॅमेरा आहे. चीनमध्ये या फोनची किंमत 1700 युआन (जवळपास 17600 रुपये) असणार आहे.

one plus 7 : वन प्लस 7 आणि वन प्लस 7 प्रो हे बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स पुढील महिन्यात म्हणजेच 14 मे रोजी भारतात लॉन्च केले जाणार आहेत. यासंबंधी वन प्लस कंपनीने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून माहिती दिली केली आहे.

XOLO zx : झोलो कंपनीने झेडएक्स हे नवीन मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून, याला दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी हा फोन 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोअरेज आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोअरेज मध्ये उपलब्ध आहे. तसेच फोनची किंमत अनुक्रमे 11,499 आणि 13,999 रूपये आहे.

BSNL ची धमाकेदार ऑफर : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने जुन्या प्लॅनमध्ये बदल करत नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. यामध्ये 35 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 5 जीबी डेटा मिळणार आहे. प्लॅनची वैधता 5 दिवसांची असणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 अखेर मलेरियावर लस उपलब्ध!

LetsUp | Science

जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधक लस आफ्रिकेत उपलब्ध झाली आहे.

💁‍♂ आफ्रिकेतील मलावी येथे ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. या लसीच्या निर्मितीसाठी गेल्या 30 वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. त्यानंतर ही लस उपलब्ध करून देण्यात आली. या मलेरिया प्रतिबंधक लसीला आरटीएस असे नाव देण्यात आले आहे.

🧐 दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू: मलेरिया या आजारामुळे जगभरात दरवर्षी 4 लाख 35 हजार जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता ही प्रतिबंधक लसीचा फायदा मलेरियाग्रस्तांना होणार आहे.

📍 ही लस घाना आणि केनिया या देशातही येत्या आठवड्यात उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) दिली आहे.

💫 ही लस 2 वर्षांवरील मुलांना देता येणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर होणार

LetsUp । Update

दरवर्षी जाहीर होणाऱ्या 66व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी लोकसभा निवडणुकांनंतर जाहीर होणार आहे.

🎯 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावं दरवर्षी एप्रिल महिन्यात जाहीर होतात. पण यंदा लोकसभा निवडणूक असल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कारांदरम्यान चित्रपटांना प्रोत्साहन देणाऱ्या राज्याचाही सन्मान केला जातो.

🧐 आचारसंहिता ठरतेय अडचण : एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका असल्याने आचारसंहिता लागू आहे. अशा वेळी पुरस्कार जाहीर झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल, त्यामुळे तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

💁‍♂ वर्षभरात चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम कामगिरी केलेल्यांना दरवर्षी 3 मे रोजी नवी दिल्ली येथील कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी पुरस्कार वितरणाची तारिख अद्याप जाहीर झालेली नाही.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

पंतप्रधान नरेंद्र मोदीं 5 वर्षाच्या काळात पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिलासा, उमेदवारी विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार लवकरच दोनशे व पाचशेच्या नव्या नोटा चलनात येणार.

श्रीलंका बॉम्बस्फोट चौकशीदरम्यान महिलेने स्वतःसह मुलांना बॉम्बने उडवले.

भारत आणि इंडोनेशियामधील राजकीय संबंधांना 70 वर्ष पूर्ण, इंडोनेशियाने बनवला रामायणावर आधारित विशेष स्टॅम्प.
__________________

💹 Sensex : 39,054.68 | 🔼 489.80 (1.27%)
💹 NIFTY: 11,726.15 | 🔼 150.20 (1.30%)
🌟 Gold Rate : ₹32,610.00 for 10gm
__________________

“अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”; नारायण राणे आत्मचरित्र लिहिणार, नितेश राणेंचे ट्विट.

महाराष्ट्र दिनी 800 पोलिसांना बहाल होणार पोलिस महासंचालक पदक.

होंडा मोटरसायकल कंपनीने भारतात होंडा CBR650R लाँच केली. 15 हजारापासून बुकिंग सुरू.

इंग्लंड येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी IPL मधून परदेशी खेळाडू परतणार मायदेशी.

'कुली नंबर 1' च्या सिक्वलमध्ये झळकणार वरूण धवन आणि सारा अली खानची जोडी.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुणांचे भरती होण्याचे प्रमाण झाले कमी : भारतीय लष्कर

● तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या टिक-टॉक' वरील बंदी अखेर उठवली, मद्रास हायकोर्टाचा निर्णय

● पुलवामानंतर भारत के वीर पोर्टलवर 225 कोटींचा मदतनिधी गोळा; पुलवामापर्यंत हा आकडा 45 कोटी होता

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● 26 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांच्या कोणत्याही पत्रकार परिषदेचे आयोजन नाही; भाजपकडून स्पष्टीकरण

● सरकारने केलेली मालमत्ता जप्तीची कारवाई म्हणजे माझ्यासाठी आर्थिक मृत्यूदंड : विजय मल्ल्या

● अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

● Redmi Y3 भारतात लाँच, यामध्ये 32 मेगापिक्सलचा सुपर सेल्फी कॅमेरा; दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध

● रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून किंग्स इलेव्हन पंजाबचा 19 धावांनी धुव्वा, डिव्हिलियर्स ठरला सामनावीर

● आशियाई कुस्ती स्पर्धा : दुसऱ्या दिवशी भारताच्या पुरुष कुस्तीपटूंनी 5 पदकांची केली कमाई

● अभिनेता हृतिक रोषाचा संघर्ष सातासमुद्रापार, 'बेन ब्रूक्स' या आंतरराष्ट्रीय पुस्तकात मिळालं स्थान

● अहमदनगर - नगर दक्षिण मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी जिल्ह्यात मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार

● अहमदनगर - काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे आज गुरुवारी (दि.25) आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार

● अहमदनगर - काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची उद्या शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी 5 वाजता संगमनेर येथे जाहीर सभा होणार

● अहमदनगर - राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; बेकायदा दारूवक्रिीप्रकरणी सात जणांना अटक

● अहमदनगर - शहरात मोबाईल कंपन्यांकडून उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर पैकी सुमारे 200 मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची माहिती समोर

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📺 आणि आजच्याच दिवशी दूरदर्शन रंगीबेरंगी बनले!

LetsUp । Special

एके काळी पूर्ण माध्यमसत्ता एकहाती गाजवणारे दूरदर्शन हे सध्या दुर्लक्षित झाल्याचे वास्तव आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळामधे दूरदर्शन, त्याची संकल्पना आणि विकास याचबरोबर विकासात्मक संवाद यामध्ये असलेले योगदान अढळ आहे.

देशभरामधे केबल वाहिन्यांचे कितीही जाळे पसरलेले असले तरी आजही भारताच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोचणारे दृकश्राव्य माध्यम म्हणजे दूरदर्शन. आजही दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठ्या दूरचित्रवाणी नेटवर्कपैकी एक मानले जाते.

1959मधे दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण सुरू झाले, यादरम्यान त्याचे अस्तित्व आकाशवाणीचा एक विभाग यापलिकडे नव्हते. हे प्रक्षेपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे याकरिता रंगीत प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आणि इतके दिवस कृष्णधवल असलेले दूरदर्शन 25 एप्रिल 1982 मध्ये रंगीबेरंगी बनले.

1985 नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. त्यातील काही निवडक मालिकांवर एक नजर...

1) हम लोग : 1984 साली आलेल्या हम लोग या मालिकेने एक वेगळेच दालन उघडले. कनिष्ठ मध्यम वर्गीय जनतेला भावणारे कथानक तरीही कुटुंब नियोजन, लैंगिक विषमता, स्त्री शिक्षण, महिला सबलीकरण, व्यसनाधीनता यांसारख्या विविध प्रश्नांचे चित्रीकरण यामधून केले गेले.

2) भारत एक खोज : भीष्म सहानींच्या कादंबरीवर आधारित तमस ही गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेली मालिका, जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित भारत एक खोज सारखा आगळा प्रयोग अथवा जगातील सर्वश्रेष्ठ लघुकथांवर आधारित दर्पण यासारख्या मालिकांनी अभिरूचिसंपन्न कार्यक्रम प्रेक्षकांना घरबसल्या मिळू लागले.

3) रामायण आणि महाभारत : मात्र लोकप्रियतेचा उच्चांक गाठला तो रामानंद सागर यांच्या रामायण आणि बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकांनी. या सर्व मालिका करमणूकप्रधान असल्या तरी त्यामागे एक सामाजिक आणि नैतिक संदेश होता.

4) कृषीदर्शन : दूरदर्शनवरील अगदी सुरूवातीच्या काळापासून चालत आलेला आणि आजही तितकाच लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे कृषीदर्शन. याद्वारे भारतातील सर्व शेतकर्‍यांना शेतीविषयक, फळ्बाग, फुलबाग, कुक्कुटपालन अशा संबंधित विषयांवर गरजेनुसार माहिती दिली जाते.

मात्र नंतर सगळ्या राष्ट्रीय चर्चांमध्ये दूरदर्शनचे स्थान नगण्य होत गेले. म्हणून सरकारने दूरदर्शनमध्ये चैतन्य यावे, यासाठी ‘प्रसार भारती’ची स्थापना केली.

आज स्वातंत्र्याला एवढी वर्षे होऊन देखील सरकारी यंत्रणेने दूरदर्शन या माध्यमाची व्याप्ती आणि प्रसार याचा पुरेपूर फायदा करून घेतलेला नाही. खाजगी वाहिन्यांच्या जंजाळामधे दूरदर्शन स्वत:चे अस्तित्व हरवून बसत आहे. वास्तविक लोकांपर्यंत पोचण्याचे, त्यामधून सकारात्मक कार्य घडवून आणण्याची प्रचंड मोठे सामर्थ दूरदर्शनकडे आहे, हे विसरता कामा नये.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤔 ट्राय करा! ओळखा बरं कोण?

Letsup | Puzzle

1) असं कोण आहे ज्याला 6 चेहरे आहेत. पण तो मेकअप करत नाही. तसेच 21 डोळे असूनही तो पाहू शकत नाही?

2) माउंट एव्हरेस्टचा शोध लागण्याआधी पृथीवरील सर्वात उंच पर्वत कोणता होता?

3) असं काय आहे ज्याला 4 पाय आहे. पण चालू शकत नाही?

4) असं काय आहे ज्याला दोन हात आणि चेहरा आहे, पण पाय नाही?

👉 टीप:

वरील प्रश्नांचे योग्य उत्तर आपणांस पुढील सेगमेंटमध्ये मिळेल.
आपणही उत्तर आपणही देऊ (व्हॉट्सअ‍ॅप) शकता. तोपर्यंत ट्राय करा किंवा वाट पहा.
लक्षात घ्या, उत्तरांच्या अनेक शक्यता असू शकतात.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🤨 तुम्हाला माहित आहे का?

LetsUp | Do U Know

📖 पहिला इंग्रजी शब्दकोश 1755 मध्ये लिहिला गेला.

🐘 आफ्रिकन हत्तींना फक्त 4 दात असतात.

💎 सर्वात दुर्मिळ हिरा हिरव्या रंगाचा असतो.

🏐 व्हॉलीबॉलचा शोध 1895 मध्ये लागला.

----------------------
👆 ओळखा बरं कोण? उत्तर खालीलप्रमाणे :

1) फासे (DICE)
4) माउंट एव्हरेस्ट
3) खुर्ची, बेड, टेबल.
4) घड्याळ.
----------------------

👁 आपले सर्वात सक्रिय स्नायू डोळ्यात असतात.

🗣 बोलत असताना आपण 72 वेगवेगळ्या स्नायूंचा वापर करतो.

🕷 कोळ्यांचे (Spiders) रक्त पारदर्शक असते.

🐜 मुंग्याच्या 80,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎭 नटश्रेष्ठ शाहू मोडक यांची आज 101 वी जयंती

LetsUp । Special

मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले अद्वितीय व्यक्तिमत्व अर्थात अभिनेते शाहू मोडक. प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक नाव म्हणजे शाहू मोडक होय. आज त्यांची 101 वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

🎯 शाहू मोडक यांचा जन्म 1918 साली अहमदनगर येथे झाला. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, अशा 29 चित्रपटांत त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली. त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय झाली कि, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत.

🎬 पहिला बोलपट : शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग 27 आठवडे पडद्यावर झळकत होता. शिवाय मराठीबरोबर त्याची हिंदी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.

🎞 अजरामर कामगिरी : माणूस, औट घटकेचा राजा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी महेता, झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या.

💫 शाहू मोडक यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता. निर्मात्यांना चित्रपटाच्या शुभारंभासाठी व चित्रिकरणाचे महुर्तही ते काढून द्यायचे. अशा या अद्वितीय कलाकाराचे 11 मार्च 1993 रोजी निधन झाले.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 आज जागतिक मलेरिया दिवस

Letsup । Special

🎯 मलेरिया रोगाचे गांभीर्य लक्षात घेता 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस म्हणून ओळखला जातो. 'मलेरिया' हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होत असून तो एनोफिलिस जातीचा डास चावल्याने होतो. मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश करून पोटात जातात व आपली संख्या वाढवितात. त्यानंतर तांबड्या रक्त पेशींमध्ये ते स्वतःहून मिसळतात.

🧐 मलेरियाची लक्षणं:

ताप: ताप हे मलेरियाचे प्रमुख लक्षणं असून, अधिक दिवस ताप येत असेल तर वेळीच वैद्यकीय उपचार घ्यावे.

डोकेदुखी: मलेरियाच्या रुग्णांना तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो. थंडी-तापासोबत जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच मलेरियाची तपासणी करून घ्या.

थंडी: मलेरियाच्या रुग्णांना, वातावरण गार नसेल तरीही थंडी भरते. अशावेळेस डॉक्टर्स अनेकदा रक्ततपासणीचा सल्ला देतात.

घाम येणे: जर तुम्हाला मलेरिया असेल तर रुग्णाला सतत घाम येण्याचे प्रमाण देखील अधिक असते.

मळमळ व उलट्या: मलेरियामध्येही उलट्या होणे हे लक्षण प्रामुख्याने आढळून येते. तसेच अंगदुखी, खोकला ही लक्षणं आढळतात.

💁‍♂ उपाय :

कुंड्या, बादली, टाकी यात पाणी अधिक काळ साठवून ठेवू नका.
घरच्या आजूबाजूला खोल ठिकाणी पाणी जमा होऊ देऊ नका.
खूप डास असलेल्या ठिकाणी नेहमी फुल कपडे घाला.
घरामध्ये मच्छरदाणीचा वापर करा.
रक्त तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या.
जर आपण औषधे पूर्ण डोस घेतले नाही तर मलेरिया पुन्हा होऊ शकतो.

📍 गेल्या वर्षी भारतातील 18 लाख नागरिकांना मलेरिया झाला होता. जगात दरवर्षी 30 ते 50 कोटी नागरिक मलेरियाने ग्रस्त असतात. जगात प्रती 30 सेकंदांना 1 बालक मलेरियाला बळी पडतो.

💫 लस उपलब्ध : आफ्रिकेतील मलावी येथे जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. या लसीला 'आरटीएस' नाव देण्यात आले.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
जगातील पहिले प्लॅस्टिक-फ्री पॅसेंजर विमानाचे उड्डाण

LetsUp । Update

प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरूद्ध जागरूकता वाढविण्यासाठी युएईच्या इतिहाद एअरवेजने प्लॅस्टिकच्या वापराशिवाय उड्डाण केले.

🎯 प्लास्टिकपासून वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इतिहाद विमान कंपनीने हा उपक्रम सुरू केला आहे. असा उपक्रम राबविणारी हि खाडी क्षेत्रातील पहिली प्रमुख विमान कंपनी आहे. जगातील पहिले प्लॅस्टिक फ्री विमान EY484 22 एप्रिल म्हणजेच जागतिक वसुंधरा दिवशी ब्रिस्बेन विमानतळावर उतरले.

💁‍♂ टिकाऊ वस्तूंचा वापर : एकदाच वापरात येणाऱ्या अशा 95 प्लॅस्टिक वस्तूंचा वापर एअरलाइनने टाळला आहे. याजागी टिकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. इको-थ्रेड चादर, गोळीच्या आकाराची टूथपेस्ट अशा अनेक टिकाऊ गोष्टींचा वापर करण्यात आला आहे.

👉 या निर्णयामुळे एका विमानातून 50 किलो कचरा नष्ट केला जातो आहे.

📍 इतिहादने या वर्षअखेरीस आपल्या फ्लाइट सेवांमधून 100 टन प्लास्टिक काढून टाकण्याची योजना आखली आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ फिटनेस क्षेत्रात करिअर

LetsUp । Career

प्रकृतीच्या तक्रारी दूर करण्यासाठी अनेक व्यक्ती फिट राहण्याचा प्रयत्न करतात. फिटनेससाठी जिम, योगा, एरोबिक्स, मार्शल आर्ट, नृत्य, चालणे, धावणे या व्यायाम प्रकारांची मदत घेतात. या क्षेत्रात तज्ज्ञ प्रशिक्षकांची गरज असून, जर या क्षेत्रांत उत्तम प्रशिक्षण प्राप्त केले तर प्रशिक्षक म्हणून करिअर घडवता येणे शक्य आहे.

🎯 फिटनेस ट्रेनरचे प्रकार :

विशेष ट्रेनर : हा एखाद्या खास विषयातील प्रशिक्षित आणि तज्ञ असतो.

वैयक्तीक ट्रेनर : हा खास व्यक्तिगतरीत्या एकावेळी एकाच व्यक्तीला प्रशिक्षण देतो.

जिम ट्रेनर : हा जिममध्ये सामूहिकरीत्या तिथल्या साहित्याचा वापर कसा करावा याविषयीची माहिती देतो.

🧐 पात्रता : फिटनेस ट्रेनर प्रशिक्षणासाठी किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.

📍 कामाचे स्वरुप : फिटनेस ट्रेनर हा लोकांना व्यायामाचे बारकावे, पद्धती शिकवतो. सुदृढ व सशक्त शरीरासाठी प्रशिक्षक योग्यरीत्या मार्गदर्शन करतात. व्यक्तीच्या आहाराचे नियोजन प्रकृतीनुसार बनवून देतो.

👉🏻 हे गुण आवश्यक : फिटनेस ट्रेनर म्हणून काम करताना व्यावसायिकरीत्या प्रशिक्षित असणे गरजेचे असते. या क्षेत्रात जनसंपर्क सतत होत असल्याने संवाद कौशल्यही अवगत करावे लागते.

💰 वेतन :सुरवातीला या क्षेत्रात अल्प वेतनावर काम करावे लागते. एकदा का तुमचे नाव आणि कामाचा दर्जा लोकांना भावला की चांगल्या पद्धतीने कमाई होते. तसेच स्वत: जिमच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवसाय करता येतो.

🏤 इन्स्टिट्युट्स :

• इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्यु. अँड स्पोर्टस सायन्स दिल्ली, संकेतस्थळ- www.igipess.du.ac.in

• साई एनएस साउथ सेंटर युनिव्हर्सिटी बेंगलोर, संकेतस्थळ- www.saisouth-bangalore.com

• अष्टांग योग रिसर्च इन्स्टिट्यूट चेन्नई, संकेतस्थळ - www.ashtanga.com

• तालवॉकर्स अ‍ॅकॅडमी मुंबई, संकेतस्थळ- www.talwalkars.net

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 जगात हॅकिंग क्षेत्रात भारत दुसऱ्या स्थानी

LetsUp । Update

जगातील अकाऊंट हॅकिंग क्षेत्रात अमेरिका पाठोपाठ भारत देश दुसऱ्या स्थानावर

💁‍♂ क्लाउड डिलिव्हरी नेटवर्क अकमाई टेक्नॉलॉजीच्या 'स्टेट ऑफ इंटरनेट/सिक्युरिटी' या रिपोर्टनुसार, भारतात एका सेकंदाला 30 हॅकिंगचे प्रकार समोर येत आहे. तसेच 120 कोटींपेक्षा अधिक अकाउंट धोक्यात असल्याचे या अहवालात समोर आले आहे.

🗓 रिपोर्टनुसार, प्रत्येक हॅकिंगमध्ये कुणीतरी व्यक्ती अथवा संगणकाद्वारे अन्य अकाउंटची माहिती चोरून युझरनेम अथवा पासवर्ड जनरेट करण्यासाठी लॉग इन केले आहे.

🎯 सायबर हल्ल्यात अमेरिका आणि भारतानंतर कॅनडा तिसऱ्या नंबरवर आहे. अमेरिकेत 2018 मध्ये 125 कोटी, भारतात 120 कोटी तर कॅनडात 102 कोटी हॅकिंगचे प्रयत्न झाले आहे.

🧐 या क्षेत्रांवर सायबर हल्ला : सायबर हल्ल्यामध्ये मीडिया, मनोरंजन, रिटेल आणि गेमिंग ही क्षेत्रं आघाडीवर आहेत.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो, उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरोधातील आरोपांची होणार चौकशी

श्रीलंका बॉम्ब स्फोटाचे सत्र सुरूच, कोलंबोजवळील पुगोडा गावात झाला स्फोट

1993 च्या मुंबई सिरियल बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू
_______________________
💹 Sensex : 38,730.86 | 🔻 -323.82 (0.83%)
💹 NIFTY: 11,640.80 | 🔻 -84.35 (0.72%)
🌟 Gold Rate : ₹32,900.00 for 10gm
_______________________

दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामध्ये 51 नागरिकांचा मृत्यू

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका सरकार देशात बुऱख्यावर बंदी घालण्याचा विचारात

चीन कंपनी शाओमीने लॉंच केली HIMO T1 इलेक्ट्रीक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 120 किमी धावणार

नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी, मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी पटकावले सुवर्णपदक

तामिळमधील सुपरस्टार विजयबरोबर 'थलपती सिनेमात' शाहरुख साकारणार व्हिलनची भूमिका

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup