Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
✨✨✨
एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच विवेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ असे म्हणत. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.

✨योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते.
✨ परीक्षेतील यश असो वा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो.. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्य़ानं साध्य करता येतात. याचे कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो.
✨ अनेकांना परीक्षेत मनासारखं यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असतं पण डोक्यात शिरत नाही अशी वेगवेगळी कारणं असतात. यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणं. लक्षात ठेवा, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर या क्षमता विकसित करता येतात.
✨ एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यानधारणेचा निश्चितच उपयोग होतो.
✨ आपल्याला हवं ते यश मिळवलंय, ध्येय साध्य केलंय याची दृश्यकल्पना करा (व्हिज्युलाइजेशन). परीक्षेसाठी छान तयारी करत असल्याचं आणि यशस्वी झाल्याची कल्पना तुमचा यशाचा मार्ग सुकर करतं.

✨✨Join @infinitympsccivil ✨✨
“हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण”
Infinity Skill Development Academy* तर्फे
शिकवा व कमवा योजनेअंतर्गत मोफत प्रवेश
बॅच २ जानेवारी २०२१ पासून पुणे येथे
कालावधी:- 6 महिने
१००% नोकरीची हमी
प्रतिमहिना २० विध्यार्थ्यांना प्रवेश
आजच आपला प्रवेश निश्चित करा
अधिक माहितीसाठी संपर्क-
(+91) 9527340010
प्रिय विद्यार्थी मित्रानो,

नुकतीच महामेट्रो ची जाहिरात आलेली आहे,आणि आपण याअगोदरच महापारेषण (Mahatransco) चा
अभ्यास सुरु केला आहे .इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग च्या विद्यार्थांनी नीट बघितलं तर लक्षात येईल कि
Technical विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त साम्य आहे त्यामुळे जर तुम्ही सर्वानी टेक्निकल
विषयाचा व्यवस्थित अभ्यास केला तर तोच अभ्यास दोन्हीही परीक्षांसाठी तुम्हाला उपयोगी पडेल .
Mahametro ची इंजिनीरिंग पदवी आधारित जी पदे आहेत त्यासाठी पात्र विद्यार्थी दोन्हीही परीक्षांची
तयारी सोबत करू शकतात.
चला तर मग लागा कामाला!
आपली परीक्षेची तयारी सुरु करा सर्वोत्तम टीम सोबत,
रोजच्या अपडेट साठी आमचे Telegram चॅनेल जॉईन करा
https://t.me/infinityelectrical
सविस्तर माहिती साठी Contact @ (+91) 788 781 1411
⭕️Examination : Mahatransco

📔Subject : Network Analysis

join @infinityelectrical
आणखी एक संयुक्त पूर्व परीक्षा...
योग्य की अयोग्य?
आणखी एक संयुक्त पूर्व परीक्षा .... ??
Anonymous Poll
50%
योग्य
50%
अयोग्य
Forwarded from Infinity Academy
💥💥💥_ "एमपीएससी' परीक्षेचा निर्णय डिसेंबरअखेर ! मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर प्रस्ताव💥💥💥💥

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे पाठविला आहे. त्यावर अजून निर्णय झाला नसून काही दिवसांत निर्णय होईल. -डी. एस. करपते, उपसचिव, सामान्य प्रशासन

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाच्या विरोधामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नियोजित बाराशे पदांची भरती थांबविण्याचा निर्णय घेतला.आता विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा लवकर व्हावी, असा प्रस्ताव आयोगाने सामान्य प्रशासनाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. https://t.me/infinitympsccivil

आता तो प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसिमितीपुढे ठेवण्यात आला आहे. तर आरक्षणासंबंधी अंतिम निर्णय होईपर्यंत "एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना "ईडब्ल्यूएस'चा लाभ देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. डिसेंबरअखेर परीक्षेसंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
https://t.me/infinitympsccivil
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्ण परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. या तिन्ही परीक्षाअंतर्गत राज्यभरातून एक हजार 206 पदे भरली जाणार आहेत.

तत्पूर्वी, एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा कोरोनामुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सेवेची पूर्वपरीक्षा 11 ऑक्टोबरला तर1 नोव्हेंबरला अभियांत्रिकी सेवा आणि22 नोव्हेंबरला अराजपत्रित गट "ब'ची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले.

त्यानुसार परीक्षेचे नियोजनही झाले. मात्र आरक्षणाच्या स्थगितीला विरोध दर्शवत परीक्षा रद्दची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने अद्याप परीक्षेसंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही.

दुसरीकडे, आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रखडलेल्या नियुक्त्या व नियोजित परीक्षांसंदर्भात तातडीचा निर्णय घेताना "एसईबीसी'तील विद्यार्थ्यांना "ईडब्ल्यूएस'चा लाभ देता येईल का, असाही प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चचा करून लवकरच निर्णय होईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

आयोगाच्या नियोजित परीक्षा व पदांची संख्या
• राज्य सेवा पूर्वपरीक्षा : 200
• अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा: 806
• अभियांत्रिकी संयुक्त परीक्षा : 217
• अर्जदार अंदाजित विद्यार्थी :7.82 लाख

मंत्रिमंडळ उपसमिती घेईल अंतिम निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे पाठविला आहे. त्यावर अजून निर्णय झाला नसून काही दिवसांत निर्णय होईल. -
डी. एस. करपते, उपसचिव, सामान्य प्रशासन संपादन : श्रीनिवास दुध्याल
https://www.esakal.com/maharashtra/decision-regarding-mpsc-exam-will-be-taken-end-december-386931