LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂ कठीण प्रसंगातही रहा पॉझिटीव्ह

LetsUp | Motivation

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात. अशा कठीण प्रसंगातही पॉझिटीव्ह राहण्यासाठी या टिप्स फायदेशीर ठरतील.

1) प्रत्येकाशी प्रेमपूर्वक वागा. समोरच्या व्यक्तीचा सन्मान करा. कोणत्याही व्यक्तीबद्दलचा राग मनात बाळगू नका.

2) प्रत्येक वेळी परफेक्ट असण्याचा अट्टाहास करु नका. आणि त्यात वेळ वाया घालवू नका.

3) स्वतःसाठी वेळ काढा.

4) भविष्य कोणीच पाहिले नाही. त्यामुळे त्याची चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका.

5) गरजेचे आहे तिथे स्वतःचे मत मांडायला शिका. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.

6) ज्या गोष्टीची तुम्हाला भिती वाटते किंवा ज्याची शंका तुम्हाला वारंवार सतावते, अशा गोष्टींचा विचार करून घाबरुन जाऊ नका.

7) नकारात्मक विचारांपासून आणि माणसांपासून दूर रहा.

8) वर्तमानात जगा. त्याचा पूरेपूर आनंद लूटा. प्रत्येक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

9) कुटुंबासोबत वेळ घालवा.

10) नैराश्यापासून दूर राहण्यासाठी रिकाम्या वेळत तुमच्या आवडीचे काम करा. समाजकार्यही तुम्हाला आनंद देईल.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

श्रीलंकेत नववा स्फोट : पोलिसांना तपासणी दरम्यान सापडले 87 बॉम्ब डिटोनेटर

श्रीलंकेच्या समुद्र सीमेवर भारताचे डॉर्नियर विमान, जहाजे तैनात; तटरक्षक दल हाय अलर्टवर

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये 66 दहशतवाद्यांचा भारतीय जवानांकडून खात्मा

बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा नाही, रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दलाल यांचे स्पष्टीकरण

कॉमेडियन व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड
_______________________________

💹 Sensex : 38,645.18 | 🔽 −495.10 (1.26%)
💹 NIFTY: 11,594.45 | 🔽 −158.35 (1.35%)
🌟 Gold Rate : ₹32,650.00 for 10gm
_______________________________

‘चौकीदार हि चोर हे’ वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली

120 कोटी द्या नाहीतर 'वानखेडे' स्टेडियम खाली करा; राज्य सरकारची एमसीएला नोटीस

तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या (दि. 23) राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांचा प्रामुख्याने समावेश.

शाओमीचा डबल साइड डिस्प्ले टीव्ही उद्या (दि. 23) चीनमध्ये होणार लाँच

आयपीएल-2019 चा अंतिम सामना चेन्नई ऐवजी हैदराबादला होणार, बीसीसीआयने केलं स्पष्ट

बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'भारत' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● लोकसभा निवडणुक तिसरा टप्पा : महाराष्ट्रातील 14 जागांसह देशातील 116 जागांवर आज मतदान

● ट्रायच्या मार्च 2019 च्या अहवालानुसार रिलायन्स जिओचा 4 जी डाउनलोड वेग अव्वल

● बाबरी मशिदीबाबतच वक्तव्य भोवले; साध्वी प्रज्ञासिंह विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश

----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------

● इराणकडून तेल आयात करणे थांबवा अन्यथा निर्बंधांना सामोरे जा, अमेरिकेची पाच देशांना सूचना

● वैद्यकिय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेमध्ये 16 टक्के मराठा आरक्षणाला विरोध, हायकोर्टात पुन्हा याचिका

● मनीष माहेश्वरी टि्वटर इंडियाचे नवे एमडी, ते 29 एप्रिलपासून जबाबदारी सांभाळतील

● स्पोर्ट युटिलिटी वाहनासाठी महिंद्रा-फोर्डची हातमिळवणी, याबाबतचा उभय कंपन्यांनी केला करार

● दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्सनी धुव्वा, ऋषभ पंत ठरला सामनावीर

● मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना 4 दिवसांची सुट्टी, बॅट-बॉलपासून लांब राहण्याच्या सूचना

● 'सूर्यवंशी' चित्रपटात 'अक्षय-कॅटरिना' ची जोडी 9 वर्षांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार

● अहमदनगर - नगर मतदारसंघासाठी आज (दि. 23) मतदान, 18 लाख मतदार बजावणार हक्क, 2030 केंद्र

● अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदान कर्मचारी वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या 215 बसेस रवाना

● अहमदनगर - राहुरीत 50 महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात, निवडणुकीसाठी महिला बाउन्सर आणल्याचा संशय, महिलांकडे चौकशी सुरु

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु; दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

LetsUp | Political

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज 13 राज्य आणि 2 केंद्रशासित राज्यातील 116 जागांवर उत्साहात मतदान सुरु

👉 सकाळी सातपासून मतदारांची मतदान केंद्रांवर दिसली गर्दी; मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

🎯 महाराष्ट्रात कुठे मतदान? : जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

📍 देशात कुठे मतदान? : गुजरात : 26, कर्नाटक : 14, केरळ : 20, उत्तर प्रदेश : 10, छत्तीसगढ़ : 7, ओडिशा : 6, बिहार : 5, पश्चिम बंगाल : 5, आसाम : 4, गोवा : 2, दादरा आणि नगर हवेली : 1, दमन दीव : 1, त्रिपुरा : 1, जम्मू आणि काश्मीर : 1

🧐 राज्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला:

बारामती : सुप्रिया सुळे Vs कांचन कुल यांच्यात लढत
माढा : रणजित निंबाळकर Vs संजय शिंदे
पुणे : गिरीष बापट Vs मोहन जोशी
अहमदनगर : संग्राम जगताप Vs सुजय विखे
जळगाव : उन्मेष पाटील Vs गुलाबराव देवकर
कोल्हापूर : संजय मंडलिक Vs धनंजय महाडिक
हातकणंगले : धैर्यशील माने Vs राजू शेट्टी
सांगली : संजय पाटील Vs विशाल पाटील Vs गो. पडळकर
संभाजीनगर : चंद्रकांत खेरे Vs सुभाष झांबड Vs इम्तियाज जलील Vs हर्षवर्धन जाधव
रायगड : अनंत गिते Vs सुनील तटकरे
रत्नागिरी-सिंधुदूर्ग : विनायक राऊत Vs नीलेश राणे Vs नवीनचंद्र बांदिवडेकर
सातारा : उदनराजे भोसले Vs नरेंद्र पाटील
जालना : रावसाहेब दानवे Vs विलास औताडे
रावेर : रक्षा खडसे Vs डॉ. उल्हास पाटील

💫 आता मतदारराजा ईव्हीएमचे बटण दाबून कुणाला कौल देतो? यावरच दिग्गजांचे भवितव्य अवलंबून असणार आहे

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 ऐतिहासिक खेळी! 25 चेंडूत शतक

LetsUp | Sports

🏏 25 चेंडूत शतक झळकावत स्कॉटलंडचा फलंदाज जॉर्ज मुंसे याने टी-20 क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

👍 ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हन संघाकडून खेळताना मुंसेने वेगवान शतकासह एका षटकात 6 षटकार खेचण्याची किमयाही साधली

👀 39 चेंडूंत 147 धावांचा पाऊस :

टी-20 सामन्यात मुंसेने अवघ्या 39 चेंडूंत 147 धावांचा पाऊस पाडला
मुंसेच्या या खेळीत 5 चौकार आणि तब्बल 20 उत्तुंग षटकारांचा समावेश होता
मुंसेने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 17 चेंडू खर्ची घातले तर पुढच्या आठच चेंडूत त्याने शतकाला गवसणी घातली

😳 सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडीत : टी-20 मध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर होता. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध 3 बाद 278 धावा केल्या होत्या. ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हन संघाने हा विक्रम मागे टाकत 3 बाद 326 धावांचा डोंगर उभा केला

💫 अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या या सामन्याला मात्र ICCचा अधिकृत दर्जा मात्र नव्हता

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 Letsup I General Knowledge

1) कोणता रेणू आपल्या विश्वातला सर्वात प्राचीन रेणू मानला जातो?

उत्तर: हिलियम हाइड्राइड आयन (HeH+)

2) 23 वी ‘आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद’ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

उत्तर : कतार (दोहा शहर)

3) 2020 सालापासून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दृष्टीसाठी उपयोगी साधने वापरण्यास कोणते शैक्षणिक मंडळ परवानगी देणार आहे?

उत्तर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)

4) भारतीय निवडणूक आयोगाची (ECI) कार्ये आणि त्याच्या रचनेबाबत कोणती घटनात्मक तरतुद स्पष्टता देते?

उत्तर: कलम 324

5) जून महिन्यात कोणता देश 'जी-20 शिखर परिषद 2019' आयोजित करणार आहे?

उत्तर: जपान (ओसाका)

6) यंदाच्या ‘जागतिक वारसा दिन 2019’ ची संकल्पना (Theme) काय होती?

उत्तर: रूरल लँडस्केप्स

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 नगरमध्ये मतदान सुरु; दुरंगी लढत रंगण्याची चर्चा जोरात!

LetsUp | Local

📍 नगर दक्षिणेत उत्साहात मतदान सुरु, सकाळी 11 वाजेपर्यंत नगरमध्ये 20.26% मतदान

👀 19 उमेदवारांचे राजकिय भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार

👉 महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे व आघाडीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात खरी लढत रंगणार असल्याची चर्चा

🎯 यंदाची वैशिष्ट्ये काय?:

192 मतदान केंद्रावरून लाईव्ह वेबकास्टिंग केले जाणार
प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट असणार
नगर दक्षिण एकूण मतदार : 18 लाख 54 हजार 248
मतदान केंद्र : 2030
यंदा 10 सखी मतदान केंद्राची स्थापना
मतदारांना अडचण आल्यास 1950 टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येणार

📍 विभानसभा मतदारनिहाय मतदार :

शेवगाव : 3 लाख 38 हजार 788
राहुरी : 2 लाख 88 हजार 127
पारनेर : 3 लाख 17 हजार 8
नगर शहर : 2 लाख 85 हजार 913
श्रीगोंदा : 3 लाख 93 हजार 24
कर्जत-जामखेड : 3 लाख 15 हजार 88

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📚 आज 'जागतिक पुस्तक दिन'

Letsup | Special

🧐 आज जागतिक पुस्तक दिन आहे. महान लेखक शेक्सपिअर तसेच इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. इंटरनेटच्या जगात वाचक वर्ग आधुनिकतेकडे वळला असला तरीही, आजही पुस्तकांची भुरळ कायम आहे.

🎯 इंटरनेट, मोबाइलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे. इंटरनेटवर कोणत्याही शब्दाचा अर्थ चटकन मिळतो. म्हणून तरुण पिढीला पुस्तक वाचणं बोअरिंग वाटतं. पुस्तकांबद्दल प्रेम वाढावं, जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. तसेच नवीन लेखकांनाही प्रोत्साहन मिळावं या हेतूनही पुस्तक दिन साजरा होतो.

💁‍♂ वाचनाचं महत्व: वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचं वाचन हे मोठ्यानेच करायला हवं. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात पेरले जातं आणि ते चांगलं लक्षात राहातं.

📍 द होली बायबल, कोटेशन्स फ्रॉम चेअरमन माओ त्से-तुंग व हॅरी पॉटर ही जगात सर्वांत जास्त वाचली जाणारी तीन पुस्तके आहेत.

👍 काही प्रेरणादायी पुस्तके:

अग्निपंख - माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम
तरुणांना आवाहन - स्वामी विवेकानंद
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
स्टिव्ह जॉब्स यांचे आत्मचरित्र - विलास साळुंके

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 SBI मध्ये 8904 लिपिक पदांसाठी भरती

LetsUp | Job

👨‍💼 पदाचे नाव: ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

📍 जागांची संख्या :8904 जागा

🧐 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक.

💁‍♂ वयाची अट: 01 एप्रिल 2019 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🎯 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💵 Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/माजी सैनिक:₹125/-]

पूर्व परीक्षा: जून 2019

मुख्य परीक्षा: 10 ऑगस्ट 2019

🗓 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2019

🗞 जाहिरात पाहा: http://bit.ly/2GCznha

🗓 ऑनलाईन अर्ज: http://bit.ly/2Z2GbvT

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनी काय काळजी घ्यावी?

LetsUp | Parenting

🎯 आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळून तो आयुष्यात यशस्वी व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. अर्थात त्यात काही चुकीचे नाही; मात्र हे यश मिळवण्याच्या संदर्भातील सर्व संकल्पना पालकांना सुस्पष्ट असायला हव्यात. मुलांच्या या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनीही पुरेसा वेळ दिला पाहिजे. पालक आणि मुले यांच्यातील संवाद आयुष्याच्या यशात महत्त्वाचा ठरतो.

🧐 पालकांनी या गोष्टींची काळजी घ्यावी :

पाल्यावर अधिकार गाजवू नये; तर त्याच्याशी मैत्री करावी.

प्रत्येक कृती करण्यास प्रेमाने सांगावे.

पालकांनी आपली भूमिका सांगतांना आपली कृती तपासावी.

मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्या टाळाव्यात म्हणजे मुलांवर ताण येणार नाही.

मुलांना पैशांपेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे. हे तत्त्व नेहमी लक्षात घ्यावे.

पाल्यासाठी स्वतःचा जास्तीत-जास्त वेळ द्यावा.

मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्याव्यात.

स्वतःची चूक झाली असल्यास ती मुलांसमोर मान्य करावी.

प्रत्येकाची प्रकृती ही निरनिराळी असल्याने पालकांनी आपल्या मुलाची तुलना कधीही दुसर्‍या मुलाबरोबर करू नये.

मुलांसमोर त्यांच्याविषयी नकारात्मक बोलू नये. यामुळे बालमनावर परिणाम होऊन त्यांच्याशी जवळीक साधता येत नाही.

घरातील इतरांसमोर मुलांचे दोष सांगितले जातात, असे कृत्य टाळावे.

आपला पाल्य काय करत नाही, हे सांगण्यापेक्षा तो काय चांगले करतो, ते इतरांना सांगावे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 IPL: 'जिओ' ने लॉन्च केला क्रिकेट सिझन पॅक

Letsup । Update

🏏 आयपीएल 2019 साठी रिलायन्स जिओने एका नवीन रिचार्ज प्लॅनची घोषणा केली

💁‍♂ क्रिकेट फॅन्सची पसंती पाहता रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी खास क्रिकेट सीझन डेटा पॅक लॉन्च केला आहे. या विशेष पॅकची किंमत 251 रुपये आहे. प्लॅन अंतर्गत ग्राहकांना माय जिओ अ‍ॅपच्या कुपन सेक्शनमध्ये, आवडत्या टीमचे एक्सक्लुसिव वॉलपेपर्स आणि लोगोही मिळणार आहेत.

🎯 2 जीबी डेटा दररोज : 251 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 51 दिवसांची आहे. ज्यात ग्राहकांना दररोज 2 जीबी 4 जी डेटा मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना 51 दिवसांत एकूण 102 जीबी डेटा मिळेल.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना व्हॉइस कॉलिंग व एसएमएसची सुविधा देण्यात येणार नाही. या प्लॅनमध्ये फक्त डेटाच वापरता येईल.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

● ख्राईस्टचर्च येथील मशिदीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी घडवले साखळी बॉम्बस्फोट, श्रीलंकेचा दावा

● पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद येथे एका मतदान केंद्रावर क्रूड बॉम्बचा हल्ला, तीन जखमी

● केरळच्या कन्नूर येथील मतदान केंद्रावरील एका व्हीव्हीपॅट मशीनच्या आतमध्ये आढळला साप, प्रशासनाची उडाली धांदल

● आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञानी बनवली उपग्रहांना ऊर्जा पुरवणारी पहिली स्वदेशी चिप
_

💹 Sensex : 38,564.88 | 🔽 −80.30 (0.21%)
💹 NIFTY: 11,575.95 | 🔽 −18.50 (0.16%)
🌟 Gold Rate : ₹32,615.00 for 10gm
_


● लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात तिसऱ्या टप्प्यासाठी देशात सरासरी 61 टक्के, महाराष्ट्रात 55.05 टक्के मतदान

● व्हीव्हीपॅटच्या 50 टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केली आहे, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री नायडू यांची माहिती

● मुंबई विद्यापीठ हे सार्वजनिक की खासगी असा प्रश्न उपस्थित करत प्राप्तीकर विभागाने मुंबई विद्यापीठाला 50 कोटींची नोटीस बजावली

● ढाई किलो का हाथ भाजप के साथ, सनी देओलचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

● अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील 14 मालमत्तांचा लिलाव होणार

● बारामती भाजपने जिंकली तर राजकारणातून निवृत्ती घेईल - अजित पवार

● तब्बल 16 वर्षानंतर सलमान खानचा तेरे नाम सिनेमाचा सिकवल येणार, दिगदर्शक सतीश कौशिक यांची घोषणा

● टी-20 क्रिकेटमध्ये जॉर्ज मुन्सीचा भीमपराक्रम; 17 चेंडूत अर्धशतक, पुढील 8 चेंडूत शतक

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 देशात सरासरी 63 तर महाराष्ट्रात 61.30 टक्के मतदान

LetsUp | Political

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी देशभरात सरासरी 63.39 टक्के तर महाराष्ट्रात 61.30 टक्के मतदान झाले

💁‍♂ देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 79 टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी 12.86 टक्के मतदान झाले

📍 महाराष्ट्र मतदान टक्केवारी:

एकूण : 61.30%

जळगाव : 58%
रावेर : 58%
जालना : 63%
औरंगाबाद : 61.87%
रायगड : 58.06%
पुणे : 53%
बारामती : 59.50%
अहमदनगर : 63%
माढा : 63%
सांगली : 64%
सातारा : 57.06%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : 62.26%
कोल्हापूर : 69%
हातकणंगले : 68.50%

📍 15 राज्यात मतदान : 63.39% (सायं 7 वाजता):

आसाम 78.52%
बिहार : 59 .77%
गोवा : 71.26%
गुजरात : 60.48%
जम्मू-काश्मीर : 12.86%
कर्नाटक : 64.06%
केरळ : 70.21%
महाराष्ट्र : 56.95%
ओडिशा : 58.18%
त्रिपुरा : 78.52%
उत्तर प्रदेश : 57.83%
पश्चिम बंगाल : 79.6%
छत्तीसगड :66 .37%
दादरा आणि नगर हवेली : 71.43%
दमण आणि दीव : 65.34%

👉 टीप: सदर आकडेवारीमध्ये तफावत असू शकते.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp News Updates

● इसिसने स्वीकारली श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांची जबाबदरी; आतापर्यंत 40 संशयितांना अटक

● जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार, आशियात मधुमेहग्रस्त महिलांत अवेळी मृत्यूचा धोका जास्त

● ICICI- व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर यांना ईडी अधिकाऱ्यांसमोर 3 मे रोजी हजर राहण्यासाठी समन्स

● न्यायालयाचा अवमान प्रकरणी राहुल गांधी यांना नोटीस; 30 एप्रिल रोजी SCत होणार सुनावणी

● गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस बानोंना 50 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

----------------------
📣 आवाहन! 'लेट्सअप'वर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसार प्रसिद्ध केला जातो. कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याची पडताळणी करावी. यातील कोणत्याही माहितीच्या अथवा आवाहनाच्या सत्यतेबाबत 'लेट्सअप' हमी घेऊ शकत नाही.! 👏
----------------------

● मराठा क्रांती मोर्चा व्यंगचित्र प्रकरण; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरुद्ध वॉरंट

● कुस्तीपटू नरसिंह यादवला संजय निरुपमांचा प्रचार भोवला; पोलीस सेवेतून निलंबित

● रिअलमी 3 प्रो चे भारतात लाँचिंग, तो 29 एप्रिल पासून अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध

● अटीतटीच्या सामन्यात चेन्नईची हैदराबादवर मात, शेन वॉटसन ठरला सामनावीर

● चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाने पटकावले सुवर्णपदक

● ‘तेरे नाम’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खान कॅमिओ रोलमध्ये झळकण्याची शक्यता

● अहमदनगर - नगर दक्षिण मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार या मतदारसंघात सुमारे 65 टक्के मतदान

● अहमदनगर - लोकसभा इलेक्शन घडामोडी : शिराळ चिंचोंडीला फेरमतदान मागणी, बाबुर्डी बेंदला मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न

● अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे गोठ्याला लागलेल्या आगीत 29 जनावरांचा होरपळून मृत्यू, सुमारे 10 लाखांचे नुकसान

● अहमदनगर - जिल्ह्यात टँकरवर होणार 77 कोटी खर्च, पाणीपुरवठ्यासाठी टँकरला प्राधान्य; अन्य उपाययोजनांकडे दुर्लक्ष

📞 जाहिरातीसाठी संपर्क: 7875190190

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 उन्हाचा दाह; जलस्रोत संपू लागले!

LetsUp | Update

💁‍♂ राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने जलस्रोतांवर परिणाम, एका आठवड्यात 500 गावातील जलस्रोत पडले कोरडे

📍 आता टँकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाऱ्या गावांची संख्या 11 हजार 738 वर पोहोचली

💫 अनेक जिल्ह्यांत जनावरांच्या चारा-पाण्याची समस्याही गंभीर, दुष्काळग्रस्त 9 जिल्ह्यांत 1084 छावण्यांमध्ये 7 लाख 14 हजार जनावारांना सांभाळले जात आहे

👉 मराठवाड्यातील अडीच हजार नाशिक विभागातील एक हजारहून अधिक गावात टँकरने पाणी पुरवठा सुरु

😇 टँकरच्या मागणीत वाढ : भूजल पातळी खाली गेल्याने तसेच जलस्रोत कोरडे पडू लागल्याने विहिरी आणि बोरवेलमधूनही पाणी मिळणे मुष्कील होत असल्याने टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे

👀 छावण्यांच्या मागणीतही वाढ : जनावरांच्या छावण्यांच्या मागणीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना या नऊ जिल्ह्यात 1084 छावण्या सुरू आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळ असून तेथे 664 छावण्या सुरू असून एकट्या बीड जिल्ह्यात 590 छावण्या सुरू आहे

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडीवर एक नजर

LetsUp | Entertainment

1) लवकरच ‘तेरे नाम’चा सीक्वल : अभिनेता सलमान खानच्या चित्रपट कारकीर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट ‘तेरे नाम’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘तेरे नाम’च्या सीक्वलचे दिग्दर्शनही सतीश कौशिक करणार आहेत. ते दोन नव्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट करणार आहेत. सलमान या चित्रपटामध्ये कॅमिओ रोलमध्ये दिसू शकतो.

2) 'तुला पाहते रे' मध्ये राजनंदिनीची एंट्री: झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' मध्ये आता पुन्हा एकदा मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

हे ट्विस्ट म्हणजे मालिकेत राजनंदिनीची एंट्री. अभिनेत्री शिल्पा तुळस्कर राजनंदिनीची भूमिका साकारणार आहेत. त्यांनी मालिकेसाठी शूटिंगला सुरुवात केली असून एका वृत्तानुसार, आज 24 एप्रिलच्या एपिसोडद्वारे त्या प्रेक्षकांना भेटणार आहेत.

3) जजमेंटचा थरारक 'ट्रेलर': ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन निर्मित बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा 'जजमेंट' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित आहे. *ट्रेलर पहा* : https://ltsup.in/2GuRl44

4) बॉलिवूड स्टार्सच्या पत्नींवर चित्रपट : सध्याच्या बायोपिकच्या ट्रेन्डमध्ये दिग्दर्शक मधूर भांडारकर सुपरस्टारच्या पत्नीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सुपरस्टारच्या पत्नीच्या आयुष्यावरील हा पहिला चित्रपट असणार आहे.

हा चित्रपट शाहरूख खानची पत्नी गौरी खान, शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि राजेश खन्नाची पत्नी डिंपल खन्ना यांच्या आयुष्यावर हा आधारित असणार आहे. तसेच या चित्रपटाचे नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असे ठेवण्यात येणार आहे.

5) रिंकूला बायोपिकमध्ये करायचंय काम : सैराट फेम रिंकू राजगुरू तीन वर्षांनी 'कागर' द्वारे मोठ्या पडद्यावर परत येतेय. या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना रिंकूने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

यावेळी रिंकूने सावित्रीबाई फुले यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचीही भूमिका साकारायची इच्छा आहे. चित्रपट माध्यमात भविष्यात छायाचित्रण आणि दिग्दर्शन शिकायचे आहे,’ असे तिने सांगितले.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎂 जन्मदिवस क्रिकेटच्या देवाचा!

LetsUp | Special

क्रिकेटचा देव, भारतरत्न, महाराष्ट्राचा मानबिंदू अशा अनेक बिरुदावली कमी पडतील सचिनसाठी. पाय जमिनीवर रोवून आकाशाला गवसणी घालणारा लाखो लोकांचा आदर्श सचिन 46 आज वाढदिवस साजरा करत आहे.

🗣 सचिनबद्दल दिग्गजांचे गौरवोद्गार:

सर डॉन ब्रॅड्मन : सचिन तेंडुलकरची बॅटिंग पाहताना मी स्वत:ला त्याच्यात पाहतो.

मॅथ्यु हेडन: मी देव पाहिला आहे. भारताच्या ‘टेस्ट’ मॅचच्या संघात तो चौथ्या स्थानी बॅटिंगला येतो.

मार्क टेलर: आम्ही ‘भारतीय’ संघासमोर हरत नाही तर ‘सचिन’ या खेळाडूसमोर हरतो".

बराक ओबामा : मी सचिन खेळत असताना क्रिकेट बघतो. मला त्याचा खेळ आवडतो म्हणून नव्हे तर तो खेळताना माझ्या देशाचं ‘प्रोडक्शन’ 5% नी कमी का होतं? हे जाणून घ्यायला.

👉 संयमी सचिन, लढवय्या सचिन आजही आपल्यासाठी नक्कीच प्ररेणादायी आहे. आज त्याच्याबद्दल माहिती नसलेल्या काही गोष्टी वरील फोटोद्वारे (इमेज) जाणून घेऊयात.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💥 भूकंपाच्या धक्याने नेपाळ हादरले!

Letsup | Update

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये आज (दि.24) एका मागोमाग एक सलग तीनवेळा भूकंपाचे धक्के बसले.

🧐 तीनदा भूकंपाचा हादरा:

पहिला धक्का : स. 6 वाजून 15 मिनिटांनी I रिश्‍टर स्‍केल : 4.8
दुसरा धक्का : 6 वाजून 29 मिनिटांनी I रिश्‍टर स्‍केल : 5.2
तिसरा धक्का : 6 वाजून 40 मिनिटांनी I रिश्‍टर स्‍केल : 4.3

💁‍♂ सुदैवाने जीवितहानी नाही : काठमांडूत सकाळी झालेल्या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती, तर भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या उत्तर-पूर्व राज्यात उशीरा रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी 6.1 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ जाणून घ्या घामोळ्यावर घरगुती उपाय!

Letsup | Tips

ऋतू बदलला की बदललेल्या हवामानाचे परिणाम साहजिकच शरीरावर होतात. उन्हाळ्यात शरीरावर घामोळ्याची पुरळं आली की प्रचंड त्रास जाणवायला लागतो. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपचार पद्धती पुढीलप्रमाणे.

कच्चा बटाटा - कच्चा बटाटा गुलाब पाण्यात मिक्स करुन त्याचा लेप करावा. हा लेप 20 मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावून ठेवावा. नंतर थंड पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. आठवड्यातून 3 वेळा हा प्रयोग करावा.

चंदन पावडर - एका वाटीत एक चमचा चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करुन लेप करावा. हा लेप 20 ते 25 मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावावा. त्यानंतर थंड पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. हा प्रयोग आठवड्यातून 3 वेळा करावा.

बेकिंग सोडा - बेकिंग सोडा साध्या पाण्यामध्ये मिक्स करुन त्याची पेस्ट घामोळे झालेल्या भागावर लावाली. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. आठवड्यातून 4 वेळा हा प्रयोग करावा.

कडूलिंबाची पानं- कडूलिंबाच्या पानांची पेस्ट करुन ही पेस्ट 20 मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावाली. त्यानंतर घामोळे झालेला भाग स्वच्छ करा. आठवड्यातून 5 वेळा हा प्रयोग करावा. यामुळे घामोळ्यांचा त्रासापासून सुटका मिळेल.

बीट - बीट पाण्यात उकळावे. हे पाणी गाळून गार झाल्यावर बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. गोवर व कांजिण्यांच्या पुरळ वा फोडांवर हे पाणी मलमाप्रमाणे ब्रशने प्रत्येक 1 तासाने दोनदा लावावे. पुरळाच्या जागी होणारी आग व खाज कमी होण्यास यामुळे मदत होईल.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
💁‍♂ तंत्रज्ञान क्षेत्रात कोठे काय? जाणून घ्या

Letsup | Tech

Infinix Smart plus 3 : स्मार्टफोन कंपनी इंफिनिक्स (Infinix)ने ट्रिपल रियर कॅमेरा असलेला 'स्मार्ट 3 प्लस' स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 6999 रुपये इतकी आहे.

oppo a9 : 'ओप्पो ए9' हा फोन चीनमध्ये 30 एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार आहे. ओप्पो ए9' फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असून वॉटरड्रॉप नॉच आणि ड्यूअल रिअर कॅमेरा आहे. चीनमध्ये या फोनची किंमत 1700 युआन (जवळपास 17600 रुपये) असणार आहे.

one plus 7 : वन प्लस 7 आणि वन प्लस 7 प्रो हे बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स पुढील महिन्यात म्हणजेच 14 मे रोजी भारतात लॉन्च केले जाणार आहेत. यासंबंधी वन प्लस कंपनीने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून माहिती दिली केली आहे.

XOLO zx : झोलो कंपनीने झेडएक्स हे नवीन मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून, याला दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी हा फोन 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोअरेज आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोअरेज मध्ये उपलब्ध आहे. तसेच फोनची किंमत अनुक्रमे 11,499 आणि 13,999 रूपये आहे.

BSNL ची धमाकेदार ऑफर : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने जुन्या प्लॅनमध्ये बदल करत नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. यामध्ये 35 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 5 जीबी डेटा मिळणार आहे. प्लॅनची वैधता 5 दिवसांची असणार आहे.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup