Infinity Electrical Engineering
1.96K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
ENGINEERING SERVICES EXAMINATION, 2018
👆👆👆
(COMMISSION'S WEBSITE - www.upsc.gov.in)
Infinity MPSC Civil:
VIDEO 👆👆👆 जात प्रमाणपत्र वैधतेसाठी करावी लागणारी ससेहोलपट थांबणार
Forwarded from Infinity Academy
APPLICATION INVITED FOR THE SUPERVISORY POST OF O & M WING👆👆
Forwarded from Infinity Academy
Nagpur Metro Rail Corporation Limited (NMRCL) vacancy for Electrical , Civil , Mechanical & Electronics Engineers
#Motivation
जन्मजात आंधळेपणा सुद्धा श्रीकांत ला ५० करोड ची कंपनी उभी करण्यापासून रोखू शकला नाही

जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात. जन्मजात आंधळेपणा. सर्व बोलत होते कि निरुपयोगी मुलगा जन्माला आला आहे. आज तोच निरुपयोगी मुलगा ५० करोडच्या कंपनीचा मालक आहे. नाव आहे श्रीकांत बोल्ला.
आई वडील अडाणी. काही तरी करायची जिद्द शांत बसू देत नव्हती. शाळेमध्येही काही चांगला अनुभव आला नाही. शेवटच्या बाकावर बसवले जायचे. वडिलांना समजले कि इथे मुलाचे शिक्षण नीट होत नाही म्हणून त्याला हैद्राबाद मधील अंध मुलांसाठी असलेल्या विशेष शाळेत पाठवले. तिथे टो फक्त बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळायचे शिकला नाही तर त्याने त्यामध्ये प्राविण्य देखील मिळवले. डॉ ए पी जे अब्दुल कलामच्या लीड इंडिया प्रोजेक्ट मध्ये काम करायची संधी देखील मिळाली.

अंध असणे हि समस्या नव्हती तर त्यामुळे एकटे रहावे लागत होते ती समस्या होती. शिक्षण व्यवस्था देखील अशी होती कि १० वी ला ९० % गुण मिळून देखील आर्टस् ला प्रवेश नाकारण्यात आला. का तर अंध आहे म्हणून. ६ महिने सरकार सोबत भांडून विज्ञान विषय आपल्या जबाबदारी वर निवडला. सर्व पुस्तके हि आवाजात रेकोर्ड करून त्यावर अभ्यास करून ९८ % गुण मिळवून पास झाला.

समस्या इथेही साथ सोडत नव्हती. आयआयटी ने अंध आहे म्हणून प्रवेश परीक्षेत बसायला नकार दिला. आपण किती लढू शकतो? जर आयआयटी ला माझी गरज नाही तर मला पण आयआयटी ची गरज नाही असे म्हणून त्याने अजून कुठे संधी मिळते आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला व संधी मिळाली. त्याने जगप्रसिद्ध एमआयटी, स्टेन्डफोर्ड, ब्रेकली आणि कार्निजे ह्या विद्यापीठात प्रवेश अर्ज दाखल केला. त्यापैकी एमआयटी ने शिष्यवृत्ती सह त्याला प्रवेश दिला. टो एमआयटी च्या इतिहासातील पहिला विदेशी अंध विद्यार्थी बनला.

आतापर्यंत त्याने 3000 अपंग विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शैक्षणिक मदत केली आहे.

श्रीकांतचे ४ प्रोडक्शन प्लांट हुबळी (कर्नाटका), निझामाबाद (तेलंगना), आंध्रप्रदेश मध्ये संपूर्ण पणे सौर उर्जेवर चालणारा अजून एक प्लांट सुरु होण्याच्या मार्गावर आहे. एका एंजल इन्व्हेस्टर ने १३ करोड गुंतवण्याची तयारी दर्शवली. आतापर्यंत ९ करोड रुपये गुंतवून झाले. श्रीकांत ला भविष्यात आल्या कंपन्यांचे आयपीओ बाजारात आणायचे आहे, हे त्याचे स्वप्न आहे. आज श्रीकांतच्या कंपनीत ७० % कामगार हे शारीरिक दृष्ट्या अपंग आहेत.