Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
महाराष्ट्र विद्युत अभियंता - Mains 2019
सुधारित निकाल...
रिया मलिक ने वर्ल्ड कैडेट कुश्ती चैंपियनशिप में नाम किया स्वर्ण पदक.

#PriyaMalik #WorldCadetChampionship #GoldMedal #ATCard
Forwarded from Infinity Academy
🎯Dear Aspirants 🎯
MPSC CIVIL ENGINEERING INTERVIEW (MES) 2019
🔶Have you doubts and quires about interview?
▶️Interact one to one with Girish sir to clear your doubts.
▶️Join the session at Following locations
Interactive sessions -
🔘NASHIK 🔘 AURANGABAD 🔘 NAGPUR
Seminar -
🔘PUNE

🎯Registration compulsory , Click below given link for registration
https://forms.gle/myyjoWZM9BMcGS9fA

🔶For more details
📞788 781 1411
Forwarded from Infinity Academy
🎯Students can have personal Interactions with Me ,

@ Nashik Location

▶️Date: 28th July 2021
▶️Time : 10.00AM to 2.00PM

For more details
📞@ 788 781 1411
⭕️♦️‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश...

*‘एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा;विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून पद भरतीसाठी सूट*

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय*



मुंबई, दि. २८ जुलै - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते.

‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे ‘एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Forwarded from Infinity Academy
प्रिय विद्यार्थी मित्रांनो
काही अपरिहार्य कारणांमुळे आपले दैनंदिन Current Affairs ( चालू घडामोडी )
हा MPSC MES Civil Engineering - 2019 Interview साठी उपयुक्त कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे . नवीन वेळापत्रक लवकरच देण्यात येईल
तसदीबद्दल क्षमस्व
इन्फिनिटी अकॅडमी

अधिक माहिती साठी
788 781 1411
Forwarded from Infinity Academy
🎯Students can have personal Interaction with Girish Sir🎯

@ Aurangabad Location

▶️Date: 2nd August 2021
▶️Time : 10.00AM to 12.00 Noon

For more details
📞@ 788 781 1411
🔴शासन निर्णय
MPSC च्या कक्षेत येणाऱ्या पदांना सदर पदभरती वरील निर्बंध आतून सूट देण्याची बाब याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे..
Olympic Day 7
Recap 30/07/2021

संमिश्र परंतु चांगला दिवस..

दिवसाच्या सुरुवातीला मनु भाकर आणि राही सरनौबत यापैकी मनु काल 5 व्या स्थानावर असल्यान अंतिम फेरीत जाईल अशी खात्री वाटत होती पण दोघी अंतिम फेरीत जाऊ शकल्या नाहीत, पिस्तुल शूटिंग मध्ये एक तरी मेडल भेटल ही अपेक्षा होती पण मेडलची पाटी या भरवश्याच्या प्रकारात कोरी राहिली.

दीपिका कुमारी रशियन तिरंदाजाला हरवत QF मध्ये पोचली पण तिथं तिची गाठ कोरियन तिरंदाजसोबत पडली (हुह्ह ..पुन्हा कोरिया) आणि आपल्या दोन्ही सांघिक टीम प्रमाणे कोरिया कडून आजही दणका बसला, पहिल्याच सेट मध्ये सलग तिन्ही arrow परफेक्ट टेन मारून कोरियन तिरंदाजान आपला दर्जा दाखवत तो दबाव कायम ठेवला. आता वैयक्तिक तिरंदाजीत फक्त अतनू दास ही आपली आशा उरलीय.(त्यानं एकट्यानच आपल्यातर्फे कोरियन तिरंदाजला हरवलं आहे)

आजचा दिवस गाजवला तो लवलीना बोर्गोहेन न ! पहिल्या राउंड मध्ये जिंकून पण शांत शांत वाटणारी लवलीना या राउंड मध्ये बरीच आक्रमक वाटली ..सामना जिंकल्यावर तिचा आवेश बघण्यासारखा होता! आज तीन ज्या बॉक्सरला हरवलंय त्या बॉक्सर न लोवलीना ला याआधी जागतिक स्तरावर 4 वेळा हरवलं होत म्हणून आज तिलाच हरवणं हे मानसिकदृष्ट्या पण खूप आव्हानात्मक होत ते तीन पेललं आणि कांस्य पदक फिक्स झालं असल तरी मला गोल्ड जिंकल्याशिवाय थांबायचं नाहीय ही जिद्द बोलुन दाखवली. प्रामाणिकपणे सांगायचं तर भारताचं हे मेडल बऱ्यापैकी अनपेक्षित होत.

बॉक्सिंग मध्ये सिमरनजीत कौर ला मात्र पहिला टप्पा ओलांडता आला नाही.

बाकी सिंधू बद्दल तर सगळ्याला माहीतच असल..आज ची तिची स्पर्धक 4th seed होती (सिंधू 6th seed आहे) तर उद्या तिची सेमी फायनल ही 2nd seed खेळाडू सोबत आहे...आव्हान तगड असणारच आहे पण एकही गेम न हरता इथवर आलेली सिंधू ते पण पेलेल अस वाटत.

आज तिची मॅच ज्या जपानी सुबक ठेंगणी सोबत होती ती प्रतिस्पर्ध्याला long rallies खेळून थकवण्यात माहीर आहे/होती, दोघींच्या उंचीत लै फरक होता म्हणून playing style मध्ये लै फरक जाणवत होता. सिंधू न सुरुवात जरा निवांत केली तरी नंतर मात्र जपानी खेळाडून सिंधूच्या थकवायच्या नादात सलग बऱ्याच unforced error केल्या अन सिंधू पहिला गेम सहज जिंकली.

दुसऱ्या गेम मध्ये पण ती 6 पॉईंट्स न आघाडीवर होती म्हणून आता झाल..पोचली सेमी ला अस वाटत असतानाच जपानी खेळाडून ती लीड तर तोडलीच उलट 2 पॉईंट ची आघाडी पण घेतली, 20-18 अशी पिछाडीवर पडून पण सिंधू न आपला अनुभव दाखवत दुसरा पण गेम अन सामना जिंकला ...बाकी उद्याच्या मॅच मध्ये मजा येणाराय!

हॉकी मध्ये आपल्या टीमनं जलवा कायम ठेवत अखेरच्या ग्रुप मॅच मध्ये जपानचा high scoring मॅच मध्ये पराभव केला. (5-3)

आपली सेमी फायनल इंग्लंड सोबत रविवारी संध्याकाळी आहे.

महिला हॉकी टीम न खात उघडत आयरिश संघाचा 1-0 न पराभव केला आणि आश्चर्य म्हणजे 4 पैकी अजून एकच सामना जिंकला असला तरी अखेरचा सामना जिंकला तर अजूनही QF मध्ये जाण्याची संधीय!

Athletics च्या (track and field ) प्रकारांना आज सुरुवात झाली पण आपला कोणताही athlete आज पुढं जाऊ शकला नाही, पण अविनाश साबळे न steeplechase 3000m या प्रकारात पुढं जाता आलं नाही तरी आपलं नॅशनल रेकॉर्ड तोडलं , सगळ्यात मोठ्या स्टेज वर आपलं सर्वोत्तम देणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे.

नौकानयन मधल्या rowing आणि sailing मध्ये जवळपास सर्व प्रकारात आपलं आव्हान संपुष्टात आलय.

गोल्फ मध्ये अनिर्बन लाहिरी आणि Equestrian (घोडेस्वारी) त फौवाद मिर्झा या आपल्या प्लेयर्स नी आज आपला खेळ सुरू केला {अशाही खेळात आपले खेळाडू पात्र झाले आहेत हे कळावं म्हणून ही माहिती}

उद्या अतनू दास, पुजाराणी आणि सिंधू च्या सामन्यावर विशेष लक्ष असेल...
#Olympic