Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity RTO AMVI
पुणे येथे आढळलेल्या कोरोनाच्या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगिकरण कक्षात उपचार सुरू. नागरिकांनी घाबरून जाऊ नये; सतर्क राहण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन.दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू.
#CoronaVirusUpdate
Forwarded from Infinity Academy
Most Awaited & Trusted Online test series for MPSC CIVIL Pre Exam 2020 launched by Infinity Acadmey

Registration open on

http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव पुढील नियोजन जाहीर करतील.... सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलन्याची शक्यता
Forwarded from Infinity RTO AMVI
✨"There is will there is way ....!"✨

RTO AMVI MAINS EXAM 2020

नमस्कार मित्रहो, कोरोनासारख्या जागतिक संकटाशी आपला देश झुंज देत असताना आपण सुद्धा घरातुन बाहेर न पडता घरी बसून एक प्रकाराची देशभक्ती च निभावत आहोत....
RTO /AMVI ची पूर्वपरीक्षा झाली असून सर्व students मुख्य परीक्षेच्या तयारी ला लागलेले असतील....घरी बसून स्टडी करताना मनावर थोडा दबाव,भीती असते कारण योग्य मार्गदर्शन शिवाय स्टडी ला दिशा मिळत नाही...हीच भीती घालवण्यासाठी Infinity academy तुमच्यासाठी पुन्हा धावून आली आहे...घरी बसून सुद्धा तुम्ही प्रोफेसर शी कनेक्ट राहू शकता...तुम्हाला आतापर्यँत कळलंच असेल हे कसं तर online video lectures ने....होय बरोबर आम्ही तुमच्यासाठी online lectures घेऊन येत आहोत....परीक्षा जुलै मध्ये होण्याची शक्यता धूसर दिसत आहे...तरी ती पुढे जाऊन तुम्हाला अजून स्टडी ला अजून वेळ मिळेल त्यामुळे मिळालेल्या वेळेचा उपयोग करुण सगळे विषय उत्तमरीत्या तयारी करून घेऊ शकता....
RTO/AMVI 2017 मध्ये तब्बल 153 + selection देणारी आणि महाराष्ट्रात top 10 rankers देणारी आमची Infinity Academy कायम गुणवत्तेशी नाळ जोडून आहे.... Quallity teaching आणि सकारात्मक वाटचाल ह्याच्याशी आम्ही नेहमीच committed आहे....
मुख्य परीक्षेच्या A ,B आणि C section चे online lectures चा कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ....देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती चा विचार करून एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने फक्त 2499/- रुपयांमध्ये आम्ही हा कोर्स तुम्हाला देत आहोत...आणि हा कोर्स घेणाऱ्या students ना देशातील lock down पूर्णपणे कमी झाल्यावर offline lectures चालू झाल्यावर ती फी 100% परत देण्याची हमी आम्ही देत आहोत.....
Quallity शी कोणतीही तडजोड न करता तुम्हाला जास्तीत जास्त गुणवत्ता देण्यासाठी आम्हाला काही वेळ लागेल त्यामुळे आम्ही एप्रिल च्या तीसऱ्या आठवड्यापासून हे lectures चालू करत आहोत...तर तुम्ही सुद्धा सामील व्हा आपल्या ह्या two in one फॉर्मुल्यात... घरी बसून तुम्ही कोरोनाच्या संकटात देशाला साथ देत तुमच्या careerची पण तयारी करू शकता....
ह्या संकटात पण आपल्याकडे ईच्छा असेल तर आपल्याला मार्ग हि दिसेल.....
चला तर मग....
कोरोनाला हरवू,
घरात बसून
आणि career घडवू
online lectures पाहून....

Regards,
Team Infinity
Forwarded from Infinity RTO AMVI
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil PRE Exam 2020
E Books ( Technical + Non Technical) Now available with discounted price on Android App Download the APP Now https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
Forwarded from Infinity Academy
Most Awaited & Trusted Online test series for MPSC CIVIL Pre Exam 2020 launched by Infinity Acadmey

Registration open on

http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil PRE Exam 2020
E Books ( Previous year Question papers with detail solutions ) Now available with discounted price on Android App Download the APP Now https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
Forwarded from Infinity Academy
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षा-२०२०" कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढे ढकलण्यात आली आली आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. परिक्षेची दिनांक नंतर घोषित करण्यात येणार आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या परिक्षार्थ्यांचा यामुळे हिरमोड होणार असला तरी यामुळे हताश होण्यासारखी परिस्थिती नाही. कोणत्याही आपत्तीकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आणि आपत्तीला संयमाने तोंड दिल्यास आपत्ती ही इष्टापत्ती ठरू शकते. एकीकडे कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले जगण्या-मरणाचे संकट तर दुसरीकडे यामुळे अस्ताव्यस्त झालेली जागतिक अर्थव्यवस्था, या दुहेरी आपत्तीला तोंड देणे अपरीहार्य आहे.

प्रत्येक पिढीला कोणत्या ना कोणत्या महासंकटाला तोंड द्यावेच लागते. जगाचा इतिहास पाहिला तर कोणतीही आपत्ती ही शेवटची नसते, उलट मानवाने त्या आपत्तीवर मात केल्याचे आपल्याला दिसून येईल. १७७० मधील बंगालचा दुष्काळ, १८९४ चा प्लेग महामारी, १९२९ ची जागतिक मंदी, १९४७ मधील देशाची फाळणी, १९६२ मधील युध्दाचा काळ, १९७२ चा दुष्काळ, १९७४ मधील देवी (स्मालपॉक्स) महामारी, १९८४ मधील भोपाळ गॅस ट्रेजेडी, १९९१ मधील देशातील बॅलन्स ऑफ पेमेंटचा आर्थिक क्रायसिस, १९९३ मधील मुंबईला झालेले बॉम्बस्फोट आणि त्यामुळे उसळलेल्या दंगली तसेच याच वर्षी झालेला किल्लारी भुकंप, १९९९ मधील कारगिल युध्द, २००१ मधील कच्छ मधील भुकंप, २००४ मधील त्सुनामी, २००५ मधील मुंबई मध्ये आलेला पूर, २००८ मधील मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला तसेच जगभरात आलेली आर्थिक मंदी, २०१३ मधील महाराष्ट्रातील दुष्काळ, २०१९ मधील सांगली, कोल्हापूरचा पूर आणि आता २०२० मधील कोरोना महामारी या सगळ्या संकटांचा सामना माणसाने केला आहे. केवळ सामना केला नाही तर त्यावर मात करून आपले जीवन अधिक समृध्द करण्यासाठी विकास घडवून आणला आहे. मात्र आता कोरोना महामारी मुळे आलेले प्राणसंकट आणि त्याच्या पाठोपाठ येऊ शकणारे आर्थिक मंदीचे संकट यामुळे एकाच वेळी दोन मोठ्या संकटांना तोंड देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या आपत्तीचे निवारण करण्यासाठी डॉक्टर, प्रशासन, शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ आपापले काम करत आहे. त्यामुळे त्याचा अति विचार करून आपल्या हाती काहीच लागणार नाही.

कोणत्याही अभ्यासक्रमाची किंवा स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांनी आलेल्या आपत्तीमुळे खचून न जाता त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे शेअर मार्केट एखाद्या घटनेमुळे कोसळतो मात्र काही काळानंतर मार्केट नवी उभारी घेऊन नवीन उच्चांक निश्चित करते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणारे हे चढ उतार आहेत, जे आपल्याला अधिक संयमी, विचारशील, भावनाप्रधान आणि खंबीर बनवतील. शेअर बाजारचे एक तत्व आहे, जे पडत्या काळात गुंतवणुक करतात, त्यांना चढत्या काळात चांगले लाभ मिळतात. तेच तत्व आपल्या आयुष्यात देखील लागू पडते. या पडत्या काळात आपण कष्टपूर्वक अभ्यासाची गुंतवणूक केल्यास त्याचा लाभ नंतर निश्चित होणार आहे.

कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात जोरदार संशोधन सुरु आहे. लवकरच या प्रयत्नांना यश येईल, अर्थव्यवस्था देखील काही वर्षात ताळ्यावर येईल आणि अशा वेळी आपण “तयार” नसू तर काहीच उपयोग होणार नाही. या संकटामुळे काही नाविन्यपूर्ण उद्योगांना प्रारंभ होणार आहे. ई-लर्निंग, ई-कॉमर्स या क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार आहेत. जागतिक मांडणी देखील Before Corona (BC) आणि After Corona (AC) अशी होणार आहे. आता ई-लर्निंग मुळे जगभरातील ज्ञान आपल्या घरात उपलब्ध झाले आहे. संयम दाखवून आपला अभ्यासाठीचा दिनक्रम ठरवण्याची आता आवश्यकता आहे. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे आणि हा दिवस आयुष्यात पुन्हा येणार नाही, त्यामुळे हा शांततेचा कालावधी आपण कष्ट करून घाम गाळून सत्कारणी लावला तर ज्यावेळी युध्द होणार आहे त्यावेळी रक्त सांडण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.

आयुष्यात जे यश आपल्याला संघर्षाशिवाय मिळते त्या यशाची चव नंतर कमी होते. मात्र संघर्षपूर्वक मिळवलेले यश हे आयुष्यभर आपल्याला प्रेरणादायी ठरते. हा निश्चितच संघर्षाचा आणि आपली तत्वे पणाला लागल्याचा काळ आहे. अशा वेळी नैराश्य दूर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी अनेक चांगली पुस्तके आहेत, ती वाचणे योग्य राहील तसेच यु-ट्युब वर अनेक चांगल्या व्यक्तींचे आत्मचरित्र उपलब्ध आहेत, ती देखील पहावीत. केवळ परिक्षेच्या अभ्यासापेक्षा आयुष्याच्या जडणघडणीसाठी करायचा हा अभ्यास देखील तेवढाच महत्वाचा आहे.

हे ही दिवस जातील, हे लक्षात असू द्या.

सर्वांना शुभेच्छा!

-प्रविण कोल्हे,
अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.
Forwarded from Infinity Academy
😥😥😥 BIG BREAKING : प्रसिद्ध हिंदी अभिनेते इरफान खान यांचं निधन
Forwarded from Infinity Academy
Most Awaited & Trusted Online test series for MPSC CIVIL Pre Exam 2020 launched by Infinity Acadmey

Registration open on

http://infinityacademyindia.com/onlinetest/register.php
Forwarded from Infinity Academy
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🙏

दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! 💐💐
Infinity MPSC Civil, [30.04.20 17:41]
✨✨थोडंसं परखड पण
फक्त तुमच्यासाठीच.......

आम्ही सहसा कोणाबद्दल negative लिहीत नाही पण आज थोडंसं परखड पण फक्त तुमच्यासाठीच लिहीत आहे, Social media चा वाढलेला विस्तार पाहता त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने कसा करता येईल ह्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले गेले....ह्याच धर्तीवर आपल्या Infinity Academy ने Telegram वर महाराष्ट्रा मध्ये MES Civil साठी पहिलं चॅनेल चालू केलं.... आणि ह्याचा उद्देश एकदम निखळ होता....तो म्हणजे शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणे आणि परिक्षेबद्दल त्यांना जागृत करणे....
29 मार्च 2017 रोजी केवळ 10 मुलांच्या समावेशा मध्ये चालू केलेलं हे चॅनेल आज पर्यंत 37,400 subscribers असणार Civil Engineeing मधील पहिलं चॅनेल आहे....
हे सर्व सांगण्याचा उद्देश एकच आहे की आज आम्ही काही परखड मत मांडत आहोत आणि हे वास्तविक खरं आहे.... प्रथमतः whats app, Hike आणि facebook ह्या app वरून मुलांना शैक्षणीक माहिती पुरवली जात होती पण त्या apps ना proper privacy नसल्यामुळे विशेषतः मुलींना खूप प्रॉब्लेम्स येत होते त्यांची नावे ,मोबा नंबर leak होत होते , ह्या सगळ्याला विराम देण्यासाठी टेलिग्राम हे अत्यंत उपयुक्त आहे हे लक्षात घेऊन आम्ही चॅनेल सुरु केले.....
काही दिवसांतच आमचे चॅनेल विद्यार्थीप्रिय होऊन आमचे subscriber वाढू लागले....पण म्हणतात ना "जेव्हा एखाद्याची प्रगती रोखता येत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जात".....अगदी तसच आमच्या बाबतीत झालं... काही अशी विघातक लोक (आताचे सर ) ज्यांना कुणाचंही भलं व्हावं अशी भावना नव्हती अशे लोक आमच्या नावाने चुकीची जाहिरात आणि बऱ्याच Telegram Group मध्ये क्लास किती वाईट आहे हे discuss करू लागले तसेच मुलांना चुकीच्या मार्गाने divert करू लागले (आता त्यांचे स्वतःचे क्लास आहेत ) .....आणि आता तेच लोक स्वतःचे group आणि चॅनेल बनवत आहेत...म्हणजे सरळ सरळ विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे.....
तसेच आपल्याला माहित असेल Infinity Academy ने नाशिक आणि औरंगाबाद ला branch chalu केली आहे आणि Healthy competition असावी असे आम्ही मानतो पण औरंगाबाद मध्ये आम्हाला फार वेगळा अनुभव आला काही झोपडपट्टी ४ ते ५ गुंडानी येऊन आमच्या स्टाफ ला जिवे मारण्याची धमकी दिली आणि पुण्यावरून येऊन ईथे क्लास कसा चालवता अशी धमकी दिली आम्ही रीतसर police Compaint दिली आहे आणि पुढील तपास चालू आहे आणि लवकरच या मागील सूत्रधार जेल मध्ये असेल आम्ही नक्की त्याचा फोटो त्यावेळेस टाकू .....
आज आपण सर्व पाहतो फक्त इंजिनीरिंग साठी टेलिग्राम ला किती grops आणि channel तयार केले आहेत....whats app आणि टेलिग्राम ह्या दोन्ही app चा उद्देश पूर्णपणे भिन्न असून तरीपण दोन्ही app same च काम करत आहेत....सर्व विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्याने आम्ही मुलींना सांगू इश्चितो कि कोणत्याही ग्रुप वर जॉईन होत असताना त्याचा आपल्याला दीर्घ कालपर्यंत काही उपयोग होणार आहे का ,ह्याचा विचार करावा....काही विद्यार्थ्यांचे स्वतःचे असे private ग्रुप असतात, तिथे देखील मुले join होत आहेत, त्यामुळे संख्या वाढून ते ग्रुप काही कुवत नसताना उगाच स्वतः च महत्व वाढवत आहेत...मग तेच ग्रुप पैसे घेऊन (10 ते 12 k) रुपये घेऊन मग बाकी ग्रुप किंवा क्लास ची जाहिरात करतात....म्हणजे तुमच्या शैक्षणीक भावनांचा एक प्रकारे busniness होत आहे... त्यामुळे वेळीच जागे होऊन अश्या ग्रुप पासून अलिप्त व्हा....तसेच काही लोक आपली स्वतःची पोळी भाजावी म्हणून तुम्हाला misguide करून इतर चांगल्या channel वरून तुमची दिशाभूल करत आहेत (Indirect Marketing ) ......मग विचार करा तुमच्या शैक्षणीक जीवनाबरोबर कसा खेळ चालू आहे...
वेळीच सावध व्हा....! आणि असल्या Telegram Group मधून बाजूला व्हा.....