Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
मुंबई : स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले की, "काल कॅबिनेटमध्ये एमपीएससीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. एसईबीसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एमपीएससीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता येत्या 31 जुलैपर्यंत राज्यात एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही."

एमपीएससी ही संस्था स्वायत्त असल्याने त्यामध्ये जास्त हस्तक्षेप करता येत नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर आम्ही या विषयावर आज पुन्हा चर्चा करणार आहोत.
⭕️ आज रोहित दादा पवार यांनी अगदी स्तुत्य मागण्या आयोग आणि सरकार दरबारी मांडल्या आहेत
त्याची वेळेत आणि चांगल्या प्रकारे अंमल बजावणी झाली तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले दिवस येतील
तरी सर्व समिती, संघटना, यांनी पाठपुरावा करावा
🛑 आगामी परीक्षांचा क्रम असा असू शकेल 🛑

1.Combine पूर्व 2020

2.AMVI Mains 2020

3.Rajseva Mains 2020

4.Civil Engineering mains 2020

@infinityelectrical
✨✨फक्त एक कॉल करा....
गिरीश सरांना ✨✨..! अगदी हक्काने...

आई वडिलांनी इंजिनीरिंग शिकवलं मात्र त्यासाठी बँकेचं लाखोंचं कर्ज झालं.
त्यानंतर कर्जफेडीसाठी बँकेचा तगादा हा जणू घरातील सर्वांच्याच जीवनशैलीचाच भाग होऊन बसला, इंजिनियर तर होणार आहोतच जॉब देखील सहजच मिळेल या एकाच आशेवर येणाऱ्या सर्व परिस्थितीला थोपवत होतो, मात्र इंजिनियर होऊन सुद्धा जॉब नाही म्हणून स्पर्धा परीक्षांची वाट धरली, मग मात्र कॉन्फीडंट वाढला गव्हर्मेंट ऑफिसर होण्याचं आपलं स्वप्न आता तडीस जाणार असे वाटत असतानाच निराशेच्या गर्तेत कधी अडकत गेलो हे समजलेच नाही, हि अशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने आज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलेली आहे.
याची कारणेही तशीच आहेत...
आयोगांच्या पदांच्या जागा निघणं, परीक्षांच्या वेळापत्रकातील जाहीर होणे, परिक्षांनंतर प्रत्यक्ष निवडप्रक्रिया आणि joining चे पत्र मिळणं हि प्रक्रिया म्हणजे म्हणजे जणू खडतर प्रवास तर आहेच परंतु रोगापेक्षा औषध भयंकर याची प्रचिती आणून देणारी आहे.
आयुष्यात आपल्या मनस्थितीची सगळ्यात जास्त घालमेल होतेय ती या काळातच, त्यातच कोरोनाच्या गडद काळ्याकुट्ट संकटातून सावरताना आई आणि वडिलांची होणारी ससेहोलपट पाहून तर तुमचाही जीव कासावीस होत असेल.
नेमक्या याच आणि याच मानसिकतेतून हळव्या आणि संवदेनशील मनाचा व तुमचाच सहप्रवासी असणारा मित्र स्वप्नील लोणकर सारखा विद्यार्थी आपली जीवनयात्रा अर्ध्यावरच संपवतो. हे सगळं कल्पनेच्या पलीकडे आहे.
सहाजिकच प्रस्तापित व्यवस्थेविषयी उद्रेक, श्रद्धांजली, शोक या साऱ्या उस्त्फुर्त प्रतिक्रिया दिवस पुढे जातील तसे काळाबरोबर विरळ होत जातात आणि पुन्हा तेच दृष्ट चक्र नव्याने सुरु होते आणि पुन्हा कोणीतरी स्वप्नील लोणकर यांची जागा घेतो.

या काळात अभ्यासाबरोबरच या क्षेत्रातील तीव्र स्पर्धा, नैराश्‍य, ताणतणाव, सामाजिक दबाव, कुटुंबाच्या अवास्तव अपेक्षा, आजारपण, भीती, चिंता, आर्थिक ओढाताण यांसारख्या मानसिक आरोग्याशी निगडित असलेल्या गोष्टी तुम्हाला जखडून टाकतात आणि मग हळू हळू आपली वाटचाल दुःखी, उदास, निराश अशी रहाते किंवा त्यामुळे दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत जातो. प्रामुख्याने काहीच करावंसं न वाटणं, कशातच मन न रमणं, उगाचच रडू येणं, मन हळवं होणं, नकारात्मक विचार, पश्चातापाची भावना, अपराधीपणा, भविष्याविषयी विनाकारण काळजी, आपण काही कामाचे नाही, आपले आयुष्य व्यर्थ आहे. जगण्यात काही अर्थ नाही असे विचार मनात येणे व यातूनच आत्महत्येचे विचार सतत चिंतनात येणे, त्याच बरोबर झोप न लागणे, भूक मंदावणे, सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे, सोबतच बेचैनी, अस्वस्थता. लक्ष न लागणे किंवा एकाग्रता कमी होणे हि सर्व लक्षणे तीव्र डिप्रेशनची असू शकतात नव्हे डिप्रेशनच असते ते असे मानसोपचार तज्ज्ञही नोंदवतात.

मित्रांनो जीवन खूप सुंदर आहे, आपल्या प्रियजनांसाठी फक्त तुम्हीच महत्वाचे आहात हे कायम लक्षात ठेवा...!

आता आम्ही आहोत आपल्या सोबत...!
जेव्हा कधी मनात वाटलं की सगळं संपलं आहे तर गिरीश sirana एकदा call कराच ...
तुमचा गुरूमित्र म्हणून मी गिरीश खेडकर 'इन्फिनिटी अकॅडमी'च्या माध्यमातून आज आपल्याला अगदी विश्वासाने शब्द देतो कि, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना तुम्हाला ज्या ज्या टप्प्यावर जिथे जिथे मदत हवी आहे. काही बोलायचे आहे त्या त्या टप्प्यावर आम्ही आमच्या तज्ज्ञ टीमसह आपली वाटचाल अधिक सहज, सुलभ करण्यास कटिबद्ध आहोत,

तूमच्या मानसिक गरजेसाठी आम्ही एक चांगल्या भक्कम फौंडेशन ची स्थापना करत आहोत.... लोक मदतीतून तसेच आमच्या academy मधून आम्ही तुमच्या वरील समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न नक्की करू ....जरी तुम्ही मानसिकरित्या जरी खचला असाल....तरी आम्ही तुमच्या मनाची समजूत काढण्यात यशस्वी होऊ हा Infinity Academy कडून गिरीश सरांचा तुम्हा विद्यार्थी मित्रांना शब्द आहे....
तर मित्रानो, कधी असं वाटलंच तर नक्की गिरीश sirana एकदा call कराच...

आपल्या निरंतर सेवेशी
गिरीश खेडकर
9158999422 ✨✨