कविता समूह
1.32K subscribers
785 photos
3 videos
2 files
39 links
कविता- चारोळी या चॅनलवर तुम्ही स्वतः लिहीत असलेल्या मराठी व हिंदी कविता-चारोळी-कथा पाठवू शकता. त्याचबरोबर इतरांनी लिहिलेल्या कविता वाचूही शकता. या चॅनलचा एकमेव उद्देश जास्तीत जास्त कविता संग्रहित करणे हा आहे.

Admin - Sachin Gotad
https://t.me/SachinGotad
Download Telegram
*माणूस होशील का*

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि कुणीतरी त्याचं केलेलं मराठीकरण ....

आलास..?
ये, दार उघडंच आहे ...आत ये
पण क्षणभर थांब....!!

दारातील पायपुसण्यावर
अहंकार झटकून ये...!!

भिंतीला बिलगून वर चढलेल्या
मधुमालतीच्या वेलावर
नाराजी सोडून ये...!!

तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये...
बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...!!

पायातल्या चपलांबरोबर
मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..!!

बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून
थोडा खेळकरपणा मागून आण..
गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू
चेहेऱ्याला लावून आण...!!

ये...
तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न
माझ्यावर सोपव...
तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला
प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...!!

ही बघ....
तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी..
सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि
आकाशी गुलालाची उधळण केलीयं...
अन

प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर
चहा उकळत ठेवलाय...
तो घोट घोट घे....

ऐक ना ...
इतकंही अवघड नाहीये रे जगणं ...! फक्त...... तू *माणूस* बनून ये...

🙏🙏🙏
Nice Poem in Marathi For Sr. Citizens! 🤓😇

म्हातारपणाला नाव छान ,
कोणी म्हणत संन्यासाश्रम ,
कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम ,
मी म्हणतो आनंदाश्रम,

म्हातारपणात कसं राहायचं ,
घरात असेल तर आश्रमासारखं ,
आश्रमात असेल तर घरासारखं ,

कशातच कुठे गुंतायचं नसतं ,
जुन्या आठवणी काढायच्या नाही ,
"आमच्या वेळी" म्हणायचं नाही ,
अपमान झाला समझायचं नाही ,
उगाच लांबण लावायची नाही ,

सुखाची भट्टी जमवत जायच,
साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं ,
राग लोभाला लांब पळवायचं ,
आनंद सारखा वाटत जायचं ,

म्हातारपण सुद्धा छान असतं ,
लेन्स इम्प्लांट ने स्वच्छ दिसतं ,
नव्या दातांनी सहज चावता येतं ,
कान यंत्राने ऐकु येतं ,

पार्कात जाऊन फिरुन यावं ,
क्लबात जाऊन पत्ते कुटावं ,
देवळात जाऊन भजन करावं ,
टी.व्ही. मधल्या सिरियल बघावं ,

मुलांसमोर गप्प बसावं ,
नातवंडांशी खेळत रहावं ,
बायकोबरोबर भांडत जावं,
मित्रांबरोबर बोलत सुटावं,

जमेल तेंव्हा टूर वर जावं*
बायकोच लगेज सोबत न्यावं,
थकलं तिथेच बसून घ्यावं,
वाटेल तेव्हा उसाचा रस प्यावं,

लायन रोटरी अटेण्ड करावं ,
वेळ असेल तर गाण गावं ,
एकांतात ठेक्यावर नाचुन घ्यावं,
पाहिल कुणी व्यायाम म्हणावं,

कंटाळा आला झोपुन जावं,
जाग आली फेसबुक बघावं,
बघता बघता घोरत राहावं,
टोकल कोणी वाटसाप उघडाव,

एकटं घरी किचन पहाव,
दुधाची साय गायब करावं,
मुलांचा खाऊ टेस्ट कराव, आलं मनात साखर खावं,

जुना शर्ट घालत राहावं,
थोडे केस सावरत राहावं,
आरशालाच बोगस म्हणावं,
कोणी नसल वाकूली करावं,

पोराचा मोबाईल उघडून बघावा,
पासवर्ड असला ठेऊन द्यावा,
डब्बा मोबाइल वापरात राहावं,
बंद पडतो आदळत राहावं,

छान रंगवावी सुरांची मैफल ,
मस्त जमवावी जेवणाची पंगत ,
सुरेल जुळवावी गप्पांची संगत,
लुटत रहावी जगण्याची गम्मत,

स्वाद घेत, दाद देत ,
तृप्त मनानं आनंद घेत ,

हळुच आपण असं निघुन जावं ,
पिकलं पान गळुन पडावं ...!!!!
🌹😁🙏🏼😁🌹
*काढा एक दिवस पिकनिक मैत्रीसाठी*

एकदा तरी भेटूया कुठे तरी.
भेटून घट्ट होतील मैत्रीच्या गाठी,
पुसून धूळ साफ करू आपली नाती..

बस झाल वाॅटसअॅप गुडमाॅर्नींग,
भेटून एक मिठी मारू आनंदी.
दोन चार शिव्या हासडू प्रेमाच्या,
पोटभर हसण्याला भेटू नगदी..

ब-याच दिवसांत मैफिल जमली नाही,
मनातली जळमटं पुसली नाही.
साठून राहिल्या गोष्टी खराब होतात म्हणे,
बाहेर काढू सारे पर्वा कसली नाही..

खरंच मित्रांनो काढा एक दिवस मैत्रीसाठी,
काहीच नाहीतर गप्पा मारण्यासाठी..
👭👬👫👭👬👫
The account of the user that created this channel has been inactive for the last 5 months. If the account of the creator remains inactive in the next 30 days, it will self-destruct and the channel will lose its creator.
The account of the user that created this channel has been inactive for the last 5 months. If the account of the creator remains inactive in the next 29 days, it will self-destruct and the channel will lose its creator.
The account of the user that created this channel has been inactive for the last 5 months. If the account of the creator remains inactive in the next 28 days, it will self-destruct and the channel will lose its creator.
The account of the user that created this channel has been inactive for the last 5 months. If the account of the creator remains inactive in the next 27 days, it will self-destruct and the channel will lose its creator.
आता बघा आणि शिका तंत्रज्ञान / टेक्नॉलॉजी विषयीच्या सर्व गोष्टी आपल्या मराठी भाषेत

Youtube वरती माझे ' Technical My Marathi ' नावाचे चॅनल आहे. या चॅनल वरती टेक्नॉलॉजी विषयीची सर्व माहिती सांगितली जाते.

1) Technical New Update
2) Android Tips & Tricks
3) Whatsapp Tricks

अशा बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हांला येथे मिळेल.

त्याचबरोबर दररोज आठवड्यातून 3 ते 4 व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले जातात.

★ खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा.
https://www.youtube.com/channel/UCLrtOV2u8HlPDJzeOgCJI1g

सोबतच चॅनलला Subscribe करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
◆ टिव्हीवरची भांडणं

लहानपणी मला
भांडणं बघायला आवडायची
गल्लीत भांडणं लागली की
मी चवीने बघायचो,
मला आजही
भांडणं बघायला आवडतात
पण सध्या गल्लीत जास्त भांडणं होत नाहीत
त्यामुळे बघायला मिळत नाहीत
मग मी टीव्ही चालू करतो,
न्यूज चॅनल लावतो
तिथे बरेच शिकलेले वगैरे
तज्ञ वगैरे
प्रवक्ता वगैरे लोक
समाजाचे, धर्माचे
ठेकेदार वगैरे
बसलेले असतात
खूप भांडणं करतात,
एकमेकांवर धावतात,
जोरजोराने ओरडतात
ते कुठल्याही गोष्टीवर भांडू शकतात
आपले प्रखर वगैरे मत मांडू शकतात
कधी कारणांवर कधी विनाकारण
त्यांचं चालूच असतं भांडण
दिवसभरात कुठे न कुठे काहीतरी होतंच असतं
कुणीतरी एखादा शब्द जिभेवरून घसरंवत असतंच
ते त्यातूनच शोधतात एखादा विषय
घंटाभर भांडायला
चांगली असतात ही भांडणं
कधी बोअर वगैरे झालो की
मी बघतो त्यांची भांडणं
मला ही भांडणं बघायला
जाम मजा वगैरे येते

★ कवी - राजेश खाकरे
◆ टेक्नो कट्टा ◆

https://youtu.be/AFZHUgenu_4

दिवसेंदिवस स्मार्टफोन वापरणाऱ्याची संख्या वाढतच चालली आहे. त्यात मार्केट मध्ये येणारे नवनवीन महागडे फोन आपण विकत घेतो, परंतु तोच फोन हरवला किंवा चोरीला गेला तर आपली काय परिस्थिती होते हे आपण सर्व जाणतो.

पण जर का फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तो आपण आपल्या स्मार्टफोन मदतीने शोधू शकतो, आता तुम्हांला असा प्रश्न पडला असेल की, स्मार्टफोन कसा शोधायचा त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास Subscribe करा हे अगदी फ्री आहे.

मित्रांना शेअर करायला विसरु नका.
◆ टेक्नो कट्टा ◆

https://youtu.be/l4LQ7AtWulQ

फोनचे Storage Full होत असेल तर तुमच्या फोनमध्ये तुमच्या कळत - नकळत येणाऱ्या किंवा असणाऱ्या Duplicate Files.

तर या Duplicate Files कशा डिलीट करायच्या यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि व्हिडिओ कृपया पूर्ण बघा.

सोबतच व्हिडिओ आवडल्यास Subscribe करा हे अगदी फ्री आहे.

मित्रांना शेअर करायला विसरु नका.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...

शिवबा काय होते कसे घडले,
कुणास ठाऊक ते कुणासाठी लढले?
जाऊ दे तो इतिहास कोण विचारतय,
आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...

माँ जिजाऊंनी शिवबा घडवले,
मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्य उभारले,
आम्ही नुसते झेंडे घेऊन मिरवतोय,
आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय....

करून गोळा अठरा पगड जाती,
शिवबानी दिली तलवार त्यांच्या हाती,
आम्ही एकमेकांवर तलवारीने हल्ला करतोय,
आता मी पण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...

शत्रुच्याही मनात घर होतं शिवबाच,
गडकिल्ले जिंकून ध्येय जिंकलं स्वराज्याच,
आम्ही गड किल्ल्यांच्या नावाने पानटपऱ्या काढतोय,
आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय....

संत तुकारामांची ऐकून गाथा,
शिवबानी घातल्या कर्मकांडास लाथा,
आम्ही अजून मुहूर्त पंचांग शोधतोय,
आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय............,
🙃😟

संकलन ( श्रीमंतयोगी ग्रुप ) 📑
*instagram : @sri_srimantyogi_*
◆ टेक्नो कट्टा ◆

https://youtu.be/91T8gvl3ETM

आता आपल्या मोबाईल मधील फोल्डर लपवा कोणत्याही अॅप्सशिवाय

यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि व्हिडिओ कृपया पूर्ण बघा.

आणि एक विनंती व्हिडिओ आवडल्यास Subscribe करा हे अगदी फ्री आहे.

मित्रांना शेअर करायला विसरु नका.
कोठुणी येते मज कळेना, अगतिकता ही या ह्रदयाला
व्दंदाची थबकुन पावले, नाचत जाते भयानमाला

शुभ्र धुके ही अबोल होवून, डोईवरती खुले चांदणे
भयान होवून संध्या सजते, अंधाराचे विणती जाळे

नक्षत्राच्या इवल्या दारी,होते झुलते पुन्हा अंबर
रात चकाकुन चमके चांदी, डोळे त्या गगनाला डोंगर

मिणमिणत्या वाऱ्या मधला स्वर,येतो छेडुन कानावरती
सप्त सुरांचे घेऊन वारे,कोण पुरवितो गगनावरती?

मला न कळले झुलते अंबर,हबकून गेले पुन्हा एकटे
वाऱ्यासंगे हिंडता हिंडता, क्षितीजासव पुन्हा मुकाटे

गर्द निळे आभाळ मोकळे, भयाण होते इथली संध्या
नक्षत्राचे देणे देवुन, मला न कळले निजली राधा

सि.रामाराव.
चंद्र पाहून सखे जशी चांदणी लपते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

लेखणीची काय चूक
ती असतेच खरी मूक
वेदना मांडल्या जातात
अन हीच तिची भूक

अस वाटतं तुझ्यासाठीच कविता बनते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

माझ्या दारी फुलांची
नवं नवी आरास
तुझ्या येण्याने खरा
घुमतो सर्वत्र सुवास

नको म्हणता सखे ती आरास निखळते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

ओठावर माझ्या तुझ्या
ओठांची गं गोडी
झाली कडू आता तरी
चव चाखू देना थोडी

ओठ भिडल्यावर सारे अंग हे भिनते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

वाट पाहतोच आहे
रंग बदलण्या सारे
हितगुज घेऊन येते
कानी वाहणारे वारे

नाकाच्या रुबाबाने नथ ही मुरडते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

भिजल्या वातीची
काय सांगू कहाणी
माझ्या आसवांची
ती ही झाली दिवाणी

खर्ची पडेल अशी शेवटी दमडीच उरते
चंद्र पाहून सखे जशी चांदणी लपते
खरंच सांगू सखे तेव्हा रात्र ही रडते

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
◆ टेक्नो कट्टा ◆

https://youtu.be/YUOfBq-aATY

ही सेटिंग्ज करा आणि तुमचे whatsapp चे आवडते मेसेज बघा.

यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि व्हिडिओ कृपया पूर्ण बघा.

आणि एक विनंती व्हिडिओ आवडल्यास Subscribe करा हे अगदी फ्री आहे.

मित्रांना शेअर करायला विसरु नका.
Technical My Marathi
आता शिका आणि बघा तंत्रज्ञानाविषयी सर्व माहिती आपल्या मराठी भाषेत
https://t.me/techmymarathi