The Infinity Banking
2.83K subscribers
3.12K photos
20 videos
93 files
891 links
The infinity Banking
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा
📚Current Affairs 19 February 2019📚

🎯1. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट
• लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एकाहून एक मोठी भेट देत आहे. मोदी सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.

🎯2. मुंबई विमानतळ ठरले 'सर्वोत्तम इन्फ्रास्ट्रक्चर'
• मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल (टी-२) देशातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) ठरले आहे. 'ईपीएस वर्ल्ड' हा या क्षेत्रातील पुरस्कार विमानतळाला मिळाला आहे.
• छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तासाला सरासरी ४८ विमानांची ये-जा होते. हे देशातील सर्वात व्यस्त, आशियातील १४ वे व जगातील २९ वे सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-19-february-2019/
📚Current Affairs 20 February 2019📚

🎯1. kp bot robo: केरळ: देशातील पहिला रोबो पोलीस कार्यरत
• केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस 'केपी-बॉट'चे उद्घाटन केले.
• केपी-बॉट पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर उभा राहून ड्युटी करणार आहे. केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे.

🎯2. गेलने मोडला आफ्रिदीचा विक्रम, झाला षटकारांचा बादशाह
• तब्बल १८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटपटू ख्रिस गेल याने वेस्ट इंडिजच्या संघात पुनरागमन केले आहे.
• इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. पहिल्याच एकदविसीय सामन्यात गेलने इंग्लडच्या गोलंदाजाची धुलाई करत अनेक विक्रम मोडले.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-20-february-2019/
Forwarded from The Infinity Academy
💥_ यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी अर्जास सुरुवात

👉🏻_ यावर्षी तब्बल 896 जागांसाठी संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरीसेवा पूर्व परीक्षा 2019साठी अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2019 असून पूर्व परीक्षा 2 जून 2019 रोजी होणार आहे.

👉🏻_ संघ लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वर्ग 1 साठी नागरीसेवा परीक्षा घेण्यात येते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. परीक्षेस पात्रतेच्या अटी आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत.

✍️_ उमेदवारांनी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

# https://t.me/letsapp
📚Current Affairs 21 February 2019📚

🎯1. हाफिज सईदच्या संघटनांवर पाकची बंदी
• पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (NSC)ची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
• यात २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची संघटना 'जमात-उद-दावा' आणि त्याला रसद पुरवणारी संस्था 'फलाह-ए-इन्सानियत' फाउंडेशनवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

🎯2. tejas: लष्करप्रमुखांसह 'तेजस'चे पहिले उड्डाण
• भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजसमधून लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी उड्डाण केले. बंगळुरूतील 'एअरो इंडिया २०१९' या कार्यक्रमांतर्गत लष्कर प्रमुखांनी उड्डाण करत स्वदेशी लढाऊ विमानाची पाहणी केली
• शस्त्र निर्माण करणाऱ्या देशातील सरकारी कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने तेजसची निर्मिती केली आहे. फायटर जेटमध्ये उड्डाणापूर्वी रावत यांनी उपस्थित अधिकारी आणि लोकांना हात दाखवत अभिवादन केले.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-21-february-2019/
Forwarded from Infinity Academy
On Student Demand MPSC Civil Engineering Exam 2017 Mock Interview Free Workshop Date :- 23rd Feb 2019 Time 9.30 AM to 1.00 PM
Forwarded from The Infinity Academy
⚡️_ पंतप्रधान मोदींना द. कोरियाकडून सेऊल शांतता पुरस्कार

दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज द. कोरियाच्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांची भेट घेतली. या भेटीवेळी मोदी यांना सेऊल शांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सेऊल शांती पुरस्कार 1990 पासून देण्यात येत आहे. याआधी संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी जगभरातून 1300 नावांच्या शिफारसी आल्या होत्या. पुरस्कार निवड समितीने यामधून 150 उमेदवार निवडले गेले. त्यामधून मोदींचे नाव 'द परफेक्ट कॅन्डिडेट फॉर द 2018 सेऊल पीस प्राईज' निवडले गेले.
📚Current Affairs 22 February 2019📚

🎯1. काश्मिरींवर हल्ले; महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटीस
• पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहे. यामध्ये विविध संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

🎯2. Seoul peace prize: सेऊल शांतता पुरस्कारानं मोदींचा गौरव
• 'गेल्या ४० वर्षांपासून भारत दहशतवादाचा सामना करतो आहे. मात्र आता गप्प राहून चालणार नाही.
• मानवतेवर विश्वास असणाऱ्यांनी एकजूट होऊन दहशतवाद पोसणाऱ्यांचं समूळ उच्चाटन करण्याची वेळ आता आली आहे. तरच जगात शांतता निर्माण होईल,' असं ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेऊल इथं केलं.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-22-february-2019/
Forwarded from The Infinity Academy
😊 ɢooᴅ ᴍᴏʀɴɪɴɢ 😊~

#Thoughts_of_the_day
Forwarded from The Infinity Academy
चर्चेतील माणूस : कायम वादग्रस्त (नवज्योत सिद्धू)
Forwarded from The Infinity Academy
📌_ मटा गाइड : गर्भश्रीमंत ते कर्जबाजारी उद्योजक
Forwarded from The Infinity Academy
🎯_ कुतूहल : वाफेवर चालणारे इंजिन

औद्योगिक क्रांतीचे प्रतीक म्हणजे वाफेवर चालणारे इंजिन.
Forwarded from The Infinity Academy
📰 लोकसत्ता 》व्यक्तिवेध

🎯_ डॉ. शुभाशीष चौधरी

प्रशासन, अध्यापन, संशोधन अशा तिन्ही घटकांचा तोल सांभाळाव्या लागणाऱ्या या पदावर अत्यंत कार्यसक्षम व्यक्तीची आवश्यकता असते.
Forwarded from The Infinity Academy
✍️_ oscar: 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स'ने पटकावला ऑस्कर

👉🏻_ दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स' या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने 'डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

👉🏻_ रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.

जाॅईन करा👉https://t.me/letsapp
Forwarded from The Infinity Academy
🏆_ #Oscar : असे मिळाले पुरस्कार:

🎯_ सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट: रोमा

🎯_ सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री: रेजिना किंग (चित्रपट- इफ बील स्ट्रीट कुड टॉक)

🎯_ सर्वोत्कृष्ट सहअभिनेता: माहर्शाला अली (चित्रपट- ग्रीन बुक)

🎯_ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स

🎯_ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट सब्जेक्ट: पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स

🎯_ सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: फर्स्ट मॅन

🎯_ सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म: स्किन

🎯_ सर्वोत्कृष्ट वेशभुषा: रुथ कार्टर

जाॅईन करा👉https://t.me/letsapp
📚Current Affairs 24 February 2019📚

🎯1. oscar: 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स'ने पटकावला ऑस्कर
• दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स' या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने 'डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

🎯2. शहिदांच्या आठवणीत राष्ट्रीय स्मारक बनवणार, पंतप्रधान मोदींची घोषणा
• पुलावामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्याच्या 10 दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या घटनेनंतर देशात असंतोष असल्याचे मोदींनी म्हटले.
• तसेच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपण संगळ्यानी एकत्र आले पाहिजे असेही मोदींनी म्हटले. मन की बातमध्ये मोदींनी शहिदांच्या आठवणीत राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा केली.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-24-february-2019/
📚Current Affairs 25 February 2019📚

🎯1. राजकुमारी रीमा अमेरिकेत सौदीची राजदूत
• सौदी अरेबियाने शनिवारी अमेरिकेतील सौदीची राजदूत म्हणून राजकुमारी रीमा बिन बंदरा हिच्या नावाची घोषणा केली आहे.
• परदेशात महिला राजदूत नेमण्याची सौदीची ही पहिलीच वेळ आहे असे सांगितले जात आहे.

🎯2. ‘ग्रीन बुक’ची ‘ऑस्कर’वर मोहोर
• चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी रात्री पार पडला.
• यंदाचा ऑस्कर हा ‘ग्रीन बुक’ चित्रपटाने पटकावला आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये एकून पाच नामांकने होती, त्यातल्या तीन पुरस्कारांवर ‘ग्रीन बुक’ने आपली मोहोर उमटवली आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-25-february-2019/
Forwarded from Infinity Academy
🙂 _*पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता*_

💥 _भारताच्या वायू सेनेने आज पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून 200 ते 300 अतिरेकी ठार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्याची माहीती पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे._

_क्षमाशील हो रिपु-समक्ष_
_तुम हुए विनीत जितना ही,_
_दुष्ट कौरवों ने तुमको_
_कायर समझा उतना ही।_

_सच पूछो, तो शर में ही_
_बसती है दीप्ति विनय की,_
_सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।_

Join @infinitympsccvil

👉 _*कवितेचा अर्थ*_
_जो दोषी आहे त्याला माफ करावं असं म्हटलं जातं. परंतु त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना भेकड समजत होते. तसं तुम्ही आम्हाला समजू नका. असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे. खरतर शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे._